सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 314, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 314

२८० सार्थ तुकारामगाथा
नसते. तो स्वतः कोणत्याही एका रंगाचा नसतो. ३ त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या लोकांच्यांत
मिसळत असलो तरी, त्यांच्या विरहितच असून शांतपणे आमची क्रीडा भजनसुखाची व ईश्वरचिंतनाची चालू असते.४
५६५ तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥ १ ॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ २ ॥
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥ ३ ॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥ ४ ॥
तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा:- आणीक-दुसरे, घडी-वेळेस, श्रवण-कान, विसंबता-विसरून.
अर्थ :-देवा, तुझ्याशिवाय इतर कुणाची थोरवी माझी वाणी करील तर मग माझी ही जीभ झडून जावो १
तुझ्यावाचून इतर काही माझ्या चित्तास आवडेल तर, माझे मस्तक फुटून जावो. २ मोठ्या आवडीने मी
आपल्या डोळ्यांनी इतरांना पाहीन तर, त्याच वेळीं माझे हे चांडाळ डोळे नष्ट होवोत. ३ माझे हे कान जर तुझे
कथामृत श्रवण न करतील तर, मग त्यांचा काय उपयोग ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एक क्षणभर जरी
तुला विसरलो मी, तरी मग माझे हे जगणे निष्कारणच नाही का झाले ? ५
स्वामींचे स्त्रीनें स्वामीस कठिण उत्तरें केलीं-अभंग ७.
५६६ मजचि भोंवता केला १ येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥ १ ॥
चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुकेचि ना ॥ २ ॥
कोणाची बईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥ ३ ॥
काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥ ४ ॥
कांहीं नेदी बांधीं धोवियेलें घर । सारवाया ढोर शेण नाहीं ॥ ५ ॥
तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंजे मायां ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा:- जोग-स्वाग, आपदा-दुःखे, मवटे, ढोर-जनावर.
अर्थ- या माझ्या नवऱ्याचा सर्व त्याग माझ्याभोवती तेवढा झालेला दिसतो. त्याच्या उपभोगात मात्र
काही कमी पडले आहे ? १ सर्व सुखोपचार घरात चालून येत आहेत. परंतु माझी फजिती मात्र चुकत नाही २ या
संसारात कुणाची बायको म्हणून या सर्व आपत्ती सहन करू ? किती कष्ट सहन करू ? ३ ही पोरे मला खाण्या-
साठी तोडत आहेत; त्यांना काय देऊ ? मरतील तर बरे एकदाची. ४ हा माझा पती घरात काही शिल्लकच
ठेवीत नाही; सारे घर धुऊन काढले आहे याने. घर सारवावे म्हटले तर गुरांचे शेणसुद्धा आता घरात उरलेले
नाही. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ही रांड काहीच विचार करीत नाही. या संसाराचा भार स्वतःवर घेऊन
उगाचच कुंथत बसते. ६
५६७ काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥ १ ॥
किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरी ॥ २ ॥
झवे बापुली आई काय माझें केलें । घड या विठ्ठलें संसाराचें ॥ ३ ॥
तुका म्हणे येती वांईरी असडे । फुंदोनिया रडे हांसे कांहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोहो-पती, असडे-दुंदवे
अर्थ :- हा मेला नवरा माझा पूर्वजन्मीचा दावेदार होता की काय कुणास माहीत ? या जन्मी पती होऊन
माझे वैर साधतो आहे. १ मी आता सतत असे हे दुःख किती काळ सोसावे ? आणि प्रत्येक वस्तुसाठी किती
१ घेतलागे जोग.