दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 335, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३०० श्रीदासबोध. [ दशक
६. लघुबोध.
श्रीगणेशाय नमः ॥ जे जे बोलिजेती पंचतत्त्वें । त्यांचीं अभ्यासावीं
नांवें । तदुपरी स्वानुभवें । रूपें जाणावीं ॥ १ ॥ यामध्यें शाश्वत कोण ।
आणि अशाश्वत कोण । ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥ पंचभूतांचा
विचार । नांव रूप सारासार । तोचि बोलिजेल निर्धार । सावध ऐका ॥३॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । नांवें बोलिलीं सावकाश । आतां रूपाचा
विश्वास । श्रवण करावा ॥ ४ ॥ पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे
तें पाणी । तेज म्हणिजे अग्नि तरणी² । सतेजादिक ॥ ५ ॥ वायु म्हणिजे
तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा । आतां शाश्वत तें विचारा । आपुले
मनीं ॥ ६ ॥ एक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें । तैसें थोडया
अनुभवें । बहुत जाणावें ॥ ७ ॥ पृथ्वी रचते आणि खचते । हें तों प्रत्य-
यास येतें । नाना रचना होत जाते । सृष्टीमध्यें ॥ ८ ॥ म्हणोन रचतें तें
खचतें । आप तेंहि आटोन जातें । तेजहि प्रगटोन विझतें । वारेंही न राहे
॥ ९ ॥ अवकाश नाममात्र आहे । तेंहि विचारितां न राहे । एवं पांच-
भौतिक राहे । हें तों घडेना ॥ १० ॥ ऐसा पांच भूतांचा विस्तार । नाश-
वंत हा निर्धार । शाश्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥ तो
आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना । म्हणोनिया संतजनां । वि-
चारावें ॥ १२ ॥ विचारितां सज्जनांसी । ते म्हणती कीं अविनाशी । जन्म
मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥ निराकारीं भासे आकार । आणि
आकारीं भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेकें ओळखावा
॥ १४ ॥ निराकार म्हणावा नित्य । आकार म्हणावा अनित्य । यासि बो-
लिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥ सारीं भासे असार । आणि असारीं
भासे सार । सारासार विचार । शोधून पाहतां ॥ १६ ॥ पांचभौतिक तें मा-
यिक । परंतु भासे अनेक । आणि आत्मा एक । व्यापून असे ॥ १७ ॥ चहूं
भूतांमध्ये गगन । तैसें गगनीं असे सघन³ । नेहैटून⁴ पाहतां अभिन्न⁵ । गगन
आणि वस्तु ॥ १८॥ उपाधियोगेंचि आकाश । उपाधि नसतां निराभास । निरा--
१ शिंगणवाडी येथे शिवाजी महाराजांस श्रीसमर्थांनीं हा उपदेश केला, असें
म्हणतात. २. सूर्य. ३. दाट. ४. बारकाईनें. ५. एकच.