दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
३०८ श्रीदासबोध. [ दशक
नव्हे काय । परी तें खोटें ॥ ११ ॥ पुण्यात्मा आणि पापात्मा । दोहोंकडे
अंतरात्मा । साधु भोंदू सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥ अंतर एक तों खरें ।
परी सांगातें घेऊं नयेती माहारें । पंडित आणि चाट पोरें । एक कैसीं
॥ १३ ॥ मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडें । राजे आणि माकडें ।
एक कैसीं ॥ १४ ॥ भागीरथीचें जळ आप । मोरी संवदेणी तेंहि आप ।
कुश्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥ या कारणें आचारशुद्ध । त्याउपरी
विचारशुद्ध । वीतरागी² आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥ शूराहूनि
मानिले लंडी³ । तरी युद्धप्रसंगीं नेकोंडी⁴ । श्रीमंत सांडूनि बेरंडी¹ । सेवि-
तां कैसें ॥ १७ ॥ एका उदकें सकळ झालें । परी पाहोनि पाहिजे सेविलें ।
सगट अवघेंच सेविलें । तरी तें मूर्खपण ॥ १८ ॥ जीवनाचें झालें अन्न ।
अन्नाचें झालें वमन । परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९ ॥ तैसें
निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदयीं धरावें । सत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ
॥ २० ॥ उत्तमास उत्तम माने । कनिष्ठास तें न माने । म्हणोन करंटें देवानें ।
करून ठेविलें ॥ २१ ॥ सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरि-
कथा पुराणश्रवण । नीतिन्यायें ॥ २२ ॥ वर्तायाचा विवेक । राजी राखणें
सकळ लोक । हळूहळू पुण्यश्लोक⁶ । करीत जावें ॥ २३ ॥ मुलांचें चालीनें
चालावें । मुलांच्या अनुमतें बोलावें । तैसें जनास शिकवावें । हळुहळू
॥ २४ ॥ मुख्य मनोगत राखणें । हीं चातुर्यांचीं लक्षणें । चतुर तो चतु-
रांग⁷ जाणे । इतर ते वेडे ॥२५॥ वेड्यास वेडें म्हणूं नये । वर्म कदापि बोलूं
नये । तरीच घडे दिग्विजय । निस्पृहासी ॥ २६ ॥ उदंड स्थळीं उदंड प्रसंग ।
जाणोनि करणें यथासांग । प्राणिमात्रांचा अंतरंग⁸ । होऊन जावें ॥ २७ ॥
मनोगत राखोन जातां । परस्परें होय अवस्था⁵ । मनोगत तोडितां व्यवस्था⁹ ।
बरी नाहीं ॥ २८ ॥ या कारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत
राखतां समस्त । वोळोज येती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
त्रयोदशदशके बोधनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंबी ३००.
१. वस्त्र धुण्याचें धोब्याचें भांडें. २. वैराग्यशील. ३. भितरे. ४. घाण, फजिती.
५. आशामृत. ६. पवित्र कीर्तीचे. ७. सर्व अंगें. ८. जिवलग. ९. सोय.
१४ वा.] निस्पृहलक्षण. ३०९
दशक चौदावा.
१. निस्पृहलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका निस्पृह शिकवण । युक्ति बुद्धि शहाणपण ।
जनें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें औषध
गुणवंत । साधें बोलणें सप्रचीत । तैसें माझें ॥ २ ॥ तात्काळाचि अवगुण
जाती । उत्तम गुणाची होय प्राप्ती । शब्द औषध तीव्र श्रोतीं । साक्षेपें से-
वावें ॥ ३ ॥ निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी
हिंडूं नये । वोळखीमध्यें ॥ ४ ॥ कांता दृष्टीस राखूं नये । गोडी मनास
चाखवूं नये । धारिष्ट चळतां दाखवूं नये । गुह्य आपुलें ॥ ५ ॥ एके स्थळीं
राहूं नये । कोंनकोंडें साहूं नये । द्रव्य द्वारा पाहूं नये । आळकेंपणें
॥ ६ ॥ आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्या द्रव्य घेऊं नये । उणा शब्द घेऊं
नये । आपणावरी ॥ ७ ॥ भिक्षेविषयीं लाजू नये । बहुत भिक्षा घेऊं नये ।
पुसतांहि देऊं नये । ओळखी आपुली ॥ ८ ॥ धड मलिण नेसूं नये । गोड
अन्न खाऊं नये । दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥ भोगीं मन असूं
नये । देहदुःखें त्रासं नये । पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥ वि-
रक्ति गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये । ज्ञान मळिण होऊं नये । वि-
वेकबळें ॥ ११ ॥ करुणाकीर्तन सोडूं नये । अंतरध्यान मोडूं नये । प्रेम-
तंतु तोडूं नये । सगुणमूर्तींचा ॥ १२ ॥ पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद
मानूं नये । समयीं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥ अपमानितां
सिणों नये । निखंदितां कष्टों नये । धिकारितां झुरों नये । कदाकाळीं ॥ १४ ॥
लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजू नये । खिजवितां खिजूं नये । विर-
क्तपुरुषें ॥ १५ ॥ शुद्धमार्ग सांडूं नये । दुर्जनासि तंडूं नये । संबंध
पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥ तपिळेंपण धरूं नये । भांडवितां
भांडूं नये । उडवितां उडों नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥ हांसवितां
हांसूं नये । बोलवितां बोलूं नये । चालवितां चालूं नये । क्षणक्षणां
१. अनुभवाचें. २. लाजीरवाणें. ३. आशाळभूत होऊन. ४. तापटपणा.
| ३१० | श्रीदासबोध. | [ दशक |
|---|
॥ १८ ॥ एक वेष धरूं नये । एक साज करूं नये । एक देशीं होऊं नये ।
भ्रमण करावें ॥ १९॥ सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये । सभेमध्यें
बैसूं नये । सर्वकाळ ॥२०॥ नेम भंगीं लावूं नये । भरंवसा कोणास देऊं
नये । अंगीकार करूं नये । नेमेस्तपणाचा ॥ २१ ॥ १. नित्यनेम सांडूं नये ।
अभ्यास बुडों देऊं नये । परतंत्र होऊं नये । कांहीं केल्या ॥२२॥ स्वतंत्रता
मोडूं नये । निरपेक्षा तोडूं नये । २ परापेक्ष होऊं नये । क्षणक्षणां ॥ २३ ॥
वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधिसुखें राहों नये । ३ ऐकांत मोडों देऊं नये । स्वरू-
पस्थितीचा ॥ २४ ॥ ४ अनर्गळताँ धरूं नये । लोकनिंद्य तें करूं नये । कोठें
तरी होऊं नये । आसक्त कदा ॥ २५ ॥ परंपरा तोडूं नये । उपासना मोडूं
नये । ज्ञानमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥ कर्ममार्ग सांडूं नये । वै-
राग्य मोडों देऊं नये । साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥ अति-
वाद करूं नये । अनीति पोटीं धरूं नये । रागें भरीं भरों नये । भलतीकडे
॥ २८ ॥ न मानी त्यास सांगों नये । कंटाळवाणें बोलों नये । बहुसाल
असों नये । एके स्थळीं ॥ २९ ॥ कांहीं उपाधि करूं नये । केली तरी धरूं
नये । धरिली तरी सांपडूं नये । उपाधीमध्यें ॥ ३० ॥ थोरपणें असूं नये ।
महत्व धरून बैसूं नये । कांहीं मान इच्छूं नये । कोठें तरी ॥ ३१ ॥ साधे-
पण सांडूं नये । सानपण मोडूं नये । बलात्कारें जोडूं नये । अभिमान अंगीं
॥ ३२ ॥ अधिकाराविण सांगूं नये । दाटून उपदेश देऊं नये । कानकोंडा
करूं नये । परमार्थ आपला ॥ ३३ ॥ कठीण शब्द बोलूं नये । कठिन आज्ञा
करूं नये । कठिनता धरूं नये । कोणे विषयीं ॥ ३४ ॥ कठिन वैराग्य सांडूं
नये । कठिन अभ्यास मोडूं नये । कठिन धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्या
॥ ३५ ॥ आपण आसक्त होऊं नये । केल्याविण सांगूं नये । बहुसाल मागूं
नये । शिष्यवर्गासी ॥३६॥ उद्धट शब्द बोलूं नये । इंद्रियस्मरण करूं नये ।
शाक्तमागें भरूं नये । मुक्तपणें कदा ॥ ३७ ॥ नीचकृत्यीं लाजों नये । वैभव
होतां माजों नये । क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥ थोरपणें चुकों नये ।
न्याय नीती सांडूं नये । अप्रमाण वर्तू नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥ कळल्याविण
बोलूं नये । अनुमानें निश्चय करूं नये । सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥
१. दुराग्रहाचा. २. परावलंबी. ३. एकाग्र चिंतन. ४. स्वैर वर्तन.
१४ वा. ] निस्पृहलक्षण. ३११
सावधपण सोडूं नये । व्यापकपण सांडूं नये । कदा सुख मानूं नये । नि-
सुंकपणाचें ॥ ४१ ॥ विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थाआज्ञा करूं नये ।
केली तरी टाकूं नये । आपणांपुढें ॥ ४२ ॥ प्रसंगेंविण बोलूं नये । अन्वयॆं-
विण गाऊं नये । विचारेंविण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३ ॥ परोप-
कार सांडूं नये । परपीडा करूं नये । विकल्प पडों देऊं नये । कोणीएकासी
॥ ४४ ॥ संशयात्मक बोलूं नये । बहुत निश्चय करूं नये । निर्वाहेंविणें²
धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४५ ॥ जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये ।
सांगेन ऐसें म्हणों नये । कोणी एकासी ॥ ४६ ॥ ज्ञानगर्व धरूं नये । स-
हसा छळणा करूं नये । कोठें वाद घालूं नये । कोणीएकासी ॥ ४७ ॥
नेणपण सांडूं नये । महंतपण सोडूं नये । द्रव्यासाठीं हिंडूं नये । हरि-
कीर्तन करीत ॥ ४८ ॥ स्वार्थबुद्धि जडों नये । कारभारीं पडों नये । कार्य-
कर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥ कोणास भार घालूं नये । जड³ भिक्षा
मागों नये । भिक्षेसाठीं सांगूं नये । परंपरा आपुली ॥ ५० ॥ सोयरिकींत
पडों नये । मध्यवर्ती⁴ घडों नये । प्रपंचाची जडों नये । उपाधि अंगीं ॥
५१ ॥ प्रपंच प्रैस्थीं⁵ जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये । पाहुण्यासारीसें
घेऊं नये । आमंत्रण कदा ॥ ५२ ॥ श्राद्ध पक्ष सँटी⁶ सामासें⁷ । शांति फळ-
शोभन बारसें । भोग राहणें बहुवसें⁸ । नवस व्रतें उद्यापनें ९ ॥ ५३ ॥ तेथें
निस्पृहें जाऊं नये । त्यांचें अन्न खाऊं नये । येळिलवाणें १० करूं नये । स्वयें
आपणां ॥ ५४ ॥ लग्नमुहूर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये । मोलें कीर्तन
करूं नये । कोठें तरी ॥ ५५ ॥ आपली भिक्षा सांडूं नये । वांरें अन्न खाऊं
नये । निस्पृहासि घडों नये । मोलें यात्रा ॥ ५६ ॥ मोलें सुकृत करूं
नये । मोलें पुजारी होऊं नये । दिलें तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७॥
कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये । मठपति होऊन बैसों नये ।
निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥ निस्पृहें अवघेंच करावें । परी आपण तेथें न सांप-
डावें । परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥ प्रयत्नांविण राहों नये ।
आळस दृष्टीस आणूं नये । देह असतां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥
१. आळसाचें. २. सोईवांचून. ३. फार. ४. मध्यस्थी. ५. बंडजावांत. ६.
षष्ठी. ७. षाण्मासिक श्राद्ध. ८. भुतें अंगात खेळवणें. ९. व्रतसमाप्ति. १०. मिंधें.
३१२ श्रीदासबोध. [ दशक
६० ॥ उपाधीमध्यें पडों नये । उपाधि अंगीं जडों नये । भजनमार्ग मोडूं
नये । निःसंगपणें ॥ ६१ ॥ बहु उपाधि धरूं नये । उपाधीविण कामा न ये ।
सगुण भक्ति सोडूं नये । १विभक्ति खोटी ॥ ६२ ॥ बहुसाल धांवों नये । बहु-
साल राहों नये । बहु कष्ट करूं नये । २औसुदें खोटें ॥ ६३ ॥ बहुसाल बोलूं
नये । अबोलणें कामा न ये । बहु अन्न जेवूं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥
बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडों नये । बहु नेम धरूं नये । बाष्कळ
खोटें ॥ ६५॥ बहु जनीं असों नये । बहु अरण्य सेवूं नये । बहु देह पाळूं
नये। आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥ बहु संग धरूं नये । संतसंग सोडूं नये ।
कर्मठपण कामा न ये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥ बहु लौकिक सांडूं नये ।
लोकांआधीन होऊं नये । बहु प्रीति कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥
बहु संशय धरूं नये । मुक्तमार्ग कामा न ये । बहु साधनीं पडों नये । स्वा-
धनेंविण खोटें ॥ ६९ ॥ बहु विषय भोगूं नये । विषयत्याग करितां न ये ।
देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥ वेगळा अनुभव घेऊं नये ।
अनुभवेंविण कामा न ये । आत्मस्थिति बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१
॥ मन उरों देऊं नये । मनेंविण कामा न ये । अलक्ष वस्तु लक्षितां न ये ।
लक्षेंविण खोटें ॥ ७२ ॥ मन बुद्धि अगोचर । बुद्धीविण अंधकार । जाणि-
वेचा घडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥ ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंविण
कामा न ये । अतर्क्य वस्तु तर्कूं नये । तकेंविण खोटें ॥ ७४ ॥ दृश्यस्मरण
कामा न ये । विस्मरण पडों देऊं नये । कांहीं चर्चा करूं नये । केल्याविण
न चले ॥ ७५ ॥ जगीं भेद कामा न ये । वर्णसंकर करूं नये । आपुल्ला
धर्म बुडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥ आशाबद्ध बोलों नये । विवेकें-
विण चालों नये । समाधान हालों नये । कांहीं केल्या ॥ ७७ ॥ ३अबद्ध
पोथी लिहों नये । पोथीविण कामा न ये । अबद्ध कदा वाचूं नये । वाचि-
ल्याविण खोटें ॥ ७८ ॥ निस्पृहें वक्तृत्व सोडूं नये । आशंका घेतां भांडों नये ।
श्रोतयाचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥ हे शिकवण धरितां चित्तीं । सकळ
सुखें ४वोळंगिती । अंगीं बाणे महंती । अकस्मात ॥ ८० ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके निस्पृहनिरूपण नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
१. अभक्तपणा. २. आयतें. ३. अव्यवस्थित. ४. प्राप्त होतात.
१४ वा.] भिक्षा. ३१३
२. भिक्षा.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागीतली पाहिजे । भिक्षा ।
ओंभवती या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥ श्लोक ॥ भिक्षाहारी निराहारी
भिक्षा नैव प्रतिग्रहः ॥ सदसद्गृहभिक्षान्नं सोमपानं दिने दिने ॥ १ ॥ टीका ॥
भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला । प्रतिग्रहावेगळां
झाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥ संतोसंत जे जन । तेथें कोरान्न मागोन
करी जो भोजन । तेणें केलें अमृतपान । प्रतिदिनीं ॥ ३ ॥ ऐसा
भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा । ईश्वराचा अगाध महिमा । तोहि
भिक्षा मागे ॥ ४ ॥ दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं ।
निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होय ॥ ५ ॥ वार लावून बैसला । तरी तो
पराधीन झाला । तैसीच नित्यावळीं । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥ आठां
दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें झालें । प्राणी एकाएकीं चे-
वले । नित्य नूतनतेपासूनी ॥ ७ ॥ नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण
करावें । तरीच भिक्षा मागतां बरवें । श्लाघ्यवाणें ॥ ८ ॥ अखंड भिक्षेचा
अभ्यास । तयास वाटेना परदेश । जिकडे तिकडे स्वदेश । लोकत्रयीं ॥ ९ ॥
भिक्षा मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजों नये । भिक्षा मागतां
भागों नये । परिश्रमें ॥ १० ॥ भिक्षा आणि चमत्कार । चाकाटती ल-
हान थोर । कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥ भिक्षा म्हणजे काम-
धेनू । सदा फळ नव्हे सामान्य । भिक्षेस करी जो अमान्य । तो करंटा
योगी ॥ १२ ॥ भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भ्रम चुकती । सामान्य
भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥ भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती ।
भिक्षेनें प्रगटे महंती । स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥ भिक्षेस
नाहीं अडथळा । भिक्षाहारी तो मोकळा । भिक्षेकरितां सार्थक वेळा ।
काळ जातो ॥ १५ ॥ भिक्षा म्हणजे अमरवेल्ली । जिकडे तिकडे लगडली ।
अवकाळीं फलदायिनी झाली । निर्लज्जासी ॥ १६ ॥ पृथ्वीमध्यें देश नाना ।
१. 'ओं भवती भिक्षां देहि' (मातोश्री, भिक्षा घाला !) २. दान देण्याच्या
दोषानें रहित. ३. चांगले वाईट. ४. धान्यादिक. ५. शंकर. ६. नित्य जेवणास
गेल्यानें. ७. त्रासूं नये. ८. अद्भुत कृत्यें. ९. चकित होतात. १०. कल्पवृक्ष.
३१४ श्रीदासबोध. [ दशक
फिरतां उपवासी मरेना । कोणे एके ठायीं जना । जड नव्हे ॥ १७ ॥ गोरेक्ष¹
वाणिज्य² कृषी³ । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी । विसंबों नये झोळीसी । कांहीं
केल्या ॥ १८ ॥ भिक्षे ऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य
नसतां अभाग्य । एकदेशी ॥ १९ ॥ कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्प-
संतोषी असावें । बहुत आणितां घ्यावें । मुष्टि एक ॥ २० ॥ सुखरूप भिक्षा
मागणें । ऐसीं निस्पृहतेचीं लक्षणें । मृदु वाग्विलास⁴ करणें । परम सौख्यकारी
॥ २१ ॥ ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलों यथामती । भिक्षा वाचवी
विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतु-
र्दशदशके भिक्षानिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. कवित्वलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ कवित्वशब्द सुमनमाळा⁵ । अर्थ परिमळ आगळा ।
तेणें संतषट्पदकुळा⁶ । आनंद होय ॥ १ ॥ ऐशी माळा अंतःकरणीं ।
गुंफून पूजा रामचरणीं । ओंकारतंतु अखंडपणीं । खंडोंचि नये ॥ २ ॥
परोपकाराकारणें । कवित्व अवश्य करणें । तया कवित्वाचीं लक्षणें । बोलि-
जेती ॥ ३ ॥ जेणें घडे भगवद्भक्ती । जेणें घडे विरक्ती । ऐशिया कवित्वा-
ची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥ क्रियेविण शब्दज्ञान । तया न
मानिती सज्जन । म्हणोन देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥ देवाचेनि
प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें । तें अत्यंत श्लाघ्यवाणें । या नांव प्रासा-
दिक ॥ ६ ॥ धीट पाठ प्रासादिक । ऐसें बोलती अनेक । तरी हा त्रिविध
विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥ धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या
मनास आलें । बळेंचि कवित्व रचिलें । या नांव धीट बोलिजे ॥ ८ ॥ पाठ
म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर । तयासारिखें उत्तर । आपणहि
केलें ॥ ९ ॥ शीघ्रचि कवित्व केलें । दृष्टीं पडलें तें वर्णिलें । भक्तीवांचून
जें झालें । या नांव धीटपाठ ॥ १० ॥ कामिक रसिक शृंगारिक । वीर हा-
स्य प्रस्ताविक । कौतुक विनोद अनेक । या नांव धीटपाठ ॥ ११ ॥ मन
१. गोरक्षण. २. व्यापार. ३. शेती. ४. भाषण. ५. कवितेचे शब्दरूप फुलांच्या
माळा. ६. साधुरूप भ्रमरसमुदायाला. ७. ओंकारस्मरणरूप तंतु. ८. स्तुतिपर.
१४ वा. ] कवित्वलक्षण. ३१५
झालें कामाकार १ । तैसेचि निघती उद्गार । धीटपाठें परपार २ । पाविजेत
नाहीं ॥ १२ ॥ व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती । तेथें केली जे
व्युत्पत्ती । या नांव धीटपाठ ॥ १३ ॥ कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व
नसावें खटपट । कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत्त ॥ १४ ॥ कवित्व नसावें
वादांग । कवित्व नसावें रसभंग । कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥१५॥
कावित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ । कवित्व नसावें कुटिल ।
लक्षूनियां ॥ १६ ॥ हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें । छंदभंग
न करावें । मुद्राहनिं ३ ॥ १७ ॥ व्युत्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन ।
भक्ति ज्ञान वैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥ भक्तिहीन जें कवित्व ।
तेंचि जाणावें ढोंगमत । आवडीविण वक्तृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥ भक्ती-
विण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद । प्रीतीविण संवाद । घडे केवीं
॥ २० ॥ असो धीटपाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेंचें पिसें । आतां प्रासादिकें ४
तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥ वैभव कांता कांचन । ज्यासि वाटे हें वमन ।
अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ जयास घडीनें घडी । भगवंतीं
लागे आवडी । चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥ जो भग-
वद्भजनांविण । जाऊं नेदी एक क्षण । सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगले
॥ २४ ॥ जया अंतरीं भगवंत । अचल राहिला निवांत । तो स्वभावें जें
बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥ अंतरीं बैसला गोविंद । तेणें लागला
भक्तिछंद । भक्तीविण अनुवाद । आणिक नाहीं ॥ २६ ॥ आवडी लागली
अंतरीं । तैशीच वदे वैखरी ५ । भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचत
॥२७॥ भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान । शंका लज्जा जाते
पळून । दुरी ठेली ॥२८॥ तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला । तेणें
अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥ गात नाचत निःशंक । तयास कैंचे
दिसती लोक । दृष्टीं त्रैलोक्यनायक । बसोनि ठेला ॥ ३० ॥ ऐसा भगवंतीं
रंगला । आणिक कांहीं नलगे त्याला । स्वेच्छा वर्णू लागला । ध्यान
कीर्ति प्रताप ॥३१॥ नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती ।
तयापुढें नरस्तुती । तृणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये
१. विषयांत गुंग. २. पैल तीर. ३. लक्षणहीन. ४. ईश्वरप्रसादाचें. ५. वाणी.
४. दशक १६-२०: सप्त-कौतुक, सूक्ष्म-ज्ञान, विमल-ज्ञान एवं आत्म-साक्षात्कार उपसंहार
३१६ श्रीदासबोध. [ दशक
संसारीं विरक्त । तया मानिती मुक्त । साधु जन ॥ ३३ ॥ त्याचे भक्तीचें
कौतुक । त्या नांव प्रासादिक । सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥
ऐका कवित्वलक्षण । केलेंचि करूं निरूपण । जेणें निवे अंतःकरण । श्रोत-
यांचें ॥ ३५ ॥ कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें रसाळ । कवित्व
असावें प्रांजळें १ । अन्वयाचें ॥ ३६ ॥ कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व
असावें अर्थांगळें २ । कवित्व असावें वेगळें । अहंतेंसी ॥ ३७ ॥ कवित्व
असावें कीर्तीवौड ३ । कवित्व असावें रम्य गोड । कवित्व असावें जाड ।
प्रतापविषयीं ॥ ३८ ॥ कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्पसूपें ।
कवित्व असावें प्रज्ञासंक्षेपें ४ । प्रबंधाचें ॥ ३९ ॥ मृदु मंजुळ कोमल । भव्य
अद्भुत विशाल । गौढ्य माधुर्य ५ रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥ अक्षरबंध पद-
बंध । नाना चातुर्य प्रबंध । नाना कौशल्यता छंदबंध । धाटी मुद्रा अनेक
॥ ४१ ॥ नाना युक्ति नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी । नाना
अर्थान्वयें साधीं । या नांव कवित्व ॥ ४२ ॥ नाना साहित्य ६ नाना दृष्टांत ।
नाना तर्क धातुमँत ७ । नाना संमति सिद्धांत । पूर्वपक्षेंसी ॥ ४३ ॥ नाना
गति नाना व्युत्पत्ती । नाना मति नाना स्फूर्ती । नाना धारणा नाना
धृती । या नांव कवित्व ॥ ४४ ॥ शंका आशंका प्रत्यंतरें ८ । नाना वाक्यें
शास्त्राधारें । तुटे संशय निर्धारें । निर्धारितां ॥ ४५ ॥ नाना प्रसंग नाना
विचार । नाना तत्त्वचर्चासार । नाना योग नाना विवरें ९ । या नांव कवित्व
॥४६॥ नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटनें । नाना संदेह फेडणें ।
या नांव कवित्व ॥४७॥ जेणें अनुताप उपजे । जेणें लौकिकें १० लाजे । जेणें
ज्ञान उपजे । या नांव कवित्व ॥ ४८ ॥ जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ति हे
मावळे । जेणें भक्तिमार्ग कळे । या नांव कवित्व ॥४९॥ जेणें देहबुद्धि तुटे ।
जेणें भवसिंधु आटे । जेणें भगवंत प्रगटे । या नांव कवित्व ॥ ५० ॥ जेणें
सद्दस्तु भासे । जेणें भौस ११ हा निरसे । जेणें भिन्नत्वें १२ नासे । या नांव कवित्व
॥ ५१ ॥ जेणें सद्बुद्धि लागे । जेणें पाषांड भंगे । जेणें विवेक जागे । या
१. स्पष्ट अर्थाचें. २. अर्थानें भरलेलें. ३. थोर कीर्तीचें. ४. बुद्धि खर्चून व
प्रयत्न करून रचिलेलें. ५. गोडी. ६. अलंकार. ७. व्याकरणशुद्ध. ८. निरनिराळीं
प्रमाणें. ९. स्पष्टीकरणें. १०. प्रापंचिक जन. ११. भासणारें जग. १२. भेदबुद्धि.
१४ वा.] कीर्तनलक्षण. ३१७
नांव कवित्व ॥ ५२ ॥ जेणें घडे समाधान । जेणें तुटे संसारबंधन । जयास
मानिती सज्जन । या नांव कवित्व ॥ ५३ ॥ ऐसें कवित्वलक्षण । सांगतां
तें असाधारण । परंतु कांहीं एक निरूपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके कवित्वलक्षणनिरूपणं नाम
तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. कीर्तनलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ कलियुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशल
गावें । कठिण कर्कश कुंटें सांडावें । एकीकडे ॥१॥ खटखट खुंटून टाकावी ।
खळखळ खळासि न करावी । खरें खोटें खवळों न द्यावी । वृत्ति आपली
॥२॥ गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये । गोप्य गुज गजौं नये ।
गुण गावे ॥ ३ ॥ घष्टणीं घिसणीं घस्मरपणें । घसरघसरूं घसरवाणें ।
घुमघुमोंचि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥ नाना नामें भगवंताचीं । नाना
ध्यानें सगुणाचीं । नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुत करावी ॥ ५ ॥ चकचक
चुकावेना । चाट चावट चाळवेना । चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें
॥ ६ ॥ छळछळ छळणा करूं नये । छळितां छळितां छळों नये । छळणें
छळणा करूं नये । कोणी एकाची ॥ ७ ॥ जी जी जी जी म्हणावें ना । जो
जो जागे तो तो पावेना । जप जपौं जनीं जनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥
झिरपे झरे पाझरे जल । झळके दुरून भळाळ । झडझड झळकती सकळ ।
प्राणी तेथें ॥ ९ ॥ या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाय
नलगे । या या या या कांहींच नलगे । सुबुद्धासी ॥१०॥ टक टक टक करूं
नये । टाळाटाळी टिकों नये । मट मट मट लावूं नये । कंटाळवाणी ॥११॥
ठस ठोंबॅस टकावेना । ठक ठक ठक करवेना । ठाके ठमके ठसावेना । मूर्ति-
ध्यान ॥ १२ ॥ डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा न ये ।
दळ दळ दळ चुकूं नये । हेकाडपणें ॥ १३ ॥ ढिसाळ ढाळा ढळती
कुंचे । ठोंबला दुसगण डुले नाचे । ढळेचि ना ढिग ढिगाचे । कंटा-
ळवाणें ॥ १४ ॥ नाना नेटक नागरें । नाना नम्र गुणागर । नाना
१. पुष्कळ. २. मनास लागे असें. ३. घांसाघीस. ४. अक्षरशत्रु. ५. सुंदर.
३१८ श्रीदासबोध. [ दशक
नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥ ताल तंबुरे तान माने । तालबद्ध
तंतगाणें । धूर्त तार्किक तानमानें । तल्लीन होती ॥ १६ ॥ थरथरा थरकती
रोमांच । थै थै थे स्वरें उंच । थिर थिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥
१७ ॥ दक्षदाक्षिण्यें दाटलें । बंदें प्रबंधें कोंदाटलें । दमदम दुमों लागलें ।
संगीतगाणें ॥ १८ ॥ धूर्त तूर्त धांवोनि आला । धिगबुद्धीनें धिग झाला ।
धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥ नाना नाटक नेटकें । नाना मा-
नें तुकें कौतुकें । नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥ पाप पळोन
गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी । परतपरेंतों परांतरीं । चटक लागे ॥
२१ ॥ फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं । फिकें
फसंकट फोल नाहीं । बकध्यानीं ॥ २२ ॥ बरें बरें बरें म्हणती । बावा बा-
वा उदंड करिती । बळें बळेंचि बोलाविली । कथेलागीं ॥ २३ ॥ भला भला
भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं । भूषण भाविकलोकीं । परोपकारें
॥ २४ ॥ मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेंन । मी मी मी
मी बहुतजनें । म्हणिजेत आहे₂॥ २५ ॥ एक टेंकत एकापाशीं । येऊं येऊं
येती झडेसी³। या या या या असें तयांसी । म्हणिजेत आहे ॥ २६ ॥ राग
रंग सालसुरंगें । अंतर संगीतरागें । रत्नपरीक्षा रत्नामागें । धावती लोक
॥ २७ ॥ लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन । लपलपों लपती
जन । आवडीनें ॥ २८ ॥ वचनें वाउगीं वदेना । वावरें विवरें वसेना ।
वक्तृत्वें निववी जना । विनीत४ होऊनी ॥ २९ ॥ सारासार समस्तांला ।
शिकऊं शिकऊं जनाला । साहित्य संगीत सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥
खरें खोटें खरें वाटलें । खर्खर खुर्बुर खुंटलें । खोटें खोटेपणे गेलें । म्हणोनि-
या ॥ ३१ ॥ शाहणें शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रुति बोधेना । शुक सा-
रिका शमेना । शब्द तयांचा ॥ ३२ ॥ हर्षे हर्षे हांसिला । हाहा होहोर्ने
भुलला । हित होईना तयाला । परत्रींचें५ ॥ ३३ ॥ लक्ष्यावें लक्षितां अल-
क्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी । लागलें लय तें अलक्षीं । विहंगममार्गैं⁶ ॥
३४ ॥ क्षेत्र८ क्षेत्रज्ञ९ क्षोभतो । क्षमेनें क्षमून क्षमावितो । क्षमणे क्षोभणें क्षे-
पुनःपुनः. ३. काकुळतीस. ४. नम्र. ५. परलोकींचें. ६. डो-
ळ्यांवर झेप घालितो त्याप्रमाणें सत्वर. ८. शरीर. ९. जीव.
१४ वा. ] हरिकथा. ३१९
श्रज्ञ तो । सर्वां ठायीं ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश
दशके कीर्तनलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. हरिकथा.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रश्न ।
सावध होऊन विचक्षण । परिसोत आतां ॥ १ ॥ हरिकथा कैसी करावी ।
रंगें कैसी भरावी । जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥ सोनें आणि
परिमळें । इक्षुदंडा लागती फळें । गौळ्यै माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता
॥ ३ ॥ तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । व्युत्पन्न
आणि वादरहित । तरी हेही अपूर्वता ॥ ४ ॥ रागज्ञानी तालज्ञानी । सक-
ळ कळा ब्रह्मज्ञानी । निरभिमानें वर्तें जनीं । तरी हेही अपूर्वता ॥ ५ ॥
मत्सर नाहीं जयासी । तो अत्यंत प्रिय सज्जनासी । चतुरंगे जाणे मानसीं ।
अंतर्निष्ठ ॥ ६ ॥ जयंत्यादिकें नाना पर्वैं । तीर्थे क्षेत्रे जीं अपूर्वे । जेथें वसि-
जे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥ तया तीर्थांतें न मानिती । शब्दज्ञानें
मिथ्या म्हणती । तयां पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥ निर्गुण नेलें
संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । दोहींकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥
पुढें असतां सगुण मूर्ती । निर्गुण कथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती ।
तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥ ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभयपंथा ।
परिक्षा लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥ सगुणमूर्तीपुढें भावें । करुणा-
कीर्तन करावें । नाना ध्यानें वर्णावें । प्रताप कीर्तीतें ॥ १२ ॥ ऐसें गातां
स्वभावें । रसाळ कथा वोढवे । सर्वांतरीं हेह्लावे । प्रेमसुख ॥ १३ ॥ कथा
रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे
कदा ॥ १४ ॥ देवाचें वर्णावें वैभव । नाना प्रकारें महत्व । सगुणीं ठेवू-
निया भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥ लाज सांडून जनांची । आस्था
सांडून धनाची । नित्य नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥ नग्न
होऊनि राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणीं । करतालिकों नृत्यें वाणी ।
१. सुवासिक २. उंसास. ३. गोडी. ४. विद्वान् ५. सर्व अंगें. ६. उचंबळून
येतें. ७. न आणावें. ८. दुसऱ्यांचे. ९. टाळ्या. १०. नाचणें.
३२० श्रीदासबोध. [ दशक
नामघोषें गर्जावीं ॥ १७ ॥ एकाची कीर्ति एकापुढें । वर्णितां साहित्यें न
पडे । म्हणोनिया पवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥ मूर्ति नसतां सगुण । श्र-
वणीं बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥ नाहीं
मूर्ति नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन । तरी करावें कीर्तन ।
प्रस्ताविक वैराग्यें ॥ २० ॥ शृंगारादि नवरसिक । त्यामध्यें सांडावें एक ।
स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णूंच नये ॥ २१ ॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां ।
विकार बाधिजे तत्वतां । धारिष्टापासोन श्रोता । चले तात्काळ ॥ २२ ॥
म्हणोनि तें त्यागावें । जें बाधक साधकां स्वभावें । घेतां अंतरीं ठसावे ।
ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार झालें मन ।
कैंचें आठवेल भजन । ईश्वराचें ॥ २४ ॥ स्त्री वर्णितां सुखावला । लाव-
ण्याचे भरीं भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासूनी ॥ २५ ॥
हरिकथेसि भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष एक जरी आकळे ।
ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानीं गुंतलें मन । कैंचें आठवेल जन । निः-
शंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥ रागज्ञान तालज्ञान ।
स्वरज्ञानेंसि व्युत्पन्न । अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥ छप्पन्न
भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा ।
भक्तचि जाणती ॥ २९ ॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणती आन ।
कळावंताचें मन । कळाकार झालें ॥ ३० ॥ श्रीहरीवांचून जे कळा । ते
जाणवी अवकळा । देव सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥ सर्पी
वेढिलें चंदनासी । निधानां आड विवेंसी । नाना कळा देवासी । आड
तैशा ॥ ३२ ॥ सोडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न । हेंच प्रत्यक्ष
विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ एक मन तें गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा
श्रीहरी । बळेंच धरूनियां चोरीं । शुश्रूषा घेतली ॥ ३४ ॥ करितां देवाचें
दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें लाविलें
॥ ३५ ॥ भेटों जातां राजद्वारीं । मध्येंच धरिला बेगारी । कळावंतां तैशी
परी । कळेनें केली ॥ ३६॥ मन ठेवून ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी ।
१. भाषण लोकांस पटत नाहीं. २. वर्णन. ३. पश्चात्तापयुक्त. ४. कामेच्छेनें
व्याप्त. ५. अवदशा. ६. भूमींतील ठेव्यास. ७. पिशाच्च. ८. सेवा.
१४ वा. ] चातुर्यलक्षणं. ३२१
तोचि एक संसारीं । धन्य जाणावा ॥ ३७ ॥ जयास हरिकथेची गोडी ।
उठे नित्य नवी आवडी । तयास झाली जोडी । सर्वोत्तमाची ॥३८॥ हरि-
कथा मांडली जेथें । सर्व सांडून धांवे तेथें । आलस्य निद्रा दवडून स्वार्थे ।
हरिभक्तीसि सादर ॥ ३९ ॥ हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी ।
साह्यभूत सर्वांपरी । साक्षेपें होय ॥ ४० ॥ तया नांव हरिदास । जयास
नामीं विश्वास । येथूनि हा समास । संपूर्ण झाला ॥ ४१ ॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके हरिकथानिरूपणं नाम पंचमः
समासः ॥ ५ ॥
६. चातुर्यलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले
उपाय । कांहीं तरी धरावी सोय । आगंतुक गुणाची ॥ १ ॥ काळें माणूस
गोरें होयना । वोढाळास यत्न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहज
गुण ॥२॥ आंधळें डोळस होईना । बधिर तें ऐकेना । पांगुळ पाय घेईना ।
कांहीं केल्या ॥३॥ कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोन सांगणें । रूप लावण्य
या कारणें । पालटेना ॥ ४ ॥ अवगुण सोडिलीं जाती । उत्तम गुण अभ्यासि-
तां येती । कुविद्या सांडूनि अभ्यासिती । शाहणे विद्या ॥ ५ ॥ मूर्खपण
सांडितां जातें । शाहणपण शिकतां येतें । कारभार करितां उमजतें । सकळ
कांहीं ॥ ६ ॥ ऐसी प्रचीति येते मना । तरी स्वहित कां कराना । सन्मागें
चालतां जाणा । सज्जना माने ॥ ७ ॥ मान्यता आवडे जीवीं । तरी उपेक्षा
कां करावी । चातुर्यैविण उंच पदवी । कदापि नाहीं ॥ ८ ॥ अंतर्कळा
शृंगारावी । नाना परी उमजवावी । संपदा मेळवून भोगावी । साव-
काश ॥ ९ ॥ देह नेटकें शृंगारिलें । परी तें चातुर्यैविण नासलें । गुणें-
विण साजिरें केलें । बाष्कळ जैसें ॥ १० ॥ यत्न करीना ना शिकेना ।
शरीर तेंहि कष्टवीना । उत्तम गुण घेईना । सदा कोपी ॥ ११ ॥ आपण
दुसऱ्यास करावें । तेणें सर्वैचि उसणें घ्यावें । जना कष्टवितां कष्टावें ।
लागेल बहू ॥ १२ ॥ न्यायें वर्तेल तो शाहणा । अन्यायी तो दैन्यवाणा ।
नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जें बहुतांस मानलें । तें
१. श्रम करून. २. अंतःकरण.
३२२ श्रीदासबोध. [ दशक
बहुतीं मान्य केलें । येर तें व्यर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥ लोकीं आप-
णास बोलावें । किंवा अवघेंचि कोसळावें । आपणासि समाधान फावे ।
ऐसें करावें ॥ १५॥ समाधानें समाधान वाढे । मैत्रीनें मैत्री जडे । मोडितां
क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥ अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजे कीं रे ।
कळत असतांच कां रे । निकामीपण ॥ १७ ॥ चातुर्यें शृंगारे अंतर । वस्त्रें
शृंगारे शरीर । दोहोंमध्यें कोण सार । बरें पाहा ॥ १८ ॥ बाह्यात्कारें शृंगा-
रिलें । तेणें लोकांच्या हातास काय आलें । चातुर्यें बहुतां संरक्षिलें । नाना
परी ॥ १९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । समस्तांस
बरें म्हणावें । ऐसें वाटे ॥ २० ॥ तनें मनें झिजावें । तेणें भलें म्हणोन
न्यावें । उगेंचि कल्पितां सिणावें । वाउगें जनीं ॥ २१ ॥ लौकिकीं कार्यभाग
भावडे । तो कार्यभाग जेथें घडे । लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥२२॥
म्हणोन दुसऱ्यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें । दुसऱ्यास कष्ट-
वितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥ हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण
कामा न ये । समजणें हाचि उपाय । सर्वत्रांसी ॥ २४ ॥ समजले आणि
वर्तले । तेचि भाग्यपुरुष झाले । या वेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥
जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव । समजला तरि
उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥ आळसें कार्यभाग नासतो । साक्षेपें होत
होत होतो । दिसते गोष्टी कळेना तो । शाहणा कैसा ॥२७॥ मैत्री करितां
होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु । बोलिलें हें सत्य कीं असत्य । ओळखावें
॥ २८ ॥ आपणास शाहणें करूं नेणे । आपलें हित आपण नेणे । जनीं
मैत्रिकी राखो नेणे । वैर करी ॥ २९ ॥ ऐसे प्रकारिचें जन । त्यास म्हणावें
अज्ञान । तयापाशीं समाधान । कोण पावे ॥३०॥ आपण एकाकी एकला ।
सृष्टींत मांडत चालिला । बहुतांमध्ये एकल्याला । यश कैचें ॥ ३१ ॥ बहु-
तांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें । प्राणी-
मात्रांसी ॥ ३२ ॥ शहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्यें
भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश-
दशके चातुर्यलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
१४ वा.] युगधर्म. ३२३
७. युगधर्म.
श्रीगणेशाय नमः ॥ नाना वेष नाना आश्रम १ । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम ।
जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥ देव ऋषि मुनि योगी । नाना
तापसी वीतरागी । पितृ आदिकरूनि विभागी । अतीत अभ्यागत ॥ २॥
गृहस्थाश्रमीं निर्माण झाले । आपुला आश्रम टाकून गेले । परंतु गृहस्था-
गृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥ ३ ॥ या कारणें गृहस्थाश्रम । सकळांमध्यें
उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया ॥ ४ ॥ जेथें षट्कर्में २
चालती । विधियुक्त क्रिया आचरती । वाङ्मधुर्यै बोलती । प्राणिमात्रांसी
॥ ५ ॥ सर्व प्रकारें नेमका । शास्त्रोक्त करणें कांहीं एक । त्याहीमध्यें अलौ-
किक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥ पुरश्चरणीं काया क्लेशी । दृढव्रती परम
सायासी । जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥ काया वाचा जीवें
प्राणें । कष्टे भगवंताकारणें । मनें घेतलें धरणें । भजनमार्गी ॥ ८ ॥ ऐसा
भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त । संसार सोडून झाला मुक्त । भ-
गवंताकारणें ॥ ९ ॥ अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्भाग । लोलं-
गते ३ एवढें अभाग्य । आणिक नाहीं ॥ १० ॥ राजे राज्य सोडून गेले । भ-
गवंताकारणें हिंडों लागले । कीर्तिरूपें पावन झाले । भूमंडळीं ॥ ११ ॥
ऐसा जो योगीश्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार । उकलू जाणे अंतर । प्राणि-
मात्रांचें ॥ १२ ॥ ऐसी वृत्ति उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्श-
नमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥ बहुतांसि करी उपाय । तो ज-
नांच्या वाट्या न ये । अखंड जयाचें हृदय । भगवद्रूप ॥ १४ ॥ जनांस
दिसे हा दुश्चित । परी तों असे सावचित । अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं
॥ १५ ॥ उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं । नाहीं तरी श्र-
वणमननीं । निरंतर ॥ १६ ॥ पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रहीं असिल्या
गांठी । तरीच ऐसियाची भेटी । होय जनांसी ॥ १७ ॥ प्रचीतीविण जें
ज्ञान । तें अवघेंच अनुमान । तेथें कैंचें परत्र ४ साधन । प्राणियांसी ॥ १८ ॥
१. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम. २. यजन,
याजन, दान, प्रतिग्रह, अध्ययन आणि अध्यापन हीं ब्राह्मणांचीं सहा कर्तव्यें.
३. भोगांची हांव असणें यासारखें. ४. परलोक ची प्राप्ति.
३२४ श्रीदासबोध. [ दशक
या कारणें मुख्य प्रत्यय । प्रचीतीविण कामा नये । उपायासारिखा अपाय ।
शहाणे जाणती ॥ १९ ॥ वेडे संसार सांडून गेले । तरी ते कष्ट कष्टोंच मेले ।
दोहींकडे अंतरले । इहलोक परत्रीं १ ॥ २० ॥ रागेंरागें निघोन गेला । तरी
तो भांडभांडोंच मेला । बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥
निघोन गेला परी अज्ञान । त्याचे संगतीस लागले जन । गुरुशिष्य दोघे
समान । अज्ञानरूपें ॥ २२ ॥ आशाबद्ध अनाचारी । निघोन गेला देशां-
तरीं । तरी तो अनाचारचि करी । जनांमध्यें ॥ २३ ॥ गृहीं पोटेंविण क-
ष्टी । कष्टी होऊन निघोन जाती । त्यास ठायीं ठायीं मारिती । चोरीं भरतां
॥ २४ ॥ संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला । तेणें
जन पावन केला । आपणा ऐसा ॥ २५ ॥ एके संगतीनें तरती । एके संग-
तीनें बुडती । या कारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥ जेथें नाहीं वि-
वेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा । घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि
मिळेना ॥ २७ ॥ जो दुसऱ्याचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे ।
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला ।
तेथें आचारचि बुडाला । वेद शास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥ ब्रह्म-
ज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु । वर्णानां ब्राह्मणो गुरुः २ ।
ऐसें हें वचन ॥ ३० ॥ ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे ॥ ३१ ॥ कित्येक दावल३मलकास
जाती । कित्येक पिरासी भजती । कित्येक तुरुंक ४ होती । आपुले इच्छेनें ॥
३२ ॥ ऐसा कलियुगीं आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंकर ।
होणार आहे ॥ ३३ ॥ गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती ।
शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ ३४ ॥ हें ब्राह्मणास कळेना । त्याची
वृत्ति वळेना । मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥ राज्य नेलें
म्लेंच्छक्षेत्रीं ५ । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं
॥ ३६ ॥ ब्राह्मणास ग्रामण्यानें ६ बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरविलें । त्याच
विष्णूनें शापिलें । परशुरामा ॥ ३७ ॥ आम्हीहि तेचि ब्राह्मण । दुःखें
१. या लोकीं आणि परलोकीं. २. चारी वर्णांमध्यें ब्राह्मण श्रेष्ठ. ३. एक यव-
नांचा देव आहे त्यास. ४. म्लेंच्छ ५. म्लेंच्छ राजपुरुषांनीं. ६. घरकलहामुळे.
बोलिलों हें वचन । वडील गेले ग्रामणी करून । आह्मां भोंवते ॥ ३८ ॥
आतांच्या ब्राह्मणीं काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे
प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्म-
णांचें अदृष्ट¹ जाणावें । प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा कीजे ॥ ४० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके युगधर्मनिरूपणं नाम सप्तमः
समासः ॥ ७ ॥
८. अखंड ध्यान.
श्रीगणेशाय नमः ॥ बरें ऐसा प्रसंग झाला । झाला तो होऊन गेला ।
आतां ब्राह्मणीं आपणाला । शहाणें करावें ॥१॥ देव पूजावा विमळहस्तीं ।
तेणें भाग्य पाविजे समस्तीं । मूर्ख अभक्त अव्यवस्थीं । दरिद्र भोगिजे ॥२॥
आधीं देवास ओळखावें । मग अनन्यभावें भजावें । अखंड ध्यान धरावें ।
सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥ सर्वांमध्यें जो उत्तम । तया नांव सर्वोत्तम । आत्मा-
नात्मविवेकवर्म । ठायीं पाडावें ॥ ४ ॥ जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा
अंतरसाक्षी । पदार्थमात्रास परीक्षौ । जाणपणें ॥ ५ ॥ तो सकळ देहांमध्यें
वर्ततो । इंद्रियेंग्राम² चेष्टवितो । प्रचीतीनें प्रत्यय येतो । प्राणिमात्रांसी ॥६॥
प्राणिमात्रीं³ जगदंतरें । म्हणोनि राखावीं अंतरें । दाता भोक्ता परस्परें । स-
कळ कांहीं ॥ ७ ॥ देव वर्ततो जगदंतरीं । तोचि आपुले अंतरीं । त्रैलोक्यांचे
प्राणिमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥ मुळीं पाहणार तो एकला । सकळां ठायीं
विभागला । देहप्रकृतीनें झाला । भिन्न भिन्न ॥ ९॥ भिन्न भासे देहाकारें ।
प्रस्तुत एकचि अंतरें । बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥ आ-
पुले पारखी सकळ लोक । पक्षी श्वापद पश्वादिक । किडा मुंगी देहधारक ।
सकळ प्राणी ॥ ११ ॥ खेचरें⁴ भूचर वनचर । नाना प्रकारांचे जळचर ।
चारी खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२ ॥ समस्त जाणिवेनें
वर्तती । रोकडी पाहावी प्रचीती । त्याची आपुली संगती । अखंड आहे
॥ १३ ॥ जगदंतरें वोळला धणी । किती एकवटील प्राणी । परी तो ओ-
१. दैव. २. सर्व इंद्रियें. ३. परमेश्वर जगदंतरीं आहे म्हणून प्राणिमात्रानें एक-
मकांचीं मनें राखावीं असा भाव. ४. आकाशांत वावरणारे.
३२६ श्रीदासबोध. [ दशक
ळखावयाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥ हें आपणाकडेच येतें । राजी
राखावें समस्तांतें । देहासि बरें करावें तें । आत्मयासि पावे ॥ १५ ॥ दुर्जन
प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव । रागास आला जरी राव ।
तरी तंडों नये ॥ १६ ॥ प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें । वि-
वेकें सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥ आत्मत्त्वीं दिसतो भेद । हा
अवघाचि देहसंबंध । एका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥ गरल
आणि अमृत झालें । परी आपण नाहीं गेलें । साक्षित्त्वें आत्मयासि पाहिलें ।
पाहिजे तैसें ॥ १९ ॥ अंतर्निष्ठ जो पुरुष । तो अंतर्निष्ठेनें विशेष । जगा-
मध्यें जो जगदीश । तो तयास ओळखे ॥ २० ॥ नयनेंचि पाहावे नयन ।
मनें शोधावें मन । तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥ तेणेंविण
कार्यभाग अडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे । प्राणी विवेकें पवाडे । तेणेंचि
योगें ॥ २२ ॥ जागृतीस व्यापार घडतो । संबंध तयासीच पडतो । स्वप्ना-
मध्यें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥ अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड
देवाचें स्मरण । याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥ सहज सां-
डूनि सायास । हाचि कोणी एक दोष । आत्मा सांडून अनात्म्यांस । ध्यानीं
धरिती ॥ २५ ॥ परी तें धरितांहि धरवेना । ध्यानीं येती व्यक्ति नाना ।
उगेचि कष्टविती मना । कासावीस करूनि ॥ २६ ॥ मूर्तिध्यान करितां
सायासें । तेथें एकाचें एक दिसे । भासों नये तेंच भासे । विलक्षण ॥ २७ ॥
ध्यान देवाचें धरावें । किंवा देवालयाचें करावें । हेंचि बरवें विवरावें ।
आपुले ठायीं ॥ २८ ॥ देह देऊळ आत्मा देव । कोठें धरूं पाहतां भाव ।
देव ओळखून जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥ अंतर्निष्ठा ध्यान ऐसें ।
दंडेकध्यान अनारिसें । प्रयत्नेंविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥
अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां संवेंचि मोडे । उगेचि कष्टती बापुडे ।
स्थूळध्यानें ॥ ३१ ॥ देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती ।
भोगणें लागे विपत्ती । देहयोगें ॥ ३२ ॥ ऐसें मनीं आठवतें । विचारितां
भलतेंच होतें । दिसों नये तेंच दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥ दिसतें तें
सांगतां न ये । बळें भावार्थ धरितां न ये । साधक कासाविस होय । अंत-
१. आत्मा नव्हे त्यास; अर्थात् स्वरूपाज्ञानावांचून. २. लोकरितीचें ध्यान.
१४ वा.] शाश्वत ब्रह्म. ३२७
याँमीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्षी आपुलें मन । मना-
मध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥ फुटकें मन एकवटिलें । तेणें
तुटकें ध्यान केलें । तेथें कोण सार्थक झालें । पाहाना कां ॥ ३६ ॥ अखंड
ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित्त ।
बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें कोण । ध्यानीं आठवितें तें कोण ।
दोनीमध्यें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजाच आहे ।
साधक शोधून पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥ ऐसीं
हीं प्रत्ययाचीं कार्में । प्रत्ययेंविण बोलिजे भ्रमें । लोकदंडकसंभ्रमें । चालती
प्राणी ॥ ४० ॥ दंडकध्यानाचें लक्षण । धरूनि बैसले अवलक्षण । प्रमाण
आणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥ मिथ्या समाचार उठाविती ।
वाडग्याच बोंबा घालिती । मनास आणितां अंतीं । अवघेंच मिथ्या
॥ ४२ ॥ कोणी एक ध्यानस्थ बैसला । कोणी एक शिकवी त्याला ।
मुकुट काढून माळा घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥ मनाच्या येथें काय
दुष्काळ । जे आंखूड कल्पिली माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जा-
णावे ॥ ४४ ॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती । दोरें फुलें गुंफावीं न
लागती । कल्पनेची माळ थिटी करिती । काय निमित्त ॥ ४५ ॥ बुद्धीवि-
ण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मूर्खासि खळखळ । कोणें
करावी ॥ ४६ ॥ जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडैक
चालिला । सातां पांचांचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥ प्रत्ययेंविण
साभिमान । रोगी मारिले झांकून । तेथें अवधेंच अनुमान । ज्ञान कैंचें
॥ ४८ ॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । माया पूर्वपक्ष
खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश-
दशके अखंडध्याननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. शाश्वत ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ पिंडांचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्म-
विवेक । पिंड अनात्मा आत्मा एक । सकळ कर्ता ॥ १॥ आत्म्यास अन-
१. लोकरीतीच्या मार्गानें. २. लोकाचाराचें ध्यान. ३. परिपाठ.