सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 110, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 110

डोंगार । गेले धनाचे कुबेर । मत्युपंथें ॥ ५० ॥ गेले बहुत पुरुषाथांचे । गेले
बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपांचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥ गेले बहुत श-
स्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥
गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तींचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत
राजे ॥ ५३ ॥ गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत
विवादी । बहुता परींचे ॥ ५४ ॥ गेलीं पंडितांचीं थाटें । गेलीं शब्दांचीं क-
चोंटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥ गेले तापसांचे भार । गेले
संन्यासी अपार । गेले विचारकर्ते साचार । मृत्युपंथें ॥ ५६ ॥ गेले बहुत
संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करोनि ॥ ५७ ॥
गेले ब्राह्मणसमुदाय । गेले बहुत आचार्य । गेले बहुत सांगों काय । किती
म्हणोनि ॥ ५८ ॥ असो ऐसे सकळ गेले । परंतु एकचि राहिले । जे स्वरूपा-
कार झाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृती-
यदशके मृत्युनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥

१०. वैराग्य लक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हाणिजे महापूर । माजीं जलचरें अपार ।
डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥ आशा ममता देहबेडी । सुसरीं
करिताती ताडातोडी । नेउनि दुःखाचे सांगडी- । माजीं घालिती ॥ २ ॥
अहंकार नक्रें उडविलें । नेउनि पाताळीं बुडविलें । तेथूनियां सोडविले । न
वचे प्राणी ॥ ३ ॥ काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वोहटेना । भुली पडली ॥ ४ ॥ वासना धामीण पडली
गळां । घालोनि वेंटाळें वैमी गरळा । जिव्हा लळलळी वेळोवेळां । भया-
नक ॥ ५ ॥ माथां प्रपंचाचें ओझें । घेउनि म्हणे माझें माझें । बुडतांहि
न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥ ६ ॥ पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें
अभिमानचोरें । आलें अहंतेचें काँविरें । भूतबाधा ॥ ७ ॥ बहुतेक आवैतीं
१. पराक्रमाचे. २. उद्योगाचे. ३ वाद करणारे. ४. खटपटी, वैयाकरणी.
५. मगरानें. ६. कमी होईना. ७. ओकते. ८. फुगतो, गर्व करितो. ९. वेड.
१०. भोंवऱ्यांत.