सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 120, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें९२ सार्थ तुकारामगाथा
चाल चाल रे कान्होबा खेळ मांडूं रानीं ।
बैसवू गोठणीं गाई जमा करुनि ॥ २ ॥
न लगे जावे घरा । चुकलीया येरझारा ।
सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हा ॥ ३ ॥
तुका म्हणे धाले पोट । आता कशाचा घोभाट ।
पाहाणे ते वाट । मागें पुढें राहिली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धाले-सतुष्ट झालो, घणोवटो-मालणावर
अर्थ - सर्व गोपाळ म्हणू लागले की आता या आमच्या प्रभूवर, स्वामीवर आम्ही पूर्णपणे संतुष्ट झालो
आहोत्त, आता आम्हांला दिवसोरीघोषुद्धा जरुरी नाही आता याला एक क्षणभरसुद्धा सोडता कामा नये १ अरे
कान्होबा आता चल ना, रानामध्ये जाऊन आपण आता चांगला खेळ मांडू सर्व गाई एकत्र करुन गोठणात बसवू २
आता घराकडे जाणे सुद्धा नको वाटते देवा तुझ्या संगतीत जन्ममृत्यूच्या येरझारो संपल्या तूच आता आमचा सज्जन,
सोयरा, मायबाप आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही संतुष्ट झालो आहोत आता कसलीच
तक्रारही नाही मागची पुढची वाट पाहण्याचेही कारण उरले नाही ४
१८७ तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥ १ ॥
नाहीं देखिले तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ २ ॥
घरीं ताकाचे सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - न वजो-जाणार नाही
अर्थ - देवा तुझ्या संगतीत आम्हांला भरपूर सुख मिळून आम्ही निश्चित झालो आहोत १ जे सुख
आम्ही कधी पाहिलेही नाही ते आम्ही मिळविले आहे सर्व सुखाचे भोग आम्ही भोगले आहेत २ घरी आमच्या
ताक भरपूर आहे पण येथे कृष्णाच्या संगतीत मात्र चांगल्या लोण्याचे पूर आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात,
आता या श्रीहरीने आम्हांला दूर दवडिले तरी आम्ही जाणार नाही. ४
१८८ कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥ १ ॥
तुझ्या राहिलों आधारें । जालें आपेपेचि बरें ॥ २ ॥
तुझे लागलो संगती । आता येतों काकुळती ॥ ३ ॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कामें-वासनेन भिडा-भिडेन
अर्थ - आम्ही वासनेने फार त्रासलेलो होतो, तिच्या भाम्याखाली बंतगून गलो होतो तिला काही
दयामाया नाही १ पण देवा, आता तुझ्या आधाराने राहिलो तेव्हा मात्र सर्व काही ठीक झाले २ तुझ्या संगतीत
राहिलो म्हणूनच देवा, आता मोठ्या काकुळतेने आम्ही तुला विनवू शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात
कान्होबा, तुझ्या भिडेने आमच्यामागची सर्व पीडा नाहीशी झाली ४
टिपरी-अभंग ७
१८९ खेळ माडियेला वाळवंटीं घाईं । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतोल पायीं रे ॥ १ ॥