दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 326, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ वा. ] उत्तमपुरुषनिदर्शन. २९१
धिक्कारून बोलती । तरी चळों न द्यावी शांती । दुर्जनासि मिळोन जाती ।
धन्य ते साधु ॥ १६ ॥ उत्तम गुणीं शृंगारिला । ज्ञानवैराग्यें शोभला ।
तोचि एक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥ स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें
सोशीत जावें । झिजोन कीर्तीसीं उरवावें । नानाप्रकारें ॥ १८ ॥ कीर्ति
पाहूं जातां सुख नाहीं । सुख पाहतां कीर्ति नाहीं । विचारेंविण कोठेंचि
नाहीं । समाधान ॥ १९ ॥ १परांतरास न लावावा धक्का । कदापि पडों न
द्यावा चुका । क्षमाशील तयाच्या २तुकों । कोण नाहीं ॥ २० ॥ आपलें अ-
थवा परावें । कार्य अवघेंचि करावें । प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित
नव्हे ॥ २१ ॥ बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें । ३आत्मवत् परा-
वें तें । मानीत जावें ॥ २२ ॥ कठिन शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास
येतें । तरी मग वाईट बोलावें तें । काय निमित्त ॥ २३ ॥ आपणास चि-
मटा घेतला । तेणें कासावीस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखीत
जावें ॥ २४ ॥ जे दुसऱ्यास दुःख करी । ते अपवित्र ४वैखरी । आपणास
घात करी । कोणी एके प्रसंगीं ॥ २५ ॥ पेरीलें तें उगवतें । बोलण्यासारिखें
उत्तर येतें । तरी मग कर्कश बोलावें तें । काय निमित्त ॥ २६ ॥ आपुल्या
५पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षसी
क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठिन वचन । हें अज्ञा-
नाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥ जो उत्तमगुणें शोभला । तोचि
पुरुष महा भला । कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥ क्रिये-
विण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन । भले तेथें अवलोकन । कदापि न
करिती ॥ ३० ॥ मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अगत्य धरणें । तया
महापुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥ ऐसा जो ६महानुभाव । तेणें करा-
वा समुदाय । भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥ आपण
अवचितें मरून जावें । मग भजन कोणें करावें । या कारणें भजनास लावा-
वे । बहुत लोक ॥ ३३ ॥ आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्या-
सी । आपणा मागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥ या कारणें समुदा-
१. दुसऱ्याच्या अंतःकरणास. २. तुलनेस. ३. आपल्याप्रमाणें. ४. वाणी.
५. सामर्थ्यानें. ६. थोर प्रतापाचा पुरुष.