सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 313, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २७९
शब्दार्थ व टीपा :- न सरते=पुरत नाही, पेणें=मुक्काम.
अर्थ :- देवा, तुझी उपासना कोणात घडेल ती घडो; या निर्गणाच्या वचनाप्रत कोण येईल ते येवो. १
पण आता माझा धोता व मक्ता तू होऊन अभेदत्वाची अनुभूती मला यावी. या जाणिवेने मी तुझी सेवा करावी. २
जे कुशल आहेत, चतुर आहेत, त्यांची चतुराई काही पुरत नाही. ते तुला भजत नाहीत. नुसते आपल्या बुद्धीने वृथा
तर्कच करीत बसतील. ३ देवा, तुमचा व माझा मुक्काम एकाच घरी झालेला असल्यामुळे तुमची व माझी गाठ आता
नित्याची आहे. ४
५६२ आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीन देखोवेखीं ॥ १ ॥
न फळे संतत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ २ ॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याच वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - देखोवेखी=दुसऱ्याचे पाहून, वरपडे=साधन.
अर्थ:- आम्ही परमेश्वराची जी भक्ती आरंभिली आहे, जे थट्टेने बोलणे त्याच्याशी आम्ही करितो, ते
जगाचे दृष्टीने त्याचे मरणच आहे. कारण आमचे परवर पाहून ते अंगी भाव नसता परमार्थाचे आचरण करतात १
सतत हिताचा विचार कोणता आहे, हे जोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत ते जन्ममृत्यूच्या दारात सारखे
हेलपाटेच खात राहतील. २ जे कुणी दुसऱ्याने वंदिले असेल त्यास वंदन करावे, निंदिले असेल, त्यास निंदावे. दुसरे
ज्या वाटेने गेले, त्याच वाटेने जावे हाच त्यांचा उद्योग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कितीही
सांगितले तरी कुणी ऐकत नाहीत, तरी ते यमदूतांच्या स्वाधीन होतील. ४
५६३ दीप घेउनियां धुंडितो अंधार । भेटे हा¹ विचार अघटित ॥ १ ॥
विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ २ ॥
उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न फळे भाग्यहीना ॥ ३ ॥
तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हे तंव वचन वाउगेचि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अघटित=नवलाचे, न भ्यो=भिणार नाही, हुताशन=अग्नी.
अर्थ - हातात दिवा घेऊन अंधार धुंडायला जाणे किती शहाणपणाचे आहे ? तो कधी भेटेल हा अविचारच
नव्हे का? नवलाचेच नव्हे काय? १ आम्ही विष्णुदास प्रत्यक्ष काळासही भिणारे नव्हेत. मृगजळाच्या जाळ्यात सापडून
फसणारे आम्ही नव्हेत २ मातीची धूळ वर उधळली तर सूर्याचे तेज मलीन होईल कसे? पण हे भाग्यहीन माणसास
कसे समजणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गवताने अग्नी झाकला जातो, हे बोलणे युगात आहे. नाही काय? ४
५६४ नटनाट्यें अवघें संपादिले सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥ १ ॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुले स्वरूप जाणतसों ॥ २ ॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होउनि निश्चित² क्रीडा करूं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- स्फटिक=शक्तिमुक्त पारदर्शक दगड, उपाधि=अडचण
अर्थ - नाना प्रकारची नृत्ये व नाटके करणाऱ्यांप्रमाणे आम्ही नाना वेष धारण करून विविध सोंगे धारण
करू; नाना भेदांचे प्रकार दाखवू; परंतु त्यामुळे आमचा आत्मरूपाचा बोध व त्याचा रंग काही पालटणार नाही. १
बहुरूप्याने कौतुकाने नाना प्रकारचे खेळ केले, तरी तो आपले स्वतःचे रूप जाणून असतोच २ स्फटिकाच्या
पारदर्शक स्वरूपात पिवळे, लाल असे नाना रंग जरी दिसत असले, तरी त्यांची अडचण स्वतः स्फटिकास काही वाटत
- १ तो, २ निश्चित.