दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 354, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा. ] हरिकथा. ३१९
श्रज्ञ तो । सर्वां ठायीं ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश
दशके कीर्तनलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. हरिकथा.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रश्न ।
सावध होऊन विचक्षण । परिसोत आतां ॥ १ ॥ हरिकथा कैसी करावी ।
रंगें कैसी भरावी । जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥ सोनें आणि
परिमळें । इक्षुदंडा लागती फळें । गौळ्यै माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता
॥ ३ ॥ तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । व्युत्पन्न
आणि वादरहित । तरी हेही अपूर्वता ॥ ४ ॥ रागज्ञानी तालज्ञानी । सक-
ळ कळा ब्रह्मज्ञानी । निरभिमानें वर्तें जनीं । तरी हेही अपूर्वता ॥ ५ ॥
मत्सर नाहीं जयासी । तो अत्यंत प्रिय सज्जनासी । चतुरंगे जाणे मानसीं ।
अंतर्निष्ठ ॥ ६ ॥ जयंत्यादिकें नाना पर्वैं । तीर्थे क्षेत्रे जीं अपूर्वे । जेथें वसि-
जे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥ तया तीर्थांतें न मानिती । शब्दज्ञानें
मिथ्या म्हणती । तयां पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥ निर्गुण नेलें
संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । दोहींकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥
पुढें असतां सगुण मूर्ती । निर्गुण कथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती ।
तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥ ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभयपंथा ।
परिक्षा लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥ सगुणमूर्तीपुढें भावें । करुणा-
कीर्तन करावें । नाना ध्यानें वर्णावें । प्रताप कीर्तीतें ॥ १२ ॥ ऐसें गातां
स्वभावें । रसाळ कथा वोढवे । सर्वांतरीं हेह्लावे । प्रेमसुख ॥ १३ ॥ कथा
रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे
कदा ॥ १४ ॥ देवाचें वर्णावें वैभव । नाना प्रकारें महत्व । सगुणीं ठेवू-
निया भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥ लाज सांडून जनांची । आस्था
सांडून धनाची । नित्य नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥ नग्न
होऊनि राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणीं । करतालिकों नृत्यें वाणी ।
१. सुवासिक २. उंसास. ३. गोडी. ४. विद्वान् ५. सर्व अंगें. ६. उचंबळून
येतें. ७. न आणावें. ८. दुसऱ्यांचे. ९. टाळ्या. १०. नाचणें.