दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 117, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८२ श्रीदासबोध. [ दशक
जाण । पुढें कीर्तनभजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके श्रवणभक्तिनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. कीर्तन भक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें
बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरूपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १ ॥ सगुण
हरिकथा करावी । भगवत्कीर्ति वाढवावी । अखंड वागीश्वरी वदवावी ।
यथायोग्य ॥ २ ॥ बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें अर्थांतर । भगवत्कथा
निरंतर । करीत जावी ॥ ३ ॥ आपुलिया सुखस्वार्थीं । केलीच करावी
हरिकथा । हरिकथेविण सर्वथा । राहूंचि नये ॥ ४ ॥ नित्य नवा हव्यास
धरावा । साक्षेपें अत्यंतचि करावा । हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मांडगोळ अवघा
॥ ५ ॥ मनापासोनि आवडी । जीवापासून अत्यंत गोडी । सदा सर्वदा
तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६ ॥ भगवंतासि कीर्तन प्रिय । कीर्तनें समाधान
होय । बहुत जनांसि उपाय । हरिकीर्तन कलियुगीं ॥ ७ ॥ विविध विचित्र
ध्यानें । वर्णावीं अलंकार भूषणें । ध्यानमूर्ति अंतःकरणें । लक्षून कथा
करावी ॥ ८ ॥ यश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भक्तांचा आत्मा । संतुष्ट होय ॥ ९ ॥ कथान्वय लापणिका ।
नामघोष करतालिका । प्रसंगें बोलाव्या अनेका । धौटी मार्ता नेमस्त
॥ १० ॥ ताल मृदंग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान । नाना कथा
अनुसंधान । तुटोंचि न द्यावें ॥ ११ ॥ कारुणाकीर्तनाच्या लोटें । कथा
करावी बडबडाटें । श्रोत्यांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२ ॥ कंप
रोमांच स्फुरणें । प्रेमाश्रुसहित गाणें । देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे
॥ १३ ॥ पदें दोहरे श्लोक प्रबंधें । धौटी मुद्रा अनेक छंद । वीरभाटी व
विनोद । प्रसंगें करावे ॥ १४ ॥ नाना नवरसिक शृंगारिक । गद्यपद्यांचें
कौतुक । नाना वचनें प्रस्ताविकें । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५ ॥ भक्तिज्ञान-
वैराग्यलक्षण । नीतिन्याय स्वधर्मरक्षण । साधनमार्ग अध्यात्मनिरूपण ।
१. वाणी. २. प्रयत्न. ३. भाषाचातुर्य. ४. टाळ्या. ५. कल्पित गोष्टी. ६.
झालेल्या गोष्टी. ७. कविता. ८. थोर पुरुषांचें वर्णन. ९. उपक्रमरूप.