सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 130, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१०२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टोपा :- गोवळी-गवळी, गोपाळ.
अर्थ - या श्रीकृष्णाचे प्रेम एवढे मोठे की तो गोपाळांचे उष्टेही खात आहे. १ या कृष्णाचे सोबती
त्याच्या नामाचे चितन व ध्यान करतात. २ त्यांनी आलेल्या डावाचे रक्षण करून वळणाऱ्या गाईंच्या मागेही
धावावे. ३ तुकाराम महाराज भाविकाला म्हणतात, सर्व काळा एका ठिकाणी करा ४
२०३ पैल आली आगी कान्हो काय रे करावें ।
न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥ १ ॥
धांव रे हरी सांपडलों संधीं ।
दोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ २ ॥
अवचितां जाळ येतां देखियेला वरो ।
परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥ ३ ॥
सभोवता फेर रीग न पुरे पळतां ।
तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा - आगी-आग, संधीं-सकटात, रीग-शिरकाव
अर्थ - अरे श्रीकृष्णा, पलीकडे आग पेटली आहे आता आम्ही काय करावे ? आज आमचे जीव कसे
वाचणार हे काही समजत नाही १ अरे श्रीहरी, तू धाव आता. आम्ही मोठ्याच संकटात सापडलो आहोत. या
आगीच्या प्रलयात आम्ही काय करावे हेच आम्हास समजत नाही. तूच काही तरी कर व आम्हांस वाचव २
आम्ही आधी पाठमोरेच होतो, पण वळून पाहताच आगीच्या ज्वाला आम्हास दिसल्या. ३ सगळीकडे आगो एवढा
पसरला आहे की बाहेर पडण्यासाठी शिरकाव करायला कुठे जागाच नाही तुकाराम महाराज म्हणतात, अनंता,
.आता तुला समजेल तसे तू कर. आमचे रक्षण या अग्नीपासून कर. ४
२०४ भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे ।
चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥ १ ॥
बाप रे हा देवांचाही देव कळों ।
नेदी माव काय करी करवो ते ॥ २ ॥
पसरुनि मुख विश्वरूप खाय जाळ ।
सारुनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण ।
कळो आले आतां या सांगातें नाहीं शिण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा :- माव-माया, चमत्कार, संधी-बोटाच्या फटीतून
अर्थ :- ह्यावर श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही मुळीच भिऊ नका. डोळे मात्र झाकून घ्या. हे सर्व संकट देव आता
निवारण करील. यावेळी काही भीती नाही. १ मग गोपाळ मनाशी समजले की अरे बाप रे, हा तर देवांचा ही
देव दिसतो हेच खरे. काय चमत्कार करील ते काही सांगवत नाही. २ मग श्रीकृष्ण विश्वरूप पसरवून सर्व
आग तोंडाने गिळून टाकीत आहे असे सर्व गोपाळांनी हाताच्या बोटाच्या फटीतून पाहिले. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आम्ही मग मागे उगीचच भ्यालो, या श्रीहरीच्या संगतीत कसलाच शीण नाही हे आता आम्हांस कळून
चुकले ४