दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 327, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२९२ श्रीदासबोध. [ दशक
व । झाला पाहिजे महोत्सव । हातोपातीं देवाधिदेव । वोळसा करावा
॥ ३५ ॥ आतां समुदायाकारणें । पाहिजेत दोन्ही लक्षणें । श्रोतीं येथें साव-
धपणें । मन घालावें ॥ ३६ ॥ जेणें बहुतांस घडे भक्ती । ते हे रोकडी
प्रबोधशक्ती । बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥ मागों
बोलिले उत्तम गुण । तयांस मानिती प्रमाण । प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें
चाले ॥ ३८ ॥ बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें । तयांचीं वच-
नें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥ जें जनासी मानेना । तें आपले न ये
मना । आपण एकला जन नाना । सृष्टीमध्यें ॥ ४० ॥ म्हणोन सांगाती
असावे । मानत मानत शिष्य करावे । हळू हळू शेवटा न्यावे । विवेकानें
॥ ४१ ॥ परंतु हीं विवेकाचीं कामें । विवेकी करतील नेमें । इतर ते बापुडे
भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥ बहुतांसि भांडतां एकला । सैन्यावांचून
पुरवला । या कारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके उत्तमपुरुषनिदर्शननिरूपणं नाम दशमः स-
मासः ॥ १० ॥ ओंवी २९४.
दशक तेरावा.
१. आत्मानात्मविवेक.
श्रीगणेशाय नमः ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।
विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण ।
त्यांचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥ चारी
खाणी चारी वाणी । चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी । संख्या बोलिली पुराणीं ।
वर्तती आतां ॥ ३ ॥ नाना प्रकारचीं शरीरें । वर्ततां दिसती अपारें । तयां-
मध्यें निर्धारें । आत्मा कवण ॥ ४ ॥ दृष्टीमध्यें पाहतो । श्रवणामध्यें ऐक-
तो । रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥ ५ ॥ घ्राणामध्यें वास घेतो ।
सर्वांगीं तो स्पर्शतो । वाचेमध्यें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६ ॥ सावधा-
१. ताबडतोब. २. उपदेशशक्ति. ३. आत्मा कोण व अनात्मा कोण हा विचार.