दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 102, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३ रा. ] आधिभौतिक ताप. ६७
बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी । नाना यातना चतुरीं ।
आधिभौतिक जाणिजे ॥ ३७ ॥ दरवडे घालुनियां जना । तस्करें¹ करिती
यातना । तेणें दुःख होय मना । या नांव आधिभौतिक ॥ ३८ ॥ अग्नी-
चेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें आरंवेळे² । हानि झाली विव्हळे । या नांव आधि-
भौतिक ॥ ३९ ॥ नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें । दिव्यांबरें³
मनोहरें । दग्ध होती ॥ ४० ॥ नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना
स्वार्थीं⁴ । नाना पात्रें नाना अर्थीं⁵ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१ ॥ अग्नि
लागतां शेतीं । धान्यें बणंग्या⁶ खडकुती⁷ । इक्षुदंड⁸ जळोनि जाती । अकस्मात
॥ ४२ ॥ ऐसा अग्नि लागला । अथवा कोणीं लाविला । हानि झाली कां
पोळला । या नांव आधिभौतिक ॥ ४३ ॥ ऐसे सांगतां बहुत । होती
वन्हीचे आघात⁹ । तेणें दुःखें दुखवे चित्त । या नांव आधिभौतिक ॥ ४४ ॥
हारपे विसरे आणि सांडे । नासे गाहाळे फुटे पडे । असाध्य होय कोणी-
कडे । या नांव आधिभौतिक ॥ ४५ ॥ प्राणी स्थानभ्रष्ट झाले । नाना पशु
ते चुकले । कन्या पुत्र गाहाळले । या नांव आधिभौतिक ॥ ४६ ॥ तस्कर अ-
थवा दावेदार । अवचितें करिती संहार । लुटती घरें नेती खिल्लारें¹⁰ । या नांव
आधिभौतिक ॥ ४७ ॥ नाना धान्यें केळीं कापिती । पानमळा¹¹ नीट घालिती ।
ऐसे नाना आघात करिती । या नांव आधिभौतिक ॥ ४८ ॥ मैंद उचले
खोंनोरी¹² । सुवर्णपथी¹³ भुरेरेंकरी¹⁴ । ठैकु¹⁵ सिंतैह¹⁶ वर्रंपेकरी¹⁷ । वरपा घालिती
॥ ४९ ॥ गठीसोर्ट¹⁸ द्रव्य सोडिती । नाना अलंकार काढिती । नाना वस्तु
मूँषक¹९ नेती । या नांव आधिभौतिक ॥ ५० ॥ वीज पडे हिंव पडे ।
आणि पर्जन्यों सांपडे । कां तो महापुरीं बुडे । या नांव आधि-
भौतिक ॥ ५१ ॥ भोवरे वँळणें²⁰ आणि धार । वोसैंणें²¹ लाटा अपार ।
१. चोर. २. तळमळतो. ३. उंची वस्त्रे ४. काये. ५. वस्तु ६. भाताची अथवा
गवताची गंज. ७. प्रखर उन्हानें जळून गेलेलें शेत. ८. ऊंस. ९. धक्के १०. गुरें-
ढोरें. ११. पानेवेलीच्या मळ्यास. १२. खानचोर. १३. किमयागार. १४. जादू-
गार. १५. ठक. १६. फसविणारा. १७. लुटारु. १८. भामटा. १९. उंदीर.
२०. नदीचा बांक, धरण. २१. पुरांमधील केरकचरा.