सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 464, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 464

४२६ सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- मी नीट विचार करून पाहिले, तेव्हा देवा, तुम्ही मला भवसिंधू तरून नेण्याइतके समर्थ असे ताह
आहात हे समजले. १ देवा, तुमचेच पाय मी माझ्या चित्तात धारण करीन गुप्त काय ते तेथेच आहे. २ माझ्या
मनाच्या असलेल्या परमार्थाच्या सर्व खुणा या हरीच्या भक्तिरसात बुडून गेल्या आहेत ३ तुकाराम महाराज
म्हणतात, माझ्या हातात हे मर्म आले; हे फार चांगले झाले आहे ४
९३४ पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥ १ ॥
जिव्हे गोडी तीन अक्षराचा रस । अमृत जयास फिके पुढें ॥ २ ॥
श्रवणींची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद धारोनियां¹ ॥ ३ ॥
महामळें मन होतें जें गांबले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥ ४ ॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सापडलें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - न वजे-जात नाही, गांबले-भरलेले
अर्थ - या श्रीहरीचे मुख पाहताच माझे सुख सुखावले गेले व माझ्या डोळ्याची भूक ही कधी जात नाही
असे झाले. १ विठ्ठल या तीन अक्षराच्या भक्तिरसात गोडी निर्माण झाली असून तिच्यापुढे प्रत्यक्ष अमृतही फिके
पडत आहे २ या श्रीहरीचे गुणगान ऐकण्याची वाटही चांगली शुद्धपणे चोखाळलेली असून सर्व भेदाभेद संपून
गेले आहेत. ३ माझे मन मोठ्या मळामुळे भरलेले होते, ते यामुळे शुद्ध होऊन स्फटिकाप्रमाणे निर्मळ झाले. ४
तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनाचे जीवन असून एका फार मोठ्या मोलाचा साठा मला
सापडला आहे ५
९३५ हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देता ठायी द्वैत तुटे ॥ १ ॥
बोलापासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी बाढे प्रीत प्रेमसुख² ॥ २ ॥
जनात भूषण वैकुंठी सरता । फावले स्वहिता सर्वभावें ॥ ३ ॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पाहयला ॥ ४ ॥
तुका म्हणे हा विठ्ठलचि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - आळंगीन-आलिंगीन, बाहीं-बाहूंनी.
अर्थ :- या परमानंदस्वरूपाच्या श्रीहरीस मी दोन्ही बाहूंनी आलिंगन देईन. त्याला आलिंगन दिल्या-
बरोबर द्वैताचा नाश होतो १ त्याच्याविषयी गोष्टी करण्यातच विशेष आनंद चित्ताला होतो, मन निवून जाते
व प्रेमसुखात दुप्पटीने वाढ होते २ लोकात भूषण वाढून शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते सर्व प्रकारचे स्वहित साधले
जाते ३ सर्व प्रकारचा लौकिक व्यवहार संपतो, मायिक लोकाचार संपून जातो, आणि संसाराविषयीची भावना
समूळ नष्ट होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला याच विठ्ठलाची रात्रंदिवस सोबत हवी; माझ्या जीवास आणखी
दुसरी कसलीही हौस नाही ५
९३६ आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥ १ ॥
प्रेमपान्हा स्तनां सदा सर्वकाळ । दृष्टि हे निमंळ अमृताची ॥ २ ॥
भूक तान दुःख वाटो नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनिया ॥ ३ ॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हा करीं खेळावया ॥ ४ ॥
तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेयें न पवे हात कळिकाळाचा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - दवडी-नाहीसा कर, ठाव-स्थान, सांगात-सोबत.
१ निवारुनि, २ प्रेमसुखें