सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४२४ सार्थ तुकारामगाथा
९२६ काय करु कर्माकर्म । धरें सापडले वर्म ॥ १ ॥
होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ २ ॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी सचला ॥ ३ ॥
तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हा ओझें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लेखा-मर्यादा, वेचावेच-जमाखर्च
अर्थ - कर्म व अकर्म याच्या कटकटींची चर्चा मी कशास करू ? मला या विठ्ठलाच्या नामाचे हे वर्म खरे
सापडले आहे १ देवा, तू तुझ्या नामासारखाच कृपाळू व वत्सल होतोस व त्याचप्रमाणे आपल्या भक्ताची
समजूत काढतोस अशी किती जनाची समजूत काढलीस त्याला सीमा नाही २ तुझ्या स्वरूपाविषयीही देवा काही
खर्च वा काही जमा, असे न होता तू जसा आहेस तसाच साचून आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा, माझे
ओझे तुम्ही का मानावे ? ४
९२७ एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥ १ ॥
आम्ही देवा शक्तिहीने । भाकू तेणे करुणा ॥ २ ॥
पावटणी केला काळ । जया बळ होते ते ॥ ३ ॥
तुका म्हणे वीर्यावीर । सतधीर समुद्र ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हातोफळी-हातावर हात मारून ठाया-ईश्वरस्वरूपात पावटणी-पायरी
अर्थ - कित्येक बलवान साधुसत आपल्या हातावर हात देऊन, टाळी वाजवून ईश्वरस्वरूपास प्राप्त झाले
आहेत १ पण देवा, आम्ही मात्र शक्तिहीन असल्याने तुझी करुणाच केवळ भाकू २ ज्या साधुसंताना सामर्थ्य
होते, त्यांनी यमास आपल्या घरी चढून जाण्याच्या पायरीचे स्थान दिले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे
सत म्हणजे धैर्यवान व वीरातील वीर असून धीराचे समुद्रच आहेत ४
९२८ पुढिलांचे इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥ १ ॥
सत गेले तया ठाया । देवराया पावतीं ॥ २ ॥
ज्येष्ठांचीं का आम्हा जोडी । परवडी न लभो ॥ ३ ॥
तुका म्हणे करीं फोड । पुरवीं लाड आमुचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - परवडी-प्रकार
अर्थ - आमच्या पुढे जाऊन साधुसंतानी जे मिळविले, त्याचीच इच्छा मीही करीत आहे पण माझ्या अंगी
तेवढे बळ मात्र नाही १ पण देवराया, यापूर्वीचे साधुसंत जेथे जाऊन पोचले आहेत, ते स्थान मला दाखवा त्या
स्थानावर मला पोचवा २ ज्येष्ठ असणाऱ्या साधुसंतानी भक्तीचे जे जे प्रकार भोगले त्याचा लाभ आम्हांस का
होऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आमचे कोडकौतुक करून लाड पुरवा ना ४
९२९ कैवल्याच्या तुम्हा घरीं । रासी हरी उदंड ॥ १ ॥
मजसाटीं का जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ २ ॥
सर्वो गुणीं सपूरता । ऐसा पिता असोनी ॥ ३ ॥
तुका म्हणे पाडुरंगा । जालो सागा सन्मुख ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कैवल्याच्या-मोक्षाच्या, उदंड-पुष्कळ वाणी-कमतरता
अर्थ - देवा, तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी असतील १ मग मलाच सर्व बाबतीत कमतरता
का हो ? मला त्यांचा वाटा का मिळत नाही ? २ तू सर्व गुणांनी सपूर्ण असून, सर्वांचा पिता असून माझ्या
सार्थ तुकारामगाथा ४२५
धांवतोस अशी उणीव का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुमच्या समोर येऊन उभा आहे, मला
सांगा ना सर्व काही ४
९३० आपल्याला तुम्ही रूपासी समजा । फासया घरजा आरसिया ॥ १ ॥
हे तो नव्हे देहबुद्धीचे कारण । होईल नारायणे दान केले ॥ २ ॥
शत्रूचिया बाणे वर्मासि स्पर्शवे । हे तो नाहीं ठावे मोकलिया ॥ ३ ॥
तुका म्हणे बहु मुरें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फासया-बाय म्हणून, घरजा-त्याग, राग
अर्थ - आपापल्या रूपांना तुम्ही समजून घ्या ना उगाच रागारागाने आरसाच टाकून देण्यात काय अर्थ
आहे ? १ देहबुद्धी निर्माण होऊन नीट शरीर रक्षणाचे समजले म्हणजे गुह्यरूप प्राप्त होते असे नाही नारायणाने
दान दिले तरच रूप आपणास मिळते २ शत्रूच्या बाणामुळे शत्रूच्या वर्मास स्पर्श होतो, पण ते बाण सोडणाऱ्यास
समजत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, बहुमुलानी ही वचने सांगितली तरी सत्याशिवाय त्याना महत्व
नाही ४
९३१ न मनावी चिंता तुम्ही सतजनों । हिरा स्फटिकमणी केवि होय ॥ १ ॥
पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ २ ॥
बहुतासी भय एकाचिया दंडे । बहुत या तोडे वचनासी ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं बैसरी या सर । करायाचे चार वेडे वेडे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - न मनवी-मानू नये करू नये पारिखा-परका, सर-बरोबरी
अर्थ - तुम्ही सत लोकानी कसलीही चिंता करू नये कारण हिऱ्याप्रमाणे लाभलेला हा परमेश्वर स्फटिक-
मण्याप्रमाणे होणार नाही १ जेथे आपण आहोत, त्यानुसारच जो प्रसंग निर्माण झाला आहे काही परका भावही
पाहिला हेही खरे आहे २ एकाला शिक्षा केली की, इतर पुष्कळांना भय वाटू लागते शब्दानाही पुष्कळ वेगवेगळा
अर्थ प्राप्त झालेला असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नाना प्रकारचे वेडेचार करणारी व इतरांची बरोबरी
करणारी अशी माझी वाणी नाही ४
९३२ यथाविधि पूजा करी । सामग्री तोवरि हे नाहीं ॥ १ ॥
आतां माझा सर्व भार । तू दातार घालविसी ॥ २ ॥
मंगळ ते तुम्हीं १ जाणा । नारायणा काय ते ॥ ३ ॥
तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सामग्री-सामग्री
अर्थ - देवा यथाविधीने पूजा करावी अशी काही सामग्री मजजवळ नाही १ परंतु दातारा, माझा सर्व
भार आता तुम्हीच चालवीत आहात २ नारायणा, जे काही पवित्र व मंगल आहे ते तुम्ही जाणीत आहात ३
तुकाराम महाराज म्हणतात देवा हा सब देहभाव मी तुलाच समर्पित केलेला आहे ४
९३३ भवसिंधूचे हे तारू । मज विचारु पाहता ॥ १ ॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ २ ॥
माझ्या खुणा मनापाशी । तें या रसीं बुडाले ॥ ३ ॥
तुका म्हणे वर्म आले । हाता भले हें माझा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - विचारु-विचार करून पाहता
१ आम्ही जाणा
तु गाथा ५४
४२६ सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- मी नीट विचार करून पाहिले, तेव्हा देवा, तुम्ही मला भवसिंधू तरून नेण्याइतके समर्थ असे ताह
आहात हे समजले. १ देवा, तुमचेच पाय मी माझ्या चित्तात धारण करीन गुप्त काय ते तेथेच आहे. २ माझ्या
मनाच्या असलेल्या परमार्थाच्या सर्व खुणा या हरीच्या भक्तिरसात बुडून गेल्या आहेत ३ तुकाराम महाराज
म्हणतात, माझ्या हातात हे मर्म आले; हे फार चांगले झाले आहे ४
९३४ पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥ १ ॥
जिव्हे गोडी तीन अक्षराचा रस । अमृत जयास फिके पुढें ॥ २ ॥
श्रवणींची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद धारोनियां¹ ॥ ३ ॥
महामळें मन होतें जें गांबले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥ ४ ॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सापडलें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - न वजे-जात नाही, गांबले-भरलेले
अर्थ - या श्रीहरीचे मुख पाहताच माझे सुख सुखावले गेले व माझ्या डोळ्याची भूक ही कधी जात नाही
असे झाले. १ विठ्ठल या तीन अक्षराच्या भक्तिरसात गोडी निर्माण झाली असून तिच्यापुढे प्रत्यक्ष अमृतही फिके
पडत आहे २ या श्रीहरीचे गुणगान ऐकण्याची वाटही चांगली शुद्धपणे चोखाळलेली असून सर्व भेदाभेद संपून
गेले आहेत. ३ माझे मन मोठ्या मळामुळे भरलेले होते, ते यामुळे शुद्ध होऊन स्फटिकाप्रमाणे निर्मळ झाले. ४
तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनाचे जीवन असून एका फार मोठ्या मोलाचा साठा मला
सापडला आहे ५
९३५ हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देता ठायी द्वैत तुटे ॥ १ ॥
बोलापासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी बाढे प्रीत प्रेमसुख² ॥ २ ॥
जनात भूषण वैकुंठी सरता । फावले स्वहिता सर्वभावें ॥ ३ ॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पाहयला ॥ ४ ॥
तुका म्हणे हा विठ्ठलचि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - आळंगीन-आलिंगीन, बाहीं-बाहूंनी.
अर्थ :- या परमानंदस्वरूपाच्या श्रीहरीस मी दोन्ही बाहूंनी आलिंगन देईन. त्याला आलिंगन दिल्या-
बरोबर द्वैताचा नाश होतो १ त्याच्याविषयी गोष्टी करण्यातच विशेष आनंद चित्ताला होतो, मन निवून जाते
व प्रेमसुखात दुप्पटीने वाढ होते २ लोकात भूषण वाढून शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते सर्व प्रकारचे स्वहित साधले
जाते ३ सर्व प्रकारचा लौकिक व्यवहार संपतो, मायिक लोकाचार संपून जातो, आणि संसाराविषयीची भावना
समूळ नष्ट होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला याच विठ्ठलाची रात्रंदिवस सोबत हवी; माझ्या जीवास आणखी
दुसरी कसलीही हौस नाही ५
९३६ आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥ १ ॥
प्रेमपान्हा स्तनां सदा सर्वकाळ । दृष्टि हे निमंळ अमृताची ॥ २ ॥
भूक तान दुःख वाटो नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनिया ॥ ३ ॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हा करीं खेळावया ॥ ४ ॥
तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेयें न पवे हात कळिकाळाचा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - दवडी-नाहीसा कर, ठाव-स्थान, सांगात-सोबत.
१ निवारुनि, २ प्रेमसुखें
सार्थ तुकारामगाथा ४२७
अर्थ - देवा, तू आमची कृपाळ अशी माउली आहेस आमची सावलीच असणाऱ्या विठ्ठला, मी तुला
शरण आलेलो आहे १ देवा, तुझ्या स्तनात माझ्यासाठी सदासर्वकाळ प्रेमपान्हा तयार असावा तुझी दृष्टी अमृताची
व निर्मळ अशी मजवर असावी २ देवा, मला भूक, तहान, दुःख, त्रास याचे कष्ट होऊ नयेत तू माझ्या अंतःकरणाचे
गुण जाणून आहेस ३ आशा, चिंता, तृष्णा, माया याना तू दूर घालविले असून, आम्हास तुझ्या स्वरूपात खेळण्या-
साठी स्थान निर्माण केले आहेस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू आम्हाता संताची संगत दे तो अशी दे
की, ज्या ठिकाणी कळीकाळा यमाचाही हात पोचू शकणार नाही ५
९३७ जेथें जावे तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेपें सतसंगें ॥ १ ॥
पूर्व पुण्यें बरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ २ ॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतापायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतापाशीं द्यावा जीव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कपाळ-नशीब, सरिस-बरोबर
अर्थ - ज्या ज्या ठिकाणी जावे, त्या त्या ठिकाणी आपले नशीब आपल्याबरोबर येत असते संताच्या
संगतीने आपल्याला विशेष लाभ होत असतो १ आपल्याला आपली पूर्वपुण्ये जर अनुकूल झाली तर मग या
विठ्ठलाशी किंवा संताशी वियोग होणारे मूळच उत्पन्न होणार नाही. २ संपत्ती, मुलगा, पत्नी हे खरे म्हणजे आपले
भाग्य नव्हे या संताच्या चरणापाशी असलेला निवास चांगला असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, संताचे
पाय हेच आमच्या मिराशीचे ठाणे व्हावे व आमच्या जीवाचा बळी याच संतांच्या पायावर जावा असे वाटते. ४
९३८ आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हेचि दृढ ॥ १ ॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ २ ॥
जोडीन ते आता देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥ ३ ॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणे इहलोका आलो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - तुटे-संपेल, दुस्तर-सांपडण्यास कठिन असा
अर्थ :- आता मी या आयुष्यात इतर काही सोस करणार नाही या विठ्ठलाचे पाय दृढ भावाने चित्तात
धरून ठेवीन १ यामुळे भवसिंधू उतरून जाण्यास मदत होईल संपण्यास कठिन असा गर्भवासही संपेल २ या
आयुष्यात मी आता देवाचे चरण जोडीन, हेच माझे परमार्थविषयक असे अविनाशी धन आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, बरे झाले, हा मनुष्यदेह मला मिळाला आणि याच देहाने मी या लोकी जन्मास आलो ४
९३९ जतन करीन जीवें । शुद्धभावे करुनी ॥ १ ॥
विठ्ठल विठ्ठल हे धन । जीवन अंतकाळींचे ॥ २ ॥
वदळ हे सचित सारू । बरवा करू उदिम हा ॥ ३ ॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं साठवू ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वदळ-वरवरचे
अर्थ - या विठ्ठलाचा ठेवा मी आता जीयाभावाने जपून ठेवीन शुद्ध भावाने मी त्याचे रक्षण करीन १
अंतकाळच्या जीवनाचे मुख्य धन, हे विठ्ठलस्वरूपाचेच आहे २ वरवरचे संचितकर्म जे आहे ते दूर सारून या विठ्ठलाच्या
प्राप्तीचा व्यवहार धन्यापैकी करू ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलास हृदयाच्या पेटीत, या संपुटात
साठवून ठेवू ४
१ पुढें
४२८ सार्थ तुकारामगाथा
९४० एवढा प्रभु भावे । तेणे सपुटीं राहावे ॥ १ ॥
होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ २ ॥
एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥ ३ ॥
आला नावा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सपुटीं-भक्ताच्या हृदयरूपी संपुष्टात, संपुटात
अर्थ - हा प्रभू खरे पाहता केवढा मोठा, पण नवल असे की, तो भक्ताच्या प्रेमासाठी तो त्याच्या
हृदयसंपुटात वास करतो १ याची जशी भक्ती करावी तसा तो प्रसन्न होतो जी इच्छा मनात धरावी ती तो
पुरवितो २ एवढा मोठा हा सर्व जगास दान देणारा ईश्वर, पण भक्ताजवळ केवळ एखादे तुळशीचे पान मागतो
पाण्याचा थेंब मागतो, व तेवढ्याने तो संतुष्ट होतो ३ हा ईश्वर आपल्या भक्तासाठी खरे म्हणजे नावारूपास,
आला व तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व लोकांना अतिशय सुलभ असाही झाला ४
९४१ भाग्यें ऐसी जाली जोडी । आता घडी विसंबेना ॥ १ ॥
विटेवरी समचरण । संतीं खूण सांगितली ॥ २ ॥
अवघें आता काम सारू । हाचि करू कंव्वाड ॥ ३ ॥
तुका म्हणे खंडू खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - विसभेना-गोडणार नाही कँवाड-निश्चयाने
अर्थ - माझे फार मोठे भाग्य, म्हणून या विठ्ठलाची प्राप्ती मला झाली आता याला मी एक क्षणभरही
सोडणार नाही १ संतानी खूण सांगितल्याप्रमाणे विटेवर समचरण असलेल्या या देवाचा लाभ मला झाला २
आता बाकीची सर्व कामे दूर सारून याची जपणूक निश्चयाने करू ३ तुकाराम महाराज म्हणतात, पापपुण्यामुळे
होणाऱ्या या पुढरुपा जन्ममरणाच्या खपा खंडित करू ४
९४२ पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥ १ ॥
सर्वभावे लोभ्या आवडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ॥ २ ॥
तुका म्हणे एकविध जाले मन । विठ्ठला वाचून नेणे दुजें ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - प्रमाण-पूज्य
अर्थ - पतिव्रता स्त्रीस जसा तिचा पती नेहमी पूज्य असतो, त्याप्रमाणे हा नारायण आम्हास अत्यंत प्रिय
आहे १ सर्वांवा लोभ असणाऱ्या माणसास ज्याप्रमाणे धन अतिशय प्रिय असते, त्याप्रमाणे या नारायणाविषयी
आमच्या मनात प्रीती आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, या पाडुरंगचरणी आमचे मन एकरूप झाले असून या
विठ्ठलाशिवाय दुसरे मी काहीही जाणीत नाही ३
९४३ विठ्ठल गीत गांवा विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥ १ ॥
अनाथाचा वधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भयबंधु यमपाश ॥ २ ॥
तोचि शरणागता हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या सतासमागमें ॥ ३ ॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥ ४ ॥
विठ्ठलाचे नाम घेता जाले सुख । गोडावले मुख तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - गोडावले-गोड वाट
अर्थ - या विठ्ठलाचेच नाम गीतामध्ये गावे, याच विठ्ठलाचे ध्यान चित्तामध्ये धरावे विटेवर उभा
असणारा हा विठ्ठल डोळे भरून पाहावा १ हा विठ्ठल अनाथांचा बंधू असून कृपेचा सागर आहे हाच आपल्या
सार्थ तुकारामगाथा ४२९
भक्ताचे भयपाश व यमपाश तोडून टाकतो २ शरण आलेल्या भक्तांना हाच विठ्ठल मुक्तीचे दान देणारा असून
या संतसमागमात हा नेहमीच प्राप्त होतो. ३ हा विठ्ठल म्हणजे गुणाचा साठा असून याच्यामुळेच सर्व सिद्धी प्राप्त
होण्यासारख्या आहेत. या विठ्ठलाच्या नामामुळे समाधीच लागून राहते. ४ विठ्ठलाचे नाम घेताना फारच सुख झाले
असून मुखही गोड झाले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. ५
९४४ विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती ।
न धरी भय चित्तीं । बळ किती तयाचे ॥ १ ॥
लागे आपणचि हातीं । किंव भाकावी काकुलती ।
करीं मग चित्तीं । असेल तें तयाचे ॥ २ ॥
एकलिया भाववळें । कें सांपडे तो काळें ।
वैष्णवांच्या मेळें । उभा ठाके हाकेसी ॥ ३ ॥
बांधा माझिया जीवांसी । तुका म्हणे प्रेमापाशीं ।
न सोडों तयासी । सर्वस्वासी उदार ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गती-मार्ग
अर्थः- हा विठ्ठल हातात सापडण्याचा एक मार्ग सापडलेला आहे. आता त्याची भीती तुम्ही मुळीच
बाळगू नका, त्याची शक्ती अशी कितीशी आहे ? १ त्याच्याजवळ जरा काकुळतीचा भाव व्यक्त केला, की तो
आपण होऊन आपल्या भक्ताच्या हातात येतो. मग तो आपल्या मनात असेल त्याप्रमाणे त्या भक्ताचे करतो. २
एकटघाऱ्याच्या भक्तीच्या बळाने तो कधी तरी कालान्तराने सापडतो; पण वैष्णवांच्या समुदायात मात्र नुसती हाक
मारली तरी तो उभा राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या देवाला माझ्या जीवाशी बांधून टाकावे.
प्रेमपाशाने हृदयाशी बांधल्यावर सर्वविषयी मी उदार असलो तरी याला मात्र सोडणार नाही. ४
९४५ वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कें पां येथें येतीं ।
तया जन्ममरणराती । नाहीं चित्तीं परलोक ॥ १ ॥
धन्यधन्य हरिचे दास । तयां सुलभ गर्भवास ।
ब्रह्मादिक करिती आस । तोर्यावास¹ भेटीची ॥ २ ॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस ।
पाहे रात्रदिवस । वाट कर जोडोनियां ॥ ३ ॥
रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां ॥
मोक्षसायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥ ४ ॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले ।
आणीक ही उध्दरिले । महादोषी चाडाळ ॥ ५ ॥
सकळ करिती त्याची आस । सर्वभावे ते उदास ।
धन्यभाग्य त्यास । तुका म्हणे दहपणे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- कें-केव्हा, छतो-वाळली, सायुज्यता-चतुर्विध मुक्तीमधील एक.
अर्थः- या वैकुंठात भक्त केव्हा येतील ? याविषयी तेथील लोक एकसारखी वाट पाहात असतात. पण
भक्ताना जन्ममरणाची चिंता कधीच नसल्याने त्यांच्या चित्तात परलोकाची अथवा वैकुंठाची इच्छा कधीच नसते १
श्रीहरीचे हे दास धन्य होत. त्यांना गर्भवासाचे दुःख नेहमीच सहजसुलभ वाटते. ब्रह्मादिक देवही यांच्या भेटीची
१ तीर्था वास
४३० सार्थ तुकारामगाथा
इच्छा करीत असतात आणि अनेक तीर्थे यानाच भेटावयास उत्सुक असतात २ याच्याकडून हरिकथेचे श्रवण व्हावे
म्हणून यमधर्मासारखे थोर थोरही याची वाट रात्रंदिवस पाहात असतात हात जोडून ते मार्गप्रतीक्षा करतात ३
रिद्धीसिद्धी या न बोलावता येऊन हरिभक्ताचा शोध घेतात सायुज्यतेची मुक्ती अशा भक्ताची उत्सुकतेने वाट
पाहात असते ४ हे हरिभक्त ज्या ठिकाणी उभे राहतील, त्या ठिकाणी नेहमीच प्रेमसुखात तल्लीन झालेले दिसतील
यानी आपल्या संगतीने अनेक महादोषी व चाडाळ अशा दुर्जनाचाही उद्धार केला आहे ५ तुकाराम महाराज
म्हणतात, सर्वजण याच्याच दर्शनाची इच्छा करितात, पण हे हरिदास मात्र सर्व भावानी उदासच असतात याचे
दर्शन ज्याना होते त्याचे भाग्य धन्य आहे, असेच म्हणावयास हवे ६
९४६ सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठीं विकूं पाहे ॥ १ ॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचे । निवडी दोहोंचे वेगळाले ॥ २ ॥
क्षीरा नीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ ३ ॥
तुका म्हणे थोटा १भागवलाचि खोटा । अपमान मोठा पावेल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पारखी-परीक्षा करणारा, क्षीर-दूध, नीर-पाणी थोटा-खोटा
अर्थ - एखाद्या दागिन्यावर सुवर्णाची चमक असावी, पण पोटात मात्र तांबेच बसविलेले असावे, व खरे
सोने म्हणून तो विकायला जावा १ पण नीट परीक्षा करणारा जो असतो तो त्यातील तांब्यास ओळखतात व
तांबे आणि सोने वेगळे काढून दाखवितात २ दूध व पाणी याचे एक मूल्य कसे होईल ? स्वादामुळे दोन्ही वस्तू
भिन्न भिन्न आहेत असेच ठरेल ३ तुकाराम महाराज म्हणतात असा हा स्वत मोठे असल्याचा अभिमान खोटाच
आहे त्यामुळे अपमान मात्र होण्याचा संभव फार असतो ४
९४७ फोडुनि सांगडी बाधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजी ॥ १ ॥
आपला घात आपणचि करी । आणिका सागता नाइके तरी ॥ २ ॥
भुकेभेणे विष घेऊ पाहे आता । आपल्याचि घाता करू पाहे ॥ ३ ॥
तुका म्हणे एक चालतील पुढे । तयासी वाकडे जाता ठके ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सागडी-नदी तरून जाण्याचे साधन, माजासी-कमरेला भुकेभेणे-भुकेच्या भीतीने
अर्थ - नदीचे पाणी तरून जाण्याचे भोपळ्यासारखे साधन जर फोडून ते कमरेस बाधले तर मग तो
सहजासहजी पैलतीरास कसा पोचणार ? १ तो मनुष्य आपला घात आपणच करून घेतो दुसऱ्याने सागितले तरी
ऐकत नाही २ भूक लागली या भीतीने भूक भागविण्यासाठी कुणी जर विष खाल्ले तर मग काय होईल ?
आपलाच घात आपण केल्याप्रमाणे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वांपासून जे योग्य मार्गाने पुढे चालले
आहेत, त्याच्याच मार्गाने आपणही जावे त्याच्याहून वेगळ्या मार्गाने जाताच फसल्यासारखे होईल ४
९४८ उपकारासाठीं बोलों हे उपाय । येणेविण काय आम्हा चाड ॥ १ ॥
बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि ॥ २ ॥
तुका म्हणे माझे देखतील डोळे । भोग देते वेळे येईल कळो ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - चाड-गरज
अर्थ - हे परमार्थसाधनाचे उपाय मी केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी बोलत आहे नाही तर
याविना माझे काय अडले आहे ? हे सांगण्याची गरज मला काय आहे ? १ परंतु हे अज्ञ लोक अज्ञानात बुडून
चालले आहेत त्यांचे दुःख डोळ्यानी बघवत नाही याचा कळवळा माझ्या मनात फार येतो २ या संसारी लोकांना
भोग भोगण्याची पाळी येईल तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, यांच्या दुःखाने आमचेच डोळे यांच्याकडे करुणेने
पाहतील ३
१ आपण
विवरणः- स्वकर्म निष्काम झाल्यावर, स्वतः ईश्वरभेटीने तृप्त झाल्यावर, जीवशिवाच्या, आत्मा-
परमात्म्याच्या ऐक्याची प्रचीती आल्यावर साधुसंत कशासाठी या जगांत वावरतात? या एका प्रश्नाचे स्पष्ट उत्तर
तुकाराम महाराजांनी या एका महत्त्वाच्या अभंगात दिलेले आहे. सर्व जगत् हे एका बीजाचा विस्तार असल्याने
व एकच आत्मतत्त्व सर्व भूतमात्रांत भरून असल्यामुळे, ब्रह्मभाव अथवा साक्षात्काराची भावना ही कधी एकाच
व्यक्तींत सीमित होऊन राहात नाही. ती साऱ्या विश्वाला कवळण्यास सिद्ध होते. अज्ञानाने कष्टी बहुरी होणाऱ्या
मानवांचे अश्रू पुसायला ती उत्सुक होते. ज्ञानेश्वरांपासून तुकारामरामदासांपर्यंत सर्व संतांनी आपल्या या कार्याने
॰॰ नष्ट केले आहे. धर्माच्या पालनासाठी व पाखांडखंडनासाठी आपण हातात शब्दाचे तीक्ष्ण बाण धरून हिंडत
आहोत, असे तुकोबांनी एका अभंगात म्हटले आहे. जे रंजले-गांजलेले आहेत, त्यांना जवळ करणे हाच साधुसंतांच्या
देवत्वाचा मुख्य धर्म आहे, असेही तुकारामबुवा सांगतात. अशा या दुःखी, कष्टी लोकांचा कळवळा या माणुसकांना
मोठाच असतो. सर्व भूतमात्रांत पसरून राहिलेला ईश्वरी अंश दुःखित झालेला त्यांना पाहावत नाही. ‘चित्तेनें कर
फाटतो’ या शब्दांत अस्ताव्यस्त झालेल्या समाजाच्या दुःखाचे स्वरूप रामदासांनी व्यक्त केले आहे.
९४९ आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥ १ ॥
होईं बा जागा होईं बा जागा । वाउगा कां गा सिणसीस ॥ २ ॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसिन ना ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपाव-उपाय, येर-दुसरा, वाव-व्यर्थ, जाणिवेच्या-ज्ञानाच्या
अर्थ :- ज्यामुळे ईश्वराची आठवण होईल, तो उपाय आपण करावा. इतर सर्व व्यर्थ असणारा खटाटोप
टाकून द्यावा. १ अरे बाबा, माणसा, तू नीट जागे व्हावेस. उगाच का शिणतोस ? कष्टी होतोस ? २ ज्ञानाच्या
व्यर्थ ओझ्याने तू या संसारसागरात बुडशील मात्र; मग त्यातून सुखरूपपणे बाहेर पडणे, कधी होणार नाही. ३
तुकाराम महाराज म्हणतात, तू एका भावभक्तीच्या बळावरच ईश्वरास प्राप्त करून घेशील. केवळ ज्ञानाने तुला
सर्व काही समजेल असे नाही. ४
९५० माझ्या मुखावाटा नयो¹ हें वचन । व्हावें हें संतान द्रव्य कोणां ॥ १ ॥
फुBuffer/फुकाचा² विभाग पतनदुःखासी । दोहोंमुळे त्यासी तेंचि साधे³ ॥ २ ॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानीं । सादर या मनीं होऊनियां ॥ ३ ॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळे । आशामोहाजाळें गुंतलिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- संतान-मूलबाळ.
अर्थ :- कुणाला मूलबाळ व्हावे, कुणाला संतती प्राप्त व्हावी, असे शब्द माझ्या मुखावाटे कधी निघू नयेत. १
कारण या दोन गोष्टींमुळे फुकट दुःखाचा व पतनाचा वाटा मात्र प्राप्त होतो. २ माझ्या कानांनी कुणाची निंदा-
स्तुती ऐकू नये व मनाने या मार्गास, म्हणजे निंदास्तुतीच्या मार्गास कधीही लागू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
आशा व नाना मोह यांच्या जाळघांत सापडल्यानंतर देव मात्र अप्राप्य होतो. ४
९५१ चित्त ग्वाही तेथे लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥ १ ॥
मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक⁴ हा देव अंतर्वाही ॥ २ ॥
शुद्ध भावा न लगे सुचाया परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥ ३ ॥
भोगित्यासी काज अंतरींचें गोड । बाहिरल्या घाड नाहीं रंगें ॥ ४ ॥
तुका म्हणे भाव शुध्द हें कारण । भेटे नारायण होईल त्यांचा ॥ ५ ॥
१ नये, २ सुखाचा, ३ साध्य, ४ व्यापला.
४३२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण
अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे, त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित
आपणच पाहावे १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे, असा जो मनाचा भाव होत असतो,
तोच खरा मानाबपास हृदा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सांगावा लागत नाही तो दुसऱ्याच्या
ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोडीशी कारण असते,
बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे
म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५
९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥
काहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥
ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा
अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १
याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची
खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा
जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४
९५३ वासनेच्या मुखीं अदळोनि भीतें । निर्वाहापुरतें कारण ते ॥ १ ॥
या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥
सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥ ३ ॥
तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अंग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भीतें-भिऊन, कारण-कार्य
अर्थ - नाना वासनांना भिऊन, त्याची भीती बाळगून, त्याच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच
कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म-
तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण
ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४
९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवाये ॥ १ ॥
अबोल्याचा काळ आता ऐशापरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥
करू आला तो तो केला उपलाहो । उरोच संदेहो दिला नाहीं ॥ ३ ॥
तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी
अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती
काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली
आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा, तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या
मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक
गोष्टी विषयांचा मोह काही संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करावा या मार्गास येण्याचे निश्चित
केले ४
सार्थ तुकारामगाथा ४३३
९५५ निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकी भिन्न भेद घडे ॥ १ ॥
तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेंचि वरी जेथें तेथें ॥ २ ॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥
तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही.
अर्थ :- या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्याने
परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून
यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर
उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनानी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या-
प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४
९५६ तुजच पासाव जालोंसों निर्माण । असावे तें भिन्न कासयानें ॥ १ ॥
पाहाया जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥
ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पासाव-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा
अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो
हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या
ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलो आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे फक्त अकर्ता बनलो आहे ४
विवरण -एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व चराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त
भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुख्यपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते, पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी
त्यालाच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व
सृष्टीचा चराचर संसार आवागम आला एकाच अव्यक्तापासून हे सर्व गुणरूपीधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या
ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे " अव्यक्त प्रकृती हे याचे बीज, बुद्धी हे झाड,
अहंकार हा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोध्या, पचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर
डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलांनी व शुभाशुभ फळांनी नेहमी समृद्ध असता सर्व प्राणिमात्रांना
आधारभूत होतो " असे याचे वर्णन आढळते ज्ञानेश्वरी ग्रंथापासून या प्रतिमेचे वर्णन करताना या मूलभूत बीजा-
तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतास वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे
व गीता यांतील अश्वत्थ वृक्ष होय.
परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव याचे हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतानी
मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा कित्येक वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहोत, पापी आहोत,
संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहोत व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा साऱ्या ध्यास सर्वांना
असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन, मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवते ? हे पाप आले कोठून ?
दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही गाबडे घातलेले दिसते संत गोरोबांनी
विठ्ठलाचे अभंग लिहिले आहेत, त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर
देवा, तुम्हीही प्रकृती रूपासावयाच हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत योगिनील सर्व
तु. गाथा. ५५
४३२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण
अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित
आपणच पाहाये १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे असा जो मनाचा भाव होत असतो,
तोच खरा मानावयास हवा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सागावा लागत नाही तो दुसऱ्याच्या
ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोष्टीशी कारण असते,
बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे
म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५
९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥
कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥
ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा
अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १
याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची
खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा
जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४
९५३ वासनेच्या मुखीं अदळुनि भीतें । निर्वाहापुरते कारण ते ॥ १ ॥
या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥
सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकी सादर आत्मत्याचे ॥ ३ ॥
तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भीतें-भिजून, कारण-काय
अर्थ - नाना वासनांना भिजून, त्याची भीती बाळगून, त्यांच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच
कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म
तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण
ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४
९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवावे ॥ १ ॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥
करूं आला तो तो केला लवलाहो । उरोच संदेहो दिला नाही ॥ ३ ॥
तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग झाला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी
अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती
काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली
आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या
मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक
गोष्टी विषयींचा मोह कधी संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करू या मार्गास येण्याचे निश्चित
केले ४
सार्थ तुकारामगाथा ४३३
९५५ निर्गुणाचे द्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥ १ ॥
तुम्हां आम्हा आता न पडे यावरी । आहों तेंचि बरी जेथें तेथें ॥ २ ॥
आपणापासुनी नसावे अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥
तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही
अर्थ - या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्यामुळे
परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून
यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर
उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनांनी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या-
प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४
९५६ तुजच पासाय जालोसो निर्माण । असावे तें भिन्न कासयाने ॥ १ ॥
पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥
ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करुनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां बोलतसे स्पष्ट । जालो क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पासाय-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा
अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो
हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या
ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलेले आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे करुन अकर्ता बनलो आहे ४
विवरण - एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व सचराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त
भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुखपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी
त्यासच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व
सृष्टीचा चराचर संसार आकारास आला एकाच अव्यक्तातपासून हे सर्व गुणरूपधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या
ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे "अव्यक्त प्रकृती हे याचे बीज बुद्धी हे खोड,
अहंकार हा मुख्य पल्लव मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोल्या, पंचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर
डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलानी व शुभाशुभ फलानी नेहमी समृद्ध असतो सर्व प्राणिमात्रांना
आधारभूत होतो' असे याचे वर्णन आढळते ऋग्वेदादी ग्रंथापासून या प्रक्रियेचे वर्णन करताना या मूलभूत वीजा-
तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतरूप वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे
व गीता यातील अश्वत्थ वृक्ष हाय.
परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव यात हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतांनी
मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा रित्या वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहात, पापी आहोत,
संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहात व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा सारखा ध्यास सर्वांना
असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवने ? हे पाप आले कोठून ?
दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही मातले घातलेले दिसतात संत चोखामेळानी
विटाळाचे अभंग लिहिले आहेत त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर
देवा, तुझीही प्रवृत्ती तपासावयास हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत बीजातील सर्व
तु गाथा .५५
४३४ | सार्थ तुकारामगाथा
गुणदोष वृक्षाच्या फुलाफळांत येतात ना ? मग याचा दोष वृक्षाकडे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा निष्कर्ष
असा की, आम्ही सर्व देवा, तुझ्यापासून निर्माण झालेलो असल्यामुळे तुमच्या-आमच्यात भिन्नता नसावी तुकोबांची
शिष्या बहिणाबाई हिने तर एका अभंगात या भूमिकेवरून विठ्ठलास विचारिले आहे, ' ' तुम्ही आम्ही मुलें होतौं एके
ठायीं । कोणते अन्यायीं सापडलों ॥ तुझ्याचि हिताने वाढला संसार । आम्हो का रे दूर उतरलों ? " तुझ्याच इच्छेने
हा संसार वाढला, मग तू स्वतंत्र, शुद्ध, मुक्त व भी मात्र बद्ध, पतित कसा ? असा हा प्रश्न आहे
सर्व चराचर जगत व अव्यक्त ब्रह्मतत्त्व यांच्या या विक्षेप नात्यावर आधारलेला हा भक्तीचा विकास
मराठी संतानी अतिशय गोड व लडिवाळ स्वरूपात रगविला आहे या त्याच्या सुखविलासास तत्त्वज्ञानाचे पाठबळ
आहेच 'मया ततमिद सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि' मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सर्व जग
विस्तारलेले आहे व माझ्या ठिकाणी ही सर्व भूते आहेत अशा अर्थाच्या गीतेतील श्लोकावर भाष्य करिताना
ज्ञानेश्वरांनी अतिशय बहार करून आत्मा व परमात्मा, जीव व शिव, ईश्वर व भक्त याचा एकत्वाचा सवद्य वर्णन
केलेला आहे त्यांनी अनेक गरवा व समर्पक दृष्टान्त देऊन म्हटले आहे की, 'माझेया विस्तारलेपणा नावे । हें अशेष
नोहे आघवें ? । जैसे दूध मुराले स्वभावें । तरि तेंचि दही ॥ का बीजचि जाहले तरू । अथवा भांगराचि अलंकार ।
तैसा मज एकाचा विस्तारु । तें हे जग ॥ "
९५७ प्रीतिभग माझा केला पाडुरंगा । भक्तिरस सागा का जी तुम्हीं ॥ १ ॥
म्हणउनि काही न ठेवीं चि उरो । आलो वर्मावरी एकाएकीं ॥ २ ॥
न देखोचि काही परती माघारी । उरली ते उरी नाही मुळीं ॥ ३ ॥
तुका म्हणे आला अंतरासी खड । तरि माझें तोड खवळिले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उरी-कमतरता, वर्मावरी-सूक्ष्म मुद्यावर अंतरासी-सवघास
अर्थ - पांडुरंगा, या भक्तिरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रीतीचा भग केला आहे ना ? १ म्हणूनच
मी आता कसलीच कमतरता न ठेवता, मी सूक्ष्म मुद्द्यावर येऊन तुमची वर्मे काढणार आहे २ तुमच्यापासून काही
माघारे परतून येईल, असे मी पाहणारच नाही काही कमतरताही उरू देणार नाही ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुमच्या-आमच्या सवघास असा हा खड पडला तर माझे तोंड मात्र खवळून जाईल ४
९५८ लटिका ऐसा म्हणता देव । सदेहसा वाटतसे ॥ १ ॥
ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ २ ॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायी चपळत्वे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लटिका-खोटा, मोळा-रीत, भेंडोळा-गुंडाळे, ताळो-ताळमेळ
अर्थ - हा देव खोटाच आहे की काय, असा संशय माझ्या मनात आलेला आहे १ याची सेवा करता
करता हाच अनुभव मला आलेला आहे २ तुम्ही देवा, शून्याकारी आहात, व तसेच असण्याची तुमची रीत आहे;
असा तुमच्या कीर्तीचा डका सर्वत्र गर्जत आहे तुमच्या कीर्तीचे हे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असूनही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ बसत नाही ४
९५९ जंशासाठीं तैसे हाये । हे बरवे कळलेसे ॥ १ ॥
उदास' तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥
ठका महाठक जोडा । जो धडपुडा लागासी ॥ ३ ॥
एकागीच भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वे ॥ ४ ॥
१ उदार
शब्दार्थ व टीपा :- वरवें-चांगले, धडकूडा-धडधडीत, प्रत्यक्ष
अर्थ:- जो जसा असेल तसे आपण व्हावे, हे आम्हांस चांगले समजून आले आहे. १ नारायणा, तू जर
उदास असशील, तर मीही तसाच उदास झालो आहे २ एका ठकास दुसरा महाठक भेटला, तसा तुमचा व आमचा
प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी एकाकी होऊनच माझा जीव दिनधोक असल्याने
या देवापाशी असा भांडत आहे. ४
९६० बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न घराच ॥ १ ॥
आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ २ ॥
तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥ ३ ॥
तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव
अर्थ :- देवा, मी तुमच्यासाठी अनेक प्रकारांनी काकुळतीस आलो आहे; पण तुम्ही मात्र यासंबंधी तुमच्या
चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. १ मग देवा, आता कशासाठी खोटो हाव मी माझ्या मनात वागवू ? २
देवा, तुमच्याआमच्यांत ताटातुटी झाली आहे. आता तुमच्यात व आमच्यात भेट होणार, ती केवळ तुमच्याविषयोच्या
चिंतनानेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिणे मनातील इच्छेमुळे मोठे लाजिरवाणे झाले आहे. ४
९६१ आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥ १ ॥
मढचापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मढघापाशी-प्रेताजवळ ?
अर्थ :- एक आश्चर्याची गोष्ट घडलेली माझ्या मनात आलेली आहे. १ प्रेतापाशी बसून त्याच्या नाते-
वाईकांनी केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तसेच मी आजवर देवा, तुमचेपाशी करुणा भाकली तो फुकट गेली. २
एखादे खोटे कृत्य पाहून मग राग कसा येऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्या शब्दांना हा
कसला शोध लागला ? ४
९६२ मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥ १ ॥
लटकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥
हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सफळांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येयें देवा काशाची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संकोचों-संकोच धरू
अर्थ :- मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरावा ? १
कुठल्याही खोट्या गोष्टीची मी स्तुती करणार नाही; कारण माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. २ जे हिशेबाने
येईल त्याचा स्वीकार करावा, हे तर सर्वांनाच समजते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या ठिकाणी कसली
स्वामीसेवा आहे ? ४
९६३ पाठवणें १ पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥ १ ॥
घडलें तें भेटीसीवें । दिसेल बरवें सफळां ॥ २ ॥
१ पाटवणे.
४३४ सार्थ तुकारामगाथा
गुणदोष वृक्षाच्या फुलाफळात येतात ना ? मग याचा दाप कुणाकडे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा निष्कर्ष
असा की, आम्ही सर्व दवा, तुझ्यापासून निर्माण झालो असल्यामुळे तुमच्या-आमच्यात भिन्नता नसावी तुकावाची
शिष्या बहिणाबाई हिने तर एका अभंगात या भूमिकेवरून विठ्ठलास विचारिले आह,' तुम्ही आम्ही सुखें होतो एके
ठायीं । कोणते अन्यायीं सांपडलों ॥ तुझ्याचि हिताने वाढला संसार । आम्ही का रे दूर अन्तरलों ?" तुझ्याच इच्छेन
हा संसार वाढला, मग तू स्वतंत्र, शुद्ध, मुक्त व मी मात्र बद्ध, पतित कसा ? असा हा प्रश्न आहे
सर्व चराचर जगत व अव्यक्त ब्रह्मतत्त्व यांच्या या विशेष नात्यावर आधारला हा भक्तीचा विकास
मराठी संतानी अतिशय गोड व लडिवाळ स्वरूपात रंगविला आह या त्याच्या मुत्सद्देपणास तत्त्वज्ञानाचे पाठबळ
आहेच ' मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि ' मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सब जग
विस्तारलेले आहे व माझ्या ठिकाणी ही सर्व भूते आहेत अशा अर्थाच्या गीतेतील श्लोकावर भाष्य करिताना
ज्ञानेश्वरानी अतिशय वहार करून आत्मा व परमात्मा, जीव व शिव, ईश्वर व भक्त याचा एकत्वाचा संबंध वणन
केलेला आहे त्यांनी अनेक सरस व समर्पक दृष्टान्त देऊन म्हटले आहे की, माझेया विस्तारलेपणा भावे । हे जगचि
नोहे आघवे ? । जैसे दूध मुराले स्वभावे । तरि तेंचि दहीं ॥ का योजचि जाहले तरू । अथवा भांगराचि अलंकारु ।
तैसा मज एकाचा विस्तारु । ते हे जग ॥ '
९५७ प्रीतिभंग माझा केला पाडुरंगा। भवितरस सांगा का जो तुम्हीं ॥ १ ॥
म्हणऊनि काही न ठेवींचि उरो । आलो वर्मावरी एकाएकीं ॥ २ ॥
न देखोचि काहीं परती माघारी । उरली ते उरी नाही मुळीं ॥ ३ ॥
तुका म्हणे आला अंतरासी खड । तरि माझें तोड खचळिले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उरी-कमतरता, वर्मावरी-सूक्ष्म मुद्यावर अंतरासी-संबंधास
अर्थ - पांडुरंगा या भवितरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रीतीचा भग केला आहे ना ? १ म्हणूनच
मी आता कसलीच कमतरता न ठेवता, मी सूक्ष्म मुद्यावर येऊन तुमची वर्म काढणार आहे २ तुमच्यापासून काही
माघारे परतून येईल, असे मी पाहणारच नाही काही कमतरताही उरू देणार नाही ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुमच्या-आमच्या संबंधास असा हा खड पडला तर माझे तोंड मात्र लबळून जाईल ४
९५८ लटिका ऐसा म्हणता देव । संदेहसा वाटतसे ॥ १ ॥
ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ २ ॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायी चपळत्वे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लटिका-खोटा मोळा-रीत भेंडोळा-गुंडाळ ताळी-ताळमेळ
अर्थ - हा देव खोटाच आहे की काय, असा संशय माझ्या मनात आलेला आहे १ याची सेवा करता
करता हाच अनुभव मला आलेला आहे २ तुम्ही देवा, शून्याकारी आहात, व तसेच असण्याची तुमची रीत आहे,
असा तुमच्या कीर्तीचा डंका सर्वत्र गर्जत आहे तुमच्या कीर्तीचे हे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असूनही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ बसत नाही ४
९५९ जेंशासाठीं तैंसे हवे । हे बरवे कळलेसे ॥ १ ॥
उदास¹ तू नारायणा । भी ही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥
ठका महाठक जोडा । जो धडपुडा लागासी ॥ ३ ॥
एकागींच भाडे तुका । नाहीं धोका जीवित्वे ॥ ४ ॥
१ उदार
सार्थ तुकारामगाथा ४३५
शब्दार्थ व टीपा :- बरवें-चांगले, घडफुडा-धडधडीत, प्रत्यक्ष.
अर्थ :- जो जसा असेल तसे आपण व्हावे, हे आम्हांस चांगले समजून आले आहे. १ नारायणा, तू जर
उदास असशील, तर मीही तसाच उदास झालो आहे २ एका ठकास दुसरा महाठक भेटला, तसा तुमचा व आमचा
प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी एकाकी होऊनच माझा जीव बिनधोक असल्याने
या देवापाशी असा भांडत आहे. ४
९६० बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न घराच ॥ १ ॥
आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ २ ॥
तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चितनें ॥ ३ ॥
तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव
अर्थ :- देवा, मी तुमच्यासाठी अनेक प्रकारांनी काकुळतीस आलो आहे; पण तुम्ही मात्र यासंबंधी तुमच्या
चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. १ मग देवा, आता कशासाठी खोटी हाव मी माझ्या मनात बाळगू ? २
देवा, तुमच्याआमच्यांत ताटातुटी झाले आहे. आता तुमच्यात व आमच्यात भेट होणार, ती केवळ तुमच्याविषयीच्या
चिंतनानेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिणे मनातील इच्छेमुळे मोठे लाजिरवाणे झाले आहे. ४
९६१ आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥ १ ॥
मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मढ्यापाशी-प्रेताजवळ
अर्थ :- एक आश्चर्याची गोष्ट घडलेली माझ्या मनात आलेली आहे. १ प्रेतापाशी बसून त्याच्या नाते-
वाईकांनी केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तशीच मी आजवर देवा, तुमचेपाशी करुणा भाकली ती फुकट गेली. २
एखाद्याचे खोटे कृत्य पाहून मग राग कसा येऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्या शब्दांना हा
कसला शोध लावला ? ४
९६२ मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥ १ ॥
'लटफियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥
हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संकोचो-संकोच धरू
अर्थ :- मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरावा ? १
कुठल्याही खोट्या गोष्टीची मी स्तुती करणार नाही; कारण माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. २ जे हिशेबाने
येईल त्याचा स्वीकार करावा, हे तर सर्वांनाच समजते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या ठिकाणी कसली
स्वामीसेवा आहे ? ४
९६३ पाठवणें' पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥ १ ॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सफळां ॥ २ ॥
१ पाटवणे.
४३६ सार्थ तुकारामगाथा
न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥ ३ ॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका १ साक्षीतें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पाठवणें-पायरीला.
अर्थ :- देवाच्या देवळाच्या पायरीला नुसता स्पर्श करून, नमस्कार करून काय उपयोग ? त्याने उद्धार
कसा होणार ? १ प्रत्यक्ष भेटीत जे सुख उभे राहील, तेच सर्वात चांगले शोभून दिसणारे आहे. २ जर एकमेकांची
दृष्टादृष्टच झाली नाही, तर मग सर्व गोष्टी वरवरच्याच, कोरडयाच राहतात ३ तुकाराम महाराज म्हणतात,
यासाठीच मी अबोल झालो असून अंतःकरणात त्याच्या साक्षीने मौन धारण केले आहे. ४
९६४ अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥ १ ॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ २ ॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥ ३ ॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलेंसे प्रेम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अचळ-स्थिर, न चळणारे.
अर्थ :- निर्भय असणारे असे हे एकच स्थान म्हणजे, या विठ्ठलाचे चरण होत १ म्हणूनच मी याचा
विश्वास धरून याच्या पायांचा दास होऊन राहिलो आहे. २ या श्रीहरीच्या पायांची गोडी मला लागली, म्हणूनच
माझी आवड पूर्ण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठात या श्रीहरीचे नाम असून अंगात
रोमारोमी या श्रीहरीचे प्रेम भरून राहिले आहे ४
९६५ संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥ १ ॥
आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ २ ॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥ ३ ॥
तुका म्हणे कसां निवडा जी खरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संदेह-संशय, निरसे-दूर होईल, फिक्यासी-रुचीहीन, फिके असणाऱ्यास, फटवूं-
फसवू, आळीपायीं-पायापाशी हट्ट
अर्थ :- सर्व संशयाचे निरसन झाले, ते दूर झाले तरच चांगले रुचकर असते. जे फिके व रुचिहीन असते,
त्याविषयी कुणासही आदर वाटत नाही कुणालाही ते आवडतही नाही. १ देवा, आता मला खोटी आशा दाखवून
उगाच फसवू नका मी आता तुमच्याकडे वारंवार कुठे ये-जा करू ? २ आता तुमच्या लाभावाचून माझा जीव
जरी गेला तरी काय संकट ओढवणार आहे ? मी वाचून तरी काय मोठे कार्य साधले जाणार आहे ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, आम्ही पोरांनी आपल्या पायांशी हट्ट केला आहे, तो तुम्ही नीट कसास लावून पुरवावा, आमची
निवड नीट करावी ४
९६६ वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचाचि वाहो बहुतेक ॥ १ ॥
आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलागा काळ जितितसे ॥ २ ॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥ ३ ॥
तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें खरें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहो-प्रवाह, निश्चळ-स्वस्थ
अर्थ :- वाणीने वृथा बडबड पुष्कळ करण्यासारखी आहे; पण त्याप्रमाणे अनुभव मात्र दुर्लभ आहे. बहुतेक
ठिकाणी आधीची जी चाल असेल, तिचाच मागोवा घेत जाण्याची रीत असते. १ अशा परिस्थितीत आम्ही स्वस्थ
१ एका.
सार्थ तुकारामगाथा ४३७
इसे राहावे ? कारण आमच्या पाठीमागे एकसारखा काळ लागलेला आहे. तो आम्हास जिंकू पाहात आहे. २
केवळ पोट भरण्यासाठी परमार्थाचे व भक्तीचे ढोंग करून कसे चालेल ? त्यायोगे मूळ मुद्दलासच तोटा येईल ना. ३
तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुमच्या अभय अशा वरदहस्ताने मी माझ्या मनास जागृत ठेवणे हेच चांगले
होय. ४
१६७ उगॅचि हे मन राहाते निश्चळ । तरि कां तळमळ साट' होती ॥ १ ॥
काय तुमचीं नेणो कवतुक विदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ २ ॥
नानाछंदें आम्हां नाचयावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साट-एकसारखी, विदाने-कौशल्ये
अर्थ :- माझे मन उगेच राहून स्थिर होत असूनही मग ही तळमळ एकसारखी का होत आहे हो ? १
तुमची कौशल्ये काय व कशी आहेत, हे काही ध्यानात येत नाही तुम्ही सर्वोत्तमपणाने क्रीडा करीत असता २ देवा,
तुम्ही नाना छंद करून आम्हा जीवांना नाना प्रकारांनी नाचविता, आमच्या हावा भलत्यासलत्या वाढविता. ३
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या चेष्टा करीत आहात. ४
१६८ आम्ही बळकट जालो फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥ १ ॥
जाले तेव्हां जाले मागील ते मागें । आतां धर्मलागे ठावो जालीं ॥ २ ॥
तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध युद्ध व्हावें ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- फिराउनी-फिरून, गोऊ-गुंतवू
अर्थ - देवा, आम्ही फिरून आता मोठे बळकट झालो आहोत. आम्हांस सांभाळण्याचे किंवा आमच्यावर
कृपा करण्याचे जे ब्रीद तुम्ही घेतले आहे, त्यात तुम्हास गुंतवून टाकू १ यापूर्वी काय झाले असेल ते असो, आता
मात्र तुला पकडण्याची सर्व धर्मे आम्हास माहीत झाली आहेत २ देवा, तुझ्या सर्व चेष्टाचा सबंध तोडण्यासाठीच
आम्ही शुद्ध भावाने तत्पर झालेले आहोत. तुम्हीही आमच्यासारख्या शुद्धापाशी शुद्धयुद्ध व्हावे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आम्हास आत्मस्वरूपात येण्याची जशी सोय आहे, तशीच ती तुम्हासही असेलच ४
१६९ तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसे ॥ १ ॥
कासया घातला लावणी उद्धार । ठेवा करकर बाह्यनियां ॥ २ ॥
सुटो नये ऐसे कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवूनि ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही समाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, नुपेक्षाल-अव्हेर करणार नाही, करकर-कटकट, बाह्यनियां-दूर करून,
निरुतें-खरोखर, केवा-पर्वा, फिकीर, अवघड
अर्थ:- देवा, तुम्ही माझा अव्हेर कधीही करणार नाही, अशीच खात्री मला आहे मला तुम्ही, फार अधीर
आहे मी, असेच समजता. १ देवा, माझ्या उद्धाराची गोष्ट एवढ्या लावणीवर का हो टाकली आहे ? एकदा
उद्धार करून ही कटकट कायमची मिटवा ना. २ खरोखर ही कटकट काही मागची सुटणार नाही, असे तुम्हांस
कळते तर मग पुनः पुनः अशी आळवणी करून का घेता हो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मोठे
भाग्यवान आहात, तुम्हांला माझ्यासारख्याच्या उद्धाराचे एवढे अवघड का वाटावे ? ४
१ साठ.
४३८ सार्थ तुकारामगाथा
९७० तुम्हा होईल देवा पडिला विसर । आम्हीं ते उत्तर यत्न केलें ॥ १ ॥
पतितपावन ब्रीद मिरविसी । याचा काय देसी झाडा साग ॥ २ ॥
आहाच मी नव्हें अर्थाचे भुकेले । नलत्या एका बोले वारेन त्या ॥ ३ ॥
तुका म्हणे देह देईन साडणे । सहित अभिमाने ओवाळूनि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - झाडा-हिशेब, अर्थाचे-सपत्तीचा वारेन-दूर करता येईल
अर्थ - देवा, आमचा विसरच तुम्हास पडलेला दिसतो आम्ही तर उद्धारासाठी एकसारखी बडबड
तुमच्यासमोर केलेली आहे १ पतितपावन असे ब्रीद देवा, तू मिरवितोस, मग माझा जर उद्धार केला नाहीस, तर
या ब्रीदाचा हिशेब कसा देशील ? २ उगाच मी आपला काही सपत्तीचा भुकेलेला नाही तुम्हास भलत्या सलत्या
बोलाने मला दूर करता येईल असे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देह मी सर्व अभिमानासहित
तुमच्यावरून ओवाळून टाकीन ४
९७१ जडलो अगाअंगीं । मग ठेवी प्रसगो । कांहीं उरीजोगी । लोकी आहे पुरती ॥ १ ॥
ठेवी निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सापडली संधी । मग बळ कोणासी ॥ २ ॥
गळा बाधेन पायीं । हालो नेदी ठायिचा ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥ ३ ॥
तुका म्हणे ठावे । तुम्ही' असा जी वरचे । वोभाटाची सवे । मुळीहुनी विठोबा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उरीजोगी-शिल्लक राहील असा सवे-सवय
अर्थ - देवा, मी तुमच्या अंगाला येऊनच जडलो आहे अशा या प्रसंगी तुमचा मोठेपणा शिल्लक राहील,
असा काही मी ठेवणार नाही तुमचा व आमचा सबध कसा आहे याविषयीची कीर्ती लोकात पूर्णपणे आहेच १
आमच्या बुद्धीने अजून धीर धरला आहे, तोपर्यंतच देवा, तुम्ही पूर्णपणे विचार करा मग सधी सापडल्यावर आम्ही
तुला धरून ठेवले तर, बळ कुणाचे मोठे आहे हे ध्यानात येईल २ अशा वेळी माझा गळा आपल्या पायाशी बाधेन,
मग तुम्हाला जाग्यावरून काही हालता यायचे नाही यावेळी तुमची पुरती फजीती केल्याशिवाय निवाडा होईल
असे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्हास पुरतेच ठाऊक आहात आपल्या दारात आलेल्या
याचकाला असेच ओरडत ठेवण्याची सवयच पहिल्यापासून तुम्हाला आहे ४
९७२ आम्ही शक्तिहीने । कैसे कराल ते नेणे ।
लिगाडाच्या गुणें । लोळमला राहिलो ॥ १ ॥
माझें मज देईं देवा । असे ठेविला तो ठेवा ।
नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ २ ॥
नाहीं गळा पडलो झोड । तुमचे तेचि माझें तोड ।
चोघा चार खड । लायणी हे अनुचित ॥ ३ ॥
नाही येत बळा । आता तुम्हासी गोपाळा ।
तुका म्हणे गळा । उगवा पाया लागतो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लिगाडाच्या-कटकटीच्या, झोड-निलाजरा, दांडगा
अर्थ - देवा, आम्ही तर शक्तीहीन आहोत आमचा उद्धार तुम्ही कसा करणार आहात, ते काही समजत
नाही तुम्हाला स्वतःपाठीमागे अशीच सारखी कटकट ठेवण्याची सवयच असल्यामुळे, मी असा कृपेशिवाय खोळंबून
राहिलो आहे १ देवा, मी माझा जो ठेवा तुमच्याजवळ ठेविला आहे, तो मला परत द्या ना मी काही आगली
अधिक मिळावे म्हणून काही हाव धरीत नाही २ मी एखादा दांडगा असून तुमच्या गळ्यात भलेच पडलो आहे
१ आम्हा
असे नव्हे तुमचे व माझे बोलणे एकसारखेच असल्याने दोघांना बोलावून दोघांच्या भांडणाचा निकाल लावून टाका
ना एकदाचा हे काम लावणीवर टाकणे उचित नाही देवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी काही
आता निकरावर येत नाही तुमच्या पायावर मी माझे डोके ठेविले आहे, ते आणून माझी मुक्तता करा एवढीच
विनंती आहे ४
९७३ काय कृपेविण घालावे साकडें । निश्चिती निवाडें कोण्या एका ॥ १ ॥
आहो तैंसी पुढें असो दीनपणे । वेचूनि वचने करुणेची ॥ २ ॥
धरू भय आता काय वाहों चिंता । काय करु आता आप्तपण ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साकडें-संकट
अर्थ - देवा, तुम्ही मजवर कृपा केलेली नाही म्हणून काय मी तुम्हास संकटात घालावे ? देवा, मी
निश्चित असावे, असा कोणताही एखादा निवाडा तुम्ही केलेला नाही १ देवा, यापुढेही आम्ही पूर्वी होतो तसेच
दीन वृत्तीने राहू करुणेची वचने तुमच्यासमोर बोलत राहू २ आता कसले भय धरून मनात चिंता वाहू ? आता
आप्तपणाच्या संबंधास तरी काय करावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीव भावभक्तीच्या शिवाय
आहोत, म्हणूनच देव आमच्यापासून दूर झाला आहे ४
९७४ नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज का नारायण दुरी जाला ॥ १ ॥
अशंकितीं मनें करों आळवण । नाहीं समाधान निश्चितीचे ॥ २ ॥
दासाचा विसर हे तो अनुचित । असे¹ सर्व नीत पायापाशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्हा लाज येत नाहीं । आम्हा चिंताडोहीं बुडविता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुरी-दूर अशंकितें-संशयित होऊन
अर्थ - शास्त्रवचनांची अथवा साधुसंतांची मर्यादा मी अजून कधी ओलांडली नाही मग हा नारायण
मला एवढा दूर का बरे झाला आहे ? १ याच संशयित मनाने मी या देवाची प्रार्थना करीत आहे, पण माझ्या
मनाच्या ठिकाणी चिंतारहित असे समाधान नाही २ देवा, तुला तुझ्या दासाचा विसर पडला आहे हे तर फारच
अनुचित दिसते तुमच्याजवळ तर सर्व नीती आहे असे असून तुम्ही असे वागता ? ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, आम्हाला अशा प्रकारे नाना प्रकारच्या चिंताच्या डोहामध्ये बुडविताना तुम्हाला काही लाज वाटत नाही ? ४
९७५ जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकावी ॥ १ ॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जाले ॥ २ ॥
क्षणक्षणा माझा न घ्यावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल फटवेचि तें तें होय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सांडी-त्याग फल फटवेचि-फोलकटाप्रमाण
अर्थ - एखाद्या मुलाचा प्राण जाईपर्यंत त्याची आई त्याचा त्याग करते, हे एक मोठे आश्चर्यच आहे १
देवा, तुम्ही दुर्बळच आहात, काय ? मग आम्ही जे सांगतो आहोत, ते तुम्ही नीट कानानी का ऐकत नाही ? तुमच्या
ठिकाणी काय कमीपणा निर्माण झाला की काय हो ? २ क्षणाक्षणास आमचा सांभाळ तुम्ही करूच नये, अशा
दुर्दैवाचा काळ मोठा विपरीत आलेला दिसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमच्या बोलण्यास काही
रुचीच नाही, असे झाले आहे फोलकटाप्रमाणे ते व्यर्थ होत आहे ४
१ असो