सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१८ वा.] अंतर्देव. ३९३
कळेना ॥ १७ ॥ त्याची पैसावली कुबुद्धी । तेथें कैंची असेल शुद्धी ।
कुबुद्धी तेचि सुबुद्धी । ऐसी वाटे ॥ १८ ॥ मनुष्यें बुद्धीस सांडावें । त्याचें
काय खरें मानावें । तेथें विचाराच्या नांवें । शून्याकार ॥ १९ ॥ विचारें
इहलोक परलोक । विचारें होतसे सार्थक । विचारें नित्यानित्य विवेक ।
पाहिला पाहिजे ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके
जनस्वभावनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. अंतर्देव.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निराकार निश्चळ । आत्मा सविकार चंचळ ।
तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥ देवाचा ठावचि लागेना । एक देव
नेमस्त कळेना । बहुत देवीं अनुमानेना । एक देव ॥ २ ॥ म्हणोनि विचार
असावा । विचारें देव शोधावा । बहुत देवांचा गोथा । पडोंच नये ॥ ३ ॥
देव क्षेत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला । पृथ्वीमध्यें दंडक चालिला ।
येणें रीती ॥ ४ ॥ नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षेत्रदेवचि केवळ ।
नाना क्षेत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥ क्षेत्रदेव पाषाणाचा । विचार
पाहतां तयाचा । तंत लागला मुळाचा । अवतारांकडे ॥ ६ ॥ अवतारी देव
संपले । देह धरून वर्तों लागले । त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु
महेश ॥ ७ ॥ त्या तिन्ही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहतां ।
कर्ता भोक्ता तत्वतां । प्रत्यक्ष आहे ॥ ८ ॥ युगानुयुगें तिन्ही लोक । एक-
ला चालवी अनेक । हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥
आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर । जाणीवरूपें कलेवर । विवेकें
वर्तवी ॥ १० ॥ तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्थां जाती । प्राणी
बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥ मग विचारिती अंतःकरणीं । जेथें
तेथें धोंडा पाणी । उगेंच वणवण हिंडोनी । काय होतें ॥ १२ ॥ ऐसा
ज्यासि विचार कळला । तेणें सत्संग धरिला । सत्संगें देव सांपडला । बहुत
जनांसी ॥ १३ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें । अवि-
वेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥ अंतरवेधी अंतर जाणे । बाहेर-
१. घोटाळा. २. परिपाठ. ३. शरीर. ४. अंतर्निष्ठ. ५. बहिर्मुख.

३९४ श्रीदासबोध. [ दशक
सुद्धा कांहींच नेणे । म्हणोनि विवेकी शहाणे । अंतर शोधिती ॥ १५॥ विवेका-
विणें जो भाव । तो भावचि अभाव । मूर्खास प्रतिमादेव । ऐसें वचन
॥ १६ ॥ पाहत समजत शेवटास गेला । तोचि विवेकी म्हणावा भला ।
तत्त्वें सांडूनि पावला । निरंजनीं १ ॥ १७ ॥ येर जें आकारासि येतें । तें अव-
घें नासोन जातें । मग गलबल्या वेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ चंचळ
देव निश्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम । प्रत्ययज्ञानें निष्भ्रम । होइजेतें
॥ १९ ॥ प्रचीतीविण जें केलें । तें अवघें व्यर्थ गेलें । प्राणी कष्टकष्टेंचि मेले ।
कर्मेकचाटें ॥ २० ॥ कर्मावेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें ।
विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥ कांहीं अनुमानलें विचारें ।
देव आहे जगदंतरें । सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥ सगुण
पाहतां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला । संगत्यागें मोकळा झाला ।
वस्तुरूप ॥ २३ ॥ परमेश्वरीं अनुसंधान । लावितां होइजे पावन । मुख्य
ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं विवरणें । पाहावीं
सुचित्त अंतःकरणें । नित्यानित्यविवेकश्रवणें । जगदुद्धार ॥ २५ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके अंतर्देवनिरूपणं नाम अष्टमः
समासः ॥ ८ ॥
९. निद्रा.
श्रीगणेशाय नमः ॥ वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विलास । निद्रा
आलिया सावकाश । जाणार नाहीं ॥ १ ॥ निद्रेनें व्यापिली काया ।
आळस अंगमोडे जांभया । तेणें करितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥ कड-
कडां जांभया येती । चटाचटां चुटक्या वाजती । डकडकां डुलक्या येती ।
सावकाश ॥ ३ ॥ एकाचे डोळे झांकती । एकाचे डोळे लागती । एक ते
वचकून पाहती । चहूंकडे ॥ ४ ॥ एक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे
फोडिले । हुडकांचे तुकडे झाले । शुद्ध नाहीं ॥ ५ ॥ एक टेंकोन बैसले ।
तेथेंचि घोरों लागले । एक उताणे पसरले । सावकाश ॥ ६ ॥ कोणी सुर-
कुंडी घालिती । कोणी कानवैंडे निजती । कोणी चक्रीं फिरती । चहूंकडे
१. उपाधिशून्य ब्रह्मपदीं. २. एका जातीचे वाद्य, त्याचे. ३, कुशीवर.

१८ वा.] श्रोता-अवलक्षण. ३९५
॥ ७ ॥ एक हात हालविती । एक पाय हालविती । एक दांत खाती । क-
केरटें ॥ ८ ॥ एकांचीं वस्त्रें निघोन गेलीं । तीं नागवीं च लोळों लागलीं ।
एकांचीं मुंडाशीं गडबडलीं । चहूं कडे ॥ ९ ॥ एक निजलीं अस्ताव्यस्तें ।
एक दिसती जैशीं प्रेतें । दांत पसरोन जैशीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥
एक वोसणतेचि उठिले । एक अंधारीं फिरों लागले । एक जाऊनि निजले ।
उकिरड्यावरी ॥ ११ ॥ एक मडकीं उतरती । एक भूमि चांचपती । एक
उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥ एक प्राणी वोसणती । एक
स्फुंदस्फुंदों रडती । एक खदखदां हांसती । सावकाश ॥ १३ ॥ एक हाका
मारूं लागले । एक बोंबलत उठिले । एक वचकोन राहिले । आपुले ठायीं
॥ १४ ॥ एक क्षणक्षणां खुरडती । एक डोई खाजविती । एक कण्हों लागती ।
सावकाश ॥ १५॥ एकांच्या लाळा गळल्या । एकांच्या पिका सांडल्या । एकीं
लघुशंका केल्या । सावकाश ॥ १६॥ एक राऊतें सोडिती । एक कर्पट डेंकर देती ।
एक खांकरून थुंकती । भलतीकडे ॥ १७ ॥ एक हगती एक ओकिती । एक
खोकती एक शिंकती । एक ते पाणी मागती । निदसुरे ॥ १८ ॥ एक दुः-
स्वप्नें निबुंजेले । एक सुस्वप्नें संतोषिले । एक ते गाढमूर्छी पडिले । सुषुप्ती-
मध्यें ॥ १९ ॥ इकडे उजेडाया झालें । कोणीं पठन आरंभिलें । कोणीं प्रातः-
स्मरामि आरंभिलें । हरिकीर्तन ॥ २० ॥ कोणीं आठविल्या ध्यानमूर्ती ।
कोणी एकांतीं जप करिती । कोणी पाठांतरें उजळिती । नाना प्रकारें ॥ २१॥
नाना विद्या नाना कळा । आपलालया शिकती सकळा । तान मान गायन-
कळा । एक गाती ॥ २२ ॥ मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त झाली ।
व्यवसायीं बुद्धि आपली । प्रेरित झाले ॥ २३॥ ज्ञाता तत्त्वें सांडून पळाला ।
तुरियेपलीकडे गेला । आत्मनिवेदनें झाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निद्रानिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥
१०. श्रोता-अवलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक कार्याचा साक्षेपं । कांहीं तरी वडे विक्षेप ।
१. घाबरून. २. अपान वायु. ३. भ्याले. ४. महत्तत्त्व वगैरे. ५. प्रयत्न.

३९६ श्रीदासबोध. [ दशक
काळसाह्य तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥ कार्यभाग होत चालिला ।
तेणें प्राणी सुखी झाला । विचारहि सुचों लागला । दिवसेंदिवस ॥ २ ॥
कोणी एक प्राणी जन्मास येतो । कांहीं तरी काळ साह्य होतो । दुःखा-
उपरी सुख देतो । देव कृपाळूपणें ॥ ३ ॥ अवघाचि काळ जरी साजे । तरी
अवघेच होती राजे । कांहीं साजे कांहीं न साजे । ऐसें आहे ॥ ४ ॥ इह-
लोक आणि परलोक । साधतां कोणी एक विवेक । अद्भुत होय स्वाभा-
विक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥ ऐकिल्याविण कळलें । शिकविल्याविण शाहाण-
पण आलें । हें देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥ सकळ कांहीं ऐकतां
कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे । नेमस्त मध्यें आकळे । सारासार ॥ ७ ॥
श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें । येणें उपायें स्वभावें ।
त्रैलोक्य चाले ॥ ८ ॥ श्रवणाआड विक्षेप येती । नानाजिन्नस सांगों किती ।
सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ श्रवणीं लोक बैसले ।
बोलतां बोलतां एकाग्र झाले । त्या उपरी जे नूतन आले । ते एकाग्र न
होती ॥ १० ॥ मनुष्य बाहेर हिंडून आलें । नाना प्रकारांचें ऐकिलें । उदंड
गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥ प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक
थोडे असती । श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥ श्रवणीं
बैसले ऐकाया । अडों लागलीसे काया । येती कडकडा जांभया । निद्राभरें
॥ १३ ॥ बैसले सुचित्त करूनि मना । परी तें मनचि ऐकेना । मागें होतें
ऐकिलें नाना । तेंचि धरून बैसलें ॥ १४ ॥ तत्पर केलें शरीर । परी मनामध्यें
आणिक विचार । कल्पना कहिपते विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १५ ॥
जें जें कांहीं श्रवणीं पडलें । तितुकें समजोन विवरलें । तरीच कांहीं सार्थक
झालें । निरूपणीं ॥ १६ ॥ मन दिसतें मा धरावें । ज्याचें त्याणें आव-
रावँ । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरीं ॥ १७ ॥ निरूपणीं येऊन बै-
सला । परी तो उदंड जेवून आला । बैसतांचि कासावीस झाला । तृषा-
क्रांत ॥ १८ ॥ आधीं उदक आणिविलें । घळघळां उदंड घेतलें । तेणें मळ-
मळों लागलें । उठोनि गेला ॥ १९ ॥ कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा
सरतां मोठी फजिती । क्षणक्षणां उठोन जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥ दि-
सेनें कासावीस केला । अवघें सांडून धांवला । निरूपणप्रसंग निघोन गेला ।

१८ वा. ] श्रोता-अवलक्षण. ३९७
अखंड ऐसा ॥ २१ ॥ दृष्टांतीं कांहीं अपूर्व आलें । अंतःकरण तेथेंचि रा-
हिलें । कोठवरी काय वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥ निरूपणीं येऊन
बैसला । तों विंचवें फणकाविला । कैचें निरूपण झाला । कासावीस
॥ २३ ॥ पोटामध्यें तिडीक उठली । पाठीमध्यें करकें भरलीं<sup>१</sup> । चाळकें<sup>२</sup>
चिकुल्याँ पुळी झाली । बैसवेना ॥ २४ ॥ पिसोळाँ चावून पळाला । तेणें
प्राणी दुश्चित झाला । कोणे नेटें गलबला केला । तेथेंचि धांवे ॥ २५ ॥
विषयी लोक श्रवणीं येती । ते बायकांकडेच पाहती । चोरटे लोक चोरून
जाती । पादरक्षां ॥ २६ ॥ होय नव्हे वाद विवाद । तेणें उदंड झाला खेद ।
शिष्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥ कोणी निरूपणीं बैसती ।
सावकाश गोष्टी लाविती । हरिदास रें रें करिती । पोटासाठीं ॥२८॥ बहुत जा-
णते मिळाले । एकापुढें एक बोले । लोकांचे आश्चर्य राहिले । कोण जाणे॥२९॥
माझें होय तुझें नव्हे । ऐशी अखंड जनां सवे । न्यायनीति सांडूनि धांवे ।
अन्यायाकडे ॥ ३० ॥ आपल्या थोरपणासाठीं । अचावचा तोंड पिटी ।
न्याय नाहीं तें शेवटीं । परम अन्यायी ॥ ३१ ॥ एकीकडे अभिमान उठे ।
दुसरीकडे उदंड पेटे । ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२ ॥ म्हणोनि
जाणते विचक्षण । ते आधींच धरती नेणपण । मूर्ख टोणपा आपण । कां-
हींच नाहीं ॥ ३३ ॥ आपणासून देव थोर । ऐसा जयास कळला विचार ।
सकळ कांहीं जगदंतर । तेंचि राखावें ॥ ३४ ॥ सभेमध्यें कल्होळ झाला ।
शब्द येतो जाणत्याला । अंतरें राखो नाहीं शिकला । कैसा योगी
॥ ३५ ॥ अखंड आपणास सांभाळिती । क्षुल्लकपण येऊं न देती । थोर
लोकांस क्षमा शांती । अगत्य करणें ॥ ३६ ॥ वैर करितां वैरचि वाढे ।
आपणास दुःख भोगणें घडे । म्हणोनि शाहाण्याचें कुर्डे<sup>६</sup> । कळों
आलें ॥ ३७ ॥ अवगुणापाशीं बैसला गुणी । अवगुण कळतो तत्क्षणीं ।
विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥३८॥ उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न ।
विवेकबळें नाना यत्न । करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥
दुर्जनीं वेढवेढोनि घेतला । बाष्कळ लोकीं घसरिला । विवेकापासून च्येव-
१ लचक. २. चाळकवाऊ. ३. चिखलापासून पायांच्या बोटांस फोड येतात ते.
४. जोडे, वाहणा. ५. मनांतील अभिप्राय. ६. कोडें, मर्म.

३९८ श्रीदासबोध. [ दशक
ला । विवेकी कैसा ॥ ४० ॥ न्याय पर्याय उपाय । मूर्खास हें कळे काय ।
मूर्खाकरितां चिवडा होय । मजालसींचा ॥ ४१ ॥ मग ते शाहणे नीट
करिती । स्वयें साहोनि साहविती । स्वयें करून करविती । लोकांकरवीं
॥ ४२ ॥ पृथ्वीमध्यें उदंड जन । जनांमध्येंचि असती सज्जन । जयांकरितां
समाधान । प्राणिमात्रांसी ॥ ४३ ॥ तो मनोगतांचीं अंगें जाणे । नाना
प्रसंग समय जाणे । संतसालागीं निववूं जाणे । नानाप्रकारें ॥ ४४ ॥ ऐसा
तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक । त्याचें करणें कांहींएक । जनास
कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनांस चाळवी । नाना मंडळी हालवी । ऐसी हे
समर्थ पदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥ विवेक एकांतीं करावा । जगदीश-
धारणेनें करावा । लोक आपला आणि परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥
एकांतीं विवेक ठायीं पडे । एकांतीं यत्न सांपडे । एकांतीं तर्क वावंडे ।
ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ एकांतीं स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें ।
अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥ जयास एकांत मानला ।
अवघ्या आधीं कळे त्याला । त्या वेगळा वडीलपणाला । ठावाचि नाहीं ॥५०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके श्रोता-अवलक्षणनिरूपणं
नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २८८.
दशक एकोणिसावा.
१. लेखनक्रिया.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसूनै करावें सुंदर । जें
देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळ मोकळें । वोतलें
मषीचें काळें । कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळें । मुक्तामाळा जैशा ॥२॥
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्याहि
बीट । अर्कुलीं वेलांव्या ॥ ३ ॥ पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपे तों
पाहात गेलें । एक टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥ अक्षरांचें काळेपण ।
१. समुदायाचा. २. चालतो. ३. वळवून. ४. शाईचें. ५. सहज. ६. रेफ.

१९ वा.] लेखनक्रिया. ३९९
टांकाचें ठोंसरपण । तैसेंचि लवण वांकण । सारिखेंचि ॥ ५ ॥ ओळीस
ओळी लागेना । अर्कुलीं मात्रा भेदीना । खालींचे ओळीस स्पर्शेना । अथवा
लंबाक्षर ॥ ६ ॥ पान शिशानें रेखाटावें । त्यावरी नेमेंचि लिहावें । दूर
जवळी न व्हावें । अंतर ओळींचें ॥ ७ ॥ कोठें शोधासि आठलेना । चुकी
पाहतां सांपडेना । गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥ ८ ॥ ज्याचें वय
आहे नूतन । त्यानें लिहावें जपून । जनासि पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातारपणीं । मध्यम लिहिण्याची
करणी । केली पाहिजे ॥ १० ॥ भौवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंच चम-
चमीत लिहावें । कागद झडतांहि झडावें । नलगोचि अक्षर ॥ ११ ॥ ऐसा
ग्रंथ जपोन लिहावा । प्राणिमात्रास उपजे हेवा । ऐसा पुरुष पाहावा ।
म्हणती लोक ॥ १२ ॥ काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लावून सोडावी । कांहीं एक ॥ १३ ॥ घट्ट कागद आणावे । जपोन
नेमस्त खळौवे । लिहिण्याचे सांमे असावे । नानापरी ॥ १४ ॥ सुऱ्या
१ कातऱ्या जागाईत । खळी घोटाळी तागाईत । नाना सुरंगमिश्रित ।
जाणोनि घ्यावे ॥ १५ ॥ नाना देशींचे बोरू आणावे । घट्ट बारीकसर
घ्यावे । नाना रंगांचे आणावे । नानाजिनसी ॥ १६ ॥ नानाजिनसी टांक-
तोडणी । नाना प्रकारें रेखाटणी । चित्र विचित्र करणी । सिसेंलोळ्या
॥ १७ ॥ हिंगूळ संग्रहीं असावे । वाळले आँलींतें पाहोनि घ्यावे । सोपे
भिजवून वाळवावे । संग्रह मैषीचे ॥ १८ ॥ तगंटीं इतिश्रीयौ कराव्या ।
बंदरी फळ्या घोटाव्या । नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रे ॥१९॥ नानार
गोफ नाना वासैनें । मेणकापडें सिंदूरवर्णं । पेट्या कुलपें जपणें । पुस्तका-
कारणें ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके लेखन-
क्रियानिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
१. तुरटीचे पाण्यांत भिजवून वाळवावे. २. सामान. ३. समास-फळी. ४.
तुरटी. ५. घोटकवडा. ६. कागद चिकट करण्याचें सामान. ७. अलिता. ८. शाईचें.
९. शेवटीं. १०. 'इति श्री...' इत्यादि ग्रंथसमाप्तिसूचक शब्द. ११. वेष्टनें.

४०० श्रीदासबोध. [ दशक
२. विवरण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद ।
नाना प्रकारांचे संवाद । समजोन पाहावे ॥ १ ॥ शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद
प्रबंधभेद । नाना शब्दांचे शब्दभेद । जाणोनि घ्यावे ॥ २ ॥ नाना आशंका
प्रत्युत्तरें । नाना प्रतीत साक्षात्कारें । जेणेंकरितां जगदंतरें । चमत्कारती
॥ ३ ॥ नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्यय पाहावा नेमस्त । अनुमानाचें अस्ता-
व्यस्त । बोलोंच नये ॥ ४ ॥ प्रवृत्ति अथवा निवृत्ति । प्रचीतीविण अवघी
भ्रांती । गळ्यामधील जगज्योती । चेतेल कोठें ॥ ५ ॥ हेतु समजोन उत्तर
देणें । दुसऱ्याचे जीवींचें समजणें । मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तीं हीं ऐसीं
॥ ६ ॥ चातुर्याविण खटपट । ते विद्याचि फळकूट । सभेमध्यें आट-
वांट । समाधान कैंचें ॥ ७ ॥ बहुत बोलणें ऐकावें । तेथें मौनचि धरावें ।
अल्पचिन्हें समजावें । जगदंतर ॥ ८ ॥ बाष्कळामध्यें बैसों नये । उद्धटासि
तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥ नेणपण
सोडूं नये । जाणपणें फुगों नये । नाना जनांचें हृदय । मृदुशब्दें उकलावें
॥ १० ॥ प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसि जाजूं घेऊं नका । खरें अस-
तांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥ शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट-
लोकीं बैसों नये । बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥ अंतर
आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडेंचि वाचावें । चटक लावून सोडावें । भल्या
मनुष्यासी ॥ १३ ॥ मजालसींत बैसों नये । समाराधनेसि जाऊं
नये । जातां येळिळेंवाणें होय । जिणें आपुलें ॥ १४ ॥ उत्तम
गुण प्रगटवावे । मग भल्यासि बोलतां फावे । भले पाहोन करावे ।
शोधून मित्र ॥ १५ ॥ उपासनेसारिखें बोलावें । सर्व जन तोषवावे । सगट
बरेपण राखावें । कोणी एकासी ॥ १६ ॥ ठायीं ठायीं शोध घ्यावा ।
मग ग्रामीं प्रवेश करावा । प्राणिमात्र ओळखावा । आसपणें ॥ १७ ॥ उंच
नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदय । अस्तमानीं जाऊं नये । कोठें
तरी ॥ १८ ॥ जगामध्यें जगमित्र । जिव्हेपाशीं असे सूत्र । कोठें तरी स-
१. लोकांचीं मनें. २. प्रपंच. ३. परमार्थ. ४. जगदंतर. ५. व्यर्थ. ६. भ्रम.
७. तक्रार. ८. आळ. ९. रिकाम्या लोकांत. १०. पराधीन.

१९ वा.] करंटलक्षण. ४०१
स्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥ कथा होती तेथें जावें । दूर दीनासारिखें
बैसावें । तेथील सकळ होंदं घ्यावें । अंतर्यामीं ॥२०॥ तेथें भले आढळती ।
व्यापके तेहि कळों येती । हळू हळू मंदगती । रीघ करावी ॥ २१ ॥ सक-
ळांमध्यें विशेष श्रवण । श्रवणाहून थोर मनन । मननें होय समाधान । बहुत
जनांचें ॥ २२॥ धूर्तपणें सकळ जाणावें । अंतरीं अंतर बाणावें । समज-
ल्याविण शिणावें । कासयासी ॥ २३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
एकोनविंशतिदशके विवरणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥

३. करंटलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ सुचित्त करुनि अंतःकरण । ऐका करंटलक्षण ।
हें त्यागितां सदैव-लक्षण । अंगीं बाणे ॥ १ ॥ पापाकरितां दारिद्र प्राप्त ।
दरिद्रें होय पाप संचित । ऐसेंचि होत जात । क्षणक्षणां ॥२॥ या कारणें करंट-
लक्षणें । ऐकोनि त्यागचि करणें । म्हणजे कांहींएक बाणे । सदैव लक्षण ॥३॥ क-
रंटास आळस आवडे । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अ-
धर्मी सदा ॥४॥ सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगौंचि बोले सैरावेरा । कोणी एका-
च्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥ लिहों नेणे वाचूं नेणे । सवदासूत घेऊं
नेणे । हिशेब कित्येक राखौं नेणे । धौरणा नाहीं ॥ ६ ॥ हारवी सांडी पाडी
फोडी । विसरे चुके नाना खोडी । भल्याचे संगतीची आवडी । कदापि नाहीं
॥ ७ ॥ चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले । खटनट एकवटिले ।
चोरटे पापी ॥ ८ ॥ ज्यासि त्यासि कळकटा । स्वयें सदाचा चोरटा । पर-
घातकी धीट मोठा । वाटा पाडी ॥ ९ ॥ दीर्घसूचना सुचेचि ना । न्याय
नीति हे रुचेचि ना । पराभिलाषवासना । निरंतर ॥ १० ॥ आळसें शरीर
पाळिल । परंतु पोटाविण गेलें । सुडकें मिलेनालें झालें । पांघरायासि ॥ ११॥
आळसें शरीर पिळी । अखंड कुशी कोंडोळी । निद्रेचे पाडी सुकाळीं ।
आपणासी ॥ १२ ॥ जनासि मैत्री करीना । कठिण शब्द बोले नाना । मूर्ख-
पणें आवरेना । कोणी एकासी ॥ १३ ॥ पवित्र लोकांमध्ये भिडावे । वोंग-
ळांमध्यें निःशंक धावे । सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥

१. अभिप्राय. २. उद्योगी. ३. दैववान. ४. बुद्धि. ५. खाजवी. ६. आवडते.

४०२ श्रीदासबोध. [ दशक
तेथें कैंचा परोपकार । केला बहुतांचा संहार । पापी अनर्थी अपस्मार । सर्व
अबुंद्धी ॥ १५ ॥ शब्द सांभाळून बोलेना । आवरितां आवरेना । कोणी
एकासीं मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥ कोणी एकासी विश्वास नाहीं ।
कोणी एकासी सख्य नाहीं । विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा
॥ १७ ॥ राखावी बहुतांचीं अंतरें । भाग्य येतें तदनंतरें । ऐशीं विवेकाचीं
उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥ स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें
ऐकेना । तयास उपाय नाना । काय करिती ॥ १९ ॥ कल्पना करी उदंड कांहीं ।
प्राप्तव्य तें कांहींच नाहीं । अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥
पुण्यमार्ग सांडिला मनें । पाप झडावें कशानें । निश्चय नाहीं अनुमानें ।
नाश केला ॥ २१ ॥ कांहीं एक पुरतें कळेना । सभेमध्यें बोलों राहेना । वा-
ष्कळ लबाड ऐसें जनां । कळों आलें ॥ २२ ॥ कांहीं नेमकपण आपुलें ।
बहुत जनांसि कळों आलें । तेंचि मनुष्य मान्य झालें । भूमंडळीं ॥ २३ ॥
झिजल्यावांचूनि कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । जिकडे तिकडे
होते छी छी । अवलक्षणें ॥ २४ ॥ भल्यांची संगती धरीना । आपणास शा-
हाणें करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥ लो-
कांसि बरें करावें । तें उसणें सर्वैचि घ्यावें । ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना
॥ २६ ॥ जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंटपणाचें लक्षण । बहुतांसि न माने
तें अवलक्षण । सहजाचि झालें ॥ २७ ॥ कार्याकारण सकळ कांहीं । कार्याविण तों
कांहींच नाहीं । निकामीं तो दुःखप्रवाही । वाहतचि गेला ॥ २८ ॥ बहुतांसि
मान्य थोडा । त्याच्या पापास नाहीं जोडा । निराश्रयीं पडे उघडा । जेथें तेथें
॥ २९ ॥ या कारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावे । तेणें
मनासारखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
एकोनविंशतिदशके करंटलक्षणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
————
४. सदैवलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिलें करंटलक्षण । तें विवेकें सांडावें सं-
पूर्ण । आतां ऐका सदैवलक्षण । सौख्यदायक ॥ १ ॥ उपजतगुण शरीरीं ।
परोपकारी नानापरी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥ सुंदर

१९ वा.] सदैवलक्षण. ४०३
अक्षर लिहों जाणे । चपळ शुद्ध वाचों जाणे । अर्थांतर सांगों जाणे । सकळ
कांहीं ॥ ३ ॥ कोणाचें मनोगत तोडीना । भल्याची संगति सोडीना ।
सदैवलक्षणें अनुमाना । आणूनि ठेवी ॥ ४ ॥ तो सकळ जनांसि व्हावा ।
जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ नाना
उत्तमगुण सत्पात्र । तोचि मनुष्य जगमित्र । प्रगटकीर्ति स्वतंत्र । पराधीन
नाहीं ॥ ६ ॥ राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा
विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥ नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों
जाणे । बोला ऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥ जो मानला बहुतांसी ।
कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यराशी । महापुरुष ॥ ९ ॥ तो
परोपकार करीतचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणें
त्याला । भूमंडळीं ॥ १० ॥ बहुत जन वासे पाहे । वेळेसि तात्काळ उभा
राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्ट
कळा । जाणे संगीत गायनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें
॥ १२ ॥ सकळांसि नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणी
एकाचें उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥ न्याय नीति भजन मर्यादा । काळ-
सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तम गुणें
शृंगारिला । तो बहुतांमध्ये शोभला । प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा
॥ १५ ॥ जाणता पुरुष असेल जेथें । कलह कैंचा उठेल तेथें । उत्तम गुणा-
विषयीं रिते । ते प्राणी करंटे ॥ १६ ॥ प्रपंचीं जाणे राजकारण । परमार्थीं
साकल्यविवरण । सर्वांमध्ये उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें एक
पुढें एक । ऐसा कदापि नाहीं दंफेक । सर्वत्रांसि अलोकिक । तया पुरु-
षाची ॥ १८ ॥ अंतरासि लागेल ढका । ऐशी वर्तणुक करूं नका । जेथें
तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥ कर्मविधि उपासनाविधी । ज्ञानविधि वै-
राग्यविधी । विशालशवक्तृत्वाची बुद्धी । चलेल कैसी ॥ २० ॥ पाहतां अवघे
उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं
॥ २१ ॥ आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लहान थोर । तैसाचि
करी परोपकार । मनापासूनी ॥ २२ ॥ दुसऱ्याच्या दुःखें दुखावे । दुस-
१. वाट पाहे. २. सूर्य. ३. परब्रम्हाचा विचार ४. वागणूक.

४०४ श्रीदासबोध. [ दशक
प्याच्या सुखें सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उ-
दंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैशी अवघ्यांची चिंता
करी । महापुरुष ॥ २४ ॥ जयास कोणाचें सोसेना । तयाची निष्किंचन
वासना । धिक्कारितां धिकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥ मिथ्या श-
रीर निंदिलें । तरी याचें काय गेलें । झाल्यास आणि जिंकिलेँ । देहबुद्धीनें
॥ २६ ॥ हैं तों अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तरी उ-
त्तमगुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गु-
णास प्राणी खेदे । तीक्ष्णबुद्धि लोक साधे । काय जाणती ॥ २८ ॥ लोकीं
अत्यंत क्षमा करिती । आलिया लोकांचे प्रचीती । मग ते लोक पाठी रा-
खिती । नाना प्रकार्री ॥ २९॥ बहुतांसि वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे
विचार । धीर उदार गंभीर । महापुरुष ॥ ३० ॥ जितुके कांहीं उत्तम गुण ।
तैं समर्थांचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि झालें ॥ ३१ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके सदैवलक्षणनिरूपणं नाम
चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. देहमान्य.
श्रीगणेशाय नमः ॥ मातीचा देव धोंड्याचा देव । सोन्याचा देव रु-
प्याचा देव । कांस्याचा देव पितळेचा देव । तांब्याचा देव चित्रलेप ॥ १ ॥
रुईच्या लांकडाचे पाँवळाचे देव । बाण तांदळे नर्मदेचे देव । शालग्राम
काश्मीरदेव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥ ताम्रनाणीं हेमेंनाणीं । कोणी पू-
जिती देवतार्चनीं । चक्रांकित चक्रतीर्थांहूनी । घेऊनि येती ॥ ३ ॥ उदंड
उपासनेचे भेद । किती करावे विशद । आपलाले आवडीचा वेध । लागला
जनीं ॥ ४ ॥ परी त्या सकळांचेंहि कारण । मुळीं पाहावें स्मरणं । तया
स्मरणाचे अंश जाण । नाना दैवतें ॥ ५ ॥ मुळीं द्रष्टा देव तो एक । त्याचे
झाले अनेक । समजोन पाहतां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥ देहावेगळी
भक्ति फावेना । देहावेगळा देव पावेना । या कारणें मूळ भजना । देहचि
आहे ॥ ७ ॥ देह मुळींच केला वाव । तरी भजनास कैचा ठाव । म्हणोनि
भजनाचा उपाव । देहात्मयोगें ॥ ८ ॥ देहाविण देव कैसा भजावा । देहा-
१. दरिद्री. २. निराळा. ३. सोन्याचीं नाणीं. ४. स्फूर्ति.

१९ वा.] देहमान्य. ४०५
विण देव कैसा पूजावा । देहाविण महोत्सव कैसा करावा । कोणत्या प्रकारें
॥ ९ ॥ अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबूल धूप दीप । नाना भजनाचा सा-
क्षेप । कोठें करावा ॥ १० ॥ देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासि गंध कोठें
लावावें । मंत्रपुष्प तरी वाहावें । कोणे ठायीं ॥ ११ ॥ म्हणोनि देहाविण
अडतें । अवघें सांकडेंचि पडतें । देहाकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥
देव देवता भूतें दैवतें । मुळींचें सामर्थ्य आहे तेथें । अधिकारें नाना दैवतें ।
भजत जावीं ॥ १३ ॥ नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषास पावलें ।
या कारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥ मायावल्ली फांपा-
वली । नाना देहफळीं लगडली । मुळींची जाणीव कलों आली । फळामध्यें
॥ १५ ॥ म्हणोनि येकील न करावें । पाहावें तें येथेंचि पाहावें । ताळा प-
डतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥ प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत
फिरती । नाना अनुमानीं पडती । जेथें तेथें ॥ १७ ॥ लोकांची पाहतां
रीती । लोक देवतार्चनें करिती । अथवा क्षेत्रदेव पाहती । ठायीं ठायीं ॥
१८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोनि धरिती निर्धार । परी तें अवघें स-
विस्तर । होऊनि गेलें ॥ १९ ॥ एक ब्रह्मा विष्णु महेश । ऐकोनि म्हणती
हे विशेष । गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥ देवास
नाहीं स्थान मान । कोठें करावें भजन । हा विचार पाहतां अनुमान । होत
जातो ॥ २१ ॥ नसतां देवाचें दर्शन । कैसेनि होइजे पावन । धन्य धन्य
ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥ भूमंडळीं देव नाना । त्यांची भीड
उल्लंघेना । मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्या ॥ २३ ॥ कर्तृत्व वेगळें
करावें । मग त्या देवासि पाहावें । तरी कांहींएक पडे ठावें । गौप्य गुह्य ॥
२४ ॥ तें दिसेना ना भासेना । कल्पांतींहि नासेना । सुकृतावेगळें विश्वा-
सेना । तेथें मन ॥ २५ ॥ उदंड कल्पिती कल्पना । उदंड इच्छिते वासना ।
अभ्यंतरींचे तरंग नाना । उदयार्ते पावती ॥ २६ ॥ म्हणोनि कल्पनार-
हित । तेंचि वस्तु शाश्वत । अंत नाहीं म्हणोनि अनंत । बोलिजे तया ॥
२७ ॥ हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनि तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप
व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥ नाना लीला नाना लाघवें । तें काय जाणिजे
बापुड्या जीवें । संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥ ऐसी सूक्ष्म

४०६ श्रीदासबोध. [ दशक
स्थिति गती । कळतां चुके अधोगती । सद्गुरुवचनें सद्गती । तत्काळ होते
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके देहमान्य-
निरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥

६. बुद्धिवाद.
श्रीगणेशाय नमः ॥ परमार्था आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं ।
कां जे विवराविवरों चुकी । पडोंच नेदी ॥ १ ॥ जो जो संदेह वाटे मना ।
तो तो कदापि करीना । आदि अंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥ स्वतां
निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना । कठिण आहे जनार्दनां १ । राजी
राखणें ॥ ३ ॥ कोणी दाटून उपदेश देती । कोणी मध्यवर्ती घालिती । ते
सहजचि हळु पडती । लालुचीनें ॥ ४ ॥ जयास सांगावा विवेक । तो जा-
णावा प्रतिकुंचकें २ । पुढें पुढें नाशक । कारभार होतो ॥ ५ ॥ भावास भाऊ
उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती । वोळखीच्या लोकांत महंती । मां-
डूंचि नये ॥ ६ ॥ पहिले दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे ।
अविवेकी ते जैसे तैसे । मिळती तेथें ॥ ७ ॥ भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हा हि
फटकळ विचारु । नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥ प्रगट
विवेक बोलेना । झांका तापा करी जना । मुख्य निश्चय अनुमाना । आ-
णूंच नेदी ॥ ९ ॥ हुकीसारिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे । दूर दृष्टीनें
पुरे । साधु नव्हती ॥ १० ॥ कोणास कांहींच न मागावें । भगवद्भजन
वाढवावें । विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥ परांतर रक्षायाचीं
कामें । बहुत कठिण विवेकवर्मे । स्वइच्छेनें स्वधर्मे । लोकराहाटी ॥ १२ ॥
आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला । नीच यातीनें नासला ।
समुदाय ॥ १३ ॥ ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । म-
ळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥
अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें ।
पाठांतर ॥ १६ ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी ।


१. सर्व जनांच्या अंतरात्म्यास. २. प्रतिकूळ,

१९ वा. ] यत्न. ४०७
आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ १७ ॥ अखंड हरिकथेचा छंद ।
सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध । सूर्य जैसा ॥ १८ ॥ दु-
र्जनासि राखो जाणे । सज्जनासि निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे ।
ज्याचें त्यापरी ॥ १९ ॥ संगतींचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तात्काळ उठे ।
अखंड अभ्यासीं लगते । समुदाय ॥ २० ॥ जेथें तेथें नित्य नवा ।
जनासि वाटे हा असावा । परंतु लालुचेचा गोवा । पडोंच नेदी ॥ २१ ॥
उत्कृष्ट भक्ति उत्कृष्ट ज्ञान । उत्कृष्ट चातुर्य उत्कृष्ट भजन । उत्कृष्ट योग अ-
नुष्ठान । ठायीं ठायीं ॥ २२ ॥ उत्कृष्ट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति
दिगंतीं फांकली । उत्कृष्ट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥ कांहीं-
एक उत्कृष्टेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन ।
काय होतें ॥ २४ ॥ नाहीं देहाचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा । प्रसंग
पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ या कारणें सावधान असावें । जितुकें
होईल तितुकें करावें । भगवत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आप-
णास जें जें अनुकूल । तें तें करावें तात्काळ । होइना त्यांस निवळ । वि-
वेक उमजवावा ॥ २७ ॥ विवेकामध्यें सांपडेना । ऐसें तों कांहींच असे-
ना । एकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥ अखंड तजविजा
चाळणा जेथें । पाहतां काय उणें तेथें । एकांताविणें प्राणियांतें । बुद्धि
कैंची ॥ २९ ॥ एकांतीं विवेक करावा । आत्माराम ओळखावा । येथून
तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
एकोनविंशतिदशके बुद्धिवादनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. यत्न.
श्रीगणेशाय नमः ॥ कथेंचें घमंडे भरून द्यावें । आपण निरूपणीं विव-
रावें । उणें पडोंच न द्यावें । कोणीएक विषयीं ॥ १ ॥ भैंजणार खालीं प-
डला । तो भजनारीं जाणिला । नेणतां लोक उगाच राहिला । टकमकां
पाहात ॥ २ ॥ उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें । म्हणिजे
महत्व उडालें । वक्त्याचें ॥ ३ ॥ थोडें बोलोन समाधान करणें । रागेजोन
१. गर्दी उसळून द्यावी. २. उपदेश करणारा.

४०८ श्रीदासबोध. [ दशक

तरी मन धरणें । मनुष्य वेधों लावणें । कोणी एक ॥ ४ ॥ सोसवेना चिण-
चिण केली । तेथें तामस वृत्ति दिसोन आली । अवघी आवडीच उडाली ।
श्रोत्यांची ॥ ५ ॥ कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनीं भंगले ।
क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजेत लोक ॥ ६ ॥ शिष्य विकल्पें रान घेतो । गुरु
मागें मागें धांवतो । विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥
आशाबद्ध क्रियाहीन । नाहीं चातुर्यांचे लक्षण । ते महंतीची भणभण ।
बंदे नाहीं ॥ ८ ॥ ऐसे गोसांवी हळु पडती । ठायीं ठायीं कष्टी होती ।
तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैंचें ॥ ९ ॥ जिकडे तिकडे कीर्ति माजे ।
सकळ लोकांस हव्यास उपजे । लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं
॥ १० ॥ परलोकीं वास करावा । समुदाय उगाच पहावा । मागण्याचा
तगादा न लावावा । कांहींएक ॥ ११ ॥ जिकडे जग तिकडे जगन्नायक ।
कळला पाहिजे विवेक । रात्रंदिवस विवेकी लोक । संभाळीत जाती
॥ १२ ॥ जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला । अवघे
नष्ट एकला भला । कशावरूनी ॥ १३ ॥ वोस मुलखीं काय पाहावें ।
लोकांवेगळें कोठें राहावें । तैंन्हे खोटी सोंडतें घ्यावें । कांहींएक ॥ १४ ॥
तस्मात लोकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये । परत्रसाधनाचा उ-
पाय । श्रवण करून असावें ॥ १५ ॥ आपणांस बरें पाहतां न ये । लोक
बुडवायाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाय । विकल्पचि अवघा
॥ १६ ॥ अभ्यासेँ प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकौन असावें । प्रगट होऊन
नासावें । हैं बरें नव्हे ॥ १७ ॥ मंद हळूहळु चालतो । चपळ कैसा आटो-
पतो । आरबी फिरवणारे तो । कैसा असावा ॥ १८ ॥ हीं धकाधकीचीं
कामें । तीक्ष्णबुद्धीचीं वर्में । भोळ्या भावार्थे संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥ शेत
केलें परी वाहेनाँ । जवारें केलें परी फिरेना । जन मेळविले परी धरीना ।
अंतर्यामीं । २० ॥ जरी चढती वाढती आवडी उठे । तरीच परमार्थ प्र-
गटे । घसवस करितां विटे । सगट लोक ॥ २१ ॥ आपलें लोकांस मानेना ।
लोकांचें आपणास मानेना । अवघा विकल्पचि मना । समाधान कैंचें


१. शिस्त. २. वरच्या स्थानी, एकांतीं. ३. दृष्टीषणा. ४. पड. ५. आरबी घोडा. ६. घोटाळ्यानें. ७. निगा करीना. ८. व्यापार.

॥ २२ ॥ नाशक दीक्षा सिंतेरू लोक । तेथें कैंचा असेल विवेक । जेथें
बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥ बहुत दिवस श्रम केला ।
शेवटीं अवघाचि वायां गेला । आपणास ठाकेना<sup>१</sup> गलवला । कोणें करावा
॥ २४ ॥ संगीते चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप ।
क्षणक्षणां विक्षेप कोप । किती म्हणोन सांगावा ॥ २५ ॥ मूर्खपणें भरंग-
ळती । ज्ञातेपणें कलह करिती । होते दोहींकडे फजिती । लोकांमध्ये ॥ २६ ॥
कारभार आटोपेना करवेना । आणि उगेंहि रहेना<sup>२</sup> । या कारणें सकळ जनां ।
काय म्हणावें ॥ २७ ॥ नाशक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें ।
परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥ परिभ्रमण करवेना । दुसऱ्याचें
कांहींच सोसेना । तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥ आतां
हें आपणाचपाशीं । बरें विचारावें आपणासी । अनुकूल पडेल तैशी । वर्त-
णूक करावी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशति-
दशके यत्ननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. उपाधिलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टीमध्यें बहुत लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारांचे विवेक । आढळों लागती ॥ १ ॥ किती प्रापंचिक जन ।
अखंड वृत्ती उदासीन । सुखदुःखें समाधान । डंडळेना ॥ २ ॥ स्वभावेंचि
नेमक बोलती । सहजचि नेमक चालती । अपूर्व बोलण्याची स्थिती । सक-
ळांसि माने ॥ ३ ॥ सहजचि तालज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उम-
टतें । सहजचि कळत जातें । न्यायनीतिलक्षण ॥ ४ ॥ एखादा आढळे
गाजी । सकळ लोक अखंड राजी । सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणि-
मात्रांची ॥ ५ ॥ चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें । महं-
ताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥ ऐसे आढळतां लोक । चमत्कारें
गुणग्राहक । क्रिया बोलणें नेमक<sup>३</sup> । प्रत्ययाचें ॥ ७ ॥ सकळ अवगुणा-
मध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुके-
ना कीं ॥ ८ ॥ डौलेंचि<sup>४</sup> काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्व-


१. ठक. २. होईना. ३. सुरळीत. ४. सहजासहजीं.

४१० श्रीदासबोध. [ दशक
दा । तेथें पीळ पेंचाची आपदा । आढळेलिचिला ॥ ९ ॥ एकासि अभ्या-
सितां न ये । एकासि स्वभावेंचि ये । ऐसा भगवंताचा महिमा काय ।
कैसा कळेना ॥ १० ॥ मोठीं राजकारणें चुकती । राजकारणीं वेढों¹ लागती ।
नाना चुकीची फजीती । चहूंकडे ॥ ११ ॥ या कारणें चुकों नये । म्हणिजे
उदंड उपाय । उपायांचा अपाय । चुकतां होय ॥ १२ ॥ काय चुकलें तें
कळेना । मनुष्याचें मनचि वळेना । खवळला अभिमान गळेना । दोहींकडे
॥ १३ ॥ अवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगिती । कोठें चुके ते
युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥ ह्यापोविण² आटोप केला । तो अवघा सर-
तचि गेला । अकलेचा बंद नाहीं घातला । दूरदृष्टीनें ॥ १५ ॥ एखादें
मनुष्य तें शिळें । त्याचें करणेंचि बावळें । नाना विकल्पांचें जाळें । करून
टाकी ॥ १६ ॥ तें आपणासि उकलेना । दुसऱ्यास कांहींच कळेना । नाचे
विकल्पें कल्पना । ठायीं ठायीं ॥१७॥ ह्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या ।
कोणें येऊन आटोपाव्या । ज्याच्या त्याणें कराव्या । बळकट बुद्धी ॥ १८ ॥
ज्यासि उपाधि आवरेना । तेणें उपाधि वाढवावी ना । सावचित्त करूनियां
मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांवधांवोनि उपाधि वेष्टी । आपण
कष्टी लोक कष्टी । हे कामा न ये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत
कष्टी झाला । आपणहि अत्यंत त्रासला । व्यर्थचि केला गलबला । कास-
यासी ॥ २१ ॥ असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहींएक नासे ।
सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥ लोकांपाशीं भावार्थ कैंचा ।
आपण जगवावा तयांचा । शेवट उपढरै³ कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥
अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लागे । नाना प्रकारीं
दगे । चंचळामध्यें ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ ।
तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवघे तुटोन
जाती । मनास वाटे विश्रांती । ऐशी दुर्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभा-
ळावी ॥२६॥ आपणास मुळीं उपाधि नाहीं । ऋणानुबंधें मिळाले सर्वही
आल्या गेल्याची क्षिति⁴ नाहीं । ऐसें झालें पाहिजे ॥ २७ ॥ जो उपाधीस
कंटाळला । तो निवांत होऊनि बैसला । आटोपेना तो गलबला । कासयासी
१. अडचणींत पडतात. २. आटोक्यावांचून. ३. उणें, हानि. ४. पर्वा.

१९ वा.] राजकारण. ४११
॥ २८ ॥ कांहीं गलबला कांहीं निवळ । ऐसा कंठित जावा काळ । तेणें-
करितां विश्रांति वेळ । आपणासी फावे ॥२९॥ उपाधि कांहीं राहत नाहीं ।
समाधानायेवढें थोर नाहीं । नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणां ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके उपाधिलक्षणनिरूपणं
नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. राजकारण.
श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास । तेणें
अखंड सावकाश । एकांत सेवावा ॥ १ ॥ तेथें तजविजा कळती । अखंड
चाळणा निघती । प्राणिमात्रांची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥ जरी
हा चाळणाच करीना । तरी कांहींच उमजेना । हिशेबझाडाच पाहेना ।
दिवाळखोर ॥३॥ एक मिराशी साधिती । एक सध्यां गमाविती । व्यापक-
पणाची स्थिती । ऐशी आहे ॥४॥ जेणें जें जें मनीं धारिलें । तें तें आधींच
समजलें । कृत्रिम अवघेंच खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥ अखंड राहतां
सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । या कारणें विश्रांतीतें । घेतां न ये
॥ ६ ॥ आळसें आळस केला । तरी मग कारभारचि बुडाला । अंतरहेत
चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥ उदंड उपासनेचीं कामें । लावित जावीं
नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥८॥ चोर भांडारी करावा ।
घसरतांच सांभाळावा । गोवा मूर्खपणाचा काढावा । हळू हळू ॥ ९ ॥ ह्या
अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी । राजकारणें मंडळ
वेष्टी । चहूकडे ॥१०॥ नष्टासि नष्ट योजावे । वाचाळासि वाचाळ आणावे ।
आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंचि नेदी ॥११॥ कांटीनें कांटी झाडावी ।
झाडावी परी ते कळों न द्यावी । कळकटपणाची पदवी । असों न द्यावी
॥१२॥ न कळतां करी कार्य जें तें । तें काम तात्काळाचि होतें । गिचड्यांत
पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥ ऐकोनि आवडी लागावी । देखोनि
बळकटांच व्हावी । सलगीनें आपली पदवी । सेवकांमध्यें ॥ १४ ॥ कोणी-
एक काम करितां होतें । न करितां मार्गे पडतें । या कारणें ढिलेपण तें ।
असोंचि नये ॥१५॥ जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।

जो आपणाचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६॥ अवघ्यांस अवघेंच कळलें ।
तेव्हां तें रितें पडलें । या कारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७॥ मुख्य
सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्येक खल्लक उगवावे ।
राजकारणामध्यें ॥ १८॥ बोलके पहिलवान कळकटे । तयांसीच घ्यावे
झटे । दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९॥ ग्रामण्य वर्मीं सांप-
डावें । रगडून पीठचि करावें । करून मागुती सांवरावें । बुडवूं नये
॥ २०॥ खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें
प्रगट झालें । बरें वाईट ॥ २१ ॥ समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा
असाव्या बळकटा । मठ करून ताठा । धरूं नये ॥ २२॥ दुर्जन प्राणी
समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी
॥ २३ ॥ जनांमध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । या कारणें ते
वाट । बुझोनि टाकावी ॥ २४ ॥ गलिमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या
फुरफुरती भुजा । ऐसा पाहिजे कीं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५॥ तयास
देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाँखे । सह-
जाचि होती ॥ २६ ॥ हीं धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें । ढिले-
पणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७॥ कोठेंच पडेना दृष्टी । ठायीं ठायीं
त्याच्या गोष्टी । वाग्विलासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥ हुंब्यासि
हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लोंदापुढें करावा ।
दुसरा लोंदें ॥ २९ ॥ घट्टाास आणावा घट्ट । उद्धटास पाहिजे उद्धट । खट-
नटासि खटनट । अगत्यें करी ॥ ३० ॥ जैसास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां
मजार्संसी थाटे । इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनाविंशतिदशके राजकारणनिरूपणं नाम-
नवमः समासः ॥ ९ ॥
१०. विवेकलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धा-
रणा । जेथें अखंड राजकारणा । मनासि आणिती ॥ १ ॥ सृष्टीमध्यें उत्तम
१. कारस्थानी लोक. २. योजावे. ३. ताणदोर. ४. कैवारी. ५. प्राणांत अवस्था-
६. मार्गानें. ७. दांडगा. ८. दुष्ट. ९. स्नेहसंबंध. १०. समुदाय.