दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१२ वा.] काल. २८७
चळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥ आकाश म्हणिजे अवकाश ।
अवकाश बोलिजे विलंबास । त्या विलंबरूप काळास । जाणोन घ्यावें ॥ ५ ॥
सूर्याकरितां विलंब कळे¹ । गणना सकळांची आकळे । पळापासून निवडेले ।
युगपर्यंत ॥ ६ ॥ पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष² मास । षण्मास
वर्ष युगास । ठाव जाहला ॥ ७ ॥ कृत त्रेत द्वापार केली । संख्या चालली
भूमंडळीं । देवाचीं आयुष्यें आगळीं³ । शास्त्रीं निरूपिलीं ॥ ८ ॥ ते देवत्र-
याची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट । दंडक सांडितां चटपट । लोकांस
होते ॥ ९ ॥ मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना । कोण
थोर कोण शहाणा । कैसा म्हणावा ॥ १० ॥ असो हें जाणत्याचीं कामें ।
नेणता उगाचि गुंते भ्रमें । प्रत्यय जाणोनि वर्में । ठायीं पाडावीं ॥ ११ ॥
उत्पत्तिकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संहारकाळ । आद्यंत अवघा काळ ।
विलंबरूप ॥ १२ ॥ जें जें जये प्रसंगीं झालें । तेथें काळाचें नांव पडलें ।
बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥ पर्जन्यकाळ शीतकाळ ।
उष्णकाळ संतोशकाळ । सुखदुःख आनंदकाळ । प्रत्यय येतो ॥ १४ ॥ प्रातः-
काळ मध्यान्हकाळ । सायंकाळ वसंतकाळ । पर्वकाळ कठिणकाळ । जा-
णिजे लोकीं ॥ १५ ॥ जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृद्धापकाळ ।
अंतकाळ विषमकाळ । वेळरूपें ॥ १६ ॥ सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोष-
काळ पुण्यकाळ । सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥
असतें एक वाटतें एक । त्याचें नांव हीनविवेक । नाना⁴ प्रवृत्तीचे⁵ लोक । प्र-
वृत्ति जाणती ॥ १८ ॥ प्रवृत्ति चाले अधोमुखें । निवृत्ति धावें ऊर्ध्वमुखें ।
ऊर्ध्वमुखें नानामुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥ ब्रह्मांडरचना जेथूनि झाली ।
तेथें विवेकी दृष्टि घाली । विवरतां विवरतां लाधली । पूर्वापार स्थिति
॥ २० ॥ प्रपंचीं असोन परमार्थ पाहे । तो हे स्थितींतें लाहे । प्रारब्धयोगें-
करून राहे । लोकांमध्ये ॥ २१ ॥ सकळांचें एकाचि मूळ । एक जाणते एक
बाष्कळ । विवेकेंकरून तात्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥ तरीच
जन्माचें सार्थक । भले पाहती उभयलोक । कारण मूळींचा विवेक । केला
पाहिजे ॥ २३ ॥ विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान । त्यांचें ऐकतां
१. ओळखते २. पंधरवडा. ३. अधिक. ४. निरनिराळी. ५. व्यवहाराचे.
भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥ बरें आमचें काय गेलें । जें केलें तें फळास
आलें । पेरिलें तें उगवलें । भोगती आतां ॥ २५॥ पुढेंहीू करी तो पावे । भक्ति-
योगें भगवंत फावे । देवभक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥ कीर्ति करून
मेले । उगेचि आले आणि गेले । शाहाणे होऊन अमले । काय सांगावें ॥ २७॥
येथील येथें अवघेंचि राहतें । ऐसें प्रत्ययास येतें । कोण काय घेऊनि जातें ।
सांगाना कां ॥ २८ ॥ ¹पैदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकाश । येणें
करितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥ जगदीशपरता लाभ नाहीं । कार्याकारण
सर्व कांहीं । संसार करित असतांही । समाधान ॥ ३० ॥ मागां होते जन-
कादिक । राज्य करितही अनेक । तैसेचि आतां ²पुण्यश्लोक । कित्येक असती
॥ ३१ ॥ राजा असतां मृत्यु आला । लक्ष कोटी कबूल झाला । तरी सो-
डीना तयाला । मृत्यु कांहीं ॥ ३२ ॥ ऐसें पराधीन जिणें । यामध्यें दुखणें
वाहणें । नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनी ॥ ३३ ॥ ³हाट भरला
संसाराचा । नफा पहावा देवाचा । तरीच या कष्टाचा । परिहार होतो
॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके कालनिरूपणं
नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. यत्नशिक्षा.
श्रीगणेशाय नमः ॥ दुर्बळ ⁴नैचारी वोडगस्त । आळसी खादाड ऋण-
ग्रस्त । मूर्खपणें अवघें अव्यवस्थ । कांहींच नाहीं ॥ १ ॥ खाया नाहीं जे-
वाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं । आंथराया नाहीं पांघराया नाहीं ।
खोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥ सोयरें नाहीं धायरें नाहीं । इष्ट नाहीं मित्र
नाहीं । पाहतां कोठें ओळख नाहीं । आश्रयेंविण परदेशी ॥ ३ ॥ तेणें कैसें
करावें । काय जीवेसि धरावें । वांचावें कीं मरावें । कोणत्या प्रकारें ॥ ४ ॥
ऐसें कोणी एकें पुसिलें । कोणी एकें उत्तर दीधलें । श्रोतीं सावध ऐकिलें ।
पाहिजे आतां ॥ ५ ॥ लहान थोर काम नाहीं । केल्याविणें होत नाहीं ।
करंट्या सावध पाहीं । ⁵सदैव होसी ॥ ६ ॥ अंतरीं नाहीं सावधानता ।
यत्न ठाकेना पुरता । सुख संतोषाची वार्ता । येथें कैंची ॥ ७ ॥ म्हणोनि
१. सर्व वस्तूंबर. २. पुण्यवान् महात्मे. ३. बाजार. ४. दुर्वर्तनी. ५. भाग्यवान्.
१२ वा. ] यत्नशिक्षा. २८९
आळस सोडावा । यत्न साक्षेपें जोडावा । दुश्चितपणाचा मोडावा । थारा
बळें ॥ ८ ॥ १] प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरोंनि करावें । नित्य नेमें
करावें । पाठांतर ॥ ९ ॥ मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।
बाष्कळपणाची वटवट । करूंांच नये ॥ १० ॥ दिशेकडे दुरी जावें । शुचि-
ष्मंत होऊन यावें । येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥ धूत-
वस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षालनें । देवदर्शन देवतांचें । यथा-
सांग ॥ १२ ॥ कांहीं फळाहार घ्यावा । पुढें व्यवसाय करावा । लोक आ-
पला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥ सुंदर अक्षर ल्याहावें । स्पष्ट नेमस्त
वाचावें । विवरविवैरोनी जाणावें । अर्थांतरें ॥ १४ ॥ नेमस्त नेटकें पुसावें ।
विशद करून सांगावें । प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥ सावधा-
नता असावी । नीति मर्यादा राखावी । जनास माने ऐसी करावी । क्रिया
शुद्ध ॥ १६ ॥ आलियाचें समाधान । हरिकथा निरूपण । सर्वदा प्रसंग
पाहून । वर्तत जावें ॥ १७ ॥ ताळ घाटी मुद्रा शुद्ध । अर्थप्रमेय अन्वय
शुद्ध । गद्य पद्य दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥ गाणें वाजवणें नाचणें ।
हस्तन्यासें दाखवणें । सभारंजनें वचनें । आडकथा छंदबंध ॥ १९ ॥ बहु-
तांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें करावें । विलगं पडोंचि न
द्यावें । कथेमध्यें ॥ २० ॥ लोकांसि उदंड वाँजी आणूं नये । लोकांचें उक-
लावें हृदय । तरी मग स्वभावेंचि होय । नामघोष ॥ २१ ॥ भक्ति ज्ञान
वैराग्य योग । नाना साधनांचे प्रयोग । जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥२२॥
तैसें बोलणें बोलावें । तैसेंच चालणें चालावें । मग महंतलीला स्वभावें ।
अंगीं वाणे ॥ २३ ॥ युक्तीविण साजिरा योग । तो दुराशेचा रोग । संग-
तीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥ ऐसें न करावें सर्वथा । जनास
पाववूं नये व्यथा । हृदयीं चिंतावें समर्था । रघुनाथजीसी ॥ २५ ॥ उदास-
वृत्तीस मानवे जन । विशेष कथानिरूपण । रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाडं
न्यावी ॥ २६ ॥ सांगं महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें ।
नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥ अक्कलबंद नाहीं जेथें । अवघेंचि
१. प्रातःस्मरण. २. पाय धुणें. ३. विचार करकरून. ४. अर्थाचे मर्म. ५.
हाताचे हावभाव. ६. उणें. ७. कंटाळा. ८. निस्पृहपणास. ९. पलीकडे. १०. पूर्ण.
२९० श्रीदासबोध. [ दशक
विस्कळित तेथें । एके अकलेविण तें । काय आहे ॥ २८ ॥ घालून अकलेचा
पंवाड १ । व्हावें ब्रह्मांडाहून वाड २ । तेथें कैचें आणिलें द्वाड । करंटपण ॥२९॥
येथें आशंका फिटली । बुद्धि यत्नीं प्रवेशली । कांहीं एक आशा वाढली ।
अंतर्यामीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके यत्न-
शिक्षानिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. उत्तमपुरुषनिदर्शन.
श्रीगणेशाय नमः ॥ आपण यथेष्ट जेवणें । उरलें अन्न तें वांटणें । परंतु
वायां दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥ तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान
जनांस सांगावें । तरतेनें बुडों न द्यावें । बुडतयासी ॥२॥ उत्तम गुण स्वयें
घ्यावे । ते बहुतांस सांगावे । वर्तल्याविण बोलावें । ते शब्द मिथ्या ॥३॥
स्नान संध्या देवतार्चन । एकाग्र करावें जपध्यान । हरिकथा निरूपण ।
केलें पाहिजे ॥ ४ ॥ शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों न द्यावें । कोणी एकाचें ॥ ५ ॥ अडलें गांजलें जाणावें । यथा-
शक्ति कामास यावें । मृदुवचन बोलत जावें । कोणी एकासी ॥ ६ ॥ दुस-
ऱ्याचे दुःखें दुःखी व्हावें । परसंतोषें सुखी व्हावें । प्राणिमात्रास मेळवून
घ्यावें । बरव्या शब्दें ॥ ७ ॥ बहुतांचे अन्याय क्षमावे । बहुतांचे कार्यभाग
करावे । आपल्यापरी व्हावे । पौरिखे ३ जन ॥ ८ ॥ दुसऱ्याचें अंतर जाणावें ।
तदनुसारचि वर्तावें । लोकांस परीक्षीत जावें । नानाप्रकारें ॥ ९ ॥ नेम-
केंचि बोलावें । तात्काळचि प्रतिवचन द्यावें । कदापि रागासि न यावें ।
क्षमारूपें ॥ १० ॥ आळस अवघाच दवडावा । यत्न उदंडचि करावा । शब्द-
मत्सरें ४ न करावा । कोणी एकाचा ॥ ११ ॥ उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा ।
शब्द निवडून बोलावा । सावधपणें करीत जावा । संसार आपुला ॥ १२ ॥
मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीसी सादर व्हावें । मरोन कीर्तीस उर-
वावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥ नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों
आला । सर्व आर्जवी तयाला । काय उणें ॥ १४ ॥ ऐसा उत्तमगुणी विशेष ।
तयास म्हणावें पुरुष । जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होय ॥ १५॥ उदंड
१. विस्तार. २. मोठें. ३. परकी, दुसरे. ४. अर्थ न पाहतां शब्दवाद करणें.
१२ वा. ] उत्तमपुरुषनिदर्शन. २९१
धिक्कारून बोलती । तरी चळों न द्यावी शांती । दुर्जनासि मिळोन जाती ।
धन्य ते साधु ॥ १६ ॥ उत्तम गुणीं शृंगारिला । ज्ञानवैराग्यें शोभला ।
तोचि एक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥ स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें
सोशीत जावें । झिजोन कीर्तीसीं उरवावें । नानाप्रकारें ॥ १८ ॥ कीर्ति
पाहूं जातां सुख नाहीं । सुख पाहतां कीर्ति नाहीं । विचारेंविण कोठेंचि
नाहीं । समाधान ॥ १९ ॥ १परांतरास न लावावा धक्का । कदापि पडों न
द्यावा चुका । क्षमाशील तयाच्या २तुकों । कोण नाहीं ॥ २० ॥ आपलें अ-
थवा परावें । कार्य अवघेंचि करावें । प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित
नव्हे ॥ २१ ॥ बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें । ३आत्मवत् परा-
वें तें । मानीत जावें ॥ २२ ॥ कठिन शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास
येतें । तरी मग वाईट बोलावें तें । काय निमित्त ॥ २३ ॥ आपणास चि-
मटा घेतला । तेणें कासावीस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखीत
जावें ॥ २४ ॥ जे दुसऱ्यास दुःख करी । ते अपवित्र ४वैखरी । आपणास
घात करी । कोणी एके प्रसंगीं ॥ २५ ॥ पेरीलें तें उगवतें । बोलण्यासारिखें
उत्तर येतें । तरी मग कर्कश बोलावें तें । काय निमित्त ॥ २६ ॥ आपुल्या
५पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षसी
क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठिन वचन । हें अज्ञा-
नाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥ जो उत्तमगुणें शोभला । तोचि
पुरुष महा भला । कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥ क्रिये-
विण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन । भले तेथें अवलोकन । कदापि न
करिती ॥ ३० ॥ मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अगत्य धरणें । तया
महापुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥ ऐसा जो ६महानुभाव । तेणें करा-
वा समुदाय । भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥ आपण
अवचितें मरून जावें । मग भजन कोणें करावें । या कारणें भजनास लावा-
वे । बहुत लोक ॥ ३३ ॥ आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्या-
सी । आपणा मागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥ या कारणें समुदा-
१. दुसऱ्याच्या अंतःकरणास. २. तुलनेस. ३. आपल्याप्रमाणें. ४. वाणी.
५. सामर्थ्यानें. ६. थोर प्रतापाचा पुरुष.
२९२ श्रीदासबोध. [ दशक
व । झाला पाहिजे महोत्सव । हातोपातीं देवाधिदेव । वोळसा करावा
॥ ३५ ॥ आतां समुदायाकारणें । पाहिजेत दोन्ही लक्षणें । श्रोतीं येथें साव-
धपणें । मन घालावें ॥ ३६ ॥ जेणें बहुतांस घडे भक्ती । ते हे रोकडी
प्रबोधशक्ती । बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥ मागों
बोलिले उत्तम गुण । तयांस मानिती प्रमाण । प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें
चाले ॥ ३८ ॥ बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें । तयांचीं वच-
नें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥ जें जनासी मानेना । तें आपले न ये
मना । आपण एकला जन नाना । सृष्टीमध्यें ॥ ४० ॥ म्हणोन सांगाती
असावे । मानत मानत शिष्य करावे । हळू हळू शेवटा न्यावे । विवेकानें
॥ ४१ ॥ परंतु हीं विवेकाचीं कामें । विवेकी करतील नेमें । इतर ते बापुडे
भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥ बहुतांसि भांडतां एकला । सैन्यावांचून
पुरवला । या कारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके उत्तमपुरुषनिदर्शननिरूपणं नाम दशमः स-
मासः ॥ १० ॥ ओंवी २९४.
दशक तेरावा.
१. आत्मानात्मविवेक.
श्रीगणेशाय नमः ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।
विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण ।
त्यांचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥ चारी
खाणी चारी वाणी । चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी । संख्या बोलिली पुराणीं ।
वर्तती आतां ॥ ३ ॥ नाना प्रकारचीं शरीरें । वर्ततां दिसती अपारें । तयां-
मध्यें निर्धारें । आत्मा कवण ॥ ४ ॥ दृष्टीमध्यें पाहतो । श्रवणामध्यें ऐक-
तो । रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥ ५ ॥ घ्राणामध्यें वास घेतो ।
सर्वांगीं तो स्पर्शतो । वाचेमध्यें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६ ॥ सावधा-
१. ताबडतोब. २. उपदेशशक्ति. ३. आत्मा कोण व अनात्मा कोण हा विचार.
१३ वा. ] आत्मानात्मविवेक. २९३
न आणि चंचळ । चहूंकडे चळवळ । एकलाचि चालवी सकळ । इंद्रियद्वारें
॥ ७ ॥ पाय चालवी हात हालवी । अुकुटी पालवी डोळा घालवी । संकेत
खुणा बोलवी । तोचि आत्मा ॥ ८ ॥ धिटांवी लाजवी खाजवी । खोकवी
ओकवी थुंकवी । अन्न जेवून उदक सेवी । तोचि आत्मा ॥ ९ ॥ मळमूत्र-
त्याग करी । शरीर मात्र सांवरी । प्रवृत्ति निवृत्ति विवरी । तोचि आत्मा
॥ १० ॥ ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारें वोळखे । संतोष पावे आणि
धोंके । तोचि आत्मा ॥ ११ ॥ आनंद विनोद उद्वेग चिंता । काया छाया
माया ममता । आत्मत्वें पावे समता । तोचि आत्मा ॥ १२ ॥ पदार्थांची
आस्था धरी । जनीं वाईट बरें करी । आपल्यां राखे पराय्यां मारी । तोचि
आत्मा ॥ १३ ॥ युद्ध होतां दोन्हीकडे । नाना शरीरीं वावडे । परस्परीं
पाडी पडे । तोचि आत्मा ॥ १४ ॥ तो येतो जातो देहीं वर्ततो । हांसतो
[L
२९४ श्रीदासबोध. [ दशक
वरी । ब्रह्मादि पिपीलिका देह धरी¹ । नित्यानित्यविवेक चतुरीं । जाणिजे
ऐसा ॥ २७ ॥ जड तितुकें अनित्य । आणि सूक्ष्म तितुकें नित्य । यांहि
मध्यें नित्यानित्य । पुढें निरूपिलें ॥ २८ ॥ स्थूल सूक्ष्म वोलांडिलें । कार-
ण महाकारण सांडिलें । विराट हिरण्यगर्भ खांडिलें । विवेकानें ॥ २९ ॥
अव्याकृत मूळप्रकृती² । तेथें जाऊन बैसली वृत्ती । ते वृत्ती व्हावया निवृ-
त्ती । निरूपण ऐका ॥ ३० ॥ आत्मानात्मविवेक बोलिला । चंचल आत्मा
प्रत्यया आला । पुढिलिये समासीं निरूपिला । सारासारविचार ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके आत्मानात्मविवेकनिरू-
पणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. सारासारविचार.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका सारासारविचार । उभारलें जगडंबर³ । त्यांत
कोण सार कोण असार । विवेकें ओळखावें ॥ १ ॥ दिसेल तें नासेल । आ-
णि येईल तें जाईल । जें असतांचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥ मागां आ-
त्मानात्मविवेक बोलिला । आत्मा वोळखून सांडिला । आत्मा जाणतां
लागला । मुळींचा तंतू ॥ ३ ॥ मुळीं जे राहिली वृत्ती । ते झाली पाहिजे
निवृत्ती । सारासारविचार श्रोतीं । बरा पहावा ॥ ४ ॥ नित्यानित्यविवेक
केला । आत्मा नित्यसा निवडिला । निवृत्तिरूपें हेत उरला । निर्विकारीं
॥ ५ ॥ हेत म्हणजे तो चंचल । निर्गुण म्हणजे तें निश्चळ । सारासारवि-
चारें चंचल । होऊन जातें ॥ ६ ॥ चले म्हणोनि तें चंचल । न चले म्हणो-
नि निश्चळ । निश्चळीं उडे चंचल । निश्चयेंसी ॥ ७ ॥ ज्ञान आणि उपासना⁴ ।
दोन्ही एकचि पहाना । उपासनेकरितां जना । जगदुद्धार ॥ ८ ॥ द्रष्टा सा-
क्षी जाणता । ज्ञानघन चैतन्य सत्ता । ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥
त्या ज्ञानाचें विज्ञान⁵ होतें । शोधून पाहावें बहुमतें । चंचल अवघें नासतें ।
येणेंप्रकारें ॥ १० ॥ नाशवंत नासेल कीं नासेना । ऐसें अनुमानाचि आहे ।
मना । तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकारी नव्हे ॥ ११ ॥ नित्य नि-
१. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व देह धारण करितो. २. माया, आदिशक्ति.
३. जगाचा पसारा. ४. भक्ति. ५. साक्षात्कार.
१३ वा. ] सारसारविचार. २९५
श्रय केला । संदेह उरतचि गेला । तरी तो जाणावा वाहवला । मायामृग-
जळीं ॥ १२ ॥ क्षयचि नाहीं जो अक्षयी । व्यापकपणें सर्वो ठायीं । तेथें हेतु
संदेह नाहीं । निर्विकारीं ॥ १३ ॥ जें उदंड घनदाट । आद्य मध्य शेवट ।
अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥ पाहतां जैसें गगन । गगनाहून तें
सघन । जनचि नाहीं । निर्जन । सदोदित ॥ १५ ॥ चर्मचक्षु ज्ञानचक्षु ।
हा तो अवघा पूर्वपक्ष । निर्गुण ठायींचें अलक्ष । लक्षवेना ॥ १६ ॥ संग-
त्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । संगत्याग करुनि पाही । मौनें-
गर्भ ॥ १७ ॥ निरसितां अवघेंचि निरसिलें । चंचल तितुकें निघोन गेलें ।
निश्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥ आठवा देह मूळमाया । निरसो-
नि गेल्या अष्टकाया । साधु सांगती उपाया । कृपाळूपणें ॥ १९ ॥ सोहहंस
तत्वमसी । तें तूं ब्रह्म आहेसी । विचार पाहतां स्थिति ऐसी । सहजाचि
होते ॥ २० ॥ साधक असोन ब्रह्म उरलें । तेथें वृत्तिशून्य झालें । सारासार
विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥ तें तापेना ना निवेना । तें उजळेना ना
काळवंडेना । ढहुळेना ना वितळेना । परब्रह्म तें ॥ २२ ॥ तें भिजेना ना
वाळेना । तें विझेना ना जळेना । जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥
२३ ॥ दिसेना ना भासेना । उपजेना ना नासेना । तें येईना ना जाईना ।
परब्रह्म तें ॥ २४ ॥ जें सन्मुखचि चहूंकडे । जेथें दृश्यभास उडे । धन्य
साधु तो पेंहुडे । निर्विकारीं ॥२५॥ निर्विकल्प कल्पनातीत । तोचि ओख-
खावा संत । येर अवघेंचि असंत । भ्रमरूप ॥ २६ ॥ खोटें सांडून खरें
घ्यावें । तरीच परीक्षवंत म्हणावें । असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें
॥ २७ ॥ जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ती तद्रूप होते । आत्म-
निवेदनी भक्ती ते । ऐसी आहे ॥ २८ ॥ वाच्यांशें मुक्ति मुक्ति बोलावी ।
लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी । विवरितां हेतु नुरवी । ते तद्रूपता ॥ २९ ॥
सद्रूप चिद्रूप आणि तद्रूपं । स्वरूप म्हणिजे आपुलें रूप । आपलें रूप म्ह-
णिजे अरूप । तत्त्वनिरसना उपरी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसं-
वादे त्रयोदशदशके सारसारविचारनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
१. अखंड. २. निर्जन. ३. निरास होणारा विचार. ४. शब्दरहित ब्रह्म. ५.
विश्रांति घेतो. ६. क्षणभंगुर. ७. नित्य. ८. ज्ञानरूप. ९. एकरूप.
२९६ श्रीदासबोध. [ दशक
३. उभारणी.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहूनि विशाल ।
निर्मळ आणि निश्चळ । निर्विकारी ॥ १ ॥ ऐसें असतां कित्येक काळ । तेथें
आरंभिला भूगोल । तया भूगोळाचें मूळ । सावध ऐका ॥ २ ॥ परब्रम्ह
असतां निश्चळ । तेथें संकल्प उठिला चंचल । तयास बोलिजे केवळ ।
आदिनारायण ॥ ३ ॥ मूळमाया जगदीश्वर । त्यासि म्हणिजे षड्गुणेश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥ ऐलीकडे गुणक्षोभिणी १ । तेथें
जन्म घेतला त्रिगुणीं । मूळ ओंकाराची मांडणी । तेथूनि जाणावी ॥ ५ ॥
अकार उकार मकार । तिन्ही मिळोन ओंकार । पुढें पंचभूतांचा विस्तार ।
विस्तारला ॥ ६ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्म्यासी । तयापासोनि जन्म
वायूसी । तया वायूपासून तेजासी । जन्म जाहला ॥ ७ ॥ वायूचा कातरा
घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे । सूर्यबिंब तें प्रगटे । तथें ठायीं ॥ ८ ॥ वारा
वाजतो शीतल । तेथें निर्माण झालें जल । तें जल आळोनि भूगोल । निर्माण
झाला ॥ ९ ॥ त्या भूगोळाचे पोटीं । अनंत बीजांचिया कोटी । पृथ्वीपाण्या
होतां भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥ पृथ्वीवरी वल्ली नानारंग । पत्र पुष्पांचे
तरंग । नाना स्वाद तेथें मग । फलें जाहलीं ॥ ११ ॥ पत्रें पुष्पें फलें मूळें ।
नाना वर्ण नाना रसाळें । नाना धान्यें अन्नं केवळें । तेथून जाहलीं ॥ १२ ॥
अन्नापासुनि झालें रेत । रेतापासून प्राणी निपजत । ऐसी हे रोकडी प्रचीत २ ।
उत्पत्तीची ॥ १३ ॥ अंडज जारज स्वेदज उद्भिज । पृथ्वी पाणी सकळांचें
बीज । ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥ चारी खाणी चारी वाणी ।
चौऱ्यायंशी लक्ष जीवयोनी । निर्माण झाले लोक तिन्ही । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥
मुळीं अष्टधा प्रकृती । अवघे पाण्यापासून जन्मती । पाणी नसतां मरती ।
सकळ प्राणी ॥ १६ ॥ नव्हे अनुमानाचें बोलणें । याचा बरा प्रत्यय घेणें ।
वेद शास्त्रे पुराणे । प्रत्ययें घ्यावी ॥ १७ ॥ जें आपल्या प्रत्यया येईना । तें
अनुमानिक घ्यावें ना । प्रत्ययेंविण सकळ जना । व्यवसाय नाहीं ॥ १८ ॥
व्यवसाय प्रवृत्ति निवृत्ति । दोहोंकडे पाहिजे प्रचीती । प्रचीतीविण अनुमानें
असती । ते विवेकहीन ॥ १९ ॥ ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकलित ३
१. त्रिगुणांना प्रगट करणारी. २. निश्चितपणा. ३. संक्षेपानें.
१३ वा.] प्रलय. २९७
बोलिला प्रकार । आतां विस्ताराचा संहार । तोही ऐका ॥ २० ॥ मुळा-
पासून शेवटवरी । अवघा अंतरात्माचि करी । करी आणि विवरी । यथा-
योग्य ॥ २१॥ पुढें संहार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला । इतुक्त्या उपरी
झाला । समास पूर्ण ॥ २२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके
उभारणीनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. प्रलय.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत ।
ऐसा समाचार साद्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥ शतवर्ष अनावृष्टी । तेणें
जळेल हे सृष्टी । पर्वत माती ऐसी पृष्ठी² । भूमीची तडके ॥ २ ॥ बारा
कळीं सूर्यमंडळा । किरणापासूनी निघती ज्वाळा । शत वर्षें भूगोळा ।
दहन होय ॥ ३ ॥ सिंदूरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरां³ । तो
आहोंळोन⁴ सरारां । विष वमी ॥ ४ ॥ त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें
पाताळें जळती । महापावकें⁵ भस्म होती । पाताळलोक ॥ ५ ॥ तेथें महा-
भूतें खवळती । प्रलयवात सुटती । प्रलयपावक वाढती । चहूकडे ॥ ६ ॥
तेथें अक्रा रुद्र खवळले । बारां⁶ सूर्य कडाडिले । पावकमात्र एकवटिले ।
प्रलयकाळीं ॥ ७ ॥ वायु विजांचे तडाके । तेथें पृथ्वी अवघीच तडके ।
कठिनत्व अवघेंचि फांके । चहूकडे ॥ ८ ॥ तेथें मेरूची कोण गणना ।
कोण सांभाळील कोणा । चंद्र सूर्य तारागणा । मूस जाहली ॥ ९ ॥ पृथ्वीनें
विरी⁷ सांडिली । अवघी धगधगायमान झाली । ब्रह्मांडभट्टी जळोन गेली ।
एकसरा ॥ १० ॥ जळानें विरी⁷ सांडिली । विशेष महावृष्टि झाली । तेणें
पृथ्वी मिळाली । जळामध्यें ॥ ११ ॥ भाजला चुना जळीं विरे । तैसा
पृथ्वीस धीर न धरे । विरी सांडूनियां त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥ शेष
कूर्म वराह गेला । पृथ्वीचा आधार तुटला । सैंधव सांडून जळाला । मिळोन
गेली ॥ १३ ॥ तेथें प्रलयमेघ उचलले । कठिन घोरें गर्जिन्नले । अखंड
१. नासतील. २. पृष्ठभाग. ३. शेषाला. ४. पोळून जाऊन ५. प्रलयाग्नीनें.
६. मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषा, हिरण्यगर्भ, मरीचि, आदित्य, सविता, अर्क,
व भास्कर हे बारा सूर्य. ७. शक्ति, जिवटपणा.
विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥ पर्वतप्राय पडती गारा । पर्वत
उडती ऐसा वारा । निबिड तया अंधकारा । उपमाच नाहीं ॥ १५ ॥ सिंधु
नद्या एकवटल्या । भेणें नभींहूनि रिचवल्या । संधी नाहीं धारा मिळाल्या
अखंड पाणी ॥ १६ ॥ तेथें मत्स्य कूर्म सर्प पडती । पर्वतासारखे दिसती
गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥ सप्त सिंधु आवरणीं गेले
आवरण वेढे मोकळे झाले । जळरूप झालिया खवळले । प्रलयपावक
॥ १८ ॥ ब्रह्मांडा ऐसा तप्त लोहो । शोषी जलाचा समूहो । तैसें जळ
झालें पाहो । अपूर्व मोठें ॥ १९ ॥ तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य
माजला वन्ही । तया वन्हीस केली झडपणी । प्रलयवातें ॥ २० ॥ दीपासी
पालवें घातला । तैसा प्रलयपावक विझाला । पुढें वायु प्रबळला । असं-
भाव्य ॥ २१ ॥ उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा ।
पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥ महद्भूत मूळमाया । विस्मरणें
वितुळे काया । पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥ दृश्य हलक-
ल्लोळें नेलें । जड चंचळ वितुळलें । या उपरि शाश्वत उरलें । परब्रह्म तें
॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रलयनिरूपणं
नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. काहाणी.
श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन ।
कालक्रमणे लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥ श्रोता पुसे वक्तयासी । का-
हणी सांगा बरवीसी । वक्ता म्हण श्रोतयांसी । सावध ऐका ॥ २ ॥ एक
स्त्रीपुरुषें होतीं । उभयतांमध्ये बहु प्रीती । एकरूपेंचि वर्तती । भिन्न नाहीं
॥ ३ ॥ ऐसा कांहींएक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता
आणी भला । सर्वविषयीं ॥ ४ ॥ पुढें त्यासही झाला कुमर् । तो पित्याहून
आतुर । कांहीं तदर्थ चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥ तेणें व्याप उदंड केला ।
बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥ त्याचा
१. ओतल्या. २. फुंकर. ३. हाहाकारें. ४. प्रकृति व पुरुष. ५. सत्वगुण;
विष्णु. ६. रजोगुण; ब्रह्मा. ७. चंचल. ८. बापाच्या निमे. ९. कर्तृत्वानें.
पुत्र जो ज्येष्ठ¹. तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकतां नीट । संहार
करी ॥ ७ ॥ पिता² उगाच बैसला । लेकें³ बहुत व्याप केला । सर्व जाणता
भला । ज्येष्ठ पुत्र⁴ ॥ ८ ॥ नातू त्याचें अर्थ जाणे । पणतूं तो कांहींच नेणे ।
चुकतांचि संहारणें । महाक्रोधी ॥ ९ ॥ लेंकें सकळांचें पाळण करी । नातू
मेळवी वरच्या⁵वरी । पणतूं चुकल्या संहार करी । अकस्मात ॥ १० ॥ नेम-
स्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि झाला । ऐसा बहुत काळ गेला ।
आनंदरूप ॥ ११ ॥ विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना ।
परस्परें किंतु मना । बहुत पडिले ॥ १२ ॥ उदंड घरकलह लागला । तेणें
कित्येक संहार झाला । विपर्त⁶ पडिलें थोर थोरांला । बेबंद जाहलें ॥ १३ ॥
नेणपणें भरीं भरले । मग ते अवघे संहारले । जैसे यादव निमाले । उन्मत्त-
पणें ॥ १४ ॥ बाप लेंकें नातू पणतूं । सकळांचा झाला निःपातु । कन्यापुत्र
हेतुमातू⁷ । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥ ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्म-
मृत्युपासून सुटला । श्रोता वक्ता धन्य झाला । प्रचीतीनें ॥ १६ ॥ ऐसी
काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होते जाते । इतुकें बोलून गोसावी ते ।
निवांत जाहले ॥ १७ ॥ आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो । ऐसें
हें बोलणें विवरो । कोणी तरी ॥ १८ ॥ चुकत वाकत आठवलें । तितुकें
संकाळित बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥ ऐसी
काहाणी निरंतर । विवेकें ऐकती नर । दास म्हणे जगदुद्धार । तेचि करिती
॥ २० ॥ त्या जगदुद्धाराचें लक्षण । केलें पाहिजे विवरण । सार निवडावें
निरूपण । यासी बोलिजे ॥ २१ ॥ निरूपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्व-
कोडें उकलावें । समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥ विवरोन
पाहतां अष्टदेह । पुढें सहजाचि निःसंदेह । अखंड निरूपणें राहे । समाधान
॥ २३ ॥ तत्त्वांचा गलबला जेथें । निवांत कैसें असेल तेथें । या कारणें गुलि⁸-
परतें । कोणी एकें असावें ॥ २४ ॥ ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद ।
पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे त्रयोदशदशके काहाणीनिरूपणं नाम पंचम समासः ॥ ५ ॥
१. तमोगुण; शंकर. २. मूळ पुरुष. ३. सत्त्वगुण; विष्णु. ४. रजोगुण; ब्रम्हा. ५.
पुनःपुन्हा. ६. वांकडें. ७. कन्यापुत्रांचा हेतु किंवा गोष्ट. ८. गलबल्यापासून दूर.
३०० श्रीदासबोध. [ दशक
६. लघुबोध.
श्रीगणेशाय नमः ॥ जे जे बोलिजेती पंचतत्त्वें । त्यांचीं अभ्यासावीं
नांवें । तदुपरी स्वानुभवें । रूपें जाणावीं ॥ १ ॥ यामध्यें शाश्वत कोण ।
आणि अशाश्वत कोण । ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥ पंचभूतांचा
विचार । नांव रूप सारासार । तोचि बोलिजेल निर्धार । सावध ऐका ॥३॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । नांवें बोलिलीं सावकाश । आतां रूपाचा
विश्वास । श्रवण करावा ॥ ४ ॥ पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे
तें पाणी । तेज म्हणिजे अग्नि तरणी² । सतेजादिक ॥ ५ ॥ वायु म्हणिजे
तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा । आतां शाश्वत तें विचारा । आपुले
मनीं ॥ ६ ॥ एक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें । तैसें थोडया
अनुभवें । बहुत जाणावें ॥ ७ ॥ पृथ्वी रचते आणि खचते । हें तों प्रत्य-
यास येतें । नाना रचना होत जाते । सृष्टीमध्यें ॥ ८ ॥ म्हणोन रचतें तें
खचतें । आप तेंहि आटोन जातें । तेजहि प्रगटोन विझतें । वारेंही न राहे
॥ ९ ॥ अवकाश नाममात्र आहे । तेंहि विचारितां न राहे । एवं पांच-
भौतिक राहे । हें तों घडेना ॥ १० ॥ ऐसा पांच भूतांचा विस्तार । नाश-
वंत हा निर्धार । शाश्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥ तो
आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना । म्हणोनिया संतजनां । वि-
चारावें ॥ १२ ॥ विचारितां सज्जनांसी । ते म्हणती कीं अविनाशी । जन्म
मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥ निराकारीं भासे आकार । आणि
आकारीं भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेकें ओळखावा
॥ १४ ॥ निराकार म्हणावा नित्य । आकार म्हणावा अनित्य । यासि बो-
लिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥ सारीं भासे असार । आणि असारीं
भासे सार । सारासार विचार । शोधून पाहतां ॥ १६ ॥ पांचभौतिक तें मा-
यिक । परंतु भासे अनेक । आणि आत्मा एक । व्यापून असे ॥ १७ ॥ चहूं
भूतांमध्ये गगन । तैसें गगनीं असे सघन³ । नेहैटून⁴ पाहतां अभिन्न⁵ । गगन
आणि वस्तु ॥ १८॥ उपाधियोगेंचि आकाश । उपाधि नसतां निराभास । निरा--
१ शिंगणवाडी येथे शिवाजी महाराजांस श्रीसमर्थांनीं हा उपदेश केला, असें
म्हणतात. २. सूर्य. ३. दाट. ४. बारकाईनें. ५. एकच.
१३ वा. ] प्रत्यय. ३०१
भास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥ आतां असो हे विवंचना । परंतु
जें पाहतां नासेना । तगे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥ परमात्मा
तो निराकार । जाणिजे हाचि विचारसार । आणि आपण कोण हा विचार ।
पाहिला पाहिजे ॥ २१ ॥ देहास अंत येतां । वायु जातो तत्वतां । लटिकें
म्हणाल तरी आतां । श्वासोच्छ्वास धरावा ॥ २२ ॥ श्वास कोंडतां देह पडे ।
देह पडतां म्हणती मडें । मड्यास कर्तव्य न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥
देहावेगळा वायु न करी । वायुवेगळा देह न धरी । विचार पाहतां कांहींच
न करी । एका वेगळें एक ॥ २४ ॥ उगेंच पाहतां मनुष्य दिसे । विचार
घेतां कांहींच नसे । अभेदभक्तीचें लक्षण ऐसें । ओळखावें ॥ २५ ॥ कर्ता
आपण ऐसें म्हणावें । तरी आपले इच्छेसारिखें व्हावें । इच्छेसारिखें न
होतां मानावें । अवघेंचि वाव ॥ २६ ॥ म्हणोन कर्ता नव्हे कीं आपण ।
तेथें भोक्ता कैंचा कोण । हेंचि विचाराचें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥
अविचार आणि विचार । जैसा प्रकाश आणि अंधकार । विकार आणि
निर्विकार । एक नव्हे कीं ॥ २८ ॥ जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच
चालेना । खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥ प्रत्ययासि बोलिजे न्याय ।
अप्रत्यय तो अन्याय । जात्यंधास१ परीक्षा काय । नाना रत्नांची ॥ ३० ॥
म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणासि अनन्य । आत्मनिवेदनें मान्य ।
परम पुरुष ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके लघु-
बोधनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. प्रत्यय.
श्रीगणेशाय नमः ॥ निर्मळ निश्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश ।
आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥ आधीं पैस मग पदार्थ ।
प्रत्यक्ष पाहतां यथार्थ । प्रत्यक्षेविण पाहतां व्यर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥
ब्रह्म म्हणिजे तें निश्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचल । तयास दृष्टांत के-
वळ । वायु जाणावा ॥ ३ ॥ घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटीं बिंब दृष्टांत
आत्म्याचा । विवरितां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥ भूत म्हणिजे जि-
१. जन्मांधास. २. देहसमर्पण केल्यानें.
३०२ श्रीदासबोध. [ दशक
तुकें झालें । झालें तितुकें निमालें । चंचळ आलें आणि गेलें । ऐसें जाणावें
॥ ५ ॥ अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ । दोन्ही ज-
ळोन तात्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥ ब्रह्म आकाश निश्चळ जाती । आत्मा
वायु चंचळ जाती । परीक्षवंत परीक्षिती । खरें कीं खोटें ॥ ७ ॥ जड अ-
नेक आत्मा एक । ऐसा आत्मानात्मविवेक । जगा वर्तवी जगन्नायक ।
तयास म्हणावें ॥ ८ ॥ जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वी वर्ते सर्वात्मा ।
अवघा मिळोन चंचळ आत्मा । निश्चळ नव्हे ॥ ९ ॥ निश्चळ तें परब्रह्म ।
तेथें नाहीं दृश्यभान । विमळ ब्रह्म तें निर्भ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥ आधीं
आत्मानात्मविवेक थोर । मग सारासारविचार । सारासारविचारें संहार ।
प्रकृतीचा ॥ ११ ॥ विचारें प्रकृति संहारे । दृश्य असतांच वोसरे । अंत-
रात्मा निर्गुणीं संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥ चढता अर्थ लागला । तरी
अंतरात्मा चढतचि गेला । उतरल्या अर्थे उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥
अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो । अनुमानें संदेहीं
पडतो । कांहीं एक ॥ १४ ॥ निःसंदेह अर्थ चालिला । तरी आत्मा निः-
संदेहचि झाला । अनुमान अर्थे झाला । अनुमानरूपी ॥ १५ ॥ नवरसिकं
अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि झाले । चाटपणें होऊन गेले । चाटाचि अवघे
॥ १६ ॥ जैसा जैसा पडे प्रसंग । तैसे गुहिऱ्यांचे रंग । या कारणें उत्तम
मार्ग पाहोन । धरावा ॥ १७ ॥ उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाका-
रचि झालें । लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥ पदार्थ-
वर्णन आवघें । किती म्हणोन सांगावें । परंतु अंतरीं समजावें । होय कीं
नव्हे ॥ १९ ॥ जें जें देखिलें आणि ऐकिलें । तें अंतरीं सदृढ बैसलें । हित
अनहित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥ या कारणें सर्व सांडावें । एक दे-
वास धुंडावें । तरी वर्म पडे ठावें । कांहीं एक ॥ २१ ॥ नाना सुखें देवें
केलीं । लोकें तयास चुकलीं । ऐसीं चुकतांच मेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥
सर्व सांडून शोधा मजला । ऐसा देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य
केला । भगवंताचा ॥ २३ ॥ म्हणोनि नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी
होती । मनीं सुखचि इच्छिती । परी तें कैंचें ॥ २४ ॥ उदंड सुख जया
१ . सरड्याचे. २. 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज'-गीता, अ. १८.
१३ वा.] कर्तूलक्षण. ३०३
लांगलें । वेडे तयास चुकले । सुख सुख म्हणतांच मेले । दुःख भोगीत
॥ २५ ॥ शाहण्यानें ऐसें न करावें । सुख होय तेंचि करावें । देवास धुं-
डीत जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥ मुख्य देवचि ठायीं पडला । मग काय
उणें तयाला । लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥ २७॥ विवेकाचें फळ
तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख । यांत मानेल तें अवश्य । केलें पा-
हिजे ॥ २८ ॥ कत्यांसि ओळखावें । यासि विवेक म्हणावें । विवक सां-
डितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥ आतां असो हें बोलणें । कत्यांस ओळ-
खणें । आपलें हित विचक्षणें २ । चुकों नये ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रत्ययनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. कर्तृलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । कोण कर्ता निश्चयेंसी ।
सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥ तंव बोलिले सभानायक । जे
बोलिके एकाहून एक । या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर परिसावें ॥ २॥
एक म्हणती कर्ता देव । एक म्हणती कोण देव । आपुलाला अभिप्राय ।
सृष्टीमध्यें बोलती ॥ ३ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थे बोलती स्पष्ट ।
आपुलाली उपासना ३ श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४॥ कोणी एक ऐसें म्हणती ।
कर्ता देव मंगळमूर्ती ४ । एक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥ एक म्ह-
णती कर्ता भैरव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती बरिदेव । एक
म्हणती भगवती ॥ ६ ॥ एक म्हणती नरहरी । एक म्हणती बनशंकरी । एक
म्हणती सर्व करी । नारायण ॥ ७ ॥ एक म्हणती श्रीराम कर्ता । एक म्ह-
णती श्रीकृष्ण कर्ता । एक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥ एक
म्हणती पांडुरंग । एक म्हणती श्रीरंग । एक म्हणती झोटिंग । सर्व करी
॥ ९ ॥ एक म्हणती मुंज्या कर्ता । एक म्हणती सूर्य कर्ता । एक म्हणती
अग्नि कर्ता । सर्व कांहीं ॥ १० ॥ एक म्हणती लक्ष्मी करी । एक म्हणती
मारुती करी । एक म्हणती धरित्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥ एक म्हणती
तुकाई । एक म्हणती यमाई । एक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥
१. वृक्षाला फळें लागतात तसें. २. शहाण्यानें. ३. उपास्य दैवत. ४. गणपती.
एक म्हणती भार्गव कर्ता । एक म्हणती वामन कर्ता । एक म्हणती पर-
मात्मा कर्ता । एकाचि आहे ॥ १३ ॥ एक म्हणती विरंणी कर्ता । एक म्ह-
णती बस्र्वणी कर्ता । एक म्हणती रेवंणी कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥ एक
म्हणती रवळैया कर्ता । एक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता । एक म्हणती व्यं-
कटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥ एक म्हणती गुरु कर्ता । एक म्हणती दत्त
कर्ता । एक म्हणती मुख्य कर्ता । वोढैया जगन्नाथ ॥ १६ ॥ एक म्हणती
ब्रह्मा कर्ता । एक म्हणती विष्णु कर्ता । एक म्हणती महेश कर्ता । निश्च-
येंसी ॥ १७ ॥ एक म्हणती पर्जन्य कर्ता । एक म्हणती वायु कर्ता । एक
म्हणती करून अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥ एक म्हणती माया करी । एक
म्हणती जीव करी । एक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥ एक
म्हणती प्रयत्न करी । एक म्हणती स्वभाव करी । एक म्हणती कोण करी ।
कोण जाणे ॥ २० ॥ ऐसा कत्यांचा विचार । पुसतां भरला बाजार । आतां
कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥ जिहीं जो देव मानिला । कर्ता म्ह-
णती तयाला । ऐसा लोकांचा गलबला । बोसरेना ॥ २२ ॥ आपुलाल्या
साभिमानें । निश्चय केला मनें । याचा विचार पाहणें । घडेचिना ॥ २३ ॥
बहुत लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार । परंतु याचा विचार ।
ऐसा आहे ॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । निश्चयें तोडावें अनुमान ।
प्रत्ययें मानावें प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥ जें जें कर्त्यानें केलें । तें तें
त्या उपरी झालें । कर्त्या पूर्वी आढळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥ केलें तें पांच-
भौतिक । आणि पांचभौतिक ब्रह्मादिक । तरी भूतांशीं पांचभौतिक । केलें
तें घडेना ॥ २७ ॥ पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें । पां-
चभौतिक स्वभावें । कर्त्यांत आलें ॥ २८ ॥ पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें
नाहीं कर्तेपण । निर्विकारासि विकार कोण । लावूं शके ॥ २९ ॥ निर्गुणास
कर्तव्य न घडे । सगुण झाल्यांत सांपडे । आतां कर्तव्यता कोणीकडे । पडे
पाहा ॥ ३० ॥ लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण । म्हणोन हें
प्रमाण । जें स्वभावेंचि जाहलें ॥ ३१ ॥ एक सगुण एक निर्गुण । कोठें लावूं
कर्तेपण । या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥ सगुणें सगुण केलें । तरी
१. जैन लोकांचे देव. २. कोंकणांतील एक दैवत. ४. ओढ्या प्रांतांतील.
१३ वा. ] आत्मविवरण. ३०५
तें पूर्वींच आहे झालें । निर्गुणास कर्तव्य लाविलें । न वचे कदा ॥ ३३ ॥
येथें कर्ता दिसेना । प्रत्यय आणावा अनुमाना । दृश्य सत्यत्वें असेना ।
म्हणोनियां ॥ ३४ ॥ केलें तें अवघेंचि लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि
फिकें । वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥ बरें पाहातां प्रत्यय आला ।
तरी कां करावा गलबला । प्रचीत आलिया आपणाला । अंतर्यामीं ॥ ३६ ॥
आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे । पूर्वपक्ष¹ लागे उडवणें ।
येन्हवीं अनिर्वाच्य ॥ ३७ ॥ तंव श्रोता करी प्रश्न । देहीं सुखदुःख भोक्ता
कोण । पुढें हेंचि निरूपण । बोलिलें असे ॥ ३८ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे त्रयोदशदशके कर्तृलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. आत्मविवरण.
श्रीगणेशाय नमः ॥ आत्म्यास शरीरयोगें । उद्वेग चिंता करणें लागे ।
शरीरयोगें आत्मा तगे । हें तों प्रगटचि आहे ॥ १ ॥ देह अन्नाचिखाईना ।
तरी आत्मा कदापि तगेना । आत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥
हें एका वेगळें एक । करूं जातां निरर्थक । उभययोगें कोणी एक । कार्य
चाले ॥ ३ ॥ देहाला नाहीं चेतना । आत्म्यास पदार्थ उचलेना । स्वप्न-
भोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥ आत्मा स्वप्न अवस्थेंत जातो । परंतु
देहामध्येंहि असतो । निदसुरेपेंणें² खाजवितो । चमत्कार पाहा ॥ ५ ॥ अन्न-
रसें वाढे शरीर । शरीराप्रमाणें विचार । वृद्धपणीं तदनंतर । दोन्ही लहा-
नाळती³ ॥ ६ ॥ उन्मत्तें⁴ द्रव्यें देह खातो । देहयोगें आत्मा झुलतो । विस्म-
रणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥ देहानें घेतलें विष । आत्मा जाय
सावकाश । वाढणें मोडणें आत्म्यास । नेमस्त आहे ॥ ८ ॥ वाढणें मो-
डणें जाणें येणें । सुखदुःख देहाचेनि गुणें । नाना प्रकारें भोगणें । आत्म-
यासि घडे ॥ ९ ॥ वारूळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ । तैसें-
चि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥ शरीर नाडीचा खेटा⁵ । नाडीमध्यें
पोकळ वाटा । लहान थोर सगटा । दाटल्या नाडी ॥ ११ ॥ प्राणी अन्नोदक
घेतो । त्यांचा अन्नरस होतो । त्यास वायु प्रवर्ततो । श्वासोच्छ्वासें ॥ १२ ॥
१. शंका. २. झोपेंत. ३. क्षीण होतात. ४. मादक पदार्थ. ५. खँचाखँच.
३०६ श्रीदासबोध. [ दशक
नाडीद्वारा धांवे जीवनै । जीवनामध्ये खेले पवनै । त्या पवनासरिसा जाण ।
आत्माहि विचैरै ॥ १३ ॥ तृषेनें शोषलें शरीर । आत्म्यास कळे हा वि-
चार । मग उठोन धांवे शरीर । उदकाकडे ॥ १४ ॥ उदक मागे शब्द बो-
लवी । मार्ग पाहाेन शरीर चालवी । शरीर अवघेंच हालवी । प्रसंगानुसार
॥ १५ ॥ क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहाला उठवितो । अचावाचा
बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥ बायकोस म्हणे झालें झालें । देह साँ-
वळें करुनि आणिलें । पायांत भरोनं चालविलें । तांतडी तांतडी ॥ १७ ॥
त्यास पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरौन पात्र पाहिलें । हातांकरवीं आरंभिलें ।
आपोशन ॥१८॥ हातांकरवीं ग्रास उचलवी । मुखीं जाऊनि मुख पसरवी।
दांतांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥१९॥ आपण जिव्हेमध्यें खेले। पाहतो परिमळ
सोहळे । केश काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥ अळणी कळतां मीठ
मागे । बावलेस म्हणे अगे कांगे । डोळे तापून पाहों लागे । रागें रागें ॥२१॥
गोडी लागतांच आनंदे । गोडी नसतां परम खेदे । वांकडी गोष्टी अंतरीं
भेदे । आत्मयासी ॥ २२॥ नाना अन्नांची गोडी । नाना रसस्वाद निवडी ।
तिखट लागतांच मस्तक झाडी । आणि खोंकी ॥ २३ ॥ मिरपुडी घातली
फार । कायसें करितें खापर । जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें
॥ २४ ॥ आज उदंड जेविला । सर्वैच तांब्या उछलिला । घळघळां घेऊं
लागला । सावकाश ॥ २५॥ देहीं सुखदुःख भोक्ता । तो एक आत्माचि
पाहतां । आत्म्याविण देह वृथा । मडें होय ॥ २६ ॥ मनाच्या अनंत वृत्ती ।
जाणणें तेचि आत्मस्थिती । त्रैलोकीं जितुक्या व्यक्ती । तदंतरीं आत्मा
॥ २७ ॥ जगामध्यें जगदात्मा । विश्वामध्यें विश्वात्मा । सर्व चालवी सर्वा-
त्मा । नाना रूपें ॥ २८ ॥ हुंगे चाखे देखे ऐके । मृदु कठिण वोळखे । शीत
उष्ण ठाउकें । तात्काळ होय ॥ २९ ॥ सावधपणें लाघैवी । बहुत करी उ-
ठाठेवी । या धूर्तांच्या उर्गवी । धूर्ताच करी ॥ ३० ॥ वायूसरिसा परिमळु
येतो । परी तो परिमळ वितळोन जातो । वायु धुळी घेऊन येतो । परी
तोहि जाय ॥३१॥ शीत उष्ण वायूसरिसें । सुवासें अथवा कुवासें । असिजे
परी सावकाशें । तगणें न घडे ॥ ३२ ॥ वायूसरिसे रोग येती । वायूस-
१. पाणी. २. वायु. ३. वावरतो. ४. आत्मस्वरूप. ५. चतुर. ६. उलगडा.