दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१९० श्रीदासबोध. [ दशक
करितां स्वप्न दिसे । शिंपीकरितां रुपें भासे । जळाकरितां गार वसे ।
निमिष एक ॥ ३ ॥ मातीकरितां भिंती झाली । सिंधूकरितां लहरी आली ।
तिळां¹करितां पुतळी² । दिसों लागे ॥ ४ ॥ सोन्याकरितां अलंकार । तंतू-
करितां झालें चीर³ । कांसवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥ तूप
हात तरी थिजलें । तरीं⁴करितां मीठ झालें । बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब
॥ ६ ॥ पृथ्वीकरितां झालें झाड । झाडाकरितां छाया वाढे । धातूकरित⁵
पवाड⁶ । उंच नीच वर्णांचा ॥ ७ ॥ आतां असो हे दृष्टांत । अद्वैतास कैंचें
द्वैत । द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥ भासाकरितां भास भासे ।
दृश्याकरितां दृश्य दिसे । अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरुपम ॥ ९ ॥
कल्पनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत । द्वैतावेगळें अद्वैत । कैसें जाहलें
॥ १० ॥ विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी⁷ । तेणें केली
उभारणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥ परमात्मा परमेश्वर । सकळ कर्ता जो
ईश्वर । तयापासोनि विस्तार । सकळ जाहला ॥ १२ ॥ ऐसीं अनंत नामें
धरी । अनंत शक्ति निर्माण करी । तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥
त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाच आपण । सकळ कांहीं कर्तेपण ।
तेथेंचि आलें ॥ १४ ॥ श्लोक ॥ कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । हें⁸
उघड बोलतां न ये । मोडो पाहतो उपाय । येन्हवीं हें पाहतां काय । सा-
च आहे ॥ १५ ॥ देवापासून सकळ झालें । हें सर्वांस मानलें । परी त्या
देवास । वोळखिलें पाहिजे कीं ॥ १६ ॥ सिद्धाचें जें निरूपण । तें साधकां
न माने जाण । पक्क नाहीं अंतःकरण । म्हणोनियां ॥ १७ ॥ अविद्यागुणें बो-
लिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव । मूळमायागुणें देव । बोलिजे तो
॥ १८ ॥ म्हणोनि कारण मूळमाया । अनंत शक्ति धरावया । तेथींचा अर्थ
जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥ मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि
सर्वांचा ईश । अनंतनामी जगदीश । तयासीच बोलिजे ॥ २० ॥ अवघी माया
विस्तारली । परी हे निःशेष नाथिली । ऐशिया वचनाची खोली । विरळा
जाणे ॥ २१ ॥ ऐसें अनिर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे । संतसंगें-
१. डोळ्यांतील तीळ, त्यापासून. २. बाहुली. ३. वस्त्र. ४. खाडीपासून. ५.
विस्तृत. ६. मोठेपणा. ७. शेषाला. ८. बोलून दाखविण्याजोगी नव्हे.
८ वा. ] सूक्ष्म शंका. १९१
विण नुमजे। कांहीं केल्या ॥ २२ ॥ माया तोचि मूळपुरुष । साधकां न माने हैं
निःशेष । परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥ नामरूप मा-
येस लागलें । तरी हें बोलणें नटिचि झालें । तेथें श्रोतीं अनुमानिलें । कासया-
सी ॥ २४ ॥ आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली । नि-
राकारीं कैशी झाली । मूळमाया ॥ २५॥ दृष्टिबंधन मिथ्या सकळ । परी तो
कैसा झाला खेळ । हें अवघें निव्वळ । करुन दाऊं ॥ २६ ॥ आकाश अ-
सतां निश्चळ । मध्यें झाला वायु चंचळ । तैसी जाणावी केवळ । मूळमा-
या ॥ २७ ॥ रूप वायूचें झालें । तेणें आकाश भंगलें । ऐसें हें सत्य मा-
निलें । न वचे कीं कदा ॥ २८ ॥ तैसी मूळमाया झाली । आणि निर्गुणता
संचली । येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥ वायु नव्हे पुरा-
तन । तैसी मूळमाया जाण । साच म्हणतां पुनः लीन । होत असे ॥ ३० ॥
वायु रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहे । असे परी ते न लाहे । रूप
तयाचें ॥ ३१॥ वायु सत्य म्हणों जातां । परी तो न ये दाखवितां । तया-
कडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥ तैसी मूळमाया भासे । भासे परी
ते न दिसे । पुढें विस्तारली असे । माया अविद्या १ ॥ ३३ ॥ जैसें वायू-
चेनि योगें । दृश्य उडे गगनमागें । मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४॥
गगनीं आभाळ नोंथिलें २ । अकस्मात उद्भवलें । मायेचेनि गुणें झालें । तैसें
जग ॥ ३५ ॥ नोंथिलेंच गगन नव्हतें । अकस्मात् आलें तेथें । तैसें दृश्य
झालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥ परी तया आभाळाकरितां । गगनाची
गेली निश्चळता । वाटे परी तें तत्वतां । तैसेंचि आहे ॥ ३७॥ तैसें मायेक-
रितां निर्गुण । वाटे झालें सगुण । परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८॥
आभाळ आलें आणि गेलें । तरी गगन तें संचलें । तैसें गुणा नाहीं आलें । नि-
र्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥ नभ माथां लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे । तैसें
जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥ ३ ऊर्ध्व पाहतां आकाश । नीलिमा ४
दिसे सावकाश । परी तो जाणिजे मिथ्या भास । भासला असे ॥ ४१॥ आ-
काश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें । वाटे विश्वास कोंडिलें । परी तें
मोकळेंच असे ॥ ४२ ॥ पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला
१. अज्ञान. २. नसलेलें. ३. वरतीं. ४. निळा रंग.
[page: 192]
१९२ श्रीदासबोध. [ दशक
नसे । अलिप्त जाणावें तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥ रथ धांवतां पृथ्वी चं-
चळ : वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४॥
आभाळाकरितां तो मृगांक¹ । वाटे धांवतो निःशंक । परी तें अवघें मायिक ।
आभाळ चले ॥ ४५ ॥ जळ अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंतराळ ।
वाटे परी तें निश्चळ । जैसें तैसें ॥ ४६॥ तैसें स्वरूप हें संचलें । असतां वाटे
गुणा आलें² । ऐसें कल्पनेसि गमलें । परी तें मिथ्या ॥ ४७ ॥ दृष्टिबंध-
नाचा खेळ । तैसी हे माया चंचल । वस्तु शाश्वत निश्चळ । तैसी तैसी
॥ ४८ ॥ ऐसी वस्तु निरवयव । माया दाखवी अवयव । इचा ऐसाचि
स्वभाव । नाथिलीचि हे ॥ ४९ ॥ माया पाहतां मुळींच नसे । परी हे सा-
चाऐसी भासे । उद्भवे आणि निरसे । आभाळ जैसें ॥ ५० ॥ ऐसी माया
उद्भवली । वस्तु निर्गुण संचली । अहं³ ऐसी स्फूर्ति झाली । तेचि माया
॥ ५१ ॥ गुणमायेचे पँवाडे⁴ । निर्गुणीं हें कांहींच न घडे । परी हें घडे आणि
मोडे । स्वस्वरूपीं⁵ ॥ ५२ ॥ जैसी दृष्टि तरळली । तेणें सेनाच भासली ।
पाहतां आकाशींच झाली । तरी ते मिथ्या ॥ ५३ ॥ मिथ्या मायेचा खेळ ।
उद्भव बोलिला सकळ । नाना तत्त्वांचा पाल्हाळ । मांडूनियां ॥ ५४ ॥
तत्त्वें मुळींच आहेती । ओंकार वायूची गती । तेथींचा अर्थ जाणती । दक्ष-
ज्ञानी ॥ ५५ ॥ मूळमायेचें चळण । तेंचि वायूचें लक्षण । सूक्ष्म तत्त्वें तेचि
जाण । जडत्व पावली ॥ ५६ ॥ ऐसीं पंचमहाभूतें । पूर्वी होतीं अव्यक्तें⁶ ।
पुढें झालीं व्यक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥ मूळमायेचें लक्षण । तेंचि पांच-
भौतिक जाण । तेंचि पाहतां लक्षून । सूक्ष्म दृष्टीं ॥ ५८ ॥ आकाशीं वायू-
विण । इच्छाशब्द करी कोण । इच्छाशक्ति तेचि जाण । तेजस्वरूप ॥ ५९॥
मृदुपण तेंचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ । ऐसी मूळमाया सकळ । पांच-
भौतिक जाणावी ॥ ६० एकएका भूतापोटीं । पंचभूतांची राहांटी⁷ । सर्व
कळे सूक्ष्म दृष्टी । घालून पाहतां ॥ ६१ ॥ पुढें जडत्वास आली । तरी असे
ती कालवली । ऐसी माया विस्तारली । पांचभौतिक ॥ ६२ ॥ मूळमाया
पाहतां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं । स्वर्गी मृत्यु पाताळीं । पांचचि
१. चंद्र. २. सगुण झाले. ३. 'मी' असें स्फुरण. ४. पराक्रम. ५. आत्म-
स्वरूपावर. ६. अदृश्यरूप. ७. व्यवहार.
भूतें ॥ ६३ ॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ च पाताले यत्किंचित्सचराचरम् ॥ सर्वं
तत्पांचभौतिकं षष्ठं किंचिन्न दृश्यते ॥ टीका ॥ सत्यस्वरूप आदिअंतीं ।
मध्यें पंचभूतें वर्तती । पांचभौतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥
येथें उठली आशंका । सावध होऊन ऐका । पंचभूतें झालीं एका । तमो-
गुणापासूनी ॥ ६५ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं । ऐसी
आशंका श्रोतीं । घेतली मागां ॥ ६६ ॥ ऐसें श्रोतीं आपेक्षिलें । संशयास
उभें केलें । याचें उत्तर दीधलें । पुढिलिये समासीं ॥ ६७ ॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके सूक्ष्मशंकानिरूपणं नाम तृतीयः
समासः ॥ ३ ॥
४. सूक्ष्म पंचभूतें.
श्रीगणेशाय नमः ॥ मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ ।
वृत्ति करावी निवळ । निमिष एक ॥ १ ॥ ब्रह्मीं मूळमाया झाली । तिच्या
पोटीं गुणमाया आली । मग ते गुणास प्रसवली । म्हणोनि गुणक्षोभिणी
॥ २ ॥ पुढें तिजपासाव कोण । सत्व रज तमोगुण । तमोगुणापासून नि-
र्माण । जाहलीं पंचभूतें ॥ ३ ॥ ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्त्वें विस्तारलीं ।
एवं तमोगुणापासून झालीं । पंचमहाभूतें ॥ ४ ॥ मूळमाया गुणापरती ।
तेथें भूतें कैंचीं होती । ऐसी आशंका श्रोतीं । घेतली मागें ॥ ५ ॥ आणीक
एकएकें भूतीं । पंचभूतें असती । तेहि आतां कैशी स्थिती । प्रांजळ करूं
॥ ६ ॥ सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पांचभौतिक । श्रोतीं विमळ वि-
वेक । केला पाहिजे ॥ ७ ॥ आधीं भूतें तों जाणावीं । रूपें कैसीं वोळखावीं ।
मग तीं शोधून पाहावीं । सूक्ष्म दृष्टी ॥ ८ ॥ वोळखी नाहीं अंतरीं । ते वो-
ळखावी कोणे परी । म्हणोनि वोळखी चतुरीं । नावेकें परिसावी ॥ ९ ॥ जें
जें जड आणि कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण । मृदु आणि वोलेपण । ति-
तुकें आप ॥ १० ॥ जें जें उष्ण आणि सतेज । तें तें जाणावें पैं³ तेज ।
आतां वायुहि सहज । निरूपिजेल ॥ ११ ॥ चैतन्य आणि चंचळ । तो
हा वायुचि केवळ । शून्य अवकाश निर्मळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥
१. त्रिगुणास प्रगट करणारी. २. क्षणमात्र. ३. 'पहा' अशा अर्थीं अव्यय.
१९४ श्रीदासबोध. [
ऐशीं पंच महाभूतें । ओळखी धरावी संकेतें । आतां एकीं पंचभूतें
वध ऐकां ॥ १३ ॥ जे त्रिगुणांहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार । य
अति तत्पर । होऊनि ऐका ॥ १४ ॥ सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी
आधीं निरूपावी । येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥ आका-
णजे अवकाश शून्य । शून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे जडत्व
तेचि पृथ्वी ॥ १६ ॥ आकाश आहे स्वयें मृदु । तेंचि आप स्वतः-
आतां तेजहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥ अज्ञानें भासला भास ।
तेजाचा प्रकाश । आतां वायु सावकाश । साकल्यें सांगों ॥ १८ ।
आकाशा नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध । तथापि आकाशीं
रुद्धं । तोचि वायु ॥ १९ ॥ आकाशीं आकाश मिसळलें । हैं तों न
बोलिलें । येणें प्रकारें निरूपिलें । आकाश पंचभूत ॥ २० ॥ वायूमध्ये
भूतें । तींही ऐका एकचित्तें । बोलिजेती समस्तें । यथान्वयें ॥ २१
फूल तरी जड । हळु वारा तरी निबिडं । वायु लागतां कडाड ।
झाडें ॥ २२ ॥ तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कांहींच न घडे । तोल
तया जडे । पृथिवीचा अंश ॥ २३ ॥ येथें श्रोते आशंका घेती । तेथें
झाडें होती । झाडें नव्हती तरी शक्ति । कठीणरूप आहे ॥ २४ ॥ वा
लिंग लहान । कांहीं तरी असे उष्ण । तैसें सूक्ष्मीं जडपण । सू
॥ २५ ॥ मृदुपण तेंचि आप । भासे तेजाचें स्वरूप । वायु तेथें चंचळ
सहजचि आहे ॥ २६ ॥ सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे
काश । पंचभूतांचे अंश । वायूमध्ये निरूपिले ॥ २७ ॥ आतां
लक्षण । भासलें परी तेंचि कठिण । तेजीं ऐसी वोळखण । पृथ्व
॥ २८ ॥ भासला भास वाटे मृदु । तेजीं आप तेंचि प्रसिद्ध । तेज
स्वतःसिद्ध । सांगणें नलगे ॥ २९ ॥ तेजीं वायु चंचल । तेजीं अ
निश्चळ । तेजीं पंचभूतें सकळ । निरूपिलीं ॥ ३० ॥ आतां आपाचें
आप तेजीं मृदुपण । मृदुपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥ आपें
सहजचि असे । तेज मृदुपणें भासे । वायु स्तब्धपणें दिसे । मृदुत्व
१. एकंक भूतांत. २. चित्ताचें ऐक्य. ३. संपूर्णपणें. ४. मर्यादित. ५.
६. वजन. ७. अग्नीची ठिणगी.
३२ ॥ आकाश नलगे सांगावें । तें व्यापकाच स्वभावें । आणि पंचभूतांचीं
नांवें । सूक्ष्म निरूपिलीं ॥ ३३ ॥ आतां पृथ्वीचें लक्षण । कठिण पृथ्वी
आप जान । कठिणत्वीं मृदुपण । तेंचि आपें ॥ ३४ ॥ कठिणत्वाचा जो
भास । तोचि तेजाचा प्रकाश । कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायु ॥ ३५ ॥
आकाश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक । आकाशींच कांहीं-
एक । भास भासे ॥ ३६ ॥ आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां
फुटेना । आकाश परतें होईना । तिळमात्र ॥ ३७ ॥ असो आतां पृथ्वी-
आंत । दाविला भूतांचा संकेत । एके भूतीं पंचभूत । तें हें निरूपिलें ॥
३८ ॥ परी हें आहाचें पाहतां नातुडे । बलेंच पोटीं संदेह पडे । भ्रांतिरूपें
अहंता जडे । अकस्मात ॥ ३९ ॥ सूक्ष्म दृष्टीनें पाहतां । वायुचि वाटे
तत्त्वतां । सूक्ष्म वायु शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥ एवं पांच-
भौतिक पवन । तेचि मूळमाया जान । माया आणि सूक्ष्म त्रिगुण । तेंचि
पांचभौतिक ॥ ४१ ॥ भूतें गुण मेळविजे । त्यासि अष्टधा बोलिजे । पांच-
भौतिक जाणिजे । अष्टधा प्रकृती ॥ ४२ ॥ शोधून पाहिल्याविण । संदेह
धरणें मूर्खपण । याची पाहावी ओळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥ गुणापासून
भूतें । पावलीं स्पष्ट दशेतें । जडत्वा येऊनि समस्तें । तत्वें जाहलीं ॥ ४४ ॥
पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्त्वरचना । बोलिलीसे ते जना । प्रगटचि
आहे ॥ ४५ ॥ हा भूतकेंर्दभ बोलिला । सूक्ष्मसंकेतें दाविला । ब्रह्मगोळ
उभा राहिला । तत्पूर्वी ॥ ४६ ॥ या ब्रह्मांडापैलकडील गोष्टी । जै झाली
नव्हती सृष्टी । मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥ सप्तकंचुकें प्रचंड ।
झालें नव्हतें ब्रह्मांड । मायाअविद्येचें बंड । ऐलीकडे ॥ ४८ ॥ ब्रह्मा विष्णु
महेश्वर । हा ऐलीकडील विचार । पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलीकडे ॥
४९ ॥ नाना लोक नाना स्थानें । चंद्र सूर्य तारांगणें । सप्त द्वीपें चौदा
भुवनें । ऐलीकडे ॥ ५० ॥ शेष कूर्म सप्त पाताळ । एकवीस स्वर्ग अष्ट
दिक्पाळँ । तेहतीस कोटी देव सकळ । ऐलीकडे ॥ ५१ ॥ बारा आदित्य
१. स्वतः २. वरवर. ३. भूतें पाच व गुण तीन मिळून. ४. भूतांच मिश्रण. ५.
सात आवरणें ( भूतें पांच व अहंकार आणि महत्तत्त्व हीं दोन ) यांनीं युक्त. ६. इद्र,
अग्नि, यम, निक्रंती, वरुण, वायु, कुबेर आणि शिव असे आठ दिशांचे अधिपती.
१९६ श्रीदासबोध. [ दशक
अकरा रुद्र । नव नाग सप्त ऋषीश्वर । नाना देवांचे अवतार । ऐलीकडे ॥
५२ ॥ मेघ मनु चक्रवर्ती । नाना जीवांची उत्पत्ती । आतां असो सांगों
किती । विस्तार हा ॥५३॥ सकळ विस्ताराचें मूळ । ते मूळमायाच केवळ ।
मागां निरूपिलें सकळ । पांचभौतिक ॥ ५४ ॥ सूक्ष्मभूतें जे बोलिलीं ।
तेचि पुढें जडत्वा आलीं । ते हे सकळहि बोलिलीं । पुढिलिये समासीं ॥
५५ ॥ पंचभूतें पृथगाकारें । पुढें निरूपिलीं विस्तारें । वोळखीकारणें अत्या-
दरें । श्रोतीं श्रवण करावी ॥ ५६ ॥ पांचभौतिक ब्रह्मगोल । जेणें कळे हा
प्रांजळ । दृश्य सांडून केवळ । वस्तुचि पाविजे ॥ ५७ ॥ महाद्वार वोलां-
डावें । मग देवदर्शन घ्यावें । तैसें दृश्य हें सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥
म्हणोनि दृश्याचे पोटीं । आहे पंचभूतांची दाटी । एकपणें पडिली मिठी ।
दृश्यपंचभूतां ॥ ५९ ॥ पंचभूतांचीच दृश्य । सृष्टि रचिली सावकाश ।
श्रोतीं करूनि अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे अष्टमदशके सूक्ष्मपंचभूतनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. पंचमहाभूतस्वरूप.
श्रीगणेशाय नमः ॥ केवळ मूर्ख तें नेणे । म्हणोनि घडलें सांगणें । पंच-
भूतांचीं लक्षणें । विशद करूनी ॥ १ ॥ पंचभूतांचा कर्दम जाहला । आतां
न वचे वेगळा केला । परंतु कांहीं वेगळाला । करून दाखवूं ॥ २ ॥ पर्वत
पाषाण शिळा शिखरें । नाना वर्ण लहान थोरें । खडे गुंडे बहुप्रकारें । जा-
णिजे पृथ्वी ॥ ३ ॥ नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां ।
वाळुके वाळू अनेका । मिळोन पृथ्वी ॥ ४ ॥ पुरें पट्टणें मनोहरें । नाना
मंदिरें दोमोदरें । नाना देवालयें शिखरें । मिळोन पृथ्वी ॥ ५ ॥ सप्त-
द्वीपवती पृथ्वी । काय म्हणोनि सांगावी । नवखंडें मिळोनि जाणावी ।
वसुंधरा ॥ ६ ॥ नाना देश नाना नृपती । नाना भाषा नाना रीती । लक्ष
चौऱ्यायशी उत्पत्ती । मिळोन पृथ्वी ॥ ७ ॥ नाना उद्र्धूसें वनें । नाना तरु-
वरांचीं बनें । गिरिकंदरें नाना स्थानें । मिळोन पृथ्वी ॥ ८ ॥ नाना रचना
केली देवीं । जे जे निर्मिली मानवीं । सकळ मिळोन पृथ्वी । जाणिजे
१. रत्नखचित मंदिरें. २. पृथ्वी. ३. ओसाड.
८ वा. ] पंचमहाभूतस्वरूप. १९७
श्रोतीं ॥ ९ ॥ नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्ने जीं अनेक ।
नाना काष्ठ वृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥ आतां असो हें बहुवस ।
जडांश आणि कठिणांश । सकळ पृथ्वी हा विश्वास । मानिला पाहिजे
॥ ११ ॥ बोलिलें पृथ्वीचें रूप । आतां सांगिजेल आप । श्रोतीं ओळखावें
रूप । सावध होऊनी ॥ १२ ॥ वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जें नीर ।
मेघ आणि सप्त सागर । मिळोन आप ॥ १३ ॥ श्लोकार्ध ॥ क्षारक्षीरसुरासर्पि-
र्दधि चेक्षुजलं तथा ॥ क्षारसमुद्र दिसताहे । सकळ जन दृष्टीस पाहे । जेथें
लवण होत आहे । तोचि क्षारसिंधु ॥ १४ ॥ एक दुधाचा सागर । त्या नांव
क्षीरसागर । देवें दीधला निरंतर । उपमन्यूसी १ ॥ १५ ॥ एक समुद्र मद्याचा ।
एक जाणा घृताचा । एक निखळ दह्याचा । समुद्र असे ॥ १६ ॥ एक उं-
साच्या रसाचा । एक तो शुद्ध जळाचा । ऐसा सातां समुद्रांचा । वेढा पृ-
थ्वीसी ॥ १७ ॥ एवं भूमंडळींचें जळ । नाना स्थळींचें जें सकळ । मिळोन
अवघें केवळ । आप जाणावें ॥ १८ ॥ पृथ्विगर्भीं कितीक । पृथ्वीतळीं आ-
वरणोदक । तिहीं लोकींचें उदक । मिळोन आप ॥ १९ ॥ नाना वल्ली बहु-
वस । नाना तरुवरांचे रस । मध पारा अमृत विष । मिळोन आप ॥२०॥
नाना रस स्नेहादिकें २ । यांहि वेगळे अनेक । जळाऐसे आवश्यक । आप
बोलिजे ॥ २१ ॥ सार्द्र ३ आणि शीतल । जळासारिखें पातळ । शुक्र ४ शो-
णितें ५ मूत्र लाळ । आप बोलिजे ॥ २२ ॥ आप संकेतें जाणावें । पातळ
ओलें ओळखावें । मृदु शीतल स्वभावें । आप बोलिजे ॥ २३ ॥ झाला
आपाचा संकेत । पातळ मृदु गुळगुळीत । स्वेद ६ श्लेष्मा ७ अश्रु समस्त । आ-
प जाणावें ॥ २४ ॥ तेज ऐका सावधपणें । चंद्र सूर्य तारांगणें । दिव्य
देह सतेजपणें । तेज बोलिजे ॥ २५ ॥ वन्हि मेघीं विद्युल्लता । वन्हि सृष्टि-
संहारिता । वन्हि सागरा जाळिता । वडवानळ ॥ २६ ॥ वन्हि शंकराचे
नेत्रींचा । वन्हि काळाचे क्षुधेचा । वन्हि परिवे ८ भूगोळाचा । तेज बोलिजे
॥ २७ ॥ जें जें सतेज प्रकाशरूप । तें तें तेजाचें स्वरूप । शोषक उष्णादि
आरोप ९ । तेज जाणावें ॥ २८ ॥ वायु जाणावा चंचल । चैतन्य चेतवी के-
१. एक ऋषिपुत्र, त्याला. २. तेल, तूप इत्यादि. ३. ओलसर. ४. रेत.
५. रक्त. ६. घाम. ७. कफ. ८. वेढा. ९. कल्पना.
[Page Header]
१९८ श्रीदासबोध. [ दशक
वळ । बोलणें चालणें सकळ । वायूमुळें ॥ २९ ॥ डोले हाले तितुका प-
वन । कांहींच न चले पवनेंविण । सृष्टीच्या लया कारण । मूळ तो वायु
॥ ३० ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । सकळ जाणा-
वा पवन । चंचळरूपी ॥ ३१ ॥ प्राण अपान आणि व्यान । चौथा उदान
पांचवा समान । नाग१ कूर्म क्रेकर जाण । देवदत्त धनंजय ॥ ३२ ॥ जितुकें
कांहीं होतें चळण । तितुकें वायूचें लक्षण । चंद्र सूर्य तारागण । वायुचि
धर्ता ॥ ३३ ॥ आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणि निश्चळ । अवकाश-
रूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ आकाश सकळांस व्यापक । आ-
काश अनेकीं एक । आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचें ॥ ३५ ॥ आका-
शाऐसें नाहीं सार । आकाश सकळांहूनि थोर । पाहतां आकाशाचा विचार ।
स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥ तंव श्रोतीं केला आक्षेप । दोहींचें सारखेंचि
रूप । तरी आकाशाचि स्वरूप । कां म्हणों नये ॥ ३७ ॥ आकाश स्वरूपा
कोण भेद । पाहतां दिसती अभेद । आकाश वस्तु स्वतःसिद्ध । कां न म्ह-
णावी ॥ ३८ ॥ वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निखळ । तैसेंच आकाश
केवळ । वस्तूंसारिखें ॥ ३९ ॥ ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण
पुरातन । आकाशा अंगीं सप्त गुण । शास्त्रीं निरूपिले ॥ ४० ॥ काम क्रोध
शोक मोहो । भय अज्ञान शून्यत्व पाहो । ऐसा सप्तविध स्वभावो । आका-
शाचा ॥ ४१ ॥ ऐसें शास्त्रकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत झालें ।
स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥ कांचबंदी२ आणि जळ ।
सारिखेंचि वाटे सकळ । परी एक कांच एक जळ । शाहणे जाणती ॥ ४३ ॥
रुवामध्यें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला । तेणें कपाळमोक्ष झाला ।
कापूस न करी ॥ ४४ ॥ तांदुळांमध्यें श्वेत३ खडे । तांदुळासारिखे वांकडे ।
चावूं जातां दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥ त्रिभागामध्यें४ खडा असे ।
त्रिभागासारिखाचि भासे । शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥
गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचोड५ । नागकोंडी६ आणि वेखं-
ड । एक म्हणों नये ॥ ४७ ॥ सोनें आणि सोनपितळ । एकचि वाटती
[Footnotes]
[F1] १. हीं पंच उपप्राणांचीं नांवें. २. कांचांनीं बनविलेली जागा. ३. पांढरे.
[F2] ४. चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणामध्यें. ५. अतिशय. ६. बचनाग.
८ वा.] पंचमहाभूतस्वरूप. १९९
केवळ । परी पितळेस लागतां ज्वाळ । कालिमा चढे ॥ ४८ ॥ असो हे
हीन दृष्टांत । आकाश ह्मणिजे केवळ भूत । तें भूत आणि अनंत । एक
कैसें ॥ ४९ ॥ वस्तूंसि वर्णचि नसे । आकाश श्यामवर्ण भासे । दोहोंस
साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥ श्रोते म्हणती कैचें रूप । आका-
श ठायींचें अरूप । आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥ चहूं भूतां-
स नाश आहे । आकाश कैसें नासताहे । आकाशीं न साहे । वर्ण^१ व्यक्ति^२
विकार॥५२॥ आकाश अचळ दिसतें । त्याचें काय नासों पाहतें । पाहतां
आमुचेनि मतें । आकाश शाश्वत ॥ ५३ ॥ ऐसें ऐकोन वचन । वक्ता बोले
प्रतिवचन । ऐक आतां लक्षण । आकाशाचें ॥ ५४ ॥ आकाश तमापासून
झालें । ह्मणोनि कामक्रोधें वेष्टिलें । अज्ञान शून्यत्व बोलिलें । नाम तयाचें
॥ ५५ ॥ अज्ञानें कामक्रोधादिक । मोह भय आणि शोक । हा अज्ञानाचा
विवेक । आकाशगुणें ॥ ५६ ॥ नास्तिक नकारवचन । तेंचि शून्याचें
लक्षण । तयास म्हणती हृदयशून्य । अज्ञान प्राणी ॥५७॥ आकाश स्तब्ध-
पणें शून्य । शून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे कठिण । रूप तयाचें
॥ ५८ ॥ कठिण शून्य विकारवंत । तयास कैसें म्हणावें सत । मनास वाटे
हें तद्वत । औहाच^३ दृष्टी ॥ ५९ ॥ अज्ञान कालवलें आकाशीं । तया कर्दमा
ज्ञान नाशी । म्हणोनिया आकाशासी । नाश आहे ॥ ६० ॥ तैसें आकाश
आणि स्वरूप । पाहतां वाटती एकरूप । परी दोहोंमध्यें विक्षेप । शून्य
स्वाचा ॥ ६१ ॥ औहाच^४ पाहतां कल्पनेसी । सारिखेंच वाटे निश्चयेंसी ।
परी आकाश स्वरूपासी । भेद आहे ॥ ६२ ॥ उन्मनी^५ आणि सुषुप्ति^६
अवस्था । सारिखीच वाटे तत्वतां । परी विवेचून पाहूं जातां । भेद आहे
॥ ६३ ॥ खोटें खऱ्यासारिखें भाविती । परी परीक्षावंत निवडिती । कां
कुरंगें^७ देखोनि भुलती । मृगजळासी ॥ ६४ ॥ आतां असोत हे दृष्टांत ।
बोलिलों कळाया संकेत । म्हणोनि भूत आणि अनंत । एक नव्हेती ॥६५॥
आकाश वेगळेपणें पाहावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें । वस्तूचें पाहणें
स्वभावें । ऐसें असे ॥ ६६ ॥ येथें आशंका फिटली । संदेहवृत्ति मावळली ।
भिन्नपणें न वचे अनुभविती । स्वरूपस्थिती ॥६७॥ आकाश अनुभवा येतें ।
१. रंग. २. आकार. ३. वरवर. ४. कल्पना. ५. मनोलय. ६. झाप. ७. हरिणे.
२०० श्रीदासबोध. [ दशक
स्वरूप अनुभवा परतें । म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥६८॥
दुग्धासारिखा जळांश । निवडूं जाणती राजहंस । तैसें स्वरूप आणि
आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥ सकळ माया गाथागोवी । संतसंगें हे उग-
वावी । पाविजे मोक्षपदवी । सत्समागमें ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे अष्टमदशके पंचमहाभूतस्वरूपआकाशभेदनिरूपणं नाम पंचमः
समासः ॥ ५ ॥
६. दुश्चितलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी ।
मोक्ष लाभे किती दिवसीं । हें मज निरूपावें ॥ १ ॥ धरितां साधूची
संगती । किती दिवर्शी होते मुक्ती । हा निश्चय कृपामूर्ती । मज दीनास
करावा ॥२॥ मुक्ति लाभे तत्क्षणीं । विश्वासातां निरूपणीं । दुश्चितपणें हानी ।
होत असे ॥ ३ ॥ सुचितपणें दुश्चित । मन होतें अकस्मात । त्यास करावें
निवांत । कोणे परी ॥ ४॥ मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडी ।
सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥ अर्थप्रमेयें ग्रंथांतरीं ।
शोधूनि घ्यावें अभ्यंतरीं । दुश्चितपण आलें तरी । पुन्हा श्रवण करावें ॥६॥
अर्थांतर पाहिल्याविण । उगोंचि करी जो श्रवण । तो श्रोता नव्हे पाषाण ।
मनुष्यवेषें ॥ ७ ॥ येथें श्रोते मानितील शिण । आम्हांसि केलें पाषाण ।
तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥८॥ वांकुडा तिकुडा फोडिला । पाषाण
घडून नीट केला । दुसरे वेळेस पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥
टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि
झाडिली । तरी ते पुनः लागे ॥१०॥ सांगतां अवगुण गेला । पुनः मागुती
जडला । या कारणें महा भला । पाषाण गोटा ॥ ११ ॥ ज्याचा अवगुण
झडेना । तो पाषाणाहून उणा । पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥
कोटिगुणें कैसा पाषाण । स्याचेंहि ऐका लक्षण । श्रोतीं करावें श्रवण ।
सावध होऊनी ॥ १३ ॥ माणीक मोतीं प्रर्वाळ । पाच वैडूर्य वज्रैनीळ ।
गोमेदें मणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥ यांहि वेगळे बहुत ।
१. सिद्धान्त. २. गूढार्थ. ३. श्रेष्ठ. ४. पोंवळें. ५. एक रत्न. ६. हिरा.
३. दशक ११-१५: राजनीति-निरूपण, महन्त-लक्षण, चातुर्य एवं आत्म-निवेदन
८ वा.] दुश्चितलक्षण. २०१
सूर्यकांत सोमकांत । नाना मोहरे सप्रचीत । औषधाकारणें ॥ १५ ॥
यांहि वेगळे पाषाण भले । नाना तीर्थीं जे लागले । वापीकूप सेखीं झाले ।
हरिहरमूर्ती ॥ १६ ॥ याचा पाहतां विचार । पाषाणाऐसें नाहीं सार । मनुष्य
तें काय पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥ तरी तो ऐसा नव्हे पाषाण । जो
अपवित्र निष्कारण । तयासारिखा देह जाण । दुश्चित अभक्तांचा ॥ १८ ॥
आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चितपणें । दुश्चितपणाचेनि गुणें ।
प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥ दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे ।
दुश्चितपणें स्मरण नसे । क्षणएक पाहतां ॥ २० ॥ दुश्चितपणें शत्रुजिणें ।
दुश्चितपणें जन्ममरणें । दुश्चितपणाचेनि गुणें । हानि होय । २१ ॥ दुश्चि-
तपणें नव्हे साधन । दुश्चितपणें न घडे भजन । दुश्चितपणें नव्हे ज्ञान ।
साधकासी ॥ २२ ॥ दुश्चितपणें नव्हे निश्चय । दुश्चितपणें न घडे जय ।
दुश्चितपणें होय क्षय । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥ दुश्चितपणें न घडे श्रवण ।
दुश्चितपणें न घडे विवरण । दुश्चितपणें निरूपण । हातींचें जाय ॥ २४ ॥
दुश्चितपणें बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे । चंचळचक्रों पडिलें
असे । मानस तयाचें ॥ २५ ॥ वेडें पिशाच निरंतर । अंध मुकें आणि
बधिर । तैसा जाणावा संसार । दुश्चित प्राण्यांचा ॥ २६ ॥ सावध असोनि
उमजेना । श्रवण असोन ऐकेना । ज्ञान असोन कळेना । सारासार विचार
॥ २७ ॥ ऐसा जो दुश्चित आळशी । परलोक कैंचा त्यासी । जयाचे जीवीं
अहर्निशीं । आळस वसे ॥ २८ ॥ दुश्चितपणापासून सुटला । तरी तो सर्वैचि
आळस आला । आळसाहातीं आणियाला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥ आळसें
राहिला विचार । आळसें बुडाला आचार । आळसें नव्हे पाठांतर । कांहीं
केल्या ॥ ३० ॥ आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण । आळसें
परमार्थाची खूण । मलिन जाहली ॥ ३१ ॥ आळसें नित्यनेम राहिला । आ-
ळसें अभ्यास बुडाला । आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥ आ-
ळसें गेली धारणा ४ धृति ५ । आळसें मलिन झाली वृत्ती । आळसें विवेकाची
गती । मंद जाहली ॥ ३३ ॥ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना वि-
स्तारली । आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥ ३४ ॥ दुश्चित
१. औषधी मणी. २. आड, विहीर. ३. शत्रूनें जिंकणें. ४. चित्तैक्य. ५. धैर्य.
२०२ श्रीदासबोध. [ दशक
पणासवें आळस । आळसें निद्राविलास । निद्राविलासें केवळ नाश । आ-
युष्याचा ॥ ३५ ॥ निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणें-
करितां निरूपण । उमजेचि ना ॥ ३६ ॥ हीं तिन्ही लक्षणें जेथें । विवेक
कैंचा असेल तेथें । अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥ क्षुधा ला-
गतांच जेविला । जेवून उठतां आळस आला । आळस येतांच निजला ।
सावकाश ॥ ३८ ॥ निजोन उठतांच दुश्चित । कदा नाहीं सावचित । तेथें
कैंचें आत्महित । निरूपणीं ॥ ३९ ॥ मर्कटापाशीं दिलें रत्न । पिशाचा-
हातीं निधान । दुश्चितापुढें निरूपण । तयापरी होय ॥ ४० ॥ आतां असो
हे उपपत्ती । आशंकेची कोण गती । किती दिवसां होते मुक्ती । सज्जनाचे-
नि संगें ॥ ४१ ॥ ऐका याचें प्रत्युत्तर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । संतसंगाचा
विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥ लोह परिसासि लागला । थेंबुटा सागरीं मि-
ळाला । गंगेसरिते संगम झाला । तत्क्षणींचें ॥ ४३ ॥ सावध साक्षेपी
आणि दक्ष । तयास तात्काळचि मोक्ष । इतरांसि तें अलक्ष । लक्षिलें न वचे
॥ ४४ ॥ येथें शिष्यप्रज्ञाचि केवळ । प्रज्ञावंता नलगे वेळ । अनन्यास त-
त्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥ प्रज्ञावंत आणि अनन्य । तयास नलगे एक
क्षण । अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥ प्रज्ञेविण अर्थ न कळे ।
विश्वासेंविण वस्तु नाकळे । प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥ देहा-
भिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती । सत्संगें होय सद्गती । विलंबचि
नाहीं ॥ ४८ ॥ सावध साक्षेपी आणि दक्ष । प्रज्ञावंत आणि विश्वास । त-
यास समाधानीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥ इतर भाविक साबडें ।
तयास साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उघडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥
परी तें साधन मोडूं नये । निरूपणाच्या उपायें । निरूपणें न लाये सोय ।
सर्वत्रांसी ॥ ५१ ॥ आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरूपाची दशा । त्याचे
प्राप्तीचा भरंवसा । सत्संगें केवीं ॥ ५२ ॥ ऐसें निरूपण प्रांजळ । पुढें बो-
लिलें असे सकळ । श्रोतीं होवोनियां निश्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥
अवगुण त्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें । श्रोतीं कोप न धरणें ।
१. रत्न. २. गंगा व एकादी नदी यांचा. ३. तत्काळ एकरूप होतात. ४.
उद्योगी. ५. प्रज्ञा. ६. शिष्याच्या बुद्धीची कुशाग्रता. ७. एकनिष्ठ असणारास.
८ वा.] मोक्षलक्षण. २०३
ऐंसिया वचनाचा ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके
दुश्चितलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. मोक्षलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोत्यांचा पक्ष । किती दिवसां होतो मोक्ष ।
तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १॥ मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष को-
णास म्हणावें । सत्संगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥ तरी बद्ध म्हणिजे
तो बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा झाला । तो संतसंगें कैसा ला-
धला । तेंहि ऐका ॥ ३ ॥ प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध झाला ।
तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥ मी जीव ऐसा संकल्प । दृढ ध-
रितां गेले कल्प । तेणें प्राणी झाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥ मी जीव
मज बंधन । मज आहे जन्ममरण । केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन
आतां ॥ ६ ॥ पापाचें फळ तें दुःख । आणि पुण्याचे फळ तें सुख । पाप-
पुण्य आवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥ पापपुण्यभोग सुटेना । आणि गर्भ-
वासहि तुटेना । ऐसी जयाची कल्पना । दृढ जाहली ॥ ८ ॥ तया नांव
बांधला । जीवपणें बद्ध झाला । जैसा स्वयें बांधोनि कोसला । मृत्यु पावे
॥ ९ ॥ तैसा प्राणी तो अज्ञान । नेणे भगवंताचें ज्ञान । म्हणे माझें जन्म-
मरण । सुटेचि ना ॥ १० ॥ आतां कांहीं दान करूं । पुढिलिया जन्मास
आधारु । तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥ पूर्वी दान नाहीं
केलें । म्हणोनि दरिद्र प्राप्त झालें । आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं
॥ १२ ॥ म्हणोनि दिलें वस्त्र जुनें । आणि एक ताम्र नाणें । म्हणे आतां
कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥ कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान
करी । आशा धरिली अभ्यंतरीं । कोटिगुणाची ॥ १४ ॥ रुका अडका दान
केला । अतीतास तुकडा घातला । म्हणे माझा ढीग झाला । कोटि तुक-
ड्यांचा ॥ १५ ॥ तो मी खाईन पुढिले जन्मीं । ऐसें कल्पी अंतर्यामीं ।
वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणियाची ॥ १६ ॥ आतां मी जें देईन ।
तें पुढिले जन्मीं पावेन । ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा
॥ १७ ॥ बहुतां जन्मांचे अंतीं । होय नरदेहाची प्राप्ती । येथें न होतां
२०४ श्रीदासबोध. [दशक
ज्ञानसद्गती । गर्भवास चुकेना ॥ १८ ॥ गर्भवास नरदेहींच घडे । ऐसें
हें सर्वथा न घडे । अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥
ऐसा निश्चय शास्त्रांतरीं । बहुतों केला बहुतां परी । नरदेह संसारीं ।
परम दुर्लभ अस ॥ २० ॥ पाप पुण्य समता घडे । तरीच नरदेह
जोडे । येरव्ही जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥ श्लोक ॥
नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥ मयाऽनुकूलेन नभस्व-
तेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ १ ॥ टीका ॥ नरदेह परम दुर्ल-
भ । अल्प संकल्पाचा लाभ । गुरु कैर्णधार स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥
देव अनुकूल नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणिया । भवाब्धि न तरवे तया ।
आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥ ज्ञानेंविण प्राणियासी । जन्ममृत्यु लक्ष चौ-
न्याशी । तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोनि आत्महत्यारा ॥ २४ ॥
नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण । भोगणें लागती दारुण । नाना
नीच योनी ॥ २५ ॥ रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ हंसा खर । काक
कुक्कुट जंबूक मार्जार । सरडे बेडुक मक्षिका ॥ २६ ॥ इत्यादिक नीच योनी ।
ज्ञान नसतां भोगणें जनीं । आशा धरी मूर्ख प्राणी । पुढिलिया जन्माची
॥ २७ ॥ हा नरदेह पडतां । तोचि पाविजे मागुता । ऐसा विश्वास ध-
रित्तां । लाज नाहीं ॥ २८ ॥ कोण पुण्याचा संग्रहों । जे पाविजे नरदेहो ।
दुराशा धरिली पहा हो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥ ऐसे मूर्ख अज्ञान
जन । केलें संकल्पें बंधन । शत्रु आपणास आपण । होऊनि ठेले ॥ ३० ॥
श्लोक ॥ आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ऐसें संकल्पाचें
बंधन । संतसंगें तुटे जाण । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥ पांचां
भूतांचें शरीर । निर्माण झालें चराचर । प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों
लागे ॥ ३२ ॥ देहीं अवस्था अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण । शक्ति
आदिकरूनि लक्षण । चौपुटी तत्त्वांची ॥ ३३ ॥ ऐसी पिंडब्रह्मांडरचना ।
विस्तारें वाढली कल्पना । निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥
टिपा (Footnotes):
१. नावाडी. २. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति. ३. विश्व, तैजस आणि प्राज्ञ;
मी आहें असा समज. ४. नेत्र, कंठ आणि हृदय. ५. स्थूल, प्रविविक्त आणि
आनंद. ६ पृथ्व्यादि सूक्ष्म भूतें. ७. सत्व, रज आणि तम. ८. माया. ९. सांगड.
८ वा.] · मोक्षलक्षण. २०५
नाना मतें नाना भेद । भेदें वाढती विवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद ।
साधु जाणती ॥ ३५ ॥ तया संवादाचें लक्षण । पांचभौतिक देह जाण ।
तया देहामध्यें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥ देह अंतीं नासोनि जाय ।
त्यास आत्मा म्हणों नये । नाना तत्वाचे समुदाय । देहामध्यें आले ॥३७॥
अंतःकरण १प्राणादिक । विषय २ इंद्रियदशक ३ । हा सूक्ष्माचा ४ विवेक । बोलिला
शास्त्रीं ॥ ३८ ॥ घेतां सूक्ष्माची शुद्धी ५ । भिन्न अंतःकरण मन बुद्धी । नाना
तत्वांची उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥ स्थूल सूक्ष्म कारण । महाकारण
विराट हिरण्य । अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ॥ ४० ॥ चारी
पिंडीं चारी ब्रम्हांडीं । ऐसी अष्टदेहांची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दश
देह बोलिजे ॥ ४१ ॥ ऐसें तत्वांचें लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण । कार्य
कर्ता कारण । दृश्य तयाचें ॥ ४२ ॥ जीव शिव पिंड ब्रम्हांड । माया अ-
विद्येचें बंड । हें सांगतां असे उदंड । परी तो आत्मा वेगळा ॥ ४३ ॥ पाहों
जातां आत्मे चारी । त्यांचें लक्षण अवधारीं । हें जाणोनी अभ्यंतरीं ।
सुदृढ धरावें ॥ ४४ ॥ एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा
जो विश्वात्मा । चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे चारी आत्मे ॥ ४५ ॥ भेदें
उंच नीच भासती । परी चारी एकचि असती । येविषयीं दृष्टांत संमती ।
सावध ऐका ॥ ४६ ॥ घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश । अ-
वघें मिळोन आकाश । एकचि असे ॥ ४७ ॥ तैसा जीवात्मा आणि शि-
वात्मा । परमात्मा आंणि निर्मळात्मा । अवघा मिळोन आत्मा । एकचि
असे ॥ ४८ ॥ घटीं व्यापक जें आकाश । तया नांव घटाकाश । पिंडीं
व्यापक जो ब्रम्हांश । त्यासि जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥ मठीं व्यापक
जें आकाश । तया नांव मठाकाश । तैसा ब्रम्हांडीं जो ब्रम्हांश । त्यास
शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥ मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश ।
ब्रम्हांडाबाहेरील जो ब्रम्हांश । त्यासि परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥
उपाधीवेगळें आकाश । तया नांव चिदाकाश । तैसा निर्मळात्मा
परेश । उपाधीवेगळा ॥ ५२ ॥ उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आ-
१ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. २. शब्द, स्पर्श, रूप, रस,
आणि गंध. ३. पांच ज्ञानेंद्रियें व पांच कर्मेंद्रियें. ४. लिंगदेहाचा. ५. शोध.
२०६ श्रीदासबोध. [ दशक
काश अभिन्न । तैसा आत्मा स्वानंदघन । एकचि असे ॥ ५३ ॥ दृश्यासेबाह्य¹
अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं । त्याची वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे
॥ ५४ ॥ ऐसें आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधि शो-
धितां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥ जीवपण एकदेशीं । अहंकारें जन्म सोसी ।
विवेक पहतां प्राणियांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥ जन्ममृत्यूपासून सुटला । या
नांव जाणिजे मोक्ष झाला । तत्व शोधितां पावला । तत्ववस्तु ॥ ५७ ॥ तेचि
वस्तु ते आपण । हें महावाक्याचें लक्षण । साधु करिती निरूपण । आपले-
नि सुखें ॥ ५८ ॥ जेचि क्षणीं अनुग्रहें² केला । तेचि क्षणीं मोक्ष झाला ।
बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥ आतां आशंका फिटली ।
संदेहवृत्ति मावळली । संतसंगें तात्काळ झाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥ स्वप्ना-
मध्यें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । ज्ञानविवेकें प्राणियाला ।
मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥ अज्ञान निशीच्या³ अंतरीं । संकल्पःदुखें नासती । तेणें
गुणें होय प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥ तोडावया स्वप्नबंधन । नलगे
आणिक साधन । तयास प्रयत्न जागृतीविण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥ तैसा
संकल्पें बांधला जीव । त्यास आणीक नाहीं उपाव । विवेक पाहतां वाव ।
बंधन होय ॥ ६४ ॥ विवेक पाहिल्याविण । जो जो उपाय तो तो शिण ।
विवेक पाहतां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥ आत्मयाच्या ठायीं कांहीं ।
बंध मोक्ष दोन्ही नाहीं । जन्ममृत्यु हें सर्वही । आत्मस्वरूपीं न घडे ॥ ६६ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके मोक्षलक्षणनिरूपणं नाम
सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. आत्मनिदर्शन.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां झालें निरूपण । परमात्मा तोचि तूं जाण ।
तया परमात्म्याचें लक्षण । तें हैं ऐसें असे ॥ १ ॥ जन्म नाहीं मृत्यु नाहीं ।
येणें नाहीं जाणें नाहीं । बंध मोक्ष दोन्ही नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥
परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार । परमात्मा नित्य
निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥ परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं
१. जगताचे आंत बाहेर. २. कृपा किंवा उपदेश. ३. रात्रीच्या.
८ वा.] आत्मनिवेदन. २०७
एक । परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥ ऐसी परमात्मयाची
स्थिति । बोलताती वेदश्रुती । परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाहीं ॥
५ ॥ तये भक्तींचें लक्षण । भक्ति नवविधा भजन । नवविधा भजनें पावन ।
बहु भक्त जाहले ॥ ६ ॥ तये नवविधेमध्यें सार । आत्मनिवेदन थोर ।
तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥ आपुलिया स्वानुभवें ।
आपणास निवेदावें । आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥ महापू-
जेच्या अंतीं । देवास मस्तक वाहती । तैसी आहे निकटभक्ती । आत्म-
निवेदनाची ॥ ९ ॥ आपणास निवेदीती । ऐसे भक्त थोडे असती । तयांस
परमात्मा मुक्ती । तात्काळ देतो ॥ १० ॥ आपणास कैसें निवेदावें । कोठें
जाऊन पडावें । किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ ऐसें ऐकोन
बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें । श्रोतीं सावधान होणें । एकाग्रचित्तें ॥ १२ ॥
आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा नि-
र्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥ देवा भक्तांचें शोधन । करितां होतें आत्म-
निवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ देवास ओळखों जातां ।
तेथें झाली तद्रूपता । देवभक्तांची विभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥
विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त । अयुक्त¹ नाहीं बो-
लणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥ देवा भक्तांचें पाहतां मूळ । होय भेदांचें
निर्मूळ । एक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ तयासि होतां
मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं । देव भक्त हे कडसेंणी² । निरसोनि गेली ॥
१८ ॥ आत्मनिवेदनाच्या अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती । तये नांव
सायुज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥ जो संतासि शरण गेला । अद्वैत-
निरूपणें बोधला । मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥
नदी मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोह³ सोनें होतां माघारी ।
काळिमा न ये ॥ २१ ॥ तैसा भगवंतीं मिळाला । तो न वचे वेगळा केला ।
देव आपण भक्त झाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥ देव भक्त दोन्ही एक ।
ऐसें ज्ञान जया निश्चयात्मक । साधुजनीं मोक्षदायक । तोचि जाणावा ॥
२३ ॥ आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें । तेणें त्याचें ऐश्वर्य
१. अयोग्य. २. गुंता. ३. लोखंड.
२०८ श्रीदासबोध. [ दशक
बाणे । तत्काळ अंगीं ॥ २४ ॥ देहचि होऊनि राहिजे । तेणें देहदुःख
साहिजे । देहातीतं होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥ देहातीत कैसें होणें ।
कैसें परब्रह्म पावणें । ऐश्वर्याचीं लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥ ऐसें श्रोतीं
आक्षेपिलें । याचें उत्तर काय बोलिलें । तोंचि आतां निरूपिलें । सावध
ऐका ॥ २७ ॥ देहातीत वस्तु आहे । ते तूं परब्रह्म पाहे । देहसंग हा न
साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥ ज्याची बुद्धि ऐसी । वेद वर्णिती तयासी ।
शोधितां नानाशास्त्रांसी । न पडे ठायीं ॥ २९ ॥ ऐश्वर्य ऐसें तत्त्वतां । बाणे
देहबुद्धि सोडितां । देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥ या कारणें
साधुवचन । मानूं नये अप्रमाण । मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥
३१ ॥ साधुवचन तें कैसें । काय धरावें विश्वासें । एक वेळ स्वामी ऐसें ।
मज निरूपावें ॥ ३२ ॥ सोहं२ आत्मा स्वानंदघन । अजन्मा३ तो तूंचि
जान । हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥ महावाक्यांचें४ अंतरें ।
तूंचि ब्रह्म निरंतर । ऐशिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥
देहास होईल अंत । मग मी पावेन अनंत । ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि
नये ॥ ३५ ॥ एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं । मग
आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥ मायेसि होईल कल्पांत ।
अथवा देहास होईल अंत । ते काळीं पावेन निवांत । परब्रह्म मी ॥
३७ ॥ हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान । समाधानाचें लक्षण ।
वेगळेंचि असे ॥ ३८ ॥ सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त
व्हावें । सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥ माया असो-
नचि नाहीं । देह असतांच विदेही६ । ऐसें समाधान कांहीं । वोळ-
खावें ॥ ४० ॥ ५ राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवार देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥ प्राप्त झालिया आत्म-
ज्ञान । तैसें दृश्य देहभान । दृष्टी पडतां समाधान । जाणार नाहीं ॥४२॥
मार्गी मुळीं सर्पाकार । देखतां भय आलें थोर । कळतां तेथींचा विचार ।
मग मारणें काय ॥ ४३ ॥ तैसी माया भयानक । विचार पाहतां मायिक ।
१. देहाशीं संबंध. २. तो देव मी. ३. जन्मरहित ईश्वर. ४. तत्वमस्यादि महा-
वाक्यांचा मथितार्थ. ५. ब्रह्म. ६. देहावेगळा.
मग तयेचा धाक । कासया धरावा ॥ ४४ ॥ देखतां मृगजळाचा पूर ।
म्हणे कैसा जाऊं पैलपार । कळतां तेथींचा विचार । मग सांकडें कैंचें ॥
४५ ॥ देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक । जागृति झालिया
साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥ तथापि माया कल्पनेसि दिसे । आपण
कल्पनातीत असे । तेथें उद्वेग कायसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ अंतीं मति
तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती । तुझ्या अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि झा-
ली ॥ ४८ ॥ चौदेहांचा अंत । आणि जन्ममूळाचा प्रांत । अंता प्रांतासि
अलिप्त । तो तूं आत्मा ॥ ४९ ॥ जयास ऐशी आहे मती । तयास ज्ञानें
आत्मगती । गती आणि अवगती- । वेगळाचि तूं ॥ ५० ॥ मति खुंटली
देवांची । तेथें गति आणि अवगति कैंची । आत्मशास्त्रगुरुप्रचीतीची । ऐ-
क्यता आली ॥ ५१ ॥ जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्म-
प्रचीतीं । प्राणी पावला उत्तम गती । सद्गुरुबोधें ॥ ५२ ॥ सद्गुरुबोध जेव्हां
झाला । चौदेहांस अंत आला । तेणें निजध्यास लागला । स्वस्वरूपीं ॥
५३ ॥ तेणें निजध्यासें प्राणी । ध्येयचि झाला निर्धारीं । सायुज्यमुक्तीचा
धनी । होऊनि बैसला ॥ ५४ ॥ दृश्य पदार्थ वोसरतां । अवघा आत्माचि
तत्त्वतां । नेहटून विचारें पाहतां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥ मिथ्या मि-
थ्यात्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें । श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या
नांव मोक्ष ॥ ५६ ॥ सद्गुरुवचन हृदयीं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी ।
श्रवण मनन केलेंच करी । अत्यादरें ॥ ५७ ॥ जेथें आटती दोन्ही पक्ष ।
तेथें लक्ष ना अलक्ष । या नांव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥
तेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे । केवळ ज्ञप्तिमात्र उरे ।
सूक्ष्मब्रह्म ॥ ५९ ॥ भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन तुटलें । अजन्म्यास
मुक्त केलें । जन्मदुःखापासूनी ॥ ६० ॥ निःसंगाची संगव्याधी । विदेहा-
ची देहबुद्धी । विवेकें तोडिली उपाधी । निष्प्रपंचाची ॥ ६१ ॥ अद्वैताचें
तोडिलें द्वैत । एकांतासी दिधला एकांत । अनंतास दिधला अंत । अनं-
ताचा ॥ ६२ ॥ जागृतीस चेवविलें । चेइल्यास सावध केलें । निजबोधा-
१. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण यांचा. २. संबंध. ३. दुर्गति. ४.
अखेरीस. ५. मिथ्या झाला असतां. ६. स्वपरभाव. ७. ज्ञानस्वरूप.