सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

४२ | सार्थ तुकारामगाथा

स्मरण झाले आहे, माझ्या आईप्रमाणे तू आहेस, माय पांडुरंगे, तू माझ्यासाठी लोकर धावत ये २ पुष्कळ जन्मात जे
काही पापपुण्य हातून घडले असेल त्यांच्या ओझ्याखाली मी दडपून गेलो आहे. यातून मुक्त व्हावे असे काही रहस्य
मला सापडले नाही. ३ आतून व बाहेरून असा नाना प्रकाराच्या चोरांनी मी वेढलो गेलो आहे, माझी दया कुणासही
येत नाही ४ देवा, याच्यामुळे मी फारच पंगू झालो असून माझी नागवणही फार झाली आहे. पुष्कळ दिवस झाले,
मी अगदी कासावीस होऊन गेलो आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू दीनाचा नाथ आहेस ना ? दीनाचे
रक्षण करणे हे तुझे ब्रीद आहे ना ? ते ब्रीद सांभाळण्यासाठी दीनानाथा, आता तू सत्वर धावून ये व माझे रक्षण
कर ६

विवरण - तुकारामबुवांच्या परिजपर अथवा आत्मपर अभंगातील हा एक अतिशय महत्त्वाचा अभंग आहे.
यात बुवांनी आपणास वैराग्य का व कसे प्राप्त झाले त्याचा संक्षेपाने निर्देश केला आहे आपणास संसाराचा फार
त्रास झाला, लोकांनी आपणास फार नागविले, लुबाडले, चोरांनी आतबाहेर दरोडे घालून आपली लूट नेली कोणता
त्रास तुकाराममहाराजांच्या संसारात होता ? कोणी त्यांना लुबाटिले? नागविले? स्वतःच्या संसारासबंधी आणखीही
काही अभंगातून तुकारामबुवांनी अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे 'संसाराच्या नावें घालुनिया शून्य । वाढता
हा पुण्य धर्म मेला,' संसाराचे ओझें वाहतां वाहविता । तुजविण अनंता नाहीं कोणी,' 'देव भक्तालागीं करुं नेदी
संसार,' 'जाला हा वमन संसार,' 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' इत्यादी वचनातून असे प्रत्ययास येते की
बुवांचा संसार वरवर तरी सुखाचा झाला नसावा

प्रारंभी प्रारंभी तरी तुकोबांना संसाराची वर्षे बरी गेली असावीत दुकानदारी चांगली चालत असावी
घरांत महाजनकी होती परंतु पुढे एकामागून एक अशी सांसारिक दुःखे त्यांच्यावर कोसळली 'मातापिता बंधु
सज्जन । परी उदंड धनधान्य । शरीरीं आरोग्य लोकात मान्य । एकही उणे असे ना' अशी परिस्थिती असताना
तुकारामावर अनेक आघात सतत होत राहिले 'बाप मेला न कळतां' यावरून बुवांच्या ऐन वयाच्या वेळी त्यांचे
वडील एकाएकी मरण पावले असे दिसते मग संसाराची सर्व जबाबदारी त्यांच्याचवर येऊन पडली आईही थोड्याच
दिवसात मरण पावली तुकारामबुवांचा बंधू सावजी याची बायकोही याच सुमारास मृत्यू पावली व आधीच
वैराग्यशील असणारा सावजी घर सोडून तीर्थयात्रेरा निघून गेला. तुकारामाचे एक मूल व पहिली स्त्री हीही
माणसे दगावली या भयानक अशा मृत्यूच्या थैमानामुळे आधीच बोबळे असलेले तुकारामाचे मन व्यथित झाले
दुसरी पत्नी त्यांचे मन हळुवारपणे सांभाळील अशी नव्हती

घरातील या आघातात बाह्य स्थितीचेही प्रहार त्यांच्या मनावर सतत झाले व्यथित चित्त असल्यामुळे
अद्यावर, दुकानदारीवर मन राहिले नाही त्यात दिवाळे निघण्याची वेळ आली दुष्काळाची भर पडून माणसे व
दावणीची गुरे हैराण झाली या वेळच्या दुष्काळांचे स्वरूपही भयानक होते 'पर्जन्य गेला देशान्नून । दुष्काळ आला
पुढें कठिन । मुलें माणसे खायावांवून । होतीं हैरान सर्वथा' असे वर्णन या काळाचे महिपतीने केले आहे तुकोबाचा
व्यापार चालेना, द्रव्यहानी फार झाली जगात अपमान झाला 'सावकार पिटिती दपाळ । लाता हळहळ करी'
अशा भयंकर अवस्थेत बुवा सापडले होते 'एकविसाव्यात विपरीत काळ । तुकयासि पातला हरकाळ । तेव्हा
निघताचि दिवाळें । सोइरे सकल हासती' अशा परिस्थितीत बुवांचे मन खिन्न झाले स्वत तुकाराम महाराजांनी
दुसऱ्या एका महत्त्वाच्या अभंगात म्हटले आहे की, 'खटतारें जालों अति दुःखी दुःखी । मायबाप सेसों धर्मलिया ।
बहु पीडिलों संसारें-' घरातील जिवलगाचा मृत्यू, सन १६३०-३१ चा भयंकर दुष्काळ व त्यायोगे झालेली
व्यापारहानी यामी तुकारामबुवा विव्हळ होऊन गेले 'मंद झाल्या मेघवृष्टि', 'अपीक धान्यें दिवसेदिवस', 'भेप
पडो भोती' अशा भोवतालच्या भीषण स्थितीचे बुवांनी आपल्या अभंगातून उल्लेख केले आहेत त्यांना समकालीन
वाङ्मयपत्रांचाही पुरावा मिळतो समर्थ रामदास स्वामींनी या असमानी संकटाचे हृदयभेदक वर्णन केले आहे 'काळ
बुष्काळे कहर पडता', 'पाथली ज्वारीस एक दोन अशी धारण बसली', 'उपवासीं मरो लागलो' असे उल्लेख त्या
वेळच्या सरकारी वाङ्मयपत्रातूनही मिळतात

सार्थ तुकारामगाथा ४३
तुकारामबुवांना असा हा संसाराचा ताप आतून व बाहेरून झालेला होता त्याचे चित्त कासावीस झाले
असून करुणेने द्रवले होते याच करुणपोटी त्यांनी श्रीविठ्ठलाला 'माय पांडुरंगे!' म्हणून हाक मारली तुकोबा
संसारतापाने त्रस्त झाले म्हणून त्यांना विठ्ठलाचे पाय आठविले असे जरी या अभंगात म्हटले असले तरी त्याचा अर्थ
सावधतेने समजावून घ्यावयास हवा संसारताप व दुष्काळ ही वरवरची कारणे प्रभावी दिसतात हे खरे असले तरी
'बहुत सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी' हेही खरे आहे 'पंढरीची वारी आहे माझ्या घरीं' असे त्यांनीच
म्हटले आहे 'माझ्या वडिलांची मिरासी गा देवा' या अभंगात 'वंशपरंपरा दास मी अंकित' म्हणून त्यांनी
स्वतःचा उल्लेख केला आहे तुकारामबुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यांनी देहूस एक विठ्ठलाचे देऊळ बांधले
होतेच तेव्हा या वंशात जी भूमी पहिल्‍यापासूनच तयार होत होती तीमध्ये वैराग्याचे व प्रतिकूल परिस्थितीचे बीज
पडले व देहूच्या भूमीत इंद्रायणीकाठी जे 'परब्रह्म मुहाडले' ते तुकारामबुवांच्या रूपाने साकारले
९२ भक्तऋणी देव बोलतीं पुराणे । निर्धार वचनें साच करीं ॥ १ ॥
मागें काय जाणे अडकिली वार्त्ता । कबीर सातें जातां घडिया घाटीं ॥ २ ॥
माझारिया धन आणिले घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥ ३ ॥
नामदेवाचिया घरासि आणिले । तेणे लुटविले द्विजा हातीं ॥ ४ ॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हे प्रमाण । व्यकोवाचे ऋण फेडियेले ॥ ५ ॥
बीज दळोनिया केली आराधना । लागे नारायणा पेरणे तें ॥ ६ ॥
तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तोचि एक ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - भक्तऋणी-भक्ताच्या ऋणात असणारा, कबीर-उत्तर हिंदुस्तानातील पंधराव्या शत
कातील प्रसिद्ध साधु कवी, सातें जाता-बाजारात जाताना, घडिया-विणल्या वस्त्रांच्या घडया, नामदेव-ज्ञानेश्वरांच्या
समकालीन प्रसिद्ध भगवद्भक्त व संतकवी (१२७०-१३५०, ) व्यकोवा-एकोबा म्हणजे एकनाथ अशा पाठामुळे
अर्थ स्पष्ट होतो
अर्थ - पुराणे असे सांगतात की देव, हा भक्ताच्या ऋणात पक्त आहे देवा, ही वचने खरी करून दाखवाल
ना ? १ मागें काय घडले पुणाल माहित ? पण असे ऐकतो खरे की कबीर नावाच्या एका भक्ताने बाजारास कापड
विकावयास जाताना गरीबाना ती वस्त्रे वाटून टाकली २ मग घरी येऊन पाहतो ते देवाने त्या सर्व वस्त्राची
किंमत आणून दिली आहे पण कबीराने ती घेतली नाही ३ नामदेवानी असेच केले त्यानीही असेच कापड वाटून
टाकले व मग देवाने त्या पैशाची व्यवस्था करून सर्व किंमत घरी आणून दिली, पण नामदेवानीही ती घेतली नाही,
ब्राह्मणाना ते धन वाटून टाकले ४ इतके कशास हवे ? प्रत्यक्षास प्रमाण नकोच एकनाथाचेही असेच ऋण
देवाने फेडले ५ दुसऱ्या एका प्रसंगी पेरावयाचे बी दळन घरी आलेल्या संताच्या भोजनाची व्यवस्था एका संताने
केली तेव्हा त्याच्या शेतात पेरणी करायचे कामही देवाला करावे लागले ६ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर
आपल्या भक्ताची एवढी काळजी घेतो पण यावर ज्याचा विश्वासच नाही तो खरोखर जन्माला येऊन फसलाच
म्हणावया ७
विवरण - देव हा भक्ताच्या ऋणात सुखावतो व तो आपल्या एकनिष्ठ भक्ताचे काही कमी पडू देत
नाही, हा संतवाङ्मयात व चरित्रात वारंवार येणारा विचार तुकाराम महाराजांनी काही पूर्वीची उदाहरणे देऊन
व्यक्त केला आहे कबीर, नामदेव व व्यकोवा किंवा एकोबा याची त्याना माहित असलेली हकीकत सांगितली आहे
या प्रत्येकाच्या जीवितातील ऐतिहासिक प्रसंगाचा शोध घेणे कठिण काम आहे कबीर हा उत्तर हिंदुस्थानातील
एक थोर संत पुरुष ज्ञानेश्वरांच्यावरच्या काळात होऊन गेला योगसंप्रदाय वैष्णवपंथ, सूफीसंप्रदाय याचे चमत्कारिक
मिश्रण त्याच्या शिकवणुकीत दिसून येते काही तुकारामाप्रमाणेच फटकळपणे बोलून समाजातील ढोंगे दूर करणारा
होता याचा वस्त्रे विणण्याचा धंदा होता ईश्वराच नामस्मरण करीत तो आपल्या उद्योगात रमून जाई नामदेव
१ खरी, २ एकोबाच

४४ सार्थ तुकारामगाथा


हे बालभक्त म्हणून पंढरपुरास ज्ञानेश्वराच्या काळातच प्रसिद्धीस आले होते ते शिंपी जातीचे असून कापड विकण्याचा
त्याचा धंदा होता तुकाराम महाराजांनी आणखी एका संताचे उदाहरण दिले आहे ते त्याच्या आधीच थोड्याच
वर्षांत होऊन गेलेल्या एकनाथाचे आहे परंतु हे एकोबा अभंगात व्यंकोबा म्हणून उल्लेखलेले आहेत 'व्यंकोबा'
हाच पाठ बरोबर असण्याची शक्यता आहे हे व्यंकोबा तुबाच्या समकालीन संत वाय ? कारण कबीर व नामदेव
ही दोन जुन्या काळची उदाहरणे दिल्यानंतर 'प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण' म्हणून अगदी नजीकचा उल्लेख करीत
आहेत कदाचित एकोबा म्हणजे एकनाथ हेही त्यांना काळच्या दृष्टीने कालचेपरवाचे वाटत असावेत कारण
एकनाथाच्या निर्याणानंतर आठनऊ वर्षांतच तुकोबाचा जन्म झाला

९३ भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥ १ ॥
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अगोंच अधर्म ॥ २ ॥
देव अंतरे ते पाप । खोटे उगवा सकल्प ॥ ३ ॥
तुफा म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा¹ पोटीं ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - उफराटें-उलटे, अंतरे-दूर होतो, उगवा-उलगडा करून घ्या

अर्थ - मनात ईश्वराविषयी भाव असला म्हणजे नाना विषयांचे भोग घेत असतानाही त्याग घडतात
व ईश्वराविषयी निष्ठा नसेल तर मात्र वरवर त्याग करीत असतानाही तो भोगच होतो १ असे हे धर्माचे रहस्य
उलटेसुलटे आहे वद्यो धर्मामध्येच अधर्म दिसतो, अधर्मातच धर्म असतो २ एवढे लक्षात असू द्या की ज्यामुळे देव
अंतरतो ते पापकर्म समजावे, म्हणून आपल्या कर्माचे खरेखोटेपंग नीट समजावून घ्यावे, त्याच्या स्वरूपाचा उलगडा
करून घ्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या कर्माविषयी परीक्षा न करता संकल्प करणे ही भीड खोटी
आहे विचार करून भिडेचा त्याग करणे श्रेयस्कर असते ४

९४ भोरप्याने सोंग पालटिले वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसे ॥ १ ॥
टिळे माळा मेद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ २ ॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फासा कळो नेदी ॥ ३ ॥
खाटिक हा स्नेहभावें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥ ४ ॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परो तू कृपावत पाडुरंगा ॥ ५ ॥

शब्दार्थ व टीपा - भोरप्याने-बहुरूप्याने बक-बगळा, मद-बाटमारे लोक डीवर-मासे धरणारा,
स्नेहभावें-मोठ्या प्रेमाने

अर्थ - आपल्या कमकुवत मनाची मोठ्या विनयाने व प्रांजळपणे कबुली देताना तुका म्हणत आहेत,
परमेश्वरा, बहुरूप्याने वरवरची अशी नाना प्रकाराची सोंगे धारण केली तरी तो निराळाच असतो व बगळ्याने डोळे
मिटून ध्यानाची बतावणी केली तरी त्याचे चित्त माशावरच असते १ एखाद्या वाटमाऱ्याने गळ्यात माळा घातल्या
किंवा मुद्रा लावल्या अंगावर तरी त्याचे अंतरंग निराळेच असते फांसे टाकून प्राण्यांना पकडण्याचे त्यांचे फसब दिसून
येत नाही इतकेच २ माशांना गळाला खाण्याचा पदार्थ लावून मासेमारी लोक आमिष दाखवितात, पण त्यांना
त्या गळात असणारा फास दिसत नाही ३ एखादा खाटिक मोठ्या प्रेमाने शेळ्यामेंढ्या पाळतो, त्यांना खायला
घालतो, पण त्याचा हेतू या प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाण्याचाच असतो हे वरवर दिसत नाही ४ तुकाराम
महाराज म्हणतात, या सर्व उदाहरणांप्रमाणेच मी वरवर लोकात बरा दिसत असेन, साधू वाटत असेन, पण माझे
अंतरंग अजून शुद्ध नाही, प्रभू पांडुरंगा, तू कृपाळू आहेस म्हणून सारे निभावते एवढच ५


१ विचाराच्या

सार्थ तुकारामगाथा ४५
९५ गेलो वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥ १ ॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ २ ॥
भंगलीया चित्ता । न ये काशानें सांदितां १ ॥ ३ ॥
तुका म्हणे धीर । भंगल्या पाठीं फीर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वीरसरी-वीरश्री, पराक्रम, भंगलिया-मोडून गेलेल्या, काशानें-कशानेही, सांदिता-
सांधिता, जोडता, फीर-बरोबर, उचित.
अर्थ - एकदा का अंगातील वीरश्री नाहीशी झाली, पराक्रम संपला, मग त्यास एखादी सामान्य स्त्री देखील
फजीत करू शकते १ मग मात्र पूर्वी जशी सत्ता होती तशी परत आणता येत नाही. २ एकदा चित्त कोणत्याही
कारणाने भंगले की मग ते कशानेही साधता येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर एकदा का धीर
सुटला की मग त्याची कीव किती करावी ? ४
९६ युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणें दाखविलें ॥ १ ॥
कलियुगामाजीं करावें कीर्तन । तेणें नारायण येईल भेटी ॥ २ ॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । ध्यावें वनांतर भस्म दंड ॥ ३ ॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसतो ते वाव नामाविण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- युक्ताहार-फलमूलादिकाचा जपजाप्य करतानाचा आहार, न लगे-लागत नाही,
आणिक-दुसरी, अल्प-अगदी थोडक्यात, वेव्हार-व्यवहार, व्यवसाय, वाव-व्यर्थ.
अर्थ - जपजाप्याची साधने करताना घ्यावयाचा फलमूलादिकाचा आहार पाळणे, त्याची नीट व्यवस्था
करणे किंवा यासारखी आणखी काही कर्मकाडात्मक साधने करणे याची जरूरी लागत नाही. परमेश्वराने फार
थोडक्यात असा मार्ग दाखविला आहे. १ या कलियुगात कीर्तनभक्ती हाच एक मार्ग सांगितला आहे, या कीर्तना-
मुळेच परमेश्वराची भेट होईल. २ रोजचा व्यवहार अथवा लौकिक आचार सोडण्याचीही जरूरी नाही, वनात
तपस्येसाठी जावयास नको, भस्म धारण करून, हातात दंड घेऊन सन्यासी किंवा वैरागी होण्याची जरूरी नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरप्राप्तीसाठी या कीर्तनाखेरीज आणखी इतर उपाय व्यर्थ आहेत. एक नामस्मरण व
कीर्तन यांनीच देव सतुष्ट होईल. ४
विवरण - वारकरी पंथात नामभक्ती, कीर्तनभक्ती हेच एक ईश्वरप्राप्तीचे साधन सर्वांना अतिशय सुलभ
असे सांगितले आहे. जपजाप्य, योगयाग, ध्यानधारणा, वनातील तपश्चर्या, उपासतपास, यज्ञकर्म, खडतर जागरण
याची काही जरूरी आहे असे नाही 'आता गृहादिक आचर्ये । ते कांहीं न लगे त्यजावे' म्हणून ज्ञानेश्वरीत सांगितले
आहे तुकाराम बुवांनीही 'न लगे सायास जाणे वनांतरा । सुखें घरा येतो नारायण' म्हणून या साधनमार्गांचे महत्त्व
वर्णन केले आहे. रानावनात जाऊन यज्ञयाग वगैरे करण्याची किंवा शरीराला कष्ट देऊन योगसाधन करण्याची
जरूरी या कलियुगात नाही असा निश्चय भागवत सांप्रदायिकांनी केलेला आहे 'क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्त-
चेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते'- अव्यक्ताच्या ठिकाणी चित्त लावून बसणाऱ्यांना क्लेश अधिक
होतात, कारण या उपासनेचा मार्ग कष्टकारक असतो असे भगवद्गीतेतही म्हटले आहे तेव्हा या कष्टाच्या व
त्रासाच्या मार्गाला जाण्याचे कारणच नाही असे साधुसंतांचे सांगणे आहे 'म्हणोनि योगाचिया वाटा । जे निघाले गा
सुभटा । तया दुःखाचाचि वाटा । भागा आला ।' असा स्पष्ट निर्णय ज्ञानदेवानी दिला आहे
या कष्टदायक मार्गापेक्षा नामसंकीर्तनानी भक्ती सर्वांना अतिशय सुलभ व ईश्वराची प्राप्ती करून देणारी
आहे नवविधा भक्तीतही कीर्तनास विशेष प्राधान्य आहे. भागवत संप्रदायात नामदेवापासून सर्वांनी याच कीर्तन-
भक्तीचा प्रसार केला आहे. नामदेव महाराज हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होत. 'सुंभाचा वरदोटा रक्तयाची
१. सांधिता

४६ सार्थ तुकारामगाथा
लंगोटी । नामा वाळवंटीं कीर्तन करी' म्हणून नामदेवांचे वर्णन आहे. गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन व लीलासंकीर्तन
असे कीर्तनाचे तीन प्रकार प्राचीन काळापासून मानण्यात आले आहेत. भगवान नारदमुनी हे कीर्तनसंस्थेचे आद्य
प्रवर्तक होत. भागवतपुराण, नारदपुराण यातून कीर्तनाचे माहात्म्य विस्ताराने वर्णन केले आहे. स्त्रीशूद्रादिकांपर्यंत
सर्वांना सुलभ असणारे हे साधन महाराष्ट्रातही लोकप्रिय झाले. नारद, परीक्षिती, ध्रुव, व्यास, वाल्मीकी यांचीही
नावे या परंपरेशी निगडित आहेत. नारदाची वीणा आजही कीर्तनकारांना अतिशय प्रिय आहे. नामदेव, ज्ञानदेव,
चोखादा, एकनाथ, तुकाराम रामदास या सर्वांनीच कीर्तनावर भर दिला होता. 'नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप
लावू जगीं।' अशी नामदेवांची प्रतिज्ञा आहे.
तुकाराम महाराजांचे तर शेकडो अभंग कीर्तनाचा महिमा वर्णन करणारे आहेत 'सोपें धर्म आम्हां सांगितलें
संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा- 'अमृत हें क्षीर हरिकथा माउली । सेवितो सेविली वैष्णवजनीं', 'आनंदें
कीर्तन कथा हरी प्रोष । आवडीचा रस प्रेमसुखें' 'कथा देवाचे ध्यान । कथा साधन महन । हृदयाऐसें पुण्य आणिक
नाहीं सर्वथा' अशी शेकडो वचने कीर्तनाचे माहात्म्य सांगणारी मिळतात. रामदासांनाही या कीर्तनभक्तीचे मोठे
प्रेम होते. 'भगवंतास कीर्तन प्रिय । कीर्तने समाधान होय । बहुन जनांसी उपाय । हरिकीर्तने कलियुगीं' असे सांगून
समर्थांनी कीर्तनाचे महत्त्व विशद केले आहे. कलियुगात मान्यता पावलेल्या या कीर्तनभक्तीचा महाराष्ट्रात फार
मोठ्या प्रमाणावर आधुनिक काळातही झाला. हरिदासी व वारकरी अशा दोन पद्धती मुख्यतः आज कीर्तनभक्तीच्या
दिसतात. नृत्य, संगीत, वाद्य यांच्या साह्याने परमेश्वराचे गुणगान कीर्तनात सामुदायिक रीतीने साधता येते. नमन,
स्तवन, सद्गुरुस्मरण झाल्यावर बहुधा तुकारामाचाच अभंग निरूपणास घेऊन तत्त्वज्ञान वा परमार्थ यांचे निरूपण
प्रथमार्धात करण्याचा प्रघात आहे. हा झाला पूर्वरंग, आणि उत्तररंगात पहिल्या निरूपणास शोभेल अशा एका भक्ताचे,
संताचे समग्र चरित्र कथात्मक पद्धतीने सांगावयाचे असे स्थूल स्वरूप आजही कीर्तनाचे टिकून आहे.
९७ कंठी कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥ १ ॥
हो का नर १ अथवा नारी । राड तयें नांवे खरी ॥ २ ॥
नाहीं हाती दान । शूरपणाचे काकण ॥ ३ ॥
बाळियेली संतों । केली वोडोनि फजिती ॥ ४ ॥
तुका म्हणे ताळा । नाही त्याची अवकळा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीका - कंठी-गळ्यात; कृष्णमणी-श्रीकृष्णाच्या नामाचा मणी. बाळियेली-दूर काढल;
वोडोनि-हजामत करुन, निकरान टीका करून. ताळा-मर्यादा.
अर्थ - ज्याच्या गळ्यात श्रीकृष्ण नामाचा मणी नाही त्याची वाणी कितीही गोड असली तरी अशुभच
समजावी. १ मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती रांड व तो रंड्या अशीच नावे त्यांना शोभून दिसतात. २
ज्याच्या हातात दान देणारे शूरपणाचे कंकण नाही त्याचा काय उपयोग ? ३ अशा स्त्रीपुरुषांना संतांनी आपल्या
मेळ्यातून दूर काढले असून त्यांनी त्यांची पुरती फजिती केली आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा ताळ
सुटला आहे म्हणजे ज्याच्या वागण्यात मुळीच मर्यादा नाही असे झाले आहे त्यास अवकळाच येणार, त्याचा नाश
होणार. ५
९८ माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥ १ ॥
विषयीं लपट शिकवी कुविद्या । मनामागे नाद्या होऊनि फिरे ॥ २ ॥
करुनी खातां पाक' जिरे सुरण राई । करिता अतित्याई दुःख पावे ॥ ३ ॥
औषध द्यावया चाळविले बाळा । दावूनिया गुळा दृष्टीपुढें ॥ ४ ॥
तरावया आधीं शोधा देववाणी । वाटत बोलणीं द्वारा त्याचीं ॥ ५ ॥
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥ ६ ॥
१ पुरुष

शब्दार्थ व टीपा :- माया-ईश्वरी शक्ती, अविद्या, भ्रम, ब्रह्म-ईश्वर, परमात्मा, जगाचे आदिकारण,
मायाब्रह्म याची वरवर एकसारखी चर्चा करून लोकांना फसविणाऱ्या भोंदू गुरूंच्यावर उपरोधाने टीका करण्यासाठी
हे शब्द वापरले आहेत, घमंडक-भोंदू लोक, नागविले-लुटले, नांदा-हो हो करणारा नंदीबैल, अतिष्याई-अत्याचार,
पंज़िट-फ्रेज, पिंडाचे-शरीराचे.
अर्थ:- जगात वरवर दिसणारा जो प्रपंच ती माया व खरे असणारे ब्रह्म अशा भावेत मायाब्रह्माचे भोंदू
साधुलोक निरूपण करतात किंवा वरवर दिसणारा मायिक पसारा हेच ते ब्रह्माचे रूप मानतात. असे विवेचन
करून ते स्वतःही फसतात व स्वतःप्रमाणेच इतरांनाही फसविततात. १ अशी माणसे केवळ विषयामध्ये आसक्त
असतात व लोकांना वाटेल तसा खोटा बोध करतात आणि आपण मात्र स्वतः ओढाळ मनामागे नंदीप्रमाणे होऊन
फिरतात. २ कोणतीही गोष्ट नीट रीतीने करायला हवी. नीट स्वयंपाक करून राई व सुरण या दोन्ही वस्तू
शिजल्यावर त्या पचतील, पण अत्याचार करून त्या तशाच कच्च्याच खाल्ल्या तर मात्र खाणारास दुःख होईल. ३
कडू औषध द्यायचे असेल तर गुळासारखा गोड पदार्थ पुढे करून लहान मुलाची समजूत घालावी लागते. ४
म्हणून खरोखरी असे आहे की आपणांस तरायचे असेल तर अगोदर वेदवाणी काय आहे ते शोधा, ती समजावून
घ्या व अशा भोंदू लोकांची वृथा बोलणी प्रथम दूर करा. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांचे केवळ शरीरपोषण
हेच एक ध्येय असते त्यांची व ईश्वराची भेट कधीही होणार नाही. ६
विवरण :- भोंदू साधुसंतापासून सावध असावे असे सांगताना तुकाराम महाराज या अभंगात 'तरावया
आधी शोधा वेदवाणी' असे सांगतात हे ध्यानात घ्यावयास हवे. भागवत संप्रदाय किंवा वारकरी पंथ जरी गीता-
भागवतादी ग्रंथातून आकारास आला असला तरी त्यास वेदांचे व उपनिषदांचे महत्त्व मान्यच आहे. सर्व उपनिषदांचे
सार गीतेत आले आहे व त्यावर भागवत धर्माची इमारत उभी आहे वेदविरोधी असे भागवत धर्मात काहीही नाही
कालमानाप्रमाणे जातिबंधने व वर्णव्यवस्था यांच्या विचारात थोडाफार बदल संतांनी सुचविला असला तरी वेदांचे
महत्त्व त्यांनी अनेकदा मान्य केले आहे 'वेदु स्पृष्टु होय ठावँ । परी कृपणु ऐसा आनु नाहीं' अशी टीका ज्ञानदेवांनी
केली असली तरी भाषेपुरती मर्यादित आहे. सर्वांना सुलभ होईल अशा लोकभाषेत परमार्थनिरूपण करावे अशा
भूमिकेवर हे लिहिणे आहे. पुढील संतांनी वेदमान्यतेचेच धोरण स्वीकारले आहे. वेदांचेच सार तुकारामांनी 'वेद
अनंत घोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥ विठोबासी शरण जावें' अशा शब्दांत काढले आहे. 'सकळ शास्त्रांचे हे
सार । हैं वेदांचें गव्हार' म्हणून आणखी एका अभंगात बुवांनी वेदगौरव केलेला आहे 'वेदविहित तुम्हीं आइका हो
कर्म । योजितों तीं धर्म संतांपुढें' या अभंगात तुकाराम महाराजांनी सर्वांची वेदविहित अशी कर्मे सांगितली आहेत.
इतकेच नव्हे तर आपण प्राकृत वाणीच बोलत असू व उच्च कुळात आपला जन्म झाला नसला तरी प्रभुकृपेने
आपणास केवढे सामर्थ्य आले आहे याचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, 'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।
येरांनी वाहावा भार माथा ।' सारांश, वारकरी पंथातील संतांना अभिमान हा स्पष्ट आहे. एका विशिष्ट सूत्रांत
जोडलेल्या परंपरेतून वेदापासूनच भागवत धर्माचा विकास झाला आहे. हा ओघ अखंड आहे. 'हैं धर्मजात आघवे ।
युगायुगीं म्या रखायें । ऐसा ओघ हा स्वभावें । आद्य असे' अशी ज्ञानेश्वराची साक्ष आहे.
९९ मृगजळ दिसे साचपणा ऐसें । लोटियाचें पिसें ऊर फोडी ॥ १ ॥
जाणोनि कां करा आपुलाले घात । विचार रे हित लवलाहीं ॥ २ ॥
संचित सांगातीं बोळवणें सर्वै । आचरलें द्यावें फळ तेणें ॥ ३ ॥
तुका म्हणे शेखीं स्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगो सर्वै ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मृगजळ-हरिणांना वाटणारा पाण्याचा भास, साचपणा ऐसे-सत्यासारखे, संचित-पूर्वे
जन्मीचे कर्म, सांगातीं-बरोबर, शेखीं-शेवटी, आगीसवें-अग्नीबरोबर
अर्थ :- मृगजळ हे खरे नसूनही बिचारी हरणे धापा टाकीत टाकीत त्याच्या मागे धावतात, त्यांना ते पाणी
खरेच वाटते. १ या प्रमाणे वरवरचा देहादिक प्रपंच खरा नाही असे जाणून आपला घात करण्याचे थांबवा, व

४८ सार्थ तुकारामगाथा
आपल्या हिताचा विचार लौकर करा २ आपले पूर्वसंचित जे कर्म असेल तेच आपल्या बरोबर असून आपली
पाठवणी तेच करीत असते. जैसे आपले कर्म तसे आपणास फळ मिळते ३ शेवटी आपला देह जोपर्यंत स्मशा-
नातच जाणार आहे तोपर्यंत त्याचा संबंध अग्नीशी व गोवरीशीच यायचा हे नाकारून कसे चालेल ? ४
१०० गौळीयाचीं ताकपिंरें । कोण' पोरें चांगलीं ॥ १ ॥
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ २ ॥
काय उपास पडिले होते । कण्यामोवते विदुरांच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ताकपिंरे-ताक पिणारी, विदूर-धृतराष्ट्र व पंडू याचा धर्मनिष्ठ भाऊ, कुब्जा-पाठीला
वांक असलेली कंसाची एक बुरुप दासी
अर्थ:- भक्तीसाठी परमेश्वर किती लालचावलेला असतो हे सांगण्यासाठी तुकारामबुवा सांगतात,
गवळ्यांची ताक पिणारी ती पोरे ! काय त्यांच्यात लोभ पडण्यासारखे होते ? १ पण श्रीकृष्णास त्यांचा केवढा मोठा
छंद होता ! कारण त्यांची सेवा व त्यांची भक्ती यांची थोरवी फार होती २ विदुराच्या कण्या देवांनी मोठ्या प्रेमाने
खाल्या, त्यावेळी काय देवाला उपवास पडले होते ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती कंसाघरची दासी पाठीला
पोंक आल्यामुळे अष्टवक्रा झाली होती, पण अशी विरूप झालेली व हीन कळा असलेली दासी ही ईश्वराला सौंदर्याची
राशी वाटली कारण एकच देवाला केवळ भक्ती प्रिय आहे
विवरण :- भक्तीचे महिमान सांगणारा एक महत्त्वाचा अभंग आहे हा शुद्ध प्रेमास भुकेलेला ईश्वर
आपल्या भक्ताचे रूप, त्याची जात, त्याचे पूर्वकर्म वगैरे काही न पाहता केवळ त्याचे भाव पाहतो हे सांगण्यासाठी
वरवर हीन किंवा क्षुल्लक दिसणाऱ्या काही थोर भक्तांचा उल्लेख तुकारामबुवांनी येथे केला आहे लहानपणी
गोकुळात असताना गवळ्याची मुले घेऊन श्रीकृष्ण अनेक खेळ खेळले, ती गवळ्याची मुले ! काय त्यांना रूप
असणार ? की त्यांना प्रगल्भ बुद्धी असणार ? का ती धनवंत होती ? पण ईश्वरास या गोष्टीची जरूरी नसते
त्याला फक्त प्रेम हवे असते ते या बावळ्या पोरांच्यात होते विदुर हा अंबिका नावाच्या दासीपासून झालेला मुलगा
शूद्र स्त्रीपासून याची निर्मिती म्हणून याला धृतराष्ट्र व पंडू यांची बंधुत्वाचे नाते असूनही राज्य मिळाले नाही पण
हा मोठा धर्मनिष्ठ होता श्रीकृष्णावर याचे फार प्रेम होते याची श्रीकृष्णभक्ती थोर असल्याने याच्या घरच्या
कण्याही श्रीकृष्णास गोड लागल्या आणि ती कंसाघरची दासी कुब्जा ? अंग वाकडे झाल्याने कुरूप दिसत असे त्रेता
युगातील शूर्पणखेची दासी मधुरा शापाने द्वापरयुगात कंसदासी कुब्जा बनली होती पण तिच्या मनात कृष्णाविषयी
अपार प्रेम असल्याने श्रीकृष्णाने तिला जवळ करून सुस्वरूप केले
१०१ आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आपुलाचा ॥ १ ॥
सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ २ ॥
हित तें करावे देवाचें चिंतन । करूनिया मन एकविध ॥ ३ ॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दंडवत-नमस्कार, व्यापार-कामे
अर्थ :- माझा सर्व प्राणिमात्रांना आता हाच उपदेश आहे की त्यांनी आपल्या आयुष्याचा नाश करू नये. १
सर्वांच्या पायावर डोके ठेवून मी विनंती करीत आहे की सर्वांनी आपापले चित्त शुद्ध करून विठ्ठलाची भक्ती
करावी. २ ईश्वराचे चिंतन सतत करणे हेच हितकारक असल्यामुळे ते मन शुद्ध ठेवून करावे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, जे हिताचे असेल ते लक्षात ठेवून आपली कामे करीत जावीत, आता आणखीन काय सांगावे ? ४
१ काय

सार्थ तुकारामगाथा ४९
१०२ भक्ताविण देवा । कैंचे रूप घडे सेवा ॥ १ ॥
शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ॥ २ ॥
देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥ ३ ॥
तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येरयेरा-एकमेकाना, निष्कामता-निष्काम भक्ती, स्नेहजाल-एकमेकात गुंतलेले प्रेमाचे
धागे
अर्थ - भक्त असल्याखेरीज देवाला त्याचे रूप कसे प्राप्त होईल ? भक्त आहे म्हणून देव आहे १ सोन्याच्या
कोदणात हिरा असतो म्हणून त्याची शोभा ना ? हिरा व सोने यानी एकमेकास सुशोभित केले आहे एकट्याची
काय किंमत ? २ देव जर नसेल तर भक्त मग निष्काम भक्ती तरी कुणाची करणार ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, नात्याची ही नाजूक सुतामृत किंवा प्रेमाचे हे नाजूक धागे आई व मूल याच्या नात्यातील स्नेहाप्रमाणे आहेत
आईमुळे मूल आहे व मुलामुळे आईस आईपणा आहे ४
विवरण - श्रेष्ठ भक्तीच्या एका विशेष अवस्थेचा फार मार्मिक संदर्भ या अभंगात आहे जीवाने शिवाची,
आत्म्याने परमात्म्याची सेवा किंवा भक्ती करायची त्याला वंदन करायचे त्याच्याजवळ करुणा भाकायची, त्याची
कृपा संपादन करायची हे ठीकच, पण भक्तीच्या पुढच्या अवस्थेत एक प्रश्न निर्माण होतो, तो असा की, भक्तानेच,
सेवकानेच, जीवानेच का भक्ती करायची ? जीवास जशी शिवाची ओढ असते, तशीच शिवालाही असते ना ? पर-
मेश्वरासही आपल्या भक्ताची ओढ असते ना ? काही कासावीस होतो ना ? खरं म्हणजे असंच व्हावयास हवे त्याला
एकाकी करमत नव्हते, म्हणून तो हे चराचर विश्व प्रसवला तो या जगाची माता-पिता आहे मूलस्थानी तो व व्यक्त
झालेले विश्व एकच होते पण बीजाचा विस्तार झाला, एकाच सुवर्णाचे नाना अलंकार झाले, एकाच पाण्यावर नाना
लहरी उठल्या, म्हणून काही भेद मानावा असे नाही मग भेद नाही असे ठरल्यावर कोण कुणाचे स्तवन करणार ?
भक्तास जसा ईश्वराचा ध्यास, तसा ईश्वरासही भक्ताचे अनुसंधान असतेच ना ? या उच्च भूमिकेवरून तुकारामाच्या
याही अभंगातून विचार प्रगट झाले आहेत
या अभंगात एक अति गोड भाव असा व्यक्त झाला आहे की मी भक्त आहे म्हणून देवा, तुला देवपण आहे
बाळ आहे म्हणून स्त्रीस आईपण प्राप्त झाले आहे 'तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते-प्रत्यक्ष ब्रह्मदेवासही आम्हीच
जन्म दिला आहे' या तुकाराम महाराजांच्या उक्तीमधील सामर्थ्य फार मोठे आहे दुसऱ्या एका ठिकाणी बुवांनी
म्हटलं आहे 'जरि मी नव्हतो पतित । तरि तू पावन कैंचा तेथ ?' मी येथे पतित असल्यामुळे विठ्ठला, तू पतितपावन
म्हणून लौकिकवान झालास, असा प्रेमाच्या भांडणाचा लडिवाळ मुद्दा उपस्थित केला आहे लोखंड आहे म्हणून
परिसाला महत्त्व मी भक्त आहे म्हणून देवा तुमचे महिमान असा भावार्थ दोघेही परस्परांना पोषक आहेत
१०३ विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥ १ ॥
ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ २ ॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥ ३ ॥
तुका म्हणे आले । रूपा अव्यक्त चांगले ॥ ४ ॥

५० सार्थ तुकारामगाथा
१०४ काय दिनकरा । केला कोबड्याने खरा ॥ १ ॥
का हो ऐसा सत ठेवा । भार माझे माथा देवा ॥ २ ॥
आडविले दासीं । तरि का भरती उपवासी ॥ ३ ॥
तुका म्हणे हातीं । कळा सकळ अमती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दिनकरा-सूर्यास, दासीं-सेवकांनी
अर्थ - सूर्य उगवताना कोंबडा आरवतो याचा अर्थ असा नव्हे की त्याच्या आरवण्याने सूर्य उगवतो
कोंबड्याच्या ओरडण्याने सूर्याचे उगवणे खरे मानायचे काय ? त्याचा उदय स्वयंसिद्धच आहे १ माझे व देवाचे नाते
असेच आहे सत लोकोहो, माझ्यावर सत्वाचे ओझे ठेवू नका माझ्या सत्त्वामुळे ईश्वराचे नाव सिद्ध होऊ नका २
सेवकांनी, स्वयंपाक करणाऱ्या नोकरानी जरी अडवून घेतले, किंवा सोडले तरी मालक काही उपाशी राहात नाही
तसे माझे सत्त्व नसले तरी ईश्वराचे थोरपण स्वयंसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला, माझ्या
गुणावगुणाची सारी किमया त्या अनंत स्वरूपी ईश्वराच्या स्वाधीन आहे ४
१०५ जेविता ही धरी । नाक हगंतिया परी ॥ १ ॥
ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ २ ॥
साडावे माडावे । काय ऐसे नाहीं ठावे ॥ ३ ॥
तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चाळा-निंदा, अवकळा-वाईट स्थिती, साडावे-सोडावे माडावे-पत्करावे, सरी-बरोबरी
अर्थ - परसाकडेस बसले असताना ज्याप्रमाणे घाण येऊ नये म्हणून नाक धरतात त्याप्रमाणे काही लोक
वेड्यासारखे जेवतानाच नाक धरतात १ अशा वेडसर क्रियामुळे आपली आपणच वाईट स्थिती किंवा फजिती करीत
असतो २ कुठे काय करावे, काय धरावे, काय सोडावे याचा विवेकच त्हांना नसतो ३ तुकाराम महाराज
म्हणतात, असे लोक ताक व दूध याना सारखेच मानतात ४
१०६ हो का पुत्र पत्नी बधु । त्याचा तोडावा सबंधु ॥ १ ॥
कळो आले खटचाळसे । शिवो नये लिपो दोषें ॥ २ ॥
फोडावे मडके । मेले लेखीं द्यावें एके ॥ ३ ॥
तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगेँ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मडके फोडणे-संबध तोडणे, द्यावे-द्यावाने
अर्थ - ईश्वरप्राप्तीसाठी पुत्र असो, पत्नी असो, बंधू असो त्या सर्वांचा सबंध तोडून टाकावा १ हे सबध
सर्व खटघाळ आहेत, आड येणारे आहेत असे समजून आल्यावर त्यांना शिवू सुद्धा नये, त्याच्या सहवासाचा दोष
अंगी लावून घेऊ नये २ ती सर्व मेली आहेत असे समजून त्याच्या नावाने मडके फोडून त्याचा सबंध तोडून
द्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा त्याग केल्याशिवाय संसारातील भोगाविषयीची आस्था दूर व्हायची
नाही ४
१०७ ज्याल्याविण करी शोभनतातडी । चार ते गद्यडी करीतसे ॥ १ ॥
कासया पाल्हाळ आणिफांचे देखों । संगता नव्हे सुपी सासरेसि ॥ २ ॥
फुयाच्या ढेकरें न देवेळ पुष्टी । रूप दावी कष्टी' मळिण वरी ॥ ३ ॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेविण नका याव घेऊ ॥ ४ ॥
१ दृष्टी

शब्दार्थ व टीपा - व्याल्याविण-बाळंत झाल्याशिवाय शोभन तातडी-बारशासारखे मंगल कार्य करण्याची
घाई, चार-चाळे, देशी-पाहून, कुधाऱ्या-मुद्दाम उसने आणलेल्या, कुष्ठी-कोडाच्या रोगाचा, वाव-विनाकारण
अर्थ - एक स्त्री बाळंतीण व्हायच्या आधीच बारसे वगैरे मंगल कार्य करण्याचे चाळे मूर्खाप्रमाणे करू
लागली १ दुसऱ्या खऱ्या बाळंतिणीचे विस्तारपूर्वक व्यापार पाहून ही तसे करू लागली तर काय उपयोग ? साखर
स्वतः खाऊन जो गोडी अनुभवता येते ती काय दुसऱ्यास सांगता येते ? २ तृप्ततेचे जेवण झाल्यावर जशी ढेकर
येते तशी ती उगाच भुकेल्या पोटी बळाने दिलेल्या ढेकराप्रमाणे होणार नाही दोघीत मोठाच फरक दिसणार उलट
अशा ढेकरेमुळे चेहरा मात्र कष्टदायक व मलीन दिसणार, किंवा कोडाच्या रोगाचा मनुष्य आपले कोड दिसू नये
म्हणून अंग मलीन करून घेतो तसेच होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसती बडबड करणारे श्रोत्रहो ऐका,
तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याखेरीज उगाच बोलू नका ४

१०८ जेणे घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥ १ ॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ २ ॥
प्रल्हादें जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥
तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - अंतराय-अडथळा, वियोग, वर्जावी-मोडावी, येर-मग, लेखा-गणती, हिशेब, दुःखमूळ-
दुःख देणारे
अर्थ - ईश्वराच्या प्राप्तीस जर अडथळा होत असेल, त्याचा वियोग घडत असेल तर अत्यंत पूज्य असलेल्या
आईबापांचाही त्याग करावा १ मग इतर नात्याची माणसे, प्रिय पत्नी, मुले धन यांची काय गणना ? त्याचाही
त्याग करावा, कारण हे सर्व आपल्याला दुःख देण्यास पात्र असलेले शत्रूरूप आहेत २ आईबापाचा वा आप्तांचा
असा त्याग पूर्वी अनेकांनी केला होता देवासाठी प्रल्हादाने आपल्या पित्याचा बिभीषणाने आपल्या थोरल्या बंधूचा,
भरताने आपल्या आईचा व राज्याचाही त्याग केला नव्हता काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात याच्या सेवेतून
निर्माण होणारे सर्व धर्म श्रीहरीच्या पायाशी दिसतील इतर सर्व उपाय दुःखाचे मूळ आहे त्यामुळे दुःखच होत
राहील हे निश्चित ४
विवरण - ईश्वरप्राप्ती हे सर्वात मोठं ध्येय माणसाने असल्यान या प्राप्तीच्या आड येणारी सर्व बंधने
तोडावीत असे वारंवार सांगितले जाते अतिशय पूज्य आईबाप, यांनी आपणास जन्म दिलेला असतो, पण हे जर
परमेश्वरप्राप्तीच्या आड आले तर त्याचाही त्याग करावा, मग बंधू, पुत्र पत्नी याचा त्याग करावा यात नवल ते
काय ? यांच्या अतिरिक्त मोहामधून ईश्वर दुरावतो म्हणून या नात्याचा त्याग सुचविला आहे गीतेच्या तेराव्या
अध्यायात ज्ञानी माणसांची लक्षण सांगताना 'असक्तिरनभिष्वंग पुत्रदारगृहादिषु-बायकामुलं व घर इत्यादीविषयी
लंपट न होणे'-हा एक प्रमुख म्हणून दर्शविला आहे 'दारागृहपुत्रों। नाहीं जया मैत्री । तो जाणपा धात्री । ज्ञानासि
गा' असे ज्ञानदेवानी या पुरुषांचे वर्णन केले आहे 'देवाच्या सख्यत्वासाठीं । पाडाव्या जिवलगांसि तुटी । प्राण सर्वस्वही
शेवटीं । तोही वेंचवा' असे समर्थ रामदासानी निःप्रहाण सांगितले आहे
असा हा आप्तस्वकीयांचा किंवा आईबापांचा त्याग पूर्वी कधी कुणी केला होता काय ? तुकारामबुवांनी
काही उदाहरणे आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी दिली आहेत प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा पण यास
भगवद्भक्तीचे अतिशय वेड म्हणून या बापाने प्रल्हादाचा अतिशय छळ केला प्रल्हादाने विष्णूची व नृसिंहाची
प्रार्थना केली शेवटी नृसिंह प्रकट होऊन त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला अशी कथा आहे याप्रमाणे प्रल्हादान
आपल्या बापाची पर्वा केली नाही असा भावार्थ बिभीषण हा रावणाचा बंधू मोठा भगवद्भक्त होता रावणान
सीतेस चोरून आणले, रामास त्रास देण्यास सुरवात केली, त्याच्याशी युद्ध आरंभिले म्हणून याने रावणास बराच उपदेश
केला, पण तो त्यास पटला नाही मग बिभीषण रामास अनुकूल झाला त्याने सर्व माहिती रामास पुरविली युद्धात
रामाकडूनच लडन याने दृष्टमाळे, प्रहस्त वगैरंना ठार मारले भरत हा रामाचा बंधू आपली आई कैकयी हिच्या

५२ सार्थ तुकारामगाथा
मुळे रामास वनवासास जावे लागले असे समजताच याने आईस कटू शब्दांनी फार दुखविले व आपण स्वतःही
राज्याच्या त्यागास प्रवृत्त झाला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच भरत राज्यकारभार पाहात होता.
१०९ मान अपमान गोयें । अवघें गुंडूनी ठेवावें ॥ १ ॥
हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥
शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥ ३ ॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोयें-पाश, गुंडूनी-गुंडाळून, खुंटे-पावते, ऊर्मी-सुखदुःखाची लाट
अर्थ - मान आणि अपमान याच्या पाशात गुंतून राहूं नये. हे सारे विकार गुंडाळून ठेवावेत. १ यामुळे
अंतःकरण नेहमी समाधानी राहून यातच देवाचे दर्शन झाल्याचे सुख होईल. २ याच ठिकाणी खऱ्या शांततेची
वसती असून कालधक्काचीही गती येथे खुंटेल. ३ जी जी सुखाची किंवा दुःखाची ऊर्मी येईल ती थोडी सहन करणे,
शांतपणे तीस वागविणे, एवढे थोडे जमले म्हणजे झाले. ४
विवरण-मन ईश्वराकडे लावून शाश्वतचे समाधान मिळविण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मानापमान न
मानता स्थिर बुद्धीने राहणे मान आणि अपमान याच्या वृथा जाणिवेमुळे अनेक प्रकारची दुःखे निर्माण होतात.
भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची जी लक्षणे आहेत त्यात 'अमानित्वम्' हे पहिलेच लक्षण सांग-
ण्यात आले आहे 'पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।' अशी स्थिती आपली असावी 'चातुर्य
लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी' अशी अवस्था ज्ञानी माणसाची असते. उलट मानसन्मानाची हाव धरली की
अपमानच होऊं लागतो. 'मान इच्छी तो अपमान पावे' असे तुकारामबुवांनी म्हटले आहे
११० थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालियां ॥ १ ॥
हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरले तें ॥ २ ॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधायें ॥ ३ ॥
तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- साहे-साह्यतेस, हर्षामर्ष-आनंद, दुःख, सरले-संपले, लटिकें-खोटे, देहअभिमान-देह
हा खरा असा अभिमान
अर्थ - जर आपले चित्त आपल्या साह्यास येईल तर ईश्वरप्राप्तीसाठी फार थोडे करावे लागेल १
ज्याच्या चित्तात सुखदुःखादी विकार उरले नाहीत त्याचे जीवन पांडुरंगातच विलीन झाले असे समजावे. २
सर्व साधनांचे सार हेच एक असल्याने आणखी दुसरे काही शोधावयास नको ३ तुकाराम महाराज म्हणतात,
हा सर्व प्रपंच व ही बाह्य सृष्टी या गोष्टी खोट्या असल्याने मना, तू त्याचा अभिमान सोड. ४
विवरण -मानसन्‍मान सोडावा, अपमानाची फिकीर करू नये हे जसे खरे, तसेच या मार्गात राहणाऱ्या
माणसाने सुखदुःखाचीसुद्धा पर्वा करू नये गीतेत सांगितल्याप्रमाणे 'सुखदुःखे समे कृत्वा' सुख आणि दुःख यांना समान
मानूनच आपण चालले पाहिजे 'सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें' अशी ज्ञानेश्वरांची ही शिकवण
आहे 'सुखदुःखादि यन् । का शुभाशुभं कर्म । दोनरे ऐसो मनोरथम् । नेणोचि जो ।' अशी अवस्था ईश्वरप्राप्तीसाठी सिद्ध
झालेल्या माणसाची असते सुख, दुःख, हर्ष, अमर्ष, लाभ, अलाभ, जयाजय याच्या द्वद्वातून त्यास पलीकडे जावयाचे असते.
१११ आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न फळे ॥
तरी मातेंचिये खोळे । दगड आला पोटासि ॥ १ ॥
मनुष्यदेहा ऐसा निघ । साधिलीं ते साधे सिद्ध ॥
करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा ५३
नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥
कट धरुनियां करीं उभाउभी पालवी ॥ ३ ॥
तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥
होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – पोळें-गर्भात, निघ-निघी, साठा, प्रबोध-उपदेश, जागृति, कट-कटी, पालवी-खुणा-
वतो, बोलावतॊ.
अर्थ :- एवढा जन्म वाया चालला, अजून तरी डोळे उघड. अजूनही तुला जर काहीच समजले नसेल तर
मग तू आपल्या आईच्या पोटीं बरेच दगड म्हणून जन्मलास असे मानणे भाग आहे १ चांगला मनुष्यदेह तुला
मिळाला आहे. याच मोलाच्या साठ्यामुळे तुला काय साधावयाचे आहे ते तू साध, असाच बोध संतानी केला असून ते
स्वतःही संसार-सागराच्या पलीकडे गेले आहेत २ तुझ्यासाठीं ही नाव पंढरपुरास चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या
दारात हात कटीवर ठेवून उभी आहे. ती सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याकडे उभ्या उभ्यानेच बोलावीत आहे,
खुणावीत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या नावेस काही किंमत मोजावी लागत नाही, ही फुकटच आहे
नुसती पायास मिठी घालायी; मग या भवसागरातून पलीकडच्या तीरावर जावयास उशीर काहीच नाही ४
११२ न करी संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥
या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडवड ते ॥ २ ॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा¹ ही न ये घरी मन ॥ ३ ॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या धारा आनंदाचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संग-संगत, निश्चळ-स्थिर, अद्वैत-आपण व ईश्वर, जीव व शिव, आत्मा व परमात्मा
एक आहोत ही अनुभूती, क्षय-नाश, जाणीव-मी वेगळा ही दुजेपणाची कल्पना
अर्थ :- तू आता इतर कुणाच्याही संगतीत पडू नकोस, अगदी स्थिर रहा तू. कुठल्याही संबंधाचा किंवा
ममत्वाचा मळही तू स्वतःस लावून घेऊ नकोस. १ अशा या अवस्थेसच ब्रह्मज्ञान किंवा अद्वैतज्ञान असे नाव असून
याची जाणीव अनुभवाखेरीज येणार नाही. अनुभवाशिवाय बोलणे व्यर्थ बडबडच मानावी लागेल २ या अवस्थेत
इंद्रियांची विषयाचा जय होऊन वासनेचा नाश होत असतो विविध विषयावरील वासनाची आसक्ती संपते आणि
देहादिक वृत्तींचे किंवा बाह्य प्रपंचाचे मनातील संकल्पही संपतात. ३ मी निराळा, मी वेगळा अशी जाणीवच या
अवस्थेत मनात उरत नाही. सर्वच आनंदी आनंद याचेच राज्य असते, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४
११३ पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥ १ ॥
ऐसा ठाव नाही कोठें । देव उभाउभी भेटे ॥ २ ॥
आहिति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥ ३ ॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठाव-ठिकाण, काळें-कालांतराने, पुष्कळ काळाने, उभाउभी-ताबडतोब, पेठ-बाजाराचे
मुख्य ठिकाण,
अर्थ :- पंढरपूरचा महिमा वर्णन करताना दुसरी उपमाच उपयोगी पडत नाही १ कारण या क्षेत्रासारखे
ठिकाण इतरत्र कुठेच नाही देव येथे ताबडतोब भेटतो २ बाकीची तीर्थे पुष्कळ असली तरी त्यांचेकडून इष्ट फळ
बऱ्याच काळानंतर मिळते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरपूर म्हणजे भक्तीचे मुख्य ठिकाण असून हे
भूवरचे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. ४
१ सकल्पा ही धरी न ये मन

५२ सार्थ तुकारामगाथा
मुळे रामास वनवासास जावे लागले असे समजताच याने आईस कटू शब्दांनी फार दुखविले व आपण स्वतः ही
राज्याच्या त्यागास प्रवृत्त झाला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच भरत राज्यकारभार पाहात होता
१०९ मान अपमान गोवें । अवघें गुंडूनी ठेवावें ॥ १ ॥
हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥
शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥ ३ ॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोवें-पाश, गुंडूनी-गुंडाळून, खुंठे-थांबते, ऊर्मी-सुखदुःखांची लाट
अर्थ - मान आणि अपमान यांच्या पाशांत गुंतून राहूं नये. हे सारे विकार गुंडाळून ठेवावेत. १ यामुळे
अंतःकरण नेहमी समाधानी राहून यातच देवाचे दर्शन झाल्याचे सुख होईल. २ याच ठिकाणी खऱ्या शांततेची
वस्ती असून कालचक्राचीही गती येथे खुंटेल. ३ जी जी सुखाची किंवा दुःखाची ऊर्मी येईल ती थोडी सहन करणे,
शांतपणे तीस वागविणे, एवढे थोडे असले म्हणजे झाले. ४
विवरण:-मन ईश्वराकडे लावून शाश्वतचे समाधान मिळविण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मानापमान न
मानता स्थिर बुद्धीने राहणे मान आणि अपमान याच्या वृथा जाणिवेमुळे अनेक प्रकारची दुःखे निर्माण होतात.
भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची जी लक्षणे आहेत त्यात 'अमानित्वम्' हे पहिलेच लक्षण सांग-
ण्यात आले आहे 'पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।' अशी स्थिती आपली असावी. 'चातुर्य
लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी' अशी अवस्था ज्ञानी माणसाची असते. उलट मानसन्मानाची हाव धरली की
अपमानच होऊ लागतो. 'मान इच्छी तो अपमान पाये' असे तुकारामबुवांनी म्हटले आहे.
११० थोडे आहे थोडें आहे । चित्त साहे जालियां ॥ १ ॥
हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ २ ॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधायें ॥ ३ ॥
तुका म्हणे लटिकें पाहें । सांडों देह अभिमान ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- साहे-साहवतेस, हर्षामर्ष-आनंद, दुःख, सरले-संपले, लटिकें-खोटे, देहअभिमान-देह
हा खरा असा अभिमान
अर्थ - जर आपले चित्त आपल्या साहण्यात येईल तर ईश्वरप्राप्तीसाठी फार थोडे करावे लागेल. १
ज्याच्या चित्तात सुखदुःखादी विकार उरत नाहीत त्याचे जीवन पांडुरंगातच विलीन झाले असे समजावे. २
सर्व साधनाचे सार हेच एक असल्याने आणखी दुसरे काही शोधावयास नको. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
हा सर्व प्रपंच व ही बाह्य सृष्टी या गोष्टी खोट्या असल्याने मला, तू त्याचा अभिमान सोड. ४
विवरण -मानसन्मान सोडावा, अपमानाची फिकीर करू नये हे जसे खरे, तसेच या मार्गात राहणाऱ्या
माणसाने सुखदुःखाचीसुद्धा पर्वा करू नये गीतेत सांगितल्याप्रमाणे 'सुखदुःखे समे कृत्वा' सुख आणि दुःख यांना समान
वागवूनच आपण चालले पाहिजे 'सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें' अशी ज्ञानेश्वरांची ही शिकवण
आहे. 'सुखदुःखादि धर्मं । कां शुभाशुभे कर्में । दोन्ही ऐसीं मनोधर्मं । नेणोंचि जो।' अशी अवस्था ईश्वरप्राप्तीसाठी सिद्ध
झालेल्या माणसाची असते. सुख, दुःख, हर्ष, अमर्ष, लाभ, अलाभ, जयाजय याच्या द्वंद्वातून त्यास पलीकडे जावयाचे असते.
१११ आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न फळे ॥
तरी मार्तंडिये खोळे । दगड आला पोटासि ॥ १ ॥
मनुष्यदेहा ऐसा निघ । साधिलीं ते साधे सिद्ध ॥
करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा ५३
नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥
कट धरुनियां करों उभाउभी पालवी ॥ ३ ॥
तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥
होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खोळें-गर्भात, निध-निधी, साठा, प्रबोध-उपदेश, जागृति, कट-कटी, पालवी-खुणा-
वतो, बोलावतौ
अर्थ :- एवढा जन्म वाया चालला, अजून तरी डोळे उघड. अजूनही तुला जर काहीच समजले नसेल तर
मग तू आपल्या आईच्या पोटी लप दगड म्हणून जन्मलास असे मानणे भाग आहे १ चांगला मनुष्यदेह तुला
मिळाला आहे. यात्र मोलाच्या साधनामुळे तुला काय साघावयाचे आहे ते तू साध, असाच बोध सतांनी केला असून ते
स्वत ही संसार-सागराच्या पलीकडे गेले आहेत २ तुझ्यासाठी हो नाव पंडरपुरास चद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या
दारात हात कटोवर ठेवून उभी आहे. ती सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याकडे उभ्या उभ्यानेच बोलावीत आहे,
खुणावीत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या नावेस काही किंमत मोजावी लागत नाही, ही फुकटच आहे.
नुसती पायात मिठी घालावी; मग या भवसागरातून पलीकडच्या तीरावर जावयास उशीर काहीच नाही ४
११२ न करी संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥
या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ २ ॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । सकल्पा¹ हो न ये यरी मन ॥ ३ ॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- संग-सगत, निश्चळ-स्थिर, अद्वैत-आपण व ईश्वर, जीव व शिव, आत्मा व परमात्मा
एक आहात ही अनुभूती, क्षय-नाश, जाणीव-मी वेगळा ही दुजेपणाची कल्पना
अर्थ :- तू आता इतर कुणाच्याही संगतीत पडू नकोस, अगदी स्थिर रहा तू. कुठल्याही सबंधाचा किवा
ममत्वाचा मळही तू स्वत स लावून घेऊ नकोस. १ अशा या अवस्थेसच ब्रह्मज्ञान किंवा अद्वैतज्ञान असे नाव असून
याची जाणीव अनुभवाखेरीज येणार नाही. अनुभवाशिवाय बोलणे व्यर्थ बडबडच मानावी लागेल २ या अवस्थेत
इद्रियादी विषयाचा जय होऊन वासनेचा नाश होत असतो विविध विषयावरील वासनाची आसक्ती संपते आणि
देहादिक वृत्तींचे किंवा बाह्य प्रपंचाचे मनातील सकल्पही संपतात. ३ मी निराळा, मी वेगळा अशी जाणीवच या
अवस्थेत मनात उरत नाहीं. सर्वत्र आनंदी आनंद याचेच राज्य असते, असे तुकाराम महाराज म्हणतात ४
११३ पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥ १ ॥
ऐसा ठाव नाही कोठें । देव उभाउभी भेटे ॥ २ ॥
आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥ ३ ॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठाव-ठिकाण, काळें-कालातराने, पुष्कळ वेळाने, उभाउभीं-तावडतोब, पेठ-बाजाराचे
मुख्य ठिकाण,
अर्थ :- पंडरपुरचा महिमा वर्णन करताना दुसरी उपमाच उपयोगी पडत नाही १ कारण या क्षेत्रासारखे
ठिकाण इतरत्र कुठेच नाही. येथ येथे तावडतोब भेटतो २ बाकीची तीर्थे पुष्कळ असली तरी त्यांचेकडून इष्ट फळ
बऱ्याच काळानतर मिळते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे पंडरपूर म्हणजे भक्तीचे मुख्य ठिकाण असून हे
भूवरचे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. ४
१ सकल्पा ही वरी न ये मन

५४ सार्थ तुकारामगाथा
विवरण - या एका छोट्या व गोड अभंगात भूवरचे वैकुंठ म्हणजे विष्णुलोक म्हणून मानलेल्या पंढरपूरचा
महिमा वर्णन केला आहे श्रीविठ्ठल हे दैवत पुंडलिकासाठी ज्या क्षेत्रात स्थिरावले ते हे पंढरपूर भागवत
सांप्रदायिकांना वैकुंठापेक्षाही प्रिय वाटल्याने अनेक संतानी पंढरपूरचे माहात्म्य मोठ्या तन्मयतेने वर्णन केले आहे
पुंडलिकाचा काळ अनिश्चित असल्याने पंढरपूरच्या इतिहासासबंधीही निश्चित असे सांगता येत नाही पूर्वी
पंढरपुरास पांडुरंगपूर, पंढरिपूर, फागनिपूर, पौंडरीक क्षेत्र, पंढरी, पांडरंगपल्ली, पंडरंगपल्ली, पल्लरी इत्यादी नावांनी ओळखत
असत असा पुरावा ऐतिहासिक कागदपत्रातून मिळतो पौंडरीक हे नाव पुंडरीक यावरून बनले असावे या पंढरपूरच्या
विठ्ठलाचे उपासक ज्ञानेश्वर-नामदेव याच्या आधीपासून किती तरी असावेत पद्मपुराणातील सहाव्या अथवा उत्तर
खंडातील १७६ व्या अध्यायात पैठणच्या ज्ञानश्रुति नावाच्या राजाच्या सारथ्याची कुष्टीगत झाली आहे तो अनेक
क्षेत्रे हिंडत हिंडत तीर्थस्नानतर पंढरपूर येथे आला होता सन ५१६ च्या एका ताम्रपटात पांडरंगपल्ली असा
पंढरपूरचा उल्लेख आलेला आहे सन १२३६ च्या सुमाराचा पंढरपूरचा शिलालेख जो साळोखानी मडपाच्या तुळईवर
आहे त्यात पंडरगे असा उल्लेख आलेला आहे यानंतर १२४९ च्या एका शिलालेखात 'पौंडरीक क्षेत्र' असे पंढरपुरास
म्हटले आहे १२७० च्या एका लेखात पांडुरगपूर असाही उल्लेख आहे प्रसिद्ध चौऱ्यायशीच्या शिलालेखात पंढरपुरास
फागनिपूर म्हटल आहे हा सन १२७३ चा आहे हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि नावाच्या ग्रंथात पौंडरिक क्षेत्राचे वर्णन
आहे चोखोबाच्या समाधीपाशी असलेल्या एका शिलालेखात सन १३११ मध्ये पंढरिपूर असा निर्देश आला आहे
इ स १४९०-१५०८ च्या सुमारास निजामशाहीत दलपतिराज नावाचा एक अर्थमनी होऊन गेला त्याच्या
नृसिंहप्रसाद नावाच्या ग्रंथात पुंडरीक क्षेत्राची माहिती आहे शामजी गोसावी बाजरखेडे नावाच्या एका कवीने सन
१५०५ मध्ये एका कवितेत 'पुरातन स्थळ आमुचे पंढरपूर' असा उल्लेख केलेला दिसतो बगळचे प्रसिद्ध वैष्णव
श्रीचैतन्यप्रभू किंवा गौरागदेव सन १५१०-११ मध्ये दक्षिणेत आले होते त्याच्या पंढरपूरभेटीचा उल्लेख कृष्णदास
कविराजाने 'तथा होईते पाण्डुपुर आइला गौरचन्द्र । विठ्ठल ठाकूर देखि पाइल आनंद' असा उल्लेख केला आहे
याप्रमाणे अनेक ऐतिहासिक उल्लेख पंढरपूरचे मिळतात मराठी संताच्या दृष्टीने तर अवघ्या विश्वात
पंढरपूरसारखे क्षेत्र नाही असा गौरवाचा भाग त्यांच्या अभंगात वारंवार येतो 'पंढरीचे सुख नाही त्रिभुवनीं '
'अवघी पंढरी मूर्वरुंठ नगरी', 'नामाची भरली पेठ । मूर्वरुंठ पंढरी' 'चोखा म्हणे पाहता पंढरी मूर्वरुंठ ।
मनाचे हे कष्ट दूर गेले', 'अगाध भूर्वेकुठ नगरी । पंढरी हे चराचरीं यासारख्या अनेक पक्तीतून चोखोबानी
पंढरपूरचा महिमा प्रेमाने गाइला आहे 'याप तीर्थ पंढरी । भूर्वेकुठ महीवरो काशी अयोध्या अवंति कांति ।
मथुरा माया गोमती । ऐसीं तीर्थे इत्यादिर्फे आहेती । परि सरी न पवती पाडुरंगी' अशा भाषेत स्वतः ज्ञानेश्वरांनी
पंढरपूरचा गौरव केला आहे 'इच्छितात देव पंढरीचा वास', 'बहुत तीर्थे क्षेत्रे बहुतापरी । न पावती मरी
पंढरीची', 'उदड तीर्थे, उदड क्षेत्रे । परि पवित्र पंढरी ।', 'बहुता काळाचे हे क्षेत्र । सरळ देवाचे माहेर । सकळ
संताचे निजमदिर । तें हे पंढरपूर जाणावे', 'माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं' इत्यादी ओळींतून एकनाथांनी
पंढरपूरचे वर्णन केल आहे 'धन्य धन्य हे नगर । भूर्वेकुठ पंढरपूर' म्हणून भानुदासाचा उल्लेख आहे 'पंढरीचे
सुख पाहता अलौकिक । वैकुंठनायक उभा जेथे' असा आणखी एक त्याचा अभंग प्रसिद्ध आहे नामदेवरायानी तर
पंढरपूरचे वर्णन मोठ्या प्रेमळपणाने व मुक्तकठाने केले आहे 'पंढरी हे क्षेत्र पावनपवित्र । महिमा विचित्र
त्रिभुवनीं', 'ऐसे तीर्थ कोणी दाखवा गोमटे । जेथे प्रत्यक्ष हे भेटे परब्रह्म', 'वरवे वरवे पंढरपूर । विठोबा रायाचे
नगर', 'वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी । वास दे पंढरी सर्वकाळ' इत्यादी ओळींतून नामदेवरायाचा पंढरीप्रेमा
उफाळून आला आहे
इतकेच काय पण वैकुंठनगरापेक्षाही पंढरपूर अधिक असून सर्व जगतात प्रथम पंढरपूरच उभे राहिले अशा
अर्थाचा नामदेवाचाच एक अति गोड अभंग आहे तो सबंध देण्याचा मोह हातो
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥ १ ॥ जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥ २ ॥
जेव्हा नव्हती गोदा गया । तेव्हा होती चंद्रभागा ॥ ३ ॥ चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी ॥ ४ ॥
नासिलिया भूमडळ । उरे पंढरी मडळ ॥ ५ ॥ असे सुदर्शनावरी । म्हणोनि अविनाश पंढरी ॥ ६ ॥
नामा म्हणे धा श्रीहरी । ते म्या देखिली पंढरी ॥ ७ ॥

सार्थ तुकारामगाथा ५५
तुकाराम महाराजांना पंढरपूरबद्दल अपार प्रीती वाटावी यात नवल काय ? ते तर त्यांच्या जिव्हाारीचे
गूज होते ‘जाप जाप तू पंढरी । होय होय वारकरी’, ‘जा रे'तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनाचा’, ‘पंढरीसी
जावे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ।’, ‘आमुची मिरास पंढरी । आमुचे घर भीमातीरीं’, ‘पावलो
पंढरीं वैकुंठ भुवन । धन्य आजि दीन सोनियाचा’, ‘पंढरीये माझें माहेर साजणी । ओवीये काडणीं गाऊ गीत’,
‘धन्य पुंडलिक बहु बरे केले । निधान आणले पंढरीये’, ‘धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणिषेले सार पुंडलीके’,
‘धन्य धन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षयपुरी’, ‘धन्य झालो हो संसारी । आम्ही देखिली पंढरी’, ‘पंढरीची वारी
जयाचिये घरीं । पाय-धुळी शिरीं वंदिन त्याची’ इत्यादि शेकडो वचनांतून तुकाराम महाराजांनी पंढरीमाहात्म्य
तन्मयतेने वर्णन केले आहे
असा हा पंढरपूरचा ध्यास मराठीतील सर्व साधुसंतांना दिसून येतो त्यांना दुसरे तीर्थ नको, क्षेत्र नको,
भारी दुःखे एका पंढरीच्या दर्शनाने नाहीशी होतात म्हणून तर आषाढीकार्तिकीस लाखो लोक पंढरपुरास जाऊन
विसावतात माहेरी आल्याचे सुख त्यांना याच पंढरपूरक्षेत्रात मिळते
११४ तीर्थों धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥ १ ॥
मिळालिया सतसंग । समर्पितां भले अंग ॥ २ ॥
तीर्थों भाव फळे । येथे आनाड ते वळे ॥ ३ ॥
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – रोकडा-प्रत्यक्ष, भले अंग-आपले सर्वस्व, आनाड-अडाणी मनुष्य
अर्थ – कोणत्याही तीर्थस्थानात जा, तेथे धोंडा व पाणी यांचाच सुकाळ दिसेल मनात भाव नसेल तर
तीर्थात दुसरे काय दिसणार ? खरोखर देव पाहावयाचा असेल तर तो साधुसंताच्या रूपातच पाहावा १ सतसंगती
प्राप्त होताच आपण आपले सर्वस्व त्यांना अर्पण करावे म्हणजे देवत्वाची खूण पटते २ तीर्थस्थानावर गेल्यावर
मनात शुद्ध भाव व भक्ती असेल तरच त्याचा उपयोग होतो, पण सतसंगतीत अडाणी मनुष्य असला तरीही त्याचा
उद्धार होऊ शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, माणसाचे त्रिविध ताप नाहीसे झाले की तो निष्पाप झाला असे
समजते ४
११५ घेऊनिया चक्र गदा । हाच धंदा करी तो ॥ १ ॥
भक्ता राखे पायांपाशीं । दुर्जनासी संहारी ॥ २ ॥
अव्यक्त ते आकारले । रूपा आले गुणवंत ॥ ३ ॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – चक्र-शत्रूचा नाश करणारे सुदर्शन चक्र
अर्थ – हा विठ्ठल हातात गदाचक्र घेऊन हाच उद्योग करतो १ दुर्जनाचा, वाईट लोकाचा संहार करून
आपल्या भक्ताचे रक्षण करणे हेच याचे काम असते २ याच कामासाठी अव्यक्त परब्रह्म आकारास आले, नाना
गुणांनी सांकृत झाले ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल ज्याची त्याची इच्छा पूर्ण करतो ४
विवरण – दुर्जनाच्या नाशासाठी व साधुसज्जनाच्या रक्षणासाठीच परमेश्वराचा अवतार असतो हे गीतेने
'परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम्' या श्लोकार्धात प्रकट केलेले आहे अधर्माचे प्राबल्य माजले की भगवंतास
धर्मसंस्थापनेसाठी अवतार धारण करावा लागतो अशा प्रकारे अवतार घेऊन परमेश्वर भक्ताचे रक्षण धोने करतो
यासबंधी ज्ञानेश्वरांनी फार चांगले व समर्पक असे वर्णन केले आहे ‘दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूचा मानु मियसीं ।
धर्मार्ती नीतीशीं । शंख भरीं ॥ मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळी । तं योगिया पाहे दिवाळी ।
निरंतर ॥' ढाल, चक्र, गदा, पण ही परमेश्वराची आयुधे या एका उद्योगासाठी असतात दुष्टाचा नाश, सज्जनाचे
रक्षण व धर्मसस्थापना ही काम ईश्वरास अवतार घेऊन करावी लागतात

५६ सार्थ तुकारामगाथा
११६ देखोनि पुराणिकांची दाढी । रडे फुंदे नाक ओढी ॥ १ ॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ २ ॥
आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥ ३ ॥
बोलों नये मुखावटां । म्हणें होता व्यांचा तोटा ॥ ४ ॥
दोन्ही सिंगे चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥ ५ ॥
मनां आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥ ६ ॥
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥ ७
तुका म्हणे कुडें । फळो येतें तें रोकडें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- नावरे-आवरत नाही, नेवरे-पाडरे, फुडें-खोटे
अर्थ - या अभंगात हरिदासपुराणिकाच्या कीर्तनात येणारी एक गमतीची पण मोठ्या बोधाची गोष्ट
विनोदी पद्धतीने तुकाराम सांगतात. ज्याचा एक लाडका बोकड नुकताच मेला आहे असा धनगर पुराणिक बुवांचे
पुराण कसे तन्मयतेने पण एका निराळ्याच अर्थाने समजावून घेत होता त्याचे मोठे गमतीचे वर्णन येथे आहे.
पुराणिक बुवांची दाढी पाहताच त्याला स्फुंदून स्फुंदून रडू आले; नाक पुसण्याचा प्रसंग आला लोकांना वाटले काय
निरूपणाचा परिणाम ! किती प्रेमळ श्रोता ! त्याच्या मनातील भाव मात्र निराळा होता. नुकताच मेलेला आपल्या
दाढीवाला बोकड त्यास आठवला १ त्याच्या मनात खरे प्रेम नव्हते तरी वरवर लोकांना ते खरेच प्रेम वाटले २
त्याला रडे आवरेना. बोकडाचे खूर व नख्या त्याला एकसारख्या समोर दिसत होत्या ३ तो म्हणू लागला, काय
सांगू हो ? हा माझा बोकड वियाण्याचा म्हणून राखलेला होता तोच गेला हो. पुराणिकांना एका बीजाचा हा विस्तार
असा हे सांगितले तेव्हा त्यास आपल्या 'व्याच्या' बोकडाची आठवण झाली ४ पुराणिक बुवा सांगत होते, एक पुरुष,
एक प्रकृती, चार वेद किंवा ईश्वराची चार रूपे तो धनगर बुवांच्या दोन व चार बोटाचा अर्थ मनाशी समजत
होता, हो हो माझ्या बोकडास दोन शिंगे होती, चार पाय होते. ५ कारण या धनगराच्या अंतःकरणात मेलेल्या
बोकडाचे दुःख होते. त्याचे चित्त पुराणात नव्हतेच ६ जो भाव त्याच्या अंतःकरणात होता तोच शेवटी त्याच्या
मुखातून बाहेर पडला. ७ तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणात असणारी खोटी भावना शेवटी केव्हा तरी प्रकट
होतेच ८
११७ दुर्जनाची गांधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥ १ ॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघट्टन नये बोलों ॥ २ ॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तेशी ॥ ३ ॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥ ४ ॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥ ५ ॥
तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥ ६ ॥

सार्थ तुकारामगाथा ५७
११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज' तो ॥ १ ॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचे वचन न मानी जो ॥ २ ॥
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवो नये ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - अतिवादी-वृथा वादविवाद करणारा
अर्थ - विनाकारण वितंडवाद करून भांडणारा मनुष्य हा शुद्ध बीजाचा नाही असेच समजावे. तो जातीने
अंत्यज म्हणजे महार समजावा १ कारण त्याला वेदांचे किंवा श्रुतींचे वचनच मान्य नसते, श्रेष्ठ माणसांचे वचन
तो ऐकत नाही, मानीत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, मद्यपानाचे गोड अन्न जसे त्याज्य तसे या दुर्जनास
शिवू सुद्धा नये ३
११९ शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥ १ ॥
त्याचे न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ २ ॥
संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥ ३ ॥
तुका म्हणे पोटीं । भाव अणीक ज्या होंटीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धीर-एकवाक्यता खळा-दुष्टाच्या होंटीं-ओठात
अर्थ - ज्याच्या बोलण्यात एकवाक्यता नाही, निश्चय नाही, त्याची बुद्धीच स्थिर नाही असे समजावे १
त्याचे दर्शनसुद्धा घेऊ नये, की या दुर्जनाच्या पंगतीला जेवण घेऊ नये २ कारण हा दुष्ट मनुष्य संतसज्जनांची निंदा
करतो व अधम लोकांची स्तुती करतो त्याची संगतच नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या पोटात भाव एक
व ओठात म्हणजे बोलण्यात दुसराच, त्याचे दर्शनसुद्धा नको
१२० चोरे चोरांतें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥ १ ॥
शिंदळीच्या मार्गे वेचिता पाऊले । होईल आपुले तिच्या ऐसे ॥ २ ॥
तुका म्हणे भितो पुढील्या दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - शिंदळीच्या-वाईट चालीच्या स्त्रीच्या, दत्ता-पुढे उभे राहिलेल्या, उपजली-
निर्माण झाली
अर्थ - चोराने चोरालाच उपदेश दिल्यावर तो तरी दुसरा काय देणार? जो त्याचा नित्याचा चोरीचा
अभ्यास असेल तोच शिकविणार तो १ एखाद्या वाईट चालीच्या स्त्रीच्या घरी आपण गेलो तर आपण तिच्या-
प्रमाणेच होणार २ तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे आता अशा विपरीत संगतीमुळे पुढे काय काय भयानक
स्थिती लोकांची होणार या संबंधी चिंत्ताच वाटू लागली आहे ३
१२१ मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥ १ ॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचे तोंड ॥ २ ॥
समय न कळे । काय उपयोगों ये वेळे ॥ ३ ॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खरा-गाढवाला
अर्थ - कोणत्या वेळी काय बोलावे हे न समजणाऱ्या लोकांना उद्देशून बुवा म्हणत आहेत एका लग्नात
पुढारीपण एका म्हाताऱ्यास दिले मांडवाच्या दारातच त्याला उभे करून व्यवस्था पाहायला सांगितली १ तर
१ अधम, २ अगणी
तु गा ८

५८ सार्थ तुकारामगाथा
तो प्रसंग न ओळखता वाटेल तसे बडबडू लागला, म्हणाला, त्या रांड नवरीला आणा त्या नवऱ्याचे तोंड जाळा २
त्याच्या मनात नसेल, पण असे अपशब्द या प्रसंगी का तोंडातून काढावचे? यावेळी त्याचा विपरीत परिणामच
होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रसंगातून यासारख्या गाढवांना प्रथम दूर करा ४
१२२ काहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तोचि श्वान ॥
वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥ १ ॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥
जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ २ ॥
अखंड अशुभ वाणी । खरे न बोलेचि स्वप्नीं ॥
पापी तयाहूनी । आणीक नाहीं दुसरा ॥ ३ ॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥
पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥ ४ ॥
काहीं संताचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण ॥
यमाचा आदण । सीण थोर पावेल ॥ ५ ॥
तुका म्हणे त्यानीं । मनुष्यपणा केली हानी ॥
देवा विसरुनी । गेलीं म्हणता मी माझें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - वाया-व्यर्थ वृषभ-बैल, यातीचा-जातिकुळाचा, आदण-देणगी, सीण-श्रम, दुख
अर्थ - रोज काही तरी नामस्मरण, नित्यपाठ, भजन, गीताभागवतश्रवण यासारखा नित्यनेम न करता
जो अन्न सेवन करतो तो कुत्र्याच्या जातीचा मानावा मनुष्यजन्माला येऊन तो वायाच गेला, केवळ बैलाप्रमाणे
संसाराचा फुकट भार त्याने वाहिला १ कारण अशा माणसाचा भूमीला फुकट भार होतो, कारण हा आपल्या
घराण्याचा काय आचार आहे, कुलाचार आहे, हेच विसरतो, त्यामुळे तो कुळाचाच दावेदार बनलेला असल्याने त्याचे
सर्व पितर अघोर अशा नरकातच खितपत पडतात २ त्याची वाणी नेहमी अमंगल असून तो स्वप्नातही चुकून खरे
बोलत नाही त्याच्याशिवाय दुसरा कोणीही पापी नाही ३ तो केवळ स्वतःचे पोट भरीत असतो त्याला इतर
प्राणिमात्राबद्दल कधीही दया वाटत नाही दाराशी एखादा अतिथि जरी आला तरी त्याच्या पाठीशी लागून तो
त्याला पिटाळून लावतो ४ साधुसंतांचे पूजन करावे, तीर्थांचे भ्रमण करावे या गोष्टी त्याला माहितच नसल्यामुळे
हा यमाचेच भक्ष्य बनलेला असतो तो एक थोर असो यमाला विनासायास देणगीच मिळते ५ तुकाराम महाराज
म्हणतात, अशा प्रकारच्या माणसाने सर्व मनुष्यपणाची हानी केली आहे कारण जगच्चालक परमेश्वरास विसरून हा
‘ मी मी, माझे माझे ’ करीत असतो त्याचा जन्म व्यर्थ गेला असेच समजावे ६
१२३ कन्या गो करी कयेचा विकरा । चाडाळ तो खरा तया नावे ॥ १ ॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥ २ ॥
जे जैसे करिती ते तैसे पावती । भोग ते भोगिती केले कर्मी ॥ ३ ॥
आशाबद्ध नये करुं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामध्वीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गो-गाय, विकरा-विक्री, कारण-कर्तव्य
अर्थ - स्वतःची मुलगी, गाय किंवा क्या याची विक्री पैसे घेऊन जो करतो तो खरोखरीच नावाने चांडाळच
होय १ माणसाचे गुण काय किंवा अवगुण काय हे त्याच्या ईश्वरनिष्ठेवरून ठरवायचे, जातीशी येथे काही कर्तव्य
नाही जातीवर काही अवलंबून नाही २ जशी कर्मे एखाद्याच्या हातून होतील तशी फळे त्याला प्राप्त होतील व

सार्थ तुकारामगाथा ५९
त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळे भोगावी लागतील इ आशेच्या लोभाने जे लोक करू नये तो कर्म करतात ते
नरकासच जातील असे तुकाराम महाराज म्हणतात ४
१२४ हरिहरा भेद । नाहीं करूं नये वाद ॥ १ ॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ २ ॥
भेदकासी नाड । एक वेलाटीच आड ॥ ३ ॥
उजवे वामांग । तुका म्हणे एकचि अंग ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हरि व हर-विष्णू व शंकर, नाड-अडचण, वामांग-डावे अंग
अर्थ - विष्णू व शंकर एकच असल्याने या विषयी वाद करू नये १ शंकराच्या हृदयात विष्णू व विष्णूच्या
हृदयात शंकर आहे गोडी जशी साखरेसी एकजीव झालेली असते तसे हे ऐक्य असते २ फरक करणाऱ्याला अडचण
फक्त एका वेलांटीचीच दिसून येते ३ पण तुकारामबुवा म्हणतात, डावे अंग काय, उजवे काय, दोन्ही एकच होत ४
विवरण - प्राचीन धर्मग्रंथात व पुराणात अनेक ठिकाणी विष्णू व शिव अथवा हरी व हर यांच्यात अभेद
वर्णन केला आहे शिव व विष्णू हे परस्परांची उपासना करणारे आहेत वैकुंठ चतुर्दशीला शिव विष्णूची पूजा करतात
व शिवरात्रीला मध्यरात्री विष्णू शिवाची पूजा करतात दोन देवतांची नावे वेगळी असली तरी त्यांच्यात भेद नाही
अशीच शिकवण वारकरी संप्रदायाचीही आहे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, विष्णू जगाचे पोषण करतो विश्वाचा
संहार करून शिव दुष्ट शक्तीचा नाश करून मंगल साधणारा आहे या त्रिमूर्तीचे ऐक्य मार्कंडेय पुराणात अध्याय ४६
मध्ये व भागवतात चौथ्या स्कंधात अध्याय ७ श्लोक ५०-५४ मध्ये वर्णन केले आहे ' य शिव सच वै विष्णूर्य्या विष्णू
सच वै शिव ' असे शिव व विष्णू यांचे ऐक्य हरिवंशात वर्णन केले आहे ' शिवस्य हृदय विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिव '
अस म्हटले आहे ' स ब्रह्मा स शिवः सेंद्र सोक्षर परम स्वराट् । स एव विष्णु स प्राण स कालोऽग्नि स चंद्रमा ।
स एव सर्वं यद्भूतं यच्च भव्यं सनातनम् ' असे ऐक्य कैवल्योपनिषदात वर्णन केले आहे असे हे शिव विष्णूचे ऐक्य
प्राचीन कालापासून मानले गेले आहे महाभारतात अनुशासन पर्वात उपमन्यूचे आख्यान आहे त्यात जांबवतीला पुत्र
व्हावा म्हणून श्रीकृष्णान शंकराची आराधना केली व शंकराची सहस्रनामे श्रीकृष्णाने उपदशिली असे कथन आहे
अर्जुनानेही शंकराचीन आराधना करुन पाशुपतास्त्र मिळविल्याची कथा प्रसिद्ध आहे महाभारतात असलेल्या विष्णू
सहस्रनामात 'सर्व शर्व शिव स्थाणू ' व ' स्वयम्भू शम्भुरादित्य ' अशी वर्णने आहेत त्याप्रमाणे शिव व विष्णू या दोन
देवता परस्पर भिन्न असल्या तरी त्यांचे ऐक्य सर्वांनाच मान्य आहे असा भेद कोणीही मानू नये असाच स्पष्ट आदेश
सर्वत्र दिसतो 'शिव थोर विष्णू लहान । हरि विशेष हर गौण । ऐसे म्हणति जे त्यालागून । आणून नरकी घालाव '
अशी एक ओवी शिवलीलामृतात आहे
मराठी संतानी हे हरिहराचे ऐक्य अनेक ठिकाणी आग्रहाने वर्णन केले आहे नावे भिन्न असली तरी ती
एकाच परमेश्वराची रूपे असल्याचा बोध मराठी संतांचा आहे भागवत संप्रदायाचे पहिले उद्गाते श्रीज्ञानदेव यांनी
खर म्हणजे या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घातला पण हे ज्ञानेश्वर स्वतः शिवोपासक अशा नाथ संप्रदायाकडून
प्रेरित झाले होते हे आपणास माहित आहे ' आदिनाथ उमाबीज प्रकटेले ' या अभंगात किंवा 'क्षीरसिंधुपरिसरी ।
शक्तीच्या कर्णकुहरीं ' या ओळीने सुरु होणाऱ्या ज्ञानेश्वरीमधील गुरुपरंपरेच्या ओव्या (अध्याय १८/१७५२ १७६६)
या दृष्टीने पाहण्यासारख्या आहेत एकनाथानी श्रीशिवमाहात्म्य विस्ताराने वर्णन करुन पुन हरिहरैक्य म्हणून
आणखी काही अभंग स्वतंत्र केले आहेत ' एक ध्याती एकमेका । वेगळे अंतर नोहे देखा । ', 'हराचे चिंतन हरीचे
हृदयीं । हरीचे चिंतन हराचे हृदयीं ', 'हरिहरांसी जे करिती भेद । ते भतवादी जाण निषिद्ध । हरिहर एक तेथे नाही
भेद । कासयासि वाद मूड जनों । ' इत्यादी ओळींतून एकनाथानी शिव व विष्णू यांचे ऐक्य चांगल्या रीतीन वर्णन के-
आहे 'शेवे सारिखे सारिखे, शिव आणि विष्णू सखे ' असे तुकोबांनीही म्हटले आहे शिवविष्णूच्या या ऐक्यप्रतिपादना
मागील वारकरी संप्रदयात एकादशीबरोबरच सोमवारचा उपवास करावा असा निर्देश केलेला आहे अभंग क्र ७२
वरील विवरण पाहावे