सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा २७९
शब्दार्थ व टीपा :- न सरते=पुरत नाही, पेणें=मुक्काम.
अर्थ :- देवा, तुझी उपासना कोणात घडेल ती घडो; या निर्गणाच्या वचनाप्रत कोण येईल ते येवो. १
पण आता माझा धोता व मक्ता तू होऊन अभेदत्वाची अनुभूती मला यावी. या जाणिवेने मी तुझी सेवा करावी. २
जे कुशल आहेत, चतुर आहेत, त्यांची चतुराई काही पुरत नाही. ते तुला भजत नाहीत. नुसते आपल्या बुद्धीने वृथा
तर्कच करीत बसतील. ३ देवा, तुमचा व माझा मुक्काम एकाच घरी झालेला असल्यामुळे तुमची व माझी गाठ आता
नित्याची आहे. ४
५६२ आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीन देखोवेखीं ॥ १ ॥
न फळे संतत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ २ ॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याच वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - देखोवेखी=दुसऱ्याचे पाहून, वरपडे=साधन.
अर्थ:- आम्ही परमेश्वराची जी भक्ती आरंभिली आहे, जे थट्टेने बोलणे त्याच्याशी आम्ही करितो, ते
जगाचे दृष्टीने त्याचे मरणच आहे. कारण आमचे परवर पाहून ते अंगी भाव नसता परमार्थाचे आचरण करतात १
सतत हिताचा विचार कोणता आहे, हे जोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत ते जन्ममृत्यूच्या दारात सारखे
हेलपाटेच खात राहतील. २ जे कुणी दुसऱ्याने वंदिले असेल त्यास वंदन करावे, निंदिले असेल, त्यास निंदावे. दुसरे
ज्या वाटेने गेले, त्याच वाटेने जावे हाच त्यांचा उद्योग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कितीही
सांगितले तरी कुणी ऐकत नाहीत, तरी ते यमदूतांच्या स्वाधीन होतील. ४
५६३ दीप घेउनियां धुंडितो अंधार । भेटे हा¹ विचार अघटित ॥ १ ॥
विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ २ ॥
उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न फळे भाग्यहीना ॥ ३ ॥
तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हे तंव वचन वाउगेचि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अघटित=नवलाचे, न भ्यो=भिणार नाही, हुताशन=अग्नी.
अर्थ - हातात दिवा घेऊन अंधार धुंडायला जाणे किती शहाणपणाचे आहे ? तो कधी भेटेल हा अविचारच
नव्हे का? नवलाचेच नव्हे काय? १ आम्ही विष्णुदास प्रत्यक्ष काळासही भिणारे नव्हेत. मृगजळाच्या जाळ्यात सापडून
फसणारे आम्ही नव्हेत २ मातीची धूळ वर उधळली तर सूर्याचे तेज मलीन होईल कसे? पण हे भाग्यहीन माणसास
कसे समजणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गवताने अग्नी झाकला जातो, हे बोलणे युगात आहे. नाही काय? ४
५६४ नटनाट्यें अवघें संपादिले सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥ १ ॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुले स्वरूप जाणतसों ॥ २ ॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होउनि निश्चित² क्रीडा करूं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- स्फटिक=शक्तिमुक्त पारदर्शक दगड, उपाधि=अडचण
अर्थ - नाना प्रकारची नृत्ये व नाटके करणाऱ्यांप्रमाणे आम्ही नाना वेष धारण करून विविध सोंगे धारण
करू; नाना भेदांचे प्रकार दाखवू; परंतु त्यामुळे आमचा आत्मरूपाचा बोध व त्याचा रंग काही पालटणार नाही. १
बहुरूप्याने कौतुकाने नाना प्रकारचे खेळ केले, तरी तो आपले स्वतःचे रूप जाणून असतोच २ स्फटिकाच्या
पारदर्शक स्वरूपात पिवळे, लाल असे नाना रंग जरी दिसत असले, तरी त्यांची अडचण स्वतः स्फटिकास काही वाटत

  • १ तो, २ निश्चित.

२८० सार्थ तुकारामगाथा
नसते. तो स्वतः कोणत्याही एका रंगाचा नसतो. ३ त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या लोकांच्यांत
मिसळत असलो तरी, त्यांच्या विरहितच असून शांतपणे आमची क्रीडा भजनसुखाची व ईश्वरचिंतनाची चालू असते.४
५६५ तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥ १ ॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ २ ॥
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥ ३ ॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥ ४ ॥
तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा:- आणीक-दुसरे, घडी-वेळेस, श्रवण-कान, विसंबता-विसरून.
अर्थ :-देवा, तुझ्याशिवाय इतर कुणाची थोरवी माझी वाणी करील तर मग माझी ही जीभ झडून जावो १
तुझ्यावाचून इतर काही माझ्या चित्तास आवडेल तर, माझे मस्तक फुटून जावो. २ मोठ्या आवडीने मी
आपल्या डोळ्यांनी इतरांना पाहीन तर, त्याच वेळीं माझे हे चांडाळ डोळे नष्ट होवोत. ३ माझे हे कान जर तुझे
कथामृत श्रवण न करतील तर, मग त्यांचा काय उपयोग ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एक क्षणभर जरी
तुला विसरलो मी, तरी मग माझे हे जगणे निष्कारणच नाही का झाले ? ५
स्वामींचे स्त्रीनें स्वामीस कठिण उत्तरें केलीं-अभंग ७.
५६६ मजचि भोंवता केला १ येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥ १ ॥
चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुकेचि ना ॥ २ ॥
कोणाची बईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥ ३ ॥
काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥ ४ ॥
कांहीं नेदी बांधीं धोवियेलें घर । सारवाया ढोर शेण नाहीं ॥ ५ ॥
तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंजे मायां ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा:- जोग-स्वाग, आपदा-दुःखे, मवटे, ढोर-जनावर.
अर्थ- या माझ्या नवऱ्याचा सर्व त्याग माझ्याभोवती तेवढा झालेला दिसतो. त्याच्या उपभोगात मात्र
काही कमी पडले आहे ? १ सर्व सुखोपचार घरात चालून येत आहेत. परंतु माझी फजिती मात्र चुकत नाही २ या
संसारात कुणाची बायको म्हणून या सर्व आपत्ती सहन करू ? किती कष्ट सहन करू ? ३ ही पोरे मला खाण्या-
साठी तोडत आहेत; त्यांना काय देऊ ? मरतील तर बरे एकदाची. ४ हा माझा पती घरात काही शिल्लकच
ठेवीत नाही; सारे घर धुऊन काढले आहे याने. घर सारवावे म्हटले तर गुरांचे शेणसुद्धा आता घरात उरलेले
नाही. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ही रांड काहीच विचार करीत नाही. या संसाराचा भार स्वतःवर घेऊन
उगाचच कुंथत बसते. ६
५६७ काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥ १ ॥
किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरी ॥ २ ॥
झवे बापुली आई काय माझें केलें । घड या विठ्ठलें संसाराचें ॥ ३ ॥
तुका म्हणे येती वांईरी असडे । फुंदोनिया रडे हांसे कांहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोहो-पती, असडे-दुंदवे
अर्थ :- हा मेला नवरा माझा पूर्वजन्मीचा दावेदार होता की काय कुणास माहीत ? या जन्मी पती होऊन
माझे वैर साधतो आहे. १ मी आता सतत असे हे दुःख किती काळ सोसावे ? आणि प्रत्येक वस्तुसाठी किती
१ घेतलागे जोग.

सार्थ तुकारामगाथा २८१
लोकांपुढे तोंड वांगाडावे २ या माझ्या संसाराचे या विठ्ठलाने काय बरे म्हणून केले आहे ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, अशी ही माझी बायको हुंदके देऊन देऊन रडत आहे. रडता रडता हसत आहे. ४
५६८ गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥ १ ॥
भरी लोकांची पांतोरी । मेला चोरटा खागोरी ॥ २ ॥
खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोणी-धान्याचं पोते, पांतोरी-पोटे, खागोरी-खादाड, पिसी-वेडी, लांसी-राक्षसी.
अर्थ :- तुकारामबुवांची बायको म्हणत आहे, घरी धान्याचे पोते आले तर हा नवरा काही नीट मुला-
बाळांना खाऊ घालीत नाही. १ लोकांची मात्र पोटे भरीत असतो; असा हा मेला मोठा खादाडही आहे. २ एखाद्या
वेड्या स्त्रीप्रमाणे ही खवळून जाते व राक्षसीप्रमाणे ही अंगाला, हातांना झोंबते. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
रांडे, तुझ्या संचित कर्माचा भाग नेहमी खोटाच दिसतो. ४
५६९ आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥ १ ॥
डोचकें तिवी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ २ ॥
आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥ ३ ॥
हातीं टाळ तोंड वासी । गाय देऊळीं देवापासीं ॥ ४ ॥
आतां आम्ही करूं काय । न बसे घरीं राणा जाय ॥ ५ ॥
तुका म्हणे आतां धीरो । अझुनि नाहीं जालें तरी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोहो-पती, देवलसी-देववेडा, तिवी-भिजवून मऊ करून, उदमाचा-व्यापाराचा,
सांडी-सोडी, थार-आधार, येसपार-आठवण, पत्ता, राणा-रानात.
अर्थ :- पोरा, आता खाशील तरी काय ? नवरा देववेडा झाला ना ! १ सदा आंघोळ करून डोके
भिजवतो, गळ्यात माळा घालतो. परवा व्यापाराचा उद्योग याने सोडून दिला आहे. २ आपल्या पोटाचा आधार
मात्र पाहिला आमचा काही ठावठिकाणा त्याला नाही. ३ हातात टाळ घेऊन हा एकसारखा विठोबाच्या नावाने
बडबड करीत असतो देवळात जाऊन, देवासमोर बसून सारखा गाणे म्हणत असतो. ४ आता मी करावे तरी
काय ? हा कधी घरी बसतच नाही. एकसारखा रानावनात जाऊन बसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, तू
अजून धीर धर ना. अजून काही सर्वस्व नाहीसे झाले नाही. ६.
५७० बरें जालें गेलें । आजो अवघें मिळालें ॥ १ ॥
आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ २ ॥
किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥ ३ ॥
तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चीथू-छीतु, मानवला-मनावला.
अर्थ :- बरे झाले सर्व नाहीसे झाले, त्यातच आज सर्व काही मिळाले. १ आता जवळच्या ओल्याकोरड्या
भाकरी पोटभर खाईन. २ मी रांड या नवऱ्याच्या नावाने किती तोंड वाजवू ? किती तक्रार करू ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, मी बायकोच्या या छीत्तू करून बोलण्याला सरावलो आहे. ४
५७१ न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥ १ ॥
उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ २ ॥
तु. गा.-३६

२८२ सार्थ तुकारामगाथा
जिवंतचि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥ ३ ॥
संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥ ४ ॥
तळमळती यांच्या रांडा । घालितो जीवा नांवें धोंडा ॥ ५ ॥
तुका म्हणे बरे जाले । घे गे वाहिले लीहिले ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- लोंदा-गोळा, घास
अर्थ :- काही धंदा न करिता आयता घास तोंडात पडेल तर बरे, असा विचार करणारा हा नवरा मला
भेटला आहे १ उठल्या सुटल्या टाळ कुटीतच हा बसतो, याने सर्वत्र एकच गोगट करून सोडला आहे. २ हा
जिवंत असून मेल्यासारखाच वाटतो सारी लाज याने घोळून प्यालेली दिसते ३ हा संसाराकडे चुकूनही लक्ष देत
नाही त्यामुळे सारा संसार ओस पडला आहे ४ याच्या बायका घरी तळमळून रडतात व जीव धोंड्याप्रमाणे घट्ट
करून दिवस काढीत आहेत ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे झाले ते बरे झाले. बाई, तुझ्या कपाळी होते तेच
लिहिले असून त्याप्रमाणे घडते आहे. ६
५७२ कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥ १ ॥
देवासाठीं जाले ब्रह्मांड सोइरे । कोमळया उत्तरें काय वेचे ॥ २ ॥
माने पाचारितां नव्हे आराणूक । ऐसे येती लोक प्रीतीसाठीं ॥ ३ ॥
तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कातेलेसे श्वान लागे पाठीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सोइरें-नातेवाईक, पाचारिता-बोलाविल्यावर, आराणूक-समाधान, सुख,
कातेलेसे-संतापलेल्या
अर्थ :- आपल्या पत्नीस उद्देशून बुवा म्हणतात, 'बाई, उगाच कोण आपल्या घरी येतील बरे ? काय
ज्याचा त्याला धंदा घरचा नाही की काय ? १ या देवासाठी हे सारे जगातील लोक आपले नातेवाईकच बनले
आहेत त्यांना कोमल शब्दात उत्तर दिलेस तर तुझे काय खर्च होईल ? २ मोठ्या सम्मानाने बोलाविले, तरी त्यात
सुखसमाधान नसते; असे असूनही लोक मोठ्या प्रीतीने ईश्वरासाठी आपल्याकडे येतात. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, पण या रांडेला यात काही भूषण वाटत नाही, ज्याच्या त्याच्या अंगावर संतापलेल्या कुत्र्यासारखी
धावून जाते ४
विवरण - तुकारामबुवांच्या संसारासंबंधी, पत्नीसंबंधी, निरनिराळी मते प्रचलित आहेत वर जे सात अभंग
आहेत, ते सुद्धा तुकोबांचे नसून त्यांमधे असाही काही अभ्यासकांचा ख्याल आहे तुकोबांची पत्नी जिजाबाई ही मोठी
फटकळ, वात्रहाट व तुकारामांना सदोदित त्रास देणारी अशीही तिची रेखा कुणीकुणी रंगविली आहे ही जिजाबाई
तुकोबांची दुसरी बायको हिचे माहेरचे नाव जाउली किंवा जिजाई असून ती पुण्याच्या किंवा भेंडच्या गुळवे
घराण्यातील होती दोन्ही घराणी चांगली श्रीमंत व सावकाराची होती सर्व काही ठीक होते, तोपर्यंत प्रपंचही
तुकारामबुवांचा बरोबर चालला असावा पण पुढे एकामागून एक अशी संकटपरंपरा बुवांच्यावर कोसळली आईबाप
मेले, पहिली बायको मेली, पोरगे मेले, दावणीची गुरे मेली, दून मेले, दुष्काळ पडला, व्यापार संपून गावातील पत
गेली दुकानाचे दिवाळे निघाले तुकारामबुवांची मनःस्थिती उसळून गेली खरी शांत वृत्तीने बुवांची पत्नी त्यांना
सांभाळणारी, त्याचे मन समजावून घेणारी असती तर, कदाचित् वैराग्य कमी दिसले असता. पण ती कडक स्वभावाची
होती श्रीमंतीत वाढलेली ही स्त्री बुवांचे मन बिनसत समजू करून होनी याबद्दल कित्येकांच्या मनात शंका आहे
तुकोबांचे लक्ष प्रपंचांतून निघाले त्यांना साधा व्यवहारही उरला नाही घर सोडून भामनाथाच्या डोंगरावर
जावे व विठ्ठलभजनात काळ कंठावा, नामस्मरण करावे, ज्ञानेश्वरीभागवताची पारायणे करावीत, यांत त्यांचे चित्त
रमून गेले घरी पोरांचे काय होते, संसाराचे काय होते, घरी अन्नधान्याची गरज असते ना ? यासारख्या प्रश्नांची

[Page Header]
सार्थ तुकारामगाथा २८३

[Body Text]
चिंता बुवांना नव्हती. बुवा घरी आले तरी त्यांच्याबरोबर माणसे असत. त्यांची भगवद्भक्तीची चर्चा चाले, अभंग-
निरूपण चाले, नामस्मरण, भजन चाले. या वृत्तीने संसार कसा होणार ? नवऱ्याचे काही लक्ष संसारावर नाही, असे
पाहून मग ही जिजाई संतापत असे, रागवत असे. बुवा प्रसंगी कडक भाषा तिची सोशवत, हे आपल्याला इतर
संदर्भात माहीत आहे. मग ही बोलून चालून शिक्षणाचा संस्कार नसलेली एक सामान्य अज्ञ स्त्री ती शुश्रोषापर
कडक शब्दाचा वर्षाव करी. भारी रागावत असे. तिने एकटीने हा प्रपंचाचा गाडा ओढावा तरी कसा ? प्रपंचात काय
लागत नाही ? मुलाबाळांना नीटपणे वाढविण्याची सर्व जबाबदारी निमूटपणे तिने पत्करावयास हवी होती. पण
तेवढी समजूत तिला नव्हती असे दिसते. वरील अभंगात वर्णन केलेली परिस्थिती वस्तुस्थितीस धरून असेल तर,
जिजाबाई तुकारामांना फारच कठोर उत्तरे देत होती असे दिसते. 'कोणाची बाईक होऊनिया ओढू । संवसारीं काढू
आपदा किती ?', 'पोरें मरतीं तरी बरें होतें आतां' अशा शब्दात ती आपल्या मनातील संताप व्यक्त करीत आहे.
'बरें झालें देवा, बाईल कर्कशा' म्हणून तुकोबांनीही उल्लेख केला आहे.

तुकोबा व जिजाबाई यांच्या तांडी वरवर दिसणाऱ्या या अपशब्दातून दोघांच्या मनस्थितीचे व संप्रदायाचे
विक्षेप निवडून काढणे कठीण काम आहे. सर्व लौकिक संसाराकडे तुकोबांनी पाठ फिरविली व ते एका विठ्ठलाच्या
प्रेमात सापडले. मग या प्रारंभीच्या आयुष्यात सुखावलेल्या स्त्रीने कुणाच्या आधारावर प्रपंच ओढायचा ? तिचा तोल
सुटला असला, तरी तिचीही बाजू समजावून घेण्यासारखी आहे.

बुवा एवढे परमार्थी, भक्तीच्या मार्गाने प्रवास करीत निघालेले, पण त्यांच्याही मुखातून स्वतःच्या पत्नी-
विषयी अपशब्द निघत असत. मग जिजाबाई तर बोलून चालून स्त्री. धीमंदीत वाढलेली, तीही प्रसंगी त्रास असह्य
झाल्यावर संतापून बोलत असे. पण दुपारच्या जेवणाची वेळ झाली की, भर उन्हात, डोक्यावर भाकरी घेऊन वाटघा-
कुटपाच्या मार्गाने, पोरांच्या त्रासानं, मुमाराच्या फटफजितीने भारावलेली, गांगरलेली, कष्टी झालेली जिजाबाई
आपल्या देवपिसे जडलेल्या नवऱ्यासाठी निघालेली दिसेल. यावळी तिच्या डोक्यावर भाकरी व मनात या देवभोळ्या
'ध्याना' बद्दल अपार प्रेमच असावे. जिजाबाई साध्वी होती, पतिपरायण होती, देवादिकांना मानणारी होती, पण
स्वभावाने भारी तापट असावी. या स्त्रीच्या मनाचे रहस्य तुकोबाही जाणून होते. पायात काटा रुतल्यामुळे रगड़त
लंगडत येणाऱ्या स्वस्त्रीची दैना पाहून तेही कळवळले. त्यांनी जेवणवेळेस घरी येण्याचे कबूल केले. तिला वारंवार
उपदेश करून तिचे मन शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 'देवासाठीं जाले ब्रह्मांड सोइरें' असा बहुमोलाचा उपदेश
तेही तिला करण्याचा प्रयत्न करीत असताना दिवसांन तिला केलेल्या पूर्णबोधाचा विचार पुढे आपण करणार
आहोतच. पण अभंग क्र. १९८१ ते १९९१ पर्यंत तुकोबांनी ज्या श्रेष्ठ भूमिकेवर हा उपदेश केला आहे, त्याच्या
चिंतनाने बुवांच्या व जिजाईच्या मनात आलेल्या क्षणिक यावटळी निघून जाव्यात. 'भले लोक तुज बहु मानवती ।
वाढेल या कीर्ती जगन्माजी । किंचित हें सुख टाकी वो चुकोनि । पावसील धनी परमानंद ।' या सारख्या किंवा
'नको चिंता करू वस्त्रा या पोटाची । माऊली आमुची पांडुरंग', 'वैष्णवाची दासी होई सर्वभावें । मुखीं नाम ध्यावें
विठोबाचे' यासारख्या शब्दांच्या वर्षावाने जिजाबाईचे अंतःकरण पुढे पुढे शीतल झाले असावे व बुवांचा क्षणिक
रागही नाहीसा झाला असावा. मुसानेतुराचे व भांडभांडुपणाचे मुख तिने धुवून टाकावे, अशी अपेक्षा तुकोबांची
होती.

'तू माझ्या विचाराना येऊन मिळशील तर आपल्या मधील विरोध संपेल व देवावाचून तुला व मला दुसरे
कुणीच नाही. मी त्याचीच सुखसाठीं केली आहे. तू मला त्यात साहाय्य करावेस' अशी महत्त्वाची विनंती प्रेमाच्या
पोटी बुवांनी जिजाबाईस केली आहे. यात सर्व काही आले.

[Abhanga]
५७३ भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥ १ ॥
करिता नव्हे नीट श्वानाचे हें पुच्छ । खापरा परीस काय करी ॥ २ ॥
काय करिल तया साकरेचे आळें । बीज जैसें फळें येतीं तया ॥ ३ ॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥ ४ ॥

२८४ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- पाषाण-दगड, श्वानाचें-कुत्र्याचे, खळ-दुष्ट.
अर्थ- जो मनात भाव धरून वागेल त्याच्या सामर्थ्याने दगडाचा देवही त्याला तारील. पण मूळातच जो
दुर्जन किंवा दुष्ट वृत्तीचा आहे, त्याला सज्जन तरी काय करणार ? १ कुत्र्याचे वाकडे शेपूट कधी तरी सरळ करता
येईल काय ? खापराच्या तुकड्यास परीस काय करणार ? त्याला लोखंडच हवे. २ कडू लिंबाच्या झाडास साखरेचे
आळे करून काय उपयोग ? जसे बीज असणार, तशी फळे त्याला येणार हे स्पष्ट आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, एखाद्या वेळेस वज्रासारख्या कठिण शस्त्राचा भंग होईल; पण या दुष्ट माणसाच्या स्वभावात बदल घडून
येणार नाही. ४
५७४ इच्छावें तें जबळी आलें । काय बोलें कारण ॥ १ ॥
नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ २ ॥
मुकियाचे परी जीवीं । साकर जेवीं खादली ॥ ३ ॥
तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्यची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खादली-खाल्ली, मौन्यचि-न बोलणे.
अर्थ :- ज्याची इच्छा करावी ते सर्व प्राप्त झाले आहे. आता बोलायचे काही कारण राहिले नाही. १
हरीच्या नामरूपाची गाठ पडल्यामुळे आता सर्व गोष्टी अथवा विवंचना संपल्याच ना. २ मुक्याने साखर खाल्ली
तरी, त्याला जशी तिची गोडी सांगता येत नाही तसे माझे झाले आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी
आता काय बोलावे; आता मौन धरावे, काहीच बोलू नये हे चांगले ४
५७५ साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील ॥ १ ॥
परद्रव्य परनारी । याचा घरीं विटाळ ॥ २ ॥
दैवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥ ३ ॥
तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- परद्रव्य-दुसऱ्याची संपत्ती, परनारी-दुसऱ्याची स्त्री.
अर्थ - साधनाने साधने करायची असली तरी हीच दोन करावीत. १ एक परद्रव्याचा विटाळ मानावा
व दुसरे म्हणजे परस्त्री मातेप्रमाणे मानावी. २ मग मोठ्या भाग्याने देव त्याच्या घरी येतील. सर्व संपत्तीची
अनुकूलता त्यास लाभेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, इतकेच नव्हे तर, अशा गृहस्थाचे शरीर म्हणजे देवाच्या
घरचे भांडारच होय. ४
५७६ आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥ १ ॥
मोहे धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ २ ॥
कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥ ३ ॥
सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥ ४ ॥
आम्हां घाली पाठीकडे । पुढें १कळिकाळाशीं भिडे ॥ ५ ॥
तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सूकर-वराह, कृपानीधी-कृपेचा सागर.
अर्थ :- या देवाने आमच्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह यांच्या रूपांनी अवतार घेतले आहेत. १ या देवाचे
पंढरीनाथा, असे नाव घेताच हा देव आपल्या कृपेचा पान्हा देण्यासाठी मोठ्या प्रेमाने धावून येतो. २ तसे पाहिले
तर कुठे तो दिसत नसला तरी अवचितपणे येऊन आमचे संरक्षण करीत असतो. ३ हा देव एवढा दयाळू आहे की,
१ आपण.

सार्थ तुकारामगाथा २८५
तो सुखाचा वाटा आम्हास देतो आणि दुःख स्वतःसाठी ठेवितो दुःखाचा घोट स्वतःच तो गिळीत असतो ४ आमचे
सरंक्षण करण्यासाठी हा आम्हास पाठीशी घालतो व स्वतः प्रत्यक्ष काळाशी झगडण्यासाठी पुढे होतो ५ तुकाराम
महाराज म्हणतात, हा कृपेचा सागर आमच्या रक्षणासाठी भवसागरातील नावेत उतरलेला असतो ६
५७७ रवि रश्मिकळा । नये काढिता निराळा ॥ १ ॥
तंसा आम्हा जाला भाव । अगीं जडोनि ठेला देव ॥ २ ॥
गोडी साखरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥ ३ ॥
तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - रश्मिकळा-किरणांचे तेज, ठेला-स्थिर जाला
अर्थ - सूर्याची किरणे व त्याचे तेज याना सूर्यापासून वेगळे काढता येत नाही १ त्याप्रमाणेच देवाचे
व आमचे नाते असून तो आमच्या सर्वांगातच स्थिर झालेला आहे २ साखरेपासून तिची गोडी निराळी काढता
येईल काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो जो शब्द उमटेल, तो आकाशाच्या पोटातच विरून जाणार. जो
जो भाव उमटेल, तो तो ईश्वराच्या रूपातच सामावलेला असणार ४
५७८ थोडें परी निरें । अबिट तें घ्यावे सरे ॥ १ ॥
घ्यावें जेणे नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ २ ॥
चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥ ३ ॥
आपले तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - निरें-स्वच्छ
अर्थ - अगदी थोडे, पण स्वच्छ असलेले व वीट न येणारे, यथार्थ असेल तेच घ्यावे १ असे घ्यावे की,
ज्याची कमतरता कधी पडूच नये एका बीजातून अनेक नवी बीजे तयार होतात तसे व्हावे २ आपले चित्त आपणास
साक्षी ठेवावे, इतरांच्या उपचाराची पर्वा ठेवू नये ३ आपले हित नेमके कशात आहे ते पाहावे यातच सब सार
आहे ४
५७९ अवघे देव साध । परी या अवगुणाचा वाध ॥ १ ॥
म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ २ ॥
ऊस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा ¹ निराळा ॥ ३ ॥
तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साध-साध्य
अर्थ - सर्वत्र व्यापून राहिलेला देव हे एकच असून तो साध्य करून घेणे हे कर्तव्य असले तरी या अंगाच्या
अवगुणामुळे बाध येऊन तो साधत नाही १ हे तत्त्व एकासारखे दुसरे दिसत असूनही हे त्यासारखे नसते २ ऊस
व कांदा एकाच आळ्यात लाविले तरी त्याचा स्वाद व त्याची गोडी या गोष्टी वेगळ्याच असतात ३ तुकाराम
महाराज म्हणतात विषाची व अमृताची बरोबरी होणार नाहीच ४
५८० शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥ १ ॥
म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ २ ॥
खवळलिया कामक्रोधीं । अगीं भरती आधिव्याधी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपोआप ॥ ४ ॥
१ पाहता

२८६ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा:- येर-दुसरे, आधी-मानसिक त्रास, व्याधी-शारीरिक दुःख, त्रिविधताप-आधिदैविक,
आध्यात्मिक व आधिभौतिक ताप.
अर्थ:- या जगात शांतीप्राप्तीसारखे दुसरे कुठलेही सुख नाही. बाकी दुसरे सर्व दुःखच आहे. १ म्हणून
सर्वांनी आपल्या चित्तात शांतता धारण करावी; त्यामुळेच तुम्ही या भवसागरातून पैलतीराला जाता. २ जर अंतः-
करणात कामक्रोधादी विचार सबळवून गेले, तर मानसिक व शारीरिक दुःखांनी जीवित भरून जाते. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, या शांतीच्या प्राप्तीमुळे त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतात. ४
५८१ गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ॥ १ ॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ २ ॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥ ३ ॥
हेम अळंकरा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा- परी-रीतीने, हेम-सोने.
अर्थ :- गूळ हा गोडीने सर्वत्र एकसारखाच असतो. त्याप्रमाणे हा देवच सर्वत्र भरून राहिलेला आहे. १
आता मी या सर्वज्ञ व सर्वव्यापी देवाची कोणत्या रीतीने भजन, पूजन करू ? कारण देव सर्वत्र अंतर्बाह्य स्वरूपात
भरून राहिला आहे. २ पाण्याहून वेगळा असा त्यावरचा तरंग कधी असतो काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात,
सोन्याच्या अलंकारांची नावे निरनिराळी असली तरी, सुवर्ण एकच असते. तसे देव व आम्ही भक्त एकच आहोत. ४
५८२ परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥ १ ॥
हेंचि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ २ ॥
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥ ३ ॥
सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥ ४ ॥
पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥ ५ ॥
योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥ ६ ॥
मोक्षायेवढें सुख । सुख नव्हेचि तें दुःख ॥ ७ ॥
तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - परमेष्ठिपदा-ब्रह्मदेवाचे पद, विपत्य-संकट
अर्थ - जे खरे भक्त आहेत ते ब्रह्मदेवाचे पदही नेहमीच तुच्छ मानतात १ नेहमी श्रीहरीचे चिंतन हेच
त्यांचे धन असते. २ इंद्रपदाची जे सुखाचे भोग ते त्यांना भवरोगासारखे वाटतात ३ सर्व जगाचे राज्य जरी
त्यांना मिळाले, तरी त्याच्याशी त्यांना कर्तव्य नसते ४ पाताळाचे अधिराज्य जरी त्यांना कोणी दिले, तरी ते त्यांना
संकटच वाटते. ५ योगसिद्धींच्या पूर्णतेने जे लाभ होतील ते त्यांना दुःखाचेच वाटतात. ६ मोक्षप्राप्तीसारखे मोठे
सुख त्यांना दुःखदायकच वाटते. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एक श्रीहरीशिवाय त्यांना अवघा शीणच वाटतो. ८
५८३ मोहोऱ्याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥ १ ॥
नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ २ ॥
स्वामीचिया¹ अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥ ३ ॥
तुका म्हणे खोडी । देवमनी न देती दडी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मोहोर-एक प्रकारचा दगड, याच्या संपर्कात सूत असले तर ते अग्नीतही जळत नाही.
देवमनी-घोडयाच्या गळ्याशी शुभ्रस्वस्तिक रंगाचा भोवरा असतो त्याच्यामुळे
१ स्वप्नीचिया.

अर्थ - मोहोर जातीच्या दगडाबरोबर सूत असेल तर ते अग्नीत टाकल्यावरही जळून जात नाही १
नाही तर एरवी हे सूत त्या अग्नीचेच भक्ष्य असते, हे काय सांगायला हवे ? २ एकदा स्वामीच्या अंगासारखे,
देवाच्या अंगासारखे भक्ताचे रूप झाल्यावर मग ते इतरासारखे राहात नाही त्याला कुणाचेही भय उरत नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात, एकदा घोडयाच्या गळ्यास शुभत्वदर्शक अशा चिन्हाचे दर्शन झाले की मग त्याच्या
इतर खोडी दृष्टियाडच होतात नाही का ? ४
५८४ मजसवे नको चेष्टा । नव्हे साळी काहीं कोष्टा ॥ १ ॥
येस साडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ २ ॥
येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥ ३ ॥
तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - दिमाख-श्रेष्ठपण, चार-वेडेचार
अर्थ - देवा, माझ्याशी विनाकारण चेष्टामस्करी करू नकोस मी काही साळी, कोष्टी याच्या सारखा
सामान्य नाही १ तू आपला श्रेष्ठपणा सोडून मजकडे ये मजवर कृपा कर आणि हे जर होत नसेल तर तू निघून
जा कुठेही तोंड काळे कर २ येथे काही तुझे वेडेचार चालणार नाहीत वेडावाकडा व्यवहारही चालणार नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास सरस काय आहे नीरस काय आहे, हे जाणीत असतो ४
५८५ भाव देवाचे उचित । भाव तोचि भगवंत ॥ १ ॥
धन्यधन्य शुद्ध जाती । संदेस फंचा तेथें चित्तीं ॥ २ ॥
बहुत बराडी । देवजंवळी १ आवडी ॥ ३ ॥
तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिक रिघो खडें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - संदेस-सदेह शंका, बराडी-आशा ठेवून असणे रोकडे-स्पष्ट
अर्थ - भक्तिभावाने देवास शरण जाणे हेच योग्य आहे कारण भक्तिभाव हाच एक देव आहे १ ज्या
जाती शुद्ध आहेत त्या धन्य होत कारण त्याच्या चित्तात संदेह कधीही नसतो २ ते देवादिययी फारच आशा
ठेवून असतात, त्याची देवावर प्रीतीही मोठीच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात हे स्पष्ट आहे की, देवाचा
लाभ अधिक प्रमाणात करून घेण्यास हेच भक्त समर्थ असतात ४
५८६ गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे सकल्प ॥ १ ॥
कठिन योगाहूनि क्षेम । ओकलिया होतो श्रम ॥ २ ॥
पावले मरे शिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे बहु आणी । कठिन निघालिया रणीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - योगाहून-प्राप्तीपेक्षा, क्षेम-सांभाळ, आणी-बोलणे
अर्थ - गौरवाचा प्रसंग हा गौरवापुरता ठीक आहे, पण सत्य सकल्पाचे फळ पाडुरंगाची कृपा हेच आहे १
कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीपेक्षा तिचा सांभाळ करणे कठिण काम आहे ती गोष्ट परत करण्याचा प्रसंग येतो
तेव्हाही फार श्रम होतात २ घरातील त्रासास कंटाळून एखादा मनुष्य शिवेपाशी जातो व तेथे त्याला मरण येते
म्हणजे घर सोडून शिवेपाशी येणे व तेथे मरणे, यातील श्रमच त्याच्या वाट्यास प्रामुख्याने दिसतात ३ तुकाराम
महाराज म्हणतात, एखादे बोलणे रूप शूरत्वाचे असले तरी, प्रत्यक्ष रणागणावर मात्र त्यास फार कठीण वाटते ४
५८७ न राही अवगुण । यमें मानीतसे सिण ॥ १ ॥
भोग देतां करिती काई । फुडता यमदंडें दोई ॥ २ ॥
१ देवावरी

२८८ सार्थ तुकारामगाथा
पापपुण्यझाडा । देतां तेथें मोठी पीडा ॥ ३ ॥
तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- संडी-सोडीत, झाडा-हिशेब.
अर्थ :- हा दुष्ट मनुष्य आपल्या अंगचे अवगुण सोडीत नाही. कुणी त्याच्या स्वभावातील व वर्तणुकीतील
वर्म काढल्यास त्यास फार त्रास झाल्यासारखे वाटते. १ पण भोगलेल्या कर्माची फळे पाहण्याचा प्रसंग आल्यावर
काय करणार ? यमाच्या दंडाकडून डोके फुटेल, तेव्हा काय होणार ? २ यमासमोर पापपुण्याचा झाडा द्यावा लागेल
तेव्हा मात्र मोठेच दुःख होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे मी काही बोललो की, या लोकांना त्याचा
त्रास वाटतो ४
५८८ पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥ १ ॥
अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ २ ॥
आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥ ३ ॥
तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पाक-भोजन, धणी-तृप्ती.
अर्थ:- आजवर जो त्रास मी सर्वांना दिला त्याचा आता नाश होईल. १ याचे कारण असे की ज्याचा
वीट कधीही येत नाही, अशा पांडुरंगाची संगत मी केली आहे. २ ईश्वर संगतीचे हे आयतेच भोजन मला मिळाले
आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांला त्याच्यामुळे तृप्तता अमर्याद अशी झाली आहे ४
५८९ दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख¹ ॥ १ ॥
झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ २ ॥
सिदोरी तें पापपुण्य । सर्वेंसिण भिकेचा ॥ ३ ॥
तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाहो-ओघ, प्रवाह, मार्ग.
अर्थ:- नारायणास विन्मुख झाल्यामुळे हे सर्व लोक पाहा कसे दुर्बल बनलेले आहेत. १ आपले स्वत चे
हित कशात आहे, हे पाहण्याचे यांनी सोडून दिल्यामुळे हे यमाच्या शिक्षेस मात्र प्राप्त होतात २ बरोबर जशी पाप-
पुण्याची शिदोरी असेल, त्याप्रमाणे त्यांना अनेक जन्माचा शीण सोसावा लागेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
हे असे असताना लटिक्याचा प्रवाह कैसा मार्ग कसा निर्माण झाला आहे पाहा. ४
५९० वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥ १ ॥
जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ २ ॥
काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- तुरें-डंके, वाद्ये, तुतारी.
अर्थ :- आम्ही देवाच्या भेटीला निघालो, या आनंदाच्या वार्तेने जिकडे तिकडे तुतारी निनादू लागेल. १
आम्ही अहंकार जिंकून शिखर चढून जाण्याची त्याची पायरी केलेली आहे. २ या आमच्या मार्गात आता यमास
कसला वावच नाही. आणि दुसऱ्याच्या श्रमालाही येथे अवसर नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता
वैकुंठाला जाताना त्या श्रीहरीला भेटणे फारच सोपे झाले आहे आम्हांस. ४
१ विन्मुख

सार्थ तुकारामगाथा २८९
५९१ झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरु ॥ १ ॥
तुम्हीं सर्वो सर्वोत्तम । ऐसे विसरता धर्म¹ ॥ २ ॥
परिसा तुमचे देणे । तो त्या जागे अभिमानें ॥ ३ ॥
गाहाण्याने तुका । गर्जे मारूनिया हाका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आव्हेरु-तिरस्कार
अर्थ - कल्पतरू तर बोलून चालून झाडच आहे पण तो आलेल्या याचकाचा तिरस्कार न करिता, त्यास
आश्रय देतो १ आणि देवा, तुम्ही तर सर्वांविषयी सर्वोत्तम असे प्रभू असताना जवळ करण्याचा धर्म कसे
विसरून जाता ? २ लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर त्याचे सुवर्ण बनविणे, हा धर्म त्या परिसाच्या अंगी तुम्हीच दिला
असून, तो आपल्या कर्तव्याविषयी अभिमानाने जागृत आहे ३ तुकाराम महाराज गर्जना करून अशी गान्हाणी
मोठ्याने लोकांना सांगत आहेत ४
५९२ वसवावे घर । देवे बरें निरंतर ॥ १ ॥
सग आसनीं शयनीं । घडे भोजनों गमनी ॥ २ ॥
सकल्प विकल्प । मावऴोनि पुण्यपाप ॥ ३ ॥
तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वसवावें-निर्माण कराव
अर्थ - या देहात देवाने आपले घर निर्माण करून त्यात निरंतर वसती करावी हे उत्तम १ या
देवाचीच संगत आसनावर, शयनावर, भोजनप्रसंगी घडावी हे चांगले २ याच्या सहवासाने मन, अत करणातील
सकल्प व विकल्प, पापपुण्य याच्या भावनाच नष्ट होतील ३ तुकाराम महाराज म्हणतात मग सर्व काळ त्या
गोविंदाच्याच नामाचा सुकाळ करता येईल ४
५९३ येथील हा ठसा । गेला पडोनिया ऐसा ॥ १ ॥
घरों देवाचे अबोला । त्यासि तेचि सवे त्याला ॥ २ ॥
नाहीं पाहावे लागत । एकाएकींच ते रितें ॥ ३ ॥
तुका म्हणे जन । तयामध्ये येवढें भिन्न ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठसा-रीत सवे-सवय रितें-कमी
अर्थ - देव आणि जन याच्यातील सबंधाची अशी ही रीतच पडून गेली आहे १ लोक या देवाची
अबोला धरतात व तसाच अबोला धरण्याची सवय त्या देवालाही आहेच २ एकमेकाचे काही कमी पडते आहे, हे
मुळी कुणाला पाहावेच लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक व देव यांच्यात एवढी भिन्नता आहे ४
५९४ करिता देवार्चन । घरा आले सतजन ॥ १ ॥
देव² सारावे परते । सत पूजावे आरते ॥ २ ॥
शाळिग्राम विष्णूमूर्ती । सत हो का भलते याती ॥ ३ ॥
तुका म्हणे सधी । अधिक वैष्णवाची मादी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - देवार्चन-देवाची पूजा, परते-बाजूला, आरते-प्रीतीनें, शाळिग्राम-गंडकी नदीतील
काळा देवरूप दगड मांदी-समुदाय, सधी-अशा समयास
१ नाम, २ तरी ते
तु गाथा ३७

२९० सार्थ तुकारामगाथा
अर्थ -- देवाची पूजा करीत असताना जर संत लोक घरी आले तर काय करावे ? १ त्यावेळी देव थोडा
वेळ बाजूस सारून संतांचीच पूजा मोठ्या प्रेमाने करावी २ शाळिग्राम ही तेवढी विष्णूची मूर्ती, व दाराशी आलेल्या
संतांचीच जात का त्याच्याहून वेगळी मानावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा समयास वैष्णवांच्या समुदायाचे
पूजन करणे हे अधिक महत्त्वाचे आहे ४
५९५ ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥ १ ॥
करिता स्वामीसवे वाद१ । अधिक अधिक आनंद ॥ २ ॥
असावा तो धर्म । मग साहो जातें वर्म ॥ ३ ॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठलीं गौरवी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाद-सुसंवाद, वाग्देवी-वाणीरूप देवी
अर्थ - जो ईश्वराची खरी सेवा अंतःकरणपूर्वक करितो त्याच्या जीवास कसले भय आहे ? १ ईश्वराशी
सुसंवाद करता करताच त्याच्या मनास पराकोटीचा आनंद होतो २ हाच एकनिष्ठेचा धर्म असल्यास मग त्या
स्वामीचे रहस्य समजले जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीरूपी देवीचा गौरव प्रत्यक्ष विठ्ठलाकडून
केला जातो ४
५९६ देवे जीव धाला । संसार तो कडू झाला ॥ १ ॥
तेचि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ २ ॥
वेधी आणिकास । ऐसा जया अंगीं कस ॥ ३ ॥
तुका म्हणे भूक । येणे न लगे आणीक ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धाला-संतुष्ट झाला कस-सामर्थ्य
अर्थ - या देवाच्या प्राप्तीने माझा जीव संतुष्ट झाला आहे आणि मला हा लौकिक संसार कडू वाटू
लागला आहे १ आता मला हरिहराच्या चिंतनाचे व भक्तीच्या तृप्तीचे डेंकर येतील २ आणखी दुसऱ्या वेळी
अंतःकरण वेधून घेण्याचे सामर्थ्य याच्या अंगी आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या संगतीच्या तृप्तीने
आणखी भूक मला लागणार नाही ४
५९७ नाम ताराचे ही सार । शरणागत यमकिंकर ॥ १ ॥
उत्तमाउत्तम२ । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ २ ॥
नाम जपता चंद्रमौळी । नामें तरला बाल्हाकोळी ॥ ३ ॥
तुका म्हणे वर्णू काय । तारक विठोबाचे पाय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - यमकिंकर-यमाचे दास, तारक-तारणारे, चंद्रमौळी-शिव
अर्थ - या विठ्ठलाचे नाम हे सर्व साराचे सार होय याला यमाचे सेवकही शरण आलेले असतात १
उत्तमात उत्तम असलेल्या या पुरुषोत्तमाचे नाम तुम्ही वाणीने वारंवार उच्चारावे २ याच्याच नामाच्या जपाने
शिवशंकर तरून गेले व वाल्या कोळ्याचा उद्धार झाला ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी काय वर्णन
करू ? या विठोबाचे पायच फक्त तारणारे आहेत ४
५९८ गातो भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥ १ ॥
परि तू पतितपावन । करीं साच हें वचन ॥ २ ॥
मुखें म्हणवितो दास । चित्तीं माया लोभ आस ॥ ३ ॥
तुका म्हणे दावी वेशा । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥ ४ ॥
१ पाद, २ नाम उत्तम उत्तम

सार्थ तुकारामगाथा २९१

शब्दार्थ व टीपा :- भूषण-लौकिक, समाधान, साच-बरोबर, आस-इच्छा
अर्थ :- देवा, तुझें नाम गातो, पण माझ्या अंगात म्हणावासा भक्तिभाव नाही. केवळ समाधानाचा लौकिक
जगात वाढावा म्हणून मी हे सारे करतो १ पण देवा, तू पतितपावन आहेस ना ? तुझे हे नाव व वचन तू खरे
करून दाखोव ना. २ मी तोंडाने तुझा दास, तुझा दास असे म्हणतो; पण मनात मात्र माझ्या माया, लोभ, इच्छा
या असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी हा वरवरचा साधुत्वाचा वेष दाखविला तरी, अंतरंगात मात्र
तसा भाव नाही. ४
५९९ द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥ १ ॥
माय त्यासि व्याली जेव्हां । रांड ' सटवी नव्हती तेव्हां ॥ २ ॥
कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥ ३ ॥
भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥४॥
तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनी हीन ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- नागवला-लुटला गेला
अर्थ :- या माणसाजवळ भरपूर द्रव्य असून हा दानधर्म करीत नाही पण तो राजदरबारातील कटकटी-
मुळे मात्र सतत लुटला जातो. १ याच्या आईने जेव्हा यास जन्म दिला, तेव्हा ती सटवी रांड जागी नव्हती असे
वाटते; म्हणूनच हा दुष्ट जगून राहिला. २ देवाची कथा सुरु झाली की, यास झोप येऊ लागते; पण धन्याच्या
सेवेत मात्र कुत्र्याप्रमाणे सावध राहून जागत असतो. ३ स्वतःच्या स्त्रीस भोग देताना हा अधम मनुष्य संकोच
करतो; पण दासीचे लाड एवढे करितो की, तिचे वस्त्रही उशाला घेऊन निजतो हा. ४ तुकाराम महाराज म्हणतात,
हा मनुष्य गाढवापेक्षाही हीन अवस्थेला गेलेला असतो. ५
६०० सुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धनअभिमान ॥ १ ॥
ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ २ ॥
पोटासाठीं संत । झाले कलौंत बहुत ॥ ३ ॥
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- विरळा-क्वचित
अर्थ - मुखाने मोठ्या ऐटीत ब्रह्मज्ञान बोलतो हा; पण याच्या मनात मात्र धन व मान यांची इच्छा आहे. १
अशा माणसाची सेवा करिताना जीवाला काय कधी सुख होईल का ? २ या कलियुगात पोट भरण्यासाठी
पुष्कळ संत झालेले दिसतात ३ पण खरा संत जर एखादा क्वचित कुठे असेल तर मला दाखवा, मी तुकाराम
त्याला साष्टांग लोटांगण घालून त्याचा आदरसत्कार करीन. ४
६०१ एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडन ॥ १ ॥
अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ २ ॥
अनुतापें स्नानविधि । यज्ञसिद्धि देहहोम ॥ ३ ॥
जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥ ४ ॥

२९२ सार्थ तुकारामगाथा

देहाचा होम वगैरे करून शुद्ध झालो. ३ जीव व शिव यांची अज्ञानामुळे ताटातूट झाली होती. पण त्यांचे ऐक्य
जाणून हा तुकाराम एकरूप झाला. ४
६०२ त्रैलोक्य पालितां उगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥ १ ॥
पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ २ ॥
पक्षी अजगर न करी संचित । तयास अनंत प्रतिपाळी ॥ ३ ॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उबगला-त्रासला, दर्दुर-बेडूक, संचित-संचय, साठा.
अर्थ - हा माझा देव त्रैलोक्याचा सांभाळ करतो; तरी तो कधी त्रासता नाही. त्याला आमच्या सारख्याचे
ओझे असे मोठेसे काय आहे ? १ पाषाणाच्या पोटात बेडूक वस्ती करून असतो. त्याच्या मुखात अन्न नेऊन या
नारायणाशिवाय कोण घालतो ? २ पक्षी किंवा आळशी असणारे अजगर यांनी कशाचा साठा केलेला असतो ?
तरी तो प्रभू त्याचा सांभाळ करतोच ना ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या ईश्वरावर भार घालावा सर्व. मग
तो दयेचा सिंधू कधी आपल्या भक्ताची उपेक्षा करणार नाही. ४
६०३ बोली मंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥ १ ॥
कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ २ ॥
टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घाटी ॥ ३ ॥
तुका म्हणे तो केवळ पुंड । त्यावरि वाजती यमदंड ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मंद-कपटी, ढोंगी, घाटी-गळा
अर्थ - ढोंगी किंवा कपटी माणसाचे बोलणे वरवर मोठे गोड वाटते. पण फांसे टाकून पकडण्याचेच साधन
त्याने मनात धरले असावे असे वाटते. १ वरवर तो कसा चांगला दिसतो; पण तो त्यामुळे काही भाविक नसतो,
केवळ मांगाचेच गुण त्याच्यात असतात. २ कपाळावर गंधाचा टिळा, डोक्यावर टोपी, गळ्यात माळा, असा वरवरचा
वेष असला तरी, मनातून अंधारात नेऊन एखाद्याचा गळा दाबावा अशी त्याची वासना असते. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, असा मनुष्य केवळ पुंडाई करणारा गुंडच समजावा. त्याच्यावर यमाचा दंड सारखा फिरत असतो. ४
६०४ दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामसंकीर्तनें ॥ १ ॥
हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ २ ॥
तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजायया चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी देवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपजावयाची-जन्म घेण्याची
अर्थ - देवा, तुमच्या नामसंकीर्तनामुळे सर्व दोष नाहीसे होतात. १ अशा अर्थाचे आपलेच वचन पुराणातून
आहे. तरी देवा, तुम्ही आपल्याच वचनाला खोटे का ठरविता ? २ आमच्या पापाला देवा, तुम्ही भिता की काय ?
आम्हाला पुनः पुनः जन्म घेण्याची भीती असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची सेवा प्रत्यक्ष यमासही
जिंकणारी आहे. ४
६०५ करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥ १ ॥
वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनी मानसीं ॥ २ ॥
पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥ ३ ॥
तुका म्हणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा- खंडणा-नाश, मानसीं-मनात.

सार्थ तुकारामगाथा २९३
अर्थ - देवा नारायणा, माझ्या सर्व दुःखाचा नाश करा ना. १ माझ्या मनात तुम्ही वसती करुन माझी
वृत्ती आपल्या पायांशी स्थिर राहील असे करा ना २ देवा, माझे सर्व हट्ट पूर्ण करावेत व हे फळ मला तुम्ही
द्यावेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे परमेश्वराच्या चरणाशी दीन होतात, त्यांचा ईश्वर सर्व शीण दूर करीत
असतो. ४
६०६ मी तो दीनाहूनि दीन । माझा तुज अभिमान ॥ १ ॥
मी तो आलों शरणागत । माझें करावे स्वहित ॥ २ ॥
दिनानाथा कृपाळुया । सांभाळावें आपुल्या नांवा ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां । भले नव्हे मोकलितां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मोकलिता-टाकून दिल्यास
अर्थ - देवा, मी तर आता दीनाहून दीन झालो आहे तुझ्या पायाशी तू आता मजविषयी अभिमान
धरावास १ मी तर देवा, तुला आता शरण आलो आहे. माझे सर्व प्रकारचे हित तुम्ही करुन दाखवा. २ दीना-
नाथा, कृपाळू स्वामी, आपले नाव व कीर्ती याचा आपण नीट सांभाळ करावा ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, आता मला तुम्ही टाकून दिल्यास ते बरे दिसणार नाही ४
६०७ सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥ १ ॥
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ २ ॥
वृक्षाचिया माथा सोडिला ससाना¹ । धनुष्यासि बाणा लावियेले ॥ ३ ॥
तये काळीं तुज पक्षी आठविती । धावें गा श्रीपती मायबापा ॥ ४ ॥
उडोनियां जातां ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥ ५ ॥
एकोनियां धांवा तया पक्षियाचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥ ६ ॥
डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो² लागला ससाण्यासी ॥ ७ ॥
ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोवसा संकटींचा ॥ ८ ॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदांचिये वाणी वर्णवेना ॥ ९ ॥
शब्दार्थ व टीपा - ससाना-बहिरी ससाणा, शिकारी पक्षी, विंधील-ठार करील, कोवसा-आश्रय, आधार.
अर्थ - देवा, तू किती दयाळू आहेस ? तुझे पवाडे गाताना मोठे सुख वाटते. मोठ्या प्रेमाने तुझे वर्णन
करताना त्या गोडीची मिठीच तोंडास बसते १ एका वृक्षावर एका पक्ष्याच्या जोडप्यास पिले झाली थोड्याच
वेळात एक दुराचारी व निर्दय पारधी त्या वृक्षापाशी आला २ त्याने या पक्ष्याची व पिलांची शिकार करण्याच्या
हेतूने जवळचा बहिरी ससाणा वर पक्ष्याच्या घरट्याड्यापावर सोडून दिला, आणि आपण स्वतः खाली राहून त्याने
पक्ष्यायावर बाण धरिला ३ या कठिण अशा संकटप्रसंगी देवा, त्या पक्ष्यांनी तुझे स्मरण कळवळून केले 'श्रीपती,
मायबापा, धाव रे, या संकटातून मुक्तता कर' अशी त्यांनी प्रार्थना केली. ४ या पक्ष्याच्या मनात मोठीच चिंता
होती वरच्या वर उडून जावे तर बहिरी ससाणा खाऊन टाकील न उडावे तर खालच्या पारध्याच्या बाणाने प्राण
जाणार; असा प्राणसंकटाचा पेच त्या पक्ष्याच्या समोर होता. ५ पण देवा, तू त्या पक्ष्यांचा धावा ऐकलास, आणि
घटकन एका महाभयंकर अशा विषारी सर्पाचा वेष धारण केलास. ६ सर्परुप घेऊन त्या पारध्याच्या पायात तू
डसलास व त्याला भूमीवर पाडलेस; तेव्हा त्या पारध्याच्या हातून जो बाण निसटला, तो त्या ससाण्यास लागला व
तोही मरण पावला ७ देवा, तुझे स्तवन करणाऱ्या दासावर तू अशी कृपा करतोस संकटकाळी असा तू आधार
१ ससाणा, २ तो.

२९४ सार्थ तुकारामगाथा
होतोस ८ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी तुझी कीर्ती साऱ्या त्रिभुवनात पसरली असून तुझा महिमा
वेदवाणीसही वर्णन करता येत नाही ९
विवरण - देव आपल्या भक्ताचा सांभाळ किती चतुराईने व तत्परतेने करतो याविषयी तुकारामबुवांनी
या ठिकाणी एक लहानशी कथा सांगितली आहे एकाद्या कलात्मक कथेचे सारे गुण या कथेत एकवटलेले दिसतात
दोन पक्षी, त्यांची लहान पिले, त्यांच्यावर एकाच वेळी आलेले दुहेरी संकट खालून पारध्याचा बाण, वरून बहिरी
ससाणा , मग त्यांनी परमेश्वराचे केलेले स्मरण, आता हे पक्षी व त्यांची पिले यांचे प्राण वाचणार तरी कसे ही
आपली अभंग वाचतानाची चिंता - या सर्व पार्श्वभूमीवर सर्पाचे रूप धारण करून आपल्या भक्तांना वाचविले हे
आपणास समजून मनास एक प्रकारचा संतोप वाटतो देवाची प्रार्थना करणारे लहान पक्ष्याप्रमाणे का जीव असेनात,
पण त्यांना न्याय मिळतो हा केवढा दिलासा बुवांनी या अभंगात माणसास दिलेला आहे !
६०८ नाहीं दुकळलो अन्ना । परि या मान जनार्दना ॥ १ ॥
देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुक्लपक्षीं ॥ २ ॥
भोगी भोगविता । बाळासवे तोचि पिता ॥ ३ ॥
कर्म अकर्म जळाले । प्रौढें तुका ते उरले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुकळलो-महागला काळीं-कृष्णपक्षात
अर्थ - देवा, मी काही मागायला तुझ्याकडे आलो आहे याचा अर्थ असा नव्हे, की मी अन्नाला महागलो
आहे तुला जनार्दनास मान द्यावयाचा, याच हेतूने मी तुजकडे आलो आहे १ देवा मी तुला सर्व काळी साक्षी
केला आहे शुक्लपक्षातच नव्हे, तर कृष्णपक्षातही मी तुला साक्षी केले आहे २ आपल्या मुलांना जो भोग घेण्यास
शिकवितो, व जो स्वतःही भोगतो, तोच खरा पिता समजावा ३ त्याप्रमाणे देवा, आमचे कर्म, अकर्म या विषयांचा
विचार नष्ट करून जे प्रौढ व टिकण्यासारखे आहे तेवढ्याचा आपण विचार करू, असे तुकाराम महाराज म्हणतात ४
नाटाचे—अभंग ६३.
६०९ प्रथम नमन तुज एकदंता । रगों रसाळ वोडवीं कथा ।
मति सोरस करीं प्रबळता । जेणे फिटे आता अंधकार ॥ १ ॥
तुझिये कृपेचे भरिते । आणीक काय राहिले तेथें ।
मारग सिद्धाच्यानि पथें । पावविसी तेथें तूंचि एक ॥ २ ॥
आरंभा आदि तुझें वदन । सफळ करिता कारण ।
देव ऋषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥ ३ ॥
काय वर्णूं तुझी गती । एवढी कंची मज मती ।
दिनानाथ तुज म्हणती । करीं सत्य वचन हेंचि आपुले ॥ ४ ॥
मज याहावता मायेच्या पुरीं । बुडता डोहीं भवसागरीं ।
तुज याचुनि कोण तारी । पाय झडकरी तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - एकदंत-एक दात असणारा गणपती वोडवीं-निर्माण कर
अर्थ - एकदंता, गणपते तुझा प्रथम नमस्कार करतो तुझ्या कृपेने तू रसाळ अशा कथा निर्माण कर माझी
बुद्धी प्रसादयुक्त व प्रबळ करून तिच्यामुळे अज्ञानाचा अंधार दूर होईल असे कर १ एकदा तुझी कृपा पूर्णपणे
भरून आली की, मग मला काय कमी आहे ? मोठ्या सिद्धांच्या पथांनीही तूच प्राप्त आहेस २ सर्व कार्यांच्या

सार्थ तुकारामगाथा २९५
आरंभी तुलाच वंदन असते. सर्वजन असेच सांगतात. देव, ऋषी, मुनी इत्यादींनी पुराणग्रंथांतून हेच निवेदन केले
आहे. ३ तुझ्या बुद्धीचे व गतीचे मी वर्णन काय करावे ? माझ्या अल्प मतीत एवढे सामर्थ्य कुठे आहे ? तुला
दीनानाथ म्हणतात ना ? मग मी दीन आहे. तू तुझे हे नाव खरे करून दाखीव ना. ४ मी या वृथा मायेच्या पुरात
वाहात असताना, या भवसागराच्या डोहात बुडत असताना, तुझ्याशिवाय माझे रक्षण कोण करणार ? तुकाराम
महाराज म्हणतात, गणपते, तू माझ्यावर लवकर कृपा कर. ५
६१० प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार ।
चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥ १ ॥
तो देव नटला गौरीबाळ । पांयीं बांधोनि घागऱ्या घोळ ।
नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥ २ ॥
नटारंभीं थाटियेला रंग । भुजा नाचवी हालवी अंग ।
सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥ ३ ॥
जया मानयती देव ऋषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी ।
असुर जयाच्या चरणीं । आदीं अवसानीं तोचि एक ॥ ४ ॥
सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार ।
तुका म्हणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - दातार-दाता, फरशधर-परशू धारण करणारा, पार-सीमा, अंत, गौरीबाळ-पार्वतीचा
मुलगा गणपती, मेळे-समुदाय, नटारंभीं-नृत्यनाट्याच्या आरंभी, चांग-चांगला, धनी-तृप्ती, आदीं-जन्माच्या वेळेस,
अवसांनीं-मरणाच्या वेळेस.
अर्थ -- सर्व कार्याच्या आरंभी प्रथम या गणपतीला नमन असो. सर्व सिद्धींचा दाता हा गणपती आहे. हा
चार हातांचा असून याच्या एका हातात परशू म्हणजे कुऱ्हाड आहे. याच्या सामर्थ्याचा अंत लागत नाही. १
गौरीचा हा मुलगा आता चांगला नटलेला आहे. त्याच्या पायात घागऱ्यांचे चाळ बांधलेले आहेत. नारद तुंबरांचा
समुदाय जमला आहे. याच्या सामर्थ्यामुळे इतर संकटांना पळता भुई थोडी झाली आहे. २ नृत्यनाटकाच्या आरंभी
याचे रंगरूप नटलेले आहे. हा गणपती नृत्यात अंग विविध प्रकारांनी हालवत असून आपले हातही नाचवीत आहे.
शेंदराच्या विलेपनाने याचे अंग चांगलेच माखले गेले असल्याने मोठे चांगले दिसत आहे. याच्या मुकुटावर नाग
शोभून दिसतो ३ देव, ऋषी, मुनी याला मनापासून मान देतात, याचे रूप कितीही पाहिले तरी डोळ्यांची तृप्ती
होत नाही. सारे असुर याच्या चरणी लीन होऊन असतात आपल्या जन्माच्या वेळेपासून अखेरपर्यंत याचेच एक
रक्षण असते. ४ सर्व सिद्धींचा हा दाता असल्याने तो आमचा दाता आहे. याच्या रूपास अंत नाही. याच्या कृपेने
मनुष्य भवसागर तरून जाईल. ५
विवरण - वरील दोन अभंगांत तुकोबांनी गणपतीस नमन केले आहे. गणपती हा सुखकर्ता, दुखहर्ता
असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या आरंभी त्यास नमन करण्याची चाल आहे. तो बुद्धीचा व सर्व सिद्धीचा दाता असल्या-
चेही वर्णन अनेकांनी केले आहे तुकारामबुवांचे आराध्य दैवत श्रीकृष्ण वा विठ्ठल असले तरी त्यांनी गणपती या
देवतेवरही अभंग केलेले दिसतात ज्ञानेश्वररामदासादी संतांनीही गणपतीचे अति सुरेख व भक्तिभावपूर्वक असे वर्णन
केलेले आढळेल. या पुढचे व वरील दोन असे ६३ अभंग नाटाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. नाट म्हणजे एकप्रकारचे नृत्य,
नाट्य वगैरे तुकोबांच्या वेळीही अशा प्रकारचे खेळ होत असावेत. त्याच्या निमित्ताने हे अभंग झालेले दिसतात.
'देव नटला गौरीबाळ .. भुजा नाचवी हालवी अंग ' इत्यादी वर्णनावरून या नृत्यनाट्याच्या प्रसंगी गणपतीचे
रूप घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्याची रीत त्याही काळी असावी असे दिसते.

२९६ सार्थ तुकारामगाथा
६११ विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान ।
विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसांवा ॥ १ ॥
विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त ।
विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥ २ ॥
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥ ३ ॥
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोयळा ।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेलें चाळा विश्व विठ्ठले ॥ ४ ॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ।
विठ्ठलेविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीका - आगमनिगम-वेद व शास्त्र वित्त-सपत्ती, मात-गोष्ट, सप्त पाताळ-अतल, वितल,
सुतल, रसातल, महातल, तलातल व पाताल असे सात पाताळ अधोलोक मानक आहेत अहितळ महितळ इत्यादी
आणखी सात पाताळही सांगतात
अर्थ - सर्व वेदांचे व शास्त्राचे निवासस्थान असणारा हा विठ्ठल आमचे एकमेव जीवन आहे सर्व सिद्धींचे
साधन हा विठ्ठलच असून तो आमचा विसावा आहे आम्ही त्याचेच ध्यान निरंतर करीत असतो १ आमच्या
कुळाचे दैवत हा विठ्ठलच असून आमची सारी संपत्ती आमचे सर्व गोत आमच्या सर्व चितवृत्ती या एका विठ्ठलात
सामावलेल्या आहेत आमचे पुण्य व आमचा पुरुषार्थ या विठ्ठलरूपास आहे याचीच कथा आम्हास नेहमी प्रिय वाटते २
या सर्व लोकात विठ्ठलच भरून राहिलेला असून सप्त पाताळात त्याचीच वसती आहे सर्व त्रिभुवनात विठ्ठल भरून
राहिला आहे ऋषिमूनींच्या मनात हाच विठ्ठल स्थिर झालेला आहे ३ हा विठ्ठल माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे
हा विठ्ठल मनाने कोवळा असून कृपाळू आहे हा प्रेमाचा एकमेव पुतळा असून या विठ्ठलाने सर्व विश्वात चाळविले
आहे याच्याचमुळे सर्व विश्वाचे चलनवलन होत असते ४ हा विठ्ठल मायबाप, चुलता, बहीण, भाऊ अशा
सर्व नात्यानी आमच्याशी सबंधित आहे याच्याशिवाय मला दुसरे कुठलेही गोत नाही तुकाराम महाराज म्हणतात
आता याच्याखेरीज दुसरे कुणीच मला नाही ५
६१२ बरवा झाला बेवसाव । पावलो चिंतिलाचि ठाव ।
दृढ पायीं राहिला भाव । पायला जीव विश्रांती ॥ १ ॥
वरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिन ।
तुमचें जालियां दरशण । जन्ममरण नाहीं आतां ॥ २ ॥
बरवे जाले आलो या ठाया । होते सचित ठायींचा पाया ।
देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मौंची ॥ ३ ॥
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन ।
अमूर्तमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥ ४ ॥
जुनाट जुगादिचे नाणे । बहुता काळाचें ठेवणे ।
लोपले होतें पारिखेपणे । ठाववळण चुकविला ॥ ५ ॥
आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी ।
तुका म्हणे सिणलो जगजेठी । न लवों दिठी दुसऱ्याची ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - वेवसाव-व्यवसाय उद्योग दरुषण-दर्शन, काया-शरीर, जुगादिचे-अनेक युगाचे,
न सुटे-सोडणार नाही, न खवों-लागू नकाम, दिठो-दृष्ट

अर्थ - देवा, आजपर्यंत जो व्यवसाय किंवा उद्योग मी केला तो खरा झाला, फळास आला कारण ज्याचे
मी जन्मभर चिंतन केले, त्याचेच स्थान मला प्राप्त झाले आता तुमच्या पायी माझा भाव दृढ राहिला आहे तेथेच
मला विश्रांती मिळाली आहे १ मला हा फायदाच ढळून आज झालेला दिसतो तुमच्या प्राप्तीने सारा त्रास दूर
झाला असून, तुमच्या दर्शनामुळे मला आता जन्ममरणाची भीती उरलेली नाही २ बरे झाले देवा, या ठिकाणी
येऊन पोचलो याच पायाशी माझे सर्व पूर्वकर्मांचे पुण्य साठविलेले होते कारण या स्थानाच्या प्राप्तीमुळे माझा देह-
भाव पूर्णपणे पालटून गेला त्यावर प्रत्यक्ष परब्रह्माची छाया पडून ते ब्रह्मरूपच होऊन गेले ३ हे धन मी जे
एकदा मिळविले आहे, ते कधी न विसजारे असून ते आनंदरवरूपाचे आहे अमूर्त असणारा हा मधुसूदन मूर्तरूपास
येऊन येथे उभा आहे त्याची एकसारखी पावले पाहून मी संतुष्ट झालो आहे ४ अनेक युगांचे हे नाणे जुने असून
पुष्कळ दिवसांचे हे ठेवण आहे. पण याची पारख करणाराच कुणी नव्हता म्हणून याचा ठावठिकाणा कुणास सापडला
नाही तो सर्वज्ञ असल्याने नीट पारख्यावाचून तो कुणाला मिळण्यासारखा नव्हता ५ पण आता हा मला माझ्या
जीवासाठी प्राप्त झाला आहे याच्या पायांस पडलेली मिठी मी आता कधी सोडणार नाही तुकाराम महाराज
म्हणतात, हे जगजेठी, मी फार दमलो आहे रे मला दुसऱ्या कुणाची दृष्ट होईल असे तू करू नकोस ६

६१३ मी तव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमदबुद्धी ।
तुज म्या पाठविलें नाहीं कधौँ । वाचे कृपानिधी मायबापा ॥ १ ॥
नाहीं ऐकिले गाइले गीत । धरिली लाज साडिलें हित ।
नायडे पुराण बैसले सत । केली बहुत परनिंदा ॥ २ ॥
केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडिता पर ।
करूं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥ ३ ॥
नाहीं केले तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण ।
नाहीं सतसेवा घडले दान । पूजावलोकन मूर्तीचें ॥ ४ ॥
असगसग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ।
न फळे हित करावे ते फाय । नये बोलू आठवू तें ॥ ५ ॥
आप आपण्या घातकर । शत्रु जालो मी दावेदार ।
तूं तव कृपेचा सागर । उत्तरीं पार तुका म्हणे ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - नावडे-आवडत नाही पिंड-शरीर

अर्थ - देवा मी अनाथ असून तुझे अनेक अपराध करणारा आहे मी कर्महीन असून माझी बुद्धी अगदी
मद आहे माझ्या वाणीने हे कृपेच्या सागरा, मायबापा मी कधीही तुझी आठवण केली नाही १ कधी तुझे नाम
ऐकिले नाही, कधी गाइले नाही या बाबतीत मी लाज धरून आपले स्वतःचे हित सोडून दिले मला पुराण ऐकत
बसणारे संत कधी आवडले नाहीत मी आजवर पुष्कळ वेळा दुसऱ्याची निंदा केलेली आहे २ मी स्वतः कधी
दुसऱ्यावर उपकार केला नाही कधी कुणास करू दिला नाही दुसऱ्यास दुख होताना माझ्या चित्तात कधी दया
आली नाही जो उद्योग वा व्यवहार करू नये तो मी करीत आलो आहे मी केवळ कुटुंबाचा भार व्यर्थ धारण
केला ३ मी कधी तीर्थयात्रेस गेलो नाही, हातापायासकट या देहाचेच केवळ पोषण मी केले मला कधी संतसेवा
घडली नाही, की कधी दान मी केले नाही कधी देवा तुमच्या मूर्तीस डोळे भरून पाहून तिची पूजा केली नाही ४

तु गाथा ३८

२१८ सार्थ तुकारामगाथा
मला नाजपर्यंत दुष्ट माणसाचीच संगत जडली होती. माझ्या हातून अनेक अन्यायकारक गोष्टी व अधर्माचे उपाय
मी आजपर्यंत अनेक केले. आता माझे हित कशात आहे हेच मला समजेनासे झाले आहे. माझे अपराध मला आता
आठवतही नाहीत, की ते वाचेने बोलूनही दाखविता येत नाहीत ५ असा मी आपला आपल्यासच घात करणारा
झालो असून मी स्वतःचाच शत्रू व दावेदार बनलो आहे पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपेचा सागर
आहेस ना ? मला या संसारसागरातून पार कर ना ६
विवरण :-या अभंगात व इतरही कित्येक ठिकाणी तुकारामबुवांनी मी पापी, मी दुराचारी असा उल्लेख
केलेला आहे माझी बुद्धी मंद आहे, मी कधी तुझे ध्यान केले नाही, पुराणकीर्तन ऐकले नाही, संतांची सेवा केली
नाही, काही तीर्थयात्रा केल्या नाहीत, असंगाचे संग घडले, हातून अधर्म फार झाले इत्यादी अनेक अपराधांची
मालिका बुवांनी वरीलसारख्या अभंगातून गुंफिली आहे पुढील क्र ६७० च्या अभंगात तर देवा, मी चांडाळ आहे,
मी अमंगल आहे, अवगुणाची खाण आहे, मला 'अखंड विषयांची व्यथा' असून मी 'अधम पुरता अधमाहूनी' आहे
असे त्यांनी म्हटले आहे निंदा, द्वेष, विश्वासघात, काम, क्रोध, दंभ, अहंकार माझ्यामध्ये भरपूर असून माझे
'सदा परद्वारीं परधनीं ध्यान' असून मला 'दासीगमन' ही घडले आहे असे बुवा म्हणतात
या सर्व वचनांचा काय अर्थ ? बुवांचे पूर्वायुष्य या दृष्टीने तपासून पाहावयास काही अभ्यासक तत्पर झालेले
दिसतात तुकारामबुवां वारंवार म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच त्यांच्या आधीच्या आयुष्यात काही भलेबुरे आचार-
विचार होते की काय ? या प्रश्नाचा विचार करताना असेच म्हणावेसे वाटते की, हे सर्व उद्गार भक्तीस अनुकूल
होत जाणाऱ्या पवित्र वृत्तीच्या पार्श्वभूमीवरचे आहेत असतील नसतील तसल्या पापांचा उच्चार करून कबुळतीस
यायचे, दीनता प्रकट करायची, करुणा भाकावयाची व ईश्वरास जवळ करायचे, ही एक पद्धती भक्तिमार्गातील ठरून
गेल्यासारखी आहे तुकोबांच्या अभंगातील सर्व पापे त्यांना शाब्दिक अर्थाने चिकटविता येणार नाहीत 'मी तों
अपराधाची राशी । शिखा अगूट कोंपशीं' यासारख्या उद्गारातील अतिशयोक्ती व अनुतापाची भूमिका याचा
मेळ घालूनच याचा विचार व्हावयास हवा
ऐन तारुण्यात, वयात असताना तुकोबांच्या हातून दुराचार वा पापकर्म या गोष्टी घडल्या असल्याचा
उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही अभंगातून अनेक प्रसंगी जो उच्चार होतो, तो केवळ भक्तीस अनुकूल होत राहणाऱ्या
दीन व अनुतापयुक्त वृत्तीचाच निदर्शक मानणे युक्त होणार आहे नाही तर पुढे गाथेत क्र २८३५ चा अभंग
'माझिया मीपणावरी पडो पाषाण' या ओळीने सुरुवात होणारा वादग्रस्त अभंग आहे त्यातील सर्व दोष वाच्यार्थाने
बुवांच्या अंगी लावण्याचे धैर्य कुणी करण्याचा प्रयत्न करील असे दिसत नाही कुणी तसा प्रयत्न केला तर तो
टिकण्यासारखा नाही तुकोबा वृत्तीने सात्त्विक, पण धंदा वाण्याचा, सावकारकीचा या निमित्ताने काही निराळी
व्यापारी नीती खरेखोटेपणाविषयी वापरावी लागली तरी, व्याकूळ होऊन जाणारे तुकोबा असल्या अभंगातील
पातकांचे धनी स्वतः असतील हे संभवत नाही
ऐन तारुण्यात माझ्या हातून पापे घडली, मी दुराचारी होतो, दुसऱ्यावर उपकार कधी केला नाही, संतांची
निंदाच सतत केली, यासारख्या आत्मनिवेदनात अनुतापाची, न केलेल्या पातकांविषयी अनुतापाची वृत्तीच असणे
शक्य आहे अंतःकरणातील प्रभू लौकर व्यक्त व्हावा, प्रकट व्हावा, प्रचीतीत यावा, यासाठी तुकोबांनी आपणा-
पाठीमागे अनंत पातकांची नामावळी लावून घेतली ती शब्दशः सत्य मानून त्यांच्या चरित्रातील घटनांचे धागेदोरे
हुडकणे व त्याचा अर्थ लावणे इष्ट व उचित नाही 'स्त्रियांचा तो संग नको नारायणा' यासारख्या वचनाने माहे
झिडकारून टाकणाऱ्या तुकोबांच्या या अनुतापयुक्त उद्गाराचा अर्थ सावधपणे लावावयास हवा
६१४ आतां पावेन सकळ सुखें । सादलें फदा तें न देखें ।
अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियेरे ॥ १ ॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई ।
सकळ गोताचीच साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥ २ ॥