दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
DevanagariHindipublished467 पृष्ठ
पृष्ठ 331, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपृष्ठ 331२९६ श्रीदासबोध. [ दशक
२९६ श्रीदासबोध. [ दशक
३. उभारणी.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहूनि विशाल ।
निर्मळ आणि निश्चळ । निर्विकारी ॥ १ ॥ ऐसें असतां कित्येक काळ । तेथें
आरंभिला भूगोल । तया भूगोळाचें मूळ । सावध ऐका ॥ २ ॥ परब्रम्ह
असतां निश्चळ । तेथें संकल्प उठिला चंचल । तयास बोलिजे केवळ ।
आदिनारायण ॥ ३ ॥ मूळमाया जगदीश्वर । त्यासि म्हणिजे षड्गुणेश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥ ऐलीकडे गुणक्षोभिणी १ । तेथें
जन्म घेतला त्रिगुणीं । मूळ ओंकाराची मांडणी । तेथूनि जाणावी ॥ ५ ॥
अकार उकार मकार । तिन्ही मिळोन ओंकार । पुढें पंचभूतांचा विस्तार ।
विस्तारला ॥ ६ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्म्यासी । तयापासोनि जन्म
वायूसी । तया वायूपासून तेजासी । जन्म जाहला ॥ ७ ॥ वायूचा कातरा
घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे । सूर्यबिंब तें प्रगटे । तथें ठायीं ॥ ८ ॥ वारा
वाजतो शीतल । तेथें निर्माण झालें जल । तें जल आळोनि भूगोल । निर्माण
झाला ॥ ९ ॥ त्या भूगोळाचे पोटीं । अनंत बीजांचिया कोटी । पृथ्वीपाण्या
होतां भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥ पृथ्वीवरी वल्ली नानारंग । पत्र पुष्पांचे
तरंग । नाना स्वाद तेथें मग । फलें जाहलीं ॥ ११ ॥ पत्रें पुष्पें फलें मूळें ।
नाना वर्ण नाना रसाळें । नाना धान्यें अन्नं केवळें । तेथून जाहलीं ॥ १२ ॥
अन्नापासुनि झालें रेत । रेतापासून प्राणी निपजत । ऐसी हे रोकडी प्रचीत २ ।
उत्पत्तीची ॥ १३ ॥ अंडज जारज स्वेदज उद्भिज । पृथ्वी पाणी सकळांचें
बीज । ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥ चारी खाणी चारी वाणी ।
चौऱ्यायंशी लक्ष जीवयोनी । निर्माण झाले लोक तिन्ही । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥
मुळीं अष्टधा प्रकृती । अवघे पाण्यापासून जन्मती । पाणी नसतां मरती ।
सकळ प्राणी ॥ १६ ॥ नव्हे अनुमानाचें बोलणें । याचा बरा प्रत्यय घेणें ।
वेद शास्त्रे पुराणे । प्रत्ययें घ्यावी ॥ १७ ॥ जें आपल्या प्रत्यया येईना । तें
अनुमानिक घ्यावें ना । प्रत्ययेंविण सकळ जना । व्यवसाय नाहीं ॥ १८ ॥
व्यवसाय प्रवृत्ति निवृत्ति । दोहोंकडे पाहिजे प्रचीती । प्रचीतीविण अनुमानें
असती । ते विवेकहीन ॥ १९ ॥ ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकलित ३
१. त्रिगुणांना प्रगट करणारी. २. निश्चितपणा. ३. संक्षेपानें.