दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 187, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१५२ श्रीदासबोध. [ दशक
व नाहीं ॥ २८ ॥ दुजेविण अनुभव । हें बोलणोंचि तों वाव । या कारणें
नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९ ॥ अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि
लाजे । म्हणोनियां बोलणें साजे । अनिर्वाच्य ॥ ३० ॥ दिवसरेजनीचें प-
रिमितें । करावया मूळ आदित्य । तो आदित्य गेलिया उर्वरित । त्यासि
काय म्हणावें ॥ ३१ ॥ शब्द मौनाचा विचार । व्हावया मूळ ओंकार । तो
ओंकार गेलिया उच्चार । कैसा करावा ॥ ३२ ॥ अनुभव आणि अनुभविता ।
सकळ ये मायेचिकरितां । ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥
वस्तु एक आपण एक । ऐशी असती वेगळिक । तरी अनुभवाचा विवेक ।
बोलों येता सुखें ॥ ३४ ॥ वेगळेपणाची मातें । ते लटिकी वंध्येची सुताँ । म्ह-
णूनिया अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५ ॥ अजन्मां होता निजला । तेणें
स्वप्नीं स्वप्न देखिला । सद्गुरूसि शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६ ॥ सद्गुरुकृपे-
स्तव । झाला संसार वाव । ज्ञान झालिया ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७ ॥
आहे तितुकें नाहीं झालें । नाहीं नाहींपणें निमालें । आहे नाहीं जाऊन
उरलें । नसोनि कांहीं ॥ ३८ ॥ शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान । तेणें झालें समा-
धान । ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिती ॥ ३९ ॥ अद्वैतेंनिरूपण होतां ।
निमाली द्वैताची वार्ता । ज्ञानचर्चा बोलों जातां । जागृति आली ॥ ४० ॥
श्रोतीं व्हावें सावधान । अर्थी घालावें मन । खुणे पावतां समाधान ।
अंतरीं कळे ॥ ४१ ॥ तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावरी गेलें ।
अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२ ॥ तेथें शब्दांविण ऐक्यता ।
अनुभव ना अनुभविता । ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३ ॥
तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊन जागृतीस आला । तेथें तर्क कुंठित
जाहला । अंत नलगे ॥ ४४ ॥ या निरूपणाचें मूळ । केलेंच करूं प्रांजळ ।
तेणें अंतरीं निवळ । समाधान कळे ॥ ४५ ॥ तंव शिष्यें विनविलें । जी हें
आतां निरूपिलें । तरी पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६ ॥ मज क-
१. अनुभव घेणारा, अनुभव घेण्याचा पदार्थ, व येणारा अनुभव हें त्रय. २.
दिवस व रात्र ही कालगणना. ३. बाकी राहिलेले. ४. गोष्ट. ५. वांझेची मुलगी.
६. एकरूपता. ७. ज्याचा जन्मच झाला नाहीं तो; अर्थात् जीव. ८. शून्य नव्हे
असें. ९. भेदभावना सत्य नाहीं, हा विचार. १०. सांगतां न येणारें.