सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 180, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 180

६ वा. ] दृश्यनिरसन. १४५
कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥ ३३ ॥ कर्ता राम मी नव्हे आपण ।
ऐसें सगुण निवेदन । निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होईजे ॥ ३४ ॥ मी
कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा । प्रतीत पाहसी तरी आतां ।
शीघ्रचि आहे ॥ ३५ ॥ मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६ ॥ एके भावने-
साठीं । देवासि पडे तुटी । कां ते होय कृपादृष्टी । देव कर्ता भावितां
॥ ३७ ॥ आपण आहे दों दिवसांचा । आणि देव बहुता काळांचा ।
आपण थोडे वोळखीचा । देवास त्रैलोक्य जाणे ॥ ३८ ॥ याकारणें रघुनाथ-
भजन । त्यासि मानिती बहुत जन । ब्रह्मादिक आदिकरून । रामभजनीं
तत्पर ॥ ३९ ॥ ज्ञानबळें उपासना । आम्हीं भक्त जरी मानूं ना । तरी या
दोषाचिया पतना । पावों अभक्तपणें ॥ ४० ॥ देव उपेक्षी थोरपणें । तरी
मग त्याचें तोचि जाणे । अप्रमाण तें श्लाघ्येंवाणें १। नव्हेचि कीं श्रेष्ठा
॥ ४१ ॥ देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना । ऐसी स्थिति
सज्जना- । अंतरींची ॥ ४२ ॥ सकळ मिथ्या होऊन जातें । हें रामभजनें
कळों येतें । दृश्य ज्ञानियांचेनि मतें । स्वप्न जैसें ॥ ४३ ॥ मिथ्या स्वप्नविवंच-
ना । तैसी हे सृष्टिरचना । दृश्य मिथ्या साधुजनां । कळों आलें ॥ ४४ ॥
आक्षेप झाला श्रोत्यांसी । मिथ्या तरी कां दिसतंतें आम्हांसी । याचें उत्तर
पुढिले समासीं । बोलिलें असे ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. दृश्यनिरसन.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां
दिसतें । त्याचें उत्तर बोलिजेलें । तें सावध ऐका ॥ १ ॥ देखिलें तें सत्याचि
मानावें । हें झाल्याचें देखणें नव्हे । जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे
॥ २ ॥ एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी २ । संत महंतांच्या
गोष्टी । त्याहि मिथ्या मानाव्या ॥ ३ ॥ माझें दिसतें हेंच खरें । तेथें चालेना
दुसरें । ऐशिया संशयाच्या भरें । भराँचि नये ॥ ४ ॥ मृगें देखिलें मृगजळ ३।
१. भूषण. २. असंख्य ग्रंथ. ३. प्रखर उन्हांत अरण्यांत पाण्याचा भास होतो तो.