दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 77, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५२ । श्रीदासबोध. । [ दशक
सज्जन ॥ २४ ॥ विरक्तें करावी पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें । वि-
रक्तें करावी नाना स्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥ विरक्तें उपाधी न
करावी । आणि उदासवृत्ति न सांडावी । दुराशा जडों न द्यावी । कोणे
एके विषयीं ॥ २६ ॥ विरक्तें असावें अंतर्निष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधीनपणें ॥ २७ ॥ विरक्तें समय जाणावा ।
विरक्तें प्रसंग वोळखावा । विरक्त चतुर असावा । सर्व प्रकारें ॥ २८ ॥
विरक्तें एकदेशी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें । विरक्तें अवघें जाणावें ।
ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥ हरिकथानिरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान । पिंडे-
ज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग
सिद्धांतमार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावे ॥ ३१ ॥ प्रेमळ
स्थिति उदासस्थिति । अंतरस्थिति अलिप्तस्थिति । विदेहस्थिति सहजें-
स्थिति । सकळ जाणावें ॥ ३२ ॥ ध्यान लक्षण मुद्रा आसनें । मंत्र यंत्र
विधि⁶ विधानें । नाना मतांचें देखणें । पाहून सांडावें ॥ ३३ ॥ विरक्तें
असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र । विरक्तें असावें विचित्र । बहु-
गुणी ॥ ३४ ॥ विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त । वि-
रक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥ विरक्तें शास्त्रें धां९ढोळावीं ।
विरक्तें मतें विभांडां१०वीं । विरक्तें मुमुक्षु लावावीं । शुद्धमार्गी ॥ ३६ ॥
विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा । विरक्तें आपुला म्हणावा ।
विश्वजनें ॥ ३७ ॥ विरक्तें निंदक वंदावे । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेत१२वावे । मुमुक्षुनिरूपणें ॥ ३८ ॥ विरक्तें उत्तम गुण घ्यावे ।
विरक्तें अ-गुण त्यागावे । नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९॥ ऐसीं
हीं उत्तम लक्षणें । ऐकावीं एकाग्र मनें । यांचा अँ१३व्हेर न करणें । विरक्त
कठीण शब्दांचे अर्थ (Footnotes):
१. एकांगी, एकाद्या विषयाचा मात्र विचार करणारा. २. देहाच्या जन्मनाशा-
दिकांचें तात्त्विक ज्ञान. ३. कोणत्याहि गोष्टीने चित्तास क्षोभ होत नाहीं अशी
स्थिति. ४. देहविस्मृतिरूप ज्ञानी पुरुषाची निर्विकल्प स्थिति. ५. व्यवहारांत
असतांही चित्ताची समाधानवृत्ति. ६. शास्त्रनियम. ७. व्रतें, अनुष्ठानें इत्यादि.
८. विचार. ९. बारकाईनें शोधून पहावीं. १०. जिंकावां, मोड करावा. ११.
सर्व विश्वांतील लोक. १२. जागे करावे, विचारास प्रवृत्त करावे. १३. उपेक्षा.