सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 106, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 106

३ रा. ] आधिदैविक ताप. ७१
राव । रायासि दंडिता देव । राजा न करितां नीतिन्याय । म्हणोनियां यम-
यातना ॥ ९ ॥ अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी होऊनि राहे । रा-
ज्यांतीं नरक आहे । म्हणोनियां ॥ १० ॥ राजा सांडितां राजनीति । तयासि
यम गांजिती । यमें नीति सांडितां धांवती । देवगण ॥ ११ ॥ ऐसी मर्या-
दा लाविली देवें । म्हणोनि नीतीनें वर्तावें । नीति न्याय सांडितां भोगा-
वें । यमयातनेसी ॥ १२ ॥ देवें प्रेरिले यम । म्हणोनि आधिदैविक नाम ।
तृतीय ताप दुर्गम । यमयातनेचा ॥ १३ ॥ यमदंड यमयातना । शास्त्रीं
बोलिले प्रकार नाना । तो भोग कदापि चुकेना । या नांव आधिदैविक ॥
१४ ॥ यमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद । शरीरीं घालुनि प्रमा-
द । नानाप्रकारें ॥ १५ ॥ पापपुण्याचीं शरीरें । स्वर्गीं असती कलेवरें¹ ।
त्यांत घालोनि नानाप्रकारें । पापपुण्यें भोगविती ॥ १६ ॥ नाना पुण्यें
नाना विलास । नाना दोषें यातना कर्कश । शास्त्रीं बोलिलें अविश्वास ।
मानूंचि नये ॥ १७ ॥ वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती । त्यांस
यमयातना करिती । या नांव आधिदैविक ॥ १८ ॥ अक्षोभ नरकीं उदंड
जीव । जुनाट किडे करिती रवरव । बांधोनि टाकिती हातपाव । या नांव
आधिदैविक ॥ १९ ॥ उदंड पेंस² लहान मुख । कुंभाकार कुंड एक । दुर्ग-
धी उकाडा कुंभिपाक । या नांव आधिदैविक ॥ २० ॥ तप्तभूमिका तौविती³ ।
जळत स्तंभ पोटा लाविती । नाना सांडर्स⁴ लाविती । या नांव आधिदैविक
॥ २१ ॥ यमदंडाचे उदंड मार । यातनेची सामुग्री अपार । भोग भोगिती
पापी नर । या नांव आधिदैविक ॥ २२ ॥ पृथ्वीमध्यें मार नाना । त्यांहून
कठिण यमयातना । मारितां उसंत⁵चि असेना । या नांव आधिदैविक
॥ २३ ॥ चोघे चहूकडे वोढिती । एक ते झोंकून पाडिती । ताणिती मा-
रिती वोढून नेती । या नांव आधिदैविक ॥ २४ ॥ उठवेना बैसवेना । रड-
वेना पडवेना । यातनेवरी यातना । या नांव आधिदैविक ॥ २५ ॥ आ-
क्रंदे रडे आणि फुंजे⁶ । धकाधकीनें निर्बुजे । झुरझुरोन पंजर⁷ होऊनि झिजे ।
या नांव आधिदैविक ॥ २६ ॥ कर्कश वचन कर्कश मार । यातनेचे नाना
१. शरीरें. २. आंतील अवकाश, जागा. ३. तापवितात. ४. चिमटे. ५.
विसांवा. ६. उसासे देऊन दुःख करतो. ७. हाडांचा पिंजरा.