दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 444, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें॥ २२ ॥ नाशक दीक्षा सिंतेरू लोक । तेथें कैंचा असेल विवेक । जेथें
बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥ बहुत दिवस श्रम केला ।
शेवटीं अवघाचि वायां गेला । आपणास ठाकेना<sup>१</sup> गलवला । कोणें करावा
॥ २४ ॥ संगीते चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप ।
क्षणक्षणां विक्षेप कोप । किती म्हणोन सांगावा ॥ २५ ॥ मूर्खपणें भरंग-
ळती । ज्ञातेपणें कलह करिती । होते दोहींकडे फजिती । लोकांमध्ये ॥ २६ ॥
कारभार आटोपेना करवेना । आणि उगेंहि रहेना<sup>२</sup> । या कारणें सकळ जनां ।
काय म्हणावें ॥ २७ ॥ नाशक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें ।
परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥ परिभ्रमण करवेना । दुसऱ्याचें
कांहींच सोसेना । तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥ आतां
हें आपणाचपाशीं । बरें विचारावें आपणासी । अनुकूल पडेल तैशी । वर्त-
णूक करावी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशति-
दशके यत्ननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. उपाधिलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टीमध्यें बहुत लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारांचे विवेक । आढळों लागती ॥ १ ॥ किती प्रापंचिक जन ।
अखंड वृत्ती उदासीन । सुखदुःखें समाधान । डंडळेना ॥ २ ॥ स्वभावेंचि
नेमक बोलती । सहजचि नेमक चालती । अपूर्व बोलण्याची स्थिती । सक-
ळांसि माने ॥ ३ ॥ सहजचि तालज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उम-
टतें । सहजचि कळत जातें । न्यायनीतिलक्षण ॥ ४ ॥ एखादा आढळे
गाजी । सकळ लोक अखंड राजी । सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणि-
मात्रांची ॥ ५ ॥ चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें । महं-
ताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥ ऐसे आढळतां लोक । चमत्कारें
गुणग्राहक । क्रिया बोलणें नेमक<sup>३</sup> । प्रत्ययाचें ॥ ७ ॥ सकळ अवगुणा-
मध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुके-
ना कीं ॥ ८ ॥ डौलेंचि<sup>४</sup> काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्व-
१. ठक. २. होईना. ३. सुरळीत. ४. सहजासहजीं.