दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 437, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४०२ श्रीदासबोध. [ दशक
तेथें कैंचा परोपकार । केला बहुतांचा संहार । पापी अनर्थी अपस्मार । सर्व
अबुंद्धी ॥ १५ ॥ शब्द सांभाळून बोलेना । आवरितां आवरेना । कोणी
एकासीं मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥ कोणी एकासी विश्वास नाहीं ।
कोणी एकासी सख्य नाहीं । विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा
॥ १७ ॥ राखावी बहुतांचीं अंतरें । भाग्य येतें तदनंतरें । ऐशीं विवेकाचीं
उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥ स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें
ऐकेना । तयास उपाय नाना । काय करिती ॥ १९ ॥ कल्पना करी उदंड कांहीं ।
प्राप्तव्य तें कांहींच नाहीं । अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥
पुण्यमार्ग सांडिला मनें । पाप झडावें कशानें । निश्चय नाहीं अनुमानें ।
नाश केला ॥ २१ ॥ कांहीं एक पुरतें कळेना । सभेमध्यें बोलों राहेना । वा-
ष्कळ लबाड ऐसें जनां । कळों आलें ॥ २२ ॥ कांहीं नेमकपण आपुलें ।
बहुत जनांसि कळों आलें । तेंचि मनुष्य मान्य झालें । भूमंडळीं ॥ २३ ॥
झिजल्यावांचूनि कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । जिकडे तिकडे
होते छी छी । अवलक्षणें ॥ २४ ॥ भल्यांची संगती धरीना । आपणास शा-
हाणें करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥ लो-
कांसि बरें करावें । तें उसणें सर्वैचि घ्यावें । ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना
॥ २६ ॥ जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंटपणाचें लक्षण । बहुतांसि न माने
तें अवलक्षण । सहजाचि झालें ॥ २७ ॥ कार्याकारण सकळ कांहीं । कार्याविण तों
कांहींच नाहीं । निकामीं तो दुःखप्रवाही । वाहतचि गेला ॥ २८ ॥ बहुतांसि
मान्य थोडा । त्याच्या पापास नाहीं जोडा । निराश्रयीं पडे उघडा । जेथें तेथें
॥ २९ ॥ या कारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावे । तेणें
मनासारखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
एकोनविंशतिदशके करंटलक्षणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
————
४. सदैवलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिलें करंटलक्षण । तें विवेकें सांडावें सं-
पूर्ण । आतां ऐका सदैवलक्षण । सौख्यदायक ॥ १ ॥ उपजतगुण शरीरीं ।
परोपकारी नानापरी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥ सुंदर