दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 74, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२ रा. ] सद्विद्यानिरूपण. ३९
भाविक सात्विक प्रेमळ । शांतिक्षमादयाशीळ । लीन तत्पर केवळ । अमृत-
वचनी ॥ ३ ॥ परम सुंदर आणि चतुर । परम सबळ आणि धीर । परम
संपन्न आणि उदार । अतिशयेंसीं ॥ ४ ॥ परम ज्ञाता आणि भक्त । महा-
पंडित आणि विरक्त । महातपस्वी आणि शांत । अतिशयेंसीं ॥ ५ ॥ वक्ता
आणि नैराश्यता¹ । सर्वज्ञ आणि सादरता । श्रेष्ठ आणि नम्रता । सर्वत्रांसी
॥ ६ ॥ राजा आणि धार्मिक । शूर आणि विवेक । तारुण्य आणि नेमक ।
अतिशयेंसीं ॥ ७ ॥ वृद्धाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी । धन्वं-
तरी परोपकारी । यशहस्ती² ॥ ८ ॥ कार्यकर्ता निरभिमानी । गायक आणि
वैष्णव जनीं । वैभव आणि भगवद्भजनीं । अत्यादर ॥ ९ ॥ तत्वज्ञ आणि
उदासीन । बहुश्रुत आणि सज्जन । मित्र आणि सत्वगुण । नीतिवंत ॥ १० ॥
साधु पवित्र पुण्यशीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा केवळ कृपाळ । कर्मनिष्ठ स्वधर्मी
निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥ गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मा-
र्गी सत्क्रिया धारणा³ धृती⁴ । श्रुति स्फूर्ति लीळा युक्ती । स्तुती मती परीक्षा
॥ १२ ॥ दक्ष धूर्त योग्य तार्किकें⁵ । सत्य साहित्य नेम भेदक । कुशल चपळ
चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥ आदर सन्मान तारतम्य जाणे । प्रयो-
ग समय प्रसंग जाणे । कार्यकारणचिन्हें जाणे । विचक्षण बोलका ॥ १४ ॥
सावध साक्षरी⁶ साधक । आगमनिगमशोधक⁷ । ज्ञानविज्ञानप्रबोधक । नि-
श्रयात्मक ॥ १५ ॥ पुरश्चरणी तीर्थवासी । दृढव्रती कायक्लेशी⁸ । उपासक
निग्रहासी । करूं जाणे ॥ १६ ॥ सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी
एकवचनी । निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ वासनातृप्त स-
खोल⁹ योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी¹⁰ । सौम्य सात्विक शुद्धमार्गी । नि-
ष्कपट निर्व्यसनी ॥ १८ ॥ सुघड¹¹ संगीत गुणग्राही । अनपेक्षी¹² लोकसंग्रही ।
आर्जवें¹³ सख्य सर्वही । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥ द्रव्यशुची दानशुची । न्याय-
शुची अंतरशुची । प्रवृत्तिशुची निवृत्तिशुची । सर्वशुची निःसंगपणें ॥ २० ॥
मित्रपणें परहितकारी । वाङ्मधुर्यता परशोकापहारी । सामर्थ्यपणें परनेत्र-
१ औदासीन्य. २ यशस्वी. ३ चित्ताची स्थिरता. ४. धैर्य. ५. विचारशील.
६. दीर्घोद्योगी. ७ वेदशास्त्रांचें मनन करणारा. ८ शरीरकष्ट सोसणारा. ९. गंभीर
स्वभावाचा. १०. वैराग्यशालि. ११. चतुर. १२. निरिच्छ. १३. सरळपणा.