सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 69, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४३
तुकारामबुवांना असा हा संसाराचा ताप आतून व बाहेरून झालेला होता त्याचे चित्त कासावीस झाले
असून करुणेने द्रवले होते याच करुणपोटी त्यांनी श्रीविठ्ठलाला 'माय पांडुरंगे!' म्हणून हाक मारली तुकोबा
संसारतापाने त्रस्त झाले म्हणून त्यांना विठ्ठलाचे पाय आठविले असे जरी या अभंगात म्हटले असले तरी त्याचा अर्थ
सावधतेने समजावून घ्यावयास हवा संसारताप व दुष्काळ ही वरवरची कारणे प्रभावी दिसतात हे खरे असले तरी
'बहुत सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी' हेही खरे आहे 'पंढरीची वारी आहे माझ्या घरीं' असे त्यांनीच
म्हटले आहे 'माझ्या वडिलांची मिरासी गा देवा' या अभंगात 'वंशपरंपरा दास मी अंकित' म्हणून त्यांनी
स्वतःचा उल्लेख केला आहे तुकारामबुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यांनी देहूस एक विठ्ठलाचे देऊळ बांधले
होतेच तेव्हा या वंशात जी भूमी पहिल्यापासूनच तयार होत होती तीमध्ये वैराग्याचे व प्रतिकूल परिस्थितीचे बीज
पडले व देहूच्या भूमीत इंद्रायणीकाठी जे 'परब्रह्म मुहाडले' ते तुकारामबुवांच्या रूपाने साकारले
९२ भक्तऋणी देव बोलतीं पुराणे । निर्धार वचनें साच करीं ॥ १ ॥
मागें काय जाणे अडकिली वार्त्ता । कबीर सातें जातां घडिया घाटीं ॥ २ ॥
माझारिया धन आणिले घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥ ३ ॥
नामदेवाचिया घरासि आणिले । तेणे लुटविले द्विजा हातीं ॥ ४ ॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हे प्रमाण । व्यकोवाचे ऋण फेडियेले ॥ ५ ॥
बीज दळोनिया केली आराधना । लागे नारायणा पेरणे तें ॥ ६ ॥
तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तोचि एक ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - भक्तऋणी-भक्ताच्या ऋणात असणारा, कबीर-उत्तर हिंदुस्तानातील पंधराव्या शत
कातील प्रसिद्ध साधु कवी, सातें जाता-बाजारात जाताना, घडिया-विणल्या वस्त्रांच्या घडया, नामदेव-ज्ञानेश्वरांच्या
समकालीन प्रसिद्ध भगवद्भक्त व संतकवी (१२७०-१३५०, ) व्यकोवा-एकोबा म्हणजे एकनाथ अशा पाठामुळे
अर्थ स्पष्ट होतो
अर्थ - पुराणे असे सांगतात की देव, हा भक्ताच्या ऋणात पक्त आहे देवा, ही वचने खरी करून दाखवाल
ना ? १ मागें काय घडले पुणाल माहित ? पण असे ऐकतो खरे की कबीर नावाच्या एका भक्ताने बाजारास कापड
विकावयास जाताना गरीबाना ती वस्त्रे वाटून टाकली २ मग घरी येऊन पाहतो ते देवाने त्या सर्व वस्त्राची
किंमत आणून दिली आहे पण कबीराने ती घेतली नाही ३ नामदेवानी असेच केले त्यानीही असेच कापड वाटून
टाकले व मग देवाने त्या पैशाची व्यवस्था करून सर्व किंमत घरी आणून दिली, पण नामदेवानीही ती घेतली नाही,
ब्राह्मणाना ते धन वाटून टाकले ४ इतके कशास हवे ? प्रत्यक्षास प्रमाण नकोच एकनाथाचेही असेच ऋण
देवाने फेडले ५ दुसऱ्या एका प्रसंगी पेरावयाचे बी दळन घरी आलेल्या संताच्या भोजनाची व्यवस्था एका संताने
केली तेव्हा त्याच्या शेतात पेरणी करायचे कामही देवाला करावे लागले ६ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर
आपल्या भक्ताची एवढी काळजी घेतो पण यावर ज्याचा विश्वासच नाही तो खरोखर जन्माला येऊन फसलाच
म्हणावया ७
विवरण - देव हा भक्ताच्या ऋणात सुखावतो व तो आपल्या एकनिष्ठ भक्ताचे काही कमी पडू देत
नाही, हा संतवाङ्मयात व चरित्रात वारंवार येणारा विचार तुकाराम महाराजांनी काही पूर्वीची उदाहरणे देऊन
व्यक्त केला आहे कबीर, नामदेव व व्यकोवा किंवा एकोबा याची त्याना माहित असलेली हकीकत सांगितली आहे
या प्रत्येकाच्या जीवितातील ऐतिहासिक प्रसंगाचा शोध घेणे कठिण काम आहे कबीर हा उत्तर हिंदुस्थानातील
एक थोर संत पुरुष ज्ञानेश्वरांच्यावरच्या काळात होऊन गेला योगसंप्रदाय वैष्णवपंथ, सूफीसंप्रदाय याचे चमत्कारिक
मिश्रण त्याच्या शिकवणुकीत दिसून येते काही तुकारामाप्रमाणेच फटकळपणे बोलून समाजातील ढोंगे दूर करणारा
होता याचा वस्त्रे विणण्याचा धंदा होता ईश्वराच नामस्मरण करीत तो आपल्या उद्योगात रमून जाई नामदेव
१ खरी, २ एकोबाच