सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 324, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 324

२९० सार्थ तुकारामगाथा
अर्थ -- देवाची पूजा करीत असताना जर संत लोक घरी आले तर काय करावे ? १ त्यावेळी देव थोडा
वेळ बाजूस सारून संतांचीच पूजा मोठ्या प्रेमाने करावी २ शाळिग्राम ही तेवढी विष्णूची मूर्ती, व दाराशी आलेल्या
संतांचीच जात का त्याच्याहून वेगळी मानावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा समयास वैष्णवांच्या समुदायाचे
पूजन करणे हे अधिक महत्त्वाचे आहे ४
५९५ ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥ १ ॥
करिता स्वामीसवे वाद१ । अधिक अधिक आनंद ॥ २ ॥
असावा तो धर्म । मग साहो जातें वर्म ॥ ३ ॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठलीं गौरवी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाद-सुसंवाद, वाग्देवी-वाणीरूप देवी
अर्थ - जो ईश्वराची खरी सेवा अंतःकरणपूर्वक करितो त्याच्या जीवास कसले भय आहे ? १ ईश्वराशी
सुसंवाद करता करताच त्याच्या मनास पराकोटीचा आनंद होतो २ हाच एकनिष्ठेचा धर्म असल्यास मग त्या
स्वामीचे रहस्य समजले जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीरूपी देवीचा गौरव प्रत्यक्ष विठ्ठलाकडून
केला जातो ४
५९६ देवे जीव धाला । संसार तो कडू झाला ॥ १ ॥
तेचि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ २ ॥
वेधी आणिकास । ऐसा जया अंगीं कस ॥ ३ ॥
तुका म्हणे भूक । येणे न लगे आणीक ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धाला-संतुष्ट झाला कस-सामर्थ्य
अर्थ - या देवाच्या प्राप्तीने माझा जीव संतुष्ट झाला आहे आणि मला हा लौकिक संसार कडू वाटू
लागला आहे १ आता मला हरिहराच्या चिंतनाचे व भक्तीच्या तृप्तीचे डेंकर येतील २ आणखी दुसऱ्या वेळी
अंतःकरण वेधून घेण्याचे सामर्थ्य याच्या अंगी आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या संगतीच्या तृप्तीने
आणखी भूक मला लागणार नाही ४
५९७ नाम ताराचे ही सार । शरणागत यमकिंकर ॥ १ ॥
उत्तमाउत्तम२ । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ २ ॥
नाम जपता चंद्रमौळी । नामें तरला बाल्हाकोळी ॥ ३ ॥
तुका म्हणे वर्णू काय । तारक विठोबाचे पाय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - यमकिंकर-यमाचे दास, तारक-तारणारे, चंद्रमौळी-शिव
अर्थ - या विठ्ठलाचे नाम हे सर्व साराचे सार होय याला यमाचे सेवकही शरण आलेले असतात १
उत्तमात उत्तम असलेल्या या पुरुषोत्तमाचे नाम तुम्ही वाणीने वारंवार उच्चारावे २ याच्याच नामाच्या जपाने
शिवशंकर तरून गेले व वाल्या कोळ्याचा उद्धार झाला ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी काय वर्णन
करू ? या विठोबाचे पायच फक्त तारणारे आहेत ४
५९८ गातो भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥ १ ॥
परि तू पतितपावन । करीं साच हें वचन ॥ २ ॥
मुखें म्हणवितो दास । चित्तीं माया लोभ आस ॥ ३ ॥
तुका म्हणे दावी वेशा । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥ ४ ॥
१ पाद, २ नाम उत्तम उत्तम