दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 69, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३४ श्रीदासबोध. [ दशक
देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३१ देवासि शिर वाहावें । कां तें अंग
समर्पावें । कडणीवरून घालून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३२ ॥ निराहार
उपोषण । पंचाग्निधूम्रपान । आपणास घ्यावें धुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥
सकाम जें कां अनुष्ठान । कां तें वायुरोधन । अथवा रहावें पडोन । तो
तमोगुण ॥ ३४ ॥ नखें केश वाढवावे । हस्तचि वरते करावे । अथवा वाक्-
शून्य १ व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥ नाना निग्रहीं पडावें । देहदुःखें चरफ-
डावें । क्रोधें देवास फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥ देवाची जो निंदा करी ।
तो आशाबद्ध अघोरी । जो संतसंग न करी । तो तमोगुण ॥ ३७ ॥ ऐसा
हा तमोगुण । सांगतां तो असाधारण । परी त्यागार्थ निरूपण । कांहींएक
॥ ३८ ॥ ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनांसि २ कारण । मोक्षप्राप्तीचें
लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥ केल्या कर्माचें फळ । प्राप्त होईल सकळ ।
जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥ व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे
तो सत्वगुण । तेंचि असे निरूपण । पुढिलिये समासीं ॥ ४१ ॥ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके तमोगुणनिरूपणं नाम षष्ठः
समासः ॥ ६ ॥
७. सत्वगुणनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण ।
आतां ऐका सत्वगुण । परम दुर्लभ जो ॥ १ ॥ जो भजनाचा आधार ।
जो योगियांचा थार । जो निरसी ३ संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥
जेणें होय उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं । जेणें पाविजे मुक्ती । सायु-
ज्यता ती ॥ ३ ॥ जो भक्तांचा कोंवसा ४ । जो भवार्णवींचा भरवंसा । मोक्ष-
लक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥ जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें
भूषण । रजतामांचें निरसन । जयाचेनी ॥ ५ ॥ जो परम सुखकारी । जो
आनंदाची लहरी । देऊनियां निवारी । जन्ममृत्यु ॥ ६ ॥ जो ज्ञानाचा
शेवट । जो पुण्याचें मूळपीठ । जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥
ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण । तया क्रियेचें लक्षण । ऐसें असे
१. मौन धरावें. २. अधोगतीस. ३. नष्ट करितो. ४. आश्रय, आधार.