सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 105, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 105

७० श्रीदासबोध. [ दशक
अनुपत्ती कदांन्न । या नांव आधिभौतिक ॥ ८१ ॥ आकांत वाखा प्रळय ।
युद्धीं होतां पराजय । जिवलगांचा होय क्षय । या नांव आधिभौतिक
॥ ८२ ॥ कठिण काळ आणि दुष्काळ । साशंकै आणि वोखटी वेळ । उद्वेग
चिंतेची हळहळ । या नांव आधिभौतिक ॥ ८३ ॥ घाणाचरकीं शिरकला ।
चाकाखालीं सांपडला । नाना वन्हींत पडियेला । या नांव आधिभौतिक
॥ ८४ ॥ नाना शस्त्रें भेदिला । नाना श्वापदें भक्षिला । नाना बंदीं पडि-
येला । या नांव आधिभौतिक ॥ ८५ ॥ नाना कुवासें निर्बुजे । नाना अप-
मानें लाजे । नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आधिभौतिक ॥ ८६ ॥
ऐसे सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर । श्रोतीं जाणावा विचार ।
आधिभौतिकाचा ॥ ८७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके
आधिभौतिकतापनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. आधिदैविक ताप.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला आध्यात्मिक । त्या उपरी आधिभौ-
तिक । आतां बोलिजेल आधिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥ श्लोक ॥ शुभा-
शुभैः कर्मभिस्तैर्देहांते यमयातना । स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं विद्ध्याधि-
दैविकम् ॥ १ ॥ टी० ॥ शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना । स्वर्ग
नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २ ॥ नाना दोष नाना पातकें ।
मदांधपणें अविवेकें । केलीं परी तीं दुःखदायकें । यमयातना भोगविती ॥
३ ॥ अंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें । नाना सामर्थ्यांचेनि बळें ।
अकृत्यें करिती ॥ ४ ॥ नीति सांडोनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां ।
यमयातना भोगितां । जीव जाय ॥ ५ ॥ ⁵डोळे झांकूनि स्वार्थबुद्धी । नाना
अभिलाष कुबुद्धी । ⁶वृत्तिभूमीसि साधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६ ॥ मातले-
पणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात । ⁷अप्रमाणं क्रियां करित । म्हणोनियां
यमयातना ॥ ७ ॥ मर्यादा सांडोनियां चालती । ग्राम दंडी ग्रामाधिपती ।
देश दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८ ॥ देशाधिपतीसि दंडी
१. कंगालपणा. २. हलक्या प्रतीचें अन्न. ३. अडचणीची. ४. घाबरतो. ५
दुर्वर्तन. ६. वतन. ७. अशारू, गैर.