सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ५०१
कर्तव्य केल्याचे चुकू नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखादे कार्य करण्यातच श्रम आहेत, असे पाहून ते कार्य
केल्याशिवाय का कधी त्यापासून होणारा लाभ होणार आहे ४
११२१ विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्वाति भोग जया ॥ १ ॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ २ ॥
विठ्ठल जागृतिस्वप्नसुषुप्ती । आन दुजें नेणती विठ्ठलेविण ॥ ३ ॥
भूषण अळकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जया नरा ॥ ४ ॥
तुका म्हणे ते ही विठ्ठलचि जाले । सकल्प मुराले दुजेपणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - ग्रासोग्रासीं- प्रत्येक घास घेत असताना
अर्थ - ज्याच्या गायनात विठ्ठल आहे, चित्तात विठ्ठल आहे, सर्व विश्वातो एकमेव विठ्ठल होच आहे ज्याचे
सर्व भोगही विठ्ठलमय होत असतात १ आसनावर विठ्ठल, शयनावर विठ्ठलच ज्याला दिसतो, जेवण करीत असताना
प्रत्येक घासाबरोबर ज्याना विठ्ठलच प्रतीत होतो २ ज्याच्या जागेपणी, स्वप्नामध्ये, अर्धवट झोपलेल्या अवस्थेतही
ज्याना विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही ३ ज्याचे सर्व भूषण व अळकार म्हणने हा एक विठ्ठल आहे व
ज्याचा सर्व निर्धार हा विठ्ठलच आहे ४ ते, तुकाराम महाराज म्हणतात, स्वत च विठ्ठलस्वरूपास पावलेले आहेत
असे समजावे दुजेपणाची, आपण विठ्ठलावाचून दूर आहोत, अशी भावनाच त्याच्या ठिकाणी उरलेली नाही, असे
जाणावे ५
११२२ दास जालो हरिदासाचा । बुद्धिकायामनेंवाचा ॥ १ ॥
तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदगकल्लोळ ।
नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधी हरिकीर्तनीं ॥ २ ॥
ऐकता हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्ता ॥ ३ ॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पाडुरग ॥ ४ ॥
हें सुख ब्रह्मादिका । म्हणे नाहीं नाहीं तुका ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - काया-शरीर
अर्थ - मी कायावाचामनेकरून या हरिदासाचाच दास बनून राहिलो आहे १ या कीर्तनाच्या स्थानी
प्रेमाचा सुकाळ असून टाळ, मृदंग यांच्या गजरात, मनात काही दुष्ट बुद्धी असेल तर ती सर्व नष्ट होईल हरिकीर्तना-
मध्ये समाधीचे सुख प्राप्त होईल २ या ईश्वराची कथा ऐकत असताना एखादा अभक्त असला, तरी तो भक्त
होऊन जाईल ३ या कीर्तनाचा रंग पाहून तेथे प्रत्यक्ष पांडुरंगही भूलून उभा राहिलेला असतो ४ तुकाराम
महाराज म्हणतात, अशा प्रकारचे कीर्तनामधील सुख प्रत्यक्ष ब्रह्मदेवादिकांनाही प्राप्त होणारे नाही ५
विवरण - वारकरी पंथात कीर्तनभक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण असे सांगितले आहे टाळ, मृदंग, वीणा
यांच्या थापाने युक्त असे ईश्वराचे भजन, हरिकथेचे अथवा भक्तीचे निरूपण, नृत्यसंगीताच्या साहाय्यान तल्लीनता व
प्रभुप्रेमाची लयलूट, हे कीर्तनाचे मुख्य स्वरूप होय या कीर्तनसुखाची गोडी अनेक संतानी गाइली आहे या कीर्त
नाच्या सुखाविषयी सर्वांनाच, ब्रह्मदेवालाही लोभ वाटतो, प्रत्यक्ष अमृतही लाजून दूर मरत, असे तुकाराम महाराजां-
नीच म्हटले आहे या कीर्तनाखेरीज दुसरे कुठलेही साधन नका शरण यात प्रभूचे गुणगान, ध्यान, नामस्मरण, सत
संग, भजन याचा समावेश असून हे अतिशय सोप असे साधन आहे 'पाहता साधन विठ्ठल कीर्तन । भक्त सजीवन
यात्माराम ।', 'नित्य हरिकथा नामावळी । वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ' असा या कीर्तनभक्तीचाच महिमा निवृत्ती-
नाथानी गाइला आहे या कीर्तनात ईश्वर आपले वैकुंठीचे स्थान सोडून उभा असतो, अशीही साक्ष संतानी वारंवार
दिलेली आहे 'क्षीरसागर सांडोनि हरी । कीर्तनीं उभा सहपरिवारो,' 'कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहूनी पायी

५०२ सार्थ तुकारामगाथा
धावा । नवल वैकुंठींच नसे । तो कीर्तनीं नाचतसे ', ' कीर्तनाचे थोर सुख । यदुनायक राहे उभा ', ' नसे वैकुंठीं हरी ।
नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी' अशा शब्दांत एकनाथांनी कीर्तनाचा व देवाचा संबंध वर्णन केलेला आहे.
या कीर्तनामुळे दुष्ट बुद्धी नाहीशी होते. पापवृत्ती नष्ट होते अभक्तही भक्त होऊन जातात, अशी ही साक्ष
एकनाथांनी वारंवार दिलेली आहे ' धन्यधन्य कीर्तन भूमंडळीं । महादोषा घेतसे झोळी ', ' पातकी घातकी यांसी
सोपा पंथ । कीर्तनें सरते कलीमाजी ', ' महापातकी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वद्य जाले ', ' कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं
रोया । तरले पातकी ते वेळा ' असे या कीर्तनाचे माहात्म्य एकनाथांनी वर्णन केलेले आहे.
महाराष्ट्रातील कीर्तनाचे आद्य प्रवर्तक श्रीनामदेवराय यांची ' नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं ' ही
ओळ प्रसिद्धच आहे ' कीर्तन नर्तन याचे जनार्दन । न पवती पतन येरझारी ', ' ऐकता कीर्तन होतो जीवन्मुक्त । दाविसी
अनंत नाम मात्रें ', ' ' कीर्तनाच्या सुखें सुखी होतो देव । कोणतें वैभव याची आता ' असे या कीर्तनाचे महत्त्व नामदेव
महाराजांनी वर्णन केले आहे तुकाराम महाराजांचे कीर्तनावर तर कितीतरी अभंग आहेत याच एका साध्या, सोप्या
व सरळ मार्गाचा पुरस्कार त्यांना करावयाचा होता देव, भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम कीर्तनात असल्यामुळे
याठिकाणी, ' जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारीनर । तीर्थे तया ठाया । येती पुनीत व्हावया ' असा कीर्तनाचा
महिमा असल्याचा तुकारामबुवा एका अभंगात सांगतात ' कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ', याचे कारण
असे की, तो विठ्ठलच या कीर्तनात येऊन उभा असतो जो तपश्चर्येने सापडत नाही, तो या कीर्तनात उभा असतो
' न करिता ध्याना । न करिता धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरी ' अशी या धीरगंभीरीची कीर्तनभक्ती तुकाराम
महाराजांनी वर्णन केलेली आहे या कलियुगात नामसंकीर्तन हेच एक अतिशय सोपे असे साधन सर्वांना साधुसंतांनी
उपलब्ध करून दिलेले आहे ' सोपें वर्म आम्हा सागितले संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ' असे या कीर्तनाच्या
साधनाविषयी बुवांनी म्हटले आहे या कीर्तनाच्या लोभासाठी ब्रह्मादेवादी देवही उत्सुक असतात, असे त्यांनी
इतरत्रही वारंवार सुचविले आहे स्वर्गामधील देवाची इच्छा आपणास मृत्युलोकात जन्म यावा, अशी असल्याचे त्यांनी
सागितले आहे याच कीर्तनामध्ये काया संपूर्ण ब्रह्ममय होऊन जाते असा त्यांचा अनुभव आहे
११२३ गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥ १ ॥
जतन करा जतन करा । धावते सैरा ओढाळ ते ॥ २ ॥
मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥ ३ ॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी वधु' चौऱ्यांशीचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गति-प्रगती
अर्थ - आपली प्रगती किंवा अधोगती ही केवळ आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते यासाठी
मनात साधुसंताच्या संगतीत किंवा एकांतात लावावे १ या मनास नीट सांभाळा कारण ते ओढाळ असून सैरा-
वैरा धावत सुटलेले असते २ आपला मानसन्मान किंवा आपला अपमान हा केवळ या मनाच्या अवस्थेमुळे निर्माण
होत असल्याने त्याला ज्याचे ध्यान आपण लावावे, तेच ते करीत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच
मनाच्या साह्याने संसारसागरही तरून जाता येतो चौऱ्याऐंशी लक्ष योनींतून मुक्तता केवळ या एका ओढाळ मनास
बंधूप्रमाणे वश करून घेतल्यासच होईल ४
विवरण - हे मन मोठे चंचल आहे इंद्रियसुखाकडे धावणारे आहे त्यास प्रथम आवरावे, असे सर्व साधु-
संतानी सांगितले आहे आपल्या आयुष्यातील मान व सन्मान हा सर्व या मनाच्या स्थितीगतीवर अवलंबून आहे या
मनास जिंका मनास मोकाट सोडू नका. मनाने सुखी समाधानी व्हा या मनास स्वाधीन ठेवाल, तरच तुम्ही संसार-
सागर तरून जाल, असा त्यांच्या उपदेशाचा सारांश असतो भगवद्गीतेनेही हे मन मोठे चंचल असून त्याचा निग्रह
करणे अवघड असल्याचे सांगितले आहे परंतु अभ्यासाने व वैराग्याने त्याला स्वाधीन ठेवित्ता येते, असाही निर्देश सहाव्या
१ बांधु

सार्थ तुकारामगाथा ५०३
अध्यायात आहे. मन जिंकण्याचे किंवा ताब्यात ठेवण्याचे मुख्य साधन कोणते ? तर अभ्यास व वैराग्य ही दोन प्रमुख
साधने गीतेने सांगितली आहेत. अभ्यास म्हणजे कोणतीही गोष्ट पुनः पुनः करणे व वैराग्य म्हणजे, राग, प्रीती,
लोभ नसणे, अशी अवस्था होय. पातंजलयोगसूत्रातही ' योगश्चित्तवृत्तिनिरोधः ' म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे,
याने नाव योग असे सांगून पुढे ' अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ' अभ्यास व वैराग्य यांनीच या मनाचा अथवा
चित्तवृत्तीचा निरोध होतो, असे म्हटले आहे; अशा प्रकारे अतिचपळ असणाऱ्या व आवरण्यास कठीण असणाऱ्या या
मनाच्या निरोधाचे उपाय सर्वत्र साधुसंतानी सांगितले आहेत.
'मन आधीं मुंडीं । वासनेतें खंडी । विठ्ठल ब्रह्मांडों एक आत्मा' असे श्रीसोपानदेवांनी या मनाच्या
निरोधाविषयी म्हटले आहे. त्यांनीही 'विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य । सोवळा आरोग्य हरि देखा' असेच साधन
मनाच्या निग्रहाविषयी सांगितले आहे. 'मन एके ठायीं । राहे ऐसे करों कांहीं । सर्व साधनाचे सार । मनों करावा
विचार' अशा शब्दांनी सुरुवात करून एकनाथानी मनास उपदेश केलेला आहे. रामदासाचा मनास उपदेश प्रसिद्धच
आहे. ' नका धावू तुम्ही संरा । मना मागे या सत्वरा । मन पैं आधीन । तेणें जोडे संतचरण' असा त्यांनी मनो-
जयाचा उपाय व परिणामही सांगितलेला आहे, हे मन किती ओढाळ आहे, किती अस्थिर आहे, किती चंचल आहे,
यासबंधीही त्यांनी वारंवार उल्लेख केले आहेत. ' मना तूं अधीर अधीर । बहू पातकी पामर । न राहासी स्थिर ।
क्षणभर निश्चयैं ॥ किती शिकवावें तूतें नायणसी एकचित्तें । बहू गार्णे बोलता सूं तें । नायणसी पामरा ॥' अशा मनाचे
स्वभाववर्णन एकनाथानी केलेले आहे. 'बैसतां निश्चळ । मन करी तळमळ । ध्यान धारणा ते थिथी । मन न पावेचि
सिद्धी ' असे हठवादी व दुराग्रही मन प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करते. शेवटी 'तुज सांगतसे मना । पाहे
पंढरीचा राणा । नको तुजा छंद कांहीं । राहे विठ्ठलाचे पायीं' असे त्यास सांगून 'मन रामों रंगले अवघे मनाचे राम
जाले' असा मनोजयाचा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे 'मन करा रे प्रसन्न । सर्वसिद्धींचे कारण' असा तुकोबाचा
अभंग आपणास माहीत आहेच ( क्र. २९१ )
तुकारामबुवांनाही मनाच्या ओढाळ व चंचल स्थितीचा अनुभव चांगलाच आला असावा. ' मन उताविळ ।
जाले न राहे निश्चळ । मन गुंतलें लुल्या । बाप धांवोनि द्या ठाया ', ' मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एक
पळ स्थिर नाहीं ' इत्यादी ओळींवरून तुकोबाच्या आयुष्यातही या मनास जिंकण्याचा संग्राम कसा होत असावा याची
कल्पना करता येण्यासारखी आहे. अर्थातच तुकोबानी मनास वैराग्याने, नामस्मरणाने, चिंतनाने एकसारखा अंकुश
लावलेला असल्यामुळे, त्यांना ते जिंकता आले, व रोज नव्या जागृतीचा टप्पा गाठता आला, हे स्पष्ट आहे. 'तुका
म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा ' असा त्यांनी आपल्या साधनेचा निष्कर्ष दिलेला आहे.
त्यांनीही मनास वारंवार उपदेश केलेला आहे, तोही मार्गदर्शक होण्यासारखा आहे. 'मना एक करो । म्हणे जाईन
पडरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळां ।', 'मना सांडि हे वासना दुष्ट सोडी', वगैरे ओळींतून मनास सावरण्याचे
प्रयत्नही त्यांनी सुचविले आहेत.
११२४ पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥ १ ॥
पुंडलिकें हाट भरियेली पेठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ २ ॥
उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥ ३ ॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥ ४ ॥
तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- ओखदा-औषधासही, हाट-बाजार, उदमासी-व्यापारास, धणी-तृप्ती.
अर्थ :- या पंढरपूर क्षेत्रात दुःख औषधालासुद्धा मिळायचे नाही. नेहमी सर्वत्र प्रेमसुखाचा सुकाळ
असतो. १ या पंढरपूरच्या बाजाराची पेठ भक्त पुंडलिकाने भरविलेली असून त्याने वैकुंठाबरोबरच विठ्ठलही आणून

५०४ सार्थ तुकारामगाथा

येथे उभा केलेला आहे २ आता या ठिकाणी भक्तीच्या व्यापारास कधी तूट येणार नाही या ठिकाणी सर्व प्रकारचे
लाभ होऊन मनाची तृप्ती होत असते ३ या ठिकाणचा हा विठ्ठलरूपी माल शिगोशीग पूर्ण मापाने भरलेला अस
ल्याने, सर्व देशास पुरेल एवढा विपुल प्रमाणात आहे पंढरपूरची पंचक्रोशी याच विठ्ठलरूपी मालाने दुमदुमून गेलेली
आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधुसंतांचे मन तृप्त होईल, असाच माल या पंढरपुरात लाभल्यामुळे
ते या ठिकाणीच बसून राहिले आहेत ५

११२५ द्वारकेचे केणें आले याचि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥ १ ॥
गोधिले विसारे माप केले खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ २ ॥
वैष्णव मापारी नाही जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥ ३ ॥
लाभ जाला त्यांनी धरिला तो विचार । अहिवय परत्र साटविले ॥ ४ ॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं सतांचिया ॥ ५ ॥

शब्दार्थ व टीपा -केणे-माल जिनस चोजवीत-जागवीत, शोध करीत, गोधिले-गुंतवून ठेविले, सळे-मोज-
माप, पार-अत, अहिवय-यालोकी, परत्र-परलोकी

अर्थ -द्वारकेत असणारा हा श्रीकृष्णरूपी किंवा विठ्ठलरूपी माल आज या पंढरपूरच्या बाजारात आला
आहे, आणि त्याच्यापुढे भक्तराज पुंडलिक असा शोध करीत उभा आहे १ या मालासाठी भक्तानी विसार देऊन
या विठ्ठलास गुंतवून ठेविले असल्यामुळे अजूनही हा परत द्वारकेस गेलेला नाही २ सारे वैष्णव माल घ्यावयात
सिद्ध झाले असूनही त्याचे मोजमाप कुणासही घेता आलेले नाही व पुढेही कधी त्याचा अंत लागेल असे वाटत
नाही ३ ज्याना त्याचा लाभ झाला त्यांनी तोच हातात धरून त्याचे चिंतन केले व या लोकात व परलोकातही
त्याची प्राप्ती करून घेतली ४ तुकाराम महाराज म्हणतात या पंढरीच्या क्षेत्रात मलाही मजुरी मिळालेली असून
याविषयी मला संतांचा मोठाच विश्वास वाटतो ५

११२६ सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥ १ ॥
साक्षमूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ २ ॥
पंचक्रोशीमाजी रीघ नाही दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥ ३ ॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरी ब्रह्मानंदु ॥ ४ ॥
तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस घेईं कोटि ॥ ५ ॥

शब्दार्थ व टीपा - सुरवर-देवश्रेष्ठ, रीघ-प्रवेश, आपैसा-आपोआप ज्यापें-ज्याच्याजवळ

अर्थ - ज्या क्षेत्रात चंद्रभागा निर्मळपणे वाहात आहे, त्या पेठेत सर्व देवश्रेष्ठ व सर्व तीर्थे याची दाटी
झालेली असते १ ही मी काही कोणी सांगितलेली गोष्ट सांगत आहे असे नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाची बात
सांगतो आहे या स्थानाचा महिमा फार मोठा असून त्याचे वर्णनसुद्धा करता येणार नाही २ या क्षेत्राच्या पंच
क्रोशीत एकाही दोषाला प्रवेश मिळणार नाही ते सर्व महादोष आपोआप जळून नष्ट होतात ३ या ठिकाणी पुरुष
व स्त्रिया निर्विषयी असून देवाप्रमाणे ते चतुर्भुज आहेत प्रत्येक घरात ब्रह्मानंदच निर्माण झालेला आहे ४ तुकाराम
महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ पुण्याचा लवलेशही नाही, त्याने सरळ पंढरपूरला जावे व वाटेल तेवढे पुण्य संपादन
करावे ५

विवरण - वरील तीन अभंगातून तुकारामबुवांनी पंढरपूर या क्षेत्राच महत्व वर्णन केल आहे तुकोबा
स्वतः वैश्यव्यवसाय करीत असत तेव्हा त्याच व्यापाराच्या भाषेत त्यांनी चंद्रभागेच्या तीरावर भरलेल्या या विठ्ठल
रूपी मालाचे व बाजारपेठेचे वर्णन केले आहे ही बाजारपेठ पुंडलीकान बगविली असून त्याच्याचमुळे सारे वैकुंठ या
भतळावर निर्माण झाले, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे या ठिकाणी कुणीही व्यापार केला तर त्यास कधी

सार्थ तुकारामगाथा ५०५
लूट वेगार नाहीं असे तुकोबा सांगतात द्वारकेहून हा श्रीकृष्णरूपी माल पंढरपूरच्या पेठेत सर्वांनाच पसंत पडलेला
आहे साऱ्या भक्तांनी याला मोजण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे मोजमाप कुणासही करता आलेले नाही अशा प्रकारे
व्यापाऱ्याच्या भाषेत या विठ्ठलरूपी मालाचा सौदा पटविण्याची भाषा या अभंगातून आहे भक्तांना विस्तार देऊन
गुंतविल्यामुळे या पांडुरंगास परत द्वारकेस जाताच आले नसल्याचेही तुकोबांनी मार्मिकपणे नमूद केले आहे
या द्वारकेच्या राण्यामुळे सर्वच संतांना पंढरपूरविषयी फार मोठा जिव्हाळा वाटतो ज्ञानेश्वरनामदेवाच्या
आधीपासूनच पंढरपूर व श्रीविठ्ठल याचा महिमा गाजत असला तरी माहात्म्यवर्णनास खरा प्रारंभ संतांच्या वाट-
मयांतूनच होत राहिला श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या क्षेत्राबद्दल आपल्या एका अभंगात म्हटले आहे, 'धणतीर्थ पंढरी।
भूर्वकुंठ महीवरी। भक्त पुंडलिकाचे द्वारीं। कर कटावरी राहिला 'पुन दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात, 'पंढरीसी
कीर्तन करी। पुंडलिकासी नमस्कारी। विठ्ठलचरण अंतरी धरीं। धन्य जन्म तयाचा' ज्ञानेश्वरनामदेव यांच्या काळा-
पासून या पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य विशेष रूपाने गर्जत राहिले पंढरपूर हे क्षेत्र म्हणजेच या भूमीवरील वैकुंठनगरी असे
सर्वांचीच समजूत आहे नामदेव हही धंद्याने व्यापारी व दुकानदार, त्यांनीही तुकोबाप्रमाणेच 'इनामाची भरली पेठ ।
भूर्वकुंठ पंढरी' असे म्हटले आहे या क्षेत्रात सर्व पातकांचा नाश होतो येथील देवळे पाषाण, तृण या सर्वांनाच देवाचेच
स्वरूप प्राप्त झालेले असते अशा नामदेवाची साक्ष असून 'अनंत तीर्थांचे माहेर । अनंत रूपाचे सार ।' म्हणजे हे
पंढरपूर असे त्यांनी म्हटले आहे 'झळझळित सोनसळा। कळस देखिला सोवळा। वरचे वरचें पंढरपूर । विठोबारायाचे
नगर', 'सर्व सुखरासी भिवरेच्या तिरीं । आमुची पंढरी कामधेनू' अशा शब्दात नामदेवांनी पंढरीचे वर्णन मोठ्या
काव्यमय भाषेत केले आहे त्यांनाही या क्षेत्रापुढे भुक्तिसुख अथवा ब्रह्मसुख याची पर्वा नाही त्यांनी एका अभंगात
स्पष्टपणे म्हटले आहे की, 'आम्हीं स्वर्गसुख मानू जैसा ओव। देसोनियां सुख पंढरीचे। नलगे वैकुंठ न वाटू
कैलास। सर्वस्वाची आस देवापार्थी।' तुकारामबुवांचेही अनेक अभंग पंढरपूरचे माहात्म्यवर्णन करणारे आहेत
'आमुची मिरास पंढरी। आमुचे घर भीमातीरीं', 'पंढरीये माझें माहेर साजणी। ओवीये कांडणीं गाऊ गीत',
'पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे', 'पंढरीचा महिमा। देता आणीक उपमा। ऐसा ठाय नाहीं कोठें। देव
उभाउभी भेटे' इत्यादी शब्दात या पंढरपूर क्षेत्राचे वर्णन तुकारामबुवांनीही केलेले आहे

११२७ विचार नाहीं नर खर तो जैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥ १ ॥
वादावाद करणे त्यासी तोच वरी । गुखाडोची चाड सरे तोच बाहेरी ॥ २ ॥
सौभाग्यसंपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठ। चिकरूनि १ साठी पाया लागली ते विष्ठ ॥ ३ ॥
नाही याति कुळ फांसे ओढी तयासी। तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खर-गाढव, लगड-ओझे, गुखाडीची-घाणेरड्या जागेची, चाड-किंमत
अर्थ - ज्या माणसाला परमार्थाचा विचारच माहीत नाही, तो मनुष्य असूनही गाढवाप्रमाणेच होय उगाच
पाठीवर ब्रह्मज्ञानाचे ओझे वाहणारा मात्र तो समजावा १ बाहेरच्या घाणेरड्या जागेची सवय असल्याप्रमाणे
त्याला नेहमीच वादविवाद करणे आवडते २ अशा प्रकारचा मनुष्य, मग तो जरी भाग्यवान, धीमंत, वृद्ध, प्रतिष्ठा-
वान असला तरी त्याचा धिक्कार पायास लागलेल्या विष्ठेप्रमाणे करावा ३ जो नुसतेच फांसे ओढतो, त्याला याती,
कूळ यांची प्रतिष्ठा कधीच नसते तुकाराम महाराज म्हणतात, ह्याच्या माळामुद्रांच्या सोंगाला काय जाळायचेय ? ४

११२८ देव होसी तरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणे न लगे ॥ १ ॥
दुष्ट होती तरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणे न लगे ॥ २ ॥
तुका म्हणे जे दर्पणीं विवळे । ते तया वाणलें निश्चयेंसों ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - आणिकांते-इतरांना, दुसऱ्यांना, दर्पणीं-आरशामध्ये

१ चिक्करूनि
तु गाथा ६४

५०६ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - तू जर खरोखरच देव होण्याच्या मार्गात असशील व त्याप्रमाणे होशील, तर मग तू स्वतःच्या
संगतीने इतरांनाही देव करून सोडशील १ आणि तू जर दुष्टच झालास तर, मग इतरांनाही तू तसेच दुष्ट बनवशील,
याबद्दल तू शंका धारण करू नयेस २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे जसे रूप असेल, तसे ते आरशात प्रति-
बिंबित होत राहील ३
११२९ कलिधर्म मागें सांगितले संती । आचार सांडिती द्विजलोक ॥ १ ॥
तेचि फळो आता येतसे प्रचिती । अधर्मा टेकती धर्म नव्हे ॥ २ ॥
तप व्रत करिता लागती सायास । पाळिता पिंडास गोड वाटे ॥ ३ ॥
देव म्हणऊनी न येती देउळा । संसारा वेगळा तरी का नव्हे ॥ ४ ॥
तुका म्हणे मज धरिता गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - कलिधर्म-कलियुगातील धर्म द्विजलोक-ब्राह्मण लोक, पिंडास-शरीरास, गुमान-
पर्वा, चौकशी
अर्थ - कलियुगात अधर्मच सर्वत्र पसरेल, असे मागेच संतपुरुषांनी व ऋषिमुनींनी सांगितले आहे ब्राह्मण
लोक या कलियुगात स्वतःचा आचारधर्म सोडून द्यायतील १ त्याचीच प्रचीती आता येत राहिली आहे सर्वजण
धर्म सोडून अधर्माचाच आधार घेऊ लागले आहेत २ तपश्चर्या व व्रते वगैरे करण्यास फारच परिश्रम पडत अस-
ल्यामुळे देहाचे लाड करून त्यास वाढविणे यातच त्याला गोडी वाटते ३ ते स्वतःच देव समजत असल्याने देवळात
जाण्याची त्यांना गरजच वाटत नाही संसारापासून वेगळेही ते कधी निघत नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात,
मी जर याची चौकशी केली तर तसे जे कोणी असतील ते खात्रीने नरकासच जातील ५
११३० नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥ १ ॥
विनवितो रंक दास मी सेवक । वचन ते एक आइकावे ॥ २ ॥
तुझी स्तुति वेद करिता भागला । निवाताचि ठेला नेति नेति ॥ ३ ॥
ऋषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णिता ते गुण न सरती ॥ ४ ॥
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्त्ती देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - अपार-ज्याचा अंत लागत नाही असा अमूपा-ज्याचे मापच करता येणार नाही असा,
रंक-गरीब, वाखाणी-नावाजणी करीन
अर्थ - सर्व विश्वात भरून असणाऱ्या विश्वरूपा, विष्णू, मायबापा, तुला नमस्कार असो तुझ्या रूपाचा अंत
नाही तुझ माप करता येत नाही १ मी देवा, तुझा गरीब दास व सेवक असून तुला मी विनंती करीत आहे माझे
एक वचन तुम्ही ऐकावे २ देवा, तुझी स्तुती करीत असताना वेद थकून जातात 'नेति नेति' म्हणून ते स्तब्धच
राहिले ३ अनेक ऋषिमुनी, अनेक सिद्ध, अनेक कविजन, हे जरी तुझे गुणगान करीत असले तरी तुमचे संपूर्ण वर्णन
होऊ शकत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा परिस्थितीत तुझ्या कीर्तीचे वर्णन करावे, तुझ्या कीर्तीची
वाखाणणी करावी, हे माझ्या वाणीला कसे जमणार ? ५
११३१ अंतरींचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पाण्डुरंगा ॥ १ ॥
घातलें वचन न पडेचि खाली । तू आम्हा माउली अनाथाची ॥ २ ॥
मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥ ३ ॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती कांहीं ॥ ४ ॥
तुका म्हणे आता केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥ ५ ॥

सार्थ तुकारामगाथा ५०७
शब्दार्थ व टीपा - गुज-गुह्य गोष्ट रहस्य, काज-कार्य, निर्भर-पूर्ण
अर्थ - देवा, माझ्या अंत करणातील रहस्य तुम्ही जाणलेत व त्याप्रमाणे कार्य केलेत १ आम्ही जो जो
वचने बोललो, ती ती तुम्ही काही खाली पडू दिली नाहीत तू आम्हां अनाथांची माउलीच आहेस २ माझ्यासारख्या
याचकाची सर्व आशा पदरोनियासा, मायबापा, तुम्ही पुरविली ३ माझ्या मनातील सर्व शका येथा, तुम्ही दूर
केल्यात भेदभावाची काही शंका होती, तीही तुम्ही उरू दिली नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही
मज तुमच्या कृपेने आता परिपूर्ण केले आहे मी आता तुझेच अपार असे गुणगान करीन ५
११३२ उदार कृपाळ अनाथाचा नाथ । ऐकसी मात शरणागता ॥ १ ॥
सर्व भार माथा चालविसी त्याचा । अनुसरलीं वाचा काया मने ॥ २ ॥
पाचारिता उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावे ॥ ३ ॥
चालता ही पंथ सांभाळिसी वाटे । वारितील कांटे जडे हाने ॥ ४ ॥
तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा । तू त्याचा कोंवसा सर्वभावे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - मात-हकीगत कोंवसा-आश्रयाचे स्थान
अर्थ - देवा, तू अतिशय उदार आहेस, कृपाळू असून अनाथांचा नाथ आहेस माझ्यासारख्या शरणागताची
हकीगत तू ऐकत असतोस १ जे तुला कायावाचामनेकरून अनुसरतात, त्याचा सर्व भार तू आपल्या मस्तकावर
वाहतोस २ त्यांनी तुला हाक मारिली की, तू जवळ येऊन उभा राहतोस त्यांना जे ज्या काळी हवे असेल, ते त्या
काळी तू देतोस ३ ते तुझे भक्त रस्त्याने निघाले की तू त्यांचा सांभाळ करतोस, त्यांच्या पायांना वाटेतील काटे
बोचू नयेत म्हणून ते तू आपल्या हातानी दूर करतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या दासाना
कसलीही चिंता नसते कारण तू सर्वभावे त्याचा आश्रयदाताच आहेस त्याचे आश्रयस्थान तूच आहेस ५
११३३ काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥ १ ॥
मज आता ऐसे नको करूं देवा । तुझा दास जावा वाया विण ॥ २ ॥
होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझ्या पायीं ॥ ३ ॥
अतरींचा भाव काय कळे लोका । एक मानी एका देखोवेखीं ॥ ४ ॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ति गोड देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - जाणिवेचा-ज्ञानाचा देखोवेखीं-वरवरचा आतुडती-प्राप्त होतील, विपत्ती-दारिद्र्य
अर्थ - देवा, मोठी कीर्ती, लौकिक लोकाकडून सन्मान, दंभ इत्यादींना घेऊन काय करू मी ? मला फक्त
तुझे चरण दाखोव १ हा तुझा दास आता व्यर्थ जाईल असे देवा, आता मजविषयी काहीही करू नकोस २ मला या
ज्ञानाचा फार मोठा भार उगाचच होऊन मी मात्र तुझ्या पायांना मुकेन, असे होऊ देऊ नकोस ३ अंतरगातील भाव
काय लोकांना सहजासहजी समजतो की काय ? मानसन्मान हा एक दुसऱ्यास वरवरचाही दाखविता येतो ४
तुकाराम महाराज म्हणतात देवा, जर तुझे पाय प्राप्त होतील तर मग दरिद्रयासारखे सकटही मला गोड वाटेल ५
११३४ मानाधवा जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं हे माझिया जीवा चाड ॥ १ ॥
तुझ्या पायासाठीं केली आराणूक । आना कांहीं एक नको दुजें ॥ २ ॥
करूनिया कृपा करीं अगीकार । न करीं उसीर आता देवा ॥ ३ ॥
नव्हे साच कांहीं कळो आले मना । म्हणोनि वासना आवरिली ॥ ४ ॥
तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥ ५ ॥

५०८ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - द्रव्यमाथा-संपत्तीचा साठा, धनाची जपणूक, आराणूक-विश्रांती, अगोकार-स्वीकार,
साच-खरे
अर्थ - जगामध्ये मानसन्मान हवा असेल तर जवळ काही धनाची जपणूक हवी संपत्ती जवळ असेल तरच
मानसन्मान मिळेल आणि माझ्या मनात तर याची इच्छा बिलकुल नाही १ मी आजपर्यंत तुझ्याच पायाशी विश्रां-
तीचे स्थान मिळविलेले आहे आता मला दुसरे काही एक नको २ देवा, माझ्यावर कृपा करून माझा स्वीकार
करावा ना तुम्ही आता तुम्ही या बाबतीत उशीर लावू नये ३ देवा, तुमच्याशिवाय दुसरे काहीच खरे नाही, असे एक
माझ्या मनास समजून आले आहे म्हणून मी आपली वासना आवरून धरलेली आहे ४ तुकाराम महाराज
म्हणतात, आता माझी सर्व इच्छा कृपानिधी, परमेश्वरा तुम्ही पूर्ण करावी अशी प्रार्थना आहे ५
११३५ आतां माझा सर्वभावे हा निर्धार । न करीं विचार आणिकासी ॥ १ ॥
सर्वभावे नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ २ ॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणी । पाहीन भरोनि डोळे मुख ॥ ३ ॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊ नेदी मनीं शंका कांहीं ॥ ४ ॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती, अंकित-स्वाधीन
अर्थ - आता मी सर्व भावाने माझा एकच निश्चय केला आहे आता दुसऱ्या कोणत्याही साधनाचा विचार
मी करणार नाही १ मोठ्या प्रेमाने व सर्व भावाने देवा, मी आता तुमच्याच नामाचे गान करीन व तुमचे पाय
हीच माझी सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे असे समजेन २ देवा, मी तुझ्या अंगणात लोटांगण घालीन डोळे भरून मी तुझे
मुख पाहीन ३ कसली लाज मनात न आणता देवा, मी तुझ्या भोवती नृत्य करीन मनात कसली शंका येऊ देणार
नाही ४ देवा, मी तुमच्या स्वाधीन झालेला तुमचाच एक दास असून तुकाराम महाराज म्हणतात, हाच एक संकल्प
माझ्या मनात नादत आहे ५
११३६ जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा ॥ १ ॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ २ ॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणे । ही कोणाकारणे कवणे केलीं ॥ ३ ॥
आम्हा मरण नाश तू तव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥ ४ ॥
तुका म्हणे तूचि निवडीं हा गुढार । दाखवी साचार तेंचि मज ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :-जनीं-लोकांत, मात-हकीगत, गुढार-गूढ गोष्ट
अर्थ -लोकात, किंवा या सबंध विश्वात एक परमेश्वर भरून राहिलेला आहे, अशी गोष्ट किंवा हकीगत
ऐकतो खरी, परंतु ही काय परिस्थिती आहे हे मला समजत नाही १ तर तोच जर सर्वत्र असेल तर, जन्म घेतो
कोण ? तो तर अमर आहे तर कोण मरतो ? तो तर अविनाशी आहे, तर नाना प्रकारच्या व्याधींनी व दुःखांनी
कोण ग्रस्त झालेला असतो ? नाना प्रकारचे भोग भोगणारा तरी कोण असतो? २ तोच जर सर्वत्र वस्ती करून आहे
तर मग पापपुण्य, शुद्धाशुद्ध आचरण ही मग कुणासाठी कुणी केली आहेत ? ३ आम्हा सर्वांना मरण व नाश आहे,
व तू मात्र अविनाशी आहेस यावर विश्वास ठेवून मी ते खरे कसे मानू देवा ? ४ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, या गूढ गोष्टीचा निवाडा तूच कर काय खरे असेल ते मला निवडून दाखीव ५
११३७ यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥ १ ॥
चोरा धरिता सांगे बुठोण्याचे नाव । दोघांचे ही पाव हात जाती ॥ २ ॥
तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ५०९
शब्दार्थ व टीपा :-पथार्थ-खरे, अधोर-घोर नर्क, कुठोन्याचे-कोठारीचे, मालकाचे.
अर्थ :-नीट खरे असेल ते यथार्थपणे न सांगता उगाच लोकांना आवडतील अशा थायफळ गोष्टी सांगतील
ते महा भयानक अशा नर्कास जातील. १ एखाद्या चोराला धरल्यास तो आपल्याच मालकाचे किंवा प्रमुखाचे नाव
सांगतो, मग दोघांनाही बंदिवासाची शिक्षा भोगावी लागते. २ तुकाराम महाराज म्हणतात, असा निवाडा पुराणां-
नीच केलेला आहे. ही काही केवळ माझीच अशी धडपड नाही. ३
११३८ धीर तो कारण साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहो चिंता दासांसी ॥ १ ॥
सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपणचि कळिकाळ ॥ २ ॥
जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥ ३ ॥
हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥४॥
शब्दार्थ व टीपा :-जडभारी-मोठे दुखणे, संकट, प्राकृत-साधारण, आहाच-उगाच.
अर्थ :- या भक्तिमार्गात किंवा परमार्थविचारात जो धीर धरून वागतो, त्यासच नारायणाचे साह्य
कार्य रूपाने होते. तो आपल्या दासांना कधीही शीण होऊ देत नाही, की दासांना चिंता करू देत नाही. १ त्याच्या
भक्तांनी सुखात राहून कीर्तन करावे, मोठ्या आनंदाने परमेश्वराचे गुणगान गावे. मग तोच स्वतः आपल्या
सुदर्शनाच्या साह्याने प्रत्यक्ष यमाचेही संकट दूर करितो. २ स्वतःच्या मुलावर काही मोठे संकट अथवा दुखणे जर
कोसळले, तर त्यातून त्याला मुक्त करण्यासाठी त्याची आई जीव टाकते आणि हा दाता ईश्वर या सर्वसाधारण आई-
सारखा नव्हे. तो आपल्या भक्ताची यापेक्षाही फार काळजी घेतो. ३ हे सर्व माझ्या अनुभवास आले आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, हे सर्व सत्यच आहे. माझे हे काही उगाच तुम्हांस सांगत आहे असे नाही. ४
११३९ पुढें आतां कैचा जन्म । ऐसा धम वारेसा ॥ १ ॥
सर्वथाहि फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ २ ॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥ ३ ॥
तुका म्हणे चुकती १ बापा । पुन्हा खेपा सकळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वारेसा-निवारण होईल असा.
अर्थ :- जन्ममृत्यूच्या खेपाचा धम निवारण होईल, असा यापुढे आपणांस कोणता जन्म येईल. १ अशी
सोय या मनुष्यजन्मात प्राप्त झालेली असल्यामुळे उगाच वणवण करीत फिरू नये. २ भवसागरातून तरून नेणारी
या पांडुरंगासारखी नाव भक्तिभावामुळे आपणास आता प्राप्त झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
तुम्हा या देवास मनोभावे शरण गेल्याने पुन: पुनः जन्मास येण्याचे संकट मग टळेल. ४
११४० दूध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥ १ ॥
हेंच वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ २ ॥
लोहो फफ गारा अग्नीचिया काजें । येन्हवी तें ओझें कोण वाहे ॥ ३ ॥
तुका म्हणे सोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- घृतसार-तूप हे सार, लोहो-लोखंड, फफ-कापूस.
अर्थ :- गाईम्हशींचे पालन कशासाठी करायचे असते ? त्यांच्यापासून दूध, दही, ताक वगैरे पदार्थ मिळतात
म्हणूनच त्यांची जोपासना आपण करतो. कारण या सर्वांत तुपासारखा पदार्थ हे सारभूत तत्त्व आहे. १ याच तुपा-
प्रमाणे हे वर्म श्रीहरीचे आमच्या हाती आलेले असल्यामुळे आम्ही आमच्या चित्तात या रामप्रभूस धारण केलेला
१ चुकवी.

५१० सार्थ तुकारामगाथा
आहे २ लोखंड, कापूस, गारगोटी याचे साह्य अग्नी निर्माण करण्यासाठी होत असते, म्हणूनच त्याचे ओझे वाग
वायचे असते एरव्ही कोण त्याची पर्वा करतो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, भूमिगत धन हातात येईपर्यंतच
खोरी पहार वगैरे साधने जपून ठेवायची असतात ४
११४१ वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥ १ ॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ २ ॥
क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥ ३ ॥
तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गाढे-शूर, कळिकाळ-यम
अर्थ - या विठ्ठलाचे हे सेवक मोठे शूर असून प्रत्यक्ष यमही त्यांच्या पाया पडत असतो १ ते नेहमी या
विठ्ठलाचाच जयजयकार करीत असतात, दोषांचे डोंगरच्या डोंगर त्यामुळे जळून जातात २ या वीर भक्तांच्या
हातात दया, क्षमा शांती हेच अभंग, न तुटणारे असे बाण असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, या जगतात हे
वीर भक्तच अतिशय बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत ४
११४२ ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजीं स्मराया ॥ १ ॥
मग कैंचे रे बंधन वाचे गाता नारायण । भवसिंधु तो जाण येचि तीरीं सरेल ॥ २ ॥
दास्य करील कळिकाळ बद १ तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धी म्हणियारी ॥ ३ ॥
सफळशास्त्रांचे सार हे वेदांचे गुह्यर । पाहाता विचार हाचि करिती पुराणे ॥ ४ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥ ५ ॥
तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे । आणीक ही दैवे सुख घेती भाविके ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - तीरीं-काठावर बद-बंधन ह्मणियारीं-म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या, गुह्यर-रहस्य,
मुख्य अर्थ
अर्थ - लोकहो, तुम्ही आता स्वहिताच्या खुणा कोणत्या त्या नीट ऐका केवळ पंढरीचा राणा मनामध्ये
स्मरा म्हणजे झाले १ या नारायणाचे गुणगान गाताना मग कसले आले आहे बंधन ? मग याच्या गुणगानामुळे
संसारसागर याच तीरावर संपला, असे समजायला हरकत नाही २ कळिकाळ हा तुमचे दास्य करील माया
जाळाचे बंधन सुटेल आणि सर्व रिद्धीसिद्धी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या होतील ३ सर्व शास्त्रांचे व वेदांचे
सार ते हेच रहस्य होय हाच मुख्य अर्थ होय पुराणांचाही विचार हाच आहे ४ वर सांगितलेल्या साधनाचा
अधिकार सर्वांना आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, शूद्र, चांडाळ या सर्वांना या विठ्ठलाच्या नामाचा अधिकार आहे
लहान मुले पुरुष स्त्रिया इतकेच नव्हे तर, वेश्यांनाही याचा अधिकार आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात
आम्हास अनुभवाने ही सर्व माहिती झालेली आहे या सुखाचा अनुभव इतर जी भाविक व सुदैवी माणस आहेत
ही घेतात ६
विवरण - भक्तीच्या क्षेत्रात कुणा कुणास अधिकार आहे याचा पुन पुन उच्चार तुकारामासारख संत
करीत असतात ईश्वराच्या प्राप्तीसाठी केवळ उच्चवर्णीयांनाच अधिकार असे खालच्या वर्गास किंवा हीन जातीच्या
लोकांना परमेश्वराचे दार युगानुयुगं कमठ लोकांनी जणू बद केल होत स्वयप्राप्तीसाठी अथवा मोक्षसाधनेसाठी
वेदादी ग्रंथातून पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच अधिकार प्राप्त झालेल दिसतात सर्वसामान्यांचा शूद्र वर्ग व स्त्रिया
यांना हे अधिकार परंपरेप्रमाणे नाहीत बृहदारनिषद वगैरे ग्रंथातून मैत्रेयी गार्गी वगैरे स्त्रियांची नावे असल्यामुळे
हे बंधन नंतरच्या काळातील असावे
१ वध

सार्थ तुकारामगाथा ५११
परंतु नंतर ही उणीव भरून काढण्याचा पहिला प्रयत्न गीतेमध्ये झाला. जातीचा, वर्णाचा, स्त्रीपुरुषादी
भेदाचा किंवा इतर कसलाही फरक न करता सद्गती देणारा भगवद्भक्तीचा मार्ग सर्वांना सहज व सुलभ करून
दिला तो या गीताप्रणीत भागवतधर्मानेच होय. 'स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्' असा निर्णय
भगवद्गीतेने दिलेला आहे. स्त्रिया, वैश्य व शूद्र यांच्याबरोबर अन्त्यजादी पापयोनी याचाही उल्लेख आहे. याप्रमाणे
समाजातील सर्व वर्णातील लोकांना मोक्षाचे द्वार खुले झाले होते. तोच नेमका आधार घेऊन भागवतधर्मीय संतांनी
हा मार्ग सहज सुलभ करून सोडला. 'ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळा आहे अधिकार । याळें नारीनर आदि-
करोनि वेश्यादि' असा त्याचा खुलासा तुकारामबुवांनी या अभंगात केलेला आहे. हिंदुधर्माप्रमाणे बौद्धधर्मांतही
वेश्येसही या मार्गाची प्राप्ती सुगम झालेली दिसते. बुद्धाने आम्रपाली या वेश्येस व अंगुलीमाल नावाच्या चोरासही
दीक्षा दिली असल्याची हकीगत सापडते. पिंगलादी वेश्याचा संदर्भ या ठिकाणी ध्यानात राहण्यासारखा आहे.
कान्होपात्रा ही तर एका नायकिणीची मुलगी होती. आपल्या दुष्कृत्याबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप व ईश्वरावर संपूर्ण
विश्वास, यामुळे मोक्षाची दारे सर्वांनाच या भक्तिमार्गामुळे खुली झाली
११८४ न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥ १ ॥
अविनाश सुख देईल निर्वाणीं । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ २ ॥
आणिकियां जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥ ३ ॥
आहिच्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥ ४ ॥
तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- निर्वाणी-अखेरीस, आहिच्य-या लोकात, परत्र-परलोकात.
अर्थ :- काही एक तळमळ न करिता तू आपले मन शांत व स्वस्थ करून तू आता स्थिर हो हा माझा
स्वामी मोठा कृपाळू आहे. १ हा तुला अखेरीस अविनाशी असे प्रेमामृत देईल व त्यामुळे तुझ्या चौऱ्याऐंशी लक्ष
जन्मांच्या खेपा चुकतील. २ तुझ्या स्वतःच्या अशा उद्धारामुळे आणखीही पुष्कळ लोकांचा उद्धार होईल व तुझ्या
हातून कोट्यवधी उपकार पडतील. ३ या लोकी व परलोकीही तुझी मान्यता वाढेल. यासाठी पण तू मुखाने राम
राम असे शब्द म्हणत राहा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराचा लोभ मान सोडून दे. तरच तुला
परमावधीचा आनंद प्राप्त होईल. ५

दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखो जाणे ॥ ३ ॥
न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥ ४ ॥
तुका म्हणे लेईं अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- निश्चळ-स्थिर.
अर्थ :- एके ठिकाणीं तू स्थिर बसून त्या श्रीहरीचे ध्यान कर. तो तुला भरपूर अन्नवस्त्र देईल. १ आम्हांस
अधिक वस्तूंचा संग्रह करून काय करायचेय ? आम्हांस सर्वकाही पुरविणारा देव आमचा ऋणी झाला आहे. २ हा
देव मोठा दयाळू व ममताळू असल्याने त्याला आमचा कळवळा मोठाच आहे. शरण आलेल्याचे रक्षण कसे करावे हे
तो चांगले जाणतो. ३ त्या देवास काही मागावे लागत नाही, सांगावे लागत नाही. कारण तो ज्याची जी इच्छा
असेल त्याप्रमाणे पूर्ण करीत असतो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू आपल्या वाणीवर या विठ्ठलाचाच अलंकार
घाल. त्यामुळे या जगात तू स्वतःच विठ्ठल होऊन जाशील ५
११४६ सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥ १ ॥
काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ २ ॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥ ३ ॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कळस-भांडे, पात्र, सुरारस-दारूसारखे पेय, मृत्तिकेचा-मातीचा, सांट-साठा.
अर्थ - चांगले सोन्याचे भांडे आहे; पण आत मात्र दारूसारखे पेय भरलेले आहे १ तुम्ही संतलोक मला
सांगा त्या सुवर्णाच्या भांड्याच्या किंमतीचा व देखणेपणाचा काही उपयोग आहे का ? २ उलट मातीचेच वेडे-
वाकडे मडके आहे परंतु आत मात्र अमृताचा साठा आहे. तोच महत्त्वाचा मानावा लागेल. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, या दोहोंपैकी हित कशात आहे, ते मला तुम्हीच सांगा ४
शेतावर-अभंग ३.
११४७ सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥ १ ॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ २ ॥
जपतप नागरणी । न लगे आटी दुनवणी ॥ ३ ॥
कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥ ४ ॥
ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥ ५ ॥
योज न लगे सचिताचे । पीक पिकले ठायचें ॥ ६ ॥
नाही यमाचें चोरटें । विठ्ठल पागोन्याच्या नेटें ॥ ७ ॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग¹ तो पिसा ॥ ८ ॥
सराई सर्व काळ । वांयां न वने घटिकापळ ॥ ९ ॥
प्रेम पिकले अपार । नाहीं सांटवावया थार ॥ १० ॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥ ११ ॥
१ उद्योग

सार्थ तुकारामगाथा ५१३
शब्दार्थ व टीपा :- फुकटचें-फुकटचे, जेवा-अन्नखर्च, जाहाती-जूलूम, सरिक-भागीदार, वाटेकरी, पानीदार
आटो-खटपट, श्रम, दुनवणी-पुनः नांगरणे, पाभार-शेतांत बीं पेरण्याचे आऊत, पागोऱ्याच्या-गोफणीमुळे.
अर्थ :- अहो, या विठ्ठलरायाच्या नामरूपाचे शेत फुकटचे तुम्ही करावे १ येथे काही बिगारीच्या लोकांचा
अन्नखर्च येत नाही, किंवा सरकारला साराही द्यावा लागत नाही. कुणाची हुकुमी जुलूमजबरदस्तीही येथे नाही या
शेताच्या उत्पन्नात दुसरा कुणी भाडेकरीही नाही. तूच एक या सर्व शेताचा धनी आहेस. २ या शेतासाठी जप-
तपादी साधनांची नांगरणी नको, पुन पुनः नांगरण्याची खटपट नको. ३ नानाविध कर्मांची कुळपणीही नको. कर्म
व धर्म यांच्या कुळपणीची जरूरी नाही. ४ ज्ञानरूपी पाभारीची तिकळी नको. येथे योत्तुद्या पेरावे लागत नाही. ५
येथे संचित कर्माचे बी पेरले नाही तरी चालते. येथील नामरूपामक शेत मूळचेच पिकलेले आहे. ६ येथे विठ्ठल-
नामाची गोफण सिद्ध असल्यामुळे यमरूपी चोरट्यांची भीती नाही येथे. ७ येथे पीक कधीच बुडणार नाही, हा
विश्वास आहे; विनाकारण जो काळजीत करीत बसतो, तो वेडाच समजायला हवा. ८ येथे नेहमीच हंगामाचे रूप
असते. येथील एक घटका किंवा पळही हंगामाखेरीज जात नाही. ९ या शेतात प्रेमाचे पीक अपरंपार आले असून,
त्याचा साठा करायलासुद्धा जागा नाही. १० तुकाराम महाराज म्हणतात, अशा शेताला लाभ करून घ्यायला जो
चुकला त्याच्या जगण्यालाही धिक्कार असो. ११
११४८ वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥ १ ॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ २ ॥
चोरावरवें वाट । चालोनि केलें तळपट ॥ ३ ॥
डोळे झांकुनि राती । कूपीं पडे दिवसा जोती ॥ ४ ॥
पोसी वांज' गाय । तेथें कैंची दुध साय² ॥ ५ ॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- वोणव्या-खाली वाकून, सोंकरीं-राखण करणाराच्या, निदसुरा-मूर्ख, अर्धवट जागा
असलेला, सांगडी-नाव
अर्थ :- शेताकडे चांगले, भान वर करून लक्ष न देता, खाली वाकून जो शेताची राखण करीत असतो,
त्याचे शेत कसे राखले जाणार ? ते पाखरांकडून खाल्ले जाणारच. १ याप्रमाणे मूर्ख माणसा, जागा राहून नुकसान
करून घेऊ नकोस. २ चोरांच्या बरोबर वाटचाल करून उगाच आपले नुकसान का करून घेतोस ? ३ चांगला
दिवसाचा प्रकाश असताना डोळे बांधून चालल्यामुळे विहिरीत पडण्याचे मात्र संकट उभे राहील. ४ वांझ गाय
पोसून दुधाची साय कशी मिळणार ? ५ फुटक्या नावेच्या साह्याने तुकाराम महाराज म्हणतात, कोण पैलतीरास
जाऊ शकणार ? ६
११४९ सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोन । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥ १ ॥
सोंकरीं सोकरीं विसावा तोंवरीं । नको खाऊं उर्ने आहे तों ॥ २ ॥
गोफणेती गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटें । पळती हाहाकारें अर्वाचीं पांखरांचीं थाटें ॥ ३ ॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान वळ बुद्धि व्हावी दोन्ही ॥ ४ ॥
खळे दानें विश्व सुख करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देई त्यासी ॥ ५ ॥
तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आले हातां मूस सांडिलें निकण ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सुगी-हंगामास, कोन-कोपरे, थाटें-थवे
१ वांझ, सीय.
तु. गाथा . ६५

५१४ | सार्थ तुकारामगाथा

अर्थ - हे हरिनामाचे शेत चांगले हंगामाला आले आहे चारही कोपऱ्यांपर्यंत याची राखण करावी
चांगले पीक आले असल्याने याची राखण मात्र नीट केली पाहिजे १ यासाठी या शेताचा नीट सांभाळ करावा
पीक उभे आहे, तोपर्यंत काही विसावा घेता कामा नये २ गोफणीस या श्रीहरीच्या नावाचा धोंडा घालून जोराने
फेका मग या नामाच्या गर्जनेने नाना विकाराच्या पाखराचे थवेच्या थवे उठून जातात ३ आगटी पेटवून तू जागा
बदलून राहावेस एखादे संकट आले तर वळ व बुटी या दोघांचेही साह्य व्हावयास हवे ४ या शेतावरील, खळ्या-
वरील धान्याचे दान करून सर्व जगास तू सुखी कर ज्याचा कर त्यास देऊन साराही चुकता कर ५ तुकाराम
महाराज म्हणतात, यानंतर काही कार्य मग उरणार नाही कारण निजस्वरूपाचे सत्त्व हाताशी आल्यामुळे व्यर्थ
असणारे भूस सांडून गेले तरी हरकत नाही ६

विवरण - तुकाराम महाराजांनी अनेक प्रसंगी जी रूपकात्मक रचना केली आहे, त्यात हे शेतावरील तीन
अभंग प्रसिद्ध आहेत हे शेत म्हणजे विठ्ठलाच्या नामरूपाचे होय अथवा मानवी देहालाही शेताचीच उपमा देऊन
त्याची नीट राखण करण्याविषयी उपदेश केला असतो पारमार्थिक दृष्टीनेच या शेतावरील रूपकात्मक अभंगाचा
अर्थ लावता येण्यासारखा आहे गीतेच्या तेराव्या अध्यायातही या शरीरालाच क्षेत्र म्हणजे शेत म्हटले आहे या
क्षेत्राचे म्हणजे पंचमहाभूतांच्या पासून झालेल्या शरीराचे रक्षण कसे व किती करावे, याविषयी यात विचार प्रामुख्याने
येतो मनुष्याचा देह हे एक क्षेत्र असून याचा मालक कोण, याची निगा कशी राखावी, या संबंधीचा विचार
प्रामुख्याने अध्यात्मशास्त्र करीत असते पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, मन, पाच
कर्मेंद्रिये, त्याचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुख, संघात, चेतना, धैर्य इत्यादी तत्त्वाचा समुदाय म्हणजे क्षेत्र,
अशी व्याख्या गीतेने केलेली आहे या क्षेत्राचे विस्ताराने निरूपण श्रीज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या अध्यायाच्या
प्रारंभीच केलेले आहे

तुकारामबुवांनी छान मराठमोळ्या भाषेत मराठी शेतकऱ्याचे रूपक या देहाच्या क्षेत्राचे वर्णन करण्यासाठी
रंगविले आहे या परमार्थांमधील क्षेत्रावर, शेतावर कुणाला वेठीस धरून कामास जुपावे लागत नाही त्याच्या बन-
खर्चाचा प्रश्न येथे नाही येथे बुजाला मारा द्यावा लागत नाही येथे कुणाची जुलूमजबरदस्ती नाही नांगरणी,
कुळवणी, पाबार घेऊन पेरणी इत्यादी रूपकात्मक भाषेत त्यांनी या शेतावरील हंगामाचे वर्णन केले आहे खाली मान
घालून जो शेती राखेल, त्याचे शेत पाखरे खाऊन जातील असा एक उल्लेख क्र ११४८ च्या अभंगात आहे या
संदर्भात तुकारामबुवांनी एका शेतकऱ्याचे व्यावहारिक जगातील शेत कसे राखले, याची आठवण होण्यासारखी आहे
या पाखरांपासून शेताचे रक्षण करण्याऐवजी शेतामुळेच, कणसातील दाण्यांमुळेच, पाखरांचे रक्षण झाल्याचे पाहून
तुकोबा संतुष्ट झाल्याची एक कथा त्यांच्या चरित्रात आहेच अशा प्रकारे शेताची राखण करूनही तुकोबांचे शेत
टपोऱ्या कणसांनी भरून गेलेले आहे, असाच या कथेचा शेवट आहे तरी सुद्धा या 'शेतावरील अभंगात' मात्र त्यांनी
'बोंबण्या सोंकरीं। सेत खादले पांखरीं' असाच इशारा दिलेला आहे

वर डोळे ठेवून, पाखरांकडे लक्ष न देता शेत राखता येणार नाही, असेच त्यांना सांगावयाचे आहे कारण
हे शेत नामरूपादीचे अथवा या मानवी देहाचे असल्याने, व पुन पुन न लाभणारे असल्याने महत्त्वाचे आहे काम-
क्रोधादी विकारांनी अथवा चोरांनी या शेताची लुबाडणूक करू नये, असाही भावार्थ या अभंगाचा असावा या मानव
जन्मात प्राप्त झालेले हे शेत ईश्वरी कृपेने चांगले पिकवावे, चांगला हंगाम काढावा, व खळ्यावरील सर्व धान्य
लोकांना देऊन आपण स्वतः तृप्त व्हावे, अशीच शिकवण शेतावरील या रूपकात्मक अभंगाच्या द्वारे तुकाराम
महाराजांनी दिलेली आहे

११५० नका घालू दूध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥ १ ॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥ २ ॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ५१५
शब्दार्थ व टीपा - नेदा-देऊ नका, जीवन-पाणी, फोड-हौस
अर्थ - तुम्हाला दूध जर कुणाला द्यावेसे वाटत नसेल तर देऊ नका कारण त्यात सर्व सारसर्वस्व असते
पण दुसऱ्यावर ताकाचे तरी उपकार करावेत १ जर कुणाला अन्न देण्याची शक्ती तुमची नसेल तर नका देऊ,
पण फुकटचे पाणी पाजायला काय हरकत आहे ? २ तुकाराम महाराज म्हणतात, मला देवाच्या सगुण रूपाची
हौस आहे माझ्यासारख्या दुर्बळांची इच्छा कुणी कधी पून करील का ? ४
उत्तराधिपदें-२२.
११५१ क्या गाऊ कोई सुननवाला । देखें तो सब जग ही भुला ॥ १ ॥
खेलो अपने रामहिसात । जैसी वैसी करहो मात ॥ २ ॥
काहासे लाऊ मधुरा बानी । रीझे ऐसी लोक बिरानी ॥ ३ ॥
गिरिधर लाल तो भावका भुका । राग फला नहि जानत तुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भुला-चुकलेला, रामहिसात-रामाच्या बरोबर, लाऊ-आणू, बानी-वाणी, रीझे-
रमेल, बिरानी-दुसरा
अर्थ - जिकडे पाहावे तिकडे सर्व जग चुकल्यासारखेच आहे कोणी ऐकणाराच नाही मी काय गाऊ
मग ? १ आता आत्मारामाबरोबरच खेळत राहून जसे होईल तसे त्याच्याशीच बोलत राहू २ ज्या योगे हे
विषयांत रममाण होणारे दुसरे लोक रमतील, अशी गोड वाणी मी कोठून आणू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात,
गोवर्धन पर्वताला धारण करणारा तो गोपालकृष्ण शुद्ध भावाचा भुकेला आहे आणि मीही रागज्ञान जाणत नाही ४
११५२ छोडे धन मंदिर वन बसाया । मागत तुका घरघर खाया ॥ १ ॥
तीनसो हम करयो सलाम । ज्यामुल बैठा राजाराम ॥ २ ॥
तुलसीमाला बभूत चढ़ावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥ ३ ॥
कहे तुका जो साई हमारा । हिरनकश्यप उन्हे मारहि डारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - बसाया-वस्ती करून तुका-तुकडा, तीनसों-त्याला
अर्थ - आपले घर व द्रव्य याचा त्याग करून जो वनामध्ये वस्ती करून राहिला आहे व खाण्याकरता
घरोघर तुकडा मागत आहे, १ ज्याच्या मुलामध्ये निरंतर रामनामाचीच बैठक आहे, त्याला आम्ही नमस्कार
करू २ तुळशीची माळ गळ्यात घालून, ज्याने अंगाला राख फासली आहे, अशाच हरीचे गुण आम्ही निर्मळ
मनाने गाऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात की, ज्याने हिरण्यकशिपूला मारले तोच आमचा स्वामी आहे ४
११५३ मंत्रयंत्र नहि मानत साखी । प्रेमभाव नहि अंतर राखी ॥ १ ॥
राम कहे त्याके पगहू लागू । देखत कपट अभिमान दुर भागू ॥ २ ॥
अधिक याती कुलहीन नहि जानू । जाने नारायन सो प्रानी मानू ॥ ३ ॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिहु बलिहारी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साखी-पत त्याके-त्याच्या पगहू-पाया याती-जाती, डारु-टाकू, बलिहारी-
ओवाळून टाकू
अर्थ - अंत करणात श्रीहरीचे प्रेम जर नसेल तर मंत्रतंत्राची पत आमच्याजवळ नसून आम्ही तो मानीतही
नाही १ जो नेहमी रामभजन करील त्यालाच आम्ही भजू त्याच्याच पाया आम्ही पडू ज्याच्या ठिकाणी कपट
व अभिमान आहे त्याला पाहताच आम्ही दूर पळून जाऊ २ त्याची जात, कूळ आम्ही जाणणार नाही जो

५१६ सार्थ तुकारामगाथा
नारायणाला जाणेल, त्याच प्राण्याला आम्ही मानू ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो बलवान प्रभू रामचंद्राची
उपासना करतो, त्याच्यावरून जीव व शरीर आम्ही ओवाळून टाकू ४
११५४ चुराचुराकर माखन खाया। गोलनीका नद कुमार कन्हया ॥ १ ॥
काहे बराई दिखावत मोहि। जागतहु प्रभुपना तेरा सब हि ॥ २ ॥
और बात सुन उखलसु गला। बाधलिया आपना तू गोपाला ॥ ३ ॥
फेरत बनवन गाऊ धरावत। कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - माखन-लोणी, बराई-बडाई लकरी-काठी
अर्थ - नदाचा मुलगा श्रीकृष्ण हा गोळणीचे लोणी चोरून खातो १ मला कशाला बडाई मारतोस ?
तुझा प्रभुषणा मी जाणत आहे, त्याचे तू रक्षण कर २ हे गोपाळा, आणखी एक गोष्ट तू ऐक तू आपला गळा
उखळाला बांधून घेतला आहेस ३ तुक्याबंधू म्हणतो, हातामध्ये काठी घेऊन तू रानावनात गाई वळवीत हिंडतोस ४
११५५ हरिसु मिल दे एकहि बेर। पाछे तू फिर नाये घर ॥ १ ॥
मात सुनो दुति आये मनायन। जाया करति भर जोबन ॥ २ ॥
हरिसुख मोहि कहिया न जाये। तब तू बुझे आगो पाये ॥ ३ ॥
देखहि नाव कछु पकरि हात। मिलाइ तुका प्रभुसात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - बेर-समय, वेळ पाछे-नंतर पकरि-पकडेल, धरेल
अर्थ - एक वेळ तू आपले चित्त हरेश्‍वरपात मिळव म्हणजे पुन तुला जन्ममृत्युरूपी घराकडे यावे
लागणार नाही १ ह्याविषयी हकीकत अशी आहे की, ज्या वेळी यमदूत येतील, त्यावेळो तू जरी भर जवानीत
असलास तरी ते तुला जायबंदी करतील २ हरीचे सुख अवर्णनीय आहे माझ्याने ते सागवले जाणार नाही ज्या
वेळेस तू परमार्थोत पाऊल टाकशील, त्यावेळी तुला ते कळेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू भक्ताचा शुद्ध
भाव पाहून त्याचा हात धरून आपल्याबरोबर केव्हा मिळवून घेईल हे पाहा ४
११५६ क्या कहु नहीं बुझत लोका। लिजाये जम मारत धक्का ॥ १ ॥
क्या जीवनेकी पकडी आस। हाती लिया नहि तेरा घास ॥ २ ॥
किसे दिवाने कहता मेरा। कछु जावे तन तू सब ल्या न्यारा ॥ ३ ॥
कहे तुका तू भया दियाना। आपना विचार कर ले जाना ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - बुझत-समजून, जम-यम, दिवाना-वेडा
अर्थ - काय सांगू ! यम धक्के मारून नेईल हे लोकांना समजत नाही १ हातामध्ये घेतलेला घास
मरणापूर्वी खात्रीने तोंडात घालीन, इतकी देखील सत्ता तुमच्या हातात नसून आम्ही पुष्कळ जगू, अशी आशा का
बाळगली आहे २ हे वेड्या, तू सर्वांहून निराळा आहेस तू देह, स्त्री, पुत्र इत्यादी सब माझे असे का म्हणतोस ?
ते सब नाहीसे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू येडा झाला आहेस लोकहो, तुम्ही आपल्या विषयी विचार
करा ४
११५७ कब महू पाऊ चरन तुम्हारे। ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥ १ ॥
जग रडे ज्याकु सो मोहि मीठा। मीठा दर आनंदमाहि पेठा ॥ २ ॥
भला पाऊ जनम इन्हे बेर। बस मायाके असग फेर ॥ ३ ॥
कहे तुका धन मानहि दारा। बोहि लिये गुड़लीया पसारा ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ५१७
शब्दार्थ व टीपा :- डरे-भीते, पैठा-स्थिर होणे.
अर्थ - हे देवा, मी केव्हा मरेन व तुमच्या चरणांशी केव्हा एकरूप होईन, इतके तुम्ही मला जीवापेक्षा
प्रिय आहात १ ज्याच्या संबंधाने जग दुःखी होते, ते मला गोड आहे त्या गोडीचा इतका आदर आहे की, त्या
योगे मी आनंदात स्थिरावतो. २ या योगाने आम्ही आपल्या जन्माला जाऊ व मायेचे फेरे पूर्ण झाले म्हणून असंग-
पणाने राहू ३ तुकाराम महाराज म्हणतात, धन, मान व स्त्री हा सर्व पसारा मी गुंडाळून टाकिला आहे. ४
११५८ वासो पाछै दौरे राम । सोवे खडा आपै मुकाम ॥ १ ॥
प्रेमसरडी बांधी गले । खेंच चले उधर ॥ २ ॥
आपने जनसु भुल न देवे । कर हि घर आर्घे बाट बतावे ॥ ३ ॥
तुकाप्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दौरे-पळेल, खेंच-खेचणे, ओढणे, भूल न देवे-चुकून देत नाही, वारि-ओवाळून टाकू
अर्थ - राम हा दासाच्या मागे धावतो व ते आपल्या मुक्कामावर जाऊन निजले की, तेथे उभा राहतो १
भक्त प्रेमाची दोरी गळ्यात बांधून त्याला ओढीत चालवितात त्या वेळेस तो तिकडे तोंड करून चालतो २
आपल्या दासाचा तो परमार्थाचा रस्ता चुकू देत नाही असावधपणे चुकू लागले तर, हात धरून त्यांना परमार्थाची
नीट वाट दाखवितो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामी प्रभो, तू दीनदयाळ आहेस; म्हणून हे गोपाळा,
तुझ्यावरून मी आपल्याला ओवाळून टाकीन ४
११५९ ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ १ ॥
इतने गोते काहे खाता । जब तूं अपना मूल न होता ॥ २ ॥
अंतरजामी जानत साचा । मनफा एक उपर बाचा ॥ ३ ॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नंहि लेस ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- छोर-सोड, अंतरजामीं-अंतर्यामी, लेस-लेशमात्र
अर्थ :- ज्या योगाने तुझा राम येईल असे कर बाकीच्या धंद्याविषयी सर्व इच्छा टाकून दे १ जर तू
आपल्या स्वरूपाला विसरला नसतास, तर अनेक जन्ममृत्यूचे फेरे का खावे असते ? २ मनात एक भाव व वाणीत
दुसरा भाव, परंतु हे दोन्ही भाव अंतर्यामी असणारा जो परमात्मा तो जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात
माझा प्रभू देशाविदेशातून भरला आहे त्याच्यावाचून एक लेशमात्र जागा रिकामी नाही. ४
११६० मेरे रामको नाम जो लेवे बारोबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ १ ॥
हसत खेलत चालत बाट । खाना खाते सोते खाट ॥ २ ॥
जातनसुं मुजे कछु नंहि प्यार । असतेके नंहि हेतु धेड चंभार ॥ ३ ॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाम । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - त्याके-त्याला, पैजार-जोडा
अर्थ - माझ्या रामाचे नाव जो वेळोवेळी घेईल, त्याच्या पायांत मी आपल्या शरीराचा जोडा करून
घालीन १ हसताना, खेळताना, जेवताना, पलंगावर निजताना जो रामाचे नाव घेतो, २ मग तो कोणत्याही
जातीचा, धर्माचा का असेना; त्याच्या जातीची, धर्माची मला प्रीती नाही. तो धेड असो अगर चांभार असो,
कोणत्याही जातीचा असेना ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त माझ्या रामाच्या नामाकडे लागले आहे,
त्याच्या पायाच्या ठिकाणी माझे चित्त जडो ४

५१८ सार्थ तुकारामगाथा
११६१ आप तरे त्याकी कोन वराई । औरनकुं भलो नाम धराई ॥ १ ॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥ २ ॥
बरसते मेघ फलतेहैं विरखा । कोन काम आपनी उन्होति रखा ॥ ३ ॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥ ४ ॥
काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत धातु ॥ ५ ॥
कहे तुका उपकारहि काज । सब कररहिया रघुराज ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- तरे-तरतो, खिन-क्षण
अर्थ - जो आपण स्वतः परमार्थ करून तरतो, त्याचा काय मोठेपणा आहे ? म्हणून अन्य जीवांना श्रीहरीचे
नाव चांगले घ्यावयास लावावे १ पृथ्वी अनेक भूतांचा भार वाहते. त्यात तिचे काम काय आहे ? गाय ही
मालकाला दूध देते, त्यातले किंचित्‌सुद्धा चाखीत नाही. २ मेघ वृष्टी करितात, तिचे फळ मेघांना मिळते काय ?
म्हणून काय मेघांनी आपले वृष्टी करण्याचे काम बंद ठेविले आहे ? ३ हे चंद्रसूर्य पूर्वेस उगवून पश्चिमेकडे
मावळतात. एक क्षणभर विसांवा न घेता फिरतात ४ परीस हा लोखंडाचे सोने का करतो ? त्याने लोखंडाचे
सोने केले तरी, त्याची किंमत कमी होत नाही व तो स्वतः धातूही होत नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात,
दुसऱ्यांवर उपकार करण्याचे कार्य राम करीत असतो. ६
११६२ जग चले उस घाट कोन जाय । नहिं समझत फिरफिर गोते खाय ॥ १ ॥
नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥ २ ॥
उपर स्वार बैठे तृष्णांपीठ । नहिं बाचे कोई जावे लूठ ॥ ३ ॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - बुझे-समजेल, तृष्णापीठ-तृष्णेच्या आसनावर
अर्थ :- ज्या मार्गाने जग जात आहे, त्या मार्गाने कोण जात नाही ? परंतु त्याचा परिणाम काय होईल, तो
कुणी समजत नसल्यामुळे ते वारंवार जन्ममृत्यूचे गोते खातात १ असे एकदोन नाहीत, सर्व प्राणीमात्र असेच गोते
खातात जो हे जाणतो तो आघाडीचा स्वार होतो. २ जे तृष्णेच्या आसनावर बसले आहेत, त्यातले सर्व वाचणार
नाहीत. सर्व लुटले जाणार आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व प्रकार पाहून मला भीती वाटली व मी
सगळ्यांकडे पाठ फिरवून एकट्या रामाचाच मार्ग धरला ४
११६३ भले रे भाई जिन्हे किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ १ ॥
फीरतफीरत पाया सारा । मीलत लोले धन किनारा ॥ २ ॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटत भवरोग ॥ ३ ॥
कहे तुका में ताको दास । नहिं सिरभार चलावे पास ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- चीज-सार्थक
अर्थ - लोकांनो, ज्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केले, ते चांगले. कारण चांगले
अनेक योनींतून फिरत फिरत सारभूत असा नरदेह प्राप्त झाला आहे या ठिकाणी - १
होते. २ सर्वस्वाचा त्याग करून ज्याने तीर्थव्रते केली, पण देहादी संसाररूपी रोगाची तळमळ
तुकाराम महाराज म्हणतात, जो देह व देहासंबंधी माझे अशी भावना बाळगीत नाही त्याचा
११६४ लाल कमलि ओढे पेनाये । मोसु हरियें कंसे समाये ॥ १ ॥
कहे सखि तुम्हे करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥ २ ॥

नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥ ३ ॥
और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कमली-राबळे, घोंगडी, पेनावे-पांघरून, हिरदा-हृदय, सरम-शर्म, कछु-काही
अर्थ :- हरीने लाल घोंगडी मला पांघरून कसे सुशोभित केले आहे. १ मैत्रीण म्हणते, तू हरीविषयी
आकांत करतेस, पण हरीचे हृदय तुजविषयी कठोर आहे २ हरीच्या ठिकाणी शरम, लज्जा काही नाही आणखीही
तुला सांगते की, त्याला पुष्कळ बायका आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती मैत्रीण आणखी सांगते की,
इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या हरीस नामरूप नाही. असा माझा प्रभू लोणी खात असतो. ४
११६५ राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंव न पाई ॥ १ ॥
कवनका मंदर कवनकी झोपरी । एकरामबिन सब हि फुकरी ॥ २ ॥
कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥ ३ ॥
कहे तुका सब हि चलनार । एकरामविन नहिं वासारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कवनकी-कोणाची
अर्थ :- रामाचे भजन करणे, हीच जगण्याची सफलता आहे. म्हणून हरिभजनास आळस करु नकोस १
कुणाचे घर आणि कुणाची झोपडी; एका रामावाचून सर्व फुकट आहे २ कुणाचा देह व कुणाची ममता ? एका
रामा वाचून सर्व नष्ट होणार आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही नष्ट होणार आहे. एका रामावाचून
काही सार नाही ४
११६६ काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ १ ॥
राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥ २ ॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥ ३ ॥
राना रक डोगरको राई । कहे तुका करे इलाहि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- काल-यम, मिथ्या-खोटा.
अर्थ :- भयंकर घातक अशा धनसपत्तीच्या ठिकाणी तू का गुंतून पडलास ? अरे, बाबा, रामनाम गा, व
ऐक १ राजे आदीकरून लोक हे सर्व तू मजले आहेत असे म्हणतोस, पण जोपर्यंत काळ तुझे प्राण आकर्षण करीत
नाही, तोपर्यंत हे माझे आहे, असे तुझे म्हणणे शोभते. पण प्रसंगी कोणी उपयोगी पडत नाही. २ देहादी प्रपंचही
खोटा असून मनकल्पनेचा आहे, म्हणून त्याचा अभिमान टाक व देवाला भज ३ तुकाराम महाराज म्हणतात,
राजाचा रंक व डोंगराची मोहरी होईल. याकरता काही तरी उपाय कर ४
११६७ काहे रोवे आगले मरना । ग्वार तू भुला आपना ॥ १ ॥
केते मालुम नंहि पडे । नन्हे बडे गये सो ॥ २ ॥
बाप भाई लेका नंहि । पाछें तूं हि चलनार ॥ ३ ॥
काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रोवे-रडतोस, अगले-पुढचे, बाल-केस, सिपत-पांढरे
अर्थ - अरे मूर्खा, पुढचा मेल्याबद्दल तू का रडतोस ? तू आपल्यावर येणाऱ्या मृत्यूस विसरलास काय ? १
किती तरी लहान मोठे मृत्यूच्या मुखी गेले, हे तुला माहीत नाही काय ? २ बाप, भाऊ आदीकरून अनेक मेले;

त्यांची मोजदाद करीत एक दिवस तूही मरणार. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे तुझे काळे केस पांढरे झाले, हे
तुला माहीत असू दे. ४
११९८ दया मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुम्हारा ॥ १ ॥
तनजोवनकी कोन बराई । व्याधपीडादि स काटहि खाई ॥ २ ॥
कीर्त बघारूँ तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥ ३ ॥
कहे तुका नहिं समझत मात । तुम्हारे शरन हे जोडहि हात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- जोवन-यौवन, बराई-मोठेपणा
अर्थ :- माझ्या रामावांचून सारभूत सुख कोणते आहे ? ते मला सांगा, मग मी तुमचा दास होईन १
शरीराच्या ठिकाणी तारुण्याचा, यौवनाचा काय मोठेपणा आहे ? कारण व्याधींचे दुःख त्याला क्षीण करून मारील. २
कीर्ती वाढवावयास जावे तर आपले नाव कुठे आहे ? या खोट्याच्या फेऱ्यात पडून पश्चात्ताप का करून घ्यावा ? ३
तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रकार लोकांना समजत नाही. याकरिता मी तुम्हाला हात जोडून शरण आलो आहे,
याचा तुम्ही विचार करा. ४
११९९ देखत आलौं झुटा कोरा । तो काहे छोरा घरवार ॥ १ ॥
मनसुं किया चाहिये पाज । उपर खाक पसारा ॥ २ ॥
कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥ ३ ॥
कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कोरा-निव्वळ, छोरा-सोडलास, पाज-शुद्ध
अर्थ - डोळ्यांना स्पष्ट दिसत आहे की, तू निव्वळ ढोंगी आहेस, तर घरव्यवहार कशाला टाकलास ? १
प्रथम मन शुद्ध केले पाहिजे. तसे न करता वरवर राख फासणे हा सर्व पसारा आहे २ कामक्रोधादी वृत्तींना
हृदयात आश्रय देणे, हाच संसार आहे. तू मस्तकावर त्याचे ओझे घेतले आहेस. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
ज्याने आपल्या देहाचा समूळ लोभ टाकला आहे, तोच खरा संन्यासी आहे. ४
१२०० रामभजन सब सार मिठाई । हरि संताप जनमदुख राई ॥ १ ॥
दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहिं अंततारे ॥ २ ॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पछतावे ॥ ३ ॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- खटमिठा-आंबटगोड, संताप-त्रिविध ताप
अर्थ :- रामाचे भजन करणे हे सगळ्या गोडाचे सार आहे. हे जन्मदुःख व त्रिविध ताप विशेष नाहीसे
करते. १ दूधभात, तूप, साखर सेवन केल्याने भूकही नाहीशी होत नाही व ते पुरतही नाही. २ खाण्यातच सर्व
युग निघून जाते. नंतर आंबटगोडाच्या रुचीच्या मोहाने पश्चात्ताप होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रामरसाचे
ज्याने सेवन केले, तो मोठ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात केव्हाही सापडणार नाही ४
१२०१ बारबार काहे मरत अभागी । बहुरि गरन संख्या तोरेभागी ॥ १ ॥
ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे बैकुंठ जाम ॥ २ ॥
रामनाम मोल नहिं बेचे कदरि । यो हि सब माया छुरावत झगरी ॥ ३ ॥
कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चालो ॥ ४ ॥