सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

ब्रह्मादिकांसी ॥ १० ॥ भूतांऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष
या कारणें महापुरुष । सर्व जाणती ॥११॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । १
यां सबाह्यें जगदीश । पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी
॥ १२ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत
वर्म । अनुभवें जाणावें ॥१३॥ पंचभूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति
जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥१४॥ तें हें दृश्य नाश-
वंत । ऐसें वेदश्रुती बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥१५॥
जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें २ जाळितां जळेना । जें कालवितां काल-
वेना । आपैंकरूनी ३ ॥ १६ ॥ जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना ४ झडेना ।
जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥१७॥ ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वां-
हूनि ॲनारिसें ५ । परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८ ॥ दिसेना तरी
काय झालें । परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९ ॥
दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें । परंतु गुज तें जाणावें ।
गौप्य आहे ॥२०॥ प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार ।
गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥२१॥ उमजेना तें उमजवावें । दिसेना
तें पाहावें । जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥२२॥ गुप्त तेंचि प्रगटवावें ।
असाध्य तेंचि साधावें । कॉनडेंचि ६ अभ्यासावें । सावकाश ॥ २३ ॥ वेद
विरंची ७ आणि शेष । जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म
॥ २४ ॥ तरी तें कोण परिसावें । तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें
पावावें । परब्रह्म तें ॥२५॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।
वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त ८ तें ॥ २६ ॥ तयास म्हणावें देव । वरकड
लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनाकारणें ॥ २७ ॥ ऐसा
देवाचा निश्चय झाला । देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणाचि
आपला । शोध घ्यावा ॥ २८ ॥ माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण
देहावेगळाचि होतो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥२९॥
पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्व झाडितां सार ।


१. अंतर्बाह्य. २. अग्नीनें. ३. उदकानें. ४. अथवा. ५. निराळें. ६. अवघड तेंच. ७. ब्रह्मदेव. ८. अदृश्य.

१३४ श्रीदासबोध. [ दशक
आत्माचि उरे ॥३०॥ आपणासि ठावचि नाहीं । तेथे पहाणें नलगे कांहीं ।
तत्वें ठायींच्या ठायीं । विभागुनि गेलीं ॥३१॥ बांधली आहे ती गांठोडी ।
जो कोणी विचारें सोडी । विचार पाहतां गांठोडी । आढळना ॥ ३२ ॥
तत्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहतां विचार । एक आत्मा निरंतर । आपण
नाहीं ॥ ३३ ॥ आपणासि ठावचि नाहीं । जन्ममृत्यु कैंचे काई । पाहतां
वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४ ॥ पाप पुण्य यमयातना । हैं
निर्गुणीं तों असेना । आपण तोचि तरी जन्ममरणा । ठाव कैंचा ॥ ३५ ॥
देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला । देहातीत होतां पावला ।
मोक्षपद ॥ ३६ ॥ झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक । परंतु हा
विवेक । पाहिलाचि पाहावा ॥ ३७ ॥ जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां
दृश्य वोसरे । स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८ ॥ आपणास निवे-
दावें । आपण विवेकें जुरावें । आत्मनिवेदन जाणावें । यांचें नांव ॥ ३९॥
आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन । पुढें आत्मनिवेदन । सद्गुरु-
प्रसादें ॥ ४० ॥ आत्मनिवेदनाउपरी । निखेळ १ वस्तु निरंतरी । आपण
आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१ ॥ त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला ।
संसारखेद तो उडाला । देह प्रारब्धीं ठाकिला २ । सावकाश ॥ ४२ ॥ यासि
म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न ३ । भक्तचि
जाहला ॥ ४३ आतां होणार तें होइना कां । आणि जाणार तें जाइना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४ ॥ संसारीं बुडावें चुकलें ।
देवां भक्तां ऐक्य झालें । मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरुनी ॥ ४५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम
द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. मायोद्भव.
श्रीगणेशाय नमः ॥ निर्गुण आत्मा तो निर्मळ । जैसें आकाश अंतराळ ।
घनदाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १ ॥ जे खंडलेंचि नाहीं अखंड । जें
उदंडाहूनि उदंड । जें गगनाहूनि वाँड ४ । अति सूक्ष्म ॥ २ ॥ जें दिसेना न-
१. शुद्ध. २. देहसुखाचा प्रयत्न सोडिला, हा अर्थ. ३. एकरूप. ४. मोठें.

? No, it is:
लाभे with a dot?
Wait, look at footnote 5:
There is a '५' somewhere in line 23-24!
Could the mark above "लाभे" be a superscript '५'???
YES!! A superscript 5!
Look at that mark above "लाभे":
It is a tiny digit '५'!!
Wow! Look at that: above "लाभे" is a tiny '५', which is footnote 5!
And look at footnote 5 at the bottom:
"५. आत्मरूपाचें ज्ञान झालें."
That's why! The word is simply "लाभे", and the tiny glyph above it is the superscript footnote number ५!
That makes total sense!
And let's look for the other footnote numbers:
Footnote 1: "१. सगुणनिर्गुणाच्या मिश्रणाचा."
Look above "कर्दमोचा" in line 6/7:
At the end of line 6, "कर्द-": is there a tiny '१'?
Footnote 2: "२. दूध."
Look above "क्षीरें" in line 7: there's a tiny '२' above "क्षीरें"!
Footnote 3: "३. उदक."
Look above "नीरें" in line 7: there's a tiny '३' above "नीरें"!
Footnote 4: "४. चिपाड."
Look above "बाकस

१३५ श्रीदासबोध. [ दशक
यासी ॥ २२ ॥ आपला आपण शोध घेतां । आपली तों मायिक वार्तां ।
तत्त्वांतीं उरलें तत्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३ ॥ आपणाविणें निर्गुण ब्रह्म ।
हेंचि निवेदनाचें वर्म । तत्वासरीसों गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४ ॥
मीपण पाहतां आढळना । निर्गुण ब्रह्म तें चलेना । आपण तेंचि परी कळेना ।
सद्गुरूविण ॥ २५ ॥ सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें । पुढें
सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६ ॥ आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळां-
मध्यें व्यापिलें । सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७ ॥
होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार । आपला आपणासि विसर ।
ठायीं पडे ॥ २८ ॥ आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।
मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९ ॥ झालिया तत्त्वांचें निर-
सन । निर्गुण आत्माचि आपण । कां दाखवावें मीपण । तत्वनिरसना-
उपरि ॥ ३० ॥ तत्त्वांमध्ये मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें । सोहं-
भावें प्रत्यया आलें । आत्मैनिवेदन ॥ ३१ ॥ आत्मनिवेदन होतां । देव-
भक्तांस ऐक्यता । साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२ ॥
निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पापपुण्य । निर्गुणीं अनन्य
होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३ ॥ तत्त्वीं वेंटाळूनी घेतला । प्राणी संशय्ये
गुंडाळला । आपणास आपण भुलला । कौहं म्हणे ॥ ३४ ॥ तत्त्वीं गुंतला
म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सौहं । अनन्य होतां अहं सोहं । माव-
ळलीं ३५ ॥ याउपरी उर्वरितें । तेंचि सत्स्वरूप संत । देही असोनि देहा-
तीत । जाणिजे ऐसा ॥ ३६ ॥ संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच
बोलावें लागे । आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥
३७ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायोद्भावनिरूपणं नाम
तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. ब्रह्मनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्त्र । त्रेतायुग
१. तत्त्वांच्या निरसनावरोबर. २. देव म्हणजे मीच, या भावनेनें. ३. आत्म-
रूपाचें ज्ञान. ४. मी कोण आहे ? ५. तो देवच मी. ६. बाकी राहिलेलें.

बारा लक्ष शहाण्णव सहस्त्र । द्वापर आठ लक्ष चौसष्ट सहस्त्र । आतां कलियुग
ऐका ॥ १ ॥ कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्त्र । चतुर्युगें बेचाळीस लक्ष
वीस सहस्त्र । ऐशीं चतुर्युगें सहस्त्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २ ॥ ऐसे
ब्रह्मे सहस्त्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका । विष्णु सहस्त्र होतां ऐका ।
पळ एक ईश्वराचें ॥ ३ ॥ ईश्वर जाय सहस्त्रवेळ । तें शक्तीचें अर्ध पळ ।
ऐसी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४ ॥ ऐशा अनंत शक्ति होती ।
अनंत रचना होती जाती । तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ॥ ५ ॥
परब्रह्मासि कैची स्थिती । परी ही बोलावयाची रीती । वेदश्रुती नेतिनेती¹
परब्रह्मीं ॥ ६ ॥ चार सहस्त्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहटी² ।
उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७ ॥ चार लक्ष सत्तावीस सहस्त्र ।
दोनशें चाळीस संवत्सर । पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८ ॥
ऐसे रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर । पाहतां येथील विचार ।
अंत न लागे ॥ ९ ॥ एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर ।
एक म्हणती शक्ति³ थोर । सकळांमध्ये ॥ १० ॥ ऐसे आपुलालेपरी बोलती ।
परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं । यद्दृष्टं तन्नष्टं⁴ हे श्रुती । बोलतसे ॥ ११ ॥
आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां । याचा निश्चय निवडेना ।
साधूविण ॥ १२ ॥ साधु निश्चय करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक ।
येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३ ॥ चित्रीं लिहिली सेना । त्यांत
कोण थोर कोण साना । हें कां तुम्ही विचाराना । आपुले ठायीं ॥ १४ ॥
स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरहि कल्पिलें । परंतु जागें झालिया झालें ।
कैसें पाहा ॥ १५ ॥ पाहतां जागृतीचा विचार । कैचें लहान कैचें थोर ।
झाला अवघा विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६ ॥ अवघाचि मायिक विचार ।
कैचें लहान कैचें थोर । लहानथोर हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७ ॥
जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतांच मेला । परी याचा विचार
राहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८ ॥ जयांस झालें आत्मज्ञान । तेचि थोर
महाजन । वेदशास्त्रपुराण । साधु संत बोलिले ॥ १९ ॥ एवं सकळांमध्यें


तळटीपा (Footnotes):
१. हें ब्रम्ह नव्हे, तें ब्रम्ह नव्हे, असें सांगतात; हें ब्रम्ह होय, असें सांगत
नाहींत. २. मर्यादा ३. देवी. ४. जें दिसतें तें नाशवंत.

१३८ श्रीदासबोध. [ दशक
थोर । तो एकचि परमेश्वर । तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २० ॥ तो
निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार । स्थानमानांचा विचार ।
ऐलीकडे ॥ २१ ॥ नांव रूप स्थान मान । हा तो अवघाचि अनुमान ।
तथापि होईल निदानें १ । ब्रह्मप्रलेंयीं २ ॥ २२ ॥ ब्रह्म प्रलयावेगळें । ब्रह्म नांव-
रूपा वेगळें । ब्रह्म कोणी एका काळें । जैसें तैसें ॥ २३ ॥ करिती ब्रह्मनिरू-
पण । जाणती ब्रह्म संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः
समासः ॥ ४ ॥
५. मायाब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें । श्रोत्या-
वक्त्याचे मिषें । निरूपण ऐका ॥ १ ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण
साकार । ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥२॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ ।
माया चंचळ चपळ । ब्रह्म निरूपाधि केवळ । माया उपाधिरूप
॥ ३ ॥ माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना । माया
नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४ ॥ माया रचे ब्रह्म रचेना ।
माया खचे ब्रह्म खचेना । माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५ ॥
माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना । माया धरे ब्रह्म धरेना ।
धारणेसी ॥ ६ ॥ माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना । माया
विटे ब्रह्म विटेना । अवित तें ॥ ७ ॥ माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया
करी ब्रह्म कांहींच न करी । माया नानारूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८ ॥
माया पांचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक । मायाब्रह्माचा विवेक ।
विवेकी जाणती ॥ ९ ॥ माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।
माया अंत३ पारावार । ब्रह्मास नाहीं ॥ १० ॥ सकळ माया विस्तारली ।
ब्रह्मस्थिति आच्छादिली । परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११ ॥ गों-
डाळें सांडून नीरें घेइजे । नीर सांडून क्षीरं सेविजे । माया सांडून अनु-
१. शेवट. २. ब्रह्मदेवाचीं शंभर वर्षे भरलीं म्हणजे होणाऱ्या प्रलयांत. ३-
मर्यादित. ४. पाण्याच्या पृष्ठावर वाढणारी एक वनस्पती. ५. पाणी. ६. दूध.

६ वा.] सृष्टिकथन. १३९
भविजे । परब्रह्म तैसें ॥ १२ ॥ ब्रह्म आकाशाऐसें निवळ । माया वसुंधरा
डहुळे । ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरूप ॥ १३ ॥ ब्रह्म तें अप्रत्यक्ष
असे । माया ते प्रत्यक्ष दिसे । ब्रह्म तें समचि असे । माया ते विषम-
रूप ॥ १४ ॥ माया लक्ष्यें २ ब्रह्म अलक्ष । माया साक्ष ३ ब्रह्म असाक्ष । माये-
मध्यें दोन्ही पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं १५ ॥ माया पूर्वपक्षें ४ ब्रह्म सि-
द्धांत । माया असत् ब्रह्म सत् । ब्रह्मासि नाहीं कारणें हेत । मायेसि आहे
॥ १६ ॥ ब्रह्म अखंड घनदाट । माया पांचभौतिक पोंचट । ब्रह्म तें निरंतर
निघोटें ५ । माया ते जुनी जर्जरी ॥ १७ ॥ माया घडे ब्रह्म घडेना । माया
पडे ब्रह्म पडेना । माया विघडे ब्रह्म विवडेना । जैसें तैसें ॥ १८ ॥ ब्रह्म
असतचि असे । माया निरसतांच निरसे । ब्रह्म संकल्पांत नसे । माये-
सि असे संकल्प ॥ १९ ॥ माया कठिन ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म
विशाळ । माया नसे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २० ॥ वस्तु नव्हे बोलिजे
ऐशी । माया जैसी बोलिजे तैसी । काळ पावेना वस्तूसी । मायेसि झडपी
॥ २१ ॥ नाना रूप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग ६ । माया भंगे ब्रह्म
अभंग । जैसें तैसें ॥ २२ ॥ आतां असो हा विस्तार । चालत जातें सच-
राचर । तितुकी माया परमेश्वर । सबाह्य अभ्यंतरीं ॥ २३ ॥ सकळ
उपाधीवेगळा । तो परमात्मा निराळा । जळीं असोन नातळे जळा । आ-
काश जैसें ॥ २४ ॥ मायाब्रह्माचें विवरण । करितां चुके जन्ममरण ।
संतांसि गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५ ॥ अरे या संतांचा महिमा ।
बोलावया नाहीं सीमा । जयाचेनि जगदात्मा । अंतरींच होय ॥ २६ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायाब्रह्मनिरूपणं नाम पंचमः
समासः ॥ ५ ॥
६. सृष्टिकथन.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टिपूर्वीच ब्रह्म असे । तेथें सृष्टि मुळींच नसे ।
आतां सृष्टि दिसत असे । ते सत्य कीं मिथ्या ॥ १ ॥ तुम्ही सर्वज्ञ गोसांवी ।
१. गढूळ. २. लक्षांत आणण्यास योग्य. ३. प्रत्यक्ष. ४. पूर्वपक्षाप्रमाणें
खंडित होणारी. ५. घनदाट. ६. संबंध.

१४० श्रीदासबोध. [ दशक
माझी आशंका फेडावी । ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २ ॥ आतां
ऐका प्रत्युत्तर । कथेसि व्हावें तत्पर । वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाहला
॥ ३ ॥ जीवंभूतः सनातनं । ऐसें गीतेचें वचन । येणें वाक्यें सत्यपण
सृष्टीस आलें ॥ ४ ॥ यद्दृष्टं तन्नष्टं येणें । वाक्यें सृष्टि मिथ्यापणें । सत्य
मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५ ॥ सत्य म्हणों तरी नासे । मिथ्या म्हणों
तरी दिसे । आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६ ॥ सृष्टीमध्यें बहु जन ।
अज्ञान आणि सज्ञान । म्हणोनियां समाधान । होत नाहीं ॥ ७ ॥ ऐका
अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत । देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि
आहे ॥ ८ ॥ बोले सर्वज्ञाचा राजा । मूर्खस्यै प्रतिमापूजा । ब्रह्मप्रलया-
च्या पैजा । घालूं पाहे ॥ ९ ॥ तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी
संध्या स्नान । गुरुभजन तीर्थाटण । कासया करावें ॥ १० ॥ श्लोक ॥
तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदं वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः । वादे वादे जायते तत्व-
बोधो बोधे बोधे भासते चंद्रचूडः ॥ १ ॥ ऐसें चंद्रचूडाँचें वचन । सद्गु-
रूचें उपासन । गुरुगीतानिरूपण । बोलिलें हरें ॥ ११ ॥ गुरुसि कैसें
भजावें । आधीं तयासि ओळखावें । त्याचें समाधान घ्यावें । विवेकें स्वयें
॥ १२ ॥ श्लोक ॥ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं
गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ १ ॥ गुरुगीतेचें वचन । ऐसें
सद्गुरूचें ध्यान । तेथें सृष्टि मिथ्या भान । उरेल कैंचें ॥ १३ ॥ ऐसें सज्ञान
बोलिला । सद्गुरु तो वोळखिला । सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्चिताथै
॥ १४ ॥ श्रोता ऐसें न मानी कदा । अधिक उठिला विवाद । म्हणे कैसा
रे गोविंदा । अज्ञान म्हणतोसी ॥ १५ ॥ जीवभूतः सनातनै । ऐसें गीतेचें
बचन । तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६ ॥ ऐसा श्रोता आक्षेप
करी । विषाद् मानिला अंतरीं । याचें प्रत्युत्तर चतुरीं । सावध परिसावें
॥ १७ ॥ गीतेंत बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद । म्हणोनियां.
व्यर्थ खेद । वाहतोसी ॥ १८ ॥ श्लोक ॥ अश्वत्थः सर्ववृक्षाणां...॥ टी० ॥
१. जीव हा माझा अंश असून शाश्वत आहे. २. दिसतें तितकें नाहींसें होतें. ३.
मूर्खानें प्रतिमेची पूजा करावी. ४. शिवाचें. ५. संशयाचें निरसन. ६. शंका.

६ वा. ] सृष्टिकथन. १४१
माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ । वृक्ष तोडितां तात्काळ ।
तुटत आहे ॥ १९ ॥ श्लोक ॥ नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः ॥ २ ॥ टीका ॥ शस्त्रांचेनि तुटेना ।
अग्नीचेनि जळेना । उदकामध्यें कालवेना । स्वरूप माझें ॥ २० ॥ पिंपळ
तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकानें । पिंपळ कालवे उदकानें । नाशवंत
॥ २१ ॥ तुटे जळे बुडे उडे । आतां ऐक्य कैसें घडे । म्हणोनि हैं उजेडे ।
सद्गुरुमुखें ॥ २२ ॥ इंद्रियाणां मनश्चास्मि । कृष्ण म्हणे मन तो मी । तरी
कां आवरावी ऊर्मी । चंचळ मनाची ॥२३॥ ऐसें कृष्ण कां बोलिला । साध-
नमार्ग दाखविला । खडे मांडूनि शिकविला । ओंनामा जेंवी ॥२४॥ ऐसा आहे
वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद । देहबुद्धीचा विवाद । कामा न ये ॥२५॥
वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती । ते सर्वहि निवडती । सद्गु-
रूचेनि वचनें ॥ २६ ॥ वेदशास्त्रांचें भांडण । शस्त्रं तोडीं ऐसा कोण । हैं
निवडेना साधूविण । कदा कल्पांतीं ॥ २७ ॥ पूर्वपक्ष आणि सिद्धांत ।
शास्त्रीं बोलिला संकेतें । याचा होय निश्चितार्थ । साधुमुखें ॥ २८ ॥ येन्हवीं
वादाचीं उत्तरें । एकाहूनि एक थोरें । बोलूं जातां अपारें । वेदशास्त्रं ॥२९॥
म्हणोनि वादविवाद । सांडूनि कीजे संवाद । तेणें होय ब्रह्मानंद । स्वानुभवें
॥ ३० ॥ एके कल्पनेचि पोटीं । होती जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची
गोष्टी । साच केंवी ॥ ३१ ॥ कल्पनेचा केला देव । तेथें झाला दृढभाव ।
देवालागीं येता खेंव । भक्त दुःखें दुखावला ॥ ३२ ॥ पाषाणाचा देव केला ।
एके दिवशीं भंगोनि गेला । तेणें भक्त दुखावला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३ ॥
देव हरपला घरचे घरीं । एक देव नेला चोरीं । एक देव दुराचारीं ।
फोडिला बळें ॥ ३४ ॥ एक देव झापाणिला । एक देव उदकीं टाकिला ।
एक देव नेऊन घातला । पायांतळीं ॥ ३५ ॥ काय सांगों तीर्थमहिमा ।
मोडोनि गेला दुरात्मा । थोर सत्व होतें तें माँ । काय जाहलें कळेना ॥ ३६ ॥
देव घडिला सोनारीं । देव वोतिला वोतारीं । एक देव घडिला पार्थरीं ।
पाषाणाचा ॥ ३७ ॥ नर्मदा गंडिका तीरीं । देव पडिले लक्षवरी । त्यांची
१. लहर. २. निरनिराळे निर्णय. ३. अभिप्राय. ४. सरळ भाषण. ५.
धोका. ६. फेंकून दिला. ७. मग. ८. पाथरवटांनीं.

१४२ श्रीदासबोध. [ दशक
संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥ चक्रतीर्थीं चक्रांकित । देव
असती असंख्यात । नाहीं मनीं निश्चितार्थ । एक देव ॥ ३९ ॥ बाण तां-
दळे ताम्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें । ऐसे देव कोण जाणे । खरे कीं
खोटे ॥ ४० ॥ देव रेशिमाचा केला । तोहि तुटोनिया गेला । आतां नव
नेम धरिला । मृत्तिकेच्या लिंगाचा ॥ ४१ ॥ आमचा देव बहु सत्य । आह्मांस
आक्रांतीं पावत । पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२ ॥ आतां याचें सत्व
गेलें । प्राप्त होतें तें झालें । प्राक्तन न वचे पालटिलें । ईश्वराचेनीं ॥ ४३ ॥
धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति
पडिली ॥ ४४ ॥ हे आपुलाली कल्पना । प्राक्तनाऐसीं फळें जाणा । परी त्या
देवाचिया खुणा । वेगळयाचि ॥ ४५ ॥ श्लोक ॥ नानाशास्त्रविदो लोका नाना-
दैवतपूजकाः ॥ आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १ ॥ म्हणोनि हें
मायाभ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें । वेद शास्त्र पुराणें । ऐसेंचि बोलती
॥ ४६ ॥ साधु संत महानुभाव । त्यांचा ऐसाच अनुभव । पंचभूतातीत देव ।
सृष्टि मिथ्या ॥ ४७ ॥ सृष्टीपूर्वी सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संहारतां । शा-
श्वत देव तत्वतां । आदि अंतीं ॥ ४८ ॥ ऐसा सर्वांचा निश्चय । यदर्थी नाहीं सं-
शय । व्यतिरेक आणि अन्वय । कल्पनारूप ॥ ४९ ॥ एके कल्पनेचे पोर्टी ।
बोलिजेती अष्ट सृष्टी । तये सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५० ॥ एक कल्पनेची
सृष्टी । दुसरी शाब्दिकें सृष्टी । तिसरी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१ ॥
चौथी चित्रलेप सृष्टी । पांचवी स्वममृष्टी । सहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी
सातवी ॥ ५२ ॥ आठवी दृष्टिबंधनें । ऐशा अष्ट सृष्टी जाण । यांमध्यें
श्रेष्ठ कोण । कोण सत्य मानावी ॥ ५३ ॥ म्हणोनि सृष्टी नाशवंत । जाणती
संत महंत । सगुण भजावें निश्चित । निश्चयालागीं ॥ ५४ ॥ सगुणाचेनि
आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासार विचारें । संतसंगें ॥ ५५ ॥ आतां
असो हें बहुत । संतसंगें केलें नेमस्त । येरवीं चित्त दुश्चित्त । संशयीं पडे
१. गोमती नदींत. २. सर्व प्रकारं. ३. हें ब्रह्म नव्हे, तें ब्रह्म नव्हे, हा विचार.
४. हें ब्रह्म होय, तें ब्रह्म होय, हा विचार. ५. शब्दात्मक व्यवहार. ६. चित्रांतील
व्यवहार. ७. स्वप्नांतील व्यवहार. ८. आकाशांत भासणारे अनेक आकार.
९. ज्वरानें बेशुद्ध जाल्यास भासणारे देखावे. १०. नजरबंदीचे खेळ.

६ वा. ] सगुणभजन. १४३
॥ ५६ ॥ तंव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टि मिथ्या ऐसें कळलें । परी हैं दृश्य
अवघें नैाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७ ॥ दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोनि
सत्यचि वाटतें । यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८ ॥ याचें प्रत्यु-
त्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें । श्रोतीं श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९॥
ऐवं सृष्टि मिथ्या जाण । जाणोन रक्षावें सगुण । ऐसी हे अनुभवाची खूण ।
अनुभवी जाणती ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके
सृष्टिकथननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. सगुणभजन.
श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानें दृश्य मिथ्या झालें । तरी कां पाहिजे भजन
केलें । तेणें काय प्राप्त झालें । हें मज निरूपावें ॥ १ ॥ ज्ञानाहून थोर
असेना । तरी कां पाहिजे उपासना । उपासनेनें जना । काय प्राप्त ॥ २ ॥
मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेना सगुण । भजन केलियाचा गुण ।
मज निरूपावा ॥ ३ ॥ जें प्रत्यक्ष नाशवंत । त्यासि भजावें किंनिमित्त ।
सत्य सांडून असत्य । कोण भजावें ॥ ४ ॥ असत्याचा प्रत्यय आला । तरी
मग नेम कां लागला । सत्य सांडून गलबला । कासया करावा ॥ ५ ॥
निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यय येतो । सगुण काय देऊं पाहतो ।
सांगा स्वामी ॥ ६ ॥ सगुण नाशवंत ऐसें सांगतां । पुनः भजन करावें
म्हणतां । तरी कासयासाठीं आतां । भजन करूं ॥ ७ ॥ स्वामीचे भिडेनें
बोलवेना । येहवीं कांहींच मानेना । साध्यचि झालिया साधना । कां प्रव-
र्तावॆं ॥ ८ ॥ ऐसें श्रोत्याचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें । याचें उत्तर
ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९ ॥ गुरूचें वचन प्रतिपाळण । हें मुख्य परमार्थांचें
लक्षण । वचनभंग करितां विलक्षण । सहजचि जाहलें ॥ १० ॥ म्हणोनि
आज्ञेसि वंदावें । सगुण भजन मानावें । श्रोता म्हणे हें देवें । कां प्रयोजिलें
॥ ११ ॥ काय मानिला उपकार । कोण झाला साक्षात्कार । किंवा प्रार-
ब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२ ॥ होणार हैं तों पालटेना । भजनें काय
करावें जना । हैं तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३ ॥ स्वामीची
१. नसलें. २. एकंदरीत. ३. गोंधळून जाऊन.

१४४ श्रीदासबोध. [ दशक

आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण । परंतु याचा काय गुण । मज निरू-
पावा ॥ १४ ॥ वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाचीं लक्षणें । तुज कांहीं
लागे करणें । किंवा नाहीं ॥ १५ ॥ करणें लागे भोजन । करणें लागे उदक-
प्राशन । मळमूत्रत्याग लक्षण । तेंहि सुटेना ॥ १६ ॥ जनाचें समाधान
राखावें । आपुलें पोरिखें १ वोळखावें । आणि भजनचि मोडावें । हें कोण
ज्ञान ॥ १७ ॥ ज्ञानें विवेकें मिथ्या झालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें । तरी
मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८ ॥ साहेबास लोटांगणीं जावें ।
नीचासारखें व्हावें । आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान ॥ १९ ॥
हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तूं एक मानवी रंक । भजसि ना
तरी काय गेलें ॥ २० ॥ आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ ।
जो समर्थांचाहि समर्थ । देवां सोडविता ॥ २१ ॥ त्याचे आम्ही सेवकजन ।
सेवा करितां झालें ज्ञान । तेथें अभावें २ धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२ ॥
गुरु सांगता सारासार । त्यास कैसें म्हणावें असार । तुज काय सांगणें
विचार । शाहणे जाणती ॥ २३ ॥ समर्थांचे मनींचें तुटे ३ । तेंचि जाणावें
अदृष्ट ४ खोटें । राज्यपदापासुनि करंटे । चेंवलें ५ जैसें ॥ २४ ॥ मी थोर वाटे
मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी । विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे
॥ २५ ॥ वस्तुभजन ६ करीना । ना न करी एसेंहि म्हणेना । तरी हे जाणावी
कल्पना । दडोन राहिली ॥ २६ ॥ ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि
आला देहाभिमान । येथें नाहीं कीं अनुमान । प्रत्यय तुझा ॥ २७ ॥ तरी
आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें । तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना
ऐसें ॥ २८ ॥ करी दुर्जनांचा संहार । भक्तजनांचा आधार । ऐसा हा तों
चमत्कार । रोकडा चाले ॥ २९ ॥ मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि
जातें । कृपा केलिया रघुनाथें । प्रतीत येते ॥ ३० ॥ रघुनाथभजनें ज्ञान झालें ।
रघुनाथभजनें महत्व वाढलें । म्हणोनि तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१ ॥
हें तों आहे सप्रतीत । आणि तुज वाटेना प्रतीत । साक्षात्कारें नेमस्त । प्रत्यय
करावा ॥ ३२ ॥ रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तात्काळचि सिद्धि पावे ।
१. दुसऱ्याचें. २. अविश्वास. ३. मनांतून उतरणें. ४. दैव. ५. भ्रष्ट झालें. ६.
ब्रह्माचें ध्यान, किंवा देवाचें भजन.

६ वा. ] दृश्यनिरसन. १४५
कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥ ३३ ॥ कर्ता राम मी नव्हे आपण ।
ऐसें सगुण निवेदन । निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होईजे ॥ ३४ ॥ मी
कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा । प्रतीत पाहसी तरी आतां ।
शीघ्रचि आहे ॥ ३५ ॥ मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६ ॥ एके भावने-
साठीं । देवासि पडे तुटी । कां ते होय कृपादृष्टी । देव कर्ता भावितां
॥ ३७ ॥ आपण आहे दों दिवसांचा । आणि देव बहुता काळांचा ।
आपण थोडे वोळखीचा । देवास त्रैलोक्य जाणे ॥ ३८ ॥ याकारणें रघुनाथ-
भजन । त्यासि मानिती बहुत जन । ब्रह्मादिक आदिकरून । रामभजनीं
तत्पर ॥ ३९ ॥ ज्ञानबळें उपासना । आम्हीं भक्त जरी मानूं ना । तरी या
दोषाचिया पतना । पावों अभक्तपणें ॥ ४० ॥ देव उपेक्षी थोरपणें । तरी
मग त्याचें तोचि जाणे । अप्रमाण तें श्लाघ्येंवाणें १। नव्हेचि कीं श्रेष्ठा
॥ ४१ ॥ देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना । ऐसी स्थिति
सज्जना- । अंतरींची ॥ ४२ ॥ सकळ मिथ्या होऊन जातें । हें रामभजनें
कळों येतें । दृश्य ज्ञानियांचेनि मतें । स्वप्न जैसें ॥ ४३ ॥ मिथ्या स्वप्नविवंच-
ना । तैसी हे सृष्टिरचना । दृश्य मिथ्या साधुजनां । कळों आलें ॥ ४४ ॥
आक्षेप झाला श्रोत्यांसी । मिथ्या तरी कां दिसतंतें आम्हांसी । याचें उत्तर
पुढिले समासीं । बोलिलें असे ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. दृश्यनिरसन.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां
दिसतें । त्याचें उत्तर बोलिजेलें । तें सावध ऐका ॥ १ ॥ देखिलें तें सत्याचि
मानावें । हें झाल्याचें देखणें नव्हे । जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे
॥ २ ॥ एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी २ । संत महंतांच्या
गोष्टी । त्याहि मिथ्या मानाव्या ॥ ३ ॥ माझें दिसतें हेंच खरें । तेथें चालेना
दुसरें । ऐशिया संशयाच्या भरें । भराँचि नये ॥ ४ ॥ मृगें देखिलें मृगजळ ३।
१. भूषण. २. असंख्य ग्रंथ. ३. प्रखर उन्हांत अरण्यांत पाण्याचा भास होतो तो.

१४६ श्रीदासबोध. [ दशक
तेथें धांवें तें बरळें¹ । जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूसि काय म्हणावें ॥
५ ॥ रात्रीं स्वप्न देखिलें । बहुत द्रव्य सांडपलें । बहुत जनासि वेव्हारिलें ।
तें खरें कैसेनि ॥ ६ ॥ कुशल चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र ।
देखतां उठे प्रीतिमात्र । परंतु तेथें मृत्तिका ॥ ७ ॥ नाना वनिता² हस्ती-
घोडे । रात्रीं देखतां मन बुडे । दिवसा पाहतां कातडें । कंठाळवाणें ॥ ८ ॥
काष्ठी पाषाणी पुतळ्या । नाना प्रकारें निर्मिल्या । परम सुंदर वाटल्या ।
परंतु तेथें पाषाण ॥ ९ ॥ नाना गोपुरीं³ पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं
पाहाती । लाघव देखतां भरे वृत्ती । परंतु तेथें विभास⁴ ॥ १० ॥ खेळतां
नेटकें दशावतारीं । तेथें येती सुंदर नारी । नेत्र मोडिती कळाकुसरीं । परी
ते अवघे धटिंगण ॥ ११ ॥ सृष्टि बहुरंगी असत्य । बहुरूप्याचें हें कृत्य ।
तुज वाटे दृश्य सत्य । परी ही जाण अविद्या ॥ १२ ॥ मिथ्या साचासारिखें
देखिलें । परी तें पाहिजे विचारिलें । दृष्टि तरळतां भासलें । तें साच कैसें
मानावें ॥ १३ ॥ वरी पाहतां पालथें आकाश । उदकीं पाहतां उताणें
आकाश । मध्यें चांदण्याचाहि प्रकाश । परी तें अवघें मिथ्या ॥ १४ ॥
नृपतीनें चितारी आणले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले । पाहतां तेचि ऐसें
गमलें । परी तें अवघें मायिक ॥ १५ ॥ नेत्रीं कांहीं बाहुली नसे । जेव्हां
जें पाहावें तेव्हां तें भासे । डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ॥ १६ ॥
जितुके बुडबुडे उठती । तितुक्यामध्यें रूपें दिसती । क्षणमध्यें फुटोन जाती ।
रूपें मिथ्या ॥ १७ ॥ लघुदर्पणें⁵ दोनी चारी हातीं । तितुकीं रूपें प्रति-
बिंबती । परी तें मिथ्या अंतीं । एकचि मुख ॥ १८ ॥ नदीतीरीं भार⁶ जातां ।
दुसरा भार दिसे पालथा । कां पडसादाचां⁷ अवचिता । गजर उठे ॥ १९ ॥
वापी सरोवरांचें नीर । तेथें पशु पक्षी नर वानर । नाना पत्रें वृक्षविस्तार ।
दिसे दोहीं⁸ सर्वां ॥ २० ॥ एक शस्त्र झाडूं जातां । दोन दिसती तत्वतां ।
नाना तंतु टणत्कारितां । द्विधां⁹ भासती ॥ २१ ॥ कां ते दर्पणांचे ¹⁰मंदिरीं ।
बैसली सभा दिसे दुसरी । बहुत दीपांचिये हारीं । बहुत छाया दीसती ॥


१. भ्रमिष्ट. २. पडद्यावर काढलेला चित्र; स्त्रिया, हत्ती, घोडे इत्यादि. ३.
देवालयांतील उंच उंच मजल्यांवर. ४. आभास. ५. लहान आरसे. ६. जमाव. ७.
प्रतिशब्दाचा. ८. बाजूंस. ९. दोन. १०. आरसेमहालांत.

६ वा. ] दृश्यनिरसन. १४७
२२ ॥ ऐसें हें बहुविध भासे । साचासारिखें दिसे । परी हें सत्य म्हणोन
कैसें । विश्वासावें ॥ २३ ॥ माया मिथ्या बाजीगिरी । दिसे साचाचियेपरी ।
परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये ॥ २४ ॥ लटिकें साचाऐसें भावावें ।
तरी मग पारखी कासया असावें । एवं ये अविद्येचे गोवे । ऐसेचि असती
॥ २५ ॥ मनुष्यांची बाजीगिरी । बहुत जनां वाटे खरी । शेवट पाहतां
निर्धारीं । मिथ्या होय ॥ २६ ॥ तैशीच माव राक्षसांची । देवांसहि वाटे
साची । पंचवटिकेसी मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७ ॥ पूर्वकाया पाल-
टिती । एकाचेचि बहुत होती । रक्तबिंदीं जन्मती । रजनीचरें ॥ २८ ॥
नानापदार्थ फळेंचि झाले । द्वारकेमध्यें प्रवेशले । कृष्णें दैत्य किती वधिले ।
कपटरूपी ॥ २९ ॥ कैसें कपट रावणाचें । शिर केलें मावेचें । काळनेमी-
च्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३० ॥ नाना दैत्य कपटमती । जे देवां-
सहि नाटोपती । मग निर्माण होऊन शक्ती । संहार केला ॥ ३१ ॥ ऐसी
राक्षसांची माव । जाणों न शकती देव । कपटविद्येचें लाघव । अघटित ज्यांचें
॥ ३२ ॥ मनुष्यांची बाजीगिरी । राक्षसांची वोडंबरी । भगवंताची नाना-
परी । विचित्र माया ॥ ३३ ॥ हे साचासारिखीच दिसे । विचारितांचि
निरसे । मिथ्याच परी आभासे । निरंतर ॥ ३४ ॥ साच म्हणावी तरी
हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे । दोहीं पदार्थां अविश्वासे । सांगतां
मन ॥ ३५ ॥ परंतु हे नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार । दिसतँ हें
स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६ ॥ तथापि अजून तुजला । भासचि सत्य
वाटला । तरी येथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७ ॥ दृश्य भास अवि-
द्यात्मक । तुझाही देह तदात्मक । म्हणोनि हा अविवेक । तेथें संचरला ॥
३८ ॥ दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावारि बैसलें । तरी तें लिंगदेह झालें ।
अविद्यात्मक ॥ ३९ ॥ अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोन गोष्टी विश्वा-
सली । तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४० ॥ तेचि काया मी
आपण । हें देहबुद्धीचें लक्षण । येणें करितां झालें प्रमाण । दृश्य अवघें ॥
१. गारुड. २. प्रत्येक रक्तबिंदूपासून अनेक दैत्य उत्पन्न झाले. (सप्तशती पहा.)
३. राक्षस. ४. खोटें. ५. कालनेमी राक्षस ऋषीचें सोंग घेऊन कपटानें आश्रम स्थापून
होता, त्या प्रकाराचें. (रामायण पहा.). ६. चमत्कार. ७. माया.

^५ एकवटिती" -> footnote 5 is for शुभां.
Where is footnote 4? "जनांसी^४" or "लोक^४"?
Wait, line 27 has: ४. जग. - "जन" means "जग"!
So footnote 4 is for "जन" / "जनांसी".
Now, what has footnote 3?
Could footnote 3 be on line 20: "ते अंतर^३ जाणती"?
Look at line 20: "ते अंतर जाणती ॥ ३ ॥"
Yes! "ते अंतर जाणती" has अंतर!
Wait, does Footnote 3 explain "अंतर"?
What does Footnote 3 say?
If it explains "अंतर", what does "अंतर" mean?
"अभ्यंतर"!
YES! "अंतर" means "अभ्यंतर"!
LOOK AT THAT:
"ते अंतर जाणती ॥ ३ ॥" -> "अंतर" = "अभ्यंतर"!
OH WOW! That's brilliant!
Verse 3: "ते अंतर जाणती" -> अंतर म्हणजे काय? अभ्यंतर!
Wait, look at the word in line 27:
Does it say अभ्यंतर.?
Wait, does it say ३. अभ्यंतर.?
Let's look at the letters in line 27:
· (which is the dot of ३. or `

?
Look at the second one:
अ - ब् - ... wait, look at the second one:
It has: अ, ब्, then the letter, then vertical bar with a stroke on top, and a dot!
Wait, why does it have a stroke on top of the vertical bar?
If it has a stroke on top of a vertical bar, that's 'ो' or 'ौ'!
Wait, could it be "अब्धों" or "अब्दां"?
Wait, look at the footnote 5:
"५. दक्षिणावर्ती शंख. ६. दक्षिणावर्ति वेल."
Wait, what does the superscript in the footnote look like?
Wait, look at footnote 3: "३. चितिलेलें..."
Footnote 4: "४. सोनें."
Footnote 5: "५. दक्षिणावर्ती शंख."
Footnote 6: "६. दक्षिणावर्ति वेल."
Footnote 7: "७. मलयागिरी चंदन."
Footnote 8: "८. श्रीमंत."
Footnote 9: "९. सज्जनांस."
Wait! The numbers in the footnotes are 1 to 9:
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९!
Now look at the main text: where are these numbers placed?
In line 3: "वृथापुष्टीं२" - look at "वृथापुष्टीं": there is a superscript '२' right above the

पूजा प्रत्यक्ष दर्शन । यांस महदंतर ॥ २६ ॥ पुढें जन्मांतरीं होणार ।
हा तों अवघाच उधार । तैसें नव्हे सारासार । तात्काळ लाभे ॥ २७ ॥
तात्काळाचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो । संशय अवघाचि तुटतो ।
जन्ममरणांचा ॥ २८ ॥ याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें ।
मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारणें ॥ २९ ॥ ये गोष्टीस करी अनुमान ।
तो शीघ्राचि पावेल पतन । मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३० ॥
हैं यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्राचि मुक्त होणें । असोनि कांहींच
नसणें । जनांमध्यें ॥ ३१ ॥ देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण ।
हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२ ॥ देहींच विदेहें होणें ।
करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३ ॥
येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे । संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरु-
वचनें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सारशोधन-
निरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. अनिर्वाच्यनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें
नाहीं । तरी तें कैसें आहे सर्वही । मज निरूपावें ॥ १ ॥ मुक्यानें गूळ
खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्राय मजला । निरूपण कीजे
॥ २ ॥ अनुभवहि पुसों जातां । म्हणती न ये कीं सांगतां । तरी कोणापा-
शीं पुसों आतां । समाधान ॥ ३ ॥ जे ते अगम्य सांगती । न ये माझिये
प्रचीती । विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४ ॥ ऐसें श्रोत्याचें
उत्तर । याचें कैसें प्रत्युत्तर । निरूपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५ ॥ जें
समाधानाचें स्थळ । कीं तो अनुभवचि केवळ । तेंचि स्वरूप प्रांजळ ।
बोलून दावूं ॥ ६ ॥ जें बोलास आकळेना । बोलिल्याविणहि कळेना । ज-
यास कल्पितां कल्पना । हिंपुटी होय ॥ ७ ॥ तें जाणावें परब्रह्म । जें
वेदांचें गुह्य परम । धरितां संतसमागम । सर्वहि कळे ॥ ८ ॥ तेंचि आतां
सांगिजेल । जें समाधान सखोल । ऐक अनुभवाचे बोल । अनिर्वाच्य वस्तू
१. देहरहित. २. बोलून दाखविण्यास अशक्य.

६ वा. ] अनिर्वाच्यनिरूपण. १५१
॥ ९ ॥ सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळाया गूळ देणें । ऐसें हें सद्गुरू-
विणें । होणार नाहीं ॥ १० ॥ सद्गुरुकृपा वळे त्यासी । जो शोधील आप-
णाशीं । पुढें कळेल अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११ ॥ दृढ करूनियां
बुद्धी । आधीं घ्यावी आपली शुद्धी । तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२ ॥
आपुलें मूळ बरें शोधितां । आपुली ती मायिक वार्ता । पुढें वस्तुच तत्वता ।
समाधान ॥ १३ ॥ आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं । जो कोणी
सिद्धांत लक्षी । तोचि साधु ॥ १४ ॥ सिद्धांत वस्तु लक्षूं जातां । सर्वसा-
क्षिणी ते अवस्था । आत्मा त्याहून परता । अवस्थोतीत ॥ १५ ॥ पदार्थ-
ज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणे नुरे । ते समयीं फुंजें उतरे । मीपणाचा
॥ १६ ॥ जेथें मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण । अनिर्वाच्य समाधा-
न । या कारणें बोलिजे ॥ १७ ॥ अत्यंत विचाराचे बोल । तरी ते मायिकचि
फोल । शब्दा सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८ ॥ शब्दाकरितां कळे
अर्थ । अर्थ पाहतां शब्द व्यर्थ । शब्द सांगे यथार्थ । परी आपण मिथ्या
॥ १९ ॥ शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहतां शब्द नासे । शब्द फोल
अर्थ असे । घनदाटपणें ॥ २० ॥ भुसाकरितां धान्य निपजे । धान्य घेऊ-
न भूस टाकिजे । तैसा भूस शब्द जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१ ॥ पोंचटां-
मध्यें घनवट । घनवटीं उडे पोंचट । तैसा शब्द हा फलगट । परब्रह्मीं
॥ २२ ॥ शब्द बोलूनि राहे । अर्थ शब्दापूर्वीच आहे । या कारणें न साहे ।
उपमा तया अर्थांसी ॥ २३ ॥ भूस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्य-
जावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४ ॥ दृश्य वेगळें बोलि-
जे । त्यास वाच्यांश म्हणिजे । त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश
॥ २५ ॥ ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो
अलक्ष । लक्षिला न वचे ॥ २६ ॥ जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभ-
वाचा गाभा । ऐसा तोहि उभा । कल्पित केला ॥ २७ ॥ मिथ्या कल्पने-
पासून झाला । खरेपण कैसें असेल त्याला । म्हणोनि तेथें अनुभवाला । ठा-

१. जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या (केवल साक्षित्व) या चार अवस्थांहून
भिन्न. २. अभिमान. ३. ब्रह्मानुभवाचे वेळीं 'मी' ही स्फूर्तिच नसल्यामुळे तो
अनुभव कोण सांगणार ? अर्थात् तें समाधान अनिर्वाच्य होय. ४. आंतबाहेर.

१५२ श्रीदासबोध. [ दशक
व नाहीं ॥ २८ ॥ दुजेविण अनुभव । हें बोलणोंचि तों वाव । या कारणें
नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९ ॥ अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि
लाजे । म्हणोनियां बोलणें साजे । अनिर्वाच्य ॥ ३० ॥ दिवसरेजनीचें प-
रिमितें । करावया मूळ आदित्य । तो आदित्य गेलिया उर्वरित । त्यासि
काय म्हणावें ॥ ३१ ॥ शब्द मौनाचा विचार । व्हावया मूळ ओंकार । तो
ओंकार गेलिया उच्चार । कैसा करावा ॥ ३२ ॥ अनुभव आणि अनुभविता ।
सकळ ये मायेचिकरितां । ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥
वस्तु एक आपण एक । ऐशी असती वेगळिक । तरी अनुभवाचा विवेक ।
बोलों येता सुखें ॥ ३४ ॥ वेगळेपणाची मातें । ते लटिकी वंध्येची सुताँ । म्ह-
णूनिया अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५ ॥ अजन्मां होता निजला । तेणें
स्वप्नीं स्वप्न देखिला । सद्गुरूसि शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६ ॥ सद्गुरुकृपे-
स्तव । झाला संसार वाव । ज्ञान झालिया ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७ ॥
आहे तितुकें नाहीं झालें । नाहीं नाहींपणें निमालें । आहे नाहीं जाऊन
उरलें । नसोनि कांहीं ॥ ३८ ॥ शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान । तेणें झालें समा-
धान । ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिती ॥ ३९ ॥ अद्वैतेंनिरूपण होतां ।
निमाली द्वैताची वार्ता । ज्ञानचर्चा बोलों जातां । जागृति आली ॥ ४० ॥
श्रोतीं व्हावें सावधान । अर्थी घालावें मन । खुणे पावतां समाधान ।
अंतरीं कळे ॥ ४१ ॥ तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावरी गेलें ।
अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२ ॥ तेथें शब्दांविण ऐक्यता ।
अनुभव ना अनुभविता । ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३ ॥
तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊन जागृतीस आला । तेथें तर्क कुंठित
जाहला । अंत नलगे ॥ ४४ ॥ या निरूपणाचें मूळ । केलेंच करूं प्रांजळ ।
तेणें अंतरीं निवळ । समाधान कळे ॥ ४५ ॥ तंव शिष्यें विनविलें । जी हें
आतां निरूपिलें । तरी पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६ ॥ मज क-
१. अनुभव घेणारा, अनुभव घेण्याचा पदार्थ, व येणारा अनुभव हें त्रय. २.
दिवस व रात्र ही कालगणना. ३. बाकी राहिलेले. ४. गोष्ट. ५. वांझेची मुलगी.
६. एकरूपता. ७. ज्याचा जन्मच झाला नाहीं तो; अर्थात् जीव. ८. शून्य नव्हे
असें. ९. भेदभावना सत्य नाहीं, हा विचार. १०. सांगतां न येणारें.