दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 350, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा. ] कवित्वलक्षण. ३१५
झालें कामाकार १ । तैसेचि निघती उद्गार । धीटपाठें परपार २ । पाविजेत
नाहीं ॥ १२ ॥ व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती । तेथें केली जे
व्युत्पत्ती । या नांव धीटपाठ ॥ १३ ॥ कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व
नसावें खटपट । कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत्त ॥ १४ ॥ कवित्व नसावें
वादांग । कवित्व नसावें रसभंग । कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥१५॥
कावित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ । कवित्व नसावें कुटिल ।
लक्षूनियां ॥ १६ ॥ हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें । छंदभंग
न करावें । मुद्राहनिं ३ ॥ १७ ॥ व्युत्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन ।
भक्ति ज्ञान वैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥ भक्तिहीन जें कवित्व ।
तेंचि जाणावें ढोंगमत । आवडीविण वक्तृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥ भक्ती-
विण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद । प्रीतीविण संवाद । घडे केवीं
॥ २० ॥ असो धीटपाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेंचें पिसें । आतां प्रासादिकें ४
तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥ वैभव कांता कांचन । ज्यासि वाटे हें वमन ।
अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ जयास घडीनें घडी । भगवंतीं
लागे आवडी । चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥ जो भग-
वद्भजनांविण । जाऊं नेदी एक क्षण । सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगले
॥ २४ ॥ जया अंतरीं भगवंत । अचल राहिला निवांत । तो स्वभावें जें
बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥ अंतरीं बैसला गोविंद । तेणें लागला
भक्तिछंद । भक्तीविण अनुवाद । आणिक नाहीं ॥ २६ ॥ आवडी लागली
अंतरीं । तैशीच वदे वैखरी ५ । भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचत
॥२७॥ भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान । शंका लज्जा जाते
पळून । दुरी ठेली ॥२८॥ तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला । तेणें
अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥ गात नाचत निःशंक । तयास कैंचे
दिसती लोक । दृष्टीं त्रैलोक्यनायक । बसोनि ठेला ॥ ३० ॥ ऐसा भगवंतीं
रंगला । आणिक कांहीं नलगे त्याला । स्वेच्छा वर्णू लागला । ध्यान
कीर्ति प्रताप ॥३१॥ नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती ।
तयापुढें नरस्तुती । तृणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये
१. विषयांत गुंग. २. पैल तीर. ३. लक्षणहीन. ४. ईश्वरप्रसादाचें. ५. वाणी.