सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 83, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 83

सार्थ तुकारामगाथा ५५
तुकाराम महाराजांना पंढरपूरबद्दल अपार प्रीती वाटावी यात नवल काय ? ते तर त्यांच्या जिव्हाारीचे
गूज होते ‘जाप जाप तू पंढरी । होय होय वारकरी’, ‘जा रे'तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनाचा’, ‘पंढरीसी
जावे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ।’, ‘आमुची मिरास पंढरी । आमुचे घर भीमातीरीं’, ‘पावलो
पंढरीं वैकुंठ भुवन । धन्य आजि दीन सोनियाचा’, ‘पंढरीये माझें माहेर साजणी । ओवीये काडणीं गाऊ गीत’,
‘धन्य पुंडलिक बहु बरे केले । निधान आणले पंढरीये’, ‘धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणिषेले सार पुंडलीके’,
‘धन्य धन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षयपुरी’, ‘धन्य झालो हो संसारी । आम्ही देखिली पंढरी’, ‘पंढरीची वारी
जयाचिये घरीं । पाय-धुळी शिरीं वंदिन त्याची’ इत्यादि शेकडो वचनांतून तुकाराम महाराजांनी पंढरीमाहात्म्य
तन्मयतेने वर्णन केले आहे
असा हा पंढरपूरचा ध्यास मराठीतील सर्व साधुसंतांना दिसून येतो त्यांना दुसरे तीर्थ नको, क्षेत्र नको,
भारी दुःखे एका पंढरीच्या दर्शनाने नाहीशी होतात म्हणून तर आषाढीकार्तिकीस लाखो लोक पंढरपुरास जाऊन
विसावतात माहेरी आल्याचे सुख त्यांना याच पंढरपूरक्षेत्रात मिळते
११४ तीर्थों धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥ १ ॥
मिळालिया सतसंग । समर्पितां भले अंग ॥ २ ॥
तीर्थों भाव फळे । येथे आनाड ते वळे ॥ ३ ॥
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – रोकडा-प्रत्यक्ष, भले अंग-आपले सर्वस्व, आनाड-अडाणी मनुष्य
अर्थ – कोणत्याही तीर्थस्थानात जा, तेथे धोंडा व पाणी यांचाच सुकाळ दिसेल मनात भाव नसेल तर
तीर्थात दुसरे काय दिसणार ? खरोखर देव पाहावयाचा असेल तर तो साधुसंताच्या रूपातच पाहावा १ सतसंगती
प्राप्त होताच आपण आपले सर्वस्व त्यांना अर्पण करावे म्हणजे देवत्वाची खूण पटते २ तीर्थस्थानावर गेल्यावर
मनात शुद्ध भाव व भक्ती असेल तरच त्याचा उपयोग होतो, पण सतसंगतीत अडाणी मनुष्य असला तरीही त्याचा
उद्धार होऊ शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, माणसाचे त्रिविध ताप नाहीसे झाले की तो निष्पाप झाला असे
समजते ४
११५ घेऊनिया चक्र गदा । हाच धंदा करी तो ॥ १ ॥
भक्ता राखे पायांपाशीं । दुर्जनासी संहारी ॥ २ ॥
अव्यक्त ते आकारले । रूपा आले गुणवंत ॥ ३ ॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – चक्र-शत्रूचा नाश करणारे सुदर्शन चक्र
अर्थ – हा विठ्ठल हातात गदाचक्र घेऊन हाच उद्योग करतो १ दुर्जनाचा, वाईट लोकाचा संहार करून
आपल्या भक्ताचे रक्षण करणे हेच याचे काम असते २ याच कामासाठी अव्यक्त परब्रह्म आकारास आले, नाना
गुणांनी सांकृत झाले ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल ज्याची त्याची इच्छा पूर्ण करतो ४
विवरण – दुर्जनाच्या नाशासाठी व साधुसज्जनाच्या रक्षणासाठीच परमेश्वराचा अवतार असतो हे गीतेने
'परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम्' या श्लोकार्धात प्रकट केलेले आहे अधर्माचे प्राबल्य माजले की भगवंतास
धर्मसंस्थापनेसाठी अवतार धारण करावा लागतो अशा प्रकारे अवतार घेऊन परमेश्वर भक्ताचे रक्षण धोने करतो
यासबंधी ज्ञानेश्वरांनी फार चांगले व समर्पक असे वर्णन केले आहे ‘दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूचा मानु मियसीं ।
धर्मार्ती नीतीशीं । शंख भरीं ॥ मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळी । तं योगिया पाहे दिवाळी ।
निरंतर ॥' ढाल, चक्र, गदा, पण ही परमेश्वराची आयुधे या एका उद्योगासाठी असतात दुष्टाचा नाश, सज्जनाचे
रक्षण व धर्मसस्थापना ही काम ईश्वरास अवतार घेऊन करावी लागतात