दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 67, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३२ श्रीदासबोध. [ दशक
रजोगुण हा सुटेना । संसारिक हेतु तुटेना । प्रपंचीं गुंतली वासना । यासि
उपाय कोण ॥ ३५ ॥ उपाय एक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती । तरी
यथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥ काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें
फळें जीवनें । ईश्वरीं अर्पोनियां नमनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥ यथानु-
शक्ति दान पुण्य । परी भगवंतीं अनन्य । सुखदुःखें परीं चिंतन । देवाचें-
चि करावें ॥ ३८ ॥ आदि अंतीं एक देव । मध्येंचि लाविली माँव । म्हणो-
निया पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥ ऐसा शबल रजोगुण । संक्षेपें
केलें कथन । आतां शुद्ध तो तूं जाण । पारमार्थिक ॥ ४० ॥ त्याचे वोळ-
खींचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण । तो सत्वगुण परिपूर्ण । भजनमूळ
॥ ४१ ॥ ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुभविला । आतां पुढें
परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
द्वितीयदशके रजोगुणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. तमोगुणनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण । आतां
ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥ संसारीं दुःखसंबंध । प्राप्त होतां उठे
खेद । कां अद्भुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥ शरीरीं क्रोध भरतां । नो-
ळखे माता आणि पिता । बंधु बहिण आणि कांता । ताडी तो तमोगुण ॥ ३ ॥
दुसऱ्याचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा । विसरवी जीवभावा ।
तो तमोगुण ॥ ४ ॥ भरलें क्रोधाचें कौविरें । पिशाच्यापरी वावरे । नाना
उपाहीं नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥ आपला आपण शस्त्रपात । परोव्याचा
करी घात । ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥ डोळां युद्धचि पाहावें ।
रण पडिलें तेथें जावें । ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥ अखंड भ्रांति
पडे । केला निश्चय बिघडे । अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥
क्षुधा जयाची वाड । नेणे कडू अथवा गोड । अत्यंत जो कां मूढ । तो
तमोगुण ॥ ९ ॥ प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें । स्वयें आत्म-
हत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥ किडा मुंगी आणि श्वापद । यांचा करूं
१. स्थिर होत नाहीं. २. माया. ३. वेड. ४. भटके, वागे. ५. दुसऱ्याचा.