सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 263, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २३१
राख लावूनि अंग मळी। थाथे ठोके मी एक बळी।
वासने हातीं बांधवी नळी। त्यासि येउनि गिळी। रे विठ्ठल ॥ ३ ॥
कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ।
करवी पीडा भोगवी दुःख। पडे नरकीं परी न पळेचि मूर्ख। रे विठ्ठल ॥ ४ ॥
सिफला फार मारी हाका। रांडा पोरें मेळवी लोकां।
विटंबी शरीर मागे रुका। केलें तें गेलें अवघेंचि फुका। रे विठ्ठल ॥ ५ ॥
कळावें जनां मी एक बळी। उभा राहोनि मांडी फळी।
फोडोनि गुडघे कोपर चोळी। आपला घात करोनि आपणचि तळमळे। रे विठ्ठल ॥ ६ ॥
फुकट खेळें ठकलीं वांयां। धरुनि सोंग बोडण्या डोया।
शिवों नये ती अंतरीं माया। संपादणीयिण विटंबिली काया। रे विठ्ठल ॥ ७ ॥
धुळी माती कांहीं खेलोच नका। जवांदी चंदन घ्यावा बुका।
आपणा परिमळ आणिकां लोकां। मोलाची महिमा फजिती फुका। रे विठ्ठल ॥ ८ ॥
बहुत दुःखी जालिया खेळें। अंगीं बुद्धि नाहींत बळें।
पाठीवरी तोब्रा तोंड काळें। रसना द्रवे उपस्थायच्या मुळें। रे विठ्ठल ॥ ९ ॥
काय सांगतो तें ऐका तुका। मोडा खेळ कांहीं अवगोच नका।
चला जेवूं आधीं पोटों लागल्या भुका। घाल्यावरी बरा टाकमटिका। रे विठ्ठल ॥ १० ॥
शब्दार्थ व टीपा- करंडी-परडी, उथळी-ओकतो, राहडीचे-चिखलात, फारु-शिव्या, रुका-पैसा, जवांदी-
सुवासिक पदार्थ, उपस्थ-इंद्रिय, घाल्यावरी-संतुष्ट झाल्यावर, टाकमटिका-थाटमाट
अर्थ :- देव देव म्हणून ज्याच्या नावाने तू शाल करुन ओरडत आहेस, त्यासबधी तुला काहीही ज्ञान नाही.
तर तू नीट ऐक. मी एका भावाने सर्व काही तुला सांगतो तुझ्या देहरूपी घरामध्येच जे विठ्ठलरूप वसती करुन
आहे त्याचीच तू उपासना कर १ उगाच कपाळावर गंधाचे टिळे, गळ्यात माळा, हातात फुलांची परडी, असे ढोंग
करून जगाला कशाला फसवितोस ? तू नेहमीच हात पसरून आहेस, खरा त्याग तू कधीच करीत नाहीस बभ्रदाची
पूजा करून लोकांना मात्र आपल्या साधुत्वाचे ढोंग दाखवितोस. २ तू साऱ्या अंगाला राख फासून बसतोस आणि
वृथा आपल्या मोठेपणाची ऐट मिरवतोस. तू वासनेकडून आपला गळाच बांधवून घेत आहेस यामुळे अशा लोकांना
काळ गिळतो व पुन ओकून टाकतो ३ चिखलात डोके टेकून पाय वर करून उभा राहतोस तू काय ह्यात सुख ?
उलट यामुळे तुला स्वत:ला दुख व पीडाच होईल नरकात जाशील ना. पण तुला मूर्खाला समजतच नाही ४ नाना-
प्रकारचे अपशब्द व शिव्या शिकलास तू रांडापोरांना हाका मारून तू भोवती जमवतोस. आपले शरीर विटवून,
नाना प्रकारची सोंगे करून त्यांच्याजवळ पैसा मागतोस ५ सर्व लोकांना मीच एक बलवान असे समजावे म्हणून तू
एखाद्या दुकानापुढे उभा राहून मोठ्याने ओरडा करतोस व लोक जमवितोस, आपले गुडघे व कोपर फोडून ते चोळत
बसतोस अशा प्रकारे तू आपला घात आपणच करीत आहेस ६ अशा या फुकटच्या खेळाने पुष्कळ लोक फसले ना
डोकी बोडून संन्याशाची सोंगे घेणारे फार आहेत पण त्यांच्या मनात जिला शिवू नये अशी माया भरपूर असते
वेशामुळे वेषासारखी वागणूक नसल्यामुळे देहाची नुसती विटंबनाच झाली रे. ७ म्हणून अशा प्रकारे धुळीत,
मातीत खेळ खेळण्याचे काही कारण नाही कस्तुरी, चंदन किंवा बुक्याचा याचे सेवन करून तुम्ही स्वतःही सुवास घ्या
व दुसऱ्यानाही द्यांवा. यामुळे मोठी किंमत होईल नाही तर फुकट फजिती मात्र आहे. ८ वर सांगितलेल्या खेळा-
मुळे पुष्कळांना फार दु:खे झाली आहेत त्यांच्या अंगची बुद्धी नष्ट झाली, बळ संपले त्यांच्या पाठीवर एकसारखे
आघात बसून त्यांचे तोंड काळे झाले आहे. इंद्रिय पाहून त्यांच्या तोंडात पाणी सुटते. ९ तेव्हा तुकाराम महाराज