दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
३ रा. ] आध्यात्मिक ताप. ६३
गतां कासाविस । या नांव आध्यात्मिक ॥ ३३ ॥ उसळला दम आणि
धाप । पडजीभ डेंसीं¹ । आणि कफ । मोठा वातज्वर आणि संताप । या
नांव आध्यात्मिक ॥ ३४ ॥ कोणीं सेंदूर घातला । तेणें प्राणी निर्बुजलां² ।
घशामध्यें फोड आला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५ ॥ गळसोळ्या³ आणि
जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे । दंतहीन लागती किडे । या नांव
आध्यात्मिक ॥ ३६ ॥ जरंडी⁴ घोलाणीं⁵ गंडमाळा । अवचितां स्वयें फुटे
डोळा । आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७ ॥ कळा
तिडका लागती । कां ते दंत उन्मळती । अधर जिव्हा रगडती । या नांव
आध्यात्मिक ॥ ३८ ॥ कर्णदुःख नेत्रदुःख । नाना दुःखें घडे शोक । गर्भाध
आणि नपुंसक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९ ॥ फुलें वडस⁶ आणि पडळें⁷ ।
कीड गैतां⁸ रातांधळें । दुश्चित अमिष्ट आणि खुळें । या नांव आध्यात्मिक
॥ ४० ॥ मुकें बधिर राखोडें⁹ । थोंटें चळलें आणि वेडें । पांगुल कुन्हें¹⁰ आणि
पोंवडें¹¹ । या नांव आध्यात्मिक ॥ ४१ ॥ तौरेसें¹² थुलें¹³ कान केरें¹⁴ । गोरोळें¹⁵
जमुन¹⁷ टॉपरें¹⁸ । पडांगुळें¹⁹ गेंगाणें²⁰ विदरें²¹ । या नांव आध्यात्मिक ॥ ४२ ॥
दांतरें बोतरें घाणाळें²² । घ्राणहीन श्रोत्रहीन बैरेंळ²³ । अतिकृश अतिस्थूळ । या
नांव आध्यात्मिक ॥ ४३ ॥ तोतिलें बोबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटिल ।
मत्सरी खादाड तपिळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४ ॥ संतापी अनुतापी
मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी । पापी अवगुणी विकारी । या नांव आ-
ध्यात्मिक ॥ ४५ ॥ उसव ताठा²⁴ करक । आवंटलें²५ आणि चरकें²६ । सुजी आणि
चाळकें । या नांव आध्यात्मिक ॥ ४६ ॥ सलें²⁷ आडवें गर्भपात । स्तन गुंतलें
१. कोरटा खोकला. २. घाबरला. ३. गळ्यापाशीं होणारा रोग. ४. पानथरी.
५. बुणबुणा. ६. हिरड्यांतून सुटतात. ७. मोतीबिंदु. ८. डोळे चांगले असून दिसत
नाहीं तो रोग. ९. जन्मतः ओंठतुटकें. १०. कुबडें. ११. पांगळें. १२. तारडोळें.
१३. मान तुलकावीत पाहणारें. १४. काणें. १५ तिरखें, चकणें. १६. घारेडोळें. १७.
ढेंगणें. १८. ठेंचाळत चालणारें. १९. सहाबोटांचें. २०. नाकांतून बोलणारें
२१. कुरूप. २२. मोठ्या नाकाचें. २३. बडबटणारें. २४. मान ताठरणें. २५.
जबड्याची सूज. २६. पायाचे सांधे धरतात तो रोग. २७. वाढ खुंटलेला
पोटांतील गर्भ.
६४ श्रीदासबोध. [ दशक
सन्निपात । संसारकोडें अपमृत्यु । या नांव आध्यात्मिक ॥ ४७ ॥ नखविष
आणि हिंगुरडें । ब्राचड आणि बावडें । उगीच दांतखीळ पडे । या नांव आ-
ध्यात्मिक ॥ ४८ ॥ झडती पाँती सुजती भोंवया । नेत्रीं होती रांजणवाडया ।
चाळसी लागे प्राणिया । या नांव आध्यात्मिक ॥ ४९ ॥ वांगें तिल सुरुमे
लाँसें । चामखीळ गलंडे म्हैंसे । चुंकुर होईजे मानसे । या नांव आध्या-
त्मिक ॥ ५० ॥ नाना फुगे आणि आवाळें । अंगीं दुर्गंधी प्रबळे । चाईंचाटी
लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१ ॥ नाना चिंतेचीं १० काजळी ।
नाना दुःखें चित्त पोळी । व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥५२॥
वृद्धपणींच्या आपदा । नाना रोग होती सदा । देह क्षीण सर्वथा । या
नांव आध्यात्मिक ॥ ५३ ॥ नाना व्याधि नाना दुःखें । नाना भोग नाना
खांडकें । प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४ ॥ ऐसा आ-
ध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप । सांगतां सरेना अमूप । दुःखसागर
॥ ५५ ॥ बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें । पुढें बोलिलें स्वभा-
वें । आधिभौतिक ॥ ५६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीय-
दशके आध्यात्मिकतापनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. आधिभौतिक ताप.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां झालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण ।
आतां आधिभौतिक तो कोण । सांगिजेल ॥ १ ॥ श्लोक ॥ सर्वभूतैर्देहयोगा-
त्सुखं दुःखं यदाप्यते ॥ द्वितीयं तं विजानीयात्संतापं चाधिभौतिकम् ॥ १ ॥
टी० ॥ सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे । सुखदुःख उपजों
लागे । या नांव आधिभौतिक ॥ २ ॥ तरी आधिभौतिकाचें लक्षण । प्रांज-
ळ करूं निरूपण । जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३ ॥
ठेंचा लागती मोडती कांटे । वाजती शस्त्रांचे घायें १२ बोंबे । सलें शिळका आणि
१. संसारांतील अडचणी. २. एक तऱ्हेचा फोड. ३. पापण्या. ४. मुरमाच्या
पुळ्या. ५. पांढरे चट्टे. ६. लासरूं. ७. मांसाचा एक प्रकारचा फुगा. ८.
अरिष्ट. ९. केंस झडतात तो रोग. १०. चिंतेनें येणारा काळसरपणा. ११.
पुष्कळ. १२. घाव. १३. अंगांत घस अडकून राहणें.
३ रा.] आधिभौतिक ताप. ६५
सरांटे । या नांव आधिभौतिक ॥ ४ ॥ आग्या आणि काचकुहिरी । अैवचट
लागे शरीरीं । गांधील येऊन दंश करी । या नांव आधिभौतिक ॥ ५ ॥
मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दंशी । सोट जळू लागे
पायांसीं । या नांव आधिभौतिक ॥ ६ ॥ पिसा पिसोळें चांचणें । कुसळें
सुंगळे देंकूण । विसीफें भौंवर गोंचीउ जान । या नांव आधिभौतिक
॥ ७ ॥ गोमी विंचू आणि विखार । व्याघ्र लांडगे आणि सूँकर । गोसांयाल
आणि सॉमर । या नांव आधिभौतिक ॥ ८ रानगाई रानम्हैसे । रानशकटें
आणि रिक्षें१० । रानहस्ती लांवपिसें । या नांव आधिभौतिक ॥ ९ ॥ सुस-
रीनें ओढून नेलें । कां तें अवचित बुडालें । अथवा खळाळीं पडिलें । या
नांव आधिभौतिक ॥ १० ॥ नाना विखारें अजगर । नाना मगर जळचर ।
नाना वनचरें अपार । या नांव आधिभौतिक ॥ ११ ॥ अश्व वृषभ आणि
खैर१२ । श्वान सूकर जंबूक१३ मार्जार । ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आधिभौ-
तिक ॥ १२ ॥ ऐसीं कर्कशें भयानकेँ । बहुविध दुःखदायकें । दुःख दारुण
अनेकें । या नांव आधिभौतिक ॥ १३ ॥ भिंती माळवदें पडती ।
कडे भुयारीं कोसळती । वृक्ष अंगावर मोडती । या नांव आधिभौ-
तिक ॥ १४ ॥ कोणी एकाचा शाप जडे । कोणी एकें केलें चेडें१५ ।
अधांतरीं होती वेडे । या नांव आधिभौतिक ॥ १५ ॥ कोणी
एकें चाळविलें । कोणी एकें भ्रष्टविलें । कोणी एकें धरूनि नेलें । या
नांव आधिभौतिक ॥ १६ ॥ कोणी एकें दिधलें विष । कोणी एकें
लाविले दोष । कोणी एकें घातले पाश । या नांव आधिभौतिक ॥ १७ ॥
अवचितां शेर लागला । नेणो बिबवा चिडला । प्राणी धुरें जाजावला१६ ।
या नांव आधिभौतिक ॥ १८ ॥ इंगळावरी पाय पडे । शिळेखालीं हात
सांपडे । धावतां अडखळोनि पडे । या नांव आधिभौतिक ॥ १९ ॥ वाँपी
१. एक पाला, यानें अंगाची आग होते. २. खाजरी कुयरी, हिने अंगास
खाज सुटते. ३. अकस्मात. ४. चिलट. ५. इसव. ६. रानडुक्कर. ७. साळू पक्ष्याची
जात. ८. सांबर. ९. गवे १०. अस्वलें. ११. डंखिणीपासून लागलेलें वेड. १२.
माढव. १३. कोल्हा. १४. धाब्याचें छप्पर. १५. चेटक. १६. कासावीस झाला.
१७. विहीर.
६६ श्रीदासबोध. [ दशक
कूपें सरोवर । गैतां कडा नदीतीर । अवचितें पडे शरीर । या नांव आधि-
भौतिकु ॥ २० ॥ दुर्गाखालें कोसळती । तेणें दुःखें आक्रंदती । झाडावरुनि
पडती । या नांव आधिभौतिक ॥ २१ ॥ शीतें ओंठ तडकती । हात पाय
टांचा फुटती । चिखल्याँ जिव्हाळ्या लागती । या नांव आधिभौतिक ॥
२२ ॥ अशनपानाचिये वेळे । उष्णरसें जिव्हा पोळे । दांत करकरे आणि
हरळे । या नांव आधिभौतिक ॥ २३ ॥ पराधीन बाळपणीं । कुशब्मार
जाचणी । अन्नवस्त्रांविण आळणी । या नांव आधिभौतिक ॥ २४ ॥ सासुर-
वास गांलोरे । ठणके लोंसगें चिमोरे१० । आलें रुदन न धरे । या नांव
आधिभौतिक ॥ २५ ॥ चुकतां कान पिळिती । कां डोळां हिंग घालिती ।
सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आधिभौतिक ॥ २६ ॥ नानाप्रकारचे
मार । दुर्जन मारिती अपार । दुरी अंतरे माहेर । या नांव आधिभौतिक ॥
२७ ॥ कर्ण नासिक विंधिलें । बळेंचि धरूनि गोंदिलें । खोडी जाया पोळ-
विलें । या नांव आधिभौतिक ॥ २८ ॥ परचक्रीं धरूनि नेलें । नीच यातीस
दधिलें । दुर्दशा होऊनि मेलें । या नांव आधिभौतिक ॥ २९ ॥ नाना रोग
उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले । वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव
आधिभौतिक ॥ ३० ॥ नाना व्यथेचें निरसन । व्हावया औषध दारुण ।
बलात्कारें देती जाण । या नांव आधिभौतिक ॥ ३१ ॥ नाना वल्लींचे रस ।
काढे गरगोंडे कर्कश । घेतां होय कासाविस । या नांव आधिभौतिक ॥ ३२ ॥
ढाळ आणि उळाळें देती । पथ्य कठिण सांगती । अनुपान चुकतां वि-
पत्ती । या नांव आधिभौतिक ॥ ३३ ॥ फाड रक्त आणि फांसैणी१३ । गुल-
डागोंची जाचणी । तेणें दुःखें दुखवे प्राणी । या नांव आधिभौतिक ॥ ३४ ॥
रुचिकें विबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती । शिरा तोडिती जळवा
लाविती । या नांव आधिभौतिक ॥ ३५ ॥ वहु रोग बहु औषधें । सांगतां
अपार अगाधें । प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आधिभौतिक ॥ ३६ ॥
१. कुवा. २. खाडा. ३. पाण्यांत बागण्यानें बोटांच्या मधील जागा सडते,
तो रोग ४. खाण्यापिण्याचे. ५. वेगळा होतो. ६. सुकून जाणे. ७. गालगुच्चे. ८.
ठोसे. ९. डागणें. १०. चिमटे. ११. पुष्कळ वाने घालून केलेले पातळ औषध.
१२. उलटीचें औषध. १३. शस्त्राने गांठी चिरणे. १४ चोंचे. १५. रुईचा चीक.
३ रा. ] आधिभौतिक ताप. ६७
बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी । नाना यातना चतुरीं ।
आधिभौतिक जाणिजे ॥ ३७ ॥ दरवडे घालुनियां जना । तस्करें¹ करिती
यातना । तेणें दुःख होय मना । या नांव आधिभौतिक ॥ ३८ ॥ अग्नी-
चेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें आरंवेळे² । हानि झाली विव्हळे । या नांव आधि-
भौतिक ॥ ३९ ॥ नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें । दिव्यांबरें³
मनोहरें । दग्ध होती ॥ ४० ॥ नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना
स्वार्थीं⁴ । नाना पात्रें नाना अर्थीं⁵ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१ ॥ अग्नि
लागतां शेतीं । धान्यें बणंग्या⁶ खडकुती⁷ । इक्षुदंड⁸ जळोनि जाती । अकस्मात
॥ ४२ ॥ ऐसा अग्नि लागला । अथवा कोणीं लाविला । हानि झाली कां
पोळला । या नांव आधिभौतिक ॥ ४३ ॥ ऐसे सांगतां बहुत । होती
वन्हीचे आघात⁹ । तेणें दुःखें दुखवे चित्त । या नांव आधिभौतिक ॥ ४४ ॥
हारपे विसरे आणि सांडे । नासे गाहाळे फुटे पडे । असाध्य होय कोणी-
कडे । या नांव आधिभौतिक ॥ ४५ ॥ प्राणी स्थानभ्रष्ट झाले । नाना पशु
ते चुकले । कन्या पुत्र गाहाळले । या नांव आधिभौतिक ॥ ४६ ॥ तस्कर अ-
थवा दावेदार । अवचितें करिती संहार । लुटती घरें नेती खिल्लारें¹⁰ । या नांव
आधिभौतिक ॥ ४७ ॥ नाना धान्यें केळीं कापिती । पानमळा¹¹ नीट घालिती ।
ऐसे नाना आघात करिती । या नांव आधिभौतिक ॥ ४८ ॥ मैंद उचले
खोंनोरी¹² । सुवर्णपथी¹³ भुरेरेंकरी¹⁴ । ठैकु¹⁵ सिंतैह¹⁶ वर्रंपेकरी¹⁷ । वरपा घालिती
॥ ४९ ॥ गठीसोर्ट¹⁸ द्रव्य सोडिती । नाना अलंकार काढिती । नाना वस्तु
मूँषक¹९ नेती । या नांव आधिभौतिक ॥ ५० ॥ वीज पडे हिंव पडे ।
आणि पर्जन्यों सांपडे । कां तो महापुरीं बुडे । या नांव आधि-
भौतिक ॥ ५१ ॥ भोवरे वँळणें²⁰ आणि धार । वोसैंणें²¹ लाटा अपार ।
१. चोर. २. तळमळतो. ३. उंची वस्त्रे ४. काये. ५. वस्तु ६. भाताची अथवा
गवताची गंज. ७. प्रखर उन्हानें जळून गेलेलें शेत. ८. ऊंस. ९. धक्के १०. गुरें-
ढोरें. ११. पानेवेलीच्या मळ्यास. १२. खानचोर. १३. किमयागार. १४. जादू-
गार. १५. ठक. १६. फसविणारा. १७. लुटारु. १८. भामटा. १९. उंदीर.
२०. नदीचा बांक, धरण. २१. पुरांमधील केरकचरा.
.६८ श्रीदासबोध. [ दशक
वृश्चिव गोंवी अजगर । वाहूनि जाती ॥ ५२ ॥ तयामध्यें प्राणी
सांपडला । खडकीं बेटीं² आडकला । बुडत बुडत वांचला ।
या नांव आधिभौतिक ॥ ५३ ॥ मनासारिखा नसे संसार । कुरूप
कर्कश स्त्री क्रूर । विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नांव आधिभौतिक ॥ ५४ ॥
भूत पिशाच लागलें । अंगावरून वारें गेलें । अबद्ध³ मंत्रें प्राणी चळलें ।
या नांव आधिभौतिक ॥ ५५ ॥ ब्राह्मणसंबंध शरीरीं । बहुसाल पीडा
करी । शनैश्चराचा⁴ धोका धरी । या नांव आधिभौतिक ॥ ५६ ॥ शिंक
पिंगळा आणि पाली । वोखंटे होला काक⁶ कलाली⁷ । चित्तीं काळजी
लागली । या नांव आधिभौतिक ॥ ५७ ॥ नाना ग्रह काळ वार । काळ-
तिथि घातचंद्र । काळवेळ घातनक्षत्र । या नांव आधिभौतिक ॥ ५८ ॥
दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला । दुःस्वप्नें जाजावला ।
या नांव आधिभौतिक ॥ ५९ ॥ भालुं भुंके श्वान रडे । पाली अंगावरी
पडे । नाना चिन्हैं चिंता पवाडे । या नांव आधिभौतिक ॥ ६० ॥ बाहेर
निघतां अपशकुन । नाना प्रकारीं विच्छिन्न । तेणें गुणें भंगे मन । या नांव
आधिभौतिक ॥ ६१ ॥ प्राणी बंदीं सांपडला । यातने वरपडां⁹ जाहंला
नाना दुःखै दुखावला । या नांव आधिभौतिक ॥ ६२। प्राणी राजदंड
पावत⁸ । जेरबंद चाबुक वेत । दरेमार¹⁰ तळवेमारें¹¹ होत । या नांव आधिभौ-
तिक ॥ ६३ ॥ कोरडे पारंब्या फोक । बहु प्रकार अनेक । बहु ताडिती
आधिभौतिक । या नांव बोलिजे ॥ ६४ ॥ मोगरीमार¹² बुधलेमार¹³ । चौखै-¹⁴
रूनि डंगारणेमारें¹⁵ । बुक्या गचांड्या गुडघेमार । या नांव आधिभौतिक
॥ ६५ ॥ लाता चपराका शेणमार । कानखडे दगडमार । नाना प्रकारोंचे
मार । या नांव आधिभौतिक ॥ ६६ ॥ टांगणें टिप्पऱ्या¹⁶ पिछोडे¹⁷। बेडी
१. घोणी. २. झाडाचे वनांत. ३. विसंगत; प्रयोगांत चूक झाला असा. ४. शनि-
ग्रहाचा. ५. वाईट, अपशकुनी. ६. कावळा ७. कोल्हा. ८. प्राप्त होते. ९. प्राप्त
झाला. १०. दरींत लोटून मारणें. ११. तापलेल्या तव्यावर अनवाणी उभे करणें.
१२. गुदद्वारीं मेख ठोकून मारणें. १३. दारू भरलेल्या बुधल्यास बांधून
दारू पेटवून मारणें. १४.- चोहीं बाजूंनीं ताणून. १५. बडग्यांनीं मारणें, १६-
चाप. १७. मुसक्या.
३ रा. ] आधिभौतिक ताप. ६९
बुधनौल कोलदांडे । रक्षण निग्रह चहूंकडे । या नांव आधिभौतिक
॥ ६७ ॥ नाकवैणी चुनवैणी । मिठवणी रायवैणी । गुळवणी यांची
जाचणी । या नांव आधिभौतिक ॥ ६८ ॥ जलामध्यें बुचकळती । हस्ती-
पुढें बांधून ताकिती । हांकिती छळती यातायाती । या नांव आधिभौतिक
॥ ६९ ॥ कर्णच्छेद घ्राणच्छेद । हस्तच्छेद पादच्छेद । जिव्हाच्छेद अधर-
च्छेद । या नांव आधिभौतिक ॥ ७० ॥ तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण
काढिती । नखोनखीं सुया मारिती । या नांव आधिभौतिक ॥ ७१ ॥
पारंड्यामध्ये घालणें । कां कडेलोट करणें । कां भांड्यामुखीं उडवणें । या
नांव आधिभौतिक ॥ ७२ ॥ भोतें आणि बोटोबोटीं । अथवा गळ लागणें
कंठीं । सांडस लावूनि आटाआटी । या नांव आधिभौतिक ॥ ७३ ॥
शिसें पाजणें विष देणें । अथवा शिरच्छेद करणें । कां पायांतळीं घालणें ।
या नांव आधिभौतिक ॥ ७४ ॥ कानीं खुंट्या आदळती । अपानीं मेखा
मारिती । साल काढोनि टाकिती । या नांव आधिभौतिक ॥ ७५ ॥ सरंडे
मांजरें भरिती । अथवा फांसीं नेऊन देती । नानापरी पीडा करिती ।
या नांव आधिभौतिक ॥ ७६ ॥ श्वानप्रलय व्याघ्रप्रलय । भूतप्रलय सुसरी-
प्रलय । शस्त्रप्रलय वीजप्रलय । या नांव आधिभौतिक ॥ ७७ ॥ शिरा
वोढोनि घेती । टेंभे लावूनि भाजिती । ऐशा नाना विपत्ती । या नांव
आधिभौतिक ॥ ७८ ॥ मनुष्यहानि वित्तहानि । वैभवहानि महत्त्वहानि ।
पशुहानि पदार्थहानि । या नांव आधिभौतिक ॥ ७९ ॥ बाळपणीं मरे
माता । तरुणपणीं मरे कांता । वृद्धपणीं मरण सुता । या नांव आधिभौतिक
॥ ८० ॥ दुःख दारिद्र्य आणि ऋण । विदेशपळणी नागवेण । आपदा
१. झाडाच्या बुंधाशीं नालाकृति करून बांधून मारणें. २. पायांत हात अडकवून
बांधून गुडघ्यांत दांडा घालणें. ३. पहारा. ४. बंदी. ५. नाकांत ओतावयाचें तीक्ष्ण
औषध. ६. पिण्यास देण्याचें चुन्याचें पाणी. ७. मोहरींचें पाणी. ८. गुळाचें
पाणी. ९. मनुष्याचें वजन कमी होत जाईल असे हाल करणें. १०. तोफेचें तोंडीं.
११. नखापासून शेंडीपर्यंत अंगाची चामडी काढणें. १२. चिमटे. १३. इमारतीच्या
पायामध्यें जिवंत पुरणें. १४. गुदद्वारीं. १५. विजारींत सरडे घालून ती नेसवि-
तात. १६. खवळलेलें मांजर व माणूस एके जागीं कोंडणें. १७. दरवडा.
७० श्रीदासबोध. [ दशक
अनुपत्ती कदांन्न । या नांव आधिभौतिक ॥ ८१ ॥ आकांत वाखा प्रळय ।
युद्धीं होतां पराजय । जिवलगांचा होय क्षय । या नांव आधिभौतिक
॥ ८२ ॥ कठिण काळ आणि दुष्काळ । साशंकै आणि वोखटी वेळ । उद्वेग
चिंतेची हळहळ । या नांव आधिभौतिक ॥ ८३ ॥ घाणाचरकीं शिरकला ।
चाकाखालीं सांपडला । नाना वन्हींत पडियेला । या नांव आधिभौतिक
॥ ८४ ॥ नाना शस्त्रें भेदिला । नाना श्वापदें भक्षिला । नाना बंदीं पडि-
येला । या नांव आधिभौतिक ॥ ८५ ॥ नाना कुवासें निर्बुजे । नाना अप-
मानें लाजे । नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आधिभौतिक ॥ ८६ ॥
ऐसे सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर । श्रोतीं जाणावा विचार ।
आधिभौतिकाचा ॥ ८७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके
आधिभौतिकतापनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. आधिदैविक ताप.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला आध्यात्मिक । त्या उपरी आधिभौ-
तिक । आतां बोलिजेल आधिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥ श्लोक ॥ शुभा-
शुभैः कर्मभिस्तैर्देहांते यमयातना । स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं विद्ध्याधि-
दैविकम् ॥ १ ॥ टी० ॥ शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना । स्वर्ग
नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २ ॥ नाना दोष नाना पातकें ।
मदांधपणें अविवेकें । केलीं परी तीं दुःखदायकें । यमयातना भोगविती ॥
३ ॥ अंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें । नाना सामर्थ्यांचेनि बळें ।
अकृत्यें करिती ॥ ४ ॥ नीति सांडोनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां ।
यमयातना भोगितां । जीव जाय ॥ ५ ॥ ⁵डोळे झांकूनि स्वार्थबुद्धी । नाना
अभिलाष कुबुद्धी । ⁶वृत्तिभूमीसि साधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६ ॥ मातले-
पणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात । ⁷अप्रमाणं क्रियां करित । म्हणोनियां
यमयातना ॥ ७ ॥ मर्यादा सांडोनियां चालती । ग्राम दंडी ग्रामाधिपती ।
देश दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८ ॥ देशाधिपतीसि दंडी
१. कंगालपणा. २. हलक्या प्रतीचें अन्न. ३. अडचणीची. ४. घाबरतो. ५
दुर्वर्तन. ६. वतन. ७. अशारू, गैर.
३ रा. ] आधिदैविक ताप. ७१
राव । रायासि दंडिता देव । राजा न करितां नीतिन्याय । म्हणोनियां यम-
यातना ॥ ९ ॥ अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी होऊनि राहे । रा-
ज्यांतीं नरक आहे । म्हणोनियां ॥ १० ॥ राजा सांडितां राजनीति । तयासि
यम गांजिती । यमें नीति सांडितां धांवती । देवगण ॥ ११ ॥ ऐसी मर्या-
दा लाविली देवें । म्हणोनि नीतीनें वर्तावें । नीति न्याय सांडितां भोगा-
वें । यमयातनेसी ॥ १२ ॥ देवें प्रेरिले यम । म्हणोनि आधिदैविक नाम ।
तृतीय ताप दुर्गम । यमयातनेचा ॥ १३ ॥ यमदंड यमयातना । शास्त्रीं
बोलिले प्रकार नाना । तो भोग कदापि चुकेना । या नांव आधिदैविक ॥
१४ ॥ यमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद । शरीरीं घालुनि प्रमा-
द । नानाप्रकारें ॥ १५ ॥ पापपुण्याचीं शरीरें । स्वर्गीं असती कलेवरें¹ ।
त्यांत घालोनि नानाप्रकारें । पापपुण्यें भोगविती ॥ १६ ॥ नाना पुण्यें
नाना विलास । नाना दोषें यातना कर्कश । शास्त्रीं बोलिलें अविश्वास ।
मानूंचि नये ॥ १७ ॥ वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती । त्यांस
यमयातना करिती । या नांव आधिदैविक ॥ १८ ॥ अक्षोभ नरकीं उदंड
जीव । जुनाट किडे करिती रवरव । बांधोनि टाकिती हातपाव । या नांव
आधिदैविक ॥ १९ ॥ उदंड पेंस² लहान मुख । कुंभाकार कुंड एक । दुर्ग-
धी उकाडा कुंभिपाक । या नांव आधिदैविक ॥ २० ॥ तप्तभूमिका तौविती³ ।
जळत स्तंभ पोटा लाविती । नाना सांडर्स⁴ लाविती । या नांव आधिदैविक
॥ २१ ॥ यमदंडाचे उदंड मार । यातनेची सामुग्री अपार । भोग भोगिती
पापी नर । या नांव आधिदैविक ॥ २२ ॥ पृथ्वीमध्यें मार नाना । त्यांहून
कठिण यमयातना । मारितां उसंत⁵चि असेना । या नांव आधिदैविक
॥ २३ ॥ चोघे चहूकडे वोढिती । एक ते झोंकून पाडिती । ताणिती मा-
रिती वोढून नेती । या नांव आधिदैविक ॥ २४ ॥ उठवेना बैसवेना । रड-
वेना पडवेना । यातनेवरी यातना । या नांव आधिदैविक ॥ २५ ॥ आ-
क्रंदे रडे आणि फुंजे⁶ । धकाधकीनें निर्बुजे । झुरझुरोन पंजर⁷ होऊनि झिजे ।
या नांव आधिदैविक ॥ २६ ॥ कर्कश वचन कर्कश मार । यातनेचे नाना
१. शरीरें. २. आंतील अवकाश, जागा. ३. तापवितात. ४. चिमटे. ५.
विसांवा. ६. उसासे देऊन दुःख करतो. ७. हाडांचा पिंजरा.
७२ श्रीदासबोध.
प्रकार । त्रास पावती दोषी नर । या नांव आधिदैविक ॥ २७ ॥
बोलिला राजदंड । त्याहूनी यमदंड उदंड । तेथील यातना प्रचंड ।
रूपें कर्कश ॥ २८ ॥ आध्यात्मिक आणि आधिभौतिक । त्याहूनी
आधिदैविक । अल्पसंकेतें कांहींएक । कळावया बोलिलों ॥ २९
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके आधिदैविकतापनिरूप-
अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. मृत्यु.
श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हणजे सर्वोचि स्वार । नाहीं २
उधारें । मार्गी लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १ ॥ नित्य काळाची
नकळे होणाराची गती । कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देशीं १
॥ २ ॥ सरतां संचितांचा३ शेष । नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां
निमेष । जाणें लागे ॥ ३ ॥ अवचित काळाचे म्हणियारे४ । मारीत
एकसरें । नेऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४ ॥ होतां मृत्यूची
आटी । कोर्णी घालूं न शकती पाठीं । सर्वत्रांस कुटाकुटी । मार्गे पुढें
॥ ५ ॥ मृत्युकाळ काठी निकी । वैसे वळियांचे५ मस्तकीं । महाराजे
लोकीं । राहों न शकती ॥ ६ ॥ मृत्यु न म्हणे हा क्रूर । मृत्यु न ६
झुंझार । मृत्यु न म्हणे हा संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७ ॥ मृत्यु
हा कोपी । मृत्यु न म्हणे हा प्रतापी । मृत्यु न म्हणे हा उग्ररूपी
खळ ॥ ८ ॥ मृत्यु न म्हणे कीं हा बलाढ्य । मृत्यु न म्हणे हा ध
मृत्यु न म्हणे हा आढ्य७ । सर्व गुणें ॥९॥ मृत्यु न म्हणे हा विख्यात
न ह्मणे हा श्रीमंत । मृत्यु न ह्मणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १० ॥
म्हणे हा भूपती । मृत्यु न म्हणे हा चक्रवर्ती । मृत्यु न म्हणे हा कव
कैवाडे८ जाणे ॥ ११ ॥ मृत्यु न म्हणे हा हयपती । मृत्यु न म्हणे ग
पती । मृत्यु न म्हणे हा भूपती । विख्यात राजा ॥ १२ ॥ मृत्यु
हा वरिष्ठ जनीं । मृत्यु म्हणे राजकारणी । मृत्यु न ह्मणे हा चे
१. भयंकर. २. वायदा. ३. प्रारब्धाचा सांठा. ४. सेवक. ५. बळ
६. योद्धा. ७. संपन्न. ८. कारस्थान.
३ रा. ] मृत्यु. ७३
वेतनधर्ता ॥ १३ ॥ मृत्यु न ह्मणे हा देसाई । मृत्यु न ह्मणे हा व्यवसायी१ ।
मृत्यु न ह्मणे ठायीं ठायीं । पुंड राजे ॥ १४ ॥ मृत्यु न ह्मणे मुद्राधारी ।
मृत्यु न ह्मणे व्यापारी । मृत्यु न ह्मणे परनारी । राजकन्या ॥ १५ ॥ मृत्यु
न ह्मणे कार्यकारण । मृत्यु न म्हणे वर्णावर्ण । मृत्यु न म्हणे हा ब्राम्हण ।
कर्मनिष्ठ ॥ १६ ॥ मृत्यु न म्हणे हा व्युत्पन्न२ । मृत्यु न म्हणे हा संपन्न३ ।
मृत्यु न म्हणे हा विद्वज्जन । समुदायीं ॥ १७ ॥ मृत्यु न म्हणे हा धूर्त ।
मृत्यु न म्हणे हा बहुश्रुत । मृत्यु न म्हणे हा पंडित । महा भला ॥ १८ ॥
मृत्यु न म्हणे हा पुराणिक । मृत्यु न म्हणे हा वैदिक । मृत्यु न म्हणे हा
याज्ञिक । अथवा जोशी ॥ १९ ॥ मृत्यु न म्हणे हा अग्निहोत्री । मृत्यु न
म्हणे हा श्रोत्री४ । मृत्यु न म्हणे हा मंत्रयंत्री । पूर्णगामी५ ॥ २० ॥ मृत्यु
न म्हणे हा शास्त्रज्ञ । मृत्यु न म्हणे वेदज्ञ । मृत्यु न म्हणे सर्वज्ञ । सर्व
जाणे ॥ २१ ॥ मृत्यु न म्हणे ब्रह्महत्या । मृत्यु न म्हणे गोहत्या । मृत्यु न
म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२ ॥ मृत्यु न म्हणे रागज्ञानी६ ।
मृत्यु न म्हणे तालज्ञानी । मृत्यु न म्हणे तत्त्वज्ञानी । तत्त्ववेत्ता ॥ २३ ॥
मृत्यु न म्हणे हा योगाभ्यासी । मृत्यु न म्हणे संन्यासी । मृत्यु न म्हणे
काळासी । वंचूं७ जाणे ॥ २४ ॥ मृत्यु न ह्मणे हा सावध । मृत्यु न म्हणे
हा सिद्ध । मृत्यु न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५ ॥ मृत्यु न ह्मणे
हा गोसावी । मृत्यु न म्हणे हा तपस्वी । मृत्यु न म्हणे हा मनस्वी८ । उदा-
सीन ॥ २६ ॥ मृत्यु न म्हणे ऋषीश्वर । मृत्यु न म्हणे कवीश्वर । मृत्यु न
म्हणे दिगंबर९ । समाधिस्थ१० ॥ २७ ॥ मृत्यु न म्हणे हठयोगी११ । मृत्यु न म्हणे
हा राजयोगी१२ । मृत्यु न म्हणे हा वीतरागी१३ । निरंतर ॥ २८ ॥ मृत्यु न म्हणे
हा ब्रह्मचारी । मृत्यु न म्हणे हा जटाधारी । मृत्यु न म्हणे हा निराहारी ।
योगीश्वर ॥ २९ ॥ मृत्यु न म्हणे हा संत । मृत्यु न म्हणे हा महंत । मृत्यु
१. उद्योगी. २. विद्वान्, शास्त्रें पढलेला. ३. धनवान्. ४. श्रोत्रिय, वैदिक,
कर्मनिष्ठ. ५. संपूर्ण मंत्रतंत्रशास्त्र जाणणारा. ६. गायनशास्त्र जाणणारा. ७. फसवूं,
चुकवूं. ८. मनाचें आकलन करणारा. ९. परमहंस, संन्यासी. १०. समाधींत
राहणारा. ११. शरीरशुद्धीच्या मार्गानें चित्तैक्य साधणारा. १२. विचाराच्या
योगानें चित्तैक्य साधणारा. १३. वैराग्यशील.
७४ श्रीदासबोध. [ दशक
न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥ मृत्यु न म्हणे स्वाधीन । मृत्यु न
म्हणे पराधीन । सकळ जीवांसी प्राशन । मृत्युच करी ॥ ३१ ॥ एक मृत्यु-
मार्गी लागले । एकीं अर्धपंथ क्रमिले । एक ते शेवटास गेले । वृद्धपणीं
॥ ३२ ॥ मृत्यु न म्हणे बाळ तरुण । मृत्यु न म्हणे हा सुलक्षण । मृत्यु न
म्हणे हा विचक्षण । बहु बोलका ॥ ३३ ॥ मृत्यु न म्हणे हा धीर । मृत्यु
न म्हणे हा उदार । मृत्यु न म्हणे हा सुंदर । चतुरंगी जाणे ॥ ३४ ॥
मृत्यु न म्हणे हा पुण्यपुरुष । मृत्यु न म्हणे हा हरिदास । मृत्यु न म्हणे
हा विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥ आतां असो हें बोलणें । मृत्यूपासूनि सु-
टिजे कोणें । मागें पुढें विश्वासें जाणे । मृत्युपंथें ॥ ३६॥ चौरी खाणी चारी
वाणी । चौऱ्यांशीं लक्ष जीवयोनी । जन्मा आले तितुके प्राणी । मृत्यु पाव-
ती ॥ ३७ ॥ मृत्युभेणें पळोनि जातां । तरी मृत्यु सोडीना तत्वतां । मृ-
त्यूस न ये कीं चुकवितां । कांहीं केल्या ॥३८॥ मृत्यु न म्हणे हा स्वदेशी ।
मृत्यु न म्हणे हा विदेशी । मृत्यु न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९ ॥
मृत्यु न म्हणे थोर थोर । मृत्यु न म्हणे हरिहर । मृत्यु न म्हणे अवतार ।
भगवंताचे ॥ ४० ॥ श्रोतीं कोप न करावा । हा मृत्युलोक सर्वांस ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्युपंथें ॥४१॥ एथें न मानावा किंत । हा
मृत्युलोक विख्यात । प्रकट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२ ॥ तथापि
किंतु मानिजेल । तरी मृत्युलोक न होईल । या कारणें नासेल । उपजला
प्राणी ॥ ४३ ॥ ऐसें जाणोनियां जीवीं । याचें सार्थकचि करावें । जनीं म-
रोनियां उरावें । कीर्तिरूपें ॥ ४४ ॥ येऱ्हवीं प्राणी लहान थोर । मृत्यु पा-
वती निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥ गेले बहुत
वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे । गेले अगाध महिमेचे । मृत्युपंथें ॥ ४६ ॥
गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी । गेले बहुत संग्रांमी । संग्राम-
शूर ॥ ४७ ॥ गेले बहुत बळाचे । गेले बहुत काळाचे । गेले बहुत कुळांचे ।
कुळवंत राजे ॥ ४८ ॥ गेले बहुतांचे पालक । गेले बुद्धीचे चालक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९ ॥ गेले विद्येचे सागर । गेले बळाचे
१. हुषार. २. पुण्यवान्. ३. सर्वास. ४. चार प्रकारची जीवसृष्टि. ५. खोटें.
६. योद्धे. ७. प्रवर्तक. ८. तर्कशास्त्रांत निपुण.
डोंगार । गेले धनाचे कुबेर । मत्युपंथें ॥ ५० ॥ गेले बहुत पुरुषाथांचे । गेले
बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपांचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥ गेले बहुत श-
स्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥
गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तींचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत
राजे ॥ ५३ ॥ गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत
विवादी । बहुता परींचे ॥ ५४ ॥ गेलीं पंडितांचीं थाटें । गेलीं शब्दांचीं क-
चोंटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥ गेले तापसांचे भार । गेले
संन्यासी अपार । गेले विचारकर्ते साचार । मृत्युपंथें ॥ ५६ ॥ गेले बहुत
संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करोनि ॥ ५७ ॥
गेले ब्राह्मणसमुदाय । गेले बहुत आचार्य । गेले बहुत सांगों काय । किती
म्हणोनि ॥ ५८ ॥ असो ऐसे सकळ गेले । परंतु एकचि राहिले । जे स्वरूपा-
कार झाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृती-
यदशके मृत्युनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. वैराग्य लक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हाणिजे महापूर । माजीं जलचरें अपार ।
डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥ आशा ममता देहबेडी । सुसरीं
करिताती ताडातोडी । नेउनि दुःखाचे सांगडी- । माजीं घालिती ॥ २ ॥
अहंकार नक्रें उडविलें । नेउनि पाताळीं बुडविलें । तेथूनियां सोडविले । न
वचे प्राणी ॥ ३ ॥ काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वोहटेना । भुली पडली ॥ ४ ॥ वासना धामीण पडली
गळां । घालोनि वेंटाळें वैमी गरळा । जिव्हा लळलळी वेळोवेळां । भया-
नक ॥ ५ ॥ माथां प्रपंचाचें ओझें । घेउनि म्हणे माझें माझें । बुडतांहि
न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥ ६ ॥ पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें
अभिमानचोरें । आलें अहंतेचें काँविरें । भूतबाधा ॥ ७ ॥ बहुतेक आवैतीं
१. पराक्रमाचे. २. उद्योगाचे. ३ वाद करणारे. ४. खटपटी, वैयाकरणी.
५. मगरानें. ६. कमी होईना. ७. ओकते. ८. फुगतो, गर्व करितो. ९. वेड.
१०. भोंवऱ्यांत.
पडिले । प्राणी वाहतचि गेले । जिहीं भगवंतासि बोभाईलें । भावार्थ-
बळें ॥ ८ ॥ देव आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी । येरें
तीं अभाविकें बापुडीं । वाहतचि गेलीं ॥ ९ ॥ भगवंत भावाचा भुकेला ।
भावार्थ देखोनि भुलला । संकटीं पावे भाविकाला । रक्षित असे ॥ १० ॥
जया भगवंत आवडे । तयांचे देवास सांकडें पडे । संसारदुःख समूळ झडे ।
निजदासांचें ॥ ११ ॥ जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे ।
धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२ ॥ जैसा भाव जयापाशीं । तैसाचि
देव तयापाशीं । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्रांचा ॥ १३ ॥ जरी
भाव असला मायिकें । तरी देव होय महाठक । नवल तयाचें कौतुक । जै-
शासि तैसा ॥ १४ ॥ जैसें जयाचें भजन । तैसेंच दे समाधान । भाव होतां
किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५ ॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैशासि
तैसें भासे । तयाचें सूत्र असे । आपणाचपाशीं ॥ १६ ॥ जैसें आपण
करावें । तैसेंचि तेणें व्हावें । जरी डोळे पसरोनि पहावें । तरी तेंहि टव-
कारे ॥ १७ ॥ भ्रुकुटिस घालुनियां गांठी । पाहतां तेंहि क्रोधें उठी । आपण
हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८ ॥ जैसा भाव प्रतिबिंबितला । त-
याचाचि देव जाला । जो जैसा भजेल त्याला । तैसाचि वोळे ॥ १९ ॥
भावें परमार्थाचिया वाटा । वाहती भक्तीचिया पेंठा । भरला मोक्षाचा
चौहाटा । सज्जनसंगें ॥ २० ॥ भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरीं पावन झाले ।
भावार्थ बळें उद्धरले । पूर्वज तेही ॥ २१ ॥ आपण स्वयें तरले । जनांसि
उपयोगा आले । कीर्तिश्रवणें पावन झाले । अभक्त भावार्थी ॥ २२ ॥ धन्य
तयांची जननी । जे लागले हरिभजनीं । त्यांहींच एक जन्म जनीं । सार्थक
केलें ॥ २३ ॥ तयांची वर्णू काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी । कांसे ला-
वूनि उतरी । पार दुःखाचा ॥ २४ ॥ बहुत जन्माच्या शेवटीं । जेणें चुके
आंटाआटी । तो नरदेह भेटी । करी भगवंताची ॥ २५ ॥ म्हणोनि धन्य ते
भाविक जन । जिंहीं जोडिलें हरि निधान । अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि
आलें ॥ २६ ॥ आयुष्य हेचि रत्नपेटी । माजी भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं
तळटीपा (Footnotes):
१. आळविलें. २. इतर. ३. बाह्यात्कारें. ४. भिवयांस. ५. पावतो. ६. चव्हाटा.
७. जन्ममरणरूप दगदग. ८. द्रव्याची रास. ९. सुंदर.
३ रा. ] वैराग्यलक्षण. ७७
अर्पूनियां लुटी । आनंदाची करावी ॥ २७ ॥ हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी
तो ब्रह्मादिकां वरिष्ठ । सदासर्वदा संतुष्ट । नैराश्यबोधें ॥ २८ ॥ धरूनियां
ईश्वराची कांस । केली संसाराची निरास । तया भाविकां जगदीश । सबाह्य
सांभाळी ॥ २९ ॥ जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परम सुख । संसार-
सुखाचेनि पढतमूर्ख । लोधूनि पडती ॥ ३० ॥ जयांचा ईश्वरीं जि-
व्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा । जयांचा जनावेगळा । ठेवा अ-
क्षयीं ॥ ३१ ॥ ते अक्षयसुखें सुखावले । संसारदुःख विसरलें ।
विषयरंगीं वोरंगले । श्रीरंगरंगी ॥ ३२ ॥ तयांस फावली नरदेह-
पेटी । केली ईश्वरीं साटी । येर अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३ ॥
अवचटें निधान जोडिलें । तें कवडीचे बद्दल नेलें । तैसें आयुष्य निघोन
गेलें । अभाविकांचें ॥ ३४ ॥ बहु तपाचा सांठा । तेणें लाधला परिस गो-
मटा । परी तो ठायींच करंटा । भोगूंचि नेणे ॥३५॥ तैसा संसारासि आला ।
मायाजाळीं गुंडाळला । अंतीं एकलाच गेला । हात झाडोनी ॥ ३६ ॥ या
नरदेहाचे संगतीं । बहुत पावले उत्तम गती । एक बापुडीं यातायाती ।
वरपडीं जाहलीं ॥ ३७ ॥ या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावें संत-
संगें । नीच योनि दुःख मागें । बहुत भोगिलें आहे ॥ ३८ ॥ कोण समय
येईल कैसा । याचा न कळे कीं भरंवसा । जैसे पक्षी दाही दिशा । उडोनि
जाती ॥ ३९ ॥ तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैशी वेळ । पुत्रकलत्रादि
सकळ । विघडोनि जाती ॥ ४० ॥ पाहिली घडी नव्हे आपुली । वयसां
तरी निघोनि गेली । देह पडतांच ठेविली । आहे नीच योनी ॥ ४१ ॥
श्वानसूकरादि नीच याती । भोगणें घडे नाना विपत्ती । तेथें कांहीं उत्तम
गती । पाविजेत नाहीं ॥ ४२ ॥ मागें गर्भवासीं आटाआटी । भोगितां
झालासि रे हिंपुटी । तेथोनियां थोर कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३ ॥ दुःख
भोगिलें आपुले जीवें । तेथें कैंची होती सवें । तैसेंचि पुढें एकलें जावें ।
लागेल बापा ॥ ४४ ॥ कैंची माता कैंचा पिता । कैंची बहीण कैंचा भ्राता ।
कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकलत्रादिक ॥ ४५ ॥ हीं तूं जाण मावेचीं ।
१ निरसन. २. आंतून व बांहरून. ३. विटले. ४. श्रीरंगभक्त. ५. संगति-
६. प्राप्त झालीं. ७. आधारानें. ८. अंतरतात. ९. आयुष्य. १०. दुःखी.
अवघीं सोयरीं सुखाचीं । हीं तुझ्या दुःखाचीं । सांगाती नव्हती ॥ ४६ ॥
कैंचा प्रपंच कैंचें कुळ । कासया होतोसि व्याकुळ । धन कणे¹ लक्ष्मी सकळ ।
जाइजणें² ॥ ४७ ॥ कैंचें घर कैंचा संसार । कासया करितोसि जोजार³ ।
जन्मवरी वाहोनि भार । लेखीं सांडोनि जाशी ॥ ४८ ॥ कैंचें तारुण्य कैंचें
वैभव । कैंचे सोहळे हावभाव । हें सकळही जाण माँव⁴ । माँयिक माँया ॥
॥ ४९ ॥ याच क्षणीं मरोन जाशी । तरी रघुनाथासि अंतरलासी । माझें
माझें म्हणतोसी । म्हणोनियां ॥ ५० ॥ तुवां भोगिल्या पुनरावृत्ती⁵ । ऐसीं
मायबापें किती । स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानुलक्ष ॥ ५१ ॥ कर्मयोगें
सकळही मिळालीं । एके स्थळीं जन्मासि आलीं । तीं तुवां आपुलीं मानिलीं ।
कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२ ॥ तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण
विचार । आतां एक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३ ॥ एका
डुंभराकारणें⁶ । नाना नीचांची सेवा करणें । नाना स्तुति आणि स्तवनें ।
मर्यांदा धरावी ॥ ५४ ॥ जो अन्न देतो उदरासी । शरीर विकावें लागे
त्यासी । जेणें घातलें जन्मासी । त्यास कैसें विसरावें ॥ ५५ ॥ अहर्निशीं
ज्या भगवंता । सकळ जीवांची लागली चिंता । मेघ वर्षे जयाची सत्ता ।
सिंधु मर्यादा धरावी ॥ ५६ ॥ भूमि धरिली धराधरें⁷ । प्रगट होइजे
दिवाकरें⁸ । ऐसी सृष्टि सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७ ॥ ऐसा कृपाळू
देवाधिदेव । जो सांभाळी सकळ जीव । नेणवे जयाचें लाघव⁹ । कृपाळुपणें
॥ ५८ ॥ ऐसा सर्वात्मा श्रीराम । सांडूनि धरिती विषयकाम । ते प्राणी
दुरात्मे अधम । केलें पावती ॥ ५९ ॥ रामैविण जे जे आस । तितुकी
जाणावी निराश । माझें माझें सावकाश । शीणचि उरे ॥ ६० ॥ जयासि
वाटे शीण व्हावा । तेणें विषय चिंतीत जावा । विषय न मिळतां जीवा ।
तळमळ सुटे ॥ ६१ ॥ सांडूनि राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासि कैंचें समाधान । लोलंगतांसी¹⁰ ॥ ६२ ॥ जयासि वाटे सुखचि असावें ।
तेणें रघुनाथभजनीं लागावें । स्वजन सकळहि त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३ ॥
जेणें वासना झोंबोनि पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे । म्हणोनि विषय-
१. धान्य वगैरे. २. जाणारें, विनाशी. ३. व्याप. ४. फसवणूक. ५. जन्म-
मरणाचे फेरे. ६ पोटासाठीं ७. शेषानें. ८. सूर्यानें. ९. कौशल्य. १०. विषयासक्तास
४ था.] श्रवणभक्ति. ७९
वासना मोडे । तो एक सुखी ॥ ६४ ॥ विषयजनित जें जें सुख । तेणेंचि
होतें परम दुःख । पूर्वी गोड अंतीं शोक । नेनस्तें आहे ॥ ६५ ॥ गळ
गिळितां सुख वाटे । वोढोनि घेतां घसा फाटे । कां तें बापुडें मृग आपटे ।
चारा घेऊनि पळतां ॥ ६६ ॥ तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी
ते कुंडी । म्हणोनियां आवडी । रघुनाथीं धरावी ॥ ६७ ॥ ऐकोनि बोले
भाविक । कैसेनि घडे जी सार्थक । सांगा स्वामी यमलोक । चुकेल जेणें
॥ ६८ ॥ देवासि वास्तव्य कोठें । तो मज कैसेनि भेटे । दुःखमूळ संसार
तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९ ॥ धडफौडी भगवत्प्राप्ती । होऊनि चुके अधो-
गती । ऐसा उपाय कृपामूर्ती । मज दीनासि करावा ॥ ७० ॥ वक्ता म्हणे
हो एकभावें । भगवद्भजन करावें । तेणें होईल स्वभावें । समाधान ॥७१॥
कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन । भगवद्भजनाचें लक्षण ।
मज निरूपावें ॥ ७२ ॥ ऐसा म्लानवदनें बोले । धरिलीं सदृढ पाऊलें ।
कंठ सद्गदित गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३ ॥ देखोनि शिष्याची अन-
न्यता । भावें बोलिला सद्गुरुदाता । स्वानंद तुंबळेल आतां । पुढिलिये
समासीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके वैराग्य-
लक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७८.
दशक चवथा.
१. श्रवणभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी गणनाथा । तूं विद्यावैभवसमर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्थीं । मज बोलवावें ॥ १ ॥ नमो शारदा वेदजननी ।
सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ आतां
आठवूं सद्गुरु । जो पराचाही परुँ । जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥
१. खचित. २. वाईट, अपायकारक. ३. खरोखर, त्वरित. ४. एकनिष्ठा. ५.
मुख्य विषय. ६. थोरांहून थोर.
८० श्रीदासबोध. [ दशक
।। ३ ।। श्रोत्यांनीं पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें । म्हणोनि बो-
लिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४ ॥ सावध होऊनि श्रोतेजन । ऐका नवविधा-
भजन । सच्छास्त्रीं बोलिलें पावन । होइजे येणें ॥ ५ ॥ श्लोक ॥ श्रवणं
कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्
॥ १ ॥ टी० ॥ श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन ।
दास्य सख्य आत्मनिवेदन । ऐसें हें नवविधा ॥ ६ ॥ नवविधा भजन
बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें । श्रोतीं अवधान दीधलें । पाहिजे आतां
॥ ७ ॥ प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथा पुराणश्रवण । नाना अध्यात्म¹-
निरूपण । ऐकत जावें ॥ ८ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सि-
द्धांतमार्ग । योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ९ ॥ नाना व्रतांचे म-
हिमे । नाना तीर्थांचे महिमे । नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ १० ॥
नाना माहात्म्यें² नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें । नाना तपें पुर-
श्चरणें । ऐकत जावीं ॥ ११ ॥ दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी³ ।
तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ १२ ॥ उष्णवास जळवास⁵ । शीत-
वास अरण्यवास । भूगर्भ⁶ आणि आकाशवास⁷ । कैसे ते ऐकावे ॥ १३ ॥
जपी तपी तापस योगी । नाना निग्रही⁸ हठयोगी । शाक्तौगमी¹⁰ अघोरयोगी
कैसे ते ऐकावे ॥ १४ ॥ नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्ष¹²-
स्थानें । पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १५ ॥ नाना पिंडांची
रचना । नाना भूगोल रचना । नाना सृष्टीची रचना । कैसी ती ऐकावी
॥ १६ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें तेजमंडळें । एकवीस स्वर्ग सातें¹³
पाताळें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १७ ॥ ब्रह्मविष्णुमहेशस्थानें । इंद्र देव ऋषि-
स्थानें । वायु वरुण कुबेरस्थानें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १८ ॥ नवखंडें चौदा
१. ईश्वरासंबंधीं चर्चा. २. शिवमाहात्म्य, काशीमाहात्म्य, अशासारखे ग्रंथ.
३. पाला खाऊन राहणारे. ४. पंचाग्निसाधन. ५. थंडीच्या दिवसांत गळ्याइतक्या
थंड पाण्यांत उभे राहणें. ६. भुयारांत राहणें. ७. वृक्षादिकांवर राहणें. ८. इंद्री-
यांचें दमन करणारे. ९. प्राणनिरोध करून चित्तैक्य करणारे. १०. देवीउपा-
सकांच्या पंथानें चालणारे. ११. भूतप्रेतांचें साधन करणारे. १२. चित्त एकाग्र
करण्याचीं स्थानें. १३. अतल, वितल, भुतल, तलातल, रसातल, महातल व पाताळ-
भुवनें । अष्ट दिक्पालांचीं¹ स्थानें । नाना उपवनें² गहनें । कैसीं तीं ऐकावीं
॥ १९ ॥ गणगंधर्व विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । अष्टनायका सं-
गीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ २० ॥ रागज्ञान तालज्ञान । नृत्यज्ञान
वाद्यज्ञान । अमृतवेळा³ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २१ ॥ चौदा विद्या
चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा ।
कैशा त्या ऐकाव्या ॥ २२ ॥ मंत्र मोहरे⁴ तोडगे सिद्धी । नाना वल्ली नाना
औषधी । धातु रसायनें बुद्धी⁵ । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २३ ॥ कोणत्या दोषें
कोण रोग । कोणत्या रोगास कोण प्रयोग⁶ । कोणत्या प्रयोगास कोण योग ।
साधे तो ऐकावा ॥ २४ ॥ रवरवादि कुंभीपाक । नाना यातना यमलोक ।
सुखदुःखादि स्वर्ग नरक । कैसा तो ऐकावा ॥ २५ ॥ कैशा नवविधा
भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें
॥ २६ ॥ पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवेचना । सारासार विचा-
रणा । कैसी ती ऐकावी ॥ २७ ॥ सायुज्यतामुक्ति कैशी होते । कैसें पाविजे
मोक्षातें । या कारणें नाना मतें । शोधीत जावीं ॥ २८ ॥ वेदशास्त्र आणि
पुराणें । महावाक्यांचीं⁷ विवरणें । तनुचतुष्टयानिरसनें⁸ । कैसीं तीं ऐकावीं
॥ २९ ॥ ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधूनि घ्यावें । असार तें
जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ती ॥ ३० ॥ सगुणाचीं चरित्रें ऐकावीं ।
कां ते निर्गुण अध्यात्म⁹ शोधावीं । श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं
॥ ३१ ॥ सगुण देवाचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्त्वेंयंत्रें¹⁰ । हीं दोन्हीं परम
पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३२ ॥ जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र
जप ध्यानें । कीर्ति स्तुति स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३३ ॥
ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें । विभक्ति¹¹ सांडून भ-
क्तीचें । मूळ शोधावें ॥ ३४ ॥ श्रवणभक्तीचें निरूपण । निरूपिलें असे
१. दिशांचे अधिपति; इंद्र, अग्नि, यम इत्यादि. २. वनें. ३. सर्वोत्कृष्ट मुहूर्त.
४. सर्पांच्या मस्तकांत असणारा औषधी मणि. ५. युक्ति, उपाय. ६. उपचार. ७.
चार वेदांतून जीं तत्त्वमस्यादि चार वाक्यें सार म्हणून काढलीं आहेत त्यांचीं. ८.
स्थूल, सूक्ष्म, कारण, व महाकारण अशा चार प्रकारच्या शरीरांचा विचारानें नाश
करणें. ९. वेदान्तग्रंथ. १०. तत्त्वबोधक साधनें, ग्रंथ वगैरे. ११. भेदबुद्धि.
८२ श्रीदासबोध. [ दशक
जाण । पुढें कीर्तनभजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके श्रवणभक्तिनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. कीर्तन भक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें
बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरूपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १ ॥ सगुण
हरिकथा करावी । भगवत्कीर्ति वाढवावी । अखंड वागीश्वरी वदवावी ।
यथायोग्य ॥ २ ॥ बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें अर्थांतर । भगवत्कथा
निरंतर । करीत जावी ॥ ३ ॥ आपुलिया सुखस्वार्थीं । केलीच करावी
हरिकथा । हरिकथेविण सर्वथा । राहूंचि नये ॥ ४ ॥ नित्य नवा हव्यास
धरावा । साक्षेपें अत्यंतचि करावा । हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मांडगोळ अवघा
॥ ५ ॥ मनापासोनि आवडी । जीवापासून अत्यंत गोडी । सदा सर्वदा
तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६ ॥ भगवंतासि कीर्तन प्रिय । कीर्तनें समाधान
होय । बहुत जनांसि उपाय । हरिकीर्तन कलियुगीं ॥ ७ ॥ विविध विचित्र
ध्यानें । वर्णावीं अलंकार भूषणें । ध्यानमूर्ति अंतःकरणें । लक्षून कथा
करावी ॥ ८ ॥ यश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भक्तांचा आत्मा । संतुष्ट होय ॥ ९ ॥ कथान्वय लापणिका ।
नामघोष करतालिका । प्रसंगें बोलाव्या अनेका । धौटी मार्ता नेमस्त
॥ १० ॥ ताल मृदंग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान । नाना कथा
अनुसंधान । तुटोंचि न द्यावें ॥ ११ ॥ कारुणाकीर्तनाच्या लोटें । कथा
करावी बडबडाटें । श्रोत्यांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२ ॥ कंप
रोमांच स्फुरणें । प्रेमाश्रुसहित गाणें । देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे
॥ १३ ॥ पदें दोहरे श्लोक प्रबंधें । धौटी मुद्रा अनेक छंद । वीरभाटी व
विनोद । प्रसंगें करावे ॥ १४ ॥ नाना नवरसिक शृंगारिक । गद्यपद्यांचें
कौतुक । नाना वचनें प्रस्ताविकें । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५ ॥ भक्तिज्ञान-
वैराग्यलक्षण । नीतिन्याय स्वधर्मरक्षण । साधनमार्ग अध्यात्मनिरूपण ।
१. वाणी. २. प्रयत्न. ३. भाषाचातुर्य. ४. टाळ्या. ५. कल्पित गोष्टी. ६.
झालेल्या गोष्टी. ७. कविता. ८. थोर पुरुषांचें वर्णन. ९. उपक्रमरूप.