सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 315, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 315

सार्थ तुकारामगाथा २८१
लोकांपुढे तोंड वांगाडावे २ या माझ्या संसाराचे या विठ्ठलाने काय बरे म्हणून केले आहे ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, अशी ही माझी बायको हुंदके देऊन देऊन रडत आहे. रडता रडता हसत आहे. ४
५६८ गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥ १ ॥
भरी लोकांची पांतोरी । मेला चोरटा खागोरी ॥ २ ॥
खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोणी-धान्याचं पोते, पांतोरी-पोटे, खागोरी-खादाड, पिसी-वेडी, लांसी-राक्षसी.
अर्थ :- तुकारामबुवांची बायको म्हणत आहे, घरी धान्याचे पोते आले तर हा नवरा काही नीट मुला-
बाळांना खाऊ घालीत नाही. १ लोकांची मात्र पोटे भरीत असतो; असा हा मेला मोठा खादाडही आहे. २ एखाद्या
वेड्या स्त्रीप्रमाणे ही खवळून जाते व राक्षसीप्रमाणे ही अंगाला, हातांना झोंबते. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
रांडे, तुझ्या संचित कर्माचा भाग नेहमी खोटाच दिसतो. ४
५६९ आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥ १ ॥
डोचकें तिवी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ २ ॥
आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥ ३ ॥
हातीं टाळ तोंड वासी । गाय देऊळीं देवापासीं ॥ ४ ॥
आतां आम्ही करूं काय । न बसे घरीं राणा जाय ॥ ५ ॥
तुका म्हणे आतां धीरो । अझुनि नाहीं जालें तरी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोहो-पती, देवलसी-देववेडा, तिवी-भिजवून मऊ करून, उदमाचा-व्यापाराचा,
सांडी-सोडी, थार-आधार, येसपार-आठवण, पत्ता, राणा-रानात.
अर्थ :- पोरा, आता खाशील तरी काय ? नवरा देववेडा झाला ना ! १ सदा आंघोळ करून डोके
भिजवतो, गळ्यात माळा घालतो. परवा व्यापाराचा उद्योग याने सोडून दिला आहे. २ आपल्या पोटाचा आधार
मात्र पाहिला आमचा काही ठावठिकाणा त्याला नाही. ३ हातात टाळ घेऊन हा एकसारखा विठोबाच्या नावाने
बडबड करीत असतो देवळात जाऊन, देवासमोर बसून सारखा गाणे म्हणत असतो. ४ आता मी करावे तरी
काय ? हा कधी घरी बसतच नाही. एकसारखा रानावनात जाऊन बसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, तू
अजून धीर धर ना. अजून काही सर्वस्व नाहीसे झाले नाही. ६.
५७० बरें जालें गेलें । आजो अवघें मिळालें ॥ १ ॥
आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ २ ॥
किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥ ३ ॥
तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चीथू-छीतु, मानवला-मनावला.
अर्थ :- बरे झाले सर्व नाहीसे झाले, त्यातच आज सर्व काही मिळाले. १ आता जवळच्या ओल्याकोरड्या
भाकरी पोटभर खाईन. २ मी रांड या नवऱ्याच्या नावाने किती तोंड वाजवू ? किती तक्रार करू ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, मी बायकोच्या या छीत्तू करून बोलण्याला सरावलो आहे. ४
५७१ न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥ १ ॥
उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ २ ॥
तु. गा.-३६