सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 336, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 336

१३ वा. ] प्रत्यय. ३०१
भास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥ आतां असो हे विवंचना । परंतु
जें पाहतां नासेना । तगे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥ परमात्मा
तो निराकार । जाणिजे हाचि विचारसार । आणि आपण कोण हा विचार ।
पाहिला पाहिजे ॥ २१ ॥ देहास अंत येतां । वायु जातो तत्वतां । लटिकें
म्हणाल तरी आतां । श्वासोच्छ्वास धरावा ॥ २२ ॥ श्वास कोंडतां देह पडे ।
देह पडतां म्हणती मडें । मड्यास कर्तव्य न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥
देहावेगळा वायु न करी । वायुवेगळा देह न धरी । विचार पाहतां कांहींच
न करी । एका वेगळें एक ॥ २४ ॥ उगेंच पाहतां मनुष्य दिसे । विचार
घेतां कांहींच नसे । अभेदभक्तीचें लक्षण ऐसें । ओळखावें ॥ २५ ॥ कर्ता
आपण ऐसें म्हणावें । तरी आपले इच्छेसारिखें व्हावें । इच्छेसारिखें न
होतां मानावें । अवघेंचि वाव ॥ २६ ॥ म्हणोन कर्ता नव्हे कीं आपण ।
तेथें भोक्ता कैंचा कोण । हेंचि विचाराचें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥
अविचार आणि विचार । जैसा प्रकाश आणि अंधकार । विकार आणि
निर्विकार । एक नव्हे कीं ॥ २८ ॥ जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच
चालेना । खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥ प्रत्ययासि बोलिजे न्याय ।
अप्रत्यय तो अन्याय । जात्यंधास१ परीक्षा काय । नाना रत्नांची ॥ ३० ॥
म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणासि अनन्य । आत्मनिवेदनें मान्य ।
परम पुरुष ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके लघु-
बोधनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. प्रत्यय.
श्रीगणेशाय नमः ॥ निर्मळ निश्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश ।
आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥ आधीं पैस मग पदार्थ ।
प्रत्यक्ष पाहतां यथार्थ । प्रत्यक्षेविण पाहतां व्यर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥
ब्रह्म म्हणिजे तें निश्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचल । तयास दृष्टांत के-
वळ । वायु जाणावा ॥ ३ ॥ घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटीं बिंब दृष्टांत
आत्म्याचा । विवरितां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥ भूत म्हणिजे जि-
१. जन्मांधास. २. देहसमर्पण केल्यानें.