सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

१०६ सार्थ अमृतानुभव
वांचूनि वस्तु इया । आपणापें प्रकाशावया ॥ अज्ञान हेतु
वायां । अवघेंचि ॥ २९२ ॥ म्हणोनी अज्ञान सद्भावो । कोणे-
परी न लाहो ॥ अज्ञान कीर वावो । पाहाँ ठेलियाही ॥ २९३ ॥
परी तमाचा विसुरा । न जोडेचि दिनकरा ॥ रात्रीचिया घरा ।
गेलियाही ॥ २९४ ॥ कां नीद खोळे भरितां । जाणणेंही नये
हाता । येकलिया टळटळिता । ठाकिजे जेवीं ॥ • ९५ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृतार्थविवरणे अज्ञानखंडन नाम
सप्तमप्रकरणं संपूर्णम्
हें वगळून स्वतःचा प्रकाश करण्यास वस्तूला अज्ञान कारण आहे, हें
सर्व म्हणणें निराधार आहे. २९२. म्हणून अज्ञानाची सिद्धि कोणत्याहि
प्रकारानें होत नाहीं; निश्चयेंकरून पाहावयास गेलें असतांहि अज्ञान खोटें
ठरलें. २९३ रात्रींच्या घरीं गेलें असतांहि सूर्याला अंधाराची प्रतिति होत
नाहीं. २९४. झोंप पदरांत भरावयास गेलें असतां झोळींत जगणेंहि शिल्लक
राहत नाहीं. तिला धरूं पाहाणारा मात्र रात्रभर हिंडत बसतो झालें ! २९५.
याप्रमाणें अमृतानुभव ग्रंथांतील अज्ञानखंडण नामक सातवें प्रकरण समाप्त.
प्रकरण सातवें समाप्त

प्रकरण आठवें
तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ॥ आम्हांलागीं
गुरुदेवें । आम्हीच केलों ॥ १ ॥ परी आम्हां आम्ही आहों । तें
कसें पाहों जावों ॥ तंव काय कीजे ठावो । लाजिजे ऐसा ॥ २ ॥
हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ॥ जे आम्ही न समाये ।
आम्हांमाजी ॥ ३ ॥ अहो आत्मपणीं न संटो । स्वसंविती न
घसवटो ॥ आंगीं लागलें न फुटो । कैवल्यही ॥ ४ ॥ आमुची
करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ॥ आमुतें देखो दिठी ।
ते दिठीच नव्हे ॥ ५ ॥ आमुतें करूनि विखो । भोगूं शके
पारखो ॥ तैं आमुतें न देखो । आम्हीपण ॥ ६ ॥ प्रकटो लपो
न लाहो । येथें नाहीं नवलाहो ॥ परी कैसेनीही विपावो ।
असणेयाचा ॥ ७ ॥
अरे ! आमचें स्वतःचें नांव पाहिल्यावर अज्ञानाविषयीं ज्ञान राहत
नाहीं श्रीसद्गुरुरायांनीं आम्हाला या स्थितीला आणलें. १. पण आमचे
आम्ही तरी कसे आहोंत. हें पाहावयाचें म्हटलें, तर लाज वाटते. २. इतक्या
वरच्या स्थितीला श्रीगुरूंनीं नेलें कीं, मी माझ्यातच मावत नाहीं. ३. त्या
ठिकाणीं आत्मभाव सांपडत नाहीं. आपलेपणाच्या ज्ञानाचे संस्कार नाहींत.
मोक्ष हा मूर्तिमंत शरीरस्थ असल्यानें त्याचें वेगळेपण टिकत नाहीं. ४. या
रीतीचें वर्णन करण्यासाठीं बळ या शब्दविश्वांतच नाहीं. साध्या डोळ्याला
बघतां येईल अशी दृष्टीच निर्माण झालेली नाहीं. ५. या स्थितीला दृश्य
समजून ती कोणाला पाहू शकेल ? आमचा आम्हीपणा आम्हीहि पाहूं शकत
नाहीं. ६. प्रकट व्हावें किंवा लपावें, असें घडू शकत नाहीं असें म्हणण्यांत
आश्चर्य नाहीं. कांहीं केलें तरी या स्थितीचें ज्ञान होत नाहीं. ७.

१०८ सार्थ अमृतानुभव
किंबहुना श्रीनिवृत्ति । ठेविलों असो जये स्थिती ॥ ते काय
देऊं हातीं । वाचेचिया ॥ ८ ॥ तेथें समोर व्हावया । अज्ञा-
नाचा पाडु कासया ॥ केउते मेलिया माया । होऊं पाहिजे
॥ ९ ॥ अज्ञानाचा प्रवर्त्तु ॥ नाहीं जया गांवाआंतु ॥ तेथें ज्ञानाची
तन्ही मातु । कोण जाणे ॥ १० ॥ रात्री म्हणोनि दीवे । पडती
कीं लावावे ॥ वांचूनि सूर्यासवें । सिणणें होये ॥ ११ ॥ म्हणोनी
अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ॥ आतां निमिषोन्मेषा दोहीं ।
ठेली वाट ॥ १२ ॥ येन्हवीं तन्ही ज्ञान अज्ञानें । दोहींचीं
अभिधानें ॥ अर्थाचेनि आनानें । विप्लाविलीं ॥ १३ ॥ जैसीं
दंपतें परस्परें । तोडूनि पालिटिली शिरें ॥ तेथें पालटु ना पण
सरे । दोहींचें जिणे ॥ १४ ॥
श्रीगुरूंनीं ज्या स्थितींत ठेवलें तिचें मीसुद्धां शब्दांनीं वर्णन करूं शकत
नाहीं. ८. अशा या तिच्यासमोर यावयास बिचारें अज्ञान तर कसें बरें
समर्थ असेल ? अज्ञान हें मेल्यावर, माया उत्पन्न होईल कशी ? ९. या
स्थितीत अज्ञानाचा प्रवेशच होत नाहीं आणि ज्ञानासंबंधी तरी काय सांगता
येईल ? १०. रात्र आहे म्हणून दिवे लावावे लागतात, पण उजाडल्यावर
दिवे लावण्याची कटकट कोण करील ? ११. अज्ञान नाहींसें झालें त्याच्या
सापेक्षेनें असणारें ज्ञानहि गेलें. आतां ज्ञानाज्ञान या दोघांची वाट बंद
झाली. १२. मुलतः ज्ञान व अज्ञान हीं दोन्ही नांवें अर्थभेदानें विस्तारलीं
आहेत. १३. अदलाबदल करायची म्हणून नवराबायको यांनीं आपापलीं
मस्तकें तोडलीं; पण अदलाबदल कांहीं झाली नाहीं, उलट दोघे जिवाला
मुकलें. १४.

प्रकरण आठवें १०९
कां पाठी लाविला होये । तो दीपूचि वाया जाये ॥ दिठी
आंधारें पाहे । तैं तेंचि वृथा ॥ १५ ॥ तैसें निपटानि जें नेणिजे
तें अज्ञान शब्दें बोलिजे ॥ आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान
कैसें ॥१६॥ ऐसें ज्ञान अज्ञान आले । अज्ञान ज्ञानें गेलें ॥ हें दोन्ही
वांझौलें । दोनीं झालीं ॥१७॥ आणि जाणें तोचि नेणे । नेणे तोचि
जाणे ॥ आतां कें असणें जिणें । ज्ञाना अज्ञाना ॥ १८ ॥ एवं
ज्ञानाज्ञान दोन्ही । पोटीं सूनि अहनी ॥ उदेला चिद्गगनीं ॥
चिदादित्य हा ॥ १९ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते ज्ञानखंडनं नाम
अष्टप्रकरणं संपूर्णम्
बसणाऱ्याच्या पाठीमागें लावलेला दिवा जसा निरुपयोगी होतो; तेज
अंधाराला पाहिल तर तें तेज कसें म्हणावें ? १५. आतां ज्याच्या योगानें
सर्व जाणलें जातें त्याला अज्ञान असें कसें म्हणता येईल ? १६. ज्ञान
येऊन अज्ञानाच्या ठिकाणीं अज्ञानाचा नाश तर झालाच व दोन्हीहि
मिथ्या ठरलीं १७. जो जाणतो तोच नेणतो व तोच यथार्थ जाणतो.
म्हणून ज्ञानाज्ञानांनीं कोठें जावें ? १८. या प्रकारें ज्ञानाज्ञानाहे दिवस व
रात्र त्यांत हा ज्ञानरूपी नभःप्रांगणांत उदय पावला आहे. १९. याप्रमाणें
श्रीअमृतानुभव ग्रंथांतील ज्ञानखंडननामक आठवें प्रकरण समाप्त.
प्रकरण आठवें समाप्त

प्रकरण नववें
आतां आमोद सुनास जाले । श्रुतीस श्रवण रिघाले ॥ आरिसे
उठिले । लोचनेसी ॥ १ ॥ आपुलेनि समीरपणें । वेल्हावती
विंजणें ॥ कीं माथेची चापेपणें । बहकताती ॥ २ ॥ जिव्हा
लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ॥ चकोरेंचि जैसें ।
चंद्रमा जालीं ॥ ३ ॥ फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीच जाले
नर ॥ जालें आपुलें शेजार । निद्राळूचि ॥ ४ ॥ दिठीवियाचा
रवा । नागरु इया ठेवा ॥ घडिला कां कोरिवा । परी जैसा
॥ ५॥ तैसें भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ॥ हें
सरलें अद्वैता । अफुटामाजी ॥ ६ ॥ सेवतेपणा बाहेरी । न
निगतांचि परी ॥ पाती सहस्त्रवरी । उपलविजे ॥ ७ ॥ तैसें
नवानवा अनुभवीं । वाजतां वाघावी ॥ अक्रियेच्या गांवीं ।
नेणिजे ते ॥ ८ ॥
आतां स्वतः सुवास नाक झाला, शब्द कर्ण झाले आणि आरसे नेत्र
झालें. १. वारा स्वतः पंखा बनून वारा घेतों, किंवा मस्तकेंच फुलें बनून
भूषवितात. २. रसना रस बनली, कमळ सूर्य झालें व चकोर चंद्र झाले.
३. फुलें भुंगे झाले, तरुणी पुरुष झाले, झोंपाळू मनुष्य निद्रेचें ठिकाण
झाला. ४. आंब्याच्या झाडाचे कीवळे अंकुर कोकीळ बनले, मलयपर्वता-
वरील सुवासिक वारा देहधारी झाला, रस स्वतः भोक्ते बनले. ५. घडण
आणि कोरीव काम केलें कीं जसें नीटनेटकें सुंदर दिसतें; ६. त्याप्रमाणें
उपभोग्य वस्तु आणि भोक्ता, द्रष्टा आणि दृश्य, हे सारें ब्रह्मांत एकरस
झाले. ७. शेवंतीच्या अनेक पाकळ्या असल्या तरी त्या शेवंतीपणा टाकीत
नसतात. ८.

प्रकरण नववें १११
म्हणोनि विषयाचोनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे ॥ सैंध
घेती धांवें । समोरही ॥ ९॥ परी अरिसा सिवेसिवे । तव
दिठीसी दिठी फावे ॥ तैसें जालें धांवे । वृत्तिचिया ॥१०॥ नाग
मुदी कंकण । त्रिलिंगी भेदली खूण ॥ घेतां तरी सुवर्ण । घेईजे
कीं ॥११॥ वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोनी घापे करतळ ॥ तेथें
तरी निखळ । पाणीच फावे ॥ १२ ॥ हातापाशीं स्पर्शु ।
डोळ्यापाशीं रूपसु ॥ जिभेपाशीं मिठांशु । कोण्ही एकु ॥ १३॥
तन्ही परिमळ परौतें । मिरवणें नाहीं कापुरांतें ॥ तैसें बहुता-
परी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ १४ ॥ म्हणौनी शब्दादि पदार्थ ।
श्रोत्रादिकांचे हात ॥ घ्यावया जेथें । उजू होती ॥ १५ ॥ तेथें
संबंधु होय न होये । तंव इंद्रियांचें तें नोहे ॥ मग असतचि
आहे । संबंधू ना ॥ १६ ॥
त्याप्रमाणें नवा नवा भोक्तृ व भोग्य व्यवहार झाला तरी अक्रिय
परमात्मा ब्रह्मवेत्त्याचें राहण्याचें ठिकाण असल्यामुळे वेगळा असा एकहि
व्यवहार तत्त्वतः घडत नाहीं. ९. म्हणून सर्व इंद्रियसमुदाय आपआपल्या
विषयावर तुटून पडत असतांहि १०. ज्याप्रमाणें दृष्टी आरशाला पहातांच
मागें फिरून, ती दृष्टी दृष्टीलाच पाहते, त्याप्रमाणें वृत्तीचा हा विषयग्रह-
णाचा व्यवहार आहे. ११. नाग, मुदी व कंकण यांच्यात नामरूपभेद
दिसला तरी हातांत सोनेंच येतें. १२. पाण्यावरील तरंग वेंचून आणावे
म्हणून हात घालावा तों शुद्ध पाणीच मिळतें. १३. हाताला मऊ स्पर्श,
डोळ्याला रूप व जिभेला मधुर स्वाद लागतो. १४. पण कापुराच्या
ठिकाणीं एका सुगंधावाचून दुसरें कांहीं नाहीं, त्याप्रमाणें सर्व प्रकारच्या
भानामध्यें मूळ ज्ञानरूप परमात्माच तितक्या स्फुरणरूपानें आहे. १५.
असा मुख्य भेद वेदान्तसिद्धान्त असल्यामुळे शब्दादि पांच विषय उप-
भोगण्यासाठीं श्रोत्रादि पंच ज्ञानेंद्रियें होतात. १६.

११२ सार्थ अमृतानुभव
जियें पेरीं दिसती उसीं । तिये लाभती कीं रसीं ॥ कांति
जेवीं शशी । पुनवेचिया ॥ १७ ॥ पडिलें चंदावरी चांदिणें ।
समुद्रीं जालें वरखणें ॥ विषया करणें । भेटती तैशीं ॥ १८ ॥
म्हणोनी तोंडाआड पडे । तेंही वाचा वावडे ॥ परी समाधी न
मोडे । मौनमुद्रेची ॥ १९ ॥ व्यापाराचे गाडे । मोडतांहि
आपाडे ॥ अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥२०॥ पसरूनि वृत्तीची
बावे । दिठी रूपांतें दे खेवे ॥ परी साचाचेनि नांवें । कांहींच
नलगे ॥ २१ ॥ तमातें घ्यावया । उचलूनि सहस्र बाहिया ॥
शेवटी रवी यया । हाचि जैसा ॥ २२ ॥ स्वप्नींचिया विलासा ।
भेटईन या आशा ॥ उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥ २३ ॥
इंद्रियांचा होण्याचा व्यवहार व संबंध नाहींसा होतो, पण या साऱ्यांमध्ये
नित्य असणारा परमात्मा असतो. १७. किंवा पौर्णिमेच्या चंद्रांत ज्याप्रमाणें
सर्व एका उसांत जेवढीं पेरीं असतात, तेवढीं सर्व रसभरित होतात किंवा
पौर्णिमेच्या चंद्रात ज्याप्रमाणें सर्व कला एकवटतात, १८. चंद्रावर चांदणें
पडलें किंवा समुद्रावर पाऊस पडला तरी ते सागरजल होतें, त्याच न्यायानें
इंद्रियांस विषय मिळून त्यांनीं उपभोग घेतल्याचें दिसलें तरी, पारमार्थिक
दृष्ट्या कांहींच व्यवहार होत नाहीं. १९. तोंडास येईल तसें वाणी जरी
बोलली, तरी तें बोलणाऱ्या ज्ञान्याची मौनमुद्रारूप समाधि भंगत नाहीं.
म्हणजे वास्तविक ज्ञानानें कांहीं बोललेंच नसतें. २०. ज्ञात्याच्या हातून
अनेक व्यवहार झाले असें स्थूल दृष्टीला दिसलें तरी त्याच्या अकर्तेंपणास
बाध येत नाहीं. २१. तसेंच दृष्टि, वृत्तीचे हात पसरून रूपविषयाला
आलिंगन देण्यास गेली तरी वास्तविक पाहतां कोणताहि व्यवहार घडत
नाहीं. २२. हजारों किरणें उभारून सूर्य अंधकारास भेटायला गेला
असतां, शेवटीं त्याचा तोच जसा शिल्लक राहातो. २३.

प्रकरण नववें ११३
तैसा उदैलियानि विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ॥ तंव
दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ २४ ॥ चंद्र वेंचूं गेला
चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें ॥ विऊनि वांझे स्मरणें । होती
जैसीं ॥ २५ ॥ प्रत्याहारादि आंगीं । योगें आंग टेकिलें योगीं ॥
तों जाला ये मार्गीं । दिहाचा चांदु ॥ २६ ॥ येथें प्रवृत्ति बहुडे
जिणें । अप्रवृत्तिसी वाधावणें ॥ आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु
दिसे ॥ २७ ॥ द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ॥ भेदू
तंव तंव दुण । अभेदासी ॥ २८ ॥ कैवल्याही चढावा । करित
विषयसेवा ॥ जाला भृत्यु भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥२९॥
घरामाजी पायें । चालतां मार्गूही तोचि होये ॥ ना बैसे तन्ही
आहे । पावणेंची ॥ ३० ॥
स्वप्नांतील स्त्रीला भेटण्याच्या इच्छेनें पुरुष जागा झाला तोच तो जसा
आपला आपणच असतो. २४. त्याप्रमाणें निर्विषय आत्मभाव उपजल्यावर
तत्त्ववेत्ता विषयी होतो काय ? भावातीत असा ज्ञानी कोणत्या स्थितींत
असतो हें सांगतां येण्यापलीकडचें आहे. अरे ! चांदणें वेंचण्यास चंद्र गेला
असतां तेथें कोणीं काय वेंचले ? केवळ मनोरथ वायां जातात. २५-२६.
प्रत्याहार वगैरे अष्टांगयोग सहजस्थितीनें ब्रह्म जाणणारापुढे नसले त्यांनीं
हात टेकले. अष्टांगादि योग या ब्रह्मवेत्त्यापुढे दिवसाच्या चंद्राप्रमाणें फिका
पडतो. २७. या सहजस्थितीनें प्रवृत्तीचें जगणें संपतें, अप्रवृत्तीला शोभा
येते, अशा स्थितींत ब्रह्मवेत्त्याचें सर्व आचरण अंतर्मुख असतें. २८. हें
अद्वैत, द्वैताच्या अंगणांत स्वतःचाकरी करतें, म्हणजे त्याची अद्वैतस्थिति
कायम असते. म्हणून जों जों भेद जास्त तों तों अभेदाचीच वाढ
होते. २९. या अद्वैतस्थितींत असणाऱ्या पुरुषाचें विषयसेवन मोक्षाच्या-
वरहि चढाई करितें, अभेद भक्तीच्या मंदिरांत देव व भक्त यांचें ऐक्य
होतें. ३०.
सा. अ.... ८

११४ सार्थ अमृतानुभव
तैसे भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ॥ ऐसें नाहीं
न करितां । ठाकिजेना ॥ ३१ ॥ आठवू आणि विसरू ॥ तयांतेंही
घेऊं नेदी पसरु ॥ दशेचा व्यवहारु । असाधारणु ॥ ३२ ॥ जाली
स्वेच्छाची विधि । स्वैर जाली समाधी ॥ दशे इये मोक्षऋद्धि ।
बैसों घापे ॥ ३३ ॥ जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला
पंथु ॥ होऊनि ठेला येकांतु । विश्वाचि हें ॥ ३४ ॥ भलतेउंतेन
देवें । भलतेन भक्त होआवें ॥ बैसला तेथें राणिवे । अकर्मी हो
॥ ३५ ॥ देवाचिया दाटणी । देऊळा जाली आटणी ॥ देश-
कालादि वाहणी । येईचिना ॥ ३६ ॥ देवीं देवोचि न माये ।
मा देवी के अन्वयो आहे ॥ तेथें परिवारु बहुये । ऊघडता कीं
॥ ३७ ॥ ऐसाही स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठली श्रद्धा ॥ ते
देवोचि नुसधा । कामविजे ॥ ३८ ॥
असें पाहा कीं, घरांत पावलें टाकीत असतां मार्गही घरच, अथवा बसला
तरी प्राप्यस्थानहि घरच, दोन्ही एकच. ३१. याप्रमाणें ज्ञानवान् वाटेल तें
करीत असतां त्यास नवीन कांहीं मिळवायचें नसतें किंवा करीत नसता
तरी सर्व कांहीं त्यानें मिळविलेलें असतेंच. ३२. आत्मस्वरूपाची आठवण
अथवा विसर या दोघांचाहि विस्तार ह्या स्थितीत नसतो. ३३. जे करावेंसें
वाटेल तोच विधि, जें आचरण घडेल तीच समाधि, मोक्षाचें ऐश्वर्य या
दशेची बैठक आहे. ३४. अशा ऐक्य स्थितीत देवच भक्त झाला, प्राप्त
स्थितीत मार्ग झाला, विश्वच एकांत होतो. ३५. वाटेल त्यानें देव व्हावें
व वाटेल त्यानें भक्त व्हावें, अशा रीतीनें हा नैष्कर्म्य झालेला पुरुष जेथें
बसेल तेथें ऐश्वर्यांच्या राज्यावरच राज्य करतो. ३६. देवाच्या विस्तारानें
देऊळ झाकून गेलें. चिन्मात्र वस्तूला देशकालादि व्यवहार नाहीं. ३७.
देवतांच देव मानत नाहीं, मग तेथें देवीचा प्रवेश कोठून होणार ? तेथें
कोणताहि विचित्र परिवार जुळत नाहीं. ३८.

प्रकरण नववें ११५
अवघियाचि उपचारा । जपध्यान निर्धारा ॥ नाहीं आन
संसारा । देवेवांचुनी ॥ ३९ ॥ आतां देवातेचि देवें । देववरी
भजावें ॥ अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ ४० ॥ देव देऊळ
परिवारु । कीजे कोरूनि डोंगरु ॥ तैसा भक्तीचा वेव्हारु । कां
न व्हावा ॥ ४१ ॥ पाहे पा अवघेया । रूखा रूखचि यया ॥
परी दुसरा नाहीं तया । विस्तारु जेवीं ॥ ४२ ॥ अहो मुगी
मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसें ॥ केलें देवपण तैसें ।
दोहींपरी ॥ ४३ ॥ अखताचि देवता । अखतीचि असे न
पूजितां ॥ मा अखती काय आतां । पूजों जावों ॥ ४४ ॥
दीप्तीची लुगडीं । दीपकळिके तूं वेढीं ॥ हें न म्हणतां ते उघडी ।
ठाके काई ॥ ४५ ॥
अशा वेळीं देव आणि भक्त संबंधाची श्रद्धा उपजल्यावर, तो देवच
एकटा एक आहे असें समजावें. ३९. मग जप, ध्यान, निर्धार यासारखे
सर्व उपचार हे या संसारांत परमात्म्याशिवाय दुसरे तिसरे कांहीं नाहींत.
४०. अशा स्थितींत मग देव हा देव, भक्त हा देव, पूजासाहित्य हें देव.
असें झाल्यावर अर्पणाच्या वेळीं देवानें देव पूजला असें विचित्र होतें.
४१. देव, देऊळ आणि देवाचा सर्व परिवार हें जसें डोंगरांत कोरून
काढावें, त्याप्रमाणें एका भक्तीमुळे वरील ओवींन सर्व प्रकार कां घडू
नयेत ? ४२. वृक्ष हा सर्वांगीं एकच असतांना तो मूळ, बुंधा, शाखा,
पानें, फळें या प्रकारांनीं वाढतो. ४३. मुक्यानें मुकेपणाचें नाटक वठविलें
आणि न वठविलें यांत आश्चर्य कसलें ? त्याप्रमाणें या ठिकाणीं पूजा केली
आणि न केली तरी फरक होत नाहीं. सर्व एकच. ४४. कुंकुवानें लाल
केलेल्या अक्षतांवर देवांना ठेवतात. पुनः त्याच अक्षता देवांना वाहतात.
अशा वेळीं कोण कशाची पूजा करतो बरें ? ४५.

११६ सार्थ अमृतानुभव
कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं ले का ॥ तन्ही तो
असिका । तयाचि कीं ना ॥४६॥ आगीपणें आगी । असतचि
असे आंगीं । मा कासयालागीं । देणें न देणें ॥ ४७॥ म्हणौनी
भजतां भजावें । मा न भजतां काय नव्हे ॥ ऐसें नाहीं स्वभावें ।
श्रीशिवूचि असे ॥ ४८ ॥ आतां भक्ति अभक्ति । जालें ताट
एकी पांती । कर्माकर्माचिया वाती । माल्हवूनियां ॥ ४९ ॥
म्हणवूनि उपनिषदें । दशे येती निंदे ॥ निंदाचि विशदें । स्तोत्रें
होती ॥ ५० ॥ नातरी निंदास्तुति । दोन्ही मौनासाठीं जाती ॥
मौनीं मौन आथी । बोलतां बोली ॥५१॥ घालितां अव्हासव्हा
पाये । शिवयात्रा होत जाये ॥ शिवा गेलियाही नोहे । केही
जाणें ॥ ५२ ॥
ज्योतीला जर सांगितलें कीं, 'बाई, तूं उघडी आहेस तर ही प्रकाशरूपी
लुगडी नेस !' आणि असें तिला म्हटलें नाहीं तरी ती तशीच राहील
काय ? ४६. 'तूं मला घे' असें चांदण्यानें चंद्राला सांगितलें नाहीं; तरी
त्या चंद्रांत तें असतेच कीं नाहीं ? ४७. अग्नींत उष्णता हा नैसर्गिक धर्म
आहे. तो कांहीं द्यावा घ्यावा लागतो ? ४८. म्हणून भक्ताने भजन करावें,
भजन न केलें तर कांहीं नाहीं; तो परमात्मरूप असतोच. ४९. विहित
कर्मे यांच्या वाती मालवून भक्ति आणि अभक्ति या एकाच पंक्तीला एकाच
ताटांत बसतात. ५०. सर्वांना ठाऊक असलेलाच परमात्मा उपनिषदांनीं
सांगितला असल्यानें निंदा होते; पण परमात्म्याचें तें सत्य स्वरूप सांगित-
ल्यानें तीं स्तोत्रे बनलीं आहेत. ५१. आत्मा मौनरूप असून निंदा आणि
स्तुति या दोन्ही स्तब्ध राहिल्या, दोन्ही कांहीं बोलल्या किंवा न बोलल्या
तरी परमात्मा मौनरूपच आहे. ५२.

प्रकरण नववें ११७

चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ॥ नोहे ऐसें
कौतुक । इये ठाईं ॥ ५३ ॥ येन्हवीं अडोळिलिया डोळा ।
शिवदर्शनाचा सोहळा ॥ भोगिजे भलते व्हेळा । भलतेणें ॥ ५४॥
ना समोर दिसे शिव ही । परी देखिलें कांहीं नाहीं ॥ देवा
भक्ता दोही । एकाचि पाडू ॥ ५५ ॥ आपणचि चेंडू सुटे । मग
आपणया उपटे ॥ तेणें उंदळला दाटे । आपणपांचि ॥ ५६ ॥
ऐशी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळी ॥ तरी बोलिजे
सरळी । प्रबुद्धाची ॥ ५७ ॥ कर्माचा हातु न लगे । ज्ञानाचें
कांहीं न रिगे ॥ ऐसीच होतसे आंगें । उपास्ती हे ॥ ५८ ॥
निपजे ना निमे । आंगीं आंग घुमे ॥ सुखा सुख उपमे ।
देववेल इया ॥ ५९ ॥ कोन्ही एक अकृत्रिम । भक्तीचें हें वर्म ॥
योगज्ञानादिविश्राम-। भूमिका हे ॥ ६० ॥
कोठेंहि पायधूळ झाडली तरी शिवयात्रा घडते खरी; पण यात्रेला गेला.
तरी त्याचें जाणें न जाण्यासारखें हो. ५३. हें त्याचें गमन किंवा ठायींच
‘बैसोनि निवांत’ या दोन्ही आपणांपुरत्या वेगवेगळ्या क्रिया असल्या
तरी त्याच्यापुरत्या त्या एकच असतात; हें आश्चर्य होय. ५४. आपल्या
चर्मचक्षूंनीं देवदर्शनाचा आनंद केव्हांहि माणसाला आटापिटा न करितां
घेतां येतो. तो प्रत्यक्ष पुढें उभा राहून देवदर्शन घेत असला तरी, त्यानें
कांहीं पाहिलें नाहीं, कारण तो देव आणि भक्त हे एकच असतात. आपण
भिंतीवर आपटण्यासाठीं चेंडू टाकला कीं, जणू काय तो स्वतःच उसळी
मारतो, आपणच आदळतो आणि आपला आपणच परत पूर्वस्थळी येतो.
५६-५७. पोरांचा हा खेळ थोरांच्या चष्म्यांतून पाहिल्यावर सरळ दिसतो.
५८. अशा पूर्णावस्थेप्रत कर्माचा हात पोंचत नाहीं. ज्ञान तेथें प्रवेश करूं
शकत नाहीं, आणि उपासना ही आपली आपणच होत असते. ५९. त्याच्या
ठिकाणीं ही उत्पन्न होत नाहीं किंवा नष्ट होत नाहीं. ती आपल्याच ठिकाणीं
दंग असते. अशा प्रकारच्या सुखाला सुखाची उपमा दिली आहे. ६०.

११८ सार्थ अमृतानुभव

आंगें कीर एक जाहले । परी नामरूपाचे मासले ॥ होते
ते ही आटले । हरि हर येथें ॥ ६१ ॥ अहो अर्धनारीनटेश्वरें ।
गिळित गिळित परस्परें । ग्रहण जालें एकसरें । सर्वग्रासें
॥ ६२ ॥ वाच्यजात खाउनी । वाचकत्वही गिळोनि ॥ ठाकिली
निदैजौनी । परा येथें ॥ ६३ ॥ शिवशिवा समर्था स्वामी ।
येवढीये आनंदभूमि ॥ घेपे दीजे एकें आम्ही । ऐसें केलें ॥६४॥
चेतचि मा चेवविले । निदैलोंचि मा निदविलें ॥ आम्हींच आम्हां
आणिलें । नवल जी तुझें ॥६५॥ आम्ही निखळ मा तुझे । वरी
लोमें म्हणसी माझे ॥ हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥६६॥
कोणाचें कांहीं नेघसी । आपुलेंही तैसाचि नेदिसी ॥ कोण
जाणे भोगसी । गौरव कैसें ॥ ६७ ॥


असें हें भक्तीचें स्वाभाविक मर्म आहे. योग, आदिंचें विश्राम स्थळ ही
आत्मस्थितीच आहे. ६१. शंकर आणि विष्णु यांचे आत्मस्वरूप मूळ एक
पण नांवें, रूप भिन्न होत. पण तेहि येथें नाहींसे होतात. ६२. अर्धनारी-
नटेश्वरांनीं परस्परांना गिळलें आहे आणि अशा रीतीनें गिळीत असतांना
शेवटच्या वेळीं उभयतांचें ग्रहण झाले. ६३. शब्दांनीं जें उल्लेखिले जाते
व शब्दविश्व यांना खाऊनपिऊन टाकून परा हा वाचेचा प्रकार स्तब्ध
राहिला. ६४. हे सद्गुरुनाथा ! तुम्ही परमश्रेष्ठ कल्याण आहांत. एवढ्या
या आनंदभूमीवर व्यवहारासाठीं योग्य, असे आम्हांला आपण तयार
केलेत. ६५ जणूं काय जागृतींत आपण जागे केलेंत किंवा झोपणाऱ्यांना
झोपविलेत. याप्रमाणें आपण आम्हांला घडविले, अशी आपली किमया
आहे. ६६. आम्ही तर तुझेच आहोंत आणि वरतीं तूं पुन्हा आपल्या
लोभामुळे ' हे आमचे आहेत' असे म्हणतोस ही पुनरुक्ति तुझी लखलाभ
असो. ६७.

प्रकरण नववें ११९
गुरुत्वें जेवढा चांगू । तेव्हढाचि तारुनि लघू । गुरुलघु जाणे
जो पांगू । तुझा करी ॥ ६८ ॥ शिष्या देतां वाटे । अद्वैताचा
समो फुटे ॥ तरी काह्या होती भाटें । शास्त्रे तुझीं ॥ ६९ ॥
किंबहु ये दातारा । मी तूं याचा संसारा ॥ वेंचूनि होसी
सोयरा । तेणेंचि तोषें ॥ ७० ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते जीवन्मुक्तदशा-
कथनं नाम नवमप्रकरणं संपूर्णम् ।
तूं कोणाचे कांहीं घेत नाहींस, कोणाला कांहीं देत नाहींस. मात्र तुझा
जो गौरव होत आहे, तो तूं कसा भोगतोस हें समजत नाहीं. ६८. गुरु-
पणामुळें जसे श्रेष्ठ आहांत, तेवढेच आपण तरून नेण्यास हलकेहि आहांत.
आपल्याबद्दलचा हा भेद समजावून देणे हेंहि आपल्याच हातीं आहे. ६९.
या शिष्याला अद्वैताचे ज्ञान दिल्यानें, आपल्या स्वरूपाच्या एकत्वांत कांहीं
उणें पडेल, असे कां वाटतें ? नाहीं तर शास्त्रांनीं तुझी भाटगिरी कां
पत्करली असती ? ७०. फार काय सांगूं ? हे सद्गुरु निवृत्तिराया ! संसार
आणि माझेतुझेपणा नाहींसा केला असल्यानें तूं माझा सोयरा झाला आहेस
आणि त्यामुळें मी आनंदच झालों आहें. ७१. याप्रमाणे श्रीअनुभवामृत-
ग्रंथांतील जीवन्मुक्तदशाकथन नांवाचे नववें प्रकरण संपूर्ण झाले.
प्रकरण नववे समाप्त

प्रकरण दहावें

परी गा निवृत्तिराया । हातांतळीं सुखविलें तुया ॥ परी
निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ १ ॥ परी महेशें सूर्या-
हातीं । दिधली तेजाची सूती ॥ तया भासा अंतर्वर्ती । जगचि
केलें ॥ २ ॥ चंद्रासी अमृत घातलें । तें तयाचि काई येतुलें ॥
कीं सिंधु मेघा दिधलें । मेघाचि भागू ॥ ३ ॥ दिवा जो
उजिडावडु । तो घराचाचि सुरवाडु ॥ गगनीं आथी पवाडु । तो
चाचि कीं ॥ ४ ॥ अगाधे ही उँचंबळती । ते चंद्रींची
ना शक्ति ॥ वसंत करी तैं होती । झाडाचे दानीं ॥५॥ म्हणोनी
हें असंवेर्य । हें दैवीकीचें औदार्य ॥ वांचूनि स्वातंत्र्य । माझें
नाहीं ॥ ६ ॥
माझ्या मस्तकावर हात ठेवून, अहो निवृत्तिराया ! आपण मला सुखी
केलें आणि तें सुख मी निवांत भोगावें; १. परंतु ईश्वराने सूर्याच्या हातांत
तेजाचे सूत्र दिलें त्याच्या प्रकाशाने सर्व जगाला प्रकाश मिळाला. २.
चंद्राला अमृत दिलें तें त्याच्या एकट्या पुरतें आहे काय ? किंवा समुद्राने
मेघांना पाणी दिलें तें त्याच्याच पुरतें काय ? ३. दिव्याचा प्रकाश दिव्या-
पुरताच नसून, तो सर्व घराला प्रकाश देतो; आकाशाचा अवकाश
त्याच्यापुरता नसून सर्व जगाला त्याचा उपयोग होतो. ४. अफाट अस-
णाऱ्या समुद्रास भरती येते. ही शक्ति चंद्राची नव्हे काय ? वसंतऋतूच्या
सामर्थ्यानें झाडें हीं पुष्पफलादि दानसमर्थ होतात. ५. म्हणून अहो
गुरुराया ! हें आपल्या दैवी संपत्तीचे अफाट औदार्य आहे. यावांचून हें
प्रतिपादन करण्याचे माझे स्वतंत्र सामर्थ्य नाहीं. ६.

प्रकरण दहावें १२१
आणि हा येवढा ऐसा । परिहार देऊं कायसा ॥ प्रभुप्रभाव-
विन्यासा । आड ठाउनी ॥ ७ ॥ आम्ही बोलिलों जें कांहीं ।
तें प्रगटचि असे ठाईं ॥ मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें
॥ ८॥ नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन ॥ तरी काय
जनीं जन । दिसतेना ॥ ९ ॥ जनातें जनें देखतां । द्रष्टेचि दृश्य
तत्त्वतां । कोन्ही नहोनी आइता । सिद्धांतचि हा ॥ १० ॥ यया
परौतें कांहीं । संवित रहस्य नाहीं । आणि हें तया आधींही ।
असतचि असे ॥ ११ ॥ तन्ही ग्रंथ प्रस्तावो । न घडे हें म्हणे
वावो ॥ तरी सिद्धानुवाद लाहो । आवडी करूं ॥ १२ ॥ पढि-
यंते सदा तेचि । परी भोगी नवी नवी रुची ॥ म्हणोनी हा
उचीतचि अनुवाद सिद्ध ॥ १३ ॥
एवढा हा परिहार मी कशाला करूं ? कारण या म्हणण्यांतच गुरूंच्या
सामर्थ्यास कमीपणा येतो. ७. आम्ही ज्याचें प्रतिपादन केलें तो आत्मा
आपल्या ठिकाणीं प्रकट आहेच. मग स्वयंप्रकाशाला शब्दानें प्रकाशित
करावें लागतें काय ? ८. किंवा आम्ही कदाचित् मौन धरलें असतें तर
जनानें जनाला काय पाहिलें नसतें ? ९. जनांनीं जनाला पाहिलें असतां
वास्तविक ज्ञानरूप परमात्माच दृश्य बनलेला आहे. परमात्मा कांहीं एक न
होऊन आयता स्वयंसिद्धच आहे. १०. आतांपर्यंत प्रतिपादन केलेल्या ज्ञान-
रूप आत्म्याचें या पलीकडे रहस्य नाहीं व तें रहस्य या माझ्या वर्णनानें
सिद्ध झालें असेंहि नाहीं. कारण प्रतिपादन करण्याचें पूर्वी तें आहे तसेंच
आहे. ११. तर मग आतां ग्रंथारंभ घडत नाहीं असें कदाचित कोणी
म्हणेल तर, जें सिद्ध आहे त्याचाच अनुवाद, आवडीच्या भरांत आम्हीं
केला हेंच त्याचें उत्तर. १२. आवडती वस्तु तीच असली तरी तिचा भोग
घेण्यांत नवी नवी रुचि उत्पन्न होते, हें लोकानुभवावरून सिद्ध आहे.
याच न्यायानें, शुद्ध परमात्मस्वरूपविषयक अनुवाद आम्हीं केला हे
योग्यच आहे. १३.

१२२ सार्थ अमृतानुभव
याकारणें मिवा । गोप्य दाविलें बोलोनियां ॥ ऐसें नाहीं
अपैसा । प्रकाशूचि ॥ १४ ॥ आणि पूर्ण अहंता वेठलों ।
सैंध आम्हीच दाटलों ॥ मा लोपलों ना प्रगटलों । कोन्हा
होऊनी ॥ १५ ॥ आपणया आपणपें । निरूपण काय वोपे ॥
मा उगेपणें हारपे । ऐसें आहे ॥ १६ ॥ म्हणोनी माझी वैखरी ।
मौनाचेही मौन करी ॥ हें पाणियावरी मकरी । रेखिल्या
॥ १७ ॥ एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें ॥ देखोनी
बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ १८ ॥ ज्ञानदेव म्हणे श्रीमंत ।
हें अनुभवामृत ॥ सेवूनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ १९ ॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखिळ ॥ परी अमृताही
उठी लाळ । अमृतें येणें ॥ २० ॥
या कारणास्तव आम्ही पूर्ण स्थितीला गुप्त बोलून दाखविली, पूर्ण
स्थितीला गुप्त वस्तु बोलून दाखविली असें नाहीं, ती सहज उघडीच आहे.
१४. आणि आम्हीं पूर्ण स्थितीला प्राप्त झालों सर्वत्र आमचीच व्याप्ति
झाली म्हणून कोणाच्याहि अपेक्षेनें आम्ही लोपलों नाहीं, वा प्रकटलोंहि
नाहीं. १५. आपलें निरूपण आपल्याला अर्पण करण्यात विशेष काय
आहे ? म्हणून स्वस्थ बसल्यानें हानी होते असें आहे काय ? १६. म्हणून
माझ्या वैखरीवाणीनें मौनाचेंहि मौन केलें. करणें म्हणजे पाण्यावर माशाचें
चित्र काढण्याप्रमाणें आहे. १७. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-आम्ही
सांगितल्यापेक्षां दशोपनिषदांत जास्त कांहीं सांगितलें नाहीं असें पाहून
आत्मबोधानें येथेंच बुडी मारली. १८. या श्रीमंत अनुभवामृत पानानें
जीवन्मुख अमृतरूपच होवोत ! १९. मुक्ति चांगली खरी, पण अनुभवामृत
अत्यत शुद्ध आहे, यास्तव अनुभवामृताला पाहून या मुक्तिरूप अमृतालाहि
लाळ घोटावी लागते. २०.

प्रकरण दहावें १२३
नित्य चांदू होये । परी पुनवे आनु आहे ।। हें का मी म्हणूं
लाहें । सूर्यदिठी ॥२१॥ प्रिया सावाइले होये । तें आंगीचें
आंगीं न समाये । येन्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ २२ ॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपुला । गगनाचिया डाळा ।
पेलती झाडें ॥२३॥ ययालागीं हें बोलणें अनुभवामृतपणें ।
स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ २४ ॥ आणि मुक्त मुमुक्षु बद्ध ।
हे तववरी योग्यताभेद । अनुभवामृत स्वाद । विरुद्ध जंव ॥२५॥
गंगावगहना आलीं । पाणियें गंग जालीं । कां तिमिरें भेटलीं । सूर्या
जैसीं ॥ २६ ॥ नाहीं परिसाची कसबटी । तंववरि वानियाच्या
गोष्टी । मग पंधरावीयाच्या पाठीं । बैसावें कीं ॥ २७ ॥
नित्य चंद्र आहे हें खरें, पण पौर्णिमेच्या चंद्राची गोष्ट कांहीं वेगळीच
आहे हे म्हणणें लोकदृष्टीनें ठीक आहे, पण सूर्यदृष्टी जो मी, त्यानें असें
कां म्हणावें ? २१. स्त्रीच्या अंगांत येरव्हीं तारुण्य साहजिकच असतें, पण
प्रियसमागम होतांच तें अंगांतील तारुण्य अंगांतच मावत नाहीं. २२.
वसंत ऋतु प्राप्त झाला म्हणजे झाडें आपल्या फळांनीं व फुलांनीं गगन-
चुंबित होऊन डोलतात. २३. याकरितां आमच्या अनुभवरूप पक्वान्नाची
मेजवानी, अनुभवामृत बोलण्यानें संतांना केली. २४ आमच्या अनुभवा-
मृताचा स्वाद लाभला नाहीं तोपर्यंत मुक्त मुमुक्षू, बद्ध असा अधिकार-
भेद असतो. २५. गंगेला मिळावयास गेलेलीं उदकें गंगारूपच होतात,
किंवा अंधकार सूर्याला भेटावयास गेला असतां, सूर्यरूपच होतो. २६.
परिसाचा स्पर्श झाला नाहीं तोपर्यंत सोनें उत्तम व कमी कसाचें आहे
असें बोलावें; पण परिसाची कसोटी प्राप्त झाल्यावर सर्व कस पंधराच्या
दराचे म्हणजे उत्तम सोन्याचेंच लागतात. २७.

१२४ सार्थ अमृतानुभव
तैसें जें या अक्षरा । भेटती गाभारा । ते ओघ जैसे सागरा ।
आंतु आले ॥२८॥ जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही
मात्रा । तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ २९ ॥ तैसें तियें
ईश्वरीं । आंगोळी नुभेचि दुसरी । किंबहुना सरोभरी ।
श्रीशिवेंशीचि ॥ ३० ॥ म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे ॥ अनुभवामृतें
येणें ॥सणु भोगिजे सणे । विश्वाचेनि ॥ ३१ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते ग्रंथमहिमावर्णनंनाम
दशमप्रकरणं संपूर्णम् ।
श्रीकृष्णार्पणमस्तु । शुभं भवतु ॥
त्याप्रमाणें गुरुकृपेनें या ग्रंथांतील अक्षराचा अनुभव लक्षांत येतो
तेव्हां, ज्याप्रमाणें ओघ समुद्राला मिळाल्यावर समुद्ररूप होतात, त्याप्रमाणें
तो पुरुष अमृतरूप-मोक्षरूपच होतो. २८. किंवा पन्नास वर्ण ओंकाररूप
आहेत म्हणजे त्या सर्व वर्णांत अकार, उकार, मकार, रूपानें ओंकाराचीच
व्याप्ति आहे, तसें सर्व चराचर विश्व ब्रह्मरूप आहे, दुसरें कांहीं नाहीं.
२९. त्याप्रमाणें परमात्मस्वरूपाच्याकडे अंगुलिनिर्देश करून ' एवढा,
तेवढा, असा, तसा ' असें सांगून उपयोग नाहीं. सारें त्रिभुवन केवल
शिवरूपच आहे. ३०. हा अमृतानुभवरूप आनंद सर्व विश्वानें उप-
भोगावा, असें ज्ञानेश्वरमहाराज आग्रहानें प्रतिपादन करतात. ३१.
याप्रमाणें अनुभवामृतग्रंथांतील ग्रंथपरिहारनामक प्रकरण दहावें समाप्त.
प्रकरण दहावें समाप्त.
॥ ॐ तत्सत् ॥

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।
परस्पर पाहता कैसें । मुकले भेदा ! ॥