दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 334, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपुत्र जो ज्येष्ठ¹. तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकतां नीट । संहार
करी ॥ ७ ॥ पिता² उगाच बैसला । लेकें³ बहुत व्याप केला । सर्व जाणता
भला । ज्येष्ठ पुत्र⁴ ॥ ८ ॥ नातू त्याचें अर्थ जाणे । पणतूं तो कांहींच नेणे ।
चुकतांचि संहारणें । महाक्रोधी ॥ ९ ॥ लेंकें सकळांचें पाळण करी । नातू
मेळवी वरच्या⁵वरी । पणतूं चुकल्या संहार करी । अकस्मात ॥ १० ॥ नेम-
स्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि झाला । ऐसा बहुत काळ गेला ।
आनंदरूप ॥ ११ ॥ विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना ।
परस्परें किंतु मना । बहुत पडिले ॥ १२ ॥ उदंड घरकलह लागला । तेणें
कित्येक संहार झाला । विपर्त⁶ पडिलें थोर थोरांला । बेबंद जाहलें ॥ १३ ॥
नेणपणें भरीं भरले । मग ते अवघे संहारले । जैसे यादव निमाले । उन्मत्त-
पणें ॥ १४ ॥ बाप लेंकें नातू पणतूं । सकळांचा झाला निःपातु । कन्यापुत्र
हेतुमातू⁷ । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥ ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्म-
मृत्युपासून सुटला । श्रोता वक्ता धन्य झाला । प्रचीतीनें ॥ १६ ॥ ऐसी
काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होते जाते । इतुकें बोलून गोसावी ते ।
निवांत जाहले ॥ १७ ॥ आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो । ऐसें
हें बोलणें विवरो । कोणी तरी ॥ १८ ॥ चुकत वाकत आठवलें । तितुकें
संकाळित बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥ ऐसी
काहाणी निरंतर । विवेकें ऐकती नर । दास म्हणे जगदुद्धार । तेचि करिती
॥ २० ॥ त्या जगदुद्धाराचें लक्षण । केलें पाहिजे विवरण । सार निवडावें
निरूपण । यासी बोलिजे ॥ २१ ॥ निरूपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्व-
कोडें उकलावें । समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥ विवरोन
पाहतां अष्टदेह । पुढें सहजाचि निःसंदेह । अखंड निरूपणें राहे । समाधान
॥ २३ ॥ तत्त्वांचा गलबला जेथें । निवांत कैसें असेल तेथें । या कारणें गुलि⁸-
परतें । कोणी एकें असावें ॥ २४ ॥ ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद ।
पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे त्रयोदशदशके काहाणीनिरूपणं नाम पंचम समासः ॥ ५ ॥
१. तमोगुण; शंकर. २. मूळ पुरुष. ३. सत्त्वगुण; विष्णु. ४. रजोगुण; ब्रम्हा. ५.
पुनःपुन्हा. ६. वांकडें. ७. कन्यापुत्रांचा हेतु किंवा गोष्ट. ८. गलबल्यापासून दूर.