दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 338, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३ वा.] कर्तूलक्षण. ३०३
लांगलें । वेडे तयास चुकले । सुख सुख म्हणतांच मेले । दुःख भोगीत
॥ २५ ॥ शाहण्यानें ऐसें न करावें । सुख होय तेंचि करावें । देवास धुं-
डीत जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥ मुख्य देवचि ठायीं पडला । मग काय
उणें तयाला । लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥ २७॥ विवेकाचें फळ
तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख । यांत मानेल तें अवश्य । केलें पा-
हिजे ॥ २८ ॥ कत्यांसि ओळखावें । यासि विवेक म्हणावें । विवक सां-
डितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥ आतां असो हें बोलणें । कत्यांस ओळ-
खणें । आपलें हित विचक्षणें २ । चुकों नये ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रत्ययनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. कर्तृलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । कोण कर्ता निश्चयेंसी ।
सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥ तंव बोलिले सभानायक । जे
बोलिके एकाहून एक । या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर परिसावें ॥ २॥
एक म्हणती कर्ता देव । एक म्हणती कोण देव । आपुलाला अभिप्राय ।
सृष्टीमध्यें बोलती ॥ ३ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थे बोलती स्पष्ट ।
आपुलाली उपासना ३ श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४॥ कोणी एक ऐसें म्हणती ।
कर्ता देव मंगळमूर्ती ४ । एक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥ एक म्ह-
णती कर्ता भैरव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती बरिदेव । एक
म्हणती भगवती ॥ ६ ॥ एक म्हणती नरहरी । एक म्हणती बनशंकरी । एक
म्हणती सर्व करी । नारायण ॥ ७ ॥ एक म्हणती श्रीराम कर्ता । एक म्ह-
णती श्रीकृष्ण कर्ता । एक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥ एक
म्हणती पांडुरंग । एक म्हणती श्रीरंग । एक म्हणती झोटिंग । सर्व करी
॥ ९ ॥ एक म्हणती मुंज्या कर्ता । एक म्हणती सूर्य कर्ता । एक म्हणती
अग्नि कर्ता । सर्व कांहीं ॥ १० ॥ एक म्हणती लक्ष्मी करी । एक म्हणती
मारुती करी । एक म्हणती धरित्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥ एक म्हणती
तुकाई । एक म्हणती यमाई । एक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥
१. वृक्षाला फळें लागतात तसें. २. शहाण्यानें. ३. उपास्य दैवत. ४. गणपती.