सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 233, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 233

[Page Header]
१९८ श्रीदासबोध. [ दशक

वळ । बोलणें चालणें सकळ । वायूमुळें ॥ २९ ॥ डोले हाले तितुका प-
वन । कांहींच न चले पवनेंविण । सृष्टीच्या लया कारण । मूळ तो वायु
॥ ३० ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । सकळ जाणा-
वा पवन । चंचळरूपी ॥ ३१ ॥ प्राण अपान आणि व्यान । चौथा उदान
पांचवा समान । नाग१ कूर्म क्रेकर जाण । देवदत्त धनंजय ॥ ३२ ॥ जितुकें
कांहीं होतें चळण । तितुकें वायूचें लक्षण । चंद्र सूर्य तारागण । वायुचि
धर्ता ॥ ३३ ॥ आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणि निश्चळ । अवकाश-
रूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ आकाश सकळांस व्यापक । आ-
काश अनेकीं एक । आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचें ॥ ३५ ॥ आका-
शाऐसें नाहीं सार । आकाश सकळांहूनि थोर । पाहतां आकाशाचा विचार ।
स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥ तंव श्रोतीं केला आक्षेप । दोहींचें सारखेंचि
रूप । तरी आकाशाचि स्वरूप । कां म्हणों नये ॥ ३७ ॥ आकाश स्वरूपा
कोण भेद । पाहतां दिसती अभेद । आकाश वस्तु स्वतःसिद्ध । कां न म्ह-
णावी ॥ ३८ ॥ वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निखळ । तैसेंच आकाश
केवळ । वस्तूंसारिखें ॥ ३९ ॥ ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण
पुरातन । आकाशा अंगीं सप्त गुण । शास्त्रीं निरूपिले ॥ ४० ॥ काम क्रोध
शोक मोहो । भय अज्ञान शून्यत्व पाहो । ऐसा सप्तविध स्वभावो । आका-
शाचा ॥ ४१ ॥ ऐसें शास्त्रकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत झालें ।
स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥ कांचबंदी२ आणि जळ ।
सारिखेंचि वाटे सकळ । परी एक कांच एक जळ । शाहणे जाणती ॥ ४३ ॥
रुवामध्यें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला । तेणें कपाळमोक्ष झाला ।
कापूस न करी ॥ ४४ ॥ तांदुळांमध्यें श्वेत३ खडे । तांदुळासारिखे वांकडे ।
चावूं जातां दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥ त्रिभागामध्यें४ खडा असे ।
त्रिभागासारिखाचि भासे । शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥
गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचोड५ । नागकोंडी६ आणि वेखं-
ड । एक म्हणों नये ॥ ४७ ॥ सोनें आणि सोनपितळ । एकचि वाटती


[Footnotes]
[F1] १. हीं पंच उपप्राणांचीं नांवें. २. कांचांनीं बनविलेली जागा. ३. पांढरे.
[F2] ४. चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणामध्यें. ५. अतिशय. ६. बचनाग.