सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

५ वा. ] सार्थकलक्षण. १२५
करी साधन । या नांव साधन ॥ ४ ॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैत-
निरूपणाची गोडी । मननें अर्थांतर¹ काढी । या नांव साधक ॥ ५ ॥ होतां
सारासार विचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तर² । आत्मज्ञान
पाहे ॥ ६ ॥ नानासंदेहनिवृत्ती³ । व्हावया धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरु-
प्रतीती । ऐक्यतेसि आणि ॥ ७ ॥ देहबुद्धी विवेकें वारी । आत्मबुद्धी दृढ
धरी । श्रवण मनन केलेंच करी । या नांव साधक ॥ ८ ॥ विवंचूनि⁴ दृश्य-
भान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक
॥ ९ ॥ तोडूनि द्वैताची उपाधी⁵ । अद्वैतवस्तु⁶ साधनें साधी । लावी ऐक्य-
तेची समाधी । या नांव साधक ॥ १० ॥ आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा
करी जीर्णोद्धार । विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११ ॥ उत्तम
साधूचीं लक्षणें । अंगिकारी निरूपणें । बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव
साधक ॥ १२ ॥ असत्क्रिया ते सोडिली । आणि सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरूपस्थिति⁷ बळावली । या नांव साधक ॥ १३ ॥ अवगुण त्यागी दिवसें-
दिवस । करी उत्तम गुणांचा अभ्यास । स्वरूपीं लावी निजध्यास । या
नांव साधक ॥ १४ ॥ दृढनिश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडले⁸ । सदा
स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५ ॥ प्रत्यक्ष माया अलक्ष करी ।
अलक्ष्य⁹ वस्तु लक्षी अंतरीं । आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक
॥ १६ ॥ जें या जनास चोरलें । मनासि न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ
केलें । या नांव साधक ॥ १७ ॥ जें बोलतांच वाचा धेरी¹⁰ । जें पाहतांचि
अंध करी । तेंचि साधी नानापरी । या नांव साधक ॥ १८ ॥ जें साधूं
जातां साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना । तेंचि अनुभवें आणि मना । या
नांव साधक ॥ १९ ॥ जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे । तेंचि
अनुभवा आणि बळें । या नांव साधक ॥ २० ॥ स्वानुभवाचेनि योगें ।
वस्तु साधी लाघवेंगे । तेचि वस्तु होय अंगें । या नांव साधक ॥ २१ ॥
अनुभवाचीं अंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । कांहींच नसोनि असणें ।

१. अर्थांतील मर्म. २. दृढतर, निश्चयात्मक. ३. शंकांचें निवारण. ४. मनन
करून. ५. संबंध. ६. ब्रह्म. ७. स्वरूपासंबंधीं जागृति. ८. भासत नाहीं. ९.
अचिंत्य ब्रह्म. १०. कुंठित करितें.

१२६ श्रीदासबोध. [ दशक
या नांव साधक ॥ २२ ॥ परती सारूनि उपाधी । असाध्य वस्तु साधनें
साधी । स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३ ॥ देवभक्तांचें मूळ ।
शोधूनि पाहे सकळ । साध्यचि होय तत्काळ । या नांव साधक ॥ २४ ॥
विवेकबळें गुप्त झाला । आपेंआप मावळला । दिसतो परी देखिला३ । नाहींच
कोणीं ॥ २५ ॥ मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणासि धुंडिलें । तुर्येसहित
ओलांडिलें । या नांव साधक ॥ २६ ॥ पुढें उन्मनींच्या४ शेवटीं । आपली
आपणास अखंड भेटी । अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक
॥ २७ ॥ द्वैताचा तडका तोडिला । भासाचा भासें मोडिला । देहीं असोनि
विदेही झाला । या नांव साधक ॥ २८ ॥ जयास अखंड स्वरूपस्थिती ।
नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेह निवृत्ती । या नांव साधक ॥ २९ ॥
पंचभूतांचा विस्तार । जयास वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार ।
या नांव साधक ॥ ३० ॥ स्वप्नीं भय जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१ ॥ मायेचें जें प्रत्यक्षपण
जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥ निद्रा
सांडूनि चेईंरा६ झाला । तो स्वप्नभयापासोनि सुटला । माया सांडूनि तैसा
गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३ ॥ ऐसी अंतरस्थिति बाणली । बाह्य निस्पृह-
ता अवलंबिली । संसारउपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४ ॥
कामापासोनि सुटला । क्रोधापासोनि पळाला । मदमत्सर सांडिला । एकी-
कडे ॥ ३५ ॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेसी लाजविलें । परमा-
र्थासी माजविलें । विवेकबळें ॥ ३६ ॥ अविद्येपासुनि फडकला । प्रपंचा-
पासोनि निसटला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥ थोरपणा-
सि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें
॥ ३८ ॥ मेदाचा मडघां९ मोडिला । अहंकार झोडूनी पाडिला । पायीं ध-
रूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९ ॥ विकल्पाचा केला वधू । थोपै मारिला
भवसिंधू । सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४० ॥ भवभयासि
१. मायेचा संबंध. २. देह दिसतो. ३. तो स्वतः दिसत नाहीं. ४. निर्विकल्प
समाधि; एथें मनाचा लय होतो. ५. कल्पना. ६. जागृत. ७. लाथ मारिली
८. शिडकारिलें. ९. बिऱ्हाड. १०. चापट, थापड.

५ वा.] साधकलक्षण. १२७
भडकाविलें । काळाचें टांगें¹ मोडिलें । मस्तक हाणोनि पाडिलें । जन्म-
मृत्यूचें ॥ ४१ ॥ देहसंबंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । कल्पनेचा
घात केला । अकस्मात ॥ ४२ ॥ अपघातासि ताडिलें । लिंगदेहासि विभां-
डिलें । पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३ ॥ गर्वांवरी गर्व केला ।
स्वार्थ अनर्थां घातला । अनर्थ तोहि निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४ ॥
मोहासि मध्येंच तोडिलें । दुःखासि दुधडाँचि³ केलें । शोकासि खंडूनि सां-
डिलें । एकीकडे ॥ ४५ ॥ द्वेष केला देशधडी । अभावाची चेंपिली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचें ॥ ४६ ॥ ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चय
बळावला । अवगुणांचा संहार केला । वैराग्यबळें ॥ ४७ ॥ अधर्मास स्व-
धर्मैं टाकिलें । कुकर्मास सत्कर्मैं झुगारिलें । लोटूनि वाटा लाविलें । विचारें
अविचारांसी ॥ ४८ ॥ तिरस्कार तो चिराडिला । द्वेष खिरडून सांडिला ।
विषाँद अविश्वाँदें घातला । पायांतळीं ॥ ४९ ॥ कोपावरी घालणें घातलें ।
कापट्य अंतरीं कुटिलें । सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५० ॥ प्रवृ-
त्तीचाँ केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग । निवृत्तिमंथें ज्ञानयोग । सा-
धिता झाला ॥ ५१ ॥ विष॑यमँदासि सितेंरिलें । कुविद्येसि वेडाविलें । आ-
पणासि सोडविलें । आप्ततस्करापासूनी ॥ ५२ ॥ पराधीनतेवरी कोपला ।
ममतेवरी संतापला । दुराशेचा त्याग केला । एकाएकीं ॥ ५३ ॥ स्वरूपीं
घातलें मना । यातनेसि केली यातना । साधन आणि प्रयत्ना । प्रतिष्ठिलें
॥ ५४ ॥ अभ्यासाचा संग धरिला । साक्षेपारिसा निघाला । प्रयत्न सां-
गातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५ ॥ सावध दक्ष तो साधक । पाहे नित्या-
नित्यविवेक । संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६ ॥ बळेंच सारिला
संसार । विवेकें टाकिला जोजार । शुद्धाचारें अनाचार । अष्टाविला ॥ ५७ ॥
विसरास विसरला । आळसाचा आळस केला । सावध नाहीं दुश्चित झाला ।
दुश्चितपणासी ॥ ५८ ॥ आतां असो हैं बोलणें । अवगुण सांडी निरूपणें ।
तो साधक ऐसा येणें । प्रमाणें बुँझावा ॥ ५९॥ बळेंचचि अवघा त्याग कीजे ।
१. तंगडी. २. फोडिलें. ३. दुभंग. ४. चुरडून. ५. खेद. ६. समाधानानें.
७. कर्मे करण्याच्या इच्छेचा. ८. जिवलगांचा. ९. चित्ताला अंतर्मुख करण्याच्या
मार्गानें. १०. विषयरूप फांसेगारास. ११. चुकविलें. १२. जाणावा.

१२८ श्रीदासबोध. [ दशक
म्हणोनि साधक बोलिजे । आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं
॥ ६० ॥ येथें संशय उठिला । निस्पृह तोचि साधक झाला । त्याग न घडे
संसारिकाला । तरी तो साधक नव्हे कीं ॥ ६१ ॥ ऐसें श्रोत्यांचें उत्तर ।
त्याचें कैसें प्रत्युत्तर । पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके साधकलक्षणनिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥

१०. सिद्धलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागें बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं सा-
धक । ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १ ॥ सन्मार्ग तोचि जीवीं धरणें ।
असन्मार्गाचा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २ ॥
कुबुद्धित्यागाविणें कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं । सांसारिका त्याग पाहीं ।
ऐसा असे ॥ ३ ॥ प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयत्याग केला । तरीच
पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४ ॥ त्याग घडे अभावाचा^१ । त्याग घडे
संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनैःशनैः^२ ॥ ५ ॥ ऐसा सूक्ष्म अंतर-
त्याग^३ । उभयतांस घडे सांगें^४ । निस्पृहास बाह्यत्याग^५ । विशेष घडे ॥ ६ ॥
संसारिका ठायीं ठायीं । बाह्यत्याग घडे कांहीं । नित्यनेम श्रवण नाहीं ।
त्यागेंविण ॥ ७ ॥ फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेच्या अन्वयैं । सावध ऐका ॥ ८ ॥ मागां झालें निरूपण । साध-
काची वोळखण । आतां सांगिजेल खूण । सिद्ध लक्षणाची ॥ ९ ॥ साधु
वस्तु^६ होऊनि ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेर गेला । निश्चय चळैना ऐसा झाला ।
या नांव सिद्ध ॥ १० ॥ बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण ।
मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११ ॥ साधकास संदेहवृत्ती ।
पुढें होतसे निवृत्ती^७ । याकारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२ ॥
संशयरहित जें ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण । सिद्धाअंगीं संशय जाण । ला-
गेल कैसा ॥ १३ ॥ कर्ममार्ग संशयैं भरला । साधनें संशय कालवला ।


१. अश्रद्धेचा. २. हळूहळू. ३. आसक्तीचा त्याग. ४. समग्र. ५. विषयांचा
प्रत्यक्ष त्याग. ६. ब्रह्म. ७. संशयाचें निवारण.

५ वा.] सिद्धलक्षण. १२९
सर्वांमध्यें संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४ ॥ संशयाचें ज्ञान
खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें । संशयाचें भजन खोटें । निष्फळ होय ॥ १५ ॥
व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव । व्यर्थ संशयाचा स्वभाव ।
निश्चयेंविण ॥ १६ ॥ व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ । व्यर्थ
संशयाचा परमार्थ । निश्चयेंविण ॥ १७ ॥ व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ
संशयाची प्रीती । व्यर्थ संशयाची संगती । संशय वाढवी ॥ १८ ॥ व्यर्थ
संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें । व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं
॥ १९ ॥ व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती । व्यर्थ संश-
याची गती । निश्चयेंविण ॥ २० ॥ व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ
संशयाचा पक्ष । व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१ ॥ व्यर्थ
संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित । व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण
॥ २२॥ व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता १। व्यर्थ संशयाचा
ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥ निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।
व्यर्थचि पडिले प्रवाही । संदेहाचे ॥ २४ ॥ निश्चयेंविण जें बोलणें । तें
अवघेंचि कंटाळवाणें । बाष्कळ बोलिजे वाचालपणें । निरर्थक ॥ २५ ॥ असो
निश्चयेंविण जे वलगना । ते अवघी विटंबना । संशयैं कांहीं समाधाना ।
उरी नाहीं ॥ २६ ॥ म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान ।
तेंचि सिद्धांचें लक्षण । निश्चयेंेंसी ५॥ २७ ॥ तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय
करावा कवण । मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८ ॥ ऐक
निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा । नाना देवांचा वेळसा । करूं चि
नये ॥ २९ ॥ जेणें निर्मिलें चराचर । त्याचा करावा विचार । शुद्ध विवेकें
परमेश्वर । वोळखावा ॥ ३० ॥ मुख्य देव तो कोण । भक्ताचें कैसें लक्षण ।
असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१ ॥ आपल्या देवास वोळ-
खावें । मग मी कोण हें पाहावें । संग त्यागून राहावें । वस्तुरूप ॥ ३२ ॥
तोडावा बंधनाचा संशय । करावा मोक्षाचा निश्चय । पहावा भूतांचा अ-
न्वय । व्यतिरेक ॥ ३३ ॥ पूर्वपक्षेंसीं सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत । निश्चय देवाचा ॥ ३४ ॥ देहाचेनि योगें संशय ।
१. विद्वत्ता. २. घोटाळा.

१३० श्रीदासबोध. [ दशक
करी समाधानाचा क्षय । तरी चळों न द्यावा निश्चय । आत्मत्वाचा ॥ ३५॥
सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान ।
आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६ ॥ आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
या कारणें आत्मबुद्धी । सदृढ धरावी ॥ ३७॥ आत्मबुद्धि निश्चयाची । तेचि
दशा मोक्षश्रीची । अहमात्मा १ हें कधींचि । विसरूं नये ॥ ३८ ॥ निरू-
पिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण । संतांसि गेलिया शरण ।
संशय तुटती ॥ ३९ ॥ आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४० ॥ सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें
कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहा हो । निःसंदेही ॥ ४१ ॥ देहसंबं-
धाचेनि गुणें । लक्षणांसि काय उणें । देहातीतांचीं २ लक्षणें । काय म्हणोनि
सांगावीं ॥ ४२ ॥ जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंचीं ॥ ४३ ॥ लक्षणें म्हणिजे केवळ
गुण । वस्तु ठायींच निर्गुण । तेंचि सिद्धाचें लक्षण । वस्तुरूपें ॥ ४४ ॥
तथापि ज्ञानदशकीं ३ बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें । न्यूनपूर्ण क्षमा
केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमद-
शके सिद्धलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७२.
दशक सहावा.
१. देवशोधन.
श्रीगणेशाय नमः ॥ चित्त सूचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमेष एक ॥ १ ॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं ।
राहणें आहे आपणाशीं । न भेटतां तेथिल्या प्रभूशीं । सौख्य कैंचें ॥ २ ॥
म्हणोन ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय
श्लाघ्यवाणें ४ । सर्व कांहीं ॥ ३ ॥ प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥ म्हणोन रायापासून रंक । कोणी
एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥ त्यास
१. मी आत्मा आहें, देह नव्हे. २. देहाहंभाव गळलेल्या साधूंचीं. ३. आठव्या
दशकांत. ४. चांगलें.

६ वा.] देवशोधन. १३९
न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी ।
अंगीं लागे ॥ ६ ॥ या कारणें जो शाहणा । तेणें प्रभूस भेटावें जाणा । ऐसें
न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७ ॥ ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्या-
हून थोर देशाधिपती । देशाधिपतीहून नृपती । थोर जाणावा ॥ ८ ॥ राष्ट्रा-
चा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजाचाही राजा । तो
चक्रवर्ती ॥ ९ ॥ एक नरपति एक गजपति । एक हयपति एक भूपती ।
सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजु ॥ १० ॥ असो ऐसिया समस्तां । एक
ब्रह्मा निर्माणकर्ता । त्या ब्रह्म्यासहि निर्मिता । कोण आहे ॥ ११ ॥ ब्रह्मा
विष्णु आणि हर । त्यांसि निर्मिता तोचि थोर । तो वोळखावा परमेश्वर ।
नाना यत्नें ॥ १२ ॥ तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना । ब्रह्मां-
डनायक चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३ ॥ जेणें संसारीं घातलें । अवघें
ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासि नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥ १४ ॥
म्हणोनि देव वोळखावा । जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग
धरावा । म्हणजे कळे ॥ १५ ॥ जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे
संत । जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६ ॥ चलेना डलेना
देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधु
॥ १७ ॥ जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं
ज्ञान जागे । तोचि साधु ॥ १८ ॥ जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावें
ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९ ॥ पोट भरावयाकारणें । ना-
ना विद्या अभ्यास करणें । त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे
॥ २० ॥ देव वोळखावा एक । तेंचि ज्ञान तेंचि सार्थक । येर अवघेंचि
निरर्थक । पोटविद्या ॥ २१ ॥ जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।
पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२ ॥ एवं पोट भरायाची विद्या ।
तयेसि म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान
॥ २३ ॥ ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्ञान । तयापाशीं समा-
धान । पुसिलें पाहिजे ॥ २४ ॥ अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांप-
१. वेठीस. २. सार्वभौम. ३. हातीं येईना. ४. जाणवेना. ५. थोर पुरुष.
६. याप्रकारें. ७. प्रत्यक्ष.

१३२ श्रीदासबोध. [ दशक
देल ज्ञान । करंट्यास करंट्याचे दर्शन । होतां भाग्य कैचें ॥ २५ ॥
रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैचें आरोग्य त्याला । निर्बळापाशीं निर्ब-
ळाला । पाठीं कैची ॥ २६ ॥ पिशाच्चापाशीं पिशाच्च गेलें । तेथें कोण
सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवण ॥ २७ ॥
भिकाऱ्यापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं दीक्षा । उजेड पाहतां
कृष्णपक्षा । पाविजे कैचा ॥ २८ ॥ अबुद्धापाशीं गेला अबुद्ध । तो कैसेनि
होईल सुबुद्ध । बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९ ॥ देह्यापाशीं गेला
देही । तो कैसेनि होईल विदेही⁶ । म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञान-
मार्ग ॥ ३० ॥ या कारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासार-
विचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. ब्रह्मप्रतिपादन.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायुज्यप्राप्ति होय जेणें ।
नानामतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १ ॥ ब्रह्मज्ञानाविण उपदेश ।
तो म्हणों नये विशेष । धान्याविण जैसें भूस । खातां नये ॥ २ ॥ नाना
काबांड बडविलें । ना तरी तकचि घुसळिलें । अथवा धुवणचि सेविलें ।
सावकाश ॥ ३ ॥ नाना साली भक्षिल्या । अथवा चोइट्या चोखिल्या ।
खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैसा ॥ ४ ॥ तैसें ब्रह्मज्ञानाविण । नाना
उपदेशांचा शिण । सार सांडून असार कोण । शाहणा सेवी ॥ ५ ॥ आतां
ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरूपण । सुचित करावें अंतःकरण ।
श्रोतेजनीं ॥ ६ ॥ सकळ सृष्टीची रचना । तें हें पांचभौतिकें जाणा । परंतु
हें तगेना । सर्वकाळ ॥ ७ ॥ आदि अंतीं ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची
खूण । येर पांचभौतिक सगुण । नाशवंत ॥ ८ ॥ येरवीं हीं पाहतां भूतें ।
देव कैसें म्हणावें त्यांतें । भूत म्हणतां मनुष्यातें । विषाद वाटे ॥ ९ ॥ मौं
तों जगन्नायक परमात्मा । त्यासि आणि भूत उपमा । ज्याची कळेना महिमा ।
१. आधार. २. वेड्यास. ३. काळोख्याचे दिवसांत. ४. अज्ञानी. ५. संसारी.
६. मुक्त. ७. उपदेश. ८. पाहणें. ९. पाचोळा. १०. जड सृष्टि. ११. मग.

ब्रह्मादिकांसी ॥ १० ॥ भूतांऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष
या कारणें महापुरुष । सर्व जाणती ॥११॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । १
यां सबाह्यें जगदीश । पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी
॥ १२ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत
वर्म । अनुभवें जाणावें ॥१३॥ पंचभूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति
जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥१४॥ तें हें दृश्य नाश-
वंत । ऐसें वेदश्रुती बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥१५॥
जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें २ जाळितां जळेना । जें कालवितां काल-
वेना । आपैंकरूनी ३ ॥ १६ ॥ जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना ४ झडेना ।
जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥१७॥ ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वां-
हूनि ॲनारिसें ५ । परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८ ॥ दिसेना तरी
काय झालें । परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९ ॥
दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें । परंतु गुज तें जाणावें ।
गौप्य आहे ॥२०॥ प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार ।
गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥२१॥ उमजेना तें उमजवावें । दिसेना
तें पाहावें । जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥२२॥ गुप्त तेंचि प्रगटवावें ।
असाध्य तेंचि साधावें । कॉनडेंचि ६ अभ्यासावें । सावकाश ॥ २३ ॥ वेद
विरंची ७ आणि शेष । जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म
॥ २४ ॥ तरी तें कोण परिसावें । तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें
पावावें । परब्रह्म तें ॥२५॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।
वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त ८ तें ॥ २६ ॥ तयास म्हणावें देव । वरकड
लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनाकारणें ॥ २७ ॥ ऐसा
देवाचा निश्चय झाला । देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणाचि
आपला । शोध घ्यावा ॥ २८ ॥ माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण
देहावेगळाचि होतो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥२९॥
पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्व झाडितां सार ।


१. अंतर्बाह्य. २. अग्नीनें. ३. उदकानें. ४. अथवा. ५. निराळें. ६. अवघड तेंच. ७. ब्रह्मदेव. ८. अदृश्य.

१३४ श्रीदासबोध. [ दशक
आत्माचि उरे ॥३०॥ आपणासि ठावचि नाहीं । तेथे पहाणें नलगे कांहीं ।
तत्वें ठायींच्या ठायीं । विभागुनि गेलीं ॥३१॥ बांधली आहे ती गांठोडी ।
जो कोणी विचारें सोडी । विचार पाहतां गांठोडी । आढळना ॥ ३२ ॥
तत्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहतां विचार । एक आत्मा निरंतर । आपण
नाहीं ॥ ३३ ॥ आपणासि ठावचि नाहीं । जन्ममृत्यु कैंचे काई । पाहतां
वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४ ॥ पाप पुण्य यमयातना । हैं
निर्गुणीं तों असेना । आपण तोचि तरी जन्ममरणा । ठाव कैंचा ॥ ३५ ॥
देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला । देहातीत होतां पावला ।
मोक्षपद ॥ ३६ ॥ झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक । परंतु हा
विवेक । पाहिलाचि पाहावा ॥ ३७ ॥ जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां
दृश्य वोसरे । स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८ ॥ आपणास निवे-
दावें । आपण विवेकें जुरावें । आत्मनिवेदन जाणावें । यांचें नांव ॥ ३९॥
आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन । पुढें आत्मनिवेदन । सद्गुरु-
प्रसादें ॥ ४० ॥ आत्मनिवेदनाउपरी । निखेळ १ वस्तु निरंतरी । आपण
आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१ ॥ त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला ।
संसारखेद तो उडाला । देह प्रारब्धीं ठाकिला २ । सावकाश ॥ ४२ ॥ यासि
म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न ३ । भक्तचि
जाहला ॥ ४३ आतां होणार तें होइना कां । आणि जाणार तें जाइना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४ ॥ संसारीं बुडावें चुकलें ।
देवां भक्तां ऐक्य झालें । मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरुनी ॥ ४५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम
द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. मायोद्भव.
श्रीगणेशाय नमः ॥ निर्गुण आत्मा तो निर्मळ । जैसें आकाश अंतराळ ।
घनदाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १ ॥ जे खंडलेंचि नाहीं अखंड । जें
उदंडाहूनि उदंड । जें गगनाहूनि वाँड ४ । अति सूक्ष्म ॥ २ ॥ जें दिसेना न-
१. शुद्ध. २. देहसुखाचा प्रयत्न सोडिला, हा अर्थ. ३. एकरूप. ४. मोठें.

? No, it is:
लाभे with a dot?
Wait, look at footnote 5:
There is a '५' somewhere in line 23-24!
Could the mark above "लाभे" be a superscript '५'???
YES!! A superscript 5!
Look at that mark above "लाभे":
It is a tiny digit '५'!!
Wow! Look at that: above "लाभे" is a tiny '५', which is footnote 5!
And look at footnote 5 at the bottom:
"५. आत्मरूपाचें ज्ञान झालें."
That's why! The word is simply "लाभे", and the tiny glyph above it is the superscript footnote number ५!
That makes total sense!
And let's look for the other footnote numbers:
Footnote 1: "१. सगुणनिर्गुणाच्या मिश्रणाचा."
Look above "कर्दमोचा" in line 6/7:
At the end of line 6, "कर्द-": is there a tiny '१'?
Footnote 2: "२. दूध."
Look above "क्षीरें" in line 7: there's a tiny '२' above "क्षीरें"!
Footnote 3: "३. उदक."
Look above "नीरें" in line 7: there's a tiny '३' above "नीरें"!
Footnote 4: "४. चिपाड."
Look above "बाकस

१३५ श्रीदासबोध. [ दशक
यासी ॥ २२ ॥ आपला आपण शोध घेतां । आपली तों मायिक वार्तां ।
तत्त्वांतीं उरलें तत्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३ ॥ आपणाविणें निर्गुण ब्रह्म ।
हेंचि निवेदनाचें वर्म । तत्वासरीसों गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४ ॥
मीपण पाहतां आढळना । निर्गुण ब्रह्म तें चलेना । आपण तेंचि परी कळेना ।
सद्गुरूविण ॥ २५ ॥ सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें । पुढें
सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६ ॥ आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळां-
मध्यें व्यापिलें । सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७ ॥
होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार । आपला आपणासि विसर ।
ठायीं पडे ॥ २८ ॥ आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।
मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९ ॥ झालिया तत्त्वांचें निर-
सन । निर्गुण आत्माचि आपण । कां दाखवावें मीपण । तत्वनिरसना-
उपरि ॥ ३० ॥ तत्त्वांमध्ये मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें । सोहं-
भावें प्रत्यया आलें । आत्मैनिवेदन ॥ ३१ ॥ आत्मनिवेदन होतां । देव-
भक्तांस ऐक्यता । साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२ ॥
निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पापपुण्य । निर्गुणीं अनन्य
होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३ ॥ तत्त्वीं वेंटाळूनी घेतला । प्राणी संशय्ये
गुंडाळला । आपणास आपण भुलला । कौहं म्हणे ॥ ३४ ॥ तत्त्वीं गुंतला
म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सौहं । अनन्य होतां अहं सोहं । माव-
ळलीं ३५ ॥ याउपरी उर्वरितें । तेंचि सत्स्वरूप संत । देही असोनि देहा-
तीत । जाणिजे ऐसा ॥ ३६ ॥ संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच
बोलावें लागे । आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥
३७ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायोद्भावनिरूपणं नाम
तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. ब्रह्मनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्त्र । त्रेतायुग
१. तत्त्वांच्या निरसनावरोबर. २. देव म्हणजे मीच, या भावनेनें. ३. आत्म-
रूपाचें ज्ञान. ४. मी कोण आहे ? ५. तो देवच मी. ६. बाकी राहिलेलें.

बारा लक्ष शहाण्णव सहस्त्र । द्वापर आठ लक्ष चौसष्ट सहस्त्र । आतां कलियुग
ऐका ॥ १ ॥ कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्त्र । चतुर्युगें बेचाळीस लक्ष
वीस सहस्त्र । ऐशीं चतुर्युगें सहस्त्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २ ॥ ऐसे
ब्रह्मे सहस्त्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका । विष्णु सहस्त्र होतां ऐका ।
पळ एक ईश्वराचें ॥ ३ ॥ ईश्वर जाय सहस्त्रवेळ । तें शक्तीचें अर्ध पळ ।
ऐसी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४ ॥ ऐशा अनंत शक्ति होती ।
अनंत रचना होती जाती । तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ॥ ५ ॥
परब्रह्मासि कैची स्थिती । परी ही बोलावयाची रीती । वेदश्रुती नेतिनेती¹
परब्रह्मीं ॥ ६ ॥ चार सहस्त्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहटी² ।
उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७ ॥ चार लक्ष सत्तावीस सहस्त्र ।
दोनशें चाळीस संवत्सर । पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८ ॥
ऐसे रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर । पाहतां येथील विचार ।
अंत न लागे ॥ ९ ॥ एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर ।
एक म्हणती शक्ति³ थोर । सकळांमध्ये ॥ १० ॥ ऐसे आपुलालेपरी बोलती ।
परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं । यद्दृष्टं तन्नष्टं⁴ हे श्रुती । बोलतसे ॥ ११ ॥
आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां । याचा निश्चय निवडेना ।
साधूविण ॥ १२ ॥ साधु निश्चय करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक ।
येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३ ॥ चित्रीं लिहिली सेना । त्यांत
कोण थोर कोण साना । हें कां तुम्ही विचाराना । आपुले ठायीं ॥ १४ ॥
स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरहि कल्पिलें । परंतु जागें झालिया झालें ।
कैसें पाहा ॥ १५ ॥ पाहतां जागृतीचा विचार । कैचें लहान कैचें थोर ।
झाला अवघा विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६ ॥ अवघाचि मायिक विचार ।
कैचें लहान कैचें थोर । लहानथोर हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७ ॥
जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतांच मेला । परी याचा विचार
राहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८ ॥ जयांस झालें आत्मज्ञान । तेचि थोर
महाजन । वेदशास्त्रपुराण । साधु संत बोलिले ॥ १९ ॥ एवं सकळांमध्यें


तळटीपा (Footnotes):
१. हें ब्रम्ह नव्हे, तें ब्रम्ह नव्हे, असें सांगतात; हें ब्रम्ह होय, असें सांगत
नाहींत. २. मर्यादा ३. देवी. ४. जें दिसतें तें नाशवंत.

१३८ श्रीदासबोध. [ दशक
थोर । तो एकचि परमेश्वर । तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २० ॥ तो
निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार । स्थानमानांचा विचार ।
ऐलीकडे ॥ २१ ॥ नांव रूप स्थान मान । हा तो अवघाचि अनुमान ।
तथापि होईल निदानें १ । ब्रह्मप्रलेंयीं २ ॥ २२ ॥ ब्रह्म प्रलयावेगळें । ब्रह्म नांव-
रूपा वेगळें । ब्रह्म कोणी एका काळें । जैसें तैसें ॥ २३ ॥ करिती ब्रह्मनिरू-
पण । जाणती ब्रह्म संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः
समासः ॥ ४ ॥
५. मायाब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें । श्रोत्या-
वक्त्याचे मिषें । निरूपण ऐका ॥ १ ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण
साकार । ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥२॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ ।
माया चंचळ चपळ । ब्रह्म निरूपाधि केवळ । माया उपाधिरूप
॥ ३ ॥ माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना । माया
नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४ ॥ माया रचे ब्रह्म रचेना ।
माया खचे ब्रह्म खचेना । माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५ ॥
माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना । माया धरे ब्रह्म धरेना ।
धारणेसी ॥ ६ ॥ माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना । माया
विटे ब्रह्म विटेना । अवित तें ॥ ७ ॥ माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया
करी ब्रह्म कांहींच न करी । माया नानारूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८ ॥
माया पांचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक । मायाब्रह्माचा विवेक ।
विवेकी जाणती ॥ ९ ॥ माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।
माया अंत३ पारावार । ब्रह्मास नाहीं ॥ १० ॥ सकळ माया विस्तारली ।
ब्रह्मस्थिति आच्छादिली । परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११ ॥ गों-
डाळें सांडून नीरें घेइजे । नीर सांडून क्षीरं सेविजे । माया सांडून अनु-
१. शेवट. २. ब्रह्मदेवाचीं शंभर वर्षे भरलीं म्हणजे होणाऱ्या प्रलयांत. ३-
मर्यादित. ४. पाण्याच्या पृष्ठावर वाढणारी एक वनस्पती. ५. पाणी. ६. दूध.

६ वा.] सृष्टिकथन. १३९
भविजे । परब्रह्म तैसें ॥ १२ ॥ ब्रह्म आकाशाऐसें निवळ । माया वसुंधरा
डहुळे । ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरूप ॥ १३ ॥ ब्रह्म तें अप्रत्यक्ष
असे । माया ते प्रत्यक्ष दिसे । ब्रह्म तें समचि असे । माया ते विषम-
रूप ॥ १४ ॥ माया लक्ष्यें २ ब्रह्म अलक्ष । माया साक्ष ३ ब्रह्म असाक्ष । माये-
मध्यें दोन्ही पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं १५ ॥ माया पूर्वपक्षें ४ ब्रह्म सि-
द्धांत । माया असत् ब्रह्म सत् । ब्रह्मासि नाहीं कारणें हेत । मायेसि आहे
॥ १६ ॥ ब्रह्म अखंड घनदाट । माया पांचभौतिक पोंचट । ब्रह्म तें निरंतर
निघोटें ५ । माया ते जुनी जर्जरी ॥ १७ ॥ माया घडे ब्रह्म घडेना । माया
पडे ब्रह्म पडेना । माया विघडे ब्रह्म विवडेना । जैसें तैसें ॥ १८ ॥ ब्रह्म
असतचि असे । माया निरसतांच निरसे । ब्रह्म संकल्पांत नसे । माये-
सि असे संकल्प ॥ १९ ॥ माया कठिन ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म
विशाळ । माया नसे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २० ॥ वस्तु नव्हे बोलिजे
ऐशी । माया जैसी बोलिजे तैसी । काळ पावेना वस्तूसी । मायेसि झडपी
॥ २१ ॥ नाना रूप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग ६ । माया भंगे ब्रह्म
अभंग । जैसें तैसें ॥ २२ ॥ आतां असो हा विस्तार । चालत जातें सच-
राचर । तितुकी माया परमेश्वर । सबाह्य अभ्यंतरीं ॥ २३ ॥ सकळ
उपाधीवेगळा । तो परमात्मा निराळा । जळीं असोन नातळे जळा । आ-
काश जैसें ॥ २४ ॥ मायाब्रह्माचें विवरण । करितां चुके जन्ममरण ।
संतांसि गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५ ॥ अरे या संतांचा महिमा ।
बोलावया नाहीं सीमा । जयाचेनि जगदात्मा । अंतरींच होय ॥ २६ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायाब्रह्मनिरूपणं नाम पंचमः
समासः ॥ ५ ॥
६. सृष्टिकथन.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टिपूर्वीच ब्रह्म असे । तेथें सृष्टि मुळींच नसे ।
आतां सृष्टि दिसत असे । ते सत्य कीं मिथ्या ॥ १ ॥ तुम्ही सर्वज्ञ गोसांवी ।
१. गढूळ. २. लक्षांत आणण्यास योग्य. ३. प्रत्यक्ष. ४. पूर्वपक्षाप्रमाणें
खंडित होणारी. ५. घनदाट. ६. संबंध.

१४० श्रीदासबोध. [ दशक
माझी आशंका फेडावी । ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २ ॥ आतां
ऐका प्रत्युत्तर । कथेसि व्हावें तत्पर । वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाहला
॥ ३ ॥ जीवंभूतः सनातनं । ऐसें गीतेचें वचन । येणें वाक्यें सत्यपण
सृष्टीस आलें ॥ ४ ॥ यद्दृष्टं तन्नष्टं येणें । वाक्यें सृष्टि मिथ्यापणें । सत्य
मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५ ॥ सत्य म्हणों तरी नासे । मिथ्या म्हणों
तरी दिसे । आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६ ॥ सृष्टीमध्यें बहु जन ।
अज्ञान आणि सज्ञान । म्हणोनियां समाधान । होत नाहीं ॥ ७ ॥ ऐका
अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत । देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि
आहे ॥ ८ ॥ बोले सर्वज्ञाचा राजा । मूर्खस्यै प्रतिमापूजा । ब्रह्मप्रलया-
च्या पैजा । घालूं पाहे ॥ ९ ॥ तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी
संध्या स्नान । गुरुभजन तीर्थाटण । कासया करावें ॥ १० ॥ श्लोक ॥
तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदं वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः । वादे वादे जायते तत्व-
बोधो बोधे बोधे भासते चंद्रचूडः ॥ १ ॥ ऐसें चंद्रचूडाँचें वचन । सद्गु-
रूचें उपासन । गुरुगीतानिरूपण । बोलिलें हरें ॥ ११ ॥ गुरुसि कैसें
भजावें । आधीं तयासि ओळखावें । त्याचें समाधान घ्यावें । विवेकें स्वयें
॥ १२ ॥ श्लोक ॥ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं
गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ १ ॥ गुरुगीतेचें वचन । ऐसें
सद्गुरूचें ध्यान । तेथें सृष्टि मिथ्या भान । उरेल कैंचें ॥ १३ ॥ ऐसें सज्ञान
बोलिला । सद्गुरु तो वोळखिला । सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्चिताथै
॥ १४ ॥ श्रोता ऐसें न मानी कदा । अधिक उठिला विवाद । म्हणे कैसा
रे गोविंदा । अज्ञान म्हणतोसी ॥ १५ ॥ जीवभूतः सनातनै । ऐसें गीतेचें
बचन । तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६ ॥ ऐसा श्रोता आक्षेप
करी । विषाद् मानिला अंतरीं । याचें प्रत्युत्तर चतुरीं । सावध परिसावें
॥ १७ ॥ गीतेंत बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद । म्हणोनियां.
व्यर्थ खेद । वाहतोसी ॥ १८ ॥ श्लोक ॥ अश्वत्थः सर्ववृक्षाणां...॥ टी० ॥
१. जीव हा माझा अंश असून शाश्वत आहे. २. दिसतें तितकें नाहींसें होतें. ३.
मूर्खानें प्रतिमेची पूजा करावी. ४. शिवाचें. ५. संशयाचें निरसन. ६. शंका.

६ वा. ] सृष्टिकथन. १४१
माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ । वृक्ष तोडितां तात्काळ ।
तुटत आहे ॥ १९ ॥ श्लोक ॥ नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः ॥ २ ॥ टीका ॥ शस्त्रांचेनि तुटेना ।
अग्नीचेनि जळेना । उदकामध्यें कालवेना । स्वरूप माझें ॥ २० ॥ पिंपळ
तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकानें । पिंपळ कालवे उदकानें । नाशवंत
॥ २१ ॥ तुटे जळे बुडे उडे । आतां ऐक्य कैसें घडे । म्हणोनि हैं उजेडे ।
सद्गुरुमुखें ॥ २२ ॥ इंद्रियाणां मनश्चास्मि । कृष्ण म्हणे मन तो मी । तरी
कां आवरावी ऊर्मी । चंचळ मनाची ॥२३॥ ऐसें कृष्ण कां बोलिला । साध-
नमार्ग दाखविला । खडे मांडूनि शिकविला । ओंनामा जेंवी ॥२४॥ ऐसा आहे
वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद । देहबुद्धीचा विवाद । कामा न ये ॥२५॥
वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती । ते सर्वहि निवडती । सद्गु-
रूचेनि वचनें ॥ २६ ॥ वेदशास्त्रांचें भांडण । शस्त्रं तोडीं ऐसा कोण । हैं
निवडेना साधूविण । कदा कल्पांतीं ॥ २७ ॥ पूर्वपक्ष आणि सिद्धांत ।
शास्त्रीं बोलिला संकेतें । याचा होय निश्चितार्थ । साधुमुखें ॥ २८ ॥ येन्हवीं
वादाचीं उत्तरें । एकाहूनि एक थोरें । बोलूं जातां अपारें । वेदशास्त्रं ॥२९॥
म्हणोनि वादविवाद । सांडूनि कीजे संवाद । तेणें होय ब्रह्मानंद । स्वानुभवें
॥ ३० ॥ एके कल्पनेचि पोटीं । होती जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची
गोष्टी । साच केंवी ॥ ३१ ॥ कल्पनेचा केला देव । तेथें झाला दृढभाव ।
देवालागीं येता खेंव । भक्त दुःखें दुखावला ॥ ३२ ॥ पाषाणाचा देव केला ।
एके दिवशीं भंगोनि गेला । तेणें भक्त दुखावला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३ ॥
देव हरपला घरचे घरीं । एक देव नेला चोरीं । एक देव दुराचारीं ।
फोडिला बळें ॥ ३४ ॥ एक देव झापाणिला । एक देव उदकीं टाकिला ।
एक देव नेऊन घातला । पायांतळीं ॥ ३५ ॥ काय सांगों तीर्थमहिमा ।
मोडोनि गेला दुरात्मा । थोर सत्व होतें तें माँ । काय जाहलें कळेना ॥ ३६ ॥
देव घडिला सोनारीं । देव वोतिला वोतारीं । एक देव घडिला पार्थरीं ।
पाषाणाचा ॥ ३७ ॥ नर्मदा गंडिका तीरीं । देव पडिले लक्षवरी । त्यांची
१. लहर. २. निरनिराळे निर्णय. ३. अभिप्राय. ४. सरळ भाषण. ५.
धोका. ६. फेंकून दिला. ७. मग. ८. पाथरवटांनीं.

१४२ श्रीदासबोध. [ दशक
संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥ चक्रतीर्थीं चक्रांकित । देव
असती असंख्यात । नाहीं मनीं निश्चितार्थ । एक देव ॥ ३९ ॥ बाण तां-
दळे ताम्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें । ऐसे देव कोण जाणे । खरे कीं
खोटे ॥ ४० ॥ देव रेशिमाचा केला । तोहि तुटोनिया गेला । आतां नव
नेम धरिला । मृत्तिकेच्या लिंगाचा ॥ ४१ ॥ आमचा देव बहु सत्य । आह्मांस
आक्रांतीं पावत । पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२ ॥ आतां याचें सत्व
गेलें । प्राप्त होतें तें झालें । प्राक्तन न वचे पालटिलें । ईश्वराचेनीं ॥ ४३ ॥
धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति
पडिली ॥ ४४ ॥ हे आपुलाली कल्पना । प्राक्तनाऐसीं फळें जाणा । परी त्या
देवाचिया खुणा । वेगळयाचि ॥ ४५ ॥ श्लोक ॥ नानाशास्त्रविदो लोका नाना-
दैवतपूजकाः ॥ आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १ ॥ म्हणोनि हें
मायाभ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें । वेद शास्त्र पुराणें । ऐसेंचि बोलती
॥ ४६ ॥ साधु संत महानुभाव । त्यांचा ऐसाच अनुभव । पंचभूतातीत देव ।
सृष्टि मिथ्या ॥ ४७ ॥ सृष्टीपूर्वी सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संहारतां । शा-
श्वत देव तत्वतां । आदि अंतीं ॥ ४८ ॥ ऐसा सर्वांचा निश्चय । यदर्थी नाहीं सं-
शय । व्यतिरेक आणि अन्वय । कल्पनारूप ॥ ४९ ॥ एके कल्पनेचे पोर्टी ।
बोलिजेती अष्ट सृष्टी । तये सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५० ॥ एक कल्पनेची
सृष्टी । दुसरी शाब्दिकें सृष्टी । तिसरी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१ ॥
चौथी चित्रलेप सृष्टी । पांचवी स्वममृष्टी । सहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी
सातवी ॥ ५२ ॥ आठवी दृष्टिबंधनें । ऐशा अष्ट सृष्टी जाण । यांमध्यें
श्रेष्ठ कोण । कोण सत्य मानावी ॥ ५३ ॥ म्हणोनि सृष्टी नाशवंत । जाणती
संत महंत । सगुण भजावें निश्चित । निश्चयालागीं ॥ ५४ ॥ सगुणाचेनि
आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासार विचारें । संतसंगें ॥ ५५ ॥ आतां
असो हें बहुत । संतसंगें केलें नेमस्त । येरवीं चित्त दुश्चित्त । संशयीं पडे
१. गोमती नदींत. २. सर्व प्रकारं. ३. हें ब्रह्म नव्हे, तें ब्रह्म नव्हे, हा विचार.
४. हें ब्रह्म होय, तें ब्रह्म होय, हा विचार. ५. शब्दात्मक व्यवहार. ६. चित्रांतील
व्यवहार. ७. स्वप्नांतील व्यवहार. ८. आकाशांत भासणारे अनेक आकार.
९. ज्वरानें बेशुद्ध जाल्यास भासणारे देखावे. १०. नजरबंदीचे खेळ.

६ वा. ] सगुणभजन. १४३
॥ ५६ ॥ तंव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टि मिथ्या ऐसें कळलें । परी हैं दृश्य
अवघें नैाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७ ॥ दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोनि
सत्यचि वाटतें । यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८ ॥ याचें प्रत्यु-
त्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें । श्रोतीं श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९॥
ऐवं सृष्टि मिथ्या जाण । जाणोन रक्षावें सगुण । ऐसी हे अनुभवाची खूण ।
अनुभवी जाणती ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके
सृष्टिकथननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. सगुणभजन.
श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानें दृश्य मिथ्या झालें । तरी कां पाहिजे भजन
केलें । तेणें काय प्राप्त झालें । हें मज निरूपावें ॥ १ ॥ ज्ञानाहून थोर
असेना । तरी कां पाहिजे उपासना । उपासनेनें जना । काय प्राप्त ॥ २ ॥
मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेना सगुण । भजन केलियाचा गुण ।
मज निरूपावा ॥ ३ ॥ जें प्रत्यक्ष नाशवंत । त्यासि भजावें किंनिमित्त ।
सत्य सांडून असत्य । कोण भजावें ॥ ४ ॥ असत्याचा प्रत्यय आला । तरी
मग नेम कां लागला । सत्य सांडून गलबला । कासया करावा ॥ ५ ॥
निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यय येतो । सगुण काय देऊं पाहतो ।
सांगा स्वामी ॥ ६ ॥ सगुण नाशवंत ऐसें सांगतां । पुनः भजन करावें
म्हणतां । तरी कासयासाठीं आतां । भजन करूं ॥ ७ ॥ स्वामीचे भिडेनें
बोलवेना । येहवीं कांहींच मानेना । साध्यचि झालिया साधना । कां प्रव-
र्तावॆं ॥ ८ ॥ ऐसें श्रोत्याचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें । याचें उत्तर
ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९ ॥ गुरूचें वचन प्रतिपाळण । हें मुख्य परमार्थांचें
लक्षण । वचनभंग करितां विलक्षण । सहजचि जाहलें ॥ १० ॥ म्हणोनि
आज्ञेसि वंदावें । सगुण भजन मानावें । श्रोता म्हणे हें देवें । कां प्रयोजिलें
॥ ११ ॥ काय मानिला उपकार । कोण झाला साक्षात्कार । किंवा प्रार-
ब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२ ॥ होणार हैं तों पालटेना । भजनें काय
करावें जना । हैं तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३ ॥ स्वामीची
१. नसलें. २. एकंदरीत. ३. गोंधळून जाऊन.

१४४ श्रीदासबोध. [ दशक

आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण । परंतु याचा काय गुण । मज निरू-
पावा ॥ १४ ॥ वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाचीं लक्षणें । तुज कांहीं
लागे करणें । किंवा नाहीं ॥ १५ ॥ करणें लागे भोजन । करणें लागे उदक-
प्राशन । मळमूत्रत्याग लक्षण । तेंहि सुटेना ॥ १६ ॥ जनाचें समाधान
राखावें । आपुलें पोरिखें १ वोळखावें । आणि भजनचि मोडावें । हें कोण
ज्ञान ॥ १७ ॥ ज्ञानें विवेकें मिथ्या झालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें । तरी
मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८ ॥ साहेबास लोटांगणीं जावें ।
नीचासारखें व्हावें । आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान ॥ १९ ॥
हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तूं एक मानवी रंक । भजसि ना
तरी काय गेलें ॥ २० ॥ आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ ।
जो समर्थांचाहि समर्थ । देवां सोडविता ॥ २१ ॥ त्याचे आम्ही सेवकजन ।
सेवा करितां झालें ज्ञान । तेथें अभावें २ धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२ ॥
गुरु सांगता सारासार । त्यास कैसें म्हणावें असार । तुज काय सांगणें
विचार । शाहणे जाणती ॥ २३ ॥ समर्थांचे मनींचें तुटे ३ । तेंचि जाणावें
अदृष्ट ४ खोटें । राज्यपदापासुनि करंटे । चेंवलें ५ जैसें ॥ २४ ॥ मी थोर वाटे
मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी । विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे
॥ २५ ॥ वस्तुभजन ६ करीना । ना न करी एसेंहि म्हणेना । तरी हे जाणावी
कल्पना । दडोन राहिली ॥ २६ ॥ ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि
आला देहाभिमान । येथें नाहीं कीं अनुमान । प्रत्यय तुझा ॥ २७ ॥ तरी
आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें । तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना
ऐसें ॥ २८ ॥ करी दुर्जनांचा संहार । भक्तजनांचा आधार । ऐसा हा तों
चमत्कार । रोकडा चाले ॥ २९ ॥ मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि
जातें । कृपा केलिया रघुनाथें । प्रतीत येते ॥ ३० ॥ रघुनाथभजनें ज्ञान झालें ।
रघुनाथभजनें महत्व वाढलें । म्हणोनि तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१ ॥
हें तों आहे सप्रतीत । आणि तुज वाटेना प्रतीत । साक्षात्कारें नेमस्त । प्रत्यय
करावा ॥ ३२ ॥ रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तात्काळचि सिद्धि पावे ।
१. दुसऱ्याचें. २. अविश्वास. ३. मनांतून उतरणें. ४. दैव. ५. भ्रष्ट झालें. ६.
ब्रह्माचें ध्यान, किंवा देवाचें भजन.