सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 71, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 71

सार्थ तुकारामगाथा ४५
९५ गेलो वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥ १ ॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ २ ॥
भंगलीया चित्ता । न ये काशानें सांदितां १ ॥ ३ ॥
तुका म्हणे धीर । भंगल्या पाठीं फीर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वीरसरी-वीरश्री, पराक्रम, भंगलिया-मोडून गेलेल्या, काशानें-कशानेही, सांदिता-
सांधिता, जोडता, फीर-बरोबर, उचित.
अर्थ - एकदा का अंगातील वीरश्री नाहीशी झाली, पराक्रम संपला, मग त्यास एखादी सामान्य स्त्री देखील
फजीत करू शकते १ मग मात्र पूर्वी जशी सत्ता होती तशी परत आणता येत नाही. २ एकदा चित्त कोणत्याही
कारणाने भंगले की मग ते कशानेही साधता येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर एकदा का धीर
सुटला की मग त्याची कीव किती करावी ? ४
९६ युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणें दाखविलें ॥ १ ॥
कलियुगामाजीं करावें कीर्तन । तेणें नारायण येईल भेटी ॥ २ ॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । ध्यावें वनांतर भस्म दंड ॥ ३ ॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसतो ते वाव नामाविण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- युक्ताहार-फलमूलादिकाचा जपजाप्य करतानाचा आहार, न लगे-लागत नाही,
आणिक-दुसरी, अल्प-अगदी थोडक्यात, वेव्हार-व्यवहार, व्यवसाय, वाव-व्यर्थ.
अर्थ - जपजाप्याची साधने करताना घ्यावयाचा फलमूलादिकाचा आहार पाळणे, त्याची नीट व्यवस्था
करणे किंवा यासारखी आणखी काही कर्मकाडात्मक साधने करणे याची जरूरी लागत नाही. परमेश्वराने फार
थोडक्यात असा मार्ग दाखविला आहे. १ या कलियुगात कीर्तनभक्ती हाच एक मार्ग सांगितला आहे, या कीर्तना-
मुळेच परमेश्वराची भेट होईल. २ रोजचा व्यवहार अथवा लौकिक आचार सोडण्याचीही जरूरी नाही, वनात
तपस्येसाठी जावयास नको, भस्म धारण करून, हातात दंड घेऊन सन्यासी किंवा वैरागी होण्याची जरूरी नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरप्राप्तीसाठी या कीर्तनाखेरीज आणखी इतर उपाय व्यर्थ आहेत. एक नामस्मरण व
कीर्तन यांनीच देव सतुष्ट होईल. ४
विवरण - वारकरी पंथात नामभक्ती, कीर्तनभक्ती हेच एक ईश्वरप्राप्तीचे साधन सर्वांना अतिशय सुलभ
असे सांगितले आहे. जपजाप्य, योगयाग, ध्यानधारणा, वनातील तपश्चर्या, उपासतपास, यज्ञकर्म, खडतर जागरण
याची काही जरूरी आहे असे नाही 'आता गृहादिक आचर्ये । ते कांहीं न लगे त्यजावे' म्हणून ज्ञानेश्वरीत सांगितले
आहे तुकाराम बुवांनीही 'न लगे सायास जाणे वनांतरा । सुखें घरा येतो नारायण' म्हणून या साधनमार्गांचे महत्त्व
वर्णन केले आहे. रानावनात जाऊन यज्ञयाग वगैरे करण्याची किंवा शरीराला कष्ट देऊन योगसाधन करण्याची
जरूरी या कलियुगात नाही असा निश्चय भागवत सांप्रदायिकांनी केलेला आहे 'क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्त-
चेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते'- अव्यक्ताच्या ठिकाणी चित्त लावून बसणाऱ्यांना क्लेश अधिक
होतात, कारण या उपासनेचा मार्ग कष्टकारक असतो असे भगवद्गीतेतही म्हटले आहे तेव्हा या कष्टाच्या व
त्रासाच्या मार्गाला जाण्याचे कारणच नाही असे साधुसंतांचे सांगणे आहे 'म्हणोनि योगाचिया वाटा । जे निघाले गा
सुभटा । तया दुःखाचाचि वाटा । भागा आला ।' असा स्पष्ट निर्णय ज्ञानदेवानी दिला आहे
या कष्टदायक मार्गापेक्षा नामसंकीर्तनानी भक्ती सर्वांना अतिशय सुलभ व ईश्वराची प्राप्ती करून देणारी
आहे नवविधा भक्तीतही कीर्तनास विशेष प्राधान्य आहे. भागवत संप्रदायात नामदेवापासून सर्वांनी याच कीर्तन-
भक्तीचा प्रसार केला आहे. नामदेव महाराज हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होत. 'सुंभाचा वरदोटा रक्तयाची
१. सांधिता