सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

२ रा. ] मूर्खलक्षण. २३
बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो एक मूर्ख ॥ ५२ ॥ समर्थांसी
मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरींच्या घरीं करी चोरी । तो
एक मूर्ख ॥ ५३ ॥ सांडोनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भरंवसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो एक मूर्ख ॥ ५४ ॥ संसारदुःखाचेनि गुणें ।
देवासी गाळी देणें । मैत्राचे बोले उणें । तो एक मूर्ख ॥ ५५ ॥ अल्प अ-
न्याय क्षमा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । जो विश्वासघात करी । तो
एक मूर्ख ॥ ५६ ॥ समर्थांचे मनींचा तुटे । जयाचेनि सभा विटे । क्षणीं
बरा क्षणीं पालटे । तो एक मूर्ख ॥ ५७ ॥ बहुत दिवसांचे सेवक । त्यागून
ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायक । तो एक मूर्ख ॥ ५८ ॥ अनीतीनें
द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो एक
मूर्ख ॥ ५९ ॥ घरीं असोनि सुंदरी । जो सदा परद्वार करी । बहुतांचें
उच्छिष्ट अंगिकारी । तो एक मूर्ख ॥ ६० ॥ आपलें अर्थ दुसऱ्यापाशीं ।
आणि दुसऱ्याचें अभिलाषी । पर्वतें करी हीनासी । तो एक मूर्ख ॥ ६१ ॥
अतीताचा अंत पाहे । कुग्रामामध्यें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो एक
मूर्ख ॥ ६२ ॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई
खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख ॥ ६३ ॥ उदकामध्यें सांडी गुरळी ।
पायें पाय खांजोळी । सेवा करी हीन कुळीं । तो एक मूर्ख ॥ ६४ ॥ स्त्री-
बाळकांस सलगी देणें । पिशाच्चासन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें ।
तो एक मूर्ख ॥ ६५ ॥ परस्त्रींशीं कलह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगति धरी । तो एक मूर्ख ॥ ६६ ॥ कलह पाहत उभा राहे ।
सोडवीना कौतुक पाहे । खरें असतां खोटें साहे । तो एक मूर्ख ॥ ६७ ॥
लक्ष्मी आलियावरी । जो मागील ओळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता
करी । तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ आपुलें कार्य होय तोंवरी । बहुसाल नम्रता
धरी । पुढिलांचें कार्य न करी । तो एक मूर्ख ॥ ६९ ॥ अक्षरें गाळून वाची ।
कांहीं घाली पदरींचीं । निगा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख ॥ ७० ॥
आपण वाचीना कधीं । कोणासि वाचाया नेदी । बांधोनि ठेवी बंदीं । तो
१. उत्तरास उत्तर असे. २. हांव. ३. धारेवर धरतो, त्रास देतो. ४. द्रव्य,
ठेव. ५. देणें घेणें. ६. याचकाचा. ७. गुळणी. ८. कुतरें. ९. प्राणी. १० दुसऱ्याचें.

२४ श्रीदासबोध. [ दशक
एक मूर्ख ॥ ७१ ॥ ऐसीं हीं मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । चित्त देऊ-
निया शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥ लक्षणें अपार असती । परी कांहीं
एक यथामती । त्यागार्थ बोलिलों श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥ ७३ ॥
उत्तम लक्षणें घ्यावी । मूर्खलक्षणें त्यागावीं । पुढिले समासीं आघवीं । निरू-
पिलीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके मूर्खलक्षणं
नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. उत्तमलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणेंकरितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥ वाट पुसल्याविण जाऊं नये ।
फळ वोळखिल्याविण खाऊं नये । सांपडली वस्तु घेऊं नये । एकाएकीं
॥ २ ॥ अतिवाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये । शोधिल्याविण करूं
नये । कुळहीन कांता ॥ ३॥ विचारेंविण बोलूं नये । मर्यादेविण हालूं नये ।
विवंचनेविणें चालूं नये । कांहीं केल्या ॥ ४ ॥ प्रीतीविण रुसूं नये । चो-
रासि वोळखी पुसूं नये । रात्रीं पंथ क्रमूं नये । एकाएकीं ॥ ५ ॥ जनीं
आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं
॥ ६ ॥ निंदाद्वेष करूं नये । असत्संग धरूं नये । द्रव्यदारा हरूं नये ।
बलात्कारें ॥ ७ ॥ वक्त्यास खंडूं नये । ऐक्यतेसि फोडूं नये । विद्याभ्यास
सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥ तोंडाळासि भांडूं नये । वाचाळासि तंडूं
नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥ अतिक्रोध करूं नये । जिवल-
गासि खेदूं नये । मनीं वीट मानूं नये । शिकवणीचा ॥ १० ॥ क्षणक्षणा
रुसूं नये । लटिका पुरुषार्थ बोलूं नये । केल्याविण सांगूं नये । आपुला
पराक्रम ॥ ११ ॥ बोलिला बोल विसरूं नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकूं नये ।
केल्याविण निर्खंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥ आळसें सुख मानूं नये ।
चहाडी मनासी आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३
सुखा अंग देऊं नये । प्रयत्न पुरुषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासूं नये ।
निरंतर ॥ १४ ॥ सभेमध्यें लाजू नये । बाष्कळपणें बोलूं नये । पैज होड
१. विचार केल्यांशिवाय. २. तिरस्कार अथवा धिक्कार करूं नये.

२ रा. ] उत्तमलक्षण. २५
घालूं नये । कांहीं केल्या ॥ १५ ॥ बहुत चिंता करूं नये । निःसंगपणें
राहूं नये । परस्त्रीतें पाहूं नये । पापबुद्धीं ॥ १६ ॥ कोणाचा उपकार घेऊं
नये । घेतला तरी राखूं नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ॥ १७ ॥
शौचेंविण असूं नये । मळिण वस्त्र नेसूं नये । जाणारासी पुसूं नये । कोठें
जातोसि म्हणोनि ॥ १८ ॥ व्यापकेंपण सोडूं नये । पराधीन होऊं नये ।
आपलें ओझें घालूं नये । कोणी एकासी ॥ १९ ॥ पत्रेंविणें परतें करूं नये ।
हीनाचें ऋण घेऊं नये । ग्वाहीविण जाऊं नये । राजद्वारीं ॥ २० ॥ ल-
टकी जांजू घेऊं नये । सभेसि लटिकें करूं नये । आदर नसतां बोलूं नये ।
स्वाभाविक ॥ २१ ॥ अदेखणेपण करूं नये । अन्यायाविण गांजूं नये । अ-
नतिीनें वर्तू नये । अंगबळें ॥ २२ ॥ बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा
करूं नये । बहुत दिवस राहूं नये पिशुना

२६ श्रीदासबोध. [ दशक
वाचा नवस बुडवूं नये । आपुला धर्म उडवूं नये । भलते भरीं पडूं नये ।
विचारेंविण ॥ ३६ ॥ निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये ।
पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥ सभा देखोनि
गळूं नये । समयीं उत्तर टळूं नये । धिक्कारितां ढळूं नये । धारिष्ट
आपुलें ॥ ३८ ॥ गुरुविरहित असूं नये । नीच यातीचा गुरु करूं नये ।
जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥ सत्य मार्ग सोडूं नये ।
असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
अपकीर्ति सोडावी । सत्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची
॥ ४१ ॥ न घेतां हे उत्तम गुण । तो मनुष्य अवलक्षण । ऐक त्याचें लक्षण ।
पुढिलिये समासीं ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय-
दशके उत्तमलक्षणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. कुविद्यालक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका कुविद्येचीं लक्षणें । अतिहीन कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलों श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥ ऐका कुविद्येचे प्राणी । जन्मा
येऊनि केली हानी । सांगिजेल इहीं लक्षणीं । श्रोतीं ओळखावा ॥ २ ॥
कुविद्येचा प्राणी असे । तो कठिन निरूपणीं त्रासे । अवगुणांची समृद्धि असे ।
ह्मणोनियां ॥ ३ ॥ श्लोक ॥ दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं
चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ टी०॥ काम क्रोध मद मत्सर । लोभ
दंभ तिरस्कार । गर्व ताठा अहंकार । द्वेष विवाद विकल्पी ॥ ४ ॥ आशा
ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना । असूया अविद्या
ईषणा वासना । अतृप्ति लोलंगतां ॥ ५ ॥ इच्छा वांञ्छा चिकित्सा निंदा ।
अनीति ग्रामेणी मस्ती सदा । जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ति
दुर्वासना ॥ ६ ॥ स्पर्धा खटपट आणि चटपट । नव्हे झटपट आणि वटवट ।
सदा खटनट आणि लटपट । परम व्यथा आणि कुविद्या ॥७॥ कुरूप आणि
कुलक्षण । अशक्त आणि दुर्जन । दरिद्री आणि कृपण । अतिशयेंसी ॥८॥
आळसी आणि खादाड । दुर्बळ आणि लाताड । तुटक आणि लुबाड ।
१. गीं. अ. १६. २. मत्सर. ३. इच्छा. ४. लुब्धपणा. ५. हरामी. ६. शठ व नष्ट.

२ रा. ] कुविद्यालक्षण. २७
अतिशयेंसीं ॥ ९ ॥ मूर्ख आणि तपिलें । वेडें आणि वाचाळ । लटिकें
आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ॥ १० ॥ नेणे आणि नायके । न ये आणि न
शिके । न करी आणि न देखे । अभ्यासदृष्टीं ॥ ११ ॥ अज्ञान आणि अवि-
श्वासी । छळवादी आणि दोषी । अभक्त आणि भक्तासी । देखों शकेना ॥ १२ ॥
पापी आणि निंदक । कष्टी आणि घातक । दुःखी आणि हिंसक । अति-
शयेंसीं ॥ १३ ॥ हीन आणि कृत्रिमी । रोगी आणि कुकर्मी । अमंगल आणि
अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥ नीच देह आणि ताठा । अप्रमाण आणि
फांटा । बाष्कळ आणि करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥ लंडी आणि उन्मत्त ।
निष्कामी आणि डुलत । भ्याड आणि बोलत । पराक्रम ॥ १६ ॥ कनिष्ठ
आणि गर्विष्ठ । न पुरतें आणि नष्ट । द्वेषी आणि भ्रष्ट । अतिशयेंसीं ॥ १७ ॥
अभिमानी आणि निःसंगळें । वोडगस्त आणि खळ । दांभिक आणि अन-
र्गळें । अतिशयेंसीं ॥ १८ ॥ वोखटें आणि विकारी । खोटें आणि अनुप-
कारी । अवलक्षण आणि धिक्कारी । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥ अल्पमति
आणि वादक । दीनरूप आणि भेदक । सूक्ष्मरूप आणि त्रासक । कुशब्देँ-
करूनि ॥ २० ॥ कठीणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥ न्यूनवचनी पैशून्य-
वचनी । अशुभवचनी अनित्यवचनी । द्वेपवचनी अनृतवचनी । बाष्कळ-
वचनी धिक्कारी ॥ २२ ॥ कपटी कुटिल गांढ्याळ । कुरटें कुचर नाठाळ । कोपी
कुधन टवाळ । अतिशयेंसीं ॥ २३ ॥ तपिलें तामसी अविचार । पापी अनर्थी
अपस्मार । भूतसमंधी संचार । अंगीं वसे ॥ २४ ॥ आत्महत्यारा स्त्री-
हत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा । मातृहत्यारा पितृहत्यारा । महापापी पतित
॥ २५ ॥ उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विश्वासघातकी । कृतघ्न गुरुतल्पी
नरॅकी । आततायी जल्पक ॥ २६ ॥ नित्य भांडण झगडा कलह । अधर्म
अनराहाटी शोकसंग्रह । चाहाड व्यसनी विग्रहीँ । निग्रहकर्ता ॥ २७ ॥ द्वाड
अपेशी वोंगळ । चाळक चुंबक लचाळ । स्वार्थी अभिलापी वोढाळ । अदत्त
भांड अदेखणा ॥ २८ ॥ शठ शुंभ कातरूं । लंड तरमुंडें सितरूं । बंड पाखांड
१. तापट. २. निर्लज्ज. ३. स्वच्छंद. ४. गुरुपत्नीशीं जाणारा. ५. नरकांत
पडणारा. ६. कुमार्ग. ७. भांडण. ८. कृपण. ९. भित्रा १०. घुसणारा. ११. ठक.

२८ श्रीदासबोध. [ दशक
तस्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥ धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजटें¹ ।
धोंटें उद्भट लंपट । बटवाळै² कुबुद्धि ॥ ३० ॥ मारेकरी वरपेकॅरी। दरवडेकरी
खाँणोरी⁵ । मैंद भौंदु परद्वारी । भुरेरेंकरी⁶ चेटकी ॥ ३१ ॥ निःशंक निला-
जिरा कैलभंट⁷ । टोणपा लौंद घट उद्भट । ठंस⁸ ठोंबसें⁹ खटनट । जगभांड विकारी¹⁰
॥ ३२ ॥ अधीर आळकीं अनाचारी । अंध पंगु खोकलेकरी । थौंटा बधिर
दभेकरी । तरी ताठा न सांडी ॥ ३३ ॥ विद्याहीन वैभवहीन । कुळहीन
लक्ष्मीहीन । शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीनँ¹¹ भिकारी ॥ ३४ ॥ बळहीन
कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन । लक्षणहीन लावण्यहीन । अंगहीन वि-
पारैँ¹² ॥ ३५ ॥ युक्तिहीन बुद्धिहीन । क्रियाहीन सत्वहीन । आचारहीन
विचारहीन । विवेकहीन संशयी ॥ ३६ ॥ भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन
वैराग्यहीन । शांतिहिन क्षमाहीन । सर्वहीन क्षुल्लक ॥ ३७ ॥ समय नेणे
प्रसंग नेणे । प्रयत्न नेणे अभ्यास नेणे । आर्जव नेणे मैत्रिकी नेणे । कांहींच
नेणे अभागी ॥ ३८ ॥ असो ऐसे नाना विकार । कुलक्षणांचे कोठार । ऐसे
कुविद्येचे नर । श्रोतीं वोळखावे ॥ ३९ ॥ ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि
त्यागाचि करणें । अभिमानें तैंन्हेँ¹³ भरणें हें विहित नव्हे ॥ ४० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके कुविद्यालक्षणं नाम तृतीयः
समासः ॥ ३ ॥
४. भक्तिनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ नाना सुकृतांचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याही-
मध्यें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥ नरदेहीं विशेष ब्राह्मण ।
त्याहीवरी संध्या स्नान । सद्वासना भगवद्भजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥
भगवद्भक्ति हे उत्तम । त्याहीवरी सत्समागम । काळ सार्थक हाचि परम
लाभ जाणावा ॥३॥ प्रेमप्रीतीचा सद्भाव । आणि भक्तांचा समुदाय । हरि-
कथा महोत्सव । तेणें प्रेम दुणावे ॥ ४ ॥ नरदेहीं आलिया एक । कांहीं
करावें सार्थक । जेणें पाविजे परलोक । परम दुर्लभ जो ॥ ५ ॥ विधियुक्त
१. वात्रट. २. कुभांडी. ३. भ्रष्ट. ४. लुटारू. ५. काळीजखाऊ. ६. भुरळ
पाडणारा ७. कळ काढणारा. ८. ताठर. ९. ठोंब्या. १०. हाबरा. ११. दुर्दैवी.
१२. कुरूप. १३. इट्टांस पेटणें.

२ रा. ] भक्तिनिरूपण. २९
ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म । अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें
॥ ६ ॥ अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग । नाहीं तरी धरणें
संग । साधुजनांचा ॥ ७ ॥ नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी
करावी । अथवा पुरश्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥८॥ अथवा कीजे परोप-
कार । अथवा ज्ञानाचा विचार । निरूपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥
पाळावी वेदाची आज्ञा । कर्मकांड उपासना । जेणें होइजे ज्ञाना । अधि-
कारपात्र ॥ १० ॥ काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
कांहीं तरी एक भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥ जन्मा आल्याचें फळ ।
कांहीं करावें सफळ । ऐसें न करितां निष्फळ । भूमिभार होय ॥ १२ ॥
नरदेहाचें उचित । कांहीं करावें आत्महित । यथानुशक्त्या चित्तवित्त ।
सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥ हें कांहींच न धरी जो मनीं । तो मृतप्राय
वर्ते जनीं । जन्मास येऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥ नाहीं
संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन । नाहीं मंत्र जप ध्यान ।
मानसपूजा ॥ १५ ॥ नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम ।
नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥ नाहीं सद्बुद्धि नाहीं
गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण । नाहीं अध्यात्मनिरूपण । ऐकिलें कदा ॥
१७ ॥ नाहीं भल्याची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती । नाहीं कैवल्याची
प्राप्ती । मिथ्या मर्दै ॥ १८ ॥ नाहीं नीति नाहीं न्याय । नाहीं पुण्याचा
उपाय । नाहीं परत्रींची सोय । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥ नाहीं विद्या नाहीं
वैभव । नाहीं चातुर्यांचा भाव । नाहीं कळा नाहीं लाघव । रम्य सर-
स्वतीचें ॥ २० ॥ शांति नाहीं क्षमा नाहीं । दीक्षा नाहीं मैत्री नाहीं ।
शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥ शुचि नाहीं स्वधर्म नाहीं ।
आचार नाहीं विचार नाहीं । अत्रै नाहीं परँत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची
॥ २२ ॥ कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं । योग
नाहीं धारिष्ट नाहीं । कांहींच नाहीं पाहतां ॥ २३ ॥ उपरेति नाहीं त्याग
नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं । आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्वराची
॥ २४ ॥ परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं । हरिभक्तीचा
१. मोक्षाची. २. परलोकाची. ३. इहलोक ४. परलोक. ५. वैराग्य.

३० श्रीदासबोध. [ दशक
लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥ ऐसे प्रकारचे पाहतां जन । ते जितचि
प्रेतसमान । त्यांसी न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥ पुण्य सामग्री
पुरती । तयासीच घडे भगवद्भक्ती । जे जे जैसें संचित करिती । ते ते पावती
तैसेंची ॥ २७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके भक्ति-
निरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. रजोगुणनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ मुळीं देह त्रिगुणांचा । सत्व-रज-तमांचा । त्यांमध्यें
सत्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥ सत्वगुणें भगवद्भक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावती प्राणी ॥ २ ॥ श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था
मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥१॥
टी० ॥ त्यांतही शुद्ध आणि शबल । तेहि बोलिजेती सकळ । शुद्ध तेंचि जें
निर्मल । शबलें बाधक जाणावें ॥ ३ ॥ शुद्ध-शबलांचें लक्षण । सावध प-
रिसा विचक्षण । शुद्ध तो परमार्थी जाण । शबलें तो संसारिक ॥४॥ तया
संसारिकाची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती । एक येतां दोनी जाती । निघो-
नियां ॥ ५ ॥ रज तम आणि सत्व । तेणेंचि चाले जीवित्व । रजोगुणाचें
कर्तृत्व । दाखवूं आतां ॥ ६ ॥ रजोगुण येतां शरीरीं । वर्तणूक कैसी करी ।
सावध होऊनियां चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥ माझें घर माझा संसार । देव
कैंचा आणिला थोर । ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥ माता
पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतु कियांची वाहे चिंता ।
तो रजोगुण ॥ ९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । दुसऱ्या-
चें अभिलाषावें । तो रजोगुण ॥ १० ॥ कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप
कैंचें ध्यान । विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥ नेणे तीर्थ नेण
व्रत । नेणे अतीत अभ्यागत । अनाचारीं मनोगत । तो रजोगुण ॥ १२ ॥
धनधान्याचें संचित । मन होय द्रव्यासक्त । अत्यंत कृपण जीवित । तो
रजोगुण ॥ १३ ॥ मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर । मी सक-
ळांमध्यें थोर । म्हणे तो रजोगुण ॥ १४ ॥ माझा देश माझा गांव । माझा
१. पुनः जन्मास येणें. २. नीच योनि. ३. गीता, अ० १४ पहा. ४. मिश्र.

२ रा. ] रजोगुणनिरूपण. ३१
वाढा माझा ठाव । ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगुण ॥ १५ ॥ दुसऱ्या-
चें सर्व जावें । माझेंच बरवें असावें । ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण
॥ १६ ॥ कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार । अथवा कामाचा वि-
कार । तो रजोगुण ॥ १७ ॥ बालकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥ जिवलगाची खंती । जेणें काळें
वाटे चित्तीं । तेणें काळें शीघ्रगति । रजोगुण आला ॥ १९ ॥ संसाराचे ब-
हुत कष्ट । कैसा होईल शेवट । मनास आठवे संकट । तो रजोगुण ॥ २० ॥
वैभव देखोनि दृष्टीं । आवडी उपजली पोटीं । आशागुणें हिंपुटी १ । करी तो
रजोगुण ॥ २१ ॥ कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें । दुःख
अत्यंत वाटलें । तो रजोगुण ॥ २२ ॥ जें जें दृष्टीं पडलें । तें तें मनें मागि-
तलें । लभ्य नसतां दुःख जाहलें । तो रजोगुण ॥ २३ ॥ विनोदार्थ भरे
मन । शृंगारिक करी गायन । रागरंग तानमान । करी तो रजोगुण ॥ २४॥
टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे विवादा । हास्यविनोद करी सर्वदा ।
तो रजोगुण ॥ २५ ॥ आळस उठे प्रबळ । कर्मणुकीचे नाना खेळ । कां उप-
भोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥ कळावंत बहुरूपी । नटावे-
लोकीं २ साक्षेपी ३ । नाना खेळीं दान अर्पी । तो रजोगुण ॥ २७ ॥ उन्मत्त ४
द्रव्यावरी अति प्रीती । आवडे नीचाची संगती । ग्रामण्य ५ आठवे चित्तीं ।
तो रजोगुण ॥ २८ ॥ तस्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे । नित्य-
नेमासि मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥ देवाकारणीं लाजाळू । उदरा-
लागीं कष्टाळू । प्रपंचीं जो स्नेहाळू । तो रजोगुण ॥ ३० ॥ गोड ग्रासीं आँळ- ६
केपण । अत्यादरें पिंडपोषण ७ । रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥
शृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे । कळालाघवीं मन पर्वाडे ८ । तो
रजोगुण ॥ ३२ ॥ नेणोनियां परमात्मा । सकल पदार्थां प्रेमा । बलात्कारें
वाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥ असो ऐसा रजोगुण । लोभें दावी
जन्ममरण । प्रपंचीं तो शबल ९ जान । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥ आतां
१. हिरमोड. २. नट वगैरेंना पाहण्यांत. ३. प्रयत्न करणारा. ४. मादक.
५. हरामखोरी. ६. अतिशय हाव. ७. देहाचें पोषण. ८. शिरे. ९ रजोगुणाचे
प्रकार दोन, शुद्ध आणि शबल; त्यांतील एक.

३२ श्रीदासबोध. [ दशक
रजोगुण हा सुटेना । संसारिक हेतु तुटेना । प्रपंचीं गुंतली वासना । यासि
उपाय कोण ॥ ३५ ॥ उपाय एक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती । तरी
यथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥ काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें
फळें जीवनें । ईश्वरीं अर्पोनियां नमनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥ यथानु-
शक्ति दान पुण्य । परी भगवंतीं अनन्य । सुखदुःखें परीं चिंतन । देवाचें-
चि करावें ॥ ३८ ॥ आदि अंतीं एक देव । मध्येंचि लाविली माँव । म्हणो-
निया पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥ ऐसा शबल रजोगुण । संक्षेपें
केलें कथन । आतां शुद्ध तो तूं जाण । पारमार्थिक ॥ ४० ॥ त्याचे वोळ-
खींचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण । तो सत्वगुण परिपूर्ण । भजनमूळ
॥ ४१ ॥ ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुभविला । आतां पुढें
परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
द्वितीयदशके रजोगुणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. तमोगुणनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण । आतां
ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥ संसारीं दुःखसंबंध । प्राप्त होतां उठे
खेद । कां अद्भुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥ शरीरीं क्रोध भरतां । नो-
ळखे माता आणि पिता । बंधु बहिण आणि कांता । ताडी तो तमोगुण ॥ ३ ॥
दुसऱ्याचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा । विसरवी जीवभावा ।
तो तमोगुण ॥ ४ ॥ भरलें क्रोधाचें कौविरें । पिशाच्यापरी वावरे । नाना
उपाहीं नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥ आपला आपण शस्त्रपात । परोव्याचा
करी घात । ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥ डोळां युद्धचि पाहावें ।
रण पडिलें तेथें जावें । ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥ अखंड भ्रांति
पडे । केला निश्चय बिघडे । अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥
क्षुधा जयाची वाड । नेणे कडू अथवा गोड । अत्यंत जो कां मूढ । तो
तमोगुण ॥ ९ ॥ प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें । स्वयें आत्म-
हत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥ किडा मुंगी आणि श्वापद । यांचा करूं
१. स्थिर होत नाहीं. २. माया. ३. वेड. ४. भटके, वागे. ५. दुसऱ्याचा.

२ रा.] तमोगुणनिरूपण. ३३
आवडे वध । अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥ स्त्रीहत्या बाळ-
हत्या । द्रव्यालागीं ब्रह्महत्या । करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥
ईंसाळोचेनि नेटें । विष द्यावें ऐसें वाटे । परवध मनीं उठे । तो तमोगुण
॥ १३ ॥ अंतरीं धरूनि कपट । पराचें करी तळपट । सदा मस्त सदा उद्धट
तो तमोगुण ॥ १४ ॥ युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें । मरावें
कीं मारावें । तो तमोगुण ॥ १५ ॥ कलह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी
ऐसें उठे । अंतरीं द्वेष प्रकटे । तो तमोगुण ॥ १६ ॥ मत्सरें भक्ति मोडावी ।
देवालयें बिघडावीं । फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥ सत्कर्मे
तीं नावडतीं । नाना दोष ते आवडती । पापभय नाहीं चित्तीं । तो तमो-
गुण ॥ १८ ॥ ब्रह्मवृत्तीचा उच्छेद । जीवमात्रांस देणें खेद । करूं आवडे प्र-
माद । तो तमोगुण ॥ १९ ॥ अग्निप्रलय शस्त्रप्रलय । भूतप्रलय विप्रप्रलय ।
मत्सरें करी जीवक्षय । तो तमोगुण ॥ २० ॥ भांडण लावून द्यावें । स्वयें
कौतुक पाहावें । कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २१ ॥ प्राप्त झालिया
संपत्ती । जीवांसी करी यातायाती । कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण
॥ २२ ॥ नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव । वेद शास्त्र
नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २३ ॥ परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्या-
स । संसाराचा न ये त्रास । तो तमोगुण ॥ २४ ॥ स्नान संध्या नेम नसे ।
स्वधर्मीं भ्रष्टला दिसे । अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥ ज्येष्ठ
बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे । शीघ्रकोपी निघूनि जाये । तो तमो-
गुण ॥ २६ ॥ उगोंचि खावें उगोंचि असावें । स्तब्ध होऊनि बैसावें । कांहीं-
च स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥ चेटकी विद्येचा अभ्यास । शस्त्र-
विद्येचा हव्यास । मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥ केले ग-
ळाचे नवस । रोंडी-वेडीचे सायास । काष्ठयंत्रें छेदी जिव्हेस । तो तमोगुण
॥ २९ मस्तकीं भेंदें जाळावें । पोतें४ अंग हुरपळावें । स्वयें शस्त्र टोचून
घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥ निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें ।
१. कांहीं बाधेमुळें, किंवा ईर्ष्येमुळें. २. धगधगीत निखाऱ्यांची खाई.
३. ज्वाळा निघतील असा विस्तव खांपरांत पेटवून तें डोईवर घेऊन नाचावें.
४. भुत्याच्या हातांतील दिवटीनें.

३४ श्रीदासबोध. [ दशक
देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३१ देवासि शिर वाहावें । कां तें अंग
समर्पावें । कडणीवरून घालून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३२ ॥ निराहार
उपोषण । पंचाग्निधूम्रपान । आपणास घ्यावें धुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥
सकाम जें कां अनुष्ठान । कां तें वायुरोधन । अथवा रहावें पडोन । तो
तमोगुण ॥ ३४ ॥ नखें केश वाढवावे । हस्तचि वरते करावे । अथवा वाक्-
शून्य १ व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥ नाना निग्रहीं पडावें । देहदुःखें चरफ-
डावें । क्रोधें देवास फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥ देवाची जो निंदा करी ।
तो आशाबद्ध अघोरी । जो संतसंग न करी । तो तमोगुण ॥ ३७ ॥ ऐसा
हा तमोगुण । सांगतां तो असाधारण । परी त्यागार्थ निरूपण । कांहींएक
॥ ३८ ॥ ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनांसि २ कारण । मोक्षप्राप्तीचें
लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥ केल्या कर्माचें फळ । प्राप्त होईल सकळ ।
जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥ व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे
तो सत्वगुण । तेंचि असे निरूपण । पुढिलिये समासीं ॥ ४१ ॥ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके तमोगुणनिरूपणं नाम षष्ठः
समासः ॥ ६ ॥
७. सत्वगुणनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण ।
आतां ऐका सत्वगुण । परम दुर्लभ जो ॥ १ ॥ जो भजनाचा आधार ।
जो योगियांचा थार । जो निरसी ३ संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥
जेणें होय उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं । जेणें पाविजे मुक्ती । सायु-
ज्यता ती ॥ ३ ॥ जो भक्तांचा कोंवसा ४ । जो भवार्णवींचा भरवंसा । मोक्ष-
लक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥ जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें
भूषण । रजतामांचें निरसन । जयाचेनी ॥ ५ ॥ जो परम सुखकारी । जो
आनंदाची लहरी । देऊनियां निवारी । जन्ममृत्यु ॥ ६ ॥ जो ज्ञानाचा
शेवट । जो पुण्याचें मूळपीठ । जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥
ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण । तया क्रियेचें लक्षण । ऐसें असे
१. मौन धरावें. २. अधोगतीस. ३. नष्ट करितो. ४. आश्रय, आधार.

२ रा.] सत्वगुणनिरूपण. ३५
॥ ८ ॥ ईश्वरीं प्रेम अधिक । प्रपंच संपादनें लौकिकें । सदा सन्निध विवेक ।
तो सत्वगुण ॥ ९ ॥ संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमल दावी । भज-
नक्रिया जो उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥ परमार्थाची आवडी । उठे भा-
वार्थीची गोडी । परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥ स्नान संध्या
पुण्यशीळ । अभ्यंतरींचा निर्मळ । शरीर वरीं सोज्वळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥
यजन आणि याजन । अध्ययन आणि अध्यापन । स्वयें करी पुण्यदान ।
तो सत्वगुण ॥ १३ ॥ निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी । क्रिया
पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥ अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें ।
नाना रत्नांचीं दानें । तो सत्वगुण ॥ १५ ॥ धनदान वस्त्रदान । अन्नदान
उदकदान । करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥ कार्तिकस्नानें मा-
घस्नानें । व्रतें उद्यापनें दानें । निष्काम तीर्थे उपोषणें । तो सत्वगुण ॥ १७ ॥
सहस्रभोजनें लक्षभोजनें । विविध प्रकारचीं दानें । निष्काम करी सत्व-
गुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥ तीर्थां अर्पी जो अग्रहारें । बांधी वापी
कूप सरोवरें । बांधी देवालयें शिखरें । तो सत्वगुण ॥ १९ ॥ देवद्वारीं
पडशाळा । पायऱ्या दीपमाळा । वृंदावनें पार पिंपळा । बांधी तो सत्व-
गुण ॥ २० ॥ लावी वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें । निववी तापसि-
यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥ संध्यामठ आणि भुयारीं । पायऱ्या
नदीतीरीं । भांडारगृहें देवद्वारीं । बांधी तो सत्वगुण ॥ २२ ॥ नाना दे-
वांचीं जीं स्थानें । तेथें नंदादीप घालणें । वाहे अलंकारभूषणें । तो सत्व-
गुण ॥ २३ ॥ झंगत मृदंग टाळ । दमामे नगारे काहाळ । नाना वाद्यांचे
कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥ नाना सामुग्री सुंदर । देवालयीं घाली नर ।
हरिभजनीं तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥ छत्रें आणि सुखासनें । दिंड्या
पताका निशाणें । वाहे चामरें सूर्यपानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥ वृंदावनें
तुळसीवनें । रंगमाळा संमार्जनें । ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण
॥ २७ ॥ सुंदर नाना उपकरणें । मंडप चांदवे आसनें । देवालयीं समर्पणें ।
तो सत्वगुण ॥ २८ ॥ देवाकारणें खाद्य । नाना प्रकारचे नैवेद्य । अपूर्व
१. बाह्यात्कारीं. २. देवब्राह्मणांस दिलेला गांव इत्यादि. ३. धर्मशाळा. ४.
बागबगीचे. ५. अबदागिरी.

३६ श्रीदासबोध. [ दशक
फळें अर्पी सद्यै । तो सत्वगुण ॥ २९ ॥ ऐसी भक्तीची आवडी । नित्य
दास्यत्वाची गोडी । स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥ तिथि पर्वे
महोत्सव । तेथें ज्याचा अंतर्भाव । कायावाचामनें सर्व । अर्पी तो सत्व-
गुण ॥ ३१ ॥ हरिकथेसि तत्पर । गंध माळा आणि धूप कर्पूर । घेऊन
उभा निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥ नर अथवा नारी । यथानुशक्ति सा-
मुग्री । येऊन उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥३३॥ महत्कृत्य सांडूनि मागें ।
देवास ये लागवेगें । भक्ति निकट अंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥ थोरपण
सांडूनि दुरी । नीच कृत्य अंगिकारी । तिष्ठत उभा देवद्वारीं । तो सत्वगुण
॥ ३५ ॥ देवालागीं उपोषण । वर्जी तांबूल भोजन । नित्यनेम जप ध्यान ।
करी तो सत्वगुण ॥ ३६ ॥ शब्द कठिन न बोले । अतिनेमेंसि चाले ।
योगी जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥३७॥ सांडूनियां अभिमान । निष्काम
करी कीर्तन । स्वेद रोमांच स्फुरण । तो सत्वगुण ॥ ३८ ॥ अंतरीं देवाचें
ध्यान । तेणें निडारले नयन । पडे देहाचें विस्मरण । तो सत्वगुण ॥३९॥
हरिकथेसी अति प्रीती । सर्वथा न ये विकृती । अधिक प्रेमा आदि अंतीं ।
तो सत्वगुण ॥ ४० ॥ मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले बिरुदावळी ।
घेउनि लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥ देहाभिमान गळे । विषयीं
वैराग्य प्रबळे । मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥ कांहीं क-
रावा उपाय । संसारीं गुंतोनि काय । उकलवी ऐसें हृदय । तो सत्वगुण
॥ ४३ ॥ संसारासि त्रासे मन । कांहीं करावें भजन । ऐसें मनीं उठे ज्ञान ।
तो सत्वगुण ॥ ४४ ॥ असतां आपुले आश्रमीं । अत्यादर नित्यनेमीं । सदा
प्रीति लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥ सकळांचा आला वीट । परमार्थी
जो निकट । आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥ सर्वकाळ उदा-
सीन । नाना भोगीं विटे मन । आवडे भगवद्भजन । तो सत्वगुण ॥ ४७ ॥
पदार्थां न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत । ऐसा दृढ भावार्थ । तो सत्व-
गुण ॥ ४८ ॥ अंतरीं स्फूर्ति स्फुरे । स्वस्वरूपीं तर्क भरे । नष्ट संदेह निवारे ।
तो सत्वगुण ॥ ४९ ॥ लोक बोलती विकारी । तरी अधिक प्रेमा धरी ।
निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ५० ॥ शरीर लावावें कारणीं । साक्षेपें
१. तत्काळ, उत्कंठेनें. २. निश्चळ झाले, एकाग्र झाले. ३. वीट. ४. उत्कंठा.

२ रा. ] सत्वगुणनिरूपण. ३७
उठे अंतःकरणीं । सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥५१॥ शांति क्षमा आणि
दया । निश्चय उपजे जया । सत्वगुण जाणावा तया- । अंतरीं आला ॥५२॥
आले अतित अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । यथाशक्ति दान देत ।
तो सत्वगुण ॥ ५३ ॥ तडींतोपडीं । दैन्यवाणे । आले आश्रमाचेनि गुणें ।
तयांलागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥ आश्रमीं अन्नाची आपदा ।
परी विमुख नव्हे कदा । शक्त्यनुसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥
जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना । जयासि नाहीं कामना । तो
सत्वगुण ॥ ५६ ॥ होणार तैसें होत जात । प्रपंचीं झाला आघात । डळ-
मळीना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥ एका भगवंताकारणें । सर्व
सुख सोडिलें जेणें । केलें देहाचें सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥ विषयीं
धांवे वासना । परी तो कदा डळमळीना । ज्याचें धारिष्ट चलेना । तो सत्व-
गुण ॥ ५९ ॥ देह आपदेनें पीडिला । क्षुधेतृषेनें बोसावलां २ । तरी निश्चय
राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥ श्रवण आणि मनन । निजध्यासें समा-
धान । शुद्ध झालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥ सकळांसि नम्र बोले ।
मर्यादा धरून चाले । सर्व जन तोषविले । तो सत्वगुण ॥ ६२ ॥ जयासि
अहंकार नसे । नैराश्यता विलसे । जयापाशीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥
॥ ६३ ॥ सकळ जनांसि आर्जव । नाहीं विरोधासी ठाव । परोपकारीं वेंची
जीव । तो सत्वगुण ॥६४॥ आपकार्याहूनि जीवीं । परकार्यसिद्धि करावी ।
मरून कीर्ति उरवावी । तो सत्वगुण ॥ ६५ ॥ परावयाचे दोष गुण । दृष्टीस
देखे आपण । समुद्राऐसी सांठवण । तो सत्वगुण ॥ ६६ ॥ नीच उत्तर
साहणें । प्रत्युत्तर न देणें । आपुला क्रोध सांवरणे । तो सत्वगुण ॥ ६७ ॥
अन्यायेंविण गांजिती । नानापरी पीडा करिती । तितकेंही सांठवी चित्तीं ।
तो सत्वगुण ॥ ६८ शरीरें झीज साहणें । दुर्जनासि मिळोन जाणें । निंद-
कास उपकार करणें । तो सत्वगुण ॥ ६९ ॥ मन भलतीकडे धांवे । तें
विवेकें आंवरावें । इंद्रियदमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥ सत्क्रिया
आचरावी । असत्क्रिया त्यागावी । वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण
॥ ७१ ॥ जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण । नानामंत्रों देव-
१. तपस्वी, भिक्षु. २. कासावीस झाला.

त्तार्चन । करी तो सत्वगुण ॥ ७२ ॥ पर्वकाळीं अतिसादर । वसंतपूजेसि
तत्पर । जयंत्याद्रि प्रीति थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥ विदेशीं मेलें मरणें ।
तयासि संस्कार देणें । अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥ कोणी
एकास मारी । तयासि जाऊन निवारी । जीव बंधनमुक्त करी । तो सत्व-
गुण ॥ ७५ ॥ लिंगलाखोळी अभिषेक । नामस्मरणीं विश्वास । देव-
दर्शनीं अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥ संत देखोनि धांवे । परमसुख
हेलांवे । नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥ संतकृपा होय जयांस ।
तेणें उद्धरिला वंश । जो ईश्वराचा अंश । तो सत्वगुण ॥ ७८ ॥ सन्मार्ग
दाखवी जना । जो लावी हरिभजना । ज्ञान शिकवी अज्ञाना । तो सत्व-
गुण ॥ ७९ ॥ आवडे पुण्यसंस्कार । प्रदक्षिणा नमस्कार । जया राहे पाठां-
तर । तो सत्वगुण ॥ ८० ॥ भक्तीचा हव्यास भारी । ग्रंथसामुग्री जो करी ।
धातुमूर्ति नानापरी । पूजां तो सत्वगुण ॥ ८१ ॥ झळझळीत उपकरणें ।
माळा गवाळीं आसनें । पवित्र सोवळ वसनें । तो सत्वगुण ॥ ८२ ॥ पर-
पीडेचें वाहे दुःख । परसंतोषाचें सुख । वैराग्य देखोनि मानी हरिखें । तो
सत्वगुण ॥ ८३ ॥ परभूषणीं भूषण । परदूषणीं दूषण । परदुःखीं शिणे जाण ।
तो सत्वगुण ॥ ८४ ॥ आतां असो हें बहुत । देवधर्मीं ज्याचें चित्त । भजे
कामनारहित । तो सत्वगुण ॥ ८५ ॥ ऐसा हा सत्वगुण सात्विक । संसार-
सागरीं तारक । येणें उपजे विवेक । ज्ञानमार्गाचा ॥ ८६ ॥ सत्वगुणें भगव-
द्भक्ती । सत्वगुणें ज्ञानप्राप्ती । सत्वगुणें सायुज्यमुक्ती । पाविजे ते ॥ ८७ ॥
ऐसी सत्वगुणाची स्थिति । स्वल्प बोलिलों यथामती । सावध होऊनि
श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
द्वितीयदशक सत्वगुणनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥

८. सद्विद्यानिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें । वि-
चार घेतां वळेचि बाणे । सद्विद्या अंगीं ॥ १ ॥ सद्विद्येचा जो पुरुष । तो
उत्तम लक्षणीं विशेष । त्याचे गुण ऐकतां संतोष । विशेष वाटे ॥ २ ॥

१. भरून येई. २. वस्त्रं. ३. हर्ष.

२ रा. ] सद्विद्यानिरूपण. ३९
भाविक सात्विक प्रेमळ । शांतिक्षमादयाशीळ । लीन तत्पर केवळ । अमृत-
वचनी ॥ ३ ॥ परम सुंदर आणि चतुर । परम सबळ आणि धीर । परम
संपन्न आणि उदार । अतिशयेंसीं ॥ ४ ॥ परम ज्ञाता आणि भक्त । महा-
पंडित आणि विरक्त । महातपस्वी आणि शांत । अतिशयेंसीं ॥ ५ ॥ वक्ता
आणि नैराश्यता¹ । सर्वज्ञ आणि सादरता । श्रेष्ठ आणि नम्रता । सर्वत्रांसी
॥ ६ ॥ राजा आणि धार्मिक । शूर आणि विवेक । तारुण्य आणि नेमक ।
अतिशयेंसीं ॥ ७ ॥ वृद्धाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी । धन्वं-
तरी परोपकारी । यशहस्ती² ॥ ८ ॥ कार्यकर्ता निरभिमानी । गायक आणि
वैष्णव जनीं । वैभव आणि भगवद्भजनीं । अत्यादर ॥ ९ ॥ तत्वज्ञ आणि
उदासीन । बहुश्रुत आणि सज्जन । मित्र आणि सत्वगुण । नीतिवंत ॥ १० ॥
साधु पवित्र पुण्यशीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा केवळ कृपाळ । कर्मनिष्ठ स्वधर्मी
निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥ गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मा-
र्गी सत्क्रिया धारणा³ धृती⁴ । श्रुति स्फूर्ति लीळा युक्ती । स्तुती मती परीक्षा
॥ १२ ॥ दक्ष धूर्त योग्य तार्किकें⁵ । सत्य साहित्य नेम भेदक । कुशल चपळ
चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥ आदर सन्मान तारतम्य जाणे । प्रयो-
ग समय प्रसंग जाणे । कार्यकारणचिन्हें जाणे । विचक्षण बोलका ॥ १४ ॥
सावध साक्षरी⁶ साधक । आगमनिगमशोधक⁷ । ज्ञानविज्ञानप्रबोधक । नि-
श्रयात्मक ॥ १५ ॥ पुरश्चरणी तीर्थवासी । दृढव्रती कायक्लेशी⁸ । उपासक
निग्रहासी । करूं जाणे ॥ १६ ॥ सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी
एकवचनी । निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ वासनातृप्त स-
खोल⁹ योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी¹⁰ । सौम्य सात्विक शुद्धमार्गी । नि-
ष्कपट निर्व्यसनी ॥ १८ ॥ सुघड¹¹ संगीत गुणग्राही । अनपेक्षी¹² लोकसंग्रही ।
आर्जवें¹³ सख्य सर्वही । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥ द्रव्यशुची दानशुची । न्याय-
शुची अंतरशुची । प्रवृत्तिशुची निवृत्तिशुची । सर्वशुची निःसंगपणें ॥ २० ॥
मित्रपणें परहितकारी । वाङ्मधुर्यता परशोकापहारी । सामर्थ्यपणें परनेत्र-
१ औदासीन्य. २ यशस्वी. ३ चित्ताची स्थिरता. ४. धैर्य. ५. विचारशील.
६. दीर्घोद्योगी. ७ वेदशास्त्रांचें मनन करणारा. ८ शरीरकष्ट सोसणारा. ९. गंभीर
स्वभावाचा. १०. वैराग्यशालि. ११. चतुर. १२. निरिच्छ. १३. सरळपणा.

४० श्रीदासबोध. [ दशक
धौरी । पुरुषार्थे जगमित्र ॥ २१ ॥ संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ-
क्लृप्ते असोनि श्रोता । कथानिरूपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥
विवादरहित संवादी । संगरहित निरुपाधी । दुराशारहित अक्रोधी । नि-
र्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥ विमळज्ञानी निश्चयात्मक । समाधानी आणि
भजक । सिद्ध असोनि साधक । स्वधर्म रक्षी ॥ २४ ॥ सुखरूप संतोष-
रूप । आनंदरूप हास्यरूप । ऐक्यरूप आत्मरूप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥ भाग्यवंत
जयवंत । रूपवंत गुणवंत । आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥
यशवंत कीर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत । वीर्यवंत वैरदवंत । सत्यवंत
सुँकृती ॥ २७ ॥ विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्षणवंत । कुळवंत शु-
चिष्मंत । बळवंत दयाळू ॥ २८ ॥ युक्तिवंत गुणवंत । बुद्धिवंत बहुधारिष्ट ।
दयावंत सदा संतुष्ट । निःस्पृह वीतरागी ॥ २९ ॥ असो ऐसे उत्तम गुण ।
हें सद्विद्येचें लक्षण । अभ्यासावयासि निरूपण । अल्पमात्र बोलिलों ॥ ३० ॥
रूपलावण्य अभ्यासितां न ये । सहज गुणासि न चले उपाये । कांहीं तरी
धरावी सोये । आगंतुक गुणांची ॥ ३१ ॥ ऐसी हे सद्विद्या वरवी । सर्व-
त्रांपासीं असावी । परी विरक्त पुरुष अभ्यासावी । अगत्यरूपें ॥ ३२ ॥
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके सद्विद्यानिरूपणं नाम
अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. विरक्तलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका विरक्तांचीं लक्षणें । विरक्तें असावें कोणत्या
गुणें । जेणें अंगीं सामर्थ्य बाणे । योगियांचें ॥ १ ॥ जेणें सत्कीर्ति वाढे ।
जेणें सार्थकता घडे । जेणेंकरितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥ जेणें
परमार्थ फावे । जेणें आनंद हेलोंवे । जेणें विरक्ति दुणावे । विवेकेंसहित
॥ ३ ॥ जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ११ । जेणें भाग्यश्री प्रबळे ।
मोक्षसहित ॥ ४ ॥ मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती । सुखी
१. लोकांचे रक्षण करणारा. २. सर्वज्ञता. ३. अनुग्रह प्राप्त झालेला. ४.
पुण्यवान्. ५. शुद्ध, निर्मळ. ६. निरिच्छ. ७. वैराग्यशील. ८. आंगचे नाहींत
असे, अभ्यासानें येणारे. ८. लाभे. १०. उचंबळून येई. ११. प्राप्त होते.

२ रा. ] विरक्तलक्षण. ४१
राहे सरस्वती । मधुर शब्द बोलावया ॥ ५ ॥ हीं लक्षणें श्रवण कीजे ।
आणि सुदृढ जीवीं धरिजे । तरी मग विख्यात होइजे । भूमंडळीं ॥ ६ ॥
विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें । विरक्तें धारिष्ट धरावें ।
दमनविषयीं ॥ ७ ॥ विरक्तें करावें साधन । विरक्तें लावावें भजन । वि-
रक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटवावें ॥ ८ ॥ विरक्तें भक्ति वाढवावी । वि-
रक्तें शांति दाखवावी । विरक्तें यत्नें करावी । विरक्ति आपुली ॥ ९ ॥
विरक्तें सत्क्रिया प्रतिष्ठांवी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी । विरक्तें नैराश्य-
ता धरावी । सदृढ जीवीं ॥ १० ॥ विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें
नीति अवलंबावी । विरक्तें क्षमा सांभाळावी । अत्यादरें ॥ ११ ॥ विरक्तें
परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा । विरक्तें सन्निध ठेवावा । स-
न्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥ विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निव-
वावीं । विरक्तें साबडी नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥ विरक्तें असावें परम
दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष । विरक्तें ओढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥
विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा । विरक्तें वक्तृत्वं उभारावा।
मोडला परमार्थ ॥ १५ ॥ विरक्तें विमळ ज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य
स्तवीत जावें । विरक्तें निश्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥ पर्वै करावीं
अचाटें । चालवावीं भक्तीचीं थाटें । नाना वैभवें केंचाटें । उपासनामार्ग
॥ १७ ॥ हरिकीर्तनें करावी । निरूपणें माजवावीं । भक्तिमार्गै लाजवावीं
निंदक दुर्जनें ॥ १८ ॥ बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विचार । बल्लेंचि करावा ॥ १९ ॥ स्नान संध्या जप ध्यान ।
तीर्थयात्रा भगवद्भजन । नित्यनेम पवित्रपण । अंतर शुद्ध असावें ॥ २० ॥
दृढ निश्चय धरावा । संसार मिथ्या जाणावा । विश्वाचा उद्धार करावा । सं-
सर्गमात्रें ॥ २१ ॥ विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार । विरक्तें
असावें तत्पर निरूपणविषयीं ॥ २२ ॥ विरक्तें सावध असावें । विरक्तें
शुद्धमार्गै जावें । विरक्तें झिजोनि उरावावें । सत्कीर्तीसी ॥ २३ ॥ विरक्तें
विरक्त धुंडावे । विरक्तें साधु ओळखावे । विरक्तें मित्र करावे । संत योगी
१. स्थापावी. २. भोळीं मनुष्यें. ३. कैवार घ्यावा. ४. उद्योग. ५. निश्चित,
स्थिर. ६. खटपटी.

५२ । श्रीदासबोध. । [ दशक


सज्जन ॥ २४ ॥ विरक्तें करावी पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें । वि-
रक्तें करावी नाना स्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥ विरक्तें उपाधी न
करावी । आणि उदासवृत्ति न सांडावी । दुराशा जडों न द्यावी । कोणे
एके विषयीं ॥ २६ ॥ विरक्तें असावें अंतर्निष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधीनपणें ॥ २७ ॥ विरक्तें समय जाणावा ।
विरक्तें प्रसंग वोळखावा । विरक्त चतुर असावा । सर्व प्रकारें ॥ २८ ॥
विरक्तें एकदेशी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें । विरक्तें अवघें जाणावें ।
ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥ हरिकथानिरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान । पिंडे-
ज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग
सिद्धांतमार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावे ॥ ३१ ॥ प्रेमळ
स्थिति उदासस्थिति । अंतरस्थिति अलिप्तस्थिति । विदेहस्थिति सहजें-
स्थिति । सकळ जाणावें ॥ ३२ ॥ ध्यान लक्षण मुद्रा आसनें । मंत्र यंत्र
विधि⁶ विधानें । नाना मतांचें देखणें । पाहून सांडावें ॥ ३३ ॥ विरक्तें
असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र । विरक्तें असावें विचित्र । बहु-
गुणी ॥ ३४ ॥ विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त । वि-
रक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥ विरक्तें शास्त्रें धां९ढोळावीं ।
विरक्तें मतें विभांडां१०वीं । विरक्तें मुमुक्षु लावावीं । शुद्धमार्गी ॥ ३६ ॥
विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा । विरक्तें आपुला म्हणावा ।
विश्वजनें ॥ ३७ ॥ विरक्तें निंदक वंदावे । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेत१२वावे । मुमुक्षुनिरूपणें ॥ ३८ ॥ विरक्तें उत्तम गुण घ्यावे ।
विरक्तें अ-गुण त्यागावे । नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९॥ ऐसीं
हीं उत्तम लक्षणें । ऐकावीं एकाग्र मनें । यांचा अँ१३व्हेर न करणें । विरक्त


कठीण शब्दांचे अर्थ (Footnotes):

१. एकांगी, एकाद्या विषयाचा मात्र विचार करणारा. २. देहाच्या जन्मनाशा-
दिकांचें तात्त्विक ज्ञान. ३. कोणत्याहि गोष्टीने चित्तास क्षोभ होत नाहीं अशी
स्थिति. ४. देहविस्मृतिरूप ज्ञानी पुरुषाची निर्विकल्प स्थिति. ५. व्यवहारांत
असतांही चित्ताची समाधानवृत्ति. ६. शास्त्रनियम. ७. व्रतें, अनुष्ठानें इत्यादि.
८. विचार. ९. बारकाईनें शोधून पहावीं. १०. जिंकावां, मोड करावा. ११.
सर्व विश्वांतील लोक. १२. जागे करावे, विचारास प्रवृत्त करावे. १३. उपेक्षा.