दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 114, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४ था.] श्रवणभक्ति. ७९
वासना मोडे । तो एक सुखी ॥ ६४ ॥ विषयजनित जें जें सुख । तेणेंचि
होतें परम दुःख । पूर्वी गोड अंतीं शोक । नेनस्तें आहे ॥ ६५ ॥ गळ
गिळितां सुख वाटे । वोढोनि घेतां घसा फाटे । कां तें बापुडें मृग आपटे ।
चारा घेऊनि पळतां ॥ ६६ ॥ तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी
ते कुंडी । म्हणोनियां आवडी । रघुनाथीं धरावी ॥ ६७ ॥ ऐकोनि बोले
भाविक । कैसेनि घडे जी सार्थक । सांगा स्वामी यमलोक । चुकेल जेणें
॥ ६८ ॥ देवासि वास्तव्य कोठें । तो मज कैसेनि भेटे । दुःखमूळ संसार
तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९ ॥ धडफौडी भगवत्प्राप्ती । होऊनि चुके अधो-
गती । ऐसा उपाय कृपामूर्ती । मज दीनासि करावा ॥ ७० ॥ वक्ता म्हणे
हो एकभावें । भगवद्भजन करावें । तेणें होईल स्वभावें । समाधान ॥७१॥
कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन । भगवद्भजनाचें लक्षण ।
मज निरूपावें ॥ ७२ ॥ ऐसा म्लानवदनें बोले । धरिलीं सदृढ पाऊलें ।
कंठ सद्गदित गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३ ॥ देखोनि शिष्याची अन-
न्यता । भावें बोलिला सद्गुरुदाता । स्वानंद तुंबळेल आतां । पुढिलिये
समासीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके वैराग्य-
लक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७८.
दशक चवथा.
१. श्रवणभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी गणनाथा । तूं विद्यावैभवसमर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्थीं । मज बोलवावें ॥ १ ॥ नमो शारदा वेदजननी ।
सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ आतां
आठवूं सद्गुरु । जो पराचाही परुँ । जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥
१. खचित. २. वाईट, अपायकारक. ३. खरोखर, त्वरित. ४. एकनिष्ठा. ५.
मुख्य विषय. ६. थोरांहून थोर.