सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 185, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 185

पूजा प्रत्यक्ष दर्शन । यांस महदंतर ॥ २६ ॥ पुढें जन्मांतरीं होणार ।
हा तों अवघाच उधार । तैसें नव्हे सारासार । तात्काळ लाभे ॥ २७ ॥
तात्काळाचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो । संशय अवघाचि तुटतो ।
जन्ममरणांचा ॥ २८ ॥ याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें ।
मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारणें ॥ २९ ॥ ये गोष्टीस करी अनुमान ।
तो शीघ्राचि पावेल पतन । मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३० ॥
हैं यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्राचि मुक्त होणें । असोनि कांहींच
नसणें । जनांमध्यें ॥ ३१ ॥ देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण ।
हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२ ॥ देहींच विदेहें होणें ।
करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३ ॥
येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे । संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरु-
वचनें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सारशोधन-
निरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. अनिर्वाच्यनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें
नाहीं । तरी तें कैसें आहे सर्वही । मज निरूपावें ॥ १ ॥ मुक्यानें गूळ
खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्राय मजला । निरूपण कीजे
॥ २ ॥ अनुभवहि पुसों जातां । म्हणती न ये कीं सांगतां । तरी कोणापा-
शीं पुसों आतां । समाधान ॥ ३ ॥ जे ते अगम्य सांगती । न ये माझिये
प्रचीती । विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४ ॥ ऐसें श्रोत्याचें
उत्तर । याचें कैसें प्रत्युत्तर । निरूपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५ ॥ जें
समाधानाचें स्थळ । कीं तो अनुभवचि केवळ । तेंचि स्वरूप प्रांजळ ।
बोलून दावूं ॥ ६ ॥ जें बोलास आकळेना । बोलिल्याविणहि कळेना । ज-
यास कल्पितां कल्पना । हिंपुटी होय ॥ ७ ॥ तें जाणावें परब्रह्म । जें
वेदांचें गुह्य परम । धरितां संतसमागम । सर्वहि कळे ॥ ८ ॥ तेंचि आतां
सांगिजेल । जें समाधान सखोल । ऐक अनुभवाचे बोल । अनिर्वाच्य वस्तू
१. देहरहित. २. बोलून दाखविण्यास अशक्य.