सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 129, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 129

सार्थ तुकारामगाथा १०१
शब्दार्थ व टीपा :- बरवें-उत्तम.
अर्थ :- चला आपण सर्व गाई वळून आणू व एका ठिकाणीं बसू. १ आज पुष्कळ पायी चालणे झाल्या-
मुळे व पळपळ फार झाल्यामुळे फारच त्रास वाटत आहे. २ खांद्यावर शिदोरीचे ओझें व पोटांत कडाडून लागलेली
भूक या अवस्थेंत खेळण्याचे सुख कसले ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेळीं श्रीहरीकडे धावून जावे, मग
सर्व उत्तमच होईल. ४
२०० नेणों वेळा काळ । धांलों तुस्यानें सफळ ॥ १ ॥
नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं ।
वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ २ ॥
तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥ ३ ॥
तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- फोल-व्यर्थ.
अर्थ :- श्रीकृष्णा, आम्हांस काळवेळ कांही समजत नाही. केवळ तुझ्या संगतीत आम्ही संतुष्ट झालो
आहोत. १ अरे कृष्णा, आता आम्हांस कसलेही भय नाही. कारण तू आमच्याच गाई रक्षण करून वर आम्हास
खायलाही देतोस. २ तुझ्या भीतीने इतके शब्दही आम्ही खरे म्हणजे बोलू नयेत; ३ कारण तुकाराम महाराज
म्हणतात, असे बोलणेही व्यर्थ आहे असा आमचा अनुभव आहे. ४
विटीदांडू अभंग १
२०१ सारा विटूडांडू । आणीक कांहीं खेळ मांडूं ॥ १ ॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ २ ॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥ ३ ॥
एकमेकां हाफा मारी । सेल जाळी एक घरी ॥ ४ ॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि घांव ॥ ५ ॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥ ६ ॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥ ७ ॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - पाव-पाय, गोविला-गुंतून राहिला, सेल-उत्तम घाटा.
अर्थ :- विटीदांडूचा हा खेळ आता मोडू या. दुसरा काही तरी खेळ खेळू आता आपण. १ सारे डाव
अंगावर आले. पाय कुठेच स्थिर नाही. २ विटी एकदा कोलल्यानंतर व एकदा टोला मारल्यावर ती जो झेलतो
तो गुंतून राहतो. ३ गडी एकमेकांस हाका मारतात व खेळका घाटा हातात धरतात ४ ज्यांच्यावर राज्य आले
किंवा जे खेळण्यास तयार झाले त्यांची धावपळ काही चुकत नाही. ५ एक पुढे धावतो, दुसरा मागे धावतो, दोघांनाही
धावांवे लागतेच ६ कित्येकांना धावण्याची हौस असते तर कित्येकांना धावताना हात पिटावा लागतो. त्यांना
त्याचा शीण होतो. ७ तुकाराम महाराज म्हणतात, हा खेळ आता मोडून टाकावा हे बरे. ८
२०२ पाहातां गोवळी । लाय त्यांची उपटावळी ॥ १ ॥
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होवाचें ध्यान ॥ २ ॥
आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥ ३ ॥
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥ ४ ॥